Menu

Study Circle

परीक्षार्थीस वारंवार भेडसावणारे मुलभूत प्रश्न 

 1)    युपीएससी म्हणजे काय? 
 2)    युपीएससी परीक्षा स्पर्धात्मक असते म्हणजे नेमके काय? युपीएससी परीक्षेचे स्वरूप व तिचे वैशिष्ट्ये कोणती ?
 3)    आयएएस-आयपीएस होण्यासाठी किती गुण आवश्यक असतात?
 4)    आयएएस-आयपीएस परीक्षेत मराठी उमेदवारांची अलीकडची कामगिरी कशी आहे?
 5)    डेप्युटी कलेक्टर-डीवायएसपी/एसीपी होण्यासाठी किती गुण आवश्यक असतात?
 6)    प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी कोणत्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व आवश्यक असते? UPSC आयोगाद्वारे अधिकारी होऊ पाहणार्‍या  उमेदवारांच्या कोणत्या पैलूवर भर दिला जातो?
 7)     UPSC च्या उमेदवाराकडून काय अपेक्षा असतात? या परीक्षेत यश मिळवण्यासाठी असामान्य बुद्धिमत्ता आवश्यक असते का? 
 8)     युपीएससी  परीक्षेतील यशाचा सर्वात मोठा निर्धारक घटक कोणता?
 9)     ग्रामीण भागातील विद्यार्थी यात यश प्राप्त करू शकतात का? 
 10)    या परीक्षांसाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व अत्यावश्यक असते का? 
 11)    UPSC स्पर्धा परीक्षेत अपयश का येते?
 12)    युपीएससी परीक्षेद्वारा कोणकोणती पदे भरली जातात?
 13)    नागरी सेवा-राज्यसेवा परीक्षेत किती व कोणते टप्पे असतात? 
 14)    या परीक्षांची तयारी केव्हापासून केली पाहिजे? 
 15)    या परीक्षेतील आरक्षण कशाप्रकारचे आहे?
 16)    नागरी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यामागे UPSC ची भूमिका कोणती आहे ?
 17)    प्रशासकीय कल चाचणी म्हणजे काय ? 
 18)    युपीएससी कलचाचणीत कोणती कौशल्ये तपासतात ?
 19)    ‘कल चाचणी‘ खरंच अवघड परीक्षा आहे का ?
 20)    UPSC-MPSC च्या पूर्वपरीक्षेत फरक आहे का? दोन्हीपैकी कोणती परीक्षा अवघड आहे?
 21)    या परीक्षांसाठी कोणता अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे? 
 22)    UPSC-MPSC परीक्षांची एकत्रित तयारी करता येऊ शकते का?
 23)    UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्याचे मानक किती असते?
 24)    UPSC  मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम कसा आहे?
 25)    UPSC मुख्य परीक्षांची तयारी करताना कशावर भर द्यावा?
 26)    अलीकडे UPSC  मुख्य परीक्षेच्या तयारीत कोणता बदल करावा?
 27)    UPSC च्या मुलाखतीत कमाल व किमान किती गुण मिळू शकतात?
 28)    नोकरी करता करता या परीक्षेच्या अभ्यास व वेळेचे नियोजन कसे करायचे? 
 29)    या परीक्षांसाठी कोणते संदर्भसाहित्य वाचावे ?
 30)    UPSC परीक्षेत मराठी उमेदवार सर्वप्रथम येऊ शकतो का?

 1)     युपीएससी म्हणजे काय? 
       
युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (संघ लोकसेवा आयोग). नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक सक्षम उमेदवारांची निवड करणारी स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा म्हणजे नागरी सेवा परीक्षा होय. ही अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देशाच्या विविध सेवांमध्ये म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा यांसारख्या सुमारे 36 सेवांची दालने तरुणांसाठी खुली होऊ शकतात. प्रशासनातील सनदी सेवा पदांची निवड करण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी किमान 16 प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन केले जाते. ‘आयएएस’ची परीक्षा म्हणजे महत्त्वाकांक्षी व हुशार विद्यार्थ्यांना विविध कार्यक्षेत्राची दालने उघडणारे महाद्वार आहे. 
वेबसाइट - www.upsc.gov.in
          देशाच्या कारभाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बनलेल्या प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारच भरती केले जावेत, त्यात कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी, अथवा अन्य गैरप्रकार होऊ नयेत यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवापदांच्या भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी युपीएससी  या घटनात्मक संस्थेकडे सोपवली गेली आहे.
          केंद्रपातळीवर संघ लोकसेवा आयोग आणि राज्यपातळीवर राज्य लोकसेवा आयोग  प्रशासनातील सनदी सेवांच्या भरतीसाठी दरवर्षी स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून त्यातील पात्र उमेदवारांची यादी शासनाला सादर करतात. 
          प्रशासकीय पदांसाठी आवश्यक पात्रता निर्धारित करणे, उमेदवाराकडून अर्ज मागवून लेखी व तोंडी परीक्षेद्वारे योग्य उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी या आयोगावर असते. ही निवड, गुणवत्तेखेरीज अन्य कोणत्याही निकषांद्वारे होऊ नये, घराणेशाही, वशिलेबाजी व अपात्रतांच्या सेवा प्रवेशाला आळा बसावा हा हेतू या आयोगाच्या निर्मितीमागे आहे.  प्रशासकीय अधिकारी पदांची कार्ये व जबाबदारी लक्षात घेऊन त्यांना पर्याप्त वेतन, सेवासुविधा यांची तरतूद आहे, त्यांना भरीव प्रमाणात सत्ता प्रदान केली आहे. परिणामी प्रशासक एका बाजूला लोकप्रतिनिधींना कायदे व धोरणनिर्मितीत सल्ला देण्याचे, तर दुसर्‍या बाजूला राज्यकर्त्यांनी केलेल्या कायदे-धोरणांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडतात.
        भारतात ब्रिटिशांची राजवट सुरू होऊन ती प्रस्थापित झाल्यानंतर त्यांना राज्य कारभारासाठी कारकून-कर्मचार्‍यांची गरज लागू लागली. त्याचप्रमाणे प्रशासनासाठी बुद्धिमान वरिष्ठ अधिकार्‍यांची म्हणजे नोकरशहांचीही गरज भासू लागली. त्यामुळे ब्रिटिशांनी कारकून आणि नोकरशहा निर्माण करण्यासाठी त्यांना सोयीस्कर अशी शिक्षणपद्धतीही आणली, ती भारतात रूढ केली. या शिक्षण पद्धतीतून ब्रिटिशांना हवे असलेले कारकुनांचे जथ्ये निर्माण झाले. मग ब्रिटिशांनी वरिष्ठ नोकरशहा तयार करण्यासाठी इंग्लंडमधील धर्तीवर येथे ‘आयसीएस’ म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षा सुरू केल्या. त्या काळात या परीक्षा व त्या उत्तीर्ण होणार्‍या तरुणांना मिळणार्‍या उच्च पदांवरील नोकर्‍या हे त्या काळच्या पदवीधर तरुणांना मोठेच आव्हान व आकर्षण होते. त्या काळात कुणी ‘आयसीएस’ झाला की, त्याचे व त्याच्या कुटुंबाचे हात गगनाला पोहोचत.               ‘आयसीएस’मध्ये चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नंतर परदेशात आझाद हिंद सेना स्थापून ब्रिटिशांना आव्हान दिले.
           ब्रिटिश गेले तरी स्वतंत्र व विकसनशील भारताला कार्यक्षम प्रशासनाची जरुरी होती. त्यामुळे ब्रिटिशांनी सुरू केलेली शिक्षण पद्धती व प्रशासन पद्धती चालू राहणे क्रमप्राप्त होते व ती चालू राहिली. स्वतंत्र भारताला प्रशासनासाठी बुद्धिमान, कार्यक्षम व तडफदार अधिकार्‍यांची गरज होती व त्यासाठी ब्रिटिशनिर्मित ‘आयसीएस’ऐवजी स्वतंत्र भारतात इंडियन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस म्हणजे ‘आयएएस’ सुरू करण्यात आली व भारतात एक नवे पर्व सुरू झाले. महत्त्वाकांक्षी व सरकारी नोकरीत उच्च पदावर जाऊ इच्छिणार्‍या तरुणांना ‘आयएएस’चे आकर्षण वाटते. स्वतंत्र भारतात काही वर्षानंतर भाषिक राज्ये स्थापन झाली व त्या-त्या भाषेची जनता अभिव्यक्ती व प्रशासकीय बाबींसाठी आपल्या मातृभाषेचा वापर अधिकाधिक करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा करू लागली. त्यामुळे राज्यांच्याच नव्हे तर केंद्र सरकारच्या परीक्षाही प्रांतीय भाषिकांना आपल्या भाषेतून देण्याची संधी मिळावी, अशी व्यवस्था झाली. 

 2)     युपीएससी परीक्षा स्पर्धात्मक असते म्हणजे नेमके काय? 
         युपीएससी परीक्षेचे स्वरूप व तिचे वैशिष्ट्ये कोणती ? 

         युपीएससीद्वारे वर्षाला किमान 16 परीक्षा घेतल्या जातात, तर एमपीएससीद्वारे गेल्या काही वर्षापासून वर्षाला 20 ते 30 परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा विविध अधिकारी पदांच्या भरतीसाठी असतात. यातील महत्त्वाच्या परीक्षा या एकाच टप्प्यात न घेता त्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यावर घेतल्या जातात. काही परीक्षांमध्ये  शारीरिक चाचणीचा टप्पा असतो. युपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षासाठी 2015 मध्ये सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांनी देशभरातून अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे 12 हजार जणांची मुख्य परीक्षेसाठी निवड होते. साधारणपणे 3000 जणांची मुलाखतीसाठी आणि 1000 जणांची अंतिम टप्प्यात निवड केली जाते. थोडक्यात या परीक्षेचा निकाल हा 0.2 टक्के इतका कमी असतो. म्हणजेच 1 हजार जणांतून दोघाजणांची निवड होते. 
         
                                    UPSC  परीक्षेबाबत आकडेवारी

 तपशील2014 2013
1) अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या   9.40 लाख7.70 लाख
2) पूर्व परीक्षेस बसलेले उमेदवार4.50 लाख3.20 लाख
3) मुख्य परीक्षेत पात्र उमेदवार17,00014,959
4) मुलाखतीसाठी पात्र उमेदवार3,3083,083
5) अंतिम निवड (नेमणुकीसाठी)1,2361,222

 3)    आयएएस-आयपीएस होण्यासाठी किती गुण आवश्यक असतात?
        आयएएस-आयपीएस होण्यासाठीची गुणवत्ता ही उमेदवाराचा संवर्ग, रिक्त जागांची संख्या, उमेदवाराचा पसंतीक्रम यावर अवलंबून असते. संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा-2014 ही 1750 गुणांसाठी होती, तर मुलाखत 275 गुणांसाठी होती. अंतिम निकालात एकूण 2025 गुणापैकी 1082 गुण (53 टक्के) मिळवून इरा सिंघल ही महिला उमेदवार देशात सर्वप्रथम आली, तर शेवटच्या उमेदवारास 713 म्हणजे 35 टक्के गुण होते. 
                        युपीएससी परीक्षेचे मानक (अंतिम निवड)

संवर्ग  20132014
1) जनरल775 (37.98%)889 (43.90%)
2) ओबीसी 742 (36.36%) 844 (41.67%)
3) एससी719 (35.23%)830 (40.98%)
4) एसटी707 (34.64 %)811 (40.04%)
5) पीएच-1725 (35.53%)816 (40.29%)
6) पीएच-2 718 (35.18%)778 (38.41%)
7) पीएच-3613 (30.04%)713 (35.20%)

 4)  आयएएस-आयपीएस परीक्षेत मराठी उमेदवारांची अलीकडची कामगिरी कशी आहे?
         2014 च्या निकालात 1236 यशस्वी उमेदवारामध्ये महाराष्ट्रातील 86 जण होते. 2013 च्या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी खूपच चांगले यश मिळविलेले होते. 1222 उमेदवारांमध्ये 93 महाराष्ट्रीयन उमेदवारांची निवड झाली होती. 

 5)     प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी कोणत्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व आवश्यक असते? 
         UPSC आयोगाद्वारे अधिकारी होऊ पाहणार्‍या उमेदवारांच्या कोणत्या पैलूवर भर दिला जातो?
शासनातील अधिकारी समाजाच्या हितासाठी कार्यरत असताना त्यांच्याकडील नीतिमत्ता, कार्यक्षमता, संवादकौशल्य, तर्कक्षमता, विश्‍लेषण क्षमता, निर्णयशक्ती - इत्यादी कौशल्ये व सद्गुण महत्त्वाचे असतात. या कौशल्यामुळे उमेदवार प्रशासकीय व्यवस्थेवर स्वतः विश्‍वास ठेवतातच, पण जनतेलासुद्धा शासनाच्या धोरणावर आणि योजनांत सहभागी करून घेताना त्यांचा विश्‍वास आणि पाठिंबा मिळवितात. अलीकडच्या वाढत्या भ्रष्टाचाराच्या युगात उमेदवाराचा प्रामाणिकपणा, माणुसकी, शुद्ध चारित्र्य आणि सामाजिक बांधीलकी हे गुण महत्त्वाचे आहेत. परिणामी उमेदवार हा कर्तव्यदक्ष, साध्या वृत्तीचा व संतुलित विचार करणारा असावा लागतो. थोडक्यात, प्रशासक म्हणून कार्यरत असताना उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित जे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत त्याचे परीक्षण करण्यासाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आलेला आहे.

 6)     UPSC च्या उमेदवाराकडून काय अपेक्षा असतात?  
          या परीक्षेत यश मिळवण्यासाठी असामान्य बुद्धिमत्ता आवश्यक असते का? 
UPSC परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमामध्ये आयोगाला उमेदवाराकडून काय अपेक्षित आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्यात सुरुवातीलाच लिहिलेले आहे की,
 1) The candidate would be expected to be aware with the events and happenings around them.
 2) उमेदवाराला सदर परीक्षेत गुण देताना आयोग कशाला प्राधान्य देते तेही नमूद केले आहे -  "the candidate would be awarded marks for the clarity of  thought and brevity of expression apart from several other virtues like economy of words, precise expressions, clarity of concepts etc."  
 3)     या परीक्षेत विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांच्या उत्तरातून, समाजाला भेडसावणार्‍या विविध समस्यांबाबत उमेदवाराची वैयक्तिक मते तपासून पाहिली जातात. उमेदवाराची मते खरेच सकारात्मक आहेत का, समतोल आहेत का, उपयुक्त आहेत का आणि मुख्य म्हणजे ती त्याची स्वतःची आहेत की दुसर्‍या कोणाच्या प्रभावामुळे विकसित झाली आहेत, तो एखाद्या विचारसरणीच्या आहारी गेला आहे का, एखाद्या घटनेचा सर्व दृष्टिकोनातून सारासार विचार करून त्याला सुवर्णमध्य काढता येतो का, हे सर्व काटेकोरपणे तपासले जाते. 
           स्पर्धा परीक्षेतील यश, ही सापेक्ष संकल्पना आहे. तिचे संदर्भ  हे व्यक्ती, स्थळ व कालपरत्वे नेहमीच बदलत असतात. या परीक्षेद्वारे निवडले जाणारे उमेदवार हे फक्त एखादी नोकरी करण्यासाठी निवडले जात नाहीत, तर आपला देश, समाज आणि त्याच्याशी संबंधित असणार्‍या सर्व क्षेत्राचा विकास करण्यासाठी जे सक्षम कार्यकर्ते लागतात, त्यासाठी निवडले जातात. थोडक्यात, UPSC परीक्षा फक्त नोकरी मिळविण्याची परीक्षा नसून, ती एखाद्या उमेदवारास प्रशासकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी द्यावी लागणारी पात्रता परीक्षा आहे. त्यामुळेच येथे उमेदवाराच्या ज्ञानापेक्षा त्याची आकलनक्षमता तपासली जाते. परिणामी निवड प्रक्रियेत अधिकारी होण्यासाठी एखाद्या उमेदवाराकडे असलेली फक्त प्रबळ इच्छाशक्ती इथे महत्त्वाची नसून, अधिकारी होण्यासाठी लागणार्‍या व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्याच्यामध्ये किती प्रगल्भपणे विकसित झाले आहेत आणि त्यानुसार त्याग, कष्ट, परिश्रम करून स्वतःला शिस्त लावण्याची त्याची तयारी किती आहे, हे महत्त्वाचे ठरते. 
          स्पर्धा परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपरमध्ये कशाचा समावेश असावा, याबाबत 1970 च्या दशकात कोठारी समितीच्या शिफारशींचा युपीएससीने विचार केला होता. त्यावेळी त्याचे अनुकरण एमपीएससीने केले होते. त्या अहवालातील नोंदीनुसार - ‘‘ज्या विद्यार्थ्याला नागरी सेवेत प्रवेश करावयाचा आहे त्याच्याकडे पुढील प्रकारचे कौशल्य असावे- 
 1)     विविध क्षेत्रातील घटनांची त्याला आवड असावी.
 2)     त्याच्यासभोवती घडणार्‍या घटनांबाबत तो जागरूक असावा.
 3)     त्याच्याकडे भारत देश आणि देशातील जनता याबाबत पुरेशी माहिती असावी.

 UPSC preparation is actually an experience to be lived and remembered for good reasons. One should enjoy it. Read carefully why UPSC conducts  Examination &  personality test. In its own words....
 1.     Questions will be asked on matters of general interest.
 2.     The object of the exam. is to assess the personal suitability of the candidate for  a career in public service by expert group of competent and unbiased examiners.
 *    The exam. is intended to judge the mental calibre  of a candidate. 
 *    This is really an assessment of not only his/her intellectual qualities but also social traits and  his/her interest in current affairs. 
 3.    Some of the qualities to be judged are mental alertness, critical powers of assimilation,  clear and logical exposition, balance of judgement, variety and depth of interest, ability for social cohesion and leadership,  intellectual and moral integrity.
 4.     The technique of the exam. is that of a natural, directed and purposive assessment, intended to reveal the mental qualities of the candidate.
 5.     Exam. is intended to be a test  of the specialised or general knowledge of the candidates.

UPSC tries to assess personality of the candidate by asking  general questions, intended to test the various traits. There are 10 important things you must follow -
 1)    Personal suitability of the candidate for  a career in public service
 2)    Mental alertness - judge the mental calibre  of a candidate. 
 3)    Critical power of assimilation
4)    Clear and logical exposition
5)    Balance of judgement
6)    Variety and depth of interest
7)    Ability for social cohesion and leadership
8)    Intellectual and moral integrity
9)    Assessment of specialised or general knowledge of the candidate.
10)    Interest in current events

 1) Personal suitability of the candidate for  a career in public service - 
         At each & every stage of exam.,UPSC tries to find out candidate's personality and  his/her suitability to the job.  Hence it is duty of candidate, let them know that he/she is most suitable candidate. It should be done in organised manner a with a grate discipline also one should do it humbly but assertively, in a simple manner but confidently and honestly.

 2) Mental alertness - 
         UPSC selects an officer after judging mental calibre of  the candidate. The questions asked at all levels are designed to find out alertness, awareness, attitude & aptitude of the candidate. Here alertness is intrinsic, awareness is extrinsic. One should remember attitude is related to candidate's willingness to undergo training successfully and effectively. Also aptitude is a Capacity of candidate to perform a given task to achieve a specific target in given time frame, with available resources.

 3) Critical power of assimilation - 
         Assimilation is an ability to understand things fully or completely.  If candidate is mentally alert, he will be better placed to assimilate the questions asked and then generate an honest and thoughtful respons/answer.
Usually confusing &  lengthy questions are  asked  to check  his/her ability to assimilate certain things, through answers. While reading newspapers, reports or textbooks, or while listening to news, one should cultivate this habit of assimilation. It is a means for sensitization towards the society.
         To display this trait, one should first completely read the question carefully. Never ever try to answer  before understanding the question  fully.  If you incorrectly comprehend a question, chances are more that you you will get negative marks.

 4) Clear and logical exposition -
      Critical power of assimilation naturally brings out the trait of clear and logical exposition. One can clearly answer only if one knows the demand of the question.
      Clear exposition or description of certain thought or an idea, requires clear understanding of not only the demand of question, but also a character that is honest and simple. Only honesty can bring out clear and logical answer from you.
Many  of  time Candidates try to impress  examiner with depth and grasp over issues. Avoid this unless the question specifically demands it. This exam is not about impressing the examiner, but about reflection of your true personality.
      While answering it is very important to be straight to the point. Beating around the bush exhibits your superficial knowledge.
       It is better not to write the answer than trying to cook up an answer in an attempt to impress the examiner, or trying in vain to answer every question assuming each question carries certain weightage.

 5) Balance of judgement - 
       Once you start answering, it should be unbiased and shouldn’t be judgmental. In Mains exam., ability to analyze many issues without bias is always checked. 
       Lot of confidence comes from an understanding of the demand of the question. Portray yourself as an individual fit to become a bureaucrat; and half of the battle is won.
       While answering one should try to link various issues and analyze them critically. A biased view always reflects shallowness. Instead, answer should have depth of an understanding of various issues, especially current events.
Just reading is not sufficient to pass this exam.  Don’t think that you can read everything and then just go there and answer all the questions. 
        Many ideas can be refined through intelligent conversations. 
        Be habitual to revise all important current events, form unbiased opinion on each one of them and try to express them in a group or in front of your friends.Talking to many people brings variety into your answer to your personality as well. One should talk more with more people. Try to teach students; try to address a group; if you are stubbornly introvert, then talk to mirror at least.

 6) Variety and depth of interest -
        Bureaucrat is expected to find solution to all the problems which he/she faces during his/her carrer at various levels. For that matter he/she, needs to be master of none, but jack of all trades. In short, he/she should know at least something about everything & not everything about something.  So he/she needs to acquire certain productive skills of rationalised analysis.
       To find such traits UPSC concentrates to find out candidate's depth & variety of interest,  related to the following issues -
 a)    special subjects of academic study 
 b)     the events which are happening around both within and outside  their own state or country 
 c)    modern currents of thought 
 d)    new discoveries which should rouse the curiosity  of well educated youth
       Candidates are expected to have taken an intelligent interest not only in  their special subjects of academic study but also in the events which are happening around them both within and outside their own state or country as well as in modern currents of thought and in new discoveries which should rouse the curiosity  of well educated youth.

 7) Ability for social cohesion and leadership -
       Most important part of the exam. is testing the candidates ability for social cohesion and leadership.
This is done through asking questions that demand an opinion from a candidate on various socio-economic issues.  So, be thorough with issues related to education, health, weaker sections, etc.
      Candidates answers must reflect his/her concern. This concern will be reflected only if  answer is derived from own experiences instead of reproducing facts from the books. Try to answer from experiences. If one really cares about society, examples come on their own.
      UPSC likes you if your answers are genuine and borne out of your own experiences.
You might have visited schools, you might have know about bad teachers, traveled on bad roads, visited worst hospitals, or worst doctors, or might have been  a victim of police highhandedness, or seen for yourself police brutality against innocent people – quote these in your answers. 

 8) Intellectual and moral integrity - 
      Throughout the exam, most common trait that is being tested by UPSC is candidate's intellectual and moral integrity. Every answer written by candidate carries an hint about this. Integrity is so crucial that whole process of preparation depends on it.

 9) Assessment of specialised or general knowledge of the candidate -
       Questions are designed in such a manner, that they will test Candidate's optimacy in Specialised or General Knowledge related to following qualities-
 a)  intellectual qualities (IQ)
 b)  social traits  (SQ)
 c)  Thought process (TQ)
 d)  emotional stability (EQ)
      Here optimum knowledge means the information sufficient & assential to solve a particular Q.

 10) Interest in current events -
          Interest in current events is amply checked in the prelims, Mains & interview.  Here UPSC checks consistency and depth of interest.  Never give up reading newspapers. As this exam is an year long process, you must read newspapers every day.

 7)      युपीएससी परीक्षेतील यशाचा सर्वात मोठा निर्धारक घटक कोणता?
          सदर परीक्षा ही एखाद्या उमेदवाराच्या आकलन आणि दृष्टिकोनाची चाचणी आहे. त्यामुळे आयोगास अपेक्षित असे ’’योग्य दृष्टिकोन असलेले योग्य व्यक्तिमत्त्व’’ माझ्याकडे आहे, हे दाखविण्याची कसून तयारी करणे हाच, या परीक्षेतील यशाचा सर्वात मोठा निर्धारक घटक आहे. 
          या चाचणीद्वारे सनदी अधिकार्‍यासाठी आवश्यक अशी पुढील कौशल्ये तपासली जातात - 1) वाचन कौशल्य, 2) अंकगणितीय कौशल्य, 3) संवाद कौशल्य, 4) अंतरव्यक्ती कौशल्य, 5) निर्णयक्षमता, 6) लेखी अभिव्यक्ती, 7) तर्कक्षमता/विश्‍लेषणक्षमता, 8) वैज्ञानिक दृष्टिकोन, 9) संतुलित विचारसरणी, 10) विनयशीलता व कार्यक्षमता. पूर्वपरीक्षेतील ’अंकगणितीय कौशल्ये आणि इंग्रजी भाषेचे आकलन’ या विषयातील प्रश्‍न हे दहावीच्या दर्जाचे असतात. ’कॅट’ अथवा ’जीआरई’सारख्या परीक्षांप्रमाणे क्लिष्ट स्वरूपाची गणिते, त्यातील सूत्रे अशा गुंतागुंतीच्या बाबींचा यात समावेश नाही. त्यामुळे अशी पार्श्‍वभूमी नसणार्‍या विद्यार्थ्यांना दहावीच्या पातळीवरील अंकगणित व इंग्रजीच्या आकलनाची मूलभूत क्षमता विकसित करावी लागते.

 8)     ग्रामीण भागातील विद्यार्थी यात यश प्राप्त करू शकतात का? 
         ग्रामीण भागात चांगल्या प्रशासकीय अधिकार्‍याबाबत विद्यार्थ्यामध्ये आकर्षण असते. प्रशासकीय अधिकारी किती चांगल्याप्रकारे लोकांच्या समस्या सोडवू शकतो हे ग्रामीण उमेदवारांनी खूप जवळून पाहिलेले असते. त्यामुळे या क्षेत्रातील संधी आणि मानमरातब यांच्याकडे हे विद्यार्थी आकर्षक होतात आणि परीक्षेची चांगल्याप्रकारे तयारी करून यशस्वी होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या 15 वर्षापासून युपीएससी व एमपीएससीच्या परीक्षेमध्ये ग्रामीण, निमशहरी आणि छोट्या शहरातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षाबाबत बरीच जागृती झाली आहे. तरीही माहितीचा अभाव, अभ्यासातील सातत्य नसणे, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, मराठीतून अभ्यास साहित्य उपलब्ध नसणे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी बराच उशीर लागतो. तसेच स्पर्धा परीक्षेतील करिअर संधीबाबत ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांना या क्षेत्राची ङ्गारशी माहिती नसते किंवा असली तर तो बरीच उशिराने त्रोटक व चुकीच्या स्वरूपाची असते. अधिकृत माहितीच्या अभावी या परीक्षांविषयी पालक व विद्यार्थीवर्गात निरनिराळे गैरसमज पसरतात. परिणामी बरेच विद्यार्थीक्षमता असतानादेखील या क्षेत्राकडे पाठ फिरवतात. अनेक विद्यार्थ्यांना बर्‍याच उशिरा म्हणजे पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर या क्षेत्राची माहिती प्राप्त होते. त्यामुळे असे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत (ज्यांनी पूर्वीपासून या परीक्षांची तयारी केलेली असते) मागे राहतात. 

 9) या परीक्षांसाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व अत्यावश्यक असते का? 
         युपीएससी  परीक्षा मराठी माध्यमातून देता येतात. युपीएससीची मुलाखत ही मराठी माध्यमातून देता येत असल्याने इंग्रजी भाषेचे जुजबी ज्ञान असल्यास उमेदवाराला आयएएस होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 
         2014 मध्ये केंद्र सरकारने पूर्वपरीक्षेच्या पेपर-2 मधील इंग्रजी भाषेच्या आकलनावरील प्रश्‍न पात्रतेसाठी विचारात न घेण्याचे जाहीर केले. तसे पाहिले तर 2011 पासून युपीएससीच्या पूर्वपरीक्षेत तर 2013 पासून एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत इंग्रजी भाषा आकलनासाठी 2 ते 3 उतारे देऊन त्यावर 8 ते 10 प्रश्‍न विचारले जातात आणि त्यासाठी एकूण 200 गुणांमध्ये 20 ते 25 गुण असतात. हे प्रश्‍न 10 वी च्या दर्जाचे असतात. त्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही या एका कारणावरून पूर्व परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याची शक्यता फारच कमी असते. 
        युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये पात्रता विषयामध्ये 2 भाषा विषयांचा समावेश आहे. त्यापैकी एक मातृभाषा असून दुसरी इंग्रजी भाषा. येथे इंग्रजी हा पात्रता विषय असून त्यासाठी 300 गुण आहेत. यापैकी किमान 25 टक्के गुण (75 गुण) मिळवावे लागतात. 
        मात्र उमेदवाराने लक्षात घेतले पाहिजे की, युपीएससीचे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर हे इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असतात. त्यामुळे अभ्यास जरी मराठीत केला तरी प्रश्‍नपत्रिका वाचताना इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ठरते. तसेच अनेकदा मुलाखतीत जो दुभाषी असतो तो योग्य प्रकारे भाषांतर करीलच असे नाही. परिणामी उमेदवाराला इंग्रजीतील थोडेफार मूलभूत संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. शिवाय बर्‍याच वैकल्पिक विषयातील संदर्भ साहित्य हे इंग्रजी माध्यमात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा वापर केल्यास उमेदवाराची विषयाची जाण खूपच उंचावते. त्यामुळे इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नये, दुसर्‍या बाजूला इंग्रजीच्या दबावाखाली घाबरूनही जाऊ नये. 

  10)  UPSC स्पर्धा परीक्षेत अपयश का येते?
         अनेक विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न असते. त्यांचा सुरुवातीला एक-दोन वर्षे अभ्यास जोमाने सुरू असतो. हे विद्यार्थी सरकारी पातळीवर घेण्यात येणार्‍या सर्व परीक्षांना आवर्जून बसतात. मात्र, अचूक नियोजनाअभावी दरवेळी अपयशी होणार्‍या त्यांचा समावेश होतो. हे विद्यार्थी मग निराश होऊन धोपट मार्ग स्वीकारतात. म्हणूनच यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम नीट समजून घेत गुणविभाजनाच्या अनुषंगाने सर्वाधिक गुण मिळवून देणारा भाग ओळखून त्याबाबत उपलब्ध संदर्भपुस्तकांचा  नियोजनबद्ध अभ्यास केल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो.

 11) युपीएससी परीक्षेद्वारा कोणकोणती पदे भरली जातात?
        युपीएससीद्वारे भारतीय प्रशासनातील सुमारे 36 प्रकारच्या पदांची भरती केली जाते. त्याबाबतची यादी सदर पुस्तकात इतरत्र दिली आहे. युपीएससी मार्फत दरवर्षी 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी एनडीएची परीक्षा दोनवेळा घेऊन भूदल, नौदल आणि वायूदलातील कॅप्टनपेक्षा उच्च दर्जाच्या अधिकार्‍यांची भरती केली जाते. तसेच वर्षातून दोनवेळा कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस ही परीक्षा घेऊन अशाप्रकारच्या अधिकार्‍यांची पदवीधरातून निवड केली जाते. केंद्रीय वैद्यकीय सेवेत डॉक्टरांची भरती करण्यासाठी कम्बाइन्ड मेडिकल सर्व्हिसेस, केंद्रीय अभियांत्रिकी सेवेत इंजिनिअरची भरती करण्यासाठी इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, भारतीय वन सेवेतील अधिकार्‍यांची निवड करण्यासाठी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, भारतीय अर्थ सेवेत अधिकार्‍यांची भरती करण्यासाठी इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस यासारख्या परीक्षा घेतल्या जातात. तसेच केंद्रीय पोलीस सेवेतील वेगवेगळ्या सुरक्षा दलामध्ये-बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसफ, सीआरपीएफ, एसएसबी-मध्ये असिस्टंट कमांडंटची भरती करण्यासाठी युपीएससी मार्फत दरवर्षी परीक्षा घेतली जाते. 
 12)  नागरी सेवा-राज्यसेवा परीक्षेत किती व कोणते टप्पे असतात? 
 नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात असते - 
 1) पूर्व परीक्षा, 2) मुख्य परीक्षा, 3) मुलाखत.
 राज्यसेवा पूर्व परीक्षाही तीन टप्प्यात घेतली जाते -
 1) पूर्व परीक्षा, 2) मुख्य परीक्षा, 3) मुलाखत.

 13) या परीक्षांची तयारी केव्हापासून केली पाहिजे? 
          एखाद्या विद्यार्थ्याने 10, 12 वी असतानाच आपले ध्येय निश्‍चित केले तर महाविद्यालयीन स्तरावर त्याला या दोन्ही परीक्षांचा पूर्ण अभ्यास करता येतो आणि  वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्याबरोबर लगेच त्याला युपीएससीची परीक्षा देता येते.  उमेदवाराने आयएएस होण्याचे ध्येय हे शालेय शिक्षणा दरम्यान निश्‍चित केल्यास महाविद्यालयीन स्तरावर त्याला त्याचे व्यक्तिमत्त्व अधिकार्‍यासारखे बनविण्यास योग्य ती संधी मिळू शकते. 
         प्रशासनातील करिअर हे साधारणपणे किमान 30 आणि कमाल 40 वर्षाचे असू शकते. यानुसार एखाद्या उमेदवाराने वयाची 25 वर्षे गाठण्यापूर्वी प्रशासकीय सेवेत उच्च पदावर निवड झाली तर त्याला प्रशासनातील सर्वोच्च पद मिळू शकते. म्हणजेच युपीएससीच्या परीक्षेत एखादा विद्यार्थी 21 व्या वर्षी उत्तीर्ण झाल्यास तो निवृत्त होण्याच्या अगोदर संबंधित राज्याचा मुख्य सचिव किंवा केंद्रामध्ये कॅबिनेट सचिव पदापर्यंत पोहोचू शकतो. वयाच्या 30 वर्षानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सदर संधी फार क्वचितच मिळते त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना लवकरात लवकर यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. साधारणपणे दर 10 ते 15 वर्षांनी लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमात व परीक्षा पद्धतीत सुधारणा केली जात असते. 
         युपीएससीच्या परीक्षा देण्यासाठी खुल्या गटातील उमेदवाराची वयोमर्यादा 2014 मध्ये आयोगाने 21 ते 32 वर्षे केली. पूर्वी ही 21 ते 30 दरम्यानची होती, तर एमपीएससीच्या राज्यसेवेसाठीची ही मर्यादा 19 ते 33 वर्ष दरम्यान आहे. राज्य प्रशासनातील अधिकारी 58 व्या वर्षी तर केंद्रीय सेवेतील अधिकारी 60 व्या वर्षी निवृत्त होतो. 

 14) या परीक्षेतील आरक्षण कशाप्रकारचे आहे?
       युपीएससी परीक्षेतील आरक्षण हे वय, अटेंप्ट आणि गुणांचे मानक या संदर्भातील आहे. एमपीएससीच्या बाबतीतसुद्धा आरक्षण अशाच प्रकारचे आहे. फक्त एमपीएससीची परीक्षा कितीही वेळा देता येते. 2014 पासून मराठा समाज व मुस्लीम गटाला अनुक्रमे 16 % व 5% आरक्षण जाहीर केलेले आहे.
       युपीएससी नागरी सेवा परीक्षा खुल्या गटातील उमेदवारांना 21 ते 32 वयादरम्यान सहावेळा देता येते. ओबीसी गटातील उमेदवारांना 21 ते 35 दरम्यान नऊवेळा देता येते. तर एससी आणि एसटी गटातील उमेदवारांना 21 ते 37 दरम्यान कितीही वेळा देता येते. पूर्व, मुख्य आणि अंतिम परीक्षेचे उत्तीर्ण होण्याचे मानक, आरक्षण गटातील विद्यार्थ्यांपेक्षा कमी असते. याबाबतची माहिती सदर पुस्तकात इतरत्र दिलेली आहे. नागरी सेवेत अपंगासाठी त्या त्या संवर्गात म्हणजेच ओपन, ओबीसी, एससी, एसटी-मध्ये 3 टक्के समांतर आरक्षण आहे. 
  15)  नागरी परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यामागे  UPSC ची भूमिका कोणती आहे ?
         एखाद्या कठीण प्रसंगी निर्णय घेण्यासाठी उमेदवाराकडे प्राप्त परिस्थितीचे, उपलब्ध साधनांच्या साहाय्याने बुद्धिवादी आकलन करण्याचे कौशल्य आहे की नाही हे तपासण्यासाठी UPSC ने पूर्वपरीक्षेचे स्वरूप बदलून ते ’सामान्य कल चाचणी’ सारखे केले आहे. उमेदवाराची तार्किक, बौद्धिक, चारित्र्यविषयक आणि नैतिक बाजू तपासण्यासाठी कल चाचणी (Aptitude Test) जगभरच्या सर्व स्पर्धा परीक्षांत वापरली जाते. भारतात बँका, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, मॅनेजमेंटसारख्या परीक्षांमध्ये तिचा स्वैरपणे वापर होत आहे. पण UPSC ने 2011 च्या पूर्व परीक्षेपासून व MPSC ने 2013 च्या पूर्वपरीक्षेपासून Aptitude Test चे जे स्वरूप स्वीकारले, ते या परीक्षांसारखे  नसून ते उमेदवारांची वैचारिक क्षमता किती संतुलित व अचूक आहे, हे तपासण्यावर जास्त भर देणारे आहे, कारण प्रशासनाला मानवी चेहरा देण्यासाठी संवेदनशील उमेदवारांची आवश्यकता आहे. थोडक्यात, या परीक्षेद्वारे उमेदवारांची सत्त्वपरीक्षा (Originality) घेतली जाते. 
       21 व्या शतकातील प्रशासनात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालेले आहे. दूरसंचार क्षेत्रातील क्रांती आणि माहितीच्या तंत्रज्ञान प्रसारामुळे, तसेच उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे संपूर्ण जगच एका खेडेगावात रूपांतरित झाले आहे. जगभर होणार्‍या विविध घटनांचा भारताच्या प्रगतीवर बरावाईट परिणाम होत आहे. परिणामी देशापुढे असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आणि काही उद्दिष्टे वेळेत साध्य करण्यासाठी एका निश्‍चित वर्क कल्चरची गरज आहे. त्यासाठी स्मार्ट (SMART)  प्रशासन म्हणजेच प्रशासनात साधेपणा (Simplicity), नैतिकता (Morality), जबाबदारपणा (Accountability), प्रतिसादशीलता (Respnosivity) आणि पारदर्शकता (Transparency) महत्त्वाचे  आहे. हे प्रशासनाचे बदलते स्वरूप प्रत्यक्षात अस्तित्वात यायचे असेल तर प्रशासक हा कुशल व्यवस्थापक हवा. प्रशासनाचे बदलते हे स्वरूप लक्षात घेऊन, प्रशासनात येऊ पाहणार्‍या लाखो उमेदवारांपैकी लायक विद्यार्थ्याची निवड करताना त्यांच्यातील या गुणांची चाचणी घेणे क्रमप्राप्त ठरते. त्यातूनच स्पर्धा परीक्षांची पद्धती आणि अभ्यासक्रमात बदल केला जातो.
 16) प्रशासकीय कल चाचणी म्हणजे काय ? 
        एखादा उमेदवार निवडला गेल्यानंतर त्याला जे प्रशिक्षण दिले जाते, ते यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता तपासण्यासाठी जी परीक्षा घेतली जाते तिला प्रशासकीय कलचाचणी म्हणतात.  Aptitude is capacity of a candidate to perform a given task (undergo training successfully) with available resources in a given time frame.
       कल चाचणीचा उपयोग हा प्रचंड संख्येने उपलब्ध असणार्‍या उमेदवारातून आपणास हव्या असणार्‍या व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्याच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी आवश्यक ते स्क्रिनिंग करण्यासाठी केला जातो. कोणतीही कल चाचणी ही उमेदवाराचे विशिष्ट प्रकारचे कौशल्य आणि क्षमता तपासण्यासाठी घेतली जाते. या चाचणीचे  वैशिष्ट्य म्हणजे या चाचण्यांमध्ये एखाद्या विशिष्ट घटकांना झुकते माप देण्यास वाव नसतो, तसेच ती कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रह दूषितपणावर आधारीत नसते. 
 *     नागरी कल चाचणीचा मुख्य आधार म्हणजे उमेदवाराकडे एक सार्वजनिक सेवक म्हणून समाजाबद्दल असलेले भान, नैतिकता व लोकशाही मूल्य व्यवस्थेवर असलेला त्यांचा विश्‍वास तसेच उमेदवाराने प्रशासकीय सेवेत रुजू  होण्यासाठी आवश्यक किमान वैयक्तिक योग्यता आहे की नाही हे तपासणे. 
 *     देशात घेतल्या जाणार्‍या इतर अनेक स्पर्धा परीक्षांतील कल चाचण्यांपेक्षा ही कल चाचणी वेगळी आहे. 
 *     भविष्यात प्रशासकीय पदावर विराजमान होणार्‍या उमेदवाराकडे असाव्या लागणार्‍या गुणवैशिष्ट्यांची तपासणी  करण्याच्या हेतूने संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत UPSC पेपरचा अंतर्भाव केला आहे.
 *     उमेदवारांचा प्रामाणिकपणा शोधणे हे  सीसॅट चे उद्दिष्ट असल्याने निर्णयक्षमता हा घटक समाविष्ट करण्यात आला. निर्णय योग्य की अयोग्य, हे काळ वा परिस्थितीनुरूप ठरत असल्याने - बरोबर, कमी बरोबर असा क्रम लावून गुण वाटप केले जाते. बुद्धिमापन, माहिती विश्लेषण व तार्किक प्रश्‍न-हे सर्व प्रश्‍न विविध बँकांच्या प्रवेश परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन यात असतात. कारकुनी करताना ही सर्व तांत्रिक कौशल्ये महत्त्वाची ठरतात.  

 17) युपीएससी  कलचाचणीत कोणती कौशल्ये तपासतात ?
        उमेदवाराची निवड ही तो चांगल्या प्रशासकीय व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी आहे की नाही यानुसार करावयाची असल्याने या परीक्षेद्वारे उमेदवारातील पुढील कौशल्यांची तपासणी केली जाते-
 1)     नागरी सेवेसंबंधीची उमेदवाराची अभियोग्यता (Aptitude for Civil Services) 
 2)     निर्णय प्रक्रियेसंबंधी नैतिक व चारित्र्यविषयक बाजू (Ethical & moral dimension of  decision making)
       काही विद्यार्थी CSAT ची तुलना CAT (IIM अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा) शी करतात. पण दोन्हीत बराच फरक आहे. CAT द्वारे निवडले जाणारे उमेदवार भविष्यात जे प्रशिक्षण घेतात, त्याचा उद्देश नाही म्हटले तरी ’’नफा, नफा, नफा’’ असाच असतो,तो मग वैयक्तिक असो की कंपनीचा. CSAT  चा उद्देश मात्र तसा नाही. येथे प्रशासनाला मानवी चेहरा देण्यासाठी लागणारा अधिकारी निवडताना त्याच्यामधील सामाजिक जबाबदारीची जाणीव, कर्तव्यदक्षता, प्रामाणिकपणा, त्याग करण्याची वृत्ती आणि मुख्य म्हणजे संतुलित विचार करून सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी त्याच्याकडे असावे लागणारे कौशल्य महत्त्वाचे आहे. 

 18) ‘कल चाचणी‘ खरंच अवघड परीक्षा आहे का ?
        कल चाचणी अजिबात अवघड परीक्षा नाही. सर्व शाखेतील पदवीधरांना समान संधी देणारी ही परीक्षा पद्धती आहे. ’नागरी सेवा कल चाचणी’च्या समावेशामुळे विशेषत: कलाशाखेतून शिक्षण घेतलेल्या, मराठी माध्यमातून शिकलेल्या तसेच निमशहरी, ग्रामीण भागात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नव्या बदलांमुळे काहीशी भीती असते. कल चाचणीतील ’अंकगणित, बुद्धिमापन चाचणी आणि इंग्रजी’ या घटकांमुळे हा पेपर विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक, एमबीए इ. विषयांतील पदवीधारकांना आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुलभ जातो, अशी सर्वसाधारण भावना असते. या विद्यार्थ्यांना गणितीय बाबींची असलेली ओळख आणि इंग्रजीतील शिक्षणामुळे निश्‍चितच काही प्रमाणात फायदा होत असला तरी या कौशल्याची केवळ ओळख असल्यामुळे ’त्यांना कल चाचणीची तयारी करण्याची गरज नाही,’ असे नाही. या विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी रीतसर वेळ देत कल चाचणीतील सर्व घटकांची तयारी करावी लागतेच. विद्यार्थ्यांच्या वाचन, विचार, विश्लेषण आणि अर्थनिर्णयन क्षमतांची कसोटी पाहिली जाते. त्यामुळे चांगल्या संदर्भ साहित्याचे वाचन, त्याद्वारे विचार-विश्लेषण क्षमतेचा विकास आणि भरपूर प्रश्‍नांचा सराव हे अवगत धोरण नागरी कल चाचणीसाठी उपयुक्त ठरते.
2015 च्या युपीएससी पूर्व परीक्षेपासून सामान्य अध्ययन पेपर 2 (सीसॅट) हा पात्रता स्वरूपाचा करण्यात आला असून त्यात उमेदवाराने किमान 33% गुण म्हणजेच 200 पैकी सुमारे 66 गुण मिळविणे अनिवार्य आहे. या पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या उमेदवारांच्या सामान्य अध्ययन पेपर 1 चे मूल्यमापन करून उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी गुणनिहाय पात्रता निश्‍चित केली जाणार आहे. 2016 च्या एमपीएससी पूर्व परीक्षेसाठीसुद्धा ही पद्धत एमपीएससीद्वारे स्वीकारली जाण्याची शक्यता आहे. 

 19) UPSC-MPSC च्या पूर्वपरीक्षेत फरक आहे का? दोन्हीपैकी कोणती परीक्षा अवघड आहे?
       दोन्ही परीक्षांचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच असून 2013 पासून झालेल्या परीक्षांमध्ये अनेकांना MPSC चे पेपर्स UPSC पेक्षा अवघड वाटले होते. दोन्ही परीक्षांच्या सामान्य अध्ययन पेपर-1 मधील सातही घटकावर दोन्ही परीक्षांत प्रश्‍न विचारण्यात आले होते. प्रश्‍नांचे स्वरूप पाहिले असता साधे सरळ सोपे प्रश्‍न विचारण्यापेक्षा उमेदवाराच्या विचार शक्तीचा कस कसा लागेल यावर भर देण्यात येतो.

 20) UPSC-MPSC परीक्षांची एकत्रित तयारी करता येऊ शकते का?
     2013 पासून एमपीएससी व युपीएससीच्या पूर्व परीक्षांचा अभ्यासक्रम 100% सारखाच आहे. तसेच 2012 साली एमपीएससीने मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम जाहीर केला त्याला संलग्न अभ्यासक्रम युपीएससीने मुख्य परीक्षेसाठी स्वीकारलेला आहे. साधारणपणे दोन्ही आयोगांच्या नागरी सेवा परीक्षेतील अभ्यासक्रमातील साम्य हे सुमारे 70 टक्क्यांपर्यंतचे आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षांचा अभ्यास केला तर आपोआपच युपीएससी परीक्षेसाठी आवश्यक असणारा पाया निश्‍चितच निर्माण होऊ शकतो. 

                UPSC-MPSC  पूर्वपरीक्षा (सीसॅट)

घटकMPSCUPSC
1) पेपर संख्या22
2) गुण संख्या400  400  
3) पेपर 1 - प्रश्‍नसंख्या  100100
4) पेपर 2 - प्रश्‍नसंख्या80 80 
5) पेपरसाठी वेळ (प्रत्येकी)2 तास2 तास
6) निगेटिव्ह मार्किंग1:3 1:3 

 21) UPSC-MPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्याचे मानक किती असते?
       युपीएससी पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होण्याचे मानक (400 गुणापैकी) विविध संवर्गासाठी खालील प्रकारचे होते -

संवर्ग 2011 201220132014
1)    जनरल 198209 241205
2)    ओबीसी175 190 222 204
3)    अनुसूचित जाती165 185  207182
4)    अनुसूचित जमाती161181 201174
5)    पीएच-1185160199167
6)    पीएच-2124164184113
7)    पीएच-396111 163115


 *  2014 च्या पूर्व परीक्षेत पेपर 2 मधील इंग्रजी भाषेसाठी असणारे 15 गुण रद्द करण्यात आल्याने सदर मानक हे 400 ऐवजी 385 गुणांपैकी होते.

 22) UPSC पूर्व परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे? 
       दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. तसेच दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या आहेत. 
 *    सामान्य अध्ययन पेपर 1  - एकूण- 7 घटक, वेळ -2 तास, प्रश्‍न - 100, गुण- 200
 *    सामान्य अध्ययन पेपर 2  - एकूण- 7 घटक, वेळ -2 तास, प्रश्‍न-80 , गुण-200
 *    निगेटिव्ह मार्किंग UPSC-MPSC दोन्हीसाठी 3:1  आहे.
       अ) सामान्य अध्ययन पेपर - 1 : पेपर-1 हा 100 प्रश्‍नांचा व 200 गुणांचा असतो. त्यातील घटकनिहाय प्रश्‍न व गुण वितरण पुढीलप्रमाणे असते -
 1)     चालू घडामोडी - 10 प्रश्‍न 20 गुण
 2)     इतिहास - 15 प्रश्‍न 30 गुण
 3)     महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल - 15 प्रश्‍न 30 गुण
 4)     भारतीय राज्यपद्धती व प्रशासन -15 प्रश्‍न 30 गुण
 5)     आर्थिक व सामाजिक विकास - 15 प्रश्‍न 30 गुण
 6)     पर्यावरणासंबंधी सर्वसाधारण मुद्दे - 15 प्रश्‍न 30 गुण
 7)     सामान्य विज्ञान -15 प्रश्‍न 30 गुण
    या संख्येत दरवर्षी बदल होतो.
     ब) सामान्य अध्ययन पेपर-2 : पेपर-2 हा 80 प्रश्‍नांचा व 200 गुणांचा असतो. त्यातील घटकनिहाय प्रश्‍न व गुण वितरण पुढीलप्रमाणे असते -
 1)     आकलन - 10 उतार्‍यावरील 40 प्रश्‍न (100 गुण)
 2)     संवादकौशल्यासहित आंतरव्यक्तिगत कौशल्य - 0 
 3)     तर्कसंगत विश्‍लेषण व विश्‍लेषण - 8 प्रश्‍न, 20 गुण
 4)     निर्णयक्षमता व समस्या निराकरण - 8 प्रश्‍न, 20 गुण
 5)     साधारण बुद्धिमापन चाचणी - 8 प्रश्‍न, 20 गुण
 6)     अंकज्ञान व माहिती विश्‍लेषण - 8 प्रश्‍न, 20 गुण
 7)    मराठी व इंग्रजी भाषा आकलन - 8 प्रश्‍न, 20 गुण

 23) UPSC  मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम कसा आहे?
      UPSC  नागरी सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप 
     या परीक्षेत एकूण 9 पेपर्स 2350 गुणांसाठी आहेत. त्यातील पात्रता पेपर्समधील 600 गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जात नाहीत. पात्रता पेपर्समध्ये उमेदवारास आयोगाने निश्‍चित केलेल्या किमान मानकापेक्षा जास्त गुण मिळविणे आवश्यक असते. सदर मानक हे 25% आहे.
 अ)    पात्रता पेपर -
    पेपर ’अ’ - भारतीय भाषा - 300 गुण 
    पेपर ’ब’ - अनिवार्य इंग्रजी - 300 गुण
 ब)    गुणानुक्रमासाठी ग्राह्य धरले जाणारे  विषय  -
    अनिवार्य विषय - प्रत्येक पेपरचा कालावधी 3 तास.
    पेपर 1-निबंध (250 गुण), 2500 शब्द
    पेपर 2 -भारतीय वारसा, संस्कृती इतिहास व भारत व जगाचा भूगोल (250 गुण), 5000 शब्द
    पेपर 3-शासन, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध (250 गुण),5000 शब्द
    पेपर 4- अर्थव्यवस्था, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान (250 गुण), 5000 शब्द
    पेपर 5- नैतिकता, निष्ठा व कल/दृष्टिकोन (250 गुण), 3700 शब्द 
    वैकल्पिक विषय -
    पेपर 6 - वैकल्पिक विषय (पेपर-1) (250 गुण)
    पेपर 7- वैकल्पिक विषय (पेपर-2) (250 गुण)
  
24)  UPSC मुख्य परीक्षांची तयारी करताना कशावर भर द्यावा?
     परीक्षातील यशामध्ये अभ्यासाइतकाच नमुना पेपर्स सोडविण्याचा सराव खूपच महत्त्वाचा आहे. गेल्या परीक्षांतील यशाचे गुणमानक लक्षात घेऊन आपले उद्दिष्ट निश्‍चित करून तितके किमान गुण मिळविण्यासाठी सराव करावा. UPSC साठी हे मानक 40 ते 45% चे असते, तर MPSC ने पर्सेंटाईल  पद्धत स्वीकारल्याने ते विविध संवर्गासाठी पुढील प्रकारचे आहे : खुला -35%, आरक्षित-30% ,खेळाडू व अपंग -20%. 
         युपीएससीची मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असल्याने लिखाणाचा सराव महत्त्वाचा आहे. सर्वसाधारणपणे 20 शब्द लिहिल्यास ते 1 गुणांसाठी पुरेसे असतात. प्रत्येक पेपरचा कालावधी हा साधारणपणे 3 तासांचा असतो. 

प्रश्‍नपत्रिकाकालावधीगुणशब्दसंख्या
1)    निबंध3 तास 250 2500
2)     सा. अध्ययन पेपर-13 तास2505000
3)     सा. अध्ययन पेपर-23 तास250 5000
4)     सा. अध्ययन पेपर-33 तास2505000
5)     सा. अध्ययन पेपर-43 तास2505000
6)     वैकल्पिक विषय पेपर-13 तास2505000
7)     वैकल्पिक विषय पेपर-23 तास2505000


           2013 च्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3 मध्ये प्रत्येकी 25 प्रश्‍न विचारण्यात आले होते. प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर 200 शब्दात लिहावयाचे होते आणि प्रत्येक प्रश्‍नास 10 गुण होते. काही प्रश्‍नांमध्ये प्रत्येकी 5 मार्काचे उपप्रश्‍न विचारण्यात आले होते. मात्र 2014 च्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये 25 प्रश्‍न विचारले गेले असले तरी सामान्य अध्ययन पेपर 2 आणि 3 मध्ये मात्र प्रत्येकी 20 प्रश्‍न विचारण्यात आले होते. या 20 पैकी प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर 200 शब्दात 12.50 गुणांसाठी लिहिण्यास सांगितले होते. 2013 आणि 2014 या दोन्ही परीक्षांमध्ये सामान्य अध्ययन पेपर 4 मध्ये प्रत्येकी 14 प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यापैकी 6 प्रश्‍न केस स्टडीजवर विचारले होते. 5 केस स्टडीजना प्रत्येकी 20 गुण होते, तर एका केस स्टडीजला 25 गुण होते. या सर्वांची उत्तरे 250 ते 300 शब्दात लिहिणे अपेक्षित होते. उर्वरित 8 प्रश्‍न हे 125 गुणांसाठी विचारण्यात आले होते. त्यातही उपप्रश्‍न होते. 10 गुणांच्या प्रश्‍नांचे उत्तर फक्त 150 शब्दांत लिहिण्यास सांगितले होते.
निबंध पेपरमध्ये दोन घटकावर प्रत्येकी 1250 शब्दात दोन निबंध 3 तासांमध्ये लिहावयाचे होते. एकूण 26 वैकल्पिक विषयापैकी प्रत्येक वैकल्पिक विषयाचे 2 पेपर होते. प्रत्येक पेपरमध्ये दोन भागात प्रत्येकी 4 याप्रमाणे एकूण 8 प्रश्‍न होते. त्यापैकी प्रश्‍न 1 आणि प्रश्‍न 5 यामध्ये प्रत्येकी 5 उपप्रश्‍न होते. तसेच उर्वरित प्रश्‍नांमध्ये प्रत्येकी 2 ते 3 उपप्रश्‍न विचारण्यात आले होते. येथेही 10 गुणांच्या प्रश्‍नाचे उत्तर 150 शब्दात लिहिणे अपेक्षित असते.
 
 25) UPSC मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी?
         2013 पासून मुख्य परीक्षा ही सुधारीत स्वरूपात होत आहे. उमेदवारांनी 50 टक्केपर्यंत गुण मिळविण्याचे लक्ष्य ठेवल्यास त्यांना देशात पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण होणे अवघड जाणार नाही. सुधारित मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची असून मुलाखतीचे 275 गुण धरून अंतिम निकालासाठी 2025 गुण विचारात घेतले जातात. यापैकी 1000 पेक्षा जास्त गुण मिळविल्यास तो उमेदवार निश्‍चितच देशात सर्वोच्च क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकतो. 
       पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नेहमी डोळ्यासमोर ठेवावा आणि  प्रयत्न करावेत. त्यामुळे अभ्यास जास्त सविस्तर आणि परिपूर्ण होण्यास मदत होते. शिवाय मुख्य परीक्षेच्या वेळेस अभ्यासाचे दडपण कमी होते.
 * UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे विविध टप्प्यावरील मानक - 2013 ची परीक्षा

संवर्गपूर्वमुख्यअंतिम
1)    जनरल241564775
2)    ओबीसी222534742
3)    अनुसूचित जाती207518719
4)    अनुसूचित जमाती 201510707
5)    पीएच-1 199510725
6)    पीएच-2184502712
7)    पीएच-3 163410613
एकूण गुण40017502025

 *  2014 च्या युपीएससी नागरी सेवा परीक्षेचे मानक

संवर्गपूर्वमुख्यअंतिम(%)
1)    जनरल205678779(43.90)
2)    ओबीसी204631844(41.67)
3)    अनुसूचित जाती182631830(40.98)
4)    अनुसूचित जमाती 174619811(40.04)
5)    पीएच-1 167609816(40.29)
6)    पीएच-2113575778(38.41)
7)    पीएच-3 115449713(35.20)
एकूण गुण3851750

2025

        2014 च्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पूर्व परीक्षेतील पेपर 1 मध्ये किमान गुण आणि पेपर-2 मध्ये किमान 70 गुण मिळविणे आवश्यक होते. 2015 च्या परीक्षेपासून पूर्व परीक्षेचा पेपर-2 हा पात्रता पेपर असून त्या किमान 33% (66.33 पेक्षा जास्त) गुण मिळविणे अनिवार्य आहे.
       परिणामी मुख्य परीक्षेत पात्र ठरण्यासाठी 2015 पासून सामान्य अध्ययन पेपर-1 मधील गुणवत्ता महत्त्वाची आहे.
2014 साली मुख्य परीक्षेतील 7 पेपरमध्ये प्रत्येकी 10% म्हणजेच 250 पैकी 25 गुण मिळविणे अनिवार्य आहे.
वरील तक्त्यावरून लक्षात येईल की एखाद्या उमेदवारास जर मुख्य परीक्षेत किमान गुण असतील तर 275 पैकी पुढीलप्रमाणे किमान गुण पडल्यासच त्याची निवड होऊ शकते-
 1)    जनरल - 211    
 2)    ओबीसी - 199    
 3)    अनुसूचित जाती - 201    
 4)    अनुसूचित जमाती - 197
 5)    पीएच 1    - 215
 6)    पीएच 2    - 216
 7)    पीएच 3    - 203

 27)  नोकरी करता करता या परीक्षेच्या अभ्यास व वेळेचे नियोजन कसे करायचे? 
        महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांना कौटुंबिक आर्थिक सुस्थिती नसल्याने पदवी मिळाल्याबरोबरच कोणत्यातरी प्रकारची नोकरी करावी लागते. पण अशा विद्यार्थ्यांची अधिकारी होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असते. गेल्या काही वर्षात ही बाब प्राथमिक शिक्षकांच्याबाबत प्रामुख्याने नजरेला आलेली आहे. काही उमेदवार जिल्हा परिषद, नगर पालिका किंवा शासनाच्या एखाद्या खात्यात किंवा महामंडळामध्ये वर्ग-3 च्या पदावर कार्यरत असतात. त्यांना परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे असते. काही विद्यार्थ्यांना खाजगी सेवेत वेतन खूप असते पण मानमरातब नसतो अशा विद्यार्थ्यांनाही अधिकारी व्हायचे असते. काही विद्यार्थ्यांना वर्ग-2 पदावरून वर्ग-1 पदावर किंवा डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी व्हावयाचे असते. आयआरएस किंवा आयपीएस पदी असलेल्या उमेदवारांना आयएएस मिळवायचे असते. थोडक्यात परिस्थितीमुळे किंवा इतर कारणांमुळे नोकरी करणार्‍यांना स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हावयाचे असते. अशावेळी नोकरी आणि अभ्यास या दोघांमध्ये संतुलन साधने अनेकांना शक्य होत नाही. त्यासाठी योग्य नियोजन केल्यास अगदी पहिल्या प्रयत्नात आयएएस सुद्धा होता येते. 
       नोकरीच्या स्वरूपानुसार प्रत्येक उमेदवारास किमान आठ तास प्रतिदिन नोकरीसाठी द्यावे लागतात. आठ तास, झोप आणि वैयक्तिक गोष्टीसाठी खर्च केले तर उमेदवाराकडे आठ तास उरतात. या आठ तासापैकी किमान चार तास प्रतिदिन अभ्यासासाठी वापरले तर युपीएससी, एमपीएससी पूर्व परीक्षांचा संपूर्ण अभ्यास चार महिन्यात पूर्ण होऊ शकतो. आणि मुख्य परीक्षेसाठी 6 ते 8 महिने लागू शकतात. थोडक्यात नोकरी करणार्‍या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम मुख्य परीक्षेची तयारी करावी. त्याचा फायदा त्यांना पूर्व परीक्षेला होतोच. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याच्या शक्य असल्यास 1 महिना अगोदर रजा घ्यावी. मग ही रजा मुख्य परीक्षेच्या वेळी दोन ते तीन महिने घेण्याची गरज असेल, मग ती बिन पगारी झाली तरी घ्यावी. नोकरीच्या ठिकाणी किंवा प्रवासा दरम्यान जर वेळ मिळाला तर तो अभ्यासात घालवावा. नोकरी करणार्‍या उमेदवारांना वेळेचे मूल्य आणि महत्त्व खूपच चांगले समजते. त्यामुळे थोड्या वेळात त्यांचा चांगला अभ्यास होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी परीक्षाभिमुखता येण्यासाठीच अभ्यास, अशा दृष्टीने अभ्यासक्रमाचे नियोजन करावे.

 28)  या परीक्षांसाठी कोणते संदर्भसाहित्य वाचावे ?
       युपीएससी नव्या पूर्व-मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी पूरक मुद्दे हे आपणास महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या पुढील विषयांच्या पाठ्यपुस्तकात आढळतात - इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पर्यावरण, विज्ञान, समाजशास्त्र, गणित. टेक्स्टबूक म्हणून या पुस्तकांचा वापर करावा. एमपीएससी आणि युपीएससीच्या जुन्या प्रश्‍नपुस्तिका असलेली गाइड्स किंवा एमपीएससीच्या व युपीएससीच्या वेबसाइटवरून गेल्या 10 वर्षाच्या प्रश्‍नपुस्तिका डाऊनलोड करून त्यांचे टॉपिक निहाय विश्‍लेषण करावे. अभ्यासात परीक्षाभिमुखता आणण्यासाठी स्टडी सर्कलची पुढील प्रकाशने अत्यंत मार्गदर्शक आहेत -
    11 वी आणि 12 वी पुढील विषयाची पुस्तके -
    - इतिहास        - भूगोल
    - अर्थशास्त्र        - राज्यशास्त्र
    - पर्यावरण        - समाजशास्त्र
    इयत्ता 8 वी ते 10 वी  पुढील विषयाची पुस्तके - पर्यावरण, विज्ञान व भूगोलची पाठ्यपुस्तके
    इतर पुस्तके - 
 *    युपीएससी-एमपीएससी पूर्व परीक्षा प्लॅनर
 *    युपीएससी-एमपीएससी मुख्य परीक्षा प्लॅनर
 *    10 हजार प्रश्‍नसंच
 *    युपीएससी-एमपीएससी पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन संपूर्ण मार्गदर्शक
 *    पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन पेपर-1 मार्गदर्शक
 *    पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन पेपर-2 मार्गदर्शक
 *    भूगोल व कृषी मार्गदर्शक - प्रा. एच. के. डोईफोडे, स्टडी सर्कल प्रकाशन
 *    भारतीय राज्यघटना, राजकारण व विधी - स्टडी सर्कल 
 *    मनुष्यबळ, मानवी हक्क व समुदाय विकास - स्टडी सर्कल प्रकाशन 
 *    अर्थव्यवस्था व नियोजन विकासाचे अर्थशास्त्र - स्टडी सर्कल प्रकाशन
 *    विज्ञान-तंत्रज्ञान - स्टडी सर्कल प्रकाशन
 *    इंडिया इयर बुक
 *    मॅक्ग्राहील प्रकाशनाची पुस्तके
 *    स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ मासिक - स्टडी सर्कल 
 *    जनरल नॉलेज मासिक - स्टडी सर्कल प्रकाशन
 *    नोकरी मार्गदर्शक व्यवसाय साप्ताहिक - स्टडी सर्कल 
 *    लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू ही वर्तमानपत्रे
 *    लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र, मेनस्ट्रीम, इंडिया टुडे, द इकॉनॉमिस्ट ही मासिके.

 29)  UPSC परीक्षेत मराठी उमेदवार सर्वप्रथम येऊ शकतो का?
      मराठी उमेदवारासाठी ही अतिशय चांगली सुवर्णसंधी असून अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास मराठी उमेदवार 100% भारतात पहिला येऊ शकतो. याबाबत सदर पुस्तकात इतरत्र सविस्तर चर्चा केली आहे. 

UPSC-MPSC मुख्य परीक्षा

घटक MPSC @UPSC *
1)     परीक्षेचे स्वरूपलेखी+वस्तुनिष्ठ बहुपर्यायीलेखी
2)     मराठी भाषा अनिवार्य विषय (100 गुण)  पात्रता विषय (300 गुण)
3)     इंग्रजी भाषाअनिवार्य विषय (100 गुण)  पात्रता विषय (300 गुण)
4)     भाषा विषयांचे स्वरूपलेखीलेखी
5)     सामान्य अध्ययन वस्तुनिष्ठ बहुपर्यायीलेखी
6)     निबंध विषय- समाविष्ट (250 गुण)
7)     सामान्य अध्ययन विषय4 पेपर (4*150=600 गुण)4 पेपर (4*250=1000 गुण)
8)     वैकल्पिक विषय -1 विषय, 2 पेपर (500 गुण)
9)     एकूण पेपर संख्या2+42+7
10)     एकूण गुण200+600600+1750
11)     मुलाखत100 275
12)     अंतिम निवडीसाठीचे गुण9002075

 @    2016 पासून भाषा विषय पात्रता दर्जाचा करुन त्याचे स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे करण्याचे प्रस्तावित आहे.
*     UPSC परीक्षेत पात्रता विषयांचे गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत. युपीएससीमध्ये मराठी व इंग्रजी भाषा विषयासाठी प्रत्येकी तीन तासांचा पेपर लिहावा लागतो आणि त्यात मिळालेले गुण अंतिम यादीसाठी विचारात न घेता उमेदवाराचे मुख्य परीक्षेचे उर्वरित पेपर तपासण्यासाठी पात्रता घटक म्हणून विचारात घेतले जातात.