Menu

Study Circle

युपीएससी मुख्य परीक्षा पेपर 2 : सामान्य अध्ययन पेपर 1
भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास आणि भारत व जगाचा भूगोल

 सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये पुढीलप्रमाणे 12 घटक आणि 40 उपघटक आहेत -
 1) भारतीय संस्कृती आणि वारसा 
 2) आधुनिक भारताचा इतिहास 
 3) भारतीय स्वातंत्र्य चळवळ 
 4) स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास 
 5) जगाचा इतिहास 
 6) भारतीय समाज 
 7) महिलांचे सबलीकरण 
 8) जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम 
 9) सामाजिक सक्षमीकरण 
 10) जगाचा प्राकृतिक भूगोल  
 11) जगाचा आर्थिक भूगोल 
 12) नैसर्गिक आपत्ती  आणि भौगोलिक घटना
      विविध प्रकारची भारतीय कला 
           या उपघटकात नृत्य, नाटक, संगीत, चित्रपट याबाबतची माहिती वाचावी. तसेच लोकजीवनाचा अविभाज्य भाग असणार्‍या  विविध लोककला व लोकनृत्यांचा अभ्यास करावा. विविध कलेशी संबंधित विविध व्यक्ती, त्यांचे योगदान, नृत्य, संगीत या क्षेत्रात असणारे प्रवाह, घराणी, त्यांची वैशिष्ट्ये, काळानुरूप त्यामध्ये होत गेलेले बदल अभ्यासावेत. लोककला व लोकनृत्यांचा विचार करतेवेळी या कलांचा उगम, नृत्ये कधी व कोणत्या सणाच्या वेळी साजरी होतात. त्यांची वैशिष्ट्ये या कलांमध्ये भर घालणार्‍या व्यक्ती यांचा अभ्यास करावा.
    मुख्य परीक्षा 2013 -
 1)    भारतातील सुरुवातीच्या शिलालेखामध्ये कोरलेल्या  तांडव नृत्याचे विवेचन करा. (5 गुण)   Discuss the 'Tandava' dance as recorded in early Indian inscriptions. (100 words)
    महत्त्वाचे प्रश्‍न -
 *    मध्यभारत किंवा ईशान्य भारतातील महत्त्वाच्या पारंपरिक नृत्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
 *     संगीत नाटक अकादमीने भारतातील अभिजात नृत्य शैलींचे कसे वर्गीकरण केले आहे?
 *     खालील नृत्याबाबत माहिती द्या- यक्षगान, पेरिनी शिवतांडव नृत्य, बागुरुंबा आदिवासी नृत्य, नाट्यशास्त्र. 
 *     खालील पारंपरिक रंगमंच शैलीबाबत टीपा लिहा - दशावतार, मुडीएट्टू, मार्च, भावोना, स्वाँग, भांड पथेर.
 *     हिंदूस्थानी व कर्नाटकी पद्धतीच्या शास्त्रीय संगीतातील महत्त्वाचे साम्य आणि भेद स्पष्ट करा.
 *     भारतीय चित्रपट हे तत्कालीन सामाजिक स्थिती आणि संस्कृतीला कितपत प्रभावीत करतात.
 *     भारतात पारंपारिक पद्धतीच्या विविध संगीत वाद्यांचे वर्गीकरण कोणकोणत्या गटात केले जाते?
 *     राजस्थानी व पहाडी चित्रशैली यातील फरक स्पष्ट करा.
 *     मधुबनी व मंजुषा चित्रशैलीतील फरक स्पष्ट करा.
 *     भारतात बासरी वाजविणारा कृष्ण या कल्पनेवर आधारीत लोकप्रिय कलेचा विकास झालेला आहे. चर्चा करा.
 *     नागालँड राज्यातील मोआत्सु व एमसे उत्सवातील फरक स्पष्ट करा.
 *     अरुणाचल प्रदेशातील लोसार आणि खान उत्सवातील फरक स्पष्ट करा. 
 *     पारशी समाजात अग्नीला असलेले महत्त्व स्पष्ट करा.
 *     पुढील पंथाबाबत/प्रवाहाबाबत थोडक्यात माहिती लिहा - भक्ती चळवळ, सुफी चळवळ, चिस्ती सिलसिला, आजीवक, चार्वाक, महायान, वज्रयान, बोधीसत्त्व, दारूल उल उलूम, लिंगायत.
 *     विविध प्रकारची मातीची भांडी बनवणार्‍या शैलीचे वर्णन 
 *    ललित कला अकादमीचे महत्त्व सांगा.
 *     भारतात राष्ट्रीय मिशन ऑन लायब्ररीज सुरू करण्याचे कारण 
 *    नैसर्गिक व सांस्कृतिक वारशातील फरक स्पष्ट करा.


इतिहास विषयाची तयारी 
 

        घटना, व्यक्ती, स्थळ, काळ हे इतिहासाचे आधार मानले जातात, पण इतिहास म्हणजे केवळ घडलेल्या घटनांचे वर्णन नव्हे, तर त्या घटनांची पार्श्‍वभूमी, संबंधित प्रक्रिया व त्या घटनांचे तत्कालीन व दीर्घकालीन परिणाम या बाबींचा त्यात परामर्श घेतलेला असतो, हे ध्यानात घेऊन  मुख्य परीक्षेतील सुमारे 250 वर्षांचा इतिहास (1757 ते 2014) अभ्यासताना, ढोबळमानाने घटनाक्रम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या विषयाचा आवाका जरी प्रचंड असला तरी काही ठरावीक संदर्भग्रंथांचे सतत वाचन करावे. जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ सामग्रीसहित प्रत्येक घटकांची वर्गीकरणात्मक सूक्ष्म माहितीसुद्धा संकलीत केली पाहिजे. येथे भारतीय इतिहासातील राजकीय, प्रशासकीय, आर्थिक घडामोडींसहित विविध नेत्यांची कामगिरी व त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.  
        भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकात प्राचीन ते आधुनिक कालखंडातील विविध कलाप्रकार, साहित्य आणि स्थापत्य या विषयांचा समावेश केला आहे. 
        आधुनिक भारताचा इतिहास या दुसर्‍या घटकात अठराव्या शतकाच्या मध्यापासून वर्तमानकाळापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास अंतर्भूत आहे. त्यात राजकीय घडामोडींबरोबरच सामाजिक, आर्थिक जीवनातील बदल, सांस्कृतिक क्षेत्रातील परिवर्तनाचा विचार व त्याचे महत्त्व यावर भर आहे.
        इतिहास विषयाच्या रुंदावणार्‍या कक्षा लक्षात घेऊन  स्वातंत्र्योत्तर भारतातील घडामोडींमध्ये राष्ट्रीय चळवळीतील स्त्रियांचा सहभाग, स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीप्रश्‍नविषयक चळवळी, पर्यावरण विषयक आंदोलने यावर भर आहे. इतिहास समकाळाशी जोडण्याचा प्रयत्न झाला आहे.
        राष्ट्रीय सभा व राष्ट्रीय सभाप्रणीत राष्ट्रवाद व राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखालील आंदोलने, या राष्ट्रीय सभेशी समांतर असणार्‍या चळवळी व आंदोलनांवर भर आहे.


1) भारतीय वारसा व संस्कृती  
 

        या घटकामध्ये भारतीय कला, साहित्य आणि वास्तुकला यांचा प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत झालेला विकास, यावर प्रश्‍न विचारले जातात. 
        या घटकातील साहित्य, वास्तुकला व इतर कला - यांचा अभ्यास करताना पारंपरिक माहितीबरोबरच या क्षेत्रात घडणार्‍या नव्या घडामोडी व घटनावर लक्ष केंद्रित करावे. भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत हिंदू, जैन, बौद्ध, धर्मीयांच्याबरोबरच मुस्लीम व ख्रिश्‍चन संस्कृतीचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतीयांची भाषा, वेशभूषा, आहारसवयी व धार्मिक व्यवहार या घटकांबरोबरच सण समारंभावर  तो प्रभाव जाणवतो.
       यासाठी NCERT चे इयत्ता 11 वीचे An Introduction to Indian Art हे पुस्तक सविस्तर वाचावे. 
       त्यानंतर NCERT च्या खालील पुस्तकांचे वाचन करावे-
   1) History - Our Past (Std. VI)
   2) Our Past I (Std. VII)
   3) Our past II and III (Std. VIII)
   4) Themes in Indian History I (Std. XII)
   5) Themes in Indian History II (Std. XII)
   6) Themes in Indian History III (Std. XII)
        येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की वरील सर्व पुस्तकातील सर्व प्रकरणे वाचणे महत्त्वाचे नसून त्यातील भारतीय संस्कृती आणि वारसा या संबंधीची माहिती असणार्‍या प्रकरणांचे वाचन करावे.  उदा. Themes in Indian History II या पुस्तकातील फक्त प्रकरण 2 आणि 3 वाचावे.
    वरील संदर्भ पुस्तकाशिवाय खालील संदर्भांचा आधार घ्यावा-
 1)     Graphic Book on Indian Art and Culture
 2)     Indian Culture - Spectrum Publications
 3)     CCRT website
 4)     www.insideonindia.com च्या वेबसाईटवरील उपयुक्त मटेरियल.
 5)     Indian Art and Culture - Spectrum Publications 
  *  मुख्य परीक्षा 2014 - या परीक्षेत या घटकावर 3 प्रश्‍न 30 गुणांसाठी विचारण्यात आले होते -
1)    सिंधू संस्कृतीच्या काळातील नागरी नियोजन व या संस्कृतीने, वर्तमान काळातील नागरीकरणास दिलेले योगदान.
2)    रोमन शैली व ग्रीक शैलीमुळे झालेला गांधार शैलीचा विकास. 
3)    तक्षशिला विद्यापीठ व नालंदा विद्यापीठाची तुलना.
 *  मुख्य परीक्षा 2013 - या परीक्षेत या घटकावर 3 प्रश्‍न 20 गुणांसाठी विचारण्यात आले होते -
1)    संगम साहित्यात नमूद तत्कालीन सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे अत्यंत प्रभावी शैलीत वर्णन 
2)     चोळ काळातील मंदिर वास्तुकलेचा विकास
3)    सुरुवातीच्या शिलालेखातील कोरलेले तांडव नृत्य


भारतीय साहित्य 
 

        या घटकाची तयारी करताना प्राचीन, मध्ययुगीन तसेच आधुनिक कालखंडातील लेखक, लेखिका, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये लक्षात घ्यावीत. साहित्यातील विविध प्रवाह, प्राचीन ते अर्वाचीन काळातील महत्त्वाचे ग्रंथ, आधुनिक काळातील साहित्यप्रकार (कादंबरी, नाटक, कथा, कविता) आणि भक्ती वाङ्मय, दलित, स्त्रीवादी, ग्रामीण, नागरी असे साहित्य प्रवाह यांचा अभ्यास करावा.
     मुख्य परीक्षा 2014 -
 1)    जगातील सर्वात जुन्या विद्यापीठापैकी तक्षशिला विद्यापीठ एक होते, की ज्याच्याशी विविध क्षेत्रातील प्रसिद्ध अशा तज्ज्ञांचा संबंध होता. त्याचे सामरिक स्थान त्याला प्रसिद्धी मिळवून देण्यास कारणीभूत होते, परंतु नालंदा विद्यापीठाप्रमाणे त्याला आधुनिक दृष्टिकोनातून विद्यापीठ समजले जात नाही. चर्चा करा. (10 गुण) (150 शब्द)
    मुख्य परीक्षा 2013 -
 1)     ’’दक्षिण भारताच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टीने अधिक उपयुक्त नसूनही संगम साहित्य तत्कालीन सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे अत्यंत प्रभावी शैलीत वर्णन करते‘‘ - भाष्य करा. (10 गुण)  Though not very useful from the point of view of a connected political history of South India, the Sangam literature portrays the social and economic conditions of its time with remarkable vividness. Comment. (200 words)  


भारतीय वास्तुकला  
 

         वास्तुकलेमध्ये स्थापत्यकला, चित्रकला, शिल्पकला, मंदिरशैली यांचा समावेश होतो. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत या कलाप्रकारांचा झालेला विकास अभ्यासावा. मौर्य, गुप्त, चोळ, मुस्लीम, मुघल, सातवाहन, चालुक्य, वकातक, शिलाहार, यादव, बहामनी, मराठा, ब्रिटिश इ. राजवटींच्या काळात स्थापत्य व शिल्पकलेच्या प्रकारांत महत्त्वाची भर पडली. गुहा, मंदिर, स्तूप, चैत्य, वाडे या प्रकारच्या वास्तूंची निर्मिती झाली. विशिष्ट कलाप्रकार जेथे विकसित झाले ती ठिकाणे, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांची विविध शैली, त्यात झालेले बदल, त्याला राजाश्रय देणार्‍या व्यक्ती यांचा अभ्यास करावा. विविध कालखंडातील नागरी रचनेवरही प्रश्न विचारतात.
     मुख्य परीक्षा 2014 -
 1)    गांधार शैलीचा विकास रोमन शैली इतकाच ग्रीक शैलीमुळे झालेला आहे. स्पष्ट करा. (10 गुण) (150 शब्द)
 2)    सिंधू संस्कृतीच्या काळातील नागरी नियोजन व संस्कृतीने, वर्तमान काळातील नागरीकरणास कोणत्या मर्यादेपर्यंत योगदान दिलेले आहे? चर्चा करा. (10 गुण) (150 शब्द)
     मुख्य परीक्षा 2013 -
 1)    मंदिर वास्तुकलेच्या विकासामध्ये चोल वास्तुकलेचे स्थान उच्च आहे. चर्चा करा. (5 गुण) Chola architecture represents a high watermark in the evolution of temple architecture. Discuss. (100 words)


 2) भारताचा आधुनिक इतिहास  
  

         8 व्या शतकाच्या मध्यापासून ते अलीकडच्या काळातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती आणि संबंधित घटना
        या घटकासाठी स्पेक्ट्रम प्रकाशनाचे Comprehensive History of Modern India हे पुस्तक वाचावे. बिपन चंद्रा यांच्या पुस्तकापेक्षा या पुस्तकात परीक्षाभिमुख माहिती दिली आहे.
        भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास या घटकातील पुरेशा माहितीसाठी बिपन चंद्राचे इतिहासाचे पुस्तक उपयुक्त आहे, मात्र 1750 ते 1950 या दरम्यानचा इतिहास वाचण्यासाठी स्पेक्ट्रमचे पुस्तक वाचावे, त्याचा पूर्व परीक्षेच्या अभ्यासासाठीही फायदा होतो. 
    *  मुख्य परीक्षा 2014 - या परीक्षेत या घटकावर 3 प्रश्‍न 30 गुणांसाठी विचारण्यात आले होते -
 4)    1761 साली पानिपतची तिसरी लढाई व पानिपत येथील अनेक साम्राज्यांना हादरा देणार्‍या इतर लढाया.
 5)    सुफी संत किंवा मध्ययुगीन काळातील संत चळवळीच्या प्रभावाची मर्यादा. 
 6)    18 व्या शतकाच्या मध्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंतच्या ब्रिटिश राजवटीचे आर्थिक धोरण.
 7)    नौदल उठावाचा भारतातील ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणावरील परिणाम.
 8)    भारतातील वसाहतविरोधी आंदोलनाला चालना देणार्‍या जगातील प्रमुख राजकीय, आर्थिक व सामाजिक घटना.
     *  मुख्य परीक्षा 2013 - या परीक्षेत या घटकावर 6 प्रश्‍न 60 गुणांसाठी विचारण्यात आले होते -
 1)     आधुनिक भारताचा संस्थापक या दृष्टीने लॉर्ड डलहौसीचे योगदान
 2)     अनेक विदेशी व्यक्तींनी भारताला मातृभूमी मानून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत दिलेले योगदान
 3)    भारतीय महिलांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान
 4)     विनोबा भावेंनी सुरू केलेल्या भूदान व ग्रामदान या योजनांची उद्दिष्टे आणि यश
 5)     लालबहाद्दूर शास्त्री यांच्या ’जय जवान व जय किसान’ या घोषणेची उत्क्रांती व महत्त्व
 6)     मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारतातील योगदान
    *   या घटकात 1757 ते 2014 पर्यंतचे आधुनिक शिक्षण, वृत्तपत्रे, रेल्वे, पोस्ट, तारायंत्र, उद्योग, जमीन सुधारणा, सामाजिक-धार्मिक सुधारणा व या घडामोडींचा समाजावर झालेला परिणाम या बाबी समाविष्ट आहेत. मध्ययुगीन काळातील भक्तीचळवळ, सुफी चळवळ यावरही प्रश्‍न विचारले जातात.
        येथे ब्रिटिशांची थेट सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात विकास पावलेल्या शासकीय-प्रशासकीय-आर्थिक यंत्रणेमुळे निर्माण झालेला बदल अभ्यासावा. तसेच वर नमूद केलेल्या प्रत्येक विविध क्षेत्रात कोणते बदल, सुधारणा आणि उपाययोजना हाती घेण्यात आल्या, त्यांचे प्रवर्तक कोण, त्या सुधारणांची गुणवैशिष्ट्ये कोणती व त्यांचा समाजावर झालेला प्रभाव, अशारीतीने त्यांचा एकत्रित अभ्यास करावा.
        ब्रिटिशकालीन भारतात झालेल्या घटनात्मक सुधारणांचा विचार करताना सर्वात महत्त्वाचा भर या कायद्यांतर्गत केल्या गेलेल्या तरतुदीवर द्यावा. तसेच या राजकीय सुधारणांच्या काळात असणारे भारतमंत्री, व्हाईसरॉय, राष्ट्रीय सभेशी निगडित नेतृत्वाने या कायद्यांबाबत केलेली विधाने, विश्‍लेषण आणि या कायद्यांची वैशिष्ट्ये इ. बाबींचा सविस्तर अभ्यास करावा. या कायद्यांचा तुलनात्मक अभ्यास करावा.
     *  मुख्य परीक्षा 2014 - या परीक्षेत या घटकावर 3 प्रश्‍न 30 गुणांसाठी विचारण्यात आले होते -
 1)    1761 साली पानिपतची तिसरी लढाई झाली. पानिपत येथे अनेक साम्राज्यांना हादरा देणार्‍या लढाया का झाल्या? (10 गुण) (150 शब्द)
 2)    सुफी संत किंवा मध्ययुगीन काळातील अनेक गुढवादी सिद्ध पुरुषाना एकतर हिंदू/मुस्लीम समाजातील धार्मिक विचार आणि आचारांमध्ये सुधारणा करण्यात अपयश आले किंवा सदर समाजांची नोंद घेण्याइतपत बाह्यसंरचना बदलता आली नाही. भाष्य करा. (10 गुण) (150 शब्द)
 3)    18 व्या शतकाच्या मध्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिश राजवटीच्या आर्थिक धोरणाच्या विविध पैलूंचे टीकात्मक मूल्यमापन करा. (10 गुण) (150 शब्द)
    मुख्य परीक्षा 2013 -
1)     ‘‘लॉर्ड डलहौसी हा अनेक दृष्टीने आधुनिक भारताचा संस्थापक होता.‘‘ विस्तार करा. (10 गुण) In many ways, Lord Dalhousie was the founder of modern India." Elaborate. (200 words)
       1857 पर्यंतचे ब्रिटिश सत्तेचे स्वरूप व भारतात निर्णायकपणे आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी ब्रिटिशांनी स्वीकारलेल्या धोरणांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. यात युरोपियन सत्तांचे भारतातील आगमन ते 1857 पर्यंतचा कालखंड यावर भर द्यावा. ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करताना फ्रेंच, डच, पोर्तुगीज या सत्तांबरोबरच मराठे, हैदर, बंगाल व पंजाबचे शासक या स्थानिक सत्तांशी संघर्ष करावा लागला. या युद्धांची कारणे, युद्धात सहभागी झालेल्या सत्ता व व्यक्ती, युद्धाची ठिकाणे, वर्ष, युद्धोत्तर तह, युद्धाचे परिणाम आणि विविध इतिहासकारांनी संबंधित युद्धाविषयी व्यक्त केलेली मते इ. बाबींचा अभ्यास करावा.
       ब्रिटिश प्रशासनाची माहिती संकलित करताना ईस्ट इंडिया कंपनीसाठी ब्रिटिश संसदेने केलेले कायदे, भारतातील महसूल, सैन्य, पोलीस, न्यायप्रशासन यात विविध काळात झालेल्या सुधारणा यावर भर द्यावा.
       महसूल प्रशासनाचा विचार करताना कायमधारा, रयतवारी, महालवारी यासारख्या पद्धती कोणी? कधी? कोणत्या प्रदेशात सुरू केल्या. त्यांतील महसूल दर, त्यांचे परिणाम इ. बाबी अभ्यासाव्यात. त्याचबरोबर तैनाती फौज आणि संस्थानांच्या विलीनीकरणाचे धोरण अभ्यासावे.
      भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर आधुनिक शिक्षण, वृत्तपत्रे व दळणवळणाच्या नव्या साधनांचा प्रसार झाला. शासन पुरस्कृत सामाजिक सुधारणा घडून आल्या. परिणामी, भारतीय समाजात सामाजिक व सांस्कृतिक बदल घडून आले. याबाबत सविस्तर माहिती संकलित करावी. रेल्वेच्या विकासाचा विचार करत असताना रेल्वे विकासाचे विविध टप्पे, त्यासाठी शासनाने स्थापन केलेले विविध आयोग, राष्ट्रीय नेत्यांनी रेल्वेविकासाबाबत व्यक्त केलेली मते यांचा अभ्यास करावा. अशाप्रकारे  शिक्षण प्रसार, वृत्तपत्रे/छापखाना, उद्योग विकास या घटकांचा अभ्यास करावा. 
       सामाजिक-धार्मिक सुधारणांसाठी स्थापन केलेल्या संस्था, त्यांचे संस्थापक, संस्था-स्थापना वर्ष, संस्थेचे तत्त्वज्ञान, त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सुरू केलेली नियतकालिके व वृत्तपत्रे, इतर प्रदेशांत स्थापन झालेल्या शाखा, संस्थेशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती यावर जास्त भर द्यावा.
      ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना झाल्यानंतर ’प्रबोधन’ प्रक्रिया सुरू झाली, या प्रक्रियेत राज्य पुरस्कृत व एतद्देशीय पुढाकार, महत्त्वाच्या व्यक्ती, शिक्षण आणि प्रसारमाध्यमांचे महत्त्वपूर्ण योगदान याचा अभ्यास करावा.
      ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेनंतर भारतीय समाजात जे सामाजिक व सांस्कृतिक बदल घडून आले त्यात येथील सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळींचा महत्त्वाचा वाटा होता. त्यात ब्राह्मोसमाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज यांचे योगदान जास्त होते. त्याशिवाय शीख, मुस्लीम समुदायातील सुधारणा चळवळी, दलित उद्धारासाठी हाती घेण्यात आलेले वेगवेगळे प्रयत्न, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टीस पार्टी इ.चा अभ्यास महत्त्वाचा आहे. 
      महत्त्वाचे प्रश्‍न -
    1) ब्रिटिश राजवट -
 1)“Dahlhousie’s predecessors had acted on the general principles of avoiding annexations, if these could be avoided. Dalhousie acted on the principles of annexation, if he could do so legitimately. His annexations were both of war and peace.” Analyse.
 2)“British vision of India had no single coherent set of ideas. On the contrary, the ideas were shot through with contradictions and inconsistencies.” Discuss.
 3)“Many Englishmen honestly consider themselves the trustees for India and yet to what a condition they have reduced our country.”
 4)Examine the policy of Subordinate Union towards Princely States. Account for the shift from the policy of Subordinate Isolation. (2005)
 5)What in your opinion were the positive steps taken by the British to modernise India?
 6) Discuss the major regulations enacted by the British rulers to curb the freedom of Press in India.
    2) प्रशासकीय सुधारणा  -
 1) What administrative changes were introduced in India after 1858? What were the objectives of these changes?
 2) Ilbert Bill
    3) सामाजिक सुधारणा -
 1) “The emergence of new social classes in British India was the direct consequence of the establishment of new social economy, new state system, administrative machinery and Western education.” Discuss.
 2) What was the character of socio-religious reforms in the 19th Century and how did they contribute to the national awakening in India?
 3) Characterise the main features of Indian renaissance?
 4) Write a note on Theosophical Society, Arya Samaj
 5) Gurudwara Reform Movement
    4) शैक्षणिक सुधारणा -
 1)“The foreign power will be withdrawn but for me real freedom will come only when we free ourselves of the dominance of western education, western culture and the western way of living which have been ingrained in us.”
 2) “Satan cannot enter till he finds a flaw. ...... A great ocean separates us educated few from the millions in our country.”
 3) Discuss the main findings of the Hartog Committee (1929).
    5) घटनात्मक सुधारणा -
 1) How did the Government of India Act, 1935 mark a point of no return in the history of constitutional development India ?
 2) What are the salient features of the Government of India Acts of 1858 and 1909?
 3) "The reforms of 1909 introduced a cardinal problem and ground of controversy at every revision of the Indian electoral system." Comment.
 4) What was the Butler Committee Report ? Discuss the reactions on the Report in India?
 5) "In the Montagu-Chelmsford Report communal representation and reservations were not only retained but considerably extended." Comment.
 6) Review the 'Dickie Bird Plan', Indian States Commission, Chamber of Princes.

 

3) भारतीय स्वातंत्र्य चळवळ
 

 *    या चळवळीचे विविध टप्पे आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे योगदान, तसेच देशाच्या विविध भागाने दिलेले योगदान.
या घटकासाठी बिपन चंद्रा यांचे Struggle For India’s Independence हे पुस्तक वाचावे.
       1857 ते 1947 पर्यंतच्या भारताच्या इतिहासातील राष्ट्रवादाचा उदय व विकास, जमातवादाचा विकास, राष्ट्रीय सभेला समांतर आदिवासी, शेतकरी आंदोलने, कामगार व डावी चळवळ, संस्थानातील प्रजापरिषदा व त्यांची आंदोलने इ. प्रमुख घडामोडी याबरोबरच या काळात झालेल्या घटनात्मक सुधारणांचा अभ्यास केल्यास तयारीत सुलभता येऊ शकते. भारताच्या इतिहासात हा अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे. या कालखंडातील अनेक घडामोडी, व्यक्ती, संस्था, परस्परविरोधी मते असणारे विविध प्रवाह अभ्यासावेत. 
 *  मुख्य परीक्षा 2014 - या परीक्षेत या घटकावर 2 प्रश्‍न 20 गुणांसाठी विचारण्यात आले होते -
 7)    नौदल उठाव हा कशाप्रकारे भारतातील ब्रिटिशांच्या वसाहतवादी महत्त्वाकांक्षेच्या शवपेटीला ठोकलेला शेवटचा खिळा ठरला? (10 गुण) (150 शब्द)
 8)    भारतातील वसाहतविरोधी आंदोलनाला चालना देणार्‍या जगातील प्रमुख राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घटना कोणत्या? (10 गुण) (150 शब्द)
    मुख्य परीक्षा 2013 -
 1)     अनेक विदेशी व्यक्तींनी भारताला आपली मातृभूमी मानली आणि विविध चळवळीमध्ये भाग घेतला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेचे विश्‍लेषण करा. (10 गुण)
    Several foreigners made India their homeland and participated in various movements. Analyze their role in the India struggle for freedom. (200 words)
 2)     वय, लिंग व धार्मिक बंधनातून मुक्त होऊन भारतीय महिला स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर होत्या. चर्चा करा. (10 गुण) Defying the barriers of age, gender and religion, the Indian women became the torch bearer during the struggle for freedom in India. Discuss. (200 words)
       राष्ट्रवादाचा विकास - 1857 चा उठाव, राष्ट्रीय सभेची स्थापना, मवाळ-जहाल कालखंड, बंगालची फाळणी, होमरूल चळवळ, लखनौ करार, गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन या चळवळी, आझाद हिंद सेना इ. प्रमुख घडामोडी.
       भारतीय राष्ट्रवाद - 1857 ते 1947 या 90 वर्षांच्या काळात भारतात विविध प्रदेशांत शेतकर्‍यांचे उठाव व चळवळींचा विकास झालेला दिसून येतो. ब्रिटिश सत्तेमुळे झालेली परिवर्तने व शेतकर्‍यांचे शोषण, याचा परिपाक म्हणजे हे उठाव व आंदोलने होत. या आंदोलनांचे प्रदेश, त्यांचे नेतृत्व करणार्‍या व्यक्ती, कारणे, आंदोलनाबाबत राष्ट्रीय सभा व प्रमुख नेत्यांची भूमिका, यावर केले गेलेले लेखन, शेतकर्‍यांना संघटित करण्याचे झालेले प्रयत्न व अशा संघटनांशी संबंधित नेते, यांचा अभ्यास करावा.
        राष्ट्रीय सभेस समांतर चळवळी -1857 नंतरचे आदिवासी, शेतकरी, कामगार चळवळ, हिंदू-मुस्लीम धर्मांधतेचा विकास, युनियनिस्ट पार्टी, कृषक प्रजा पक्ष, आंबेडकरांची अस्पृश्यता उद्धाराची चळवळ व दृष्टिकोन, राष्ट्रीय लढ्यातील क्रांतिकारक चळवळ, डावी चळवळ व संस्थानातील चळवळी.
        गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ - 1920 पासून 1947 पर्यंतच्या गांधी युगात घडलेल्या स्वातंत्र्य चळवळीचा सर्व इतिहास या प्रकरणात नमूद आहे. सविनय कायदेभंग चळवळीतील विविध घोषणा, काँग्रेसमधील युवकांचे क्रांतिकारी आंदोलन, अस्पृश्यते बाबत महात्मा गांधींचे उद्गार, मीरत कटाचा भारतीय साम्यवादी पक्षावरील प्रभाव, साम्यवादी पक्षाच्या किसान सभा या संघटनेत उपस्थित राहिलेले राष्ट्रीय सभेचे सदस्य, मॅडम भिकाजी कामा यांनी महिलांना स्वातंत्र्य चळवळीत आणण्याचे केलेले प्रयत्न आणि 1920 च्या असहकार चळवळीत सामील झालेल्या आदिवासी टोळ्या, वैयक्तिक सत्याग्रह, चलेजाव चळवळ,  मुस्लीम लीगचे राजकारण, संयुक्त पक्ष, कृषक प्रजापार्टी, हिंदू महासभेचे राजकारण, काँग्रेस समाजवादी पार्टी, संस्थानातील जनतेची चळवळ, ट्रेड युनियन, शेतकरी चळवळ इ. चा अभ्यास करावा.
     महत्त्वाचे प्रश्‍न -
    1) उठाव, क्रांतिकारक, आझाद हिंद सेना -
 1) Discuss the character of major tribal uprisings in British India in the nineteenth Century.
 2) Evaluate the contribution of revolutionary terrorism represented by Bhagat Singh to the cause of lndia’s struggle for independence.
 3) How did the terrorist movement gather strength in countries other than India?
 4) The crisis of the colonial order during 1919 and 1939 was directly linked to the constitutional reforms, disillusionment and militant anti-colonial struggles. Elucidate.
 5) Evaluate Subhash Chandra Bose's contribution to India's freedom.
    2) काँग्रेस पक्ष व स्वातंत्र्य चळवळ-
 1) Bring out the ideological basis of the Moderate-Extremist divide in the Indian National Congress.
 2) Discuss the main objectives of the Indian national movement up to 1905. What were its basic weakness during this period?
 3) What led to the partition of Bengal in 1905?
 4) Trace the origin of the Swadeshi Movement. How did it involve the masses?
 5) What was the attitude of Indian industrialists towards the Indian National Congress in the pre-independence era ?
 6) Critically assess Sir Tej Bahadur Sapru’s views on Indian nationalism ?
 7) Trace the growth of the Indian Home Rule Movement in Britain.
 8) “The Indian independence movement was a mass-based movement that encompassed various sections of society. It also underwent the process of constant ideological evolution.” Critically examine.
    3) गांधी युग -
 1) 'The mainstay of Mahatma Gandhi's movements was the rural India.' Elucidate.
 2) In the context of Gandhiji views on the matter, explore on an evolutionary scale, the terms 'Swadhinata', 'Swaraj' and 'Dharmarajya'. Critically comment on their contemporary relevance to Indian democracy.
 3) Discuss the aims and objects of the Khilafat Movement. To what extent was it successful?
 4) Do you think Mahatma Gandhi’s support to Khilafat Movement had diluted his secular credentials? Give your argument based on the assessment of events.
 5) “Non-Cooperation Movement gave new direction and energy to the National Movement.” Explain.
 6) Form a critical assessment of the Non-Cooperation Movement.
 7) Why did Gandhi launch the Salt Satyagraha in 1930 and with What results?
 8) Evaluate the attitudes of different political parties towards Quit India Movement.
 9) Trace the salient sequence of events in the popular revolt that took place in February 1946 in the then ‘Royal Indian Navy’ and bring out its significance in the freedom struggle. Do you agree with the view that the sailors who took part in this revolt were some of the unsung heroes of the freedom struggle?
    4) महिला, कामगार, शेतकरी  व स्वातंत्र्य चळवळ-
 1)     How did the movement for the liberation of women receive a great stimulus from the rise and growth of the nationalist movement in India?
    5) फुटीरता चळवळ-
 1) Why and how did the Congress come to accept the partition of the country?
 2) What was Mountbatten Plan? Discuss the reactions of Gandhi and Azad to the Plan.
 3) Why did Jinnah reject the C.R.Formula?
 

4) स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास
 

  *    स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे झालेले एकत्रीकरण व पुनर्रचना
      या घटकासाठी पुढील दोन पुस्तके महत्त्वाची असून त्यामध्ये सर्व अभ्यासक्रम समाविष्ट आहे-
 1)     बिपन चंद्रा यांचे India Since Independence  
    (प्रकरण 6 ते 12)
 2)     रामचंद्र गुहा यांचे India After Gandhi : History Of The World’s Largest Democracy  
    (प्रकरण 8 ते 14)
         स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्त्वाच्या घडामोडींचा 1947 ते आतापर्यंतचा कालखंड अभ्यासक्रमात अधोरेखित केला गेलेला आहे. हा घटक समकालीन जीवन व त्यातील विविध प्रश्‍नांशी निगडित असल्यामुळे या क्षेत्रात घडणार्‍या चालू घडामोडींचे संकलन अत्यावश्यक ठरते. त्यासाठी स्टडी सर्कलच्या दोन्ही मासिकांचा व परीक्षाभिमुख वर्तमानपत्रे, नियतकालिकांसारख्या संदर्भसाहित्याचा नियमित वापर करावा.
        या घटकाची तयारी विविध प्रकारे करता येते. 1948 ते 2015 दरम्यान देशाच्या विविध क्षेत्रात झालेल्या विकासाचा आढावा घेऊन त्यातील घटनाक्रम अभ्यासावा व त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील भारताची कामगिरी संकलित करावी किंवा 1947 ते 2015 दरम्यानच्या प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन त्यांचा अभ्यास करावा.
        स्वातंत्र्योत्तर काळात 1975 हे वर्ष महत्त्वाचे मानले जाते. या सालातील राजकीय, आर्थिक, कृषी, विज्ञान, उद्योग, परराष्ट्र धोरण, फुटीरतावाद, विविध चळवळी, शिक्षण, आरोग्य, नेतृत्व, घटक राज्यातील स्थिती, या बाबतीत घटनांचा सविस्तर अभ्यास करावा.
     मुख्य परीक्षा 2013 -
 1)     विनोबा भावेंनी सुरू केलेल्या भूदान आणि ग्रामदान चळवळींच्या उद्दिष्टांचे समालोचन करून त्यांच्या यशस्वितेची टीकात्मक चर्चा करा. (10 गुण) Critically discuss the objective of Bhoodan and Gramdan Movements initiated by Acharya Vinoba Bhave and their success. (200 words)  
 2)     ’जय जवान जय किसान’ या घोषणेची उत्क्रांती व महत्त्व यावर समालोचनात्मक लेख लिहा. (10 गुण) Write a critical note on the evolution and significance of the slogan, 'Jai Jawan Jai Kisan'. (200 words)
 3)     स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारतात ’मौलाना अबुल कलम आझाद’ यांनी दिलेल्या योगदानाची चर्चा करा.(10 गुण) Discuss the contribution of Maulana Abul Kalam Azad to pre- and post independent india. (200 words)
अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून हा कालखंड विविध पद्धतीने विभागता येतो. अभ्यासक्रमाचे कालखंडानुसार - 1) 1947-1950, 2) 1950-1964, 3) 1964 ते 1977, 4) 1977-2000, 5) 2000 ते 2014 असे 5 विभाग पडतात, तर अभ्यासक्रमातील आशयाच्या आधारे स्वातंत्र्योत्तर भारतातील विविध घटनांचे वर्गीकरण -
 1)    राजकीय घडामोडी व प्रश्‍न
 2)    स्वातंत्र्योत्तर भारताची उभारणी - नियोजन, शेती, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान
 3)    आंतरराष्ट्रीय राजकारण व भारत असे करता येते.
         स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी म्हणजे भारताची फाळणी, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, नक्षलवाद, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी चळवळ, बांगलादेश प्रश्‍न, आणीबाणी, पंजाब, आसाम प्रश्‍न. या घडामोडी व संबंधित प्रश्‍नांचा अभ्यास करताना तिचा उदय, उदयाची कारणे, संबंधित व्यक्ती, संघटना, सामाजिक पाया, उपस्थित केलेले प्रश्‍न, अशा घडामोडी शासनाने दिलेला प्रतिसाद, त्या घडामोडीचा एकंदर राजकीय-सामाजिक-आर्थिक जीवनावर पडलेला प्रभाव आणि सद्य:स्थिती इ. बाबींवर लक्ष केंद्रित करावे. एकूण राजकीय-सामाजिक प्रक्रिया समजून घेऊन अशा घडामोडींचा सर्वसमावेशक अभ्यास करता येतो. एका बाजूला अशा घडामोडींविषयीची तांत्रिक माहिती संकलीत करून दुसर्‍या बाजूला तिचा विश्‍लेषण यावर भर द्यावा.
        स्वतंत्र भारताची विभिन्न क्षेत्रात झालेली प्रगती आणि उभारणी लक्षात घेण्यासाठी शेती, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान या प्रमुख क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घ्यावा. त्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीवेळी प्रत्येक क्षेत्रातील स्थिती, समस्या व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या त्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शासनाने योजलेले उपाय यांचा अभ्यास करावा.
     महत्त्वाचे प्रश्‍न -
 1) Discuss the problems that impeded the integration of the princely states into the Indian Union. How were these problems tackled?
 2) Was Jawaharlal Nehru justified in adopting the principle of non-alignment as the corner-stone of India's foreign policy ?
 3) Regardless of distance in time, there were lots of similarities between Lord Curzon and Jawahar-lal Nehru. Discuss.

 

5) जगाचा इतिहास 
 

 *    18 व्या शतकापासूनच्या महत्त्वाच्या घटना - 
 1)     औद्योगिक क्रांती
 2)     जागतिक युद्धे
 3)     राष्ट्रीय सीमारेषांची पुनर्आखणी
 4)     वसाहतीकरण व निर्वसाहतीकरण
 5)     विविध राजकीय प्रणालीचे स्वरूप व त्यांचा परिणाम - साम्यवाद, भांडवलवाद, समाजवाद 
        जगाच्या इतिहासाठी नॉर्मन लोवे यांचे Modern World History  हे पुस्तक वाचावे. सदर पुस्तकात औद्योगिक क्रांती सोडल्यास अभ्यासक्रमातील सर्व घटक नमूद आहेत. हे एकच पुस्तक जागतिक इतिहासासाठी पुरेसे आहे. वरील पुस्तकाशिवाय अर्जूनदेव यांचे History of the World from the Late Nineteenth to the Early Twenty First Century या पुस्तकाचा आधार घ्यावा. वरील दोन्ही पुस्तके न मिळाल्यास  NCERT चे जुन्या अभ्यासक्रमाचे इयत्ता 10 वीचे Old World History  हे पुस्तक वाचावे.
         सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमात जगात अठराव्या शतकापासून घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा समावेश आहे. त्यादृष्टीने विचार करता औद्योगिक क्रांती, महायुद्धे (पहिले व दुसरे), राष्ट्र-राज्यव्यवस्थेचा युरोपबाहेरील प्रसार, वसाहतवाद व निर्वसाहतवाद, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद यासारख्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत. औद्योगिक क्रांती ते विविध तत्त्वज्ञान यांची पार्श्‍वभूमी, अर्थ, उदयाची कारणे, समाजावरील परिणाम आणि सद्य:स्थिती अशा विविध अंगांनी अभ्यास करण्यावर भर द्यावा. कोणतीही संकल्पना लक्षात घेताना तिच्या अर्थापासून सद्य:स्थितीतील आव्हानांपर्यंत सर्व बाबींचा अभ्यासामध्ये समावेश करणे अगत्याचे ठरते.
  *  मुख्य परीक्षा 2014 - या परीक्षेत या घटकावर 2 प्रश्‍न 20 गुणांसाठी विचारण्यात आले होते -
1)    1956 च्या सुएझ कालव्याचे संकटाची कारणे व परिणाम. 
2)    1921 साली लेनिनने स्वीकारलेल्या नव्या आर्थिक धोरणाचा भारतावरील प्रभाव.
  *  मुख्य परीक्षा 2013 - या परीक्षेत या घटकावर 6 प्रश्‍न 60 गुणांसाठी विचारण्यात आले होते -
1)    पाश्‍चात्त्य देशांपेक्षा जपानच्या औद्योगिक क्रांतीत समाविष्ट विविध घटक
2)    1966 च्या ताश्कंद करारातील मुद्दे
3)    बांगला देशाच्या निर्मितीत भारतास निर्णायक भूमिका घेण्यास भाग पाडणारी परिस्थिती
4)    युरोपियन राष्ट्रातील स्पर्धेमुळे आफ्रिका खंडाचे झालेले छोटेछोटे तुकडे
5)    अमेरिकन क्रांती ही व्यापार वादाविरुद्धचा आर्थिक विद्रोह
6)    आर्थिक महामंदीचा सामना करण्यासाठी उपयुक्त धोरणात्मक उपाय.


औद्योगिक क्रांती
 

         तसे पाहिले तर औद्योगिक क्रांती ही एक सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात कारखाना पद्धतीने गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन करून, विशेषतः अजैविक ऊर्जेचा वापर व मोठे भांडवल गुंतवून, व्यापारी पद्धतीने उत्पादन घेतले जाते आणि मिळालेल्या नफ्याच्या प्रभावी समाजातील विविध क्षेत्रामध्ये जो बदल घडून येतो त्याच्याशी जुळवून घेण्याची समाजाच्या विविध घटकांची जी प्रक्रिया असते तिला औद्योगिकीकरण म्हणतात. त्यामुळे औद्योगिकीकरणात यांत्रिकीकरण, विशेषीकरण, स्वयंचलन, यावर भर देऊन भांडवलदार कामगारांचे शोषण करतात आणि त्यातूनच मग जगात अनेक ठिकाणी संघर्ष होऊन विविध प्रकारच्या राजकीय प्रणाली विकसित झालेल्या दिसतात.
    मुख्य परीक्षा 2014-
 10)    1921 साली लेनिनने स्वीकारलेल्या नव्या आर्थिक धोरणाने, स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताने स्वीकारलेल्या धोरणांना प्रभावित केले होते. मूल्यमापन करा. (10 गुण) (150 शब्द)
    मुख्य परीक्षा 2013 -
 1)  उशिराने सुरू झालेल्या जपानच्या औद्योगिक क्रांतीमध्ये जपानी सरकारला, पाश्‍चात्त्य देशांनी अनुभवलेल्या बाबींपेक्षा इतर विशिष्ट घटकांना समाविष्ट करावे लागले. विश्‍लेषण करा. (10 गुण)  "Latecomer' Industrial Revolution in Japan involved certain factors that were markedly different from what West had experienced." Analyze. (200 words)
          19 व्या शतकात ब्रिटिशांनी भारताला वसाहत केल्याने युरोपमधील औद्योगिक क्रांतीचा भारताशी संबंध आला. सुरुवातीला भारत ही कच्चा माल पुरविणारी व पक्का माल विकत घेणारी बाजारपेठ होती. पहिल्या स्वातंत्र्य युद्धानंतर मात्र ब्रिटिशांनी भारतात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. विशेषतः रेल्वे, कोळसा, लोेखंड, कापड, साखर, मीठ, चहा, ताग, लाकूड या उद्योगधंद्यात ब्रिटिशांची गुंतवणुक वाढू लागली. पहिल्या व दुसर्‍या महायुद्धामुळे भारतातील औद्योगिकीकरणाला चालना मिळाल्याने भारतात उद्योगवाढीस चालना मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळात पंडित नेहरूंच्या पुढाकाराने जाहिर झालेल्या 1948 व 1956 च्या औद्योगिक धोरणाने भारतातील जड आणि मूलभूत उद्योगधंद्याचा पाया घातला गेला. या सर्वांमागे युरोपमध्ये 16 व्या ते 20व्या शतकात विविध टप्प्यात झालेल्या औद्योगिक क्रांतीची पार्श्‍वभूमी होती. जगात सर्वप्रथम इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, तद्नंतर अमेरिका, रशिया, दुसर्‍या महायुद्धानंतर जपान, द. कोरिया, या राष्ट्रांमध्ये औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली. या औद्योगिक क्रांतीची कारणे, तिची वैशिष्ट्ये, परिणाम, यावर प्रश्‍न विचारले जातात.


जागतिक युद्धे


         2014 हे पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीचे 100 वे वर्ष असल्याने त्यावर्षी पहिल्या महायुद्धाच्या शताब्दीला सुरुवात झाली. विसाव्या शतकात सुरुवातीस युरोपच्या भूमीवर आणि नंतर आशिया व जगातल्या महत्त्वाच्या महासागरीय परिसरात 1914 ते 1919 आणि 1936 ते 1945 या दरम्यान ही दोन महायुद्धे पार पडली. या महायुद्धाचे जे भीषण परिणाम झाले त्यामुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण जगाचा राजकीय भूगोल बदलून गेला. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला जगात सुमारे 60 राष्ट्रे अस्तित्वात होती, तर दुसर्‍या महायुद्धानंतर नव्याने 60 राष्ट्रांचा जन्म झाला.
        या महायुद्धांची कारणे, स्वरूप, विस्तार, परिणाम, यातील विविध गट, वापरलेले युद्ध साहित्य, युद्धा काळातील नेते, यावर प्रश्‍न विचारले जाऊ शकतात. या दोन्ही महायुद्धाकाळात भारत ब्रिटिशांची वसाहत होता. त्यामुळे भारताच या दोन्ही महायुद्धात सहभाग होता. अनेक भारतीय जवान युद्धात मृत्युमुखी पडलेले आहेत. विशेषतः दुसर्‍या महायुद्धात मृत्युमुखी पडलेल्या काही भारतीय जवानांचे स्मारक बेल्जियमची राजदानी ब्रुसेल्स येथे आहे. 2013 मध्ये भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या स्मारकाला भेट दिली होती. या युद्धादरम्यान असलेली भारताची राजकीय स्थिती, स्वातंत्र्य चळवळ, क्रांतीकारकांचा कारवाया, आझाद हिंद सेनेची कामगिरी अभ्यासल्यास त्यावरच्या प्रश्‍नांची उत्तरे लिहिणे सोपे जाते. 


राष्ट्रीय सीमा रेषांची पुनर्आखणी
 

         राष्ट्र ही संकल्पना 19 व्या शतकात सर्वजगभर पसरली आणि विसाव्या शतकामध्ये विविध समुदायांना स्वतःचे राष्ट्र असावे असे वाटू लागले. 21 व्या शतकातही ही प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही राष्ट्राचा सर्वात महत्त्वाचा आधार असतो तो भौगोलिक प्रदेश, असा सार्वभौम प्रदेश त्या राष्ट्राचा जीव की प्राण असतो. त्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी दोन राष्ट्रांतील सीमा ही संकल्पना विकसित झाली. प्रत्यक्षात ही सीमारेषा त्या दोन राष्ट्रातील सामाजिक जीवन, संस्कृती, इतिहास, अर्थकारण यांचे विभाजन करत असते. राष्ट्राची निर्मिती होताना विविध आधार घेतले जातात - भाषा, धर्म, प्रदेश, वंश, इत्यादी.
      मुख्य परीक्षा 2013 -
 1)     1966 साली ज्या परिस्थितीत ’ताश्कंद करार’ झाला, तिचे विश्‍लेषण करा. या करारातील मुख्य मुद्यांचे विवेचन करा. (10 गुण) Analyze the circumstances that led to the Tashkent Agreement in 1966. Discuss the highlights of the Agreement. (200 words)
 2)     ’बांगला देशाच्या निर्मितीत’ भारताला निर्णायक भूमिका करण्यास भाग पाडणार्‍या परिस्थितीचे टीकात्मक परीक्षण करा. (10 गुण) Critically examine the compulsion which prompted India to play a decisive role in the emergence of Bangladesh. (200 words)
          जर्मनीच्या बिस्मार्कने अनेक राष्ट्रांच्या सीमारेषा पुसून जर्मनी हे राष्ट्र निर्माण केले. रशियाच्या स्टॅलिनने सुद्धा हेच केले. ब्रिटिशांनी मात्र त्यांच्या वसाहती सोडताना भारतासारख्या राष्ट्राचे विभाजन केले. ते करताना ब्रिटिश अधिकार्‍यांनी सीमारेषांच्या आखणीत घातलेल्या गोंधळामुळे लाखो लोकांचे प्राण गेले.
         दुसर्‍या महायुद्धानंतर जगभर 60 पेक्षा जास्त नवीन राष्ट्रांची निर्मिती झाल्याने सीमा रेषेवरून विविध देशांत युद्धेही सुरू झाली. विशेषतः उत्तर आणि दक्षिण कोरिया युद्ध, व्हिएतनामचे युद्ध, हे सीमारेषेदरम्यानच लढले गेले. 1990 च्या दरम्यान एका बाजूला पूर्व आणि पश्‍चिम जर्मनी मधील सीमारेषेची भिंत पाडून दोन्ही राष्ट्रांचे एकत्रिकरण झाले, तर दुसर्‍या बाजूला बलाढ्य रशियाचे विघटन होऊन त्यातून 15 राष्ट्र निर्माण झाली. अगदी अलीकडे सुदान राष्ट्राचे विभाजन होऊन दक्षिण सुदान हे नविन राष्ट्र निर्माण झाले आहे. सध्या जगभर सीमा रेषेवर सैनिक तैनात असल्याने अनेक देशादरम्यान तणाव आहे. आयसीससारख्या बिगरदेश दहशतवादी संघटनेने मध्यपूर्वेतील अनेक राष्ट्रांच्या (सिरिया, इराक) सीमारेषा आणि अस्तित्वाला धोका निर्माण केला आहे. 2011 मधील जस्मीन क्रांतीनंतर आफ्रिका व मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रातील राजकीय घडामोडीमुळे सीमासंघर्ष अधिक तीव्र बनलेला आहे. 

 

वसाहतीकरण व निर्वसाहतीकरण
 

        युरोपात प्रबोधनकाळ सुरू झाल्यानंतर ज्या शोध मोहिमा आखल्या गेल्या त्यामुळे विविध युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, या खंडांचा विविध प्रदेश, आपापसात वाटून घेतला आणि स्वतःच्या विकासासाठी त्यांचा वापर केला अशा प्रदेशाला वसाहत म्हटले जाते. सुरुवातीला या युरोपियन राष्ट्रांनी काही वसाहतींशी संघर्ष न करता सबुरीने वर्तन केले पण नंतर त्या वसाहती आपल्या ताब्यात घेतल्या. स्वतःच्या विकासासाठी त्यांचे शोषण केले. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या 30 वर्षात या वसाहती संबंधित राष्ट्रांनी सोडून दिल्या त्या र्निवसाहतीकरण म्हटले जाते. या दोन्ही प्रक्रियांची कारणे, त्याचे परिणाम, विशेषतः भारत आणि आशिया खंडातील विविध वसाहतींचा अभ्यास येथे महत्त्वाचा आहे.
    मुख्य परीक्षा 2014-
 9)    1956 च्या सुएझ कालव्याचे संकटाला जबाबदार असणार्‍या घटना कोणत्या? जागतिक महासत्ता म्हणून ब्रिटनने स्वतःची जी प्रतिमा विकसित केली होती, त्याला यामुळे कसा शेवटचा धक्का बसला? (10 गुण) (150 शब्द)
    मुख्य परीक्षा 2013 -
 1)     युरोपियन राष्ट्रांतील स्पर्धारुपी अपघातामध्ये आफ्रिका खंडाचे कृत्रिमरीत्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये तुकडे करण्यात आले. विश्‍लेषण करा. (10 गुण) "Africa was chopped into States artificially created by accidents of European competition. Analyze. (200 words)

 

 विविध राजकीय प्रणालीचे स्वरूप व त्यांचा परिणाम 
 (साम्यवाद, भांडवलवाद, समाजवाद )

 

        युरोपमध्ये घडलेल्या विविध राजकीय घडामोडीमुळे विशेषतः प्रबोधन चळवळ, फ्रेंच राज्यक्रांती, इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती, अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध, रशियातील बोल्शेव्हिक क्रांती, चीनमधील लाँग मार्च व माओची क्रांती, यामुळे विविध वैचारिक प्रक्रियेला चालना मिळाली. कार्ल मार्क्सने औद्योगिक भांडवलदार, तंत्रज्ञान व भांडवलाच्या सहाय्याने श्रमिकांचे शोषण करून जी संपत्ती मिळवितात तिचे वाटप योग्य प्रमाणात न करता श्रमिकांचे शोषण करतात. या विरोधात श्रमिकांनी संघटीत होऊन आंदोलन करून सर्वसाधनसंपत्ती संपूर्ण देशाची या तत्त्वाला आधार मानून जर राजकीय प्रणाली विकसित झाली तर तिला साम्यवाद म्हणतात. भांडवलवाद याच्या नेमका उलटा असतो. त्यात खाजगी संपत्ती, नफा, व्यक्तीवाद, याला संरक्षण दिले जाते. समाजवाद हा भांडवलवादा जवळचा आहे. तेथे लोककल्याणाला जास्त महत्त्व दिले जाते. या तीनही विचारसरणीची वैशिष्ट्ये, या विचारसरणीचा पुरस्कार करणारे विचारवंत व नेते, त्यांच्यातील संघर्ष यावर प्रश्‍न विचारले जाऊ शकतात.
    मुख्य परीक्षा 2013-
 1)     ’अमेरिकन क्रांती म्हणजे व्यापारवादाविरुद्धचा आर्थिक विद्रोह होता.’’ या वाक्याचे समर्थन करा. (10 गुण) ‘American Revolution was an economic revolt against mercantilism." Substantiate. (200 words)  
 2)     आर्थिक महामंदीचा सामना करण्यासाठी कोणत्या धोरणात्मक साधनांचा वापर करण्यात आला ?(10 गुण)
    What policy instruments were deployed to contain the Great Economic Depression? (200 words)

 

भारतीय समाज 
 

 *    भारतीय समाजाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये व विविधता
 *    लोकसंख्या आणि त्यास संबंधित बाबी 
 *    दारिद्य्र आणि विकासासंबंधी मुद्दे
 *    नागरीकरण त्याच्या समस्या आणि त्यावरील उपाय
 या घटकाच्या तयारीसाठी पुढील 3 पुस्तके उपयुक्त ठरतात-
 1) इंडियन सोसायटी (NCERT Std. XII)
 2) इंडियन सोसायटी - राम आहुजा
 3) सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया - राम आहुजा


भारतीय समाजाची  वैशिष्ट्ये व विविधता
 

       भारतीय समाजाचे मूलभूत वैशिष्ट्ये म्हणजे विविधतेतील एकता. भारतीय समाज सध्या ज्या संभ्रमण अवस्थेतून जात आहे त्याला जबाबदार असणार्‍या घटकापैकी सामाजिक सक्षमीकरण, प्रदेशवाद, धर्मनिरपेक्षता, जमातवादाचे आव्हान यावर प्रश्‍न विचारले जातात. त्याचप्रमाणे स्त्रियांची समाजातील भूमिका व स्त्री संघटना, लोकसंख्या व संबंधित कळीचे मुद्दे, दारिद्य्र व विकासात्मक मुद्दे, नागरीकरण, समस्या व उपाय हे घटक अभ्यासक्रमात स्पष्टपणे नमूद आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे जागतिकीकरणाचा भारतीय समाजावरील परिणाम हा मुद्दा जाणीवपूर्वक अंतर्भूत असल्याने दलित, आदिवासी, स्त्रिया, कामगार, अल्पसंख्याक व ग्रामीण क्षेत्र या समाजघटकांवर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत कोणता परिणाम झाला आहे हे सविस्तर अभ्यासावे.


लोकसंख्या आणि त्यास संबंधित बाबी 
 

        मानवी लोकसंख्येचा थेट संबंध प्राकृतिक पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्ती इ. घटकांशी आहे. या घटकांची अनुकूलता किंवा प्रतिकूलता मानवी लोकसंख्येच्या घनता, वितरण, स्थलांतर या घटकांवर परिणाम करते. या घटकामध्ये लोकसंख्या स्थलांतर, त्याची कारणे व परिणाम या सद्यःस्थितीतील समस्येचा अभ्यास करणे आवश्यक आहे. 
       येथे 2011 च्या जनगणनेचा तसेच अलीकडे प्रसिद्ध धर्मनिहाय आकडेवारीचा सविस्तर अभ्यास करावा. या अहवालातील एकूण लोकसंख्या, तिचे वितरण, घनता, साक्षरता प्रमाण, लिंगदर, वयोगटानुसार लोकसंख्या, माता मृत्यू दर, अर्भक मृत्यू दर इ. विविध घटकांची राष्ट्र आणि राज्यांसंदर्भात माहिती अभ्यासावी. तसेच 2001 व 2011 या दोन जनगणना अहवालांचा तुलनात्मक अभ्यास करावा. सदर माहिती श्रेणीबद्ध स्वरूपात अचूकपणे मांडावी. ही माहिती राज्यनिहाय व केंद्रशासित प्रदेशनिहाय वर्गीकृत करावी. तसेच ती घटकनिहाय (लिंगदर/घनता) मांडावी. या माहितीतील सुरुवातीची 5-6 व शेवटची 5-6 राज्ये/जिल्हे यावर विशेष भर द्यावा.
    महत्त्वाचे प्रश्‍न -
 1) Review the population policy of the Govt. of India giving the distinguishing features.
 2) State the four distinctive stages of Indian Demographic history.
 3) Transhumance in India.
 4) Census definition of urban places
 5) Demographic Dividend
 6) Linguistic regions of India
 7) Explain the major racial groups of India.

 

दारिद्य्र आणि विकासासंबंधी मुद्दे 
 

         गेली 65 वर्षे 11 पंचवार्षिक योजनेअंतर्गत विविध विकास कार्यक्रम राबरूनही देशातील दारिद्य्र रेषेखालील लोकसंख्या अपेक्षित प्रमाणात घटलेली नाही. 2011 च्या आकडेवारीनुसार जरी 21 टक्के लोकसंख्या दारिद्य्र रेषेखाली असली तरी प्रत्यक्षात तिचे प्रमाण जास्तच आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशातील सध्या 25 कोटी जनता दारिद्य्र रेषेखाली आहे. ही लोकसंख्या प्रामुख्याने ग्रामीण भाग, आदिवासी प्रदेश आणि शहरातील झोपडपट्ट्या हलाखीचे जीवन जगत असते. दारिद्य्राला जेवढी सामाजिक कारणे जबाबदार आहेत, तेवढीच भौगोलिक कारणेसुद्धा जबाबदार आहेत. या कारणांचा अभ्यास करून दारिद्य्र निर्मूलनातील त्यांचे महत्त्व जाणून घेतल्यास या घटकावरील प्रश्‍नांची उत्तरे देणे सोपे होते.
        तसे पाहता हा घटक सामाजिक भूगोलाशी संबंधित आहे, दारिद्य्रामुळेच ग्रामीण नागरी स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे परिणाम शहरातील समस्या वाढत आहे, दारिद्य्र निर्मूलन करण्यासाठी अनेकदा नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिशोषण केले जाते. त्यातून साधनसंपत्तीची अवनती तर होतेच शिवाय त्यामुळे पर्यावरण असंतुलन, प्रदूषण, या समस्या निर्माण होतात. 
नागरीकरण त्याच्या समस्या आणि त्यावरील उपाय
         एकजिनसी समाजाचे बहुजिनसी समाजात रुपांतर म्हणजे नागरीकरण. नागरीकरणास कारणीभूत घटक म्हणजे औद्योगिकीरण, लोकसंख्या स्थलांतर, पर्यटन, वाहतूक व दळणवळणाच्या साधनांतील वाढ, प्रशासकीय किंवा वाणिज्यिक कारणासाठी होणारी नगरनिर्मिती, इत्यादी.
    मुख्य परीक्षा 2014 -
 13)    संयुक्त कुटुंबाचे चक्र हे सामाजिक मूल्यापेक्षा आर्थिक घटकावर अवलंबून आहे. चर्चा करा. (10 गुण) (150 शब्द)
    मुख्य परीक्षा 2013 -
 1)     भारतात वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे ज्या विभिन्न सामाजिक समस्या निर्माण झाल्या त्यांची चर्चा करा.(10 गुण) Discuss the various social problem which originated out of the speedy process of urbanization in India. (200 words)
          येथे नागरीकरणाची कारणे, स्वरूप व परिणाम अभ्यासून सुनियोजित नागरीकरणासाठी सरकारने आखलेल्या विविध योजना विशेषतः जेएनएनयुआरएम अंतर्गत केली जाणारी विकास कामे यांचा अभ्यास करावा. नागरीकरणाचा वेग वाढत आहे, पण त्यात मोठा असमतोल असून त्याचे दुष्परिणाम तीव्र स्वरूपाचे आहेत. 
    महत्त्वाचे प्रश्‍न -
 1) Examine the status of urbanization among the states in India and bring out spatial inequalities.
 2) The significance of counter-urbanisation in the improvement of metropolitan cities in India.
 3) Define the concept of 'growth centres' and evaluate its relevance in regional planning in India.
 4) Explain the nature and causes of growing slum problems in the metropolitan cities of India.
 5) “The conditions of the urban poor are more deplorable than that of their rural counterparts.” Give your views.
 6) Comment on the spatial components in urban solid waste management in the country.
 7) Rehabilitation of street children in India

 

7) महिलांचे सबलीकरण 
 

 *    महिलांची आणि महिला संघटनांची भूमिका
       सदर घटकाबाबतची माहिती 11 वी 12 वी च्या समाज शास्त्राच्या पुस्तकातून मिळते. तसेच ‘‘प्लॅटफॉर्म फॉर अ‍ॅक्शन - रिपोर्ट ऑन इंडियन वुमेन’’ हा अहवाल डाऊनलोड करून वाचावा. याशिवाय ‘योजना, कुरुक्षेत्र आणि इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली‘ या मासिकातील लेख या घटकाच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतात.
       भारतात 2011 साली 121 कोटी लोकसंख्येत महिलांची संख्या ही 50 टक्के पेक्षा कमी म्हणजे 58 कोटी पर्यंत होती. अलीकडच्या काळात महिलांना पूर्वीपेक्षा वेगळ्या पद्धतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः स्त्रियांवरील वाढलेले अत्याचार, ऑनर किलिंग, स्त्रियांचे शोषण, हुंडाबळी, परितक्त्या, भ्रूणहत्या, यांची कारणे आणि त्यावरील उपाय यांचा अभ्यास करावा, शासनाने स्त्रियांच्या सबलीकरणकरिता केलेले कायदे, योजना, आखलेले धोरण, स्वयंसेवी संस्था आणि एनजीओचे कार्य, प्रसार माध्यमांची भूमिका, यावर भर द्यावा.
  *  मुख्य परीक्षा 2014 - या परीक्षेत या घटकावर 3 प्रश्‍न 30 गुणांसाठी विचारण्यात आले होते -
 11)    भारतात काम करणार्‍या मध्यम वर्गातील महिलांचे सामाजिक स्थान पितृसत्ताक पद्धतीने कसे प्रभावित केले आहे? (10 गुण) (150 शब्द)
 12)    भारतातील काही प्रगत भागामध्ये महिलांसाठी विपरीत लिंगगुणोत्तर का आहे? तुमचे मत मांडा. (10 गुण) (150 शब्द)
 14)    भारतातील कृषी क्षेत्रात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग वाढण्यामागे जबाबदार असणार्‍या विविध आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक घटकांची चर्चा करा. (10 गुण) (150 शब्द)
   मुख्य परीक्षा 2013 -
 1)    ’महिला संघटनांना लिंगभेदापासून मुक्त करण्यासाठी त्यात पुरुषांची सदस्य संख्या वाढविली पाहिजे’ भाष्य करा. (10 गुण) "Male membership needs to be encouraged in order to make women's organization free from gender bias" Comment. (200 words)
    महत्त्वाचे प्रश्‍न -
 1) Evaluate the influence of the three important women’s organizations of the early twentieth century in India on the country’s society and politics. To what extent do you think were the social objectives of these organizations constrained by their political objectives? 3) The issue of gender equality in India.
 4) Equal rights for women in parental property
 5) What is meant by empowerment of Women in India?
 6) What were the main recommendations of the Platform for Action (PFA) adopted at the Beijing Women Conference, 1995?
 7) What are your views on the features and impact of the Domestic Violence Act, 2005? 9) Examine whether rural women in India have been empowered by their active participation in Panchayat Raj System.
 10) “Decline in the sex ratio in India is an alarming sign for India’s future social development.” Discuss.


जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम 
 

  *    भारतीय समाजावरील जागतिकीकरणाचे परिणाम
       याबाबतची सविस्तर माहिती राम आहुजांनी लिहिलेल्या वर नमूद केलेल्या दोन पुस्तकांमध्ये सविस्तर नमूद आहे.
       1991 साली भारताने आर्थिक सुधारणा सुरू केल्यामुळे भारतीय अर्थव्यव्यवस्था आणि समाज जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत ओढला गेला. गेल्या 20 वर्षात या प्रक्रियेमुळे देशातील पायाभूत संरचना, उद्योग, सेवाक्षेत्र यांचा विकास झाला. दुसर्‍या बाजूला कृषी क्षेत्रात मात्र म्हणावी तेवढी सुधारणा झाली नाही. इतर क्षेत्राच्या मानाने या क्षेत्रात गुंतवणुकीचा वेग कमी होता. जागतिकीकरणाने जास्त भर सेवा क्षेत्रावर दिला, भारतात मोठ्या प्रमाणात दूरसंचार क्षेत्राचा विकास झाला. उत्पादन आणि निर्मिती क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्राला चालना मिळाली. बर्‍याच प्रमाणात जीवनमनाचा दर्जा उंचावला असला तरी विषमता वाढलेली आहे. त्यामुळे त्याचा अनिष्ठ परिणाम समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकावर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. भौतिक बदल होत असतानाच सामाजिक आणि सांस्कृतिक बदलामुळे संयुक्त कुटुंब पद्धती, ग्रामीण जीवनशैली, रुढी, प्रथा, परंपरा यांचा र्‍हास झाल्याने अनेक सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर विधायक कार्याऐवजी करमणूक आणि इतर बाबींसाठी जास्त केला जात असल्यामुळे चंगळवाद वाढलेला आहे. यातूनच सांस्कृतिक मूल्ये, जबाबदारी आणि बांधिलकी कमी झाल्याने गुन्हेगारी, वेश्यावृत्ती, दहशतवाद, झुंडशाही या समस्येने ग्रामीण भागालासुद्धा ग्रासले गेले. 
      मुख्य परीक्षा 2013 -
 1)    ’ज्येष्ठ नागरिकांच्या’ लोकसंख्या समूहावर जागतिकीकरणा च्या झालेल्या परिणामांचे टीकात्मक परीक्षण करा. (10 गुण) Critically examine the effect of globalization of the aged population in India (200 words)
ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग आणि इतर वंचित, सामाजिक घटकांना जागतिकीकरणाचा सर्वातजास्त तोटा झालेला आहे. त्यांना यापासून सुरक्षित ठेवायचे असेल तर संबंधित समुहाच्या सबलीकरणावर भर देणे आवश्यक आहे.
    महत्त्वाचे प्रश्‍न -
 1) “Globalization has brought about a distinct class divide in India instead of ushering in a classless society.” Critically examine this argument.
 2) Discuss the impact of globalization on higher education in India.
 3) Impact of globalization on state system and its institutions

8) सामाजिक सक्षमीकरण 

  *    सामाजिक सक्षमीकरण, जातीयवाद, प्रादेशिकता, धर्मनिरपेक्षता-
       यासाठी विकिपिडीयावर पुढील मुद्याबाबत दिलेली माहिती वाटावी - 
 1) Reagsonalism in India
 2) Comunalism
 3) Secularism
    मुख्य परीक्षा 2014 -
 15)    भारतातील धर्मनिरपेक्षेबाबतची चर्चा ही पाश्‍चात्त्य जगातील धर्मनिरपेक्षतेपेक्षा कशी वेगळी आहे? (10 गुण) (150 शब्द)
         विकासाच्या प्रक्रियेमुळे भारतात एका बाजूला सुबत्ता आलेली आहे, तर दुसर्‍या बाजूला विविध नवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत. हरितक्रांतीमुळे पंजाब, हरियाणा, गुजरात यासारख्या राज्यांचा विकास वेगाने झाला. त्या तुलनेत इतर राज्ये मागे पडली. औद्योगिकीकरणामुळे महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकचा काही भाग यांचा विकास इतर राज्यांच्या तुलनेत वेगाने झाला. त्यामुळे ईशान्य भारत, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड या भागातील लोकांनी रोजगार आणि शिक्षणासाठी विकसित भागाकडे स्थलांतर केले. त्यातून प्रादेशिकतेची भावना मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 
        वाढत्या साक्षरतेमुळे निर्माण झालेल्या जागरुकतेमुळे समाजातील विविध घटकांत वंशवादाला चालना मिळाली. इतरांपेक्षा आपला समाज श्रेष्ठ ही भावना आणि स्वतःच्या समुहाला मग तो जात, प्रदेश, भाषा, वंश, धर्म, वर्ग इत्यादी घटकांवर आधारीत असला तरी एक प्रकारचे ध्रुवीकरण सुरू झाले. त्यातच देशातील राजकारण आणि काही पक्षांनी जात आणि धर्माला महत्त्व दिल्याने अनेक सामाजिक गटांना स्वतःचे राजकीय महत्त्व लक्षात आले. त्यातूनच डॉ. एम.एन. श्रीनिवास यांनी सांगितल्यानुसार देशात प्रभावी जातींच्या दबाव गटाच्या राजकारणाला चालना मिळाली. परिणामी ध्रुवीकरण वेगाने होऊन दोन गटामध्ये संघर्ष, सामाजिक अशांतता वाढीला लागली.
      भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षेता स्विकार केलेला असला तरी भारतातील धर्मनिरपेक्षता ही पाश्‍चात्य राष्ट्रापेक्षा खूपच वेगळी आहे. अनेक विविध धर्माची आणि संप्रदायाचे लोक खूपच गुन्या गोविंदाने एकत्र राहतात पण एखाद्या कारणावरून वाद निर्माण झाला, संघर्ष झाला की होणार्‍या दंगलीमुळे दोन्ही गटांचे आतोनात नुकसान होते. त्यातून सामाजिक वैर वाढते आणि राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होतो. 
      राजकारण, शिक्षण, प्रशासन आणि नोकरी यातील आरक्षणामुळे आरक्षित आणि बिगर आरक्षित सामाजिक समूहामध्ये एकमेकांचा दुस्वास करण्याची वृत्ती वाढीला लागलेली आहे. गु्वत्तेपेक्षा एखाद्या गटाच्या राजकीय मूल्याला महत्त्व मिळाल्यामुळे सवंग लोकप्रियतेसाठी निर्णय घेतले जातात. त्याचा राष्ट्रीय स्तरावर गैरवापर झाल्याने संघर्ष होत आहे.
    महत्त्वाचे प्रश्‍न -
 1) What are the features of the Uttar Pradesh Regulation of Public Religious Buildings and Places Bill, 2000, that have caused widespread protests from minorities
 2) What should be the role of the media to project ‘mass reality’ in place of ‘illusion of reality’?

 

9) भूगोल विषयाची तयारी 
 

         भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये ‘जागतिक भूगोल’ समाविष्ट असला तरी त्याचा भारत व भारतीय उपखंडावर भर आहे. भारतीय उपखंड सध्या विकासाच्या एका टप्प्यामधून जात आहे. सामाजिक न्याय, विकास व पर्यावरण संरक्षण यांचा आणि भूगोल या विषयांचा घनिष्ठ संबंध असल्याने भूगोल विषयाचा अभ्यास करताना सतत हा संबंध लक्षात ठेवावा, त्यामुळे उत्तरे लिहिण्यासाठी आवश्यक सर्वंकष दृष्टिकोन निर्माण होतो. 
       विकासाचे विविध पैलू आणि भूगोल व पर्यावरण यांचा गुंतागुंतीचा संबंध आहे. संतुलित आणि शाश्वत विकासाचा  दृष्टिकोन परीक्षार्थीमध्ये आहे की नाही याची यावरील प्रश्‍नाद्वारे पडताळणी केली जाते. उपखंडातील राष्ट्रे ही विकसनशील असल्याकारणाने केवळ विकासाची किंवा पर्यावरणीय संरक्षणाची एकांगी भूमिका गुण मिळविण्यासाठी उपयुक्त ठरत नाही. विशेषत: उपखंडातील किंवा एकूण जगातील शेती, शेतकरी आणि आदिवासींचे प्रश्न, ते सोडवण्यासाठी केले जाणारे उपाय, मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा वापर किंवा गैरवापर, विकसित राष्ट्रांचा प्रदूषणाकडे, तापमानवाढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पर्यावरणीय समस्यांकडे विकसितव विकसनशील राष्ट्रांत असणारे द्वंद्व, राजकारण व कुरघोडी आदींचा अभ्यास करावा लागतो.
      मुख्य परीक्षा 2014 -
  *  मुख्य परीक्षा 2013 - या परीक्षेत या घटकावर 5 प्रश्‍न 30 गुणांसाठी विचारण्यात आले होते -
 1)    खंडवहन सिद्धांताचे पुरावे
 2)    जगातील उष्ण वाळवंटे उत्तर गोलार्धात असण्याची कारणे
 3)    तापमानाचे व्युत्क्रमण व त्याचे परिणाम
 4)    उष्णकटिबंधीय वादळांचे नामकरण व फायलीनचा पूर्व किनारपट्टीला तडाखा 
 5)    हिट आयलँडच्या निर्मितीची कारणे

 

10) जगाचा प्राकृतिक भूगोल 
 

 *    जागतिक प्राकृतिक भूगोलाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये
 *    भौगोलिक भूस्वरूपे व त्यांचे स्थान - महत्त्वाच्या सुस्वरूपा मध्ये झालेले बदल (जलसंसाधन व हिमाच्छादन), या बदलाचे  नैसर्गिक प्राणीसंपत्ती व वनसंपत्ती यांच्यावर झालेले परिणाम
 *    महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना : भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळे, इत्यादी 
  या घटकासाठी पुढील 2 पुस्तकांचा आधार घ्यावा -
 1) Certificate Physical and Human Geography - Goh Cheng Leong
 2) Fundamentals of Physical Geography (Std. XII)
  जागतिक प्राकृतिक भूगोलाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये 
        प्राकृतिक भूगोल हा भूगोलाचा गाभा असल्याने सर्व मूलभूत संकल्पना त्यात समाविष्ट होतात. हा घटक पूर्णतः संकल्पनात्मक स्वरूपाचा आहे. संकल्पनात्मक बाबींबरोबरच उपयोजित घटक व चालू घडामोडींचा संदर्भ जोडून (विशेषतः भूकंप, पूर, त्सुनामी, चक्रीवादळे) या प्रकरणाचा अभ्यास करावा. या घटकामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाच्या रचनेपासून प्राकृतिक रचनेमधील सर्व घटक अभ्यासताना भूरूपशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना, तसेच प्राकृतिक रचनेसंबंधी संकल्पनांचा अभ्यास करावा.
 1)    पृथ्वीचे अंतरंग - रचना व प्राकृतिक जडण-घडण, भूरूप विकास नियंत्रित करणारे घटक
 2)    वातावरण - रचना, सौर उत्सर्जन व उष्मा समतोल
 3)    हवामानाचे घटक - तापमान, वायुदाब, ग्रहीय व स्थानिक वारे, मान्सून, वायुराशी, चक्रीवादळे व  हवामान प्रदेश 

    मुख्य परीक्षा 2014 -
 1)    दक्षिण चीनचा समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात या भागातच उष्णकटिबंधीय चक्रीवादळे केंद्रित झालेली आहेत. का? (10 गुण) (150 शब्द)
    मुख्य परीक्षा 2013 -
 1)     ’खंडवहन सिद्धांता’बाबत आपल्याला काय वाटते?  त्याच्या समर्थनार्थ पुराव्यांची चर्चा करा. (5 गुण) What do you understand by the theory of 'continental drift'? Discuss the prominent evidence in its support.
 2)    हवामानशास्त्रातील ‘तापमानाचे व्युत्क्रमण’ या घटनेबाबत तुम्हाला काय माहीत आहे? त्याचा हवामान व निवासस्थाना वर काय परिणाम होतो? (5 गुण) What do you understand by the phenomenon of 'temperature inversion' in meteorology? How does it affect weather and the habitants of the place? (100 words)  
    महत्त्वाचे प्रश्‍न -
 1) El Nino, La Nina and monsoon rains
 2) Write a short note on Qinghai—Tibet Railway.
 3) Glacier Meeting & its effect
   भौगोलिक भूस्वरूपे व त्यांचे स्थान
       प्राकृतिक भूगोल या विषयामध्ये नैसर्गिक रचना म्हणजेच जगातील पर्वतरांगा, नद्या, नद्यांची खोरी, हवामान, मृदा आणि जंगले इत्यादी घटकांचा अभ्यास करतात. या घटकांचे मानवी जीवनावर झालेले परिणाम, विकासामध्ये असणारी त्यांची भूमिका, सद्य:परिस्थितीत त्यांच्या अस्तित्वावर आलेली संकटे यांचाही अभ्यास करावा.
     मुख्य परीक्षा 2014 -
 1)    खंडांच्या कडेला लागून जगातील महत्त्वाचे घडीचे पर्वत  अस्तित्वात का आहेत?  भूकंप आणि ज्वालामुखी यांचा घडीच्या पर्वताच्या जागतिक वितरणाशी असलेल्या संबंधाचे वर्णन करा? (10 गुण) (150 शब्द)
 2)    इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स आर्किपिलॅगो परिसरात हजारो बेटांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण द्या. (10 गुण) (150 शब्द)
    मुख्य परीक्षा 2013 -
 1)     जगातील महत्त्वाची उष्ण वाळवंटे उत्तर गोलार्धात 20 ते 30 अंश उत्तर अक्षांश आणि खंडांच्या पश्‍चिम भागात आढळतात. कारण सांगा. (10 गुण) Major hot deserts in northern hemisphere are located between 20-30 deg N latitudes and on the western side of the continents. Why? (200 words)
 2)    जगातील नागरी निवासस्थानाच्या ठिकाणी ’उष्ण बेटांच्या’ निर्मितीमागची कारणे सांगा. (5 गुण)Bring out the causes for the formation of heat islands in the urban habitat of the world. (100 words)

 

11) जगाचा आर्थिक भूगोल 
 

 *    महत्त्वाची नैसर्गिक संसाधने : जागतिक वितरण (द. आशिया)
 *    प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या जगभरातील वितरणास जबाबदार विविध घटक
  यासाठी पुढील 3 पुस्तकांचा आधार घ्यावा -
 1) Human Geography (Std. XII)
 2) India People and Economy (Std. XII)
 3) Geography of India - Mcgrawhill Publication
        नैसर्गिक संसाधनामध्ये संबंधित देशातील मृदा संपत्ती, वनसंपत्ती, खनिज संपत्ती, जल संपत्ती यासारख्या साधनांचा समावेश होतो. याबाबत भारताचे जगातील स्थान आणि त्यांचा विकासासाठी केला जाणारा वापर, त्यामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम, अशा साधनसंपत्तीच्या वापरासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान, धोरण व भांडवल याबाबत गेल्या 65 वर्षातील भारताची वाटचाल महत्त्वाची आहे. साधनसंपत्तीबाबतच्या विविध मूलभूत संकल्पना, आकडेवारी, सद्यस्थितीत साधनसंपत्तीचा वापर करण्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती, तसेच कुशल मनुष्यबळ आणि उद्योजक यांची सांगड घालून विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहिणे आवश्यक ठरते.
   नैसर्गिक संसाधनांचे जागतिक वितरण
       हा आर्थिक भूगोल असून त्यामध्ये खनिज व ऊर्जा साधनसंपत्ती, पर्यटन, पर्यावरणाशी संबंधित घटकांचा समावेश असतो. खनिजसंपन्न क्षेत्रे, प्रकार व उत्पादन यांची माहिती नकाशासह अभ्यासावी. खनिज व ऊर्जा संसाधनांचे स्रोत प्रदेश, राज्यनिहाय साठे व उत्पादनांचा क्रम, उत्पादनातील चढउतार, त्यावर आधारित प्रकल्प, आयात व निर्यात याबद्दलची वस्तुनिष्ठ व अद्ययावत माहिती गोळा करून तिचे पाठांतर करावे. संसाधनांच्या साठ्यांची नकाशाधारित माहिती संकलित करावी. त्याचप्रमाणे संसाधनांच्या उत्खननामध्ये गुंतलेल्या सार्वजनिक, खाजगी कंपन्यांची माहिती अभ्यासावी.
      आर्थिक भूगोल या घटकामध्ये भौगोलिक घटकांचे अर्थव्यवस्थेतील योगदान आणि पर्यायाने जागतिक तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे त्यांचे परिणाम लक्षात घ्यावेत. यात पुढील मुद्दे महत्त्वाचे आहेत - 
      जगातील शेतीचे मुख्य प्रकार; स्थलांतरित शेती, सखोल उदरनिर्वाहाची शेती, यांत्रिक शेती, मळ्याची शेती, मिश्रशेती, मंडई बागायती, शेतीतील उत्पादने पशुपालन मासेमारी क्षेत्रे.
      मानवाच्या प्रमुख आर्थिक क्रिया, जगातील वेगवेगळ्या देशांत प्राथमिक द्वितीयक, तृतीय व चतुर्थक व्यवसायांत गुंतलेल्या लोकांचे प्रमाण, यांचा अभ्यास करावा.
     प्राणी व वनसंपत्ती यांच्यावर या बदलाचे झालेले परिणाम
     विकासाचे कार्यक्रम, पायाभूत संरचना, औद्योगिकीकरण, नागरीकरणाचा परिणाम म्हणून पर्यावरणाच्या असंतुलनामुळे  प्राणीसंपत्ती व वनसंपत्तीचेे विस्थापन मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशावेळी शाश्‍वत विकासाच्या संदर्भातून तसेच पुनर्वसनाच्या दृष्टीने जगभर केले जाणारे प्रयत्न व विविध जागतिक संस्थांची भूमिका अभ्यासावी.
       महत्त्वाचे प्रश्‍न -
 1)    जगातील लोह आणि पोलाद उद्योगाबाबत आढळून येणार्‍या पद्धतीतील कालिक बदलाचा आढावा घ्या. (10 गुण) (150 शब्द)
 2)    जगातील साधनसंपत्तीच्या संकटाला तोंड देताना, सागरी संपत्तीचे विविध घटक कसे वापरता येतील याचे टीकात्मक मूल्यमापन करा. (10 गुण) (150 शब्द)
    मुख्य परीक्षा 2013 -
 1)     असे म्हटले जाते की, ‘‘येत्या 25 वर्षातील देशातील खनिज तेल व नैसर्गिक वायूची गरज भागवू शकणारे पर्याप्त साठे असले तरीही ही साधनसंपत्ती विकसित करण्यावर भर दिला जात नाही.‘‘ अशा साधनसंपत्तीची उपलब्धी व त्यासंबंधी घटकांची टीकात्मक चर्चा करा. (10 गुण) It is said that India has substantial reserves of shale oil and gas, which can feed the needs of the country for quarter century. However, tapping of the resources does not appear to be high on the agenda. Discuss critically the availability and issues involved. (200 words)
    महत्त्वाचे प्रश्‍न -
 1) Discuss the wetlands and their role in ecological conservation in India.
 2) List any eight ‘Ramsar’ wetland sites located in India. What is the ‘Montreux Record” and what Indian sites are included in this Record?


12)  नैसर्गिक आपत्ती  आणि भौगोलिक घटना 
 

 *    महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना : भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळे, इत्यादी . 
      अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘नैसर्गिक आपत्ती’ हा होय. म्हणजेच भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, वादळे इत्यादीचा अभ्यास होय. याचा अभ्यास करताना त्यांच्या निर्मितीची शास्त्रीय कारणे, जगातील कोणत्या प्रदेशामध्ये यांचा अधिक उद्भव आहे. त्या-त्या प्रदेशामध्ये अशा आपत्तीप्रसंगी काय उपाययोजना करतात हे घटक लक्षात घ्यावेत.
        This topic on critical changes in geographical features is broadly related to climate change and other anthropogenic factors(such as depletion of resources, dumping of wastes etc). Geographical features like rainforests, ice caps, rivers, corals, cyclones all get affected by climate change. Anthropogenic factors are involved in increasing desertification, vanishing forests, biodiversity, pollution of rivers and lakes, etc. Focus should be on such changes.  
       यासाठी गोह चेंग लिऑन यांचे भूगोलचे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
    मुख्य परीक्षा 2014-
 16)    हवामान बदलामध्ये घडणार्‍या सामान्य बहुतांशी अनियमिततेसाठी एल निनोला जबाबदार धरले जाते. तुम्ही याशी सहमत आहात का? (10 गुण) (150 शब्द)
    मुख्य परीक्षा 2013 -
 1)    अलीकडेच भारताच्या पूर्व किनारपट्टीला तडाखा देणार्‍या वादळाला ’फायलीन’ या नावाने संबोधिले गेले. जगभर उष्ण कटिबंधीय वादळांचे नामकरण कसे केले जाते. यावर सविस्तर लिहा. (5 गुण)   The recent cyclone on east coast of India was called 'Phailin'. How are the tropical cyclones named across the world? Elaborate. (100 words)

 

13) भारताचा भूगोल 
 

 1)    महत्त्वाची नैसर्गिक संसाधने : भारतीय उपखंडातील वितरण
 2)    प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या भारतातील वितरणास जबाबदार असणारे विविध घटक
 3)     भारताचा प्राकृतिक भूगोल
 4)     भारताचा सामाजिक भूगोल
        अभ्यासक्रमामध्ये या घटकातील बर्‍याचशा मुद्यांचे सविस्तररीत्या विश्‍लेषण केलेले नाही, पण पुढील घटकांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते - भारतीय उपखंड आणि भारत यांचा प्राकृतिक, आर्थिक आणि सामाजिक भूगोल.
 *  मुख्य परीक्षा 2014 - या परीक्षेत या घटकावर .... प्रश्‍न ..... गुणांसाठी विचारण्यात आले होते -

 *  मुख्य परीक्षा 2013 - या परीक्षेत या घटकावर 7 प्रश्‍न 50 गुणांसाठी विचारण्यात आले होते -
 1)    हिमालयात पश्‍चिम घाटापेक्षा वारंवार घडणार्‍या दरड कोसळण्याच्या घटना
 2)     पश्‍चिम घाटातल्या नद्यांमुळे त्रिभुज प्रदेश निर्माण न होण्याची कारणे
 3)    अणू ऊर्जेचे महत्त्व आणि त्यासाठी उपयुक्त कच्च्या मालाची देशातील व जगातील उपलब्धता
 4)    खनिज तेल व नैसगिर्र्क वायू या पारंपारिक ऊर्जा स्रोताच्या विकासाचे महत्त्व
 5)    दक्षिणेकडील राज्यात नवीन साखर कारखाने निर्माण करण्याची वाढती प्रवृत्ती
 6)    वस्त्रोद्योगाच्या विकेंद्रीकरणास कारणीभूत घटक
 7)    वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी प्रादेशिक भावना हा महत्त्वाचा कारणीभूत घटक 
   नैसर्गिक संसाधने : भारतीय उपखंडातील वितरण
       भारतासारख्या विकसनशील व उभरत्या अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध साधनसंपत्तीचा पर्याप्त वापर करणे महत्त्वाचे आहे. त्याऐवजी गेली काही वर्ष भारतात अशा साधनसंपत्तीच्या आयातीवर भर दिला जात आहे. दुसर्‍या बाजूला अशी साधनसंपत्ती शोधणे, विकसित करणे, संवर्धित करणे यासाठी परकीय तंत्रज्ञान आणि भांडवल, तसेच खाजगी क्षेत्र यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. विशेषतः नैसर्गिक वायू आणि खनिज तेल याबाबत भारताला सातत्याने समस्या भेडसावत आहेत. तसेच या क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे विविध प्रकल्पांना होणारा विलंब यावरही प्रश्‍न विचारले जाऊ शकतात.
    मुख्य परीक्षा 2014 -
 22)    भारतातील हरितक्रांती भारताच्या पूर्व भागात सुपीक जमीन आणि पुरेसा जलसाठा असूनही त्याला टाळून पुढे निघून जाण्याची कारणे कोणती? (10 गुण)
 25)    आफ्रिकेतील समृद्ध अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचा वाढता वापर करणार्‍या आर्थिक स्पर्धेत भारतात स्वतःचे स्थान कसे वाढते? (10 गुण)
    मुख्य परीक्षा 2013 -
 2)     जीवाश्म इंधनांची दुर्मिळता वाढत असल्याने ’अणुऊर्जा’ भारतासाठी अधिकाधिक महत्त्वाची ठरत आहे. भारतात व जगात अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या कच्च्या मालाच्या उपलब्धतेबाबत चर्चा करा. (10 गुण) With growing scarcity of fossil fuels. the atomic energy is gaining more and more significance in India. Discuss the availability of raw material required for the generation of atomic energy in India and in the world. (200 words)
    महत्त्वाचे प्रश्‍न -
 1) What are the resource bases available for the economic development of the States of Jharkhand and Uttaranchal?
 2) Mention the agro-climatic regions of India stating the basis of classification.
 3) Causes of soil erosion and its control in India
 4) Negative impacts of shifting cultivation
 5) Jhum cultivation - process and consequences
 6) Causes of droughts in India
 7) Examine the causes and the extent of desertification’ in India and suggest remedial measures.
 8) What is waste land? Write a note on prospects of waste land development in India.
 9) What is Integrated Wastelands Development Programme ?
 10) Write briefly about Desert Development Programme.
 11) What are mangroves and in what way are they useful to us?
     उद्योगांच्या वितरणास जबाबदार घटक
        कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था शाश्‍वतदृष्ट्या विकसित व्हावयाची असेल तर उद्योगक्षेत्र महत्त्वाचे ठरते. या उद्योगक्षेत्राच्या विकासाला प्राथमिक क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र पूरक ठरत असते. गेल्या 65 वर्षात भारतात द्वितीय क्षेत्राचा विकास स्थिर राहिलेला आहे. त्यात अनेकदा कुंठित अवस्थासुद्धा आलेली आहे.
        प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी, खनिज, वने, पशुसंवर्धन, मासेमारी यासारख्या घटकांचा समावेश होतो. देशातील सुमारे 60 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या या क्षेत्रावर अवलंबून आहे. पण तिचा विकास देशभर समान नसून त्यात प्रादेशिक असमतोल मोठ्या प्रमाणावर आहे तो नाहिसा करून प्राथमिक क्षेत्राच्या विकासाचे धोरण आखताना या क्षेत्रावर अवलंबून असणार्‍या लोकसंख्येचे प्रमाण एका बाजूला कमी करणे, तर दुसर्‍या बाजूला जीडीपीतील या क्षेत्राचा वाटा जास्त घटनार नाही हे पाहावे लागते.
        द्वितीय क्षेत्रात प्रगती झालेली राष्ट्रेच जगात सध्या श्रीमंत राष्ट्रे म्हणून ओळखली जातात. औद्योगिकीकरणाचा भक्कम पाया असल्याशिवाय किंवा जड आणि मूलभूत उद्योगांचा विकास झाल्याशिवाय देशाच्या आर्थिक विकासाला आधार मिळत नाही. भारतात सुरुवातीला सार्वजनिक क्षेत्रात आणि 1991 पासून खाजगी तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मदतीने द्वितीय क्षेत्राच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न झाला. पण त्याला अपेक्षित यश आलेले नाही. अलीकडच्या काळात उद्योगधंद्यासाठी आवश्यक जमिन अधिग्रहण, भांडवल गुंतवणुक, कुशल मजुरांची कमतरता आणि जागतिक स्पर्धा याला तोंड द्यावे लागत असल्याने बरेच भारतीय उद्योजक परदेशातील उद्योगधंद्यात गुंतवणुक करणे पसंत करतात आणि त्यामुळे भारताला अनेक बाबतीत आऊटसोर्सिंग तसेच आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. तृतीय क्षेत्राचा विकास गेल्या 65 वर्षात, त्यातही गेल्या 20 वर्षात वेगाने झालेला आहे. या क्षेत्रात वाणिज्य, व्यापार, पर्यटन, सेवाक्षेत्र, माहितीतंत्रज्ञान क्षेत्र, प्रशासन, व्यवस्थापन या सारख्या घटकांचा समावेश होतो. 1947 मध्ये या क्षेत्राचा जीडीपीतील वाटा 20 टक्केपेक्षा कमी होता. तो 2015 मध्ये 60 टक्के पर्यंत पोहचलेला आहे, पण त्याप्रमाणात या क्षेत्रावर अवलंबून असलेली लोकसंख्या मात्र कमी आहे.
     मुख्य परीक्षा 2014 -
 1) जरी ब्रिटिश मळेवाल्यांनी आसामपासून हिमाचल प्रदेश दरम्यानच्या शिवालिक आणि निम्न हिमालय परिसरात चहाचे मळे विकसित केले असले तरी त्यांना दार्जिलिंग क्षेत्राच्या पलीकडे याबाबत म्हणावे तितके यश मिळालेले नाही. स्पष्ट करा. (10 गुण) (150 शब्द)
     मुख्य परीक्षा 2013 -
 1) दक्षिणेकडील राज्यामध्ये नवे साखर कारखाने निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढत आहे, या मताशी आपण सहमत आहात का? न्यायसंगत चर्चा करा. (5 गुण) Do you agree that there is a growing trend of opening new sugar mills in southern States of India? Discuss with justification. (100 words)
 2) भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विकेंद्रित झालेल्या वस्त्रोद्योगास कारणीभूत असलेल्या कारणांचे विश्‍लेषण करा. (5 गुण) Analyze the factors for the highly decentralized cotton textile industry in India. (100 words)
 महत्त्वाचे प्रश्‍न -
1) Assess the significance of coastal regions in the economic development of India.
 2) Examine the distribution of oil refineries in India.
 3) Account for the very high concentration of salt extration industries in the Saurashtra and South Tamilnadu Coast.
 4) Elaborate the steps taken by the Government for regionally differentiated approach to increase crop production and diversification in the country.
 5) Technological changes have brought in a major shift in the use of roads as transport corridors in India. How far do you agree with this view?
 6) Are the ‘Dedicated Freight Corridor’ railway project and the ‘Golden Quadrilateral road project mutually complementary or competitive? Assess.

 

भारताचा प्राकृतिक भूगोल
 

         प्रत्यक्षात नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात या घटकाचा तसा समावेश नाही पण 2014 च्या परीक्षेत यावर अनुक्रमे 10 मार्कासाठी 2 प्रश्‍न व 1 प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यामुळे भारतीय भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोल महत्त्वाचा ठरतो. भारताच्या प्राकृतिक भूगोलात शक्यतो पुढील मुद्यांचा अभ्यास करावा - भारताचे स्थान, स्वाभाविक विभाग, हवामान, पर्जन्यमान, मान्सून पाऊस, वने, अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने, नद्या, डोंगर, जलाशय, किनारपट्टी.
    मुख्य परीक्षा 2014 -
 20) भारतीय उपखंडात आकसणार्‍या हिमालयीन हिमनद्या आणि वातावरण बदलाची लक्षणे यांच्यातील संबंध स्पष्ट करा. (10 गुण) (150 शब्द)
    मुख्य परीक्षा 2013 -
 1) पश्‍चिम घाटापेक्षा हिमालयात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्याचे कारण सांगा. (5 गुण) Bring out the causes for more frequent occurrence of landslides in the Himalayas than in the Western Ghats. (100 words)
 2) पश्‍चिम घाटातल्या नद्यांमुळे त्रिभुज प्रदेश निर्माण होत नाहीत, कारण सांगा. (5 गुण) There is no formation of deltas by rivers of the Western Ghtas. Why? (100 words)
 महत्त्वाचे प्रश्‍न - 1) Had there been no Himalayas, what would have been the winter climate in north India?
 2) Explain how the Himalayan and the Tibetan highlands play an important role in the development of the South-West monsoon.
 3) Why are the Aravallis called a divide between Mewar and Marwar ?
 4) Discuss the distribution of winds and rainfall over India in the summer monsoon season.
 5) Explain the cause of the Indian Monsoon.
 6) The winter rains in North India are largely related to Jet Streams and Western Disturbances. Bring out the relationship.
 7) The impact of climate change on water resources in India.
 8) Bring out the significance of the various activities of the Indian Meteorological Department.
 9) Describe the major characteristics of the rivers of Peninsular India.
 10) Why do the Rivers of west-coast not form a delta?
 11) Causes for dominant dendritic pattern of drainage in the Gangetic plains.

 

भारताचा सामाजिक भूगोल
 

       हा घटक प्रत्यक्षात अभ्यासक्रमात समाविष्ट नसला तरी 2013 च्या परीक्षेत त्यावर 1 प्रश्‍न विचारण्यात आला होता. या घटकाची सांगड भारतीय समाज या घटकातील लोकसंख्या, दारिद्य्र विकास, नागरिकरण याशी जोडता येतो. सामाजिक भूगोलाचा अभ्यास करताना भारतीय लोकसंख्येचे वितरण, नागरी आणि ग्रामीण समाजातील फरक, आदिवासी समाजाची वैशिष्ट्य, भारतातील विविध वंश, धर्म आणि जाती यांच्या लोकसंख्येचे प्रमाण, निवासस्थान, स्थलांतर, त्याची कारणे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, बदलते सामाजिक पर्यावरण, जाती आणि वर्गव्यवस्थेचे एकमेकावर झालेले आक्रमण, वाढती सामाजिक विषमता, गुन्हेगारी, दंगली, सामाजिक अशांतता, स्त्रियांवरील अत्याचार या घटकांवर भर द्यावा. मुख्य परीक्षा 2013 - 1) ’भारतात वाढत असलेली प्रादेशिक भावना ही वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी कारणीभूत असलेला महत्त्वाचा घटक आहे.’ चर्चा करा. (10 गुण) Growing feeling of regionalism is an important factor in generation of demand for a separate State. Discuss. (200 words)
   महत्त्वाचे प्रश्‍न - 1) "Political boundaries and regional boundaries need to be co-terminus." Do you agree? (2005)
 2) Examine the status of urbanization among the states in India and bring out spatial inequalities.
 3) Explain the nature and causes of growing slum problems in the metropolitan cities of India.
      मराठी भाषेची संदर्भ साहित्य
       भारत व जगाचा इतिहास या विस्तृत अभ्यास घटकाच्या तयारीसाठी एनसीईआरटीची मूलभूत पाठ्यपुस्तके, बिपन चंद्रा, रोमिला थापर, डी. एन. झा अशा लेखकांची पुस्तके वापरावीत. जगाच्या इतिहासासाठी एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकाबरोबर कॅल्वोकोरोसी यांचे संदर्भ पुस्तक महत्त्वाचे ठरते. भूगोलाच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके आणि जे. सी. लिआँग यांच्या पुस्तकांचे मूलभूत वाचन व इंटरनेटचा भरपूर वापर करावा. * मराठी विश्‍वकोष खंड-12
 *  बी. एन. ग्रोव्हर यांचे इतिहासाचे पुस्तक
 *  यूएनईपी पर्यावरणविषयक महत्त्वाच्या कराराच्या वेबसाइट्स
 *  नॅशनल जिओग्रॉफिकसारखी मासिके
 *  भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाची वेबसाइट
 *  स्टडी सर्कल प्रकाशनाचे भारताचा संपूर्ण इतिहास
 *  स्टडी सर्कल प्रकाशनाची भूगोलची पुस्तके -लेखक प्रा. एच. के. डोईफोडे
       वरील सर्व पुस्तकांचा आणि संदर्भ साहित्याचा अभ्यास करताना वाचनाइतकेच लिखाणाला महत्त्व देणे आवश्यक आहे.           मुख्य परीक्षेची तयारी करताना एखादा मुद्दा फक्त एकदा वाचून चालत नाही तर तो सर्वसाधारण तीनवेळा वाचावा लागतो. पहिले वाचन समजण्यासाठी दुसरे वाचन लक्षात ठेवण्यासाठी, तर तिसरे वाचन प्रश्‍नाचे उत्तर लिहिण्यासाठी उपयुक्त ठरते. येथे एकच पुस्तक तीनवेळा वाचणे महत्त्वाचे आहे. एका मुद्यासाठी अनेक पुस्तके वाचल्यास गोंधळ होतो, तसेच वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय होऊन एखादा मुद्दा लक्षात ठेवणे तितकेसे जमत नाही. म्हणून एकच पुस्तक अनेकवेळा वाचणे चांगले.                             नागरी सेवा मुख्य परीक्षेत विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नाद्वारे उमेदवाराची मूलभूत आकलन क्षमता तपासली जाते. त्यामुळे एखाद्याच्या संकल्पना स्पष्ट असतील तर उत्तर लिहिणे सोपे जाते.                                                                                                   येथे आयोगाकडून कोणत्याही परिस्थितीत एखाद्या मुद्यावर उमेदवाराचे प्रभुत्व किती आहे यावर भर दिला जात नाही. त्यामुळे एखादा मुद्दा अभ्यासताना त्याबाबत फ्लो चार्ट किंवा तक्ता तयार करावा. येथे Jack of All Trades, Master of none हे विधान लक्षात ठेवावे. म्हणजेच एखाद्या मुद्यावर सखोल अभ्यास करून संशोधन करण्यापेक्षा एखादा मुद्दा समजून घेण्यासाठी त्याचे वारंवार वाचन करावे. तसेच अभ्यासक्रमातील अनेक मुद्यांची सद्य घटनांशी सांगड घालणे महत्त्वाचे आहे.                               कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराना मागील सर्व परीक्षांच्या प्रश्‍नांची उत्तरे लिहून काढणे अनिवार्य आहे. त्यामुळे वाचन, उजळणी, लेखन, पुनर्वाचन, पुनर्उजळणी आणि पुनर्लेखन यावर जास्तीत जास्त भर द्यावा.

सामान्य अध्ययन पेपर 1 : अभ्यासक्रम


  1)  भारतीय वारसा व संस्कृती -
 *  भारतातील प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत विकसित झालेल्या पुढील घटकांची विविध वैशिष्ट्ये -
1) साहित्य,  2) वास्तुकला,  3) विविध प्रकारची कला
  2)  भारताचा आधुनिक इतिहास -
 1) 18 व्या शतकाच्या मध्यापासून ते अलीकडच्या काळातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती आणि संबंधित घटना
 2) भारतीय स्वातंत्र्य चळवळ : या चळवळीचे विविध टप्पे आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे योगदान, तसेच देशाच्या विविध भागाने दिलेले योगदान
 3) स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे झालेले एकत्रीकरण व पुनर्रचना
 3) जगाचा इतिहास -
 * 18 व्या शतकापासूनच्या महत्त्वाच्या घटना -
 1) औद्योगिक क्रांती
 2) जागतिक युद्धे
 3) राष्ट्रीय सीमारेषांची पुर्नआखणी
 4) वसाहतीकरण व निर्वसाहतीकरण
 5) विविध राजकीय प्रणालीचे स्वरूप व त्यांचा परिणाम - साम्यवाद, भांडवलवाद, समाजवाद
 5)  भारतीय समाज -
 1) भारतीय समाजाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये व विविधता
 2) लोकसंख्या आणि त्यास संबंधित बाबी
 3) महिलांची आणि महिला संघटनांची भूमिका
 4) दारिद्य्र आणि विकासासंबंधी मुद्दे
 5) नागरीकरण त्याच्या समस्या आणि त्यावरील उपाय
 6) भारतीय समाजावरील जागतिकीकरणाचे परिणाम
 7) सामाजिक सक्षमीकरण, जातीयवाद, प्रादेशिकता, धर्मनिरपेक्षता
 6) भारताचा भूगोल -
 1) महत्त्वाची नैसर्गिक संसाधने : भारतीय उपखंडातील वितरण
 2) प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या भारतातील वितरणास जबाबदार असणारे विविध घटक
 3) भारताचा प्राकृतिक भूगोल
 4) भारताचा सामाजिक भूगोल
 7) जगाचा भूगोल -
 1) जागतिक प्राकृतिक भूगोलाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये
 2) भौगोलिक भूस्वरूपे व त्यांचे स्थान - महत्त्वाच्या सुस्वरूपा मध्ये झालेले बदल (जलसंसाधन व हिमाच्छादन), या बदलाचे नैसर्गिक प्राणीसंपत्ती आणि वनसंपत्ती यांच्यावर झालेले परिणाम
 3) महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना : भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळे, इत्यादी
 4) महत्त्वाची नैसर्गिक संसाधने : जागतिक वितरण (द. आशिया)
 5) प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या जगभरातील वितरणास जबाबदार विविध घटक

सामान्य अध्ययन पेपर (2) वरील घटकनिहाय प्रश्‍न व गुण वितरण (30 प्रश्‍न = 250 गुण) 

 उपघटक/प्रश्‍न गुणसंख्या20132014
 1) भारतीय वारसा व संस्कृती
 *  भारतातील प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत विकसित वारसा संस्कृती
 1) साहित्य
 2) वास्तुकला
 3) विविध प्रकारची कला
3(20)
1 x 10=10
1 x 5=5
1 x 5=5
3(30)
1 x 10=10
1 x 10=10
1 x 10=10
 2) भारताचा आधुनिक इतिहास
 1) 18 व्या शतकाच्या मध्यापासूनच्या घटना, व्यक्ती आणि संबंधित
 2) भारतीय स्वातंत्र्य चळवळ- टप्पे व महत्त्वाच्या व्यक्तींचे योगदान
 3) स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे झालेले एकत्रीकरण व पुनर्रचना
6(60)
1 x 10=10
2 x 10=20
3 x 10=30
5(50)
3 x 10=30
2 x 10=20
--
 3) जगाचा इतिहास
 1) औद्योगिक क्रांती
 2) जागतिक युद्धे
 3) राष्ट्रीय सीमारेषांची पुर्नआखणी
 4) वसाहतीकरण व निर्वसाहतीकरण
 5) विविध राजकीय प्रणालीचे स्वरूप व त्यांचा परिणाम - साम्यवाद,भांडवलवाद, समाजवाद
6(60)
1 x 10=10
--
2 x 10=20
1 x 10=10
2 x 10=20
2(20)
--
--
--
1 x 10=10
1 x 10=10
 4) भारतीय समाज
 1) भारतीय समाजाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये तसेच भारतीय समाजातील विविधता
 2) लोकसंख्या आणि त्यास संबंधित बाबी
 3) महिलांची आणि महिला संघटनांची भूमिका
 4) दारिद्य्र आणि विकासासंबंधी मुद्दे
 5) नागरीकरण त्याच्या समस्या आणि त्यावरील उपाय
 6) भारतीय समाजावरील जागतिकीकरणाचे परिणाम
 7) सामाजिक सक्षमीकरण, जातीयवाद, प्रादेशिकता व धर्मनिरपेक्षता
3(30)
--
--
1 x 10=10
--
1 x 10=10
1x 10=10
--
5(50)
--
--
3 x 10=30
--
1 x 10=10
--
1 x 10=10
 5) जगाचा भूगोल
 1) जागतिक प्राकृतिक भूगोलाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये
 2) भौगोलिक भूस्वरूपे व त्यांचे स्थान, बदल व त्याचे प्राणी व वनसंपत्तीवरील परिणाम
 3) महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना - भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळे, इत्यादी
 4) महत्त्वाची नैसर्गिक संसाधने - जागतिक वितरण (दक्षिण आशियासहित)
 5) प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या जगभरातील वितरणास जबाबदार विविध घटक
 6) नैसर्गिक प्राणीसंपत्ती आणि वनसंपत्ती, त्यांच्यावर या बदलाचे झालेले परिणाम
5(30)
2 x 5=10
1 x 10=10
1x 5=5
--
--
--
6(6)
1 x10=10
2 x10=20
2 x10=20
1 x10=10
1 x10=10
--
 6) भारताचा भूगोल
 1) महत्त्वाची नैसर्गिक संसाधने : भारतीय उपखंडातील वितरण
 2) प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या वितरणास जबाबदार घटक
 3) भारताचा प्राकृतिक भूगोल
 4) भारताचा सामाजिक भूगोल
7(50)
2 x 10=20
2 x 5=10
2 x 5=10
1 x10=10
4(40)
2 x 10=20
2 x 10=20
--
--
 एकूण20 x 10=200+10 x 5=5025 x 10=250