Menu

Study Circle

२७ नोव्हेंबर २०१७

पुष्पा पागधरे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

        ‘लता मंगेशकर पुरस्काराने माझे जीवन धन्य झाले. प्रत्येक गायक-गायिकेचे स्वप्न असते की आयुष्यात राज्य सरकारच्या पुरस्काराने त्यांचा गौरव व्हावा. माझेही हे स्वप्न होते. हे स्वप्न अखेर पूर्ण झाले,’ अशी भावना ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पा पागधरे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांच्या हस्ते पुष्पा पागधरे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले. त्याप्रसंगी पागधरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात हा सोहळा पार पडला. 5 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

         ‘ इतनी शक्ती हमें दे ना दाता हे गाणे आजही लोकप्रिय आहे. अनेक शाळांमध्ये ते आजही म्हटले जाते. या गाण्यातून विद्यार्थी प्रेरणा घेतात,’ अशा शब्दांमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी पागधरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान केला. संगीत, नाट्य, साहित्य आणि कलेचा वारसा जोपासण्याचे काम राज्य सरकारतर्फे सुरू असून संगीत, कला, नृत्य, चित्रकला या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा आणि त्यांना या विषयाची गोडी निर्माण व्हावी यासाठीच विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे तावडे यांनी सांगितले. लोककला, बालनाट्य, शाहिरी, कीर्तन हे कलेचे प्रकार राज्यामध्ये पोहोचावेत, यासाठी राज्याभर प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय दिवंगत संगीतकार सुधीर फडके यांची जन्मशताब्दी पुढील वर्षी सुरू होत असून ही जन्मशताब्दी राज्य सरकार साजरी करणार असल्याचे आश्वासनही तावडे यांनी यावेळी दिले.

मिस युनिव्हर्स डेमी नेल पीटर्स

       मिस युनिव्हर्स 2017 चा किताब दक्षिण आफ्रिकेकडे गेला आहे. डेमी नेल पीटर्सही यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती ठरली आहे. लासवेगासमध्ये झालेल्या सोहळ्यात मिस साऊथ आफ्रिका असलेल्या डेमी नेल पीटर्सला विजेती घोषीत केले. डेमी नेल पीटर्सला 2016 ची मिस युनिव्हर्स आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिने मानाचा मुकुट प्रदान केला. दक्षिण आफ्रिकेच्या डेमी नेल पीटर्सला मिस जमाईका डेविना बॅनेट आणि मिस कोलंबियाचे लौरा गोन्जालेज तगड आव्हान होते. या स्पर्धेत मिस जमाईकाने तिसरे स्थान मिळवले, तर फर्स्ट रन अप मिस कोलंबिया झाली. 

      मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे करायला 92 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. पण अंतिम फेरीत फक्त आफ्रिका, जमाईका आणि कोलंबियाने मजल मारली. 22 वर्षीय पिटर्सने नुकतीच बिजनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. 26 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार लास वेगास येथे सायंकाळी 7 वा. (भारतीय वेळेनुसार 27 नोव्हेंबरला पहाटे 5.30 वा.) ही स्पर्धा सुरू झाली होती. मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत श्रद्धा शशिधरने भारताचे नेतृत्व केले होते. पण टॉप 10 ची यादी श्रद्धाला गाठता न आल्याने भारताकडे मिस युनिव्हर्सचा किताब येण्याचे स्वप्न भंगले.

माउंट आगुंग

       इंडोनेशियाच्या बालीमध्ये ‘माउंट आगुंग’ या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने स्थानिक प्रशासनाने बालीमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. त्यासाठी हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. इंडोनेशियाच्या बाली बेटावरील ज्वालामुखीचा या आठवड्यातला हा दुसरा उद्रेक आहे. माउंट आगुंग या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वातावरणात प्रचंड धूर आणि राख परसली आहे. त्यामुळे बाली विमानतळ 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आले असून सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. अचानक उद्भवलेल्या या समस्येमुळे सुमारे साडेपाच हजारांहून अधिक प्रवाशी विमानतळावरच अडकले आहेत.

      बालीमध्ये नेहमीच परदेशी पर्यटकांची गर्दी असते. अडकलेल्या प्रवाशांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे समजते. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून सुमारे 25,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. इंडोनेशियामध्ये सध्या 100 हून अधिक जिवंत ज्वालामुखी आहेत.

२६ नोव्हेंबर २०१७

‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व करणार श्रद्धा शशीधर

        मानुषी छिल्लरच्या डोक्यावर ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्यस्पर्धेचा मुकूट येऊन एक आठवडा पूर्ण होत नाही तोच आणखी एका सौंदर्यस्पर्धेच्या चर्चेला उधाण आले आहे. ती स्पर्धा म्हणजे ‘मिस युनिव्हर्स’. या स्पर्धेतूनही भारतीयांना जेतेपदाच्या बर्‍याच आशा आहेत. श्रद्धा शशीधर ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील या नावाजलेल्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. 26 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार लास वेगास येथे संध्याकाळी 7 वा. (भारतीय वेळेनुसार 27 नोव्हेंबरला पहाटे 5.30 वा.) सुरु होणार्‍या मिस युनिव्हर्स या स्पर्धेत श्रद्धा भारताचे प्रतिनिधीत्त्व करेल. श्रद्धा ‘यामाहा फॅसिनो मिस डिवा 2017’ची विजेती आहे. त्यामुळे तिच्याकडून अनेकांना बर्‍याच अपेक्षा आहेत. यंदाच्या मिस युनिव्हर्सला मानाचा मुकूट घालण्याचा मान मागील वर्षीची विजेती सौंदर्यवती आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिला मिळणार आहे.

     मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता फॅशन आणि कलाविश्वाच्या नजरा मिस युनिव्हर्स या स्पर्धेकडेच लागून राहिल्या आहेत. यात सहभागी झालेल्या श्रद्धाविषयी सध्या सोशल मीडियावर बर्‍याच गोष्टी समोर येत आहेत. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार 3 सप्टेंबर 1996 ला जन्मलेल्या श्रद्धाचे शिक्षण नाशिकमधील देवळाली येथील आर्मी पब्लिक स्कूल येथे झाले असून, मुंबईच्या सोफिया महाविद्यालयातून तिने मास मीडियाचे शिक्षण घेतले आहे. 21 वर्षीय श्रद्धा राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू असून, ती शास्त्रीय नृत्यकलेतही पारंगत आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्येही ती हिरिरीने सहभागी होते. नुकतेच तिने ‘ल्हा चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे आयोजित केलेल्या एका उपक्रमाअंतर्गत तिबेटीयन निर्वासितांना शिकवण्यातही आपले योगदान दिले होते.

राऊल एहरेन यांची सहाय्यक प्रशिक्षकपदावर नेमणूक

       ओडीशातील भुवनेश्वर शहरात खेळवल्या जाणार्‍या वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने कंबर कसलेली पहायला मिळते आहे. भारतीय संघाला सर्वोत्तम प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून आणखी एका प्रशिक्षकाची नेमणूक केलेली आहे. हॉलंडचे माजी खेळाडू राऊल एहरेन यांची भारतीय हॉकी संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नेमणूक केलेली आहे. मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन यांना एहरन प्रशिक्षणाच्या कामात मदत करणार असल्याचे हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे. 1 डिसेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र एहरन यांच्याकडे वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेपुरती भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हॉकी इंडियाचे कळसह झशीषेीारपलश ऊळीशलीेीं डेव्हिड जॉन यांच्यामते भारतीय हॉकीसंघाला, महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहाय्यक प्रशिक्षकांची गरज आहे. यातच रोलंट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर तत्कालीन डीींरींशसू उेरलह हन्स स्ट्रिडर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेत एहरेन स्ट्रिडर यांची जबाबदारी पार पाडणार असल्याचे समजते.

        काही महिन्यांपूर्वी हॉकी इंडियाचे मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी एरहेन यांना हॉकी इंडियासाठी काम करण्याबद्दल विचारले होते. मरीन आणि एहरेन यांनी याआधी हॉलंडच्या ज्युनिअर संघासाठी प्रशिक्षक म्हणून काम केलेले आहे. यानंतर एहरेन यांच्या नियुक्तीसाठी हॉकी इंडियाने पाठवलेला प्रस्ताव ‘साई’ने (डिेीीीं र्ईींहेीळीूं ेष खपवळर) मान्य केला आहे. मरीन यांच्याप्रमाणे एहरेन यांच्याकडे पुरुष संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव नाही आहे. मात्र स्थानिक पातळीवर एहरेन यांची हॉकीतली कारकिर्द पाहून हॉकी इंडियाने वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेसाठी त्यांची सहाय्यक प्रशिक्षकपदालक नेमणूक केल्याचे समजते.

२५ नोव्हेंबर २०१७

इजिप्तमध्ये बॉम्बहल्ला

        इजिप्तच्या उत्तर सिनाई प्रातांतील एका मशिदीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 235 ठार, तर 109 जण जखमी झाले आहेत. नमाज सुरू असताना दहशतवाद्यांनी प्रथम मशिदीवर बॉम्ब फेकले आणि यातून वाचण्यासाठी बाहेर पडणार्‍या लोकांवर बेछूट गोळीबार केला. हल्लेखोर चार गाड्यांमधून आले होते. अल अरिश शहरातील अल रवादा येथील मशिदीवर हा हल्ला करण्यात आला.

     दहशतवादी हल्ल्यातही लष्कराला पाठिंबा देणार्‍या नागरिकांनाच टार्गेट केल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, इजिप्त सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिस यांनी सुरक्षा यंत्रणांची तातडीची बैठकही घेतली. इजिप्तमध्ये गेल्या 6 महिन्यांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मे महिन्यात एका बसवर केलेल्या हल्ल्यात 26 जण ठार झाले होते, तर त्याआधी एप्रिलमध्ये 2 शहरांतील आत्मघाती हल्ल्यात 46 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. 2011 च्या बंडानंतर सिनाई प्रांतात अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यावर्षी झालेल्या बंडात राष्ट्राध्यक्ष हुस्नी मुबारक यांची सत्ता गेली होती.

२४ नोव्हेंबर २०१७

भारतीय नौसेनेमध्ये पहिली महिला पायलट

        शुभांगी स्वरूपच्या रूपाने भारतीय नौसेनेला पहिली महिला पायलट मिळाली असून, लवकरच ती मेरिटाईम रिकानकायसन्स विमानाचे सारथ्य करणार आहे. याशिवाय नेव्हल आर्ममेंट इन्स्पेक्टर (एनआयए) या नौदलाच्या विभागातही पहिल्यांदाच तीन महिला अधिकारी रुजू झाल्या आहेत. यात नवी दिल्लीची अस्ता सेहगल, पाँडेचेरीची ए. रूपा आणि केरळची साक्ती माया यांचा समावेश आहे. नौदलाच्या केरळमधील एझीमाला अ‍ॅकॅडमीत नेव्हल ओरियन्टेशन कोर्स पास झाल्यानंतर पासिंग आऊट परेडमध्ये या चौघी सहभागी झाल्या.

       नौदलाच्या विमान उड्डाण विभागात महिला अधिकारी असल्या तरी त्यांच्याकडे वाहतूक नियंत्रण, तसेच दळणवळण आणि शस्त्रास्त्रे असलेल्या विमानांवरील देखरेखीची जबाबदारी असते. मात्र, शुभांगीच्या रूपाने पहिल्यांदाच एक महिला पायलट असणार आहे. 20 वर्षीय शुभांगी उत्तर प्रदेशची असून, तिचे वडीलही नौदलात अधिकारी आहेत. नौदलासाठी लागणारी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांची तपासणी आणि मूल्यांकनाचे काम एनआयए या विभागाकडे असते. प्रत्यक्षात जबाबदारी घेण्यापूर्वी या चौघींनाही व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती नौदलाचे प्रवक्ते कमांडर श्रीधर वारियर यांनी दिली. शुभांगीला  हैदराबादच्या वायुदलाच्या अ‍ॅकॅडमीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

नवा आयोग, नवी आव्हाने

        केंद्रीय मंत्रिमंडळाने अपेक्षेनुसार 15 वा वित्त आयोग स्थापण्याच्या निर्णयाला संमती दिली आहे. प्रामुख्याने केंद्र आणि राज्यांमध्ये महसूल विभागणीच्या शिफारशींसाठी स्थापन केलेल्या या आयोगाचा उर्वरित तपशील लवकरच जाहीर होईल. आयोगाच्या स्थापनेसंबंधातील नियम आणि निकषांना अंतिम स्वरूप प्राप्त होण्यासाठी आयोगाचे अध्यक्ष आणि त्याचे सदस्य यांची नियुक्ती महत्त्वाची आहे. अध्यक्षपद कोणाकडे जाईल, याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी सध्या जी चर्चा सुरू आहे, ती पाहता माजी वित्त सचिव एन. के. सिंग हे त्या पदावर येतील, असे दिसते.

      14 व्या आयोगाच्या शिफारसी मार्च 2020 पर्यंत लागू असण्याचे मान्य केले गेले असून नव्या वित्त आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 पर्यंत होईल. देशात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू केल्यानंतरच्या कालखंडात जमा होणार्‍या अप्रत्यक्ष करांची वाटणी केंद्र आणि राज्यांत तसेच अन्य संस्थांत कोणत्या प्रमाणात व्हावी, याचे सूत्र हा आयोग निश्चित करणार आहे. म्हणूनच या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी आधीच्या वित्त आयोगाच्या तुलनेत सर्वस्वी वेगळ्या असतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

      केंद्र आणि राज्यांदरम्यान महसूल विभागणीचे बदललेले निकष तसेच जीएसटीच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही अपेक्षा रास्तच आहे. आयोगाचे काम सुरू होते ते अध्यक्ष आणि सदस्य नेमणुकीच्या प्रक्रियेची अधिसूचना काढल्यानंतरच. त्यामुळे ही अधिसूचना कधी निघते ते आता पाहावे लागेल. सध्या एन. के. सिंग यांच्या नावाव्यतिरिक्त अन्य कोणतेही नाव चर्चेत नाही. तसेच त्यांच्या नावाला अनुकूलता लाभण्यास काही महत्त्वाची कारणे असल्याने तेच नाव नक्की होण्यात सध्यातरी काही अडचण दिसत नाही. त्यांची पहिली जमेची बाजू म्हणजे ते माजी महसूल सचिव होते आणि त्यात त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे पहिले एनडीए सरकार असताना ते केंद्रीय सचिव होते. त्यांच्या या अनुभवाचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न सरकार करेल, हे निश्चित.

       वित्तीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापनाचा कायदा अभ्यासून पुढील दिशा सुचविण्याचे काम ते आधीपासूनच करीत होते. हे काम त्यांच्याकडे याच सरकारने दिले होते. त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. मनमोहन सिंग सरकारने स्थापन केलेल्या 14 व्या वित्त आयोगाने राज्यांना 32 ऐवजी 42 टक्के असा करसंकलनातील जादा वाटा देण्याची शिफारस केली होती. ही शिफारस 2020 सालापर्यंत स्वीकारण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुढील 5 वर्षांसाठी नवीन सूत्रावली या नव्या आयोगाला तयार करावी लागेल. जीएसटी या नवीन करव्यवस्थेची कामगिरी जोखून नेमका महसूल किती प्राप्त होईल याचा आढावाही घ्यावा लागेल. शिवाय, आधीचा नियोजन आयोग गुंडाळून त्या जागी नवा नीती आयोग आल्याने 5 वर्षांचा आर्थिक आढावा घेणारी यंत्रणा सरकारकडे सध्या नाही. अशा स्थितीत नवे सूत्र ठरवणे, ही सर्वाधिक आव्हानात्मक गोष्ट असणार आहे. ते वित्त आयोगाला प्राधान्याने करावे लागणार आहे.

२३ नोव्हेंबर २०१७

सुखोई जेट विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

      भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसची Brahmos भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30MKI या जेट विमानावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली. सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आली. आजवर उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमांतून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, भारताने पहिल्यांदाच जेट विमानाचा अशा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करुन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन इतिहास घडवला.

तोंडात सर्वाधिक स्ट्रॉ ठेवण्याचा विश्‍वविक्रम

      जगभरात अनेक प्रकारचे विक्रम होत असतात. आता ओडिशातील एका तरुणाने तोंडात सर्वाधिक स्ट्रॉ ठेवण्याचा विश्‍वविक्रम केला आहे. 23 वर्षांच्या मनोजकुमार महराणा याने आपल्या तोंडात तब्बल 459 स्ट्रॉ ठेवल्या. गिनिज बुकने त्याच्या विक्रमाची नोंद केली आहे.

     याबाबतचा जुना विक्रम गेली आठ वर्षे अबाधित होता. हे सर्व स्ट्रॉ केवळ तोंडात ठेवणेच गरजेचे नव्हते, तर तशा स्थितीत किमान दहा सेकंद एकही स्ट्रॉ न पाडता राहणेही गरजेचे होते. यावेळी हातांचा वापर करण्यासही मनाई होती. अर्थात सर्व स्ट्रॉ एकत्र राहावेत, यासाठी रबर बँडचा वापर केला जाऊ शकत होता. मनोजने ही किमया करून दाखवली आणि त्याच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली. आपल्याला लहानपणापासूनच गिनिजमध्ये आपले नाव असावे अशी इच्छा होती. याबाबतचा जुना विक्रम करणार्‍या सिमोन एलमोर याच्याविषयी समजल्यावर त्याने असाच विक्रम करण्याचे ठरवले. त्याने जर्मनीत 400 स्ट्रॉ तोंडात धरण्याचा विक्रम केला होता.

२२ नोव्हेंबर २०१७

प्रधानमंत्री मातृवंदना योजना

       पहिल्या प्रसूतीवेळी मातांना 5,000 रुपयांचे अनुदान देणारी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ 1 जानेवारी 2018 पासून महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्याच्या शासकीय व निमशासकीय सेवेत असणार्‍या महिला वगळता सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहतील. विशेष म्हणजे 2017 मध्ये पहिली प्रसूती झालेल्या माताही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. 2016 मध्ये भारतातील अन्य राज्यांमध्ये केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची ही योजना सुरू करण्यात आली. मात्र महाराष्ट्रामध्ये ही योजना महिला व बालकल्याण विभागाने राबवायची की आरोग्य विभागाने राबवायची याचा निर्णय लवकर झाला नाही. अखेर ही योजना आरोग्य विभागाने राबविण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यानुसार नियोजनही सुरू झाले आहे.

      अधिकाधिक गरोदर मातांनी शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी नोंद करावी. त्यानिमित्ताने त्या महिलेचे आरोग्य कार्ड तयार व्हावे आणि प्रसूतीनंतर बाळाला आवश्यक त्या सर्व लसी दिल्या जाव्यात, हे उद्देश ठेवून ही योजना भारतभर लागू केली आहे. तिची अंमलबजावणी आता महाराष्ट्रात होणार आहे. अगदी खासगी रुग्णालयातही प्रसूती झाली तरी त्या मातेला हे अनुदान मिळणार आहे. मात्र पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात नोंद करून आरोग्य कार्ड तयार करून घेणे बंधनकारक राहणार आहे.

तीन टप्प्यांत मिळणार पैसे -

*    गरोदर मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर मिळणार 1,000 रुपये.

*    आधार कार्ड, बॅँकेच्या खात्याची माहिती दिल्यानंतर 180 दिवसांनंतर मिळणार 2,000 रुपये.

*    प्रसूतीनंतर बाळाला सर्व लसी दिल्याची खात्री झाल्यानंतर मिळणार 2,000 रुपये.

२२ नोव्हेंबर २०१७

प्रधानमंत्री मातृवंदना योजना

       पहिल्या प्रसूतीवेळी मातांना 5,000 रुपयांचे अनुदान देणारी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ 1 जानेवारी 2018 पासून महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्याच्या शासकीय व निमशासकीय सेवेत असणार्‍या महिला वगळता सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहतील. विशेष म्हणजे 2017 मध्ये पहिली प्रसूती झालेल्या माताही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. 2016 मध्ये भारतातील अन्य राज्यांमध्ये केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची ही योजना सुरू करण्यात आली. मात्र महाराष्ट्रामध्ये ही योजना महिला व बालकल्याण विभागाने राबवायची की आरोग्य विभागाने राबवायची याचा निर्णय लवकर झाला नाही. अखेर ही योजना आरोग्य विभागाने राबविण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यानुसार नियोजनही सुरू झाले आहे.

      अधिकाधिक गरोदर मातांनी शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी नोंद करावी. त्यानिमित्ताने त्या महिलेचे आरोग्य कार्ड तयार व्हावे आणि प्रसूतीनंतर बाळाला आवश्यक त्या सर्व लसी दिल्या जाव्यात, हे उद्देश ठेवून ही योजना भारतभर लागू केली आहे. तिची अंमलबजावणी आता महाराष्ट्रात होणार आहे. अगदी खासगी रुग्णालयातही प्रसूती झाली तरी त्या मातेला हे अनुदान मिळणार आहे. मात्र पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात नोंद करून आरोग्य कार्ड तयार करून घेणे बंधनकारक राहणार आहे.

तीन टप्प्यांत मिळणार पैसे -

*    गरोदर मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर मिळणार 1,000 रुपये.

*    आधार कार्ड, बॅँकेच्या खात्याची माहिती दिल्यानंतर 180 दिवसांनंतर मिळणार 2,000 रुपये.

*    प्रसूतीनंतर बाळाला सर्व लसी दिल्याची खात्री झाल्यानंतर मिळणार 2,000 रुपये.

वर्धा रेल्वेस्थानकाचा स्वच्छतेत देशात 36 वा तर विभागात सातवा क्रमांक

      गांधी जिल्हा म्हणून वर्ध्याची ओळख आहे. यामुळे महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून वर्धा रेल्वे स्थानकात ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’ अभियान राबविले. या सफाई अभियानात वर्धा रेल्वे स्थानकाला देशात 36 वा, तर मध्य रेल्वे विभागात 7 वा क्रमांक प्राप्त झाला आहे. याचे श्रेय सफाई कामगार व अधिकारी यांना दिले जात आहे.

     विदर्भ युवक स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्थेला 2013 मध्ये वर्धा रेल्वे स्थानकाचा सफाईचे कंत्राट मिळाले. तेव्हपासून संस्थेने वर्धा रेल्वेस्टेशनने सफाईकडे विशेष लक्ष दिले. सदर काम संस्था यांत्रिकी पद्धतीने करीत आहे. संस्थेने सफाई यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली. या यंत्रांद्वारे वर्धा रेल्वेस्टेशनची सफाई केली जात आहे. स्टेशनवरील प्रवाशांनीही सफाई अभियानात सहभागी होऊन स्टेशन स्वच्छ राहील याची दक्षता घेतल्याचे दिसून आले. रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी वर्धा रेल्वे स्थानकाची स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले आहे.

झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष मुगाबेंचा राजीनामा

      झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी पक्षाने त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. त्यांनी त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची तयारी सुरु केली होती. उपराष्ट्रपती इमर्सन नांगागवा यांना पदावरून दूर केल्यानंतर रॉबर्ट मुगाबे यांच्या विरोधात पक्षाने कारवाई सुरु केली होती. मुगाबे यांना त्यांची पत्नी ग्रेस यांना राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान करायचे होते. मात्र, यास नांगागवा यांचा विरोध होता. त्यामुळे नांगागवा यांनाच पदावरून दूर करण्यात आले. यानंतर लष्कराने मुगाबे यांना नजर कैदेत ठेवले होते, तर पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी त्यास नकार दिल्याने महाभियोगाची प्रक्रिया सुरू केली आहे.

    मुगाबे यांच्यावर महाभियोगाची कारवाई संसदेत सुरु करण्यात आली त्यावेळी मधेच सभागृह अध्यक्षांनी कारवाई मध्येच थांबवली आणि मुगाबे यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. सभागृह अध्यक्षांनी मुगाबे यांचा राजीनामा वाचून दाखवला ‘मी रॉबर्ट मुगाबे संविधावाच्या कलम 96 नुसार माझ्या पदाचा मी तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे.’ त्यानंतर सभागृहात एकच जल्लोष सुरु झाला. मुगाबे हे जगातील सर्वात जास्त काळ सत्तेत असणारे राष्ट्राध्यक्ष होते. 1980 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी झिम्बाब्वेला स्वातंत्र्य दिले. तेव्हापासूनन ते सत्तेत होते.

२१ नोव्हेंबर २०१७

किसन, ताईची राष्ट्रीय सुवर्णभरारी

    आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथे सुरू असलेल्या 33 व्या कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. 10,000 मीटर गटात धावताना मुलांमध्ये किसन तडवी, तर 800 मीटर मुलींमध्ये ताई बामणे हिने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. महाराष्ट्रकडून सहभागी होताना किसनने घवघवीत यश मिळविले. 10,000 मीटर गटात त्याने 30 मिनिटे 41.57 सेकंद अशी वेळ नोंदवताना सुवर्णपदक पटकावले, तर उत्तर प्रदेशचा अर्जुन कुमार 30 मिनिटे 47,91 सेकंद अशी वेळ नोंदवीत द्वितीय स्थानावर राहिला. मोहन सैनी या उत्तराखंडच्या खेळाडूने 31 मिनिटे 12.45 सेकंद अशी वेळ नोंदवत तृतीय क्रमांकासह ब्राँझपदकाची कमाई केली. मुलींमध्ये 800 मीटर गटात धावताना ताई बामणे हिने 2 मिनिटे 13.62 सेकंद अशी वेळ नोंदवत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. या गटातून केरळची ए. एस. सँड्रा हिने 2 मिनिटे 17.24 सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. तेलंगणाची डी भाग्यलक्ष्मी 2 मिनिटे 17.54 सेकंद अशी वेळ नोंदवत तिसर्या क्रमांकासह ब्राँझपदकाची मानकरी ठरली. किसन आणि ताई या खेळाडूंना महिंद्रा अँड महिंद्राने पुरस्कृत केले आहे.

डीएसपी ब्लॅकरॉकची नवी गुंतवणूक योजना

     मालमत्ता व्यवस्थापनात आघाडीवर असलेल्या डीएसपी ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट कंपनीने ‘ब्लॅकरॉक एसीई फंड सीरिज 1’ ही नवी गुंतवणूक योजना बाजारात आणली आहे. या योजेनतील निधी शेअर बाजारातील लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मल्टी कॅप शेअर्समध्ये गुंतवला जाणार आहे. 12 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान ही योजना गुंतवणूकदारांसाठी खुली आहे. एसीई फंडाद्वारे पारंपरिक गुंतवणूकदार आणि नवख्या गुंतवणूकदारांसाठी बाजारात विस्तार करायची संधी कंपनीने उपलब्ध केली आहे. 37 महिन्यांचा कालावधी असलेल्या या फंडातील 80 टक्के निधी शेअर्समध्ये गुंतवण्यात येईल. किमान 1000 रुपयांपासून या फंडामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या फंडामध्ये कंपनीच्या विश्लेषकांच्या समुहाने शिस्तबद्ध प्रक्रियेने निवडलेल्या शेअर्सचे मिश्रण आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी : दलवीर भंडारी

     भारताचे दलवीर भंडारी यांचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनने क्रिस्टोफर ग्रीनवुड यांचे नामांकन मागे घेतल्याने भंडारी यांची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भंडारी यांची ही दुसरी टर्म आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 न्यायाधीशांची संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे 9 वर्षांसाठी नेमणूक होते. मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड केली होती. भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी 2018 रोजी संपत असून या पदासाठी भारताने पुन्हा न्या. भंडारी यांना नामांकन जाहीर केले होते. न्या. भंडारी यांच्या फेरनियुक्तीत ब्रिटनचा अडथळा होता. ब्रिटनने या पदासाठी क्रिस्टोफर ग्रीनवुड यांना नामांकन जाहीर केले होते. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ब्रिटनचा समावेश असून अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन या देशांचे ग्रीनवुड यांना समर्थन होते. त्यामुळे ब्रिटनचे पारडे जड दिसत होते. अकरा फेरीत संयुक्त राष्ट्राच्या महासभेत न्या. भंडारी यांना बहुमत मिळाले होते. मात्र सुरक्षा परिषदेत भंडारी पिछाडीवर होते. यासाठी 12 वी फेरी पार पडणार होती. मात्र त्यापूर्वीच ब्रिटनने माघार घेतली आणि न्या. भंडारी यांचा मार्ग मोकळा झाला. निकटच्या मित्राच्या (भारत) विजयाचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ब्रिटनने दिली. भंडारी यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1947 मध्ये झाला. वकिलीचा वारसा त्यांना आजोबा बी. सी. भंडारी आणि वडील महावीरचंद भंडारी यांच्याकडून मिळाला. भंडारी यांनी राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. यानंतर अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. काही काळ शिकागोत वकिली केल्यानंतर ते भारतात परतले.

       1973 ते 1976 या काळात राजस्थान हायकोर्टात वकिली केली. तिथून 1977 मध्ये ते दिल्ली हायकोर्टात वकिली करण्यासाठी गेले. या क्षेत्रातील 23 वर्षांच्या अनुभवानंतर 1991 साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर 2005 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली सुनावलेल्या देहदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती. या प्रकरणातील 15 न्यायाधीशांमध्ये न्या. दलवीर भंडारी यांचा समावेश होता.

२० नोव्हेंबर २०१७

मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार

    माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. 2004-14 या काळात सिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेले निःशस्त्रीकरण, विकास आणि जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढविल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. इंदिरा गांधी मेमोरिअल ट्रस्टच्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय ज्युरींनी सर्वांनुमते त्यांची निवड केली. मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करीत असताना 2004-14 या 10 वर्षांच्या काळात त्यांनी निःशस्त्रीकरणासाठी मोठे योगदान दिले. देशाच्या आर्थिक विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा उंचावली होती. या सर्व बाबींचा विचार करून त्यांची निवड केली आहे.’ पंतप्रधानपदाची मुदत दोन वेळा पूर्ण करणारे ते तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या काळात भारत-अमेरिका अणू करार हा ऐतिहासिक द्विपक्षीय करार झाला होता. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम करताना आर्थिक सुधारणेसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे, असेही ट्रस्टने म्हटले आहे.

माजी विम्बल्डन चॅम्पियन जाना नोवोत्नाचे निधन

    माजी विम्बल्डन चॅम्पियन जाना नोवोत्नाचे रविवारी निधन झाले. ती 49 वर्षांची होती. जाना चेक रिपब्लिकची नागरिक होती. तिला दीर्घकाळापासून कर्करोगाने ग्रासले होते. तिने तिच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत 17 ग्रँड स्लॅम जिंकले. दुहेरी प्रकारात जानाच्या नावावर 76 विजेतेपदे होती. तर एकेरी प्रकारात 24 विजेतेपदांवर जानाने नाव कोरले. 1988 मध्ये तिला ऑलिम्पिकचे रौप्यपदक मिळाले. तर 1996 मध्ये अटलांटा गेम्समध्ये तिने रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने जाना नोवोत्नाच्या निधनाच्या संदर्भातले वृत्त दिले आहे.

2005 मध्ये तिने कोचिंग करायला सुरूवात केली. 2013 मध्ये जाना निवृत्त झाली. 1993 मध्ये झालेल्या विम्बल्डन स्पर्धेतील तिचा खेळ क्रीडा प्रेमींच्या स्मरणात राहिला आहे. स्टेफी ग्राफसोबत तिची लढत झाली होती. तिच्यासोबत खेळताना जाना नोवोत्नाने पहिल्या सेटमध्ये 6-7, 6-1, 4-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र स्टेफी ग्राफने दुसर्‍या सेटमध्ये चांगली कामगिरी करत तिला हरवले होते. टेनिसमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करणार्‍या जानाची कर्करोगासोबतची लढाईही सुरूच होती.

१९ नोव्हेंबर २०१७

भारताची ‘मिस वर्ल्ड’ : मनुषी छिल्लर

       वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय मनुषी छिल्लरने 2017 च्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा किताब पटकावून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. प्रियांका चोप्रानंतर (2000) तब्बल 17 वर्षांनी भारतीय सुंदरीने जगातील ही प्रतिष्ठेची सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. चीनच्या सान्या शहरात झालेल्या या स्पर्धेत 108 देशांतील स्पर्धकांवर मात करून मनुषीने हा किताब जिंकला. अंतिम फेरीपूर्वी मनुषीने ‘हेड टू हेड चॅलेंज’ आणि ‘ब्युटी विथ दी पर्पज’ हे दोन किताबही आपल्या नावे केले होते.

     तब्बल 17 वर्षांनी भारतीय सुंदरीने मिस वर्ल्डचा किताब जिंकला आहे. भारताची मिस इंडिया छिल्लरने ही स्पर्धा जिंकून ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा यांच्या रांगेत स्थान मिळवले.

      चीनमधील सान्या येथे पार पडलेल्या या स्पर्धेत जगभरातील 118 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. दुसर्‍या क्रमांकाचा बहुमान मिस मेक्सिकोने, तर तिसर्‍या क्रमांकाचा बहुमान मिस इंग्लंडने मिळवला. मनुषी छिल्लर ही हरियाणातील सोनिपत येथील राहणारी आहे. ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे. 7 मे 1997 रोजी दिल्लीत मनुषीचा जन्म झाला. मनुषी छिल्लरला फायनल राऊंडमध्ये कोणत्या प्रोफेशनमध्ये सर्वाधिक सॅलरी द्यायला हवी आणि का, असा प्रश्न ज्युरी मेंबर्सनी विचारला होता. त्यावर मनुषी म्हणाली, आईला सर्वात जास्त सॅलरी मिळायला हवी. 

शेफाली रंगनाथन सिएटलच्या उपमहापौर

    वाहतूक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावल्यानंतर चेन्नईच्या 38 वर्षीय शेफाली रंगनाथन यांची अमेरिकेच्या सिएटल शहराच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे.

     रंगनाथन यांची नियुक्ती महापौर प्रबंधक जेनी दुरकान यांनी केली. शेफाली नेहमी शाळा व कॉलेजमध्ये अव्वल होत्या. येथे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच शेफाली यांना वॉशिंग्टन ’डीसी’मध्ये पर्यावरण विषयावर काम करण्यासाठी अमेरिकन सरकारकडून ऑफर आली होती.

     वाहतूक क्षेत्रात तिने केलेली कामगिरी वाखणण्याजोगी आहे. तिचे हे यश देशातील व देशा बाहेरील तरुण मुलींना प्रेरणदायी ठरेल हे नक्की. अशी आशा शेफाली यांचे वडील प्रदीप रंगनाथन यांनी या नियुक्ती निमित्त व्यक्त केली.

     2001 मध्येच शेफाली या अमेरिकेत आल्या होत्या. त्यानंतर अमेरिकन विद्यापीठात त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शेफाली 2014-15 मध्ये मध्यवर्गीय कार्यकारी म्हणून ट्रान्सपोर्टेशन चॉइसेस कोलिशनमध्ये सहभागी झाल्या होत्या. नंतर त्यांनी कार्यकारी संचालक म्हणूनही काम पाहिले.

१८ नोव्हेंबर २०१७

चीनचे विशेष राजदूत उत्तर कोरियात

      उत्तर कोरियासोबत भविष्यातही सहकार्य कायम राहणार असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. उत्तर कोरियाच्या कथित अण्वस्त्रांवरून आंतरराष्ट्रीय संघर्ष चिघळण्याची शक्यता असताना चीनच्या वरीष्ठ राजनैतिक अधिकार्‍यांनी उत्तर कोरियाला भेट दिली.

      चीनचे विशेष राजदूत व उत्तर कोरियाचे उच्चपदस्थ अधिकारी यांची भेट झाली. या भेटीदरम्यान उत्तर कोरियाच्या शस्त्रसंकटाचा उल्लेख झाला नाही. चीन हा उत्तर कोरियाच्या आण्विक शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांचा विकास करण्याबाबत दखल घेत आहे. पण, अलीकडच्या काळात उत्तर कोरियासेबत शस्त्रास्त्रांचा विनिमय मर्यादित झालेला दिसतो.

       चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख साँग ताओ यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या निकालासंबंधी चर्चा करण्यासाठी प्योंगयांगला भेट दिली. चीनी प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्यावतीने साँग ताओ हे उत्तर कोरियाचे उच्चपदस्थ अधिकारी च्यो राँग हे यांना भेटले. साँग ताओ व च्यो राँग हे यांनी आणि दोन्ही देशांमधील संबंधांबद्दलही चर्चा केली.

     ’दोन्ही देशांच्या नागरीकांना फायदा व्हावा यासाठी दोन्ही पक्ष व उभय देशांमधील संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.’ असेही चीनच्या आंतरराष्ट्रीय विभागाने स्पष्ट केले आहे.

एक ’लक्ष्य’-1 अब्ज, मोदी सरकारचे मेगा मिशन

     ’मूडीज’च्या रेटिंगनंतर मूडमध्ये आलेल्या मोदी सरकारने आता आणखी एक लक्ष्य निश्चित केले आहे. एक अब्ज आधार क्रमांक एक अब्ज बँक खाती आणि एक अब्ज मोबाईल क्रमांकांना जोडण्यासंदर्भातील योजनेवर सरकारचा विचार सुरु आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदी, जीएसटी आणि आधार जोडणीसारख्या निर्णयांचे ’मूडीज’ आणि जागतिक बँकेने कौतुक केले आहे.

       यानंतर सरकार ’एक अब्ज आधार-एक अब्ज बँक खाती-एक अब्ज मोबाईल क्रमांक’ ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्याचा विचार करत आहे. सूत्रांनुसार, नोटाबंदीमुळे चलनातून बाद झालेल्या 6 लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा, बँक खात्यांची संख्या आणि डिजिटल पेमेंटला चालना या बाबी लक्षात घेऊन मोदी सरकारने हे लक्ष्य निश्चित केले आहे. ’वन प्लस-वन प्लस-वन प्लस’चा निर्धारित आकडा लवकरच गाठला जाईल, मात्र ते लक्ष्य कोणत्या तारखेला पूर्ण होईल, ते निश्चित सांगता येणार नाही, अशी चर्चा सरकारी अधिकार्‍यांमध्ये सुरू आहे.

१७ नोव्हेंबर २०१७

झिम्बाब्वे

      नोव्हेंबर 2017 मध्ये झिम्बाब्वे स्वतंत्र देश झाल्यापासून त्यावर सत्ता गाजवणारे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना लष्कराने नजरकैदेत टाकल्यामुळे देशात नवा आणि गहन राजकीय पेच निर्माण झाला. राजधानी हरारेमधील रस्त्यांवर कधीही रणगाडे आले नव्हते आणि आता चहुबाजूंनी ते दृष्टीस पडत आहेत. संक्रमणकालीन सरकार स्थापन झाल्याने आणि  रॉबर्ट मुगाबे यांचे राजकीय विरोधक पुन्हा सक्रिय झाले आहेत. या हंगामी सरकारमध्ये विरोधकांचा समावेश आहे. 2018 साली तेथे निवडणुका होणार असून तोवर अथवा लवकर निवडणुका होईतो जबाबदारी हंगामी सरकारवर राहील. मुगाबे यांचे मुख्य विरोधक, माजी पंतप्रधान मॉर्गन स्वानगीराय हे कर्करोगावरील उपचार संपवून मायदेशी परतले आहेत.
      * 93 वर्षीय मुगाबे चार दशकांपूर्वी झिम्बाब्वे ब्रिटनपासून स्वतंत्र झाल्यापासून सत्तेवर आहेत. त्यांनी अशी दीर्घकाळ सत्ता भोगताना भ्रष्टाचार आणि निवडणुकीत गैरप्रकार केले. गेल्या काही दिवसांपासून मुगाबे यांच्या प्रशासनावरील पकडीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यांचे लष्कराशी तणाव वाढले. मुगाबे यांच्या पक्षाच्या वतीने लष्करप्रमुख जनरल कॉन्स्टान्टिनो चिवेंगा यांच्यावर राजद्रोहाचा आरोप केल्याच्या दुसर्‍याच दिवशी लष्कराकडून त्यांना नजरकैदेत टाकून रस्त्यांवर रणगाडे आणले गेले. 

’भारतनेट’च्या दुसर्‍या टप्प्याला प्रारंभ

      14 नोव्हेंबर 2017 रोजी देशातील सर्व ग्रामपंचायतींना हाय स्पीड ब्रॉड बँडद्वारे जोडणार्‍या महत्त्वाकांक्षी ’भारतनेट’ प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याला केंद्रीय कायदा व माहिती-तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.  ग्रामीण भागापर्यंत ब्रॉडबँड सेवा पोचविण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू आणि झारखंड या राज्यांशी सामंजस्य करार करण्यात आले. 
       * रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन आदी दूरसंचार कंपन्यांनी सरकारकडून बॅन्डविड्थ खरेदी करून ग्रामीण भागात सेवा विस्तारासाठी तयारी दर्शविली आहे. या करारापोटी रिलायन्स जीओने 30 हजार ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवा पुरविण्यासाठी 13 कोटी रुपये ग्राहक शुल्क सरकारला दिले, तर भारती एअरटेलने 30 हजार 500 गावांसाठी 5 कोटी रुपये, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांनी अनुक्रमे  11 व  5 लाख रुपये दिले. 
      * भारतनेट’ प्रकल्पासाठी एकूण खर्च 45 हजार कोटी रुपये होणार असून, त्यातील 11,200 कोटी रुपये पहिल्या टप्प्यावर खर्च झाले आहेत. या प्रकल्पातील सर्व साहित्य ’मेक इन इंडियां’तर्गत तयार केलेले आहे.
      *  दुसर्‍या टप्प्याअंतर्गत मार्च 2019 पर्यंत आणखी 1.50 लाख ग्रामपंचायती जोडल्या जाणार असून या टप्प्यासाठी 34 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 
      * डिसेंबर 2017 अखेरपर्यंत देशातील 3 लाख गावांमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू होणार आहे. केरळ, कर्नाटक आणि केंद्रशासित प्रदेशांतर्गत येणार्‍या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड सेवा पोचली आहे.
     * दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जीडीपी’मध्ये 3.3 टक्के (4.5 लाख कोटी रुपये) वृद्धी होईल. तसेच इंटरनेट वापरातही 10 टक्क्यांनी वाढ होईल.  10 कोटी मनुष्य दिवसांचा रोजगारही यातून निर्माण होईल.
     * पहिल्या टप्प्यात 1 लाख ग्रामपंचायतींना जोडण्याचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट डिसेंबर 2017 अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. 
     * दुसर्‍या टप्प्यात 10 लाख किलोमीटर अतिरिक्त ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे 1.50 लाख ग्रामपंचायतींना जोडण्याचे उद्दिष्ट आहे. 
    * ग्रामीण भागात ब्रॉडबँड आणि वायफाय सेवा देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना 75 टक्के सवलतीच्या दराने बॅन्डविड्थ मिळेल. यामुळे टेलिकॉम कंपन्या ग्रामीण भागात 2 मेगाबाईट प्रतिसेकंद या वेगाने डेटा देतील अशी अपेक्षा आहे.
प्रकल्पाचा आवाका... 
45 हजार कोटी रुपये  - एकूण खर्च 
11,200 कोटी रुपये  - पहिल्या टप्प्यावर झालेला खर्च 
34 हजार कोटी रुपये  - दुसर्‍या टप्प्यासाठीचा खर्च 
10 टक्के  - इंटरनेट वापरातील वाढ 
10 कोटी  - मनुष्य दिवसांच्या रोजगाराची निर्मिती 

पंतप्रधान आवास योजना एफ.एस.आय.मध्ये वाढ

     पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचे चटई क्षेत्रफळ (एफ.एस.आय.) वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मध्यम उत्पन्न योजना अर्थात एमआयजी श्रेणी - 1 साठी चटई क्षेत्रफळ 90 चौरस मीटरच्या तुलनेत 120 चौरस मीटर इतके वाढविण्यात आले आहे, तर एमआयजी-2 श्रेणीचे चटई क्षेत्रफळ 110 चौरस मीटरच्या तुलनेत 150 चौरस मीटरपर्यंत वाढविण्यात आले आहे.

पुढील 100 वर्षांमध्ये अरबी समुद्राची पातळी 15.26 सेमीने वाढणार

      नासाच्या अहवालानुसार, जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढल्यामुळे अनेक शहरांना धोका आहे. ग्रॅडिएंट फिंगरप्रिंट मॅपिंगच्या मदतीने नासाने समुद्र पातळीत होणार्‍या वाढीची आकडेवारी गोळा केली. समुद्राच्या किनार्‍यावर असलेल्या जगभरातील 293 शहरांसमोर येत्या काळात किती मोठे संकट आहे, याचा अभ्यास नासाकडून करण्यात आला. त्यानुसार मुंबई, कर्नाटकमधील मँगलोर, आंध्रप्रदेशातील काकिनाडा या शहरांना समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे धोका आहे.
या अहवालातील नोंदी-
* जागतिक तापमान वाढीमुळे पुढील 100 वर्षांमध्ये हिमनग वितळण्याची प्रक्रिया वेगात होईल. यामुळे महासागर, उपसागर व समुद्रातील पातळीत वाढ होईल. याचा सर्वाधिक धोका जपानमधील टोक्योला असेल. येत्या 100 वर्षांमध्ये टोक्योजवळील समुद्राच्या पातळीत 17.55 सेंटिमीटरने वाढ होईल.
* भारताबद्दल विचार केल्यास, समुद्राच्या पातळीचा सर्वाधिक धोका मँगलोरला आहे.  येत्या 100 वर्षांमध्ये मँगलोरजवळील अरबी समुद्राची पातळी 15.98 सेंटिमीटरने वाढेल. 
* पुढील 100 वर्षांमध्ये मुंबईजवळील अरबी समुद्रातील पाण्याची पातळी 15.26 सेंटिमीटरने वाढेल. 
* आंध्रप्रदेशमधील काकिनाडा जवळच्या बंगालच्या उपसागराची पातळी 15.16 सेंटिमीटरने वाढेल.

म्हैसूर पाक

     दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘म्हैसूर पाका’ची भौगोलिक ओळख (जिओग्राफिकल आयडेन्टिकेशन) मिळवण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडू ही दोन्ही राज्ये एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत.
      पश्रि्चम बंगाल आणि ओदिशामध्ये ‘रसगुल्ला’ मिठाईवरुन सुरु असलेला वाद संपला असताना कर्नाटक आणि तामिळनाडू ही दोन्ही राज्ये ‘म्हैसूर पाका’वरुन आमनेसामने आली आहेत. म्हैसूर पाकाचा शोध आपल्याच राज्यात लागला, असा या दोन्ही राज्यांचा दावा आहे. 
* 1853 मध्ये लॉर्ड मेकॉले यांनी भारतीय संसदेत बोलताना म्हैसूर पाकाचा उल्लेख केला होता. त्यामुळे म्हैसूर पाकाचा शोध तामिळनाडूमध्ये लागला, असा दावा तामिळनाडूने केला आहे. संसदेत 2 फेब्रुवारी 1853 रोजी भाषण करताना लॉर्ड मॅकेले यांनी म्हैसूर पाकाचा उल्लेख केला होता. ’म्हैसूर पाकाचा शोध एका मद्रासी व्यक्तीने लावला होता. बंगळुरुतील माझ्या एका मित्राने याबद्दलची माहिती मला दिली होती. तामिळ लोक मद्रासमध्ये म्हैसूर पाक बनवतात. 74 वर्षांपूर्वी म्हैसूर पॅलेसमधील एका वकिलाने म्हैसूर पाकाची कृती चोरली होती. त्याने मरण्याआधी म्हैसूरच्या राजाला पाककृती सांगितली. त्यामुळे म्हैसूरच्या राजाने त्या खाद्यपदार्थाला म्हैसूर पाक असे नाव दिले,’ असे मॅकेले यांनी म्हटले होते.
* कर्नाटकच्या लोकांनी मात्र तामिळनाडूतील जनतेचा दावा खोडून काढला आहे. मिठाईच्या नावावरुनच हा पदार्थ म्हैसूरमध्ये बनवण्यात आल्याचे स्पष्ट होते, असा दावा कर्नाटकने केला. 

प्लास्टिक बंदी

     राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. याबाबत आगामी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडण्यात येईल. राज्यात सध्या 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. आता सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
* 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे उत्पादन व वापरावर कायद्याने बंदी आहे. यातील पहिल्यां गुन्ह्यासाठी पाच हजार व दुसर्या गुन्ह्यासाठी दहा हजार दंडाची तरतूद आहे. 
* यापुढे बंदी घालण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर आढळल्यास विक्रेत्यांवर  परवाना रद्द करण्याची तसेच 3 ते 6 महिने शिक्षेची तरतूद कायद्यात करण्याचे विचाराधीन 

जलयुक्त शिवारात पुरंदर अव्वल

      दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामांची पाहणी केली. त्यानुसार जलयुक्त शिवार योजनेची चांगल्या दर्जाची कामे केल्याने पुरंदर तालुक्यास राज्यात प्रथम क्रमांक मिळाला.
* जलयुक्त शिवार अभियानात पुरंदर तालुका अव्वल - या तालुक्याला 35 लाख रुपयांचे बक्षिस मिळाले. 
* जलयुक्त शिवार अभियानात सर्वाधिक शिवाराची कामे करण्यात पुणे जिल्ह्यास दुसरा क्रमांक पटकविला. उत्तम योजना राबविल्याबद्दल पुणे जिल्ह्यास 30 लाखांचे बक्षीस जाहीर.
* पुणे विभागीय पातळीवर पानवडी आणि पुरंदर तालुक्यातील पिंगोरी या दोन गावांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळाला. या गावांना अनुक्रमे 1 लाख आणि 75 हजार रुपयांचे बक्षिस.
* राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे करण्यात आली होती. ओढा रुंदीकरण, बांध बंदिस्ती, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यासारख्या योजनांना प्राधान्य देण्यात आले. राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या माध्यमातून गावोगावी जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. अशा विविध कामांना नागरिक आणि शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात आले. उन्हाळ्यात गावोगावी झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे लाखो लिटर पाणी जमिनीत झिरपण्यास मदत झाली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात विहिरी, ओढे नाले तुडुंब वाहू लागले. राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे लाखो लिटर पाणी वाचविणे शक्य झाले. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध कामे केल्याने त्याचा फायदा ग्रामस्थांना होत आहे. 

हायपरलूप तंत्रज्ञानासाठी करार

     राज्य सरकार आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीशी करार केला. या सामंजस्य कराराद्वारे अहवाल तयार करून हायपरलूप आधारित प्रवासी यंत्रणा कार्यान्वित करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. सामंजस्य करारानंतर सहा आठवड्यांच्या आत डेटा तयार केला जाणार आहे. आंध्र प्रदेशमधील विजयवाडा आणि अमरावती या शहरांसाठी प्राथमिक अभ्यास केला गेला आहे. सध्या ही कंपनी यूएई, अमेरिका, कॅनडा, फिनलँड या देशांमध्ये सक्रीय आहे. 
कराराची वैशिष्ट्ये-
* पुणे आणि मुंबई विभागातील मार्गांचा प्राथमिक व्यवहार्यता अभ्यास करण्यात येणार.
* हायपरलूप तंत्रज्ञान लागू होऊ शकेल का, या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तसेच आर्थिक-सामाजिक घटकांचा विचार करता राज्यातील अन्य कोणत्या मार्गांवर ही सेवा सुरु करता येईल याचा कंपनी अभ्यास करणार .
* हायपरलूपसाठी योग्य ठिकाणांची निवड करणे, तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासली जाणार.
* हायपरलूपमुळे मुंबई- पुणे हे अंतर 14 मिनिटांमध्ये गाठता येईल. कारने मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी किमान 3 तास लागतात. 

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये ऊस शेतकर्‍यांचे आंदोलन

       अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये ऊस शेतकर्‍यांच्या आंदोलनास लागलेले हिंसक वळण आणि त्यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना दुर्दैवी आहे. या घटनेनंतर गंगामाई साखर कारखान्याच्या विरोधातील आंदोलनात तोडगा निघाला असला, तरी हे लोण या जिल्ह्यात अन्यत्र पसरले. 
        गेल्या काही वर्षांत राज्यात गाळप हंगाम सुरू होण्याची चाहूल शेतकरी संघटनांच्या आंदोलनांतून आणि परिषदांमधून लागत आहे. यंदाही याची पुनरावृत्ती झाली. मात्र, कोल्हापुरात सरकारच्या पुढाकाराने कारखाने आणि संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होऊन दराबाबत तोडगा निघाल्याने दिलासा मिळाला होता. कोल्हापुरातील तोडग्यानंतर राज्याच्या अन्य विभागांमध्ये याच सूत्राची अंमलबजावणी करण्याचे सर्वांनी मान्य केले होते. 
         कोल्हापुरापाठोपाठ सोलापूरमध्ये अशी बैठक झाली; परंतु नगर आणि मराठवाडा विभागांत हे घडले नाही. गेले दोन दिवस शेवगावात आंदोलन सुरू होते. मात्र कारखाना व्यवस्थापन आपल्या दरावर अडून राहिले आणि सरकारनेही या आंदोलनाकडे लक्ष दिले नाही. 
* वाजवी मूल्याच्या रकमा (एफआरपी) दिल्यानंतर अल्कोहोल, बगॅस अशा उपपदार्थांच्या विक्रीतून येणार्‍या अतिरिक्त रकमेचे शेतकरी व कारखाना यांच्यात 70 : 30 या प्रमाणात वाटप करण्याच्या सूत्राची तुरळक अपवाद वगळता कोणीही अंमलबजावणी केलेली नाही. बहुतांश कारखान्यांनी गेल्या वर्षीचा अंतिम दरही जाहीर केलेला नाही. 
* उसाच्या दराबाबतच्या या आंदोलनांना राजकीय पदर आहेत. 

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

      यवतमाळ जिल्ह्यात बीटी वाणांवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच्या नियंत्रणासाठी शेतकर्‍यांनी फवारणी केली. त्यामुळे विषबाधा होत 22 जणांचे बळी गेले तर 400 पेक्षा अधिक बाधित होत; त्यांच्यावर उपचाराची वेळ आली. त्यानंतरही बोंडअळी नियंत्रणात आली नाही. याची सरकारने गंभीर दखल घेत बोंडअळीला लवकर बळी पडणारे वाण विकसित करणार्‍या कंपन्यांविरोधात कारवाईची तयारी चालविली आहे. 
* ज्या शेतकर्‍यांच्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यांच्याकडून कृषी सहायकानी, नमुना जी (नियम 12 (1) नुसार प्रपत्र) भरून घेतला. त्यात बियाणे कोठून खरेदी केले, लॉट क्रमांक, किती एकरावर लावले, उगवणशक्ती अशी माहिती त्यावर शेतकर्‍याला द्यावी लागते.

विकासकामे

      भौगोलिक परिस्थितीमुळे महाराष्ट्रात सिंचनक्षमतेला मर्यादा आहेत. राज्याच्या वाट्याचे पाणी अडविण्यासाठी शिवसेना-भाजप युती सरकारने ‘कृष्णा खोरे विकास महामंडळ’ स्थापले. त्यापाठोपाठ विदर्भ, गोदावरी आणि तापी खोर्‍यातील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महामंडळे झाली. या मंडळांकडून प्रकल्पांची कामे सुरू झाली. यापैकी काही प्रकल्प पूर्णत्वास आले, तर काही पूर्ण झाले. त्यानंतर पैसा नसल्याने कामे रखडली. अनेक प्रकल्प 70-80 टक्के पूर्ण आहेत. अनुशेषाच्या मुद्द्यावर विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर राज्यपालांनी आखलेल्या सूत्रानुसार पैशाचे वाटप केल जाते.

* दुष्टचक्रात अडकलेल्या 107 प्रकल्पांसाठी 75 टक्के ‘नाबार्ड’कडून कर्ज मिळणार असले, तरी 25 टक्के निधी हा राज्याला उभा करावा लागेल. 
* पुण्याच्या रिंगरोडसाठी 1500 कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. 
* चाकण ते चौफुला या चार महामार्ग जोडणार्‍या प्रकल्पाला केंद्राची मदत.
* इंदूर ते मनमाड रेल्वेमार्गाला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हिरवा कंदील दाखविला. 

डाळ निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवले

      केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडीविषयक समितीने (सीसीईए) देशात डाळीचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर सर्वप्रकारच्या डाळींच्या निर्यातीवरील निर्बंध 16 नोव्हेंबर 2017 रोजी हटवले. देशांतर्गत बाजारात डाळींचे दर कोसळल्याने व शेतकर्‍यांना हमीभाव देण्यात सरकारला अपयश येऊ लागल्याने डाळींच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.

* देशात यापूर्वी दरवर्षी डाळींचे उत्पादन 179 लाख टन होते. 2016-17 पूर्वी डाळींचे उत्पादन आणि मागणी यात तफावत असल्याने निर्यातीवर निर्बंध होते. विक्रमी उत्पादन झाल्याने डाळीला योग्य भाव मिळत नव्हता. 
* वर्ष 2016-17 मध्ये 23 दशलक्ष टन इतके डाळींचे उत्पादन झाले होते. त्यानंतर सरकारने 20 लाख टन डाळीची शेतकर्यांकडून हमी भावाने खरेदी केली होती. 
* हरभरा डाळीचे उत्पादन 2015-16 मधील 7.06 दशलक्ष टनांच्या तुलनेत 2016-17 मध्ये 9.33 दशलक्ष टनापर्यंत वाढले. या डाळीच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 32 टक्क्यांनी वाढ झाली. अन्य डाळींच्या उत्पादनात सुमारे 22 टक्क्यांनी वाढ झाली.
* रब्बी हंगामातील विविध डाळींचे उत्पादन 2.47 दशलक्ष टनाच्या तुलनेत 3.02 दशलक्ष टन इतके झाले.
* वर्ष 2017-18 मध्ये  22.90 दशलक्ष टन इतके डाळींचे उत्पादन होण्याचा अंदाज

हायपरलूप इंडिया

        एलन मुस्क यांनी 2013 मध्ये ‘हायपरलूप’ची संकल्पना मांडली आणि या संकल्पनेचा विकास करण्यासाठी ती सर्वासाठी खुली केली. ही संकल्पना भारतात कशा प्रकारे राबविता येईल यासाठी पिलानी येथील ‘बिर्ला इन्स्टिट़यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील सिबेश कर याने ‘हायपरलूप इंडिया’ नावाचा एक ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करणार्‍या समूहाची स्थापना केली आणि या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना इंडियन बिझनेस स्कूल आणि आयआयएम अहमदाबाद यांनी सहकार्य केले. या प्रकल्पाची माहिती आयआयटीच्या तंत्र महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. ‘आयआयटी टेकफेस्ट’मध्ये त्याचे सादरीकरण झाले.  
* भारतीय बनावटीची ही कॅप्सूल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून ती फेब्रुवारी 2018 महिन्यात पूर्ण होणार आहे. तर जून 2018 महिन्यात कॅलिफोर्निया येथे त्याची पहिली चाचणी घेतली जाणार आहे.
* निति आयोग आणि डीपी वर्ल्ड इंडियाने या संकल्पनेवर काम करण्यासाठी संस्थेला प्रोत्साहन दिले.
* मुंबई ते अहमदाबाद प्रवास जलद होण्यासाठी 350 किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेन भारतात येणार आहे. पण या तंत्रज्ञानाला आव्हान देणारे आणि बुलेट ट्रेनपेक्षाही जलद प्रवास करणारी ‘हायपरलूप’ येत्या काळात भारतात दाखल करण्याचे स्वप्न वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी पाहिले असून ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर ही वाहतूक व्यवस्था अस्तित्वात आली तर 35 मिनिटांत मुंबई ते बंगळुरू प्रवास शक्य होणार आहे.
हायपरलूप - 
* हायपरलूप हा वाहतुकीचा नवीन प्रकार असून, कमी दाबाच्या निर्वात पोकळीमधून वाहतूक केली जाते. हा वाहतुकीचा जलद प्रकार असून, याचा वेग 670 मेगापॉवर हर्टझ् (1080 प्रतितास कि.मी.) असा राहणार आहे. 
* एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी रस्त्याच्या लगत किंवा रस्त्यापेक्षा उंच तसेच अगदी समुद्रातूनही मोठ़या वाहिन्या उभ्या केल्या जातात. या वाहिन्यांमधून ओर्का पॉड नावाचे वाहन प्रवास करते. एखाद्या मोठ़या कॅप्सूलच्या आकाराचे हे वाहन असून ते अंतराळ यानाच्या तंत्रज्ञानानुसार प्रवास करणार आहे.
* ही कार्यक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहतूकप्रणाली दोन तृतीयांश इतक्या किमतीत विकसित होणार आहे. 
* जागतिक स्तरावर नेदरलँड, अबुधाबी ते दुबई, स्टॉकहोम ते हेलसिंकी आदी ठिकाणी याच्या चाचण्या झाल्या आहेत.

सौरमालिकेमध्ये ’सुपर अर्थ ’ हा नववा ग्रह

      पृथ्वी असलेल्या सौरमालिकेमध्ये नववा ग्रह असल्याची माहिती नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी दिली. अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (कॅलटेक) ज्येष्ठ शास्त्रज्ञ कॉन्स्टंटिन बॅटजिन यांनी या नवव्या ग्रहाच्या अस्तित्वास पुष्टी देणारे किमान पाच पुरावे आढळल्याची माहिती दिली आहे. 
* सूर्यापासून नेपच्यून ग्रह असलेल्या अंतराच्या वीसपट अंतर सूर्य व या ग्रहामध्ये आहे. 
* या नवव्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या 10 पट असल्याचा अंदाज आहे. 
* हा नववा ग्रह ’सुपर अर्थ’ असू शकण्याचे सकारात्मक संकेत आहेत.

कॅन्सर रोखणार सिंथेटिक जीन सर्किट

       रोगप्रतिकारक पेशींना चालना देऊन त्यांना कॅन्सर पेशींवर हल्ला करण्यास उद्युक्त करणारी व्यवस्था मानवी शरीरात बसविणे नजिकच्या काळात शक्य होणार आहे. तसे संशोधन ’एमआयटी’ या जगप्रसिद्ध संस्थेतील संशोधकांनी केले आहे. 
       कॅन्सरची लक्षणे दिसू लागताच रोगप्रतिकार पेशींना कॅन्सर पेशींवर हल्ला करण्याची सूचना देता येऊ शकेल, असे सिन्थेटिक जीन सर्किट संशोधकांनी विकसित केले आहे. या संशोधनाबद्दल ’सेल’ या विज्ञानविषयक नियतकालिकात शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. 
रोगप्रतिकारक पेशींना चालना देऊन त्यांना कॅन्सर पेशींवर हल्ला करण्यास उद्युक्त करणारी व्यवस्था मानवी शरीरात बसविणे नजिकच्या काळात शक्य होणार आहे. तसे संशोधन ’एमआयटी’ या जगप्रसिद्ध संस्थेतील संशोधकांनी केले आहे. 
      कॅन्सरची लक्षणे दिसू लागताच रोगप्रतिकार पेशींना कॅन्सर पेशींवर हल्ला करण्याची सूचना देता येऊ शकेल, असे सिन्थेटिक जीन सर्किट संशोधकांनी विकसित केले आहे. या संशोधनाबद्दल ’सेल’ या विज्ञानविषयक नियतकालिकात शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. 
       रोगप्रतिकारक पेशींवर उपचाराची पद्धती कॅन्सरला रोखण्यात महत्वाची मानली जाते. या पद्धतीच्या चाचण्या घेतल्या आहेत, असे ’एमआयटी’मधील बायोलॉजिकल इंजिनिअरिंग विभागाचे सहप्राध्यापक टिमोथी लू यांनी सांगितले. 
      ’आतापर्यंतच्या चाचण्यांवरून काही एक माहिती गोळा झाली आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती योग्य पद्धतीने सजग केल्यास त्या कॅन्सरपेशींना ’ओळखू’ शकतात. कॅन्सरच्या पेशी स्वतःच्या बचावासाठी विशेष व्यवस्था राबवितात. आपल्यावर इतर पेशींनी हल्ला करू नये, अशी सूचना देणारे जणू फलकच त्या घेऊन वावरतात. ही एकप्रकारची सिग्नल व्यवस्था असते. ती नष्ट करणाऱया अँटीबॉडीज् विकसित झालेल्या आहेत. एकदा हा सिग्नल कॅन्सर पेशींवरून हटला, की रोगप्रतिकारक पेशींचा हल्ल्याचा मार्ग मोकळा होतो आणि त्या कॅन्सर पेशींना संपवू शकतात,’ असे लू यांचे संशोधन सांगते. 
       ’एमआयटी’चे संशोधन कॅन्सरविरुद्धच्या लढाईत महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. स्वित्झर्लंडमधील संशोधक मार्टिन फुसेंनेगर यांच्या मते ’सिन्थेटिक जीन सर्किट हे स्मार्ट तंत्रत्रान आहे. विविध घटक एकत्र करून ट्युमर पेशींवर हल्ल्यासाठी रोगप्रतिकारक पेशींना सज्ज करण्याची पद्धत भविष्यात उपयोगी ठरणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

अंतरा

     पाळणा लांबवण्यासाठी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय पर्यायांमध्ये राज्य सरकारने ‘अंतरा’ हे गर्भनिरोधक इंजेक्शन उपलब्ध करून दिले. गेल्या 4महिन्यात महाराष्ट्रातील 2259 महिलांनी या गर्भनिरोधक इंजेक्शनचा वापर केला. मुंबईमध्ये 1986 महिलांनी हे इंजेक्शन घेतले आहे. मुंबईखालोखाल सांगली, रत्नागिरी, बीड, अहमदनगर, अकोला या जिल्ह्यांमधून या गर्भनिरोधक इंजेक्शनला मिळणारा प्रतिसाद वाढता आहे. गर्भपात करण्यापेक्षा गर्भनिरोधकांचा वापर वाढावा यादृष्टीने कुटुंब कल्याण विभागाने या इंजेक्शनच्या वापरासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू केले आहेत. पालिकेची रुग्णालये, प्रसूतीगृहे, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे इंजेक्शन मोफत दिले जाते. 
‘अंतरा’ गर्भनिरोधक इंजेक्शनची वैशिष्ट्ये-
* ‘एमपीए’ या इंजेक्शनचा वापर मासिक पाळी सुरू झाल्यानंतर अथवा गर्भपातानंतर 7 दिवसांच्या आत करता येतो.
* प्रसूतीनंतर 6 आठवड्यांनी हे इंजेक्शन घेतल्यास पुढील प्रसूतीही टळू शकते. 
* 18 ते 35 वयोगटातील महिलांना हे इंजेक्शन देण्यात येते. 
* 3 महिन्यांपर्यंत या इंजेक्शनचा प्रभाव राहतो, पुन्हा तीन महिन्यांनी इंजेक्शन घ्यावे लागते.
* सार्वजनिक व पालिका रुग्णालयांमध्ये ‘अंतरा’ निशुल्क दिले जाते. 
* या इंजेक्शनचा वापर थांबवल्यानंतर 7 ते 10 महिन्यांनी पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. 
* प्रसूतीनंतरच्या कालावधीमध्ये स्तनदा मातांसाठी ते उपयुक्त आहे. 
* हे इंजेक्शन वापरल्यानंतर शारीरिकदृष्ट्या कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. तोंडावाटे घ्याव्या लागणार्‍या औषधांचे वेगवेगळ्या स्वरूपातील दुष्परिणाम दिसून येतात, तसे याचे नाही.

सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे फायदे

   सूर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. 
- सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम, खनिजे अशी अनेक पोषणद्रव्ये असतात. 
- सूर्यफुलाच्या बिया खाल्लाने मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी यासारखे त्रास कमी होतात.
- सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणत असते त्यामुळे केसांसाठी ते फायदेशीर ठरतं.

इटली फुटबॉल महासंघ

       चार वेळा विश्र्वविजेत्या इटलीला आगामी 2018 मध्ये रंगणार्‍या फुटबॉल विश्र्वचषकात स्थान मिळवण्यात अपयश आले. प्लेऑफच्या सामन्यात स्वीडनकडून मिळालेल्या 1-0 पराभवानंतर इटलीच्या विश्र्वचषकात खेळण्याच्या आशा संपुष्टात आल्या.  या अपयशानंतर इटली फुटबॉल महासंघाने प्रशिक्षक जियान पियेरो वेंचुरा यांची उचलबांगडी केली. वेंचुरा 2018 पर्यंत इटली संघासोबत राहतील, असा करार करण्यात आला होता. त्यामुळे 2018 पर्यंतचे त्यांचे वेतन त्यांना दिले जाईल. मात्र, पदभार त्यांच्याकडे राहणार नाही.
* 1930 पासून चार वर्षांच्या अंतराने फुटबॉल विश्र्वचषक स्पर्धा खेळवण्यात येते. ब्राझिलने सर्वाधिक पाच वेळा विश्र्वचषक जिंकला असून, इटलीने यापूर्वी 2006, 1982, 1938 आणि 1934 असे चार वेळा विश्र्वचषकावर नाव कोरले आहे. पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत इटलीचा संघ सहभागी झाला नव्हता. तर 1958 मध्ये इटलीचा संघ विश्र्वचषकात खेळण्यास अपात्र ठरला होता.

रॉजर फेडरर सर्वात श्रीमंत खेळाडू

      फोर्ब्स मासिकाने दिलेल्या अहवालानुसार, गोल्फपटू टायगर वुड्सला मागे टाकत रॉजर फेडरर वैयक्तिक क्री़डा प्रकारात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला. यंदा फेडररच्या खात्यात ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन या दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांची विजेतेपदं जमा आहेत. याव्यतिरिक्त अन्य स्पर्धांच्या अंतिम फेरीतही फेडररने बाजी मारली आहे. 2017 हे वर्ष रॉजर फेडररच्या कारकिर्दीसाठी अत्यंत सकारात्मक गेलं आहे. 2009 सालापासून फेडररने सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. तर 2007 साली फेडररने सर्वाधिक स्पर्धांची विजेतेपदं पटकावण्याची किमया साधली. वर्षाच्या सुरुवातीस जागतिक क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या रॉजर फेडररने आपल्या खेळात सुधारणा करुन आता क्रमवारीत दुसरं स्थान पटकावलं आहे.
*  रॉजर फेडररने बक्षिसांच्या माध्यमातून 11 कोटी 2 लाख 35 हजार 682 अमेरिकी डॉलर्सची कमाई केली. टायगर वुड्सने 11 कोटी 61 हजार  डॉलर्सची कमाई केली

१६ नोव्हेंबर २०१७

इंडियन रूट्स इन अमेरिकन सॉइल अहवाल

     भारतीय उद्योग महासंघाच्या ”इंडियन रूट्स इन अमेरिकन सॉइल” या अहवालानुसार अमेरिकेत भारतीय कंपन्यांमुळे तेथे 1.13 लाख रोजगार निर्माण झाले असून  एकूण 18 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे.  या वार्षिक अहवालात बरीच माहिती तपशिलाने देण्यात आली असून त्यात अमेरिकेच्या प्रगतीत भारताचे असलेले योगदान सामोरे आले आहे. त्यातील महत्त्वाच्या नोंदी-

*    अमेरिका, प्युटरेरिको व इतर भागात भारतीय कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. अमेरिकेतील 50 राज्यात तसेच कोलंबिया व प्युटरेरिकोत 100 भारतीय कंपन्यांमधून 1,13,423 कामगार आहेत.

*    भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत कंपनी सामाजिक उत्तरदायित्वापोटी 147 दशलक्ष डॉलर्स, तर संशोधन व विकासावर 588 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्च केले आहेत.

*    एकूण गुंतवणूक 17.9 अब्ज डॉलर्सची असून 5 प्रमुख राज्यात भारतीय कंपन्यांचे अस्तित्व मोठया प्रमाणात आहे.  पाच राज्यात भारतीय कंपन्यांमध्ये जास्त रोजगार असून कामगारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे-

     -    न्यूजर्सी (8572)

     -    टेक्सास (7271)

     -    कॅलिफोर्निया (6749)

     -    न्यूयॉर्क (5135),

     -    जॉर्जिया (4554)

*    भारतीय कंपन्यांची गुंतवणूक सर्वाधिक असलेली राज्ये पुढीलप्रमाणे आहेत-

     -    न्यूयॉर्क (1.57 अब्ज डॉलर्स),

     -    न्यूजर्सी (1.56 अब्ज डॉलर्स),

     -    मॅसॅच्युसेट्स (931 दशलक्ष डॉलर्स)

     -    कॅलिफोर्निया (542 दशलक्ष डॉलर्स),

     -    व्योमिंग (435 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स),

*    प्रत्येक राज्य किंवा प्रदेशात भारतीय कंपन्यांची सरासरी 187 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक असून तेथे आणखी गुंतवणूक  करण्याचा 85  टक्के कंपन्यांचा इरादा आहे. 87 टक्के कंपन्या पुढील पाच वर्षांत जास्तीत जास्त स्थानिक कामगारांना रोजगार देणार आहेत. इलिनॉइस येथे भारतीय कंपन्यांची 195 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक असून 3800 रोजगार निर्माण झाले आहेत.

१५ नोव्हेंबर २०१७

औषधाच्या गोळीतही ‘डिजिटल ट्रॅकिंग’

     डिजिटल ट्रॅकिंग सेन्सर बसवलेली जगातली पहिल्या औषधाच्या गोळीला अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) मान्यता दिली आहे. ही गोळी रुग्णाने नियमित घेतली किंवा नाही, याची अचूक माहिती डॉक्टरांना यामुळे कळू शकेल. तसेच या गोळीने रुग्णाच्या शरीरावर नेमका काय परिणाम झाला, याची माहितीदेखील ठेवता येणार आहे. सध्या ही गोळी स्किझोफ्रेनिया या आजारासाठी वापरली जाणार आहे.

     नैराश्यात असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी याचा वापर केला जातो.  या गोळीतील मानवी शरीराला लागू होईल असा सेन्सर ‘पॅच’ वापरला आहे. स्मार्ट फोनवरील अ‍ॅपवर या मॅचद्वारे मेसेज पाठवण्यात येईल आणि त्यामुळे रुग्णालादेखील आपण घेतलेल्या गोळीचा नेमका काय परिणाम होत आहे याची माहिती होईल. याशिवाय रुग्णाचे डॉक्टरही पोर्टलच्या माध्यमातून या गोळीचा परिणाम अभ्यासू शकतील.

तेजस्वी जोड आकाशगंगांचा शोध

      आपला सूर्य आणि ग्रहमालिका ही ‘मिल्की वे’ नावाच्या एका आकाशगंगेचा छोटासा भाग आहे. या आकाशगंगेत असे अनेक सूर्य व ग्रह आहेत. अंतराळात अशा अनेक ग्रह-तार्‍यांनी भरलेल्या असंख्य आकाशगंगा आहेत. त्यावरूनच या असीम विश्वाची कल्पना येऊ शकते. गेल्या 20 वर्षांच्या काळातच खगोल शास्त्रज्ञांनी संशोधनात म्हटले आहे की, अंतराळात सुमारे 100 ते 200 अब्ज आकाशगंगा आहेत. आता त्यामधील एका अनोख्या आकाशगंगेचा शोध संशोधकांनी लावला आहे. या जोड आकाशगंगा असून त्या अत्यंत तेजस्वी आहेत.

        न्यूयॉर्कच्या कॉर्नेल युनिव्हर्सिटीतील डॉमिनिक रिचर्स या संशोधकाने याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, केवळ एकच अतितेजस्वी आकाशगंगा शोधणेही महत्त्वाचे असते. अशा स्थितीत जर अशा जोड आकाशगंगा दिसल्या तर त्याचे वेगळे महत्त्व लक्षात येऊ शकते. या आकाशगंगा दुर्मीळ असतात. या आकाशगंगांना ‘एडीएफएस-27’ असे नाव देण्यात आले आहे. त्या एकमेकींमध्ये मिसळून एकच होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांना हे एकच नाव दिले आहे. आपल्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेच्या तुलनेत या आकाशगंगांमध्ये तार्‍यांची निर्मिती करणार्‍या वायूचे प्रमाण 50 पटीने अधिक आहे. या वायूपैकी बहुतांश वायू लवकरच चमकदार नव्या तार्‍यांच्या (सूर्य) रूपात समोर येईल. या जोड आकाशगंगा पृथ्वीपासून सुमारे 12.7 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहेत.

१४ नोव्हेंबर २०१७

राजस्थान पोलिसांत पहिल्यांदाच तृतीय पंथीयाची होणार भरती

     राजस्थान उच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांच्या बाजूने निर्णय देत त्यांच्यासाठी सरकारी नोकरीचे दरवाजे खुले केले आहेत. जालोर जिल्ह्यातील तृतीय पंथीय गंगा कुमारी हिने न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राजस्थान पोलिसांना गंगा कुमारीला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

     खरे तर एखाद्या तृतीय पंथीयाला सरकारी नोकरी देणारा राजस्थानातील हा पहिला प्रकार आहे, तर देशातील हे तिसरे प्रकरण आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजस्थान पोलीस विभाग पोलीस कॉन्स्टेबल या पदावर पहिल्यांदाच तृतीय पंथीयाची नियुक्ती करणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता यांनी सुनावणीदरम्यान गंगा कुमारीला 6 आठवड्यांच्या आत कामावर रुजू करण्यासोबतच तिला 2015 पासून राष्ट्रीय लाभ देण्याचाही निर्णय दिला आहे. याचिककर्त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, गंगा कुमारी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी पात्र असतानाही जालोर पोलीस अधीक्षकांनी तिला नियुक्त केले नाही. कॉन्स्टेबल भरती परीक्षेत पास होऊनही नियुक्तीवरून गृह विभागाचे अधिकारी संभ्रमात होते.

       गेल्या 3 वर्षांपासून गृह विभागाचे अधिकारी तृतीय पंथीयाला नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेऊ शकलेले नव्हते. ही फाईल गृह विभागात धूळखात पडून होती. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता यांनी पोलीस विभागाला गंगा कुमारीची 6 आठवड्यांमध्ये नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

        वर्ष 2013 मध्ये 12 हजार पोलीस कॉन्स्टेबलच्या पदांसाठी भरती परीक्षा झाली होती. परीक्षेत राजस्थानातील विविध जिल्ह्यातल्या जवळपास 1.25 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 11400 विद्यार्थ्यांची पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी निवड करण्यात आली होती. यात राणीवाडा परिसरात राहणार्‍या जालोरमध्ये राहणार्‍या गंगाकुमारीचाही समावेश होता. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची मेडिकल केल्यानंतर गंगा कुमारी तृतीय पंथीय असल्याचे उघड झाले. त्यानंतर जालोर एसपी यांनी फाइल जोधपूरचे रेंज आयजी जीएल शर्मा यांना पाठवून मत मागितले आहे. असा प्रकार पहिल्यांदाच समोर आल्यानंतर 3 जुलै 2015 मध्ये फाईल पोलीस मुख्यालयात पाठवली होती. परंतु पोलीस अधिकारी गंगाकुमारीबाबत कोणताही निर्णय घेऊ शकले नव्हते.

’सीसी टीव्हीच्या कक्षा रुंदावणार’

    वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबई शहरात लावलेल्या सीसी टीव्ही कॅमेर्‍यांच्या संख्येत लवकरच भर पडणार आहे. तब्बल 1,500 कॅमेरे लावण्यास राज्याच्या गृह विभागाने हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गृह खात्याच्या परवानगीमुळे नवी मुंबईतील दुर्लक्षित परिसर आता तिसर्‍या डोळ्याच्या दृष्टिक्षेपात येणार आहे.

     नवी मुंबई महापालिकेच्यावतीने सुमारे 15 कोटी खर्च करून शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी 284 कॅमेरे बसवले आहेत. परंतु ते मोक्याची ठिकाणे वगळता इतर ठिकाणी नसल्याने बाजारपेठा, अंतर्गत चौक, उद्याने, महत्त्वाच्या शाळेबाहेरील रस्ते, खाडीकिनारे, बस आगार, पेट्रोल पम्प अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे नसल्याने गुन्हेगारांचे फावते. सीसी टीव्हीअभावी शहरात रस्त्यावरून वर्दळीच्या ठिकाणी महिला व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गृह विभागामार्फत निधी उपलब्ध करून नवी मुंबई शहरात तब्बल 1,500 सीसी टीव्ही बसवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

       या प्रस्तावांतर्गत महापालिकेने अहवाल तयार करून अंतिम अभिप्रायासाठी नवी मुंबई पोलिसांकडे पाठवला आहे. महापालिकेने दिलेल्या अहवालाचा अभ्यास करून पोलिसांना अंतिम अहवाल देणे अभिप्रेत होते. परंतु, यात दिरंगाई होत असल्याने अखेर आमदार म्हात्रे यांनी पाठपुरावा करून गृह विभागाकडून नवी मुंबई शहरात सुमारे 1,500 सीसी टीव्ही बसवण्यास परवानगी मिळवली. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

      राज्य सरकारच्या मान्यतेनंतर नवी मुंबईतील सागरी किनारे, वर्दळ नसणारे रस्ते, उद्याने, ज्येष्ठ नागरिकांची संकुले, विरंगुळा केंद्रे, मैदाने, गावठाण आदी परिसर सीसी टीव्हीच्या कक्षेत येणार आहे. याकरिता लागणारा निधी राज्य सरकार, सिडको प्रशासन व काही निधी महापालिकेच्या तिजोरीतून खर्च करण्यात येणार आहे. सीसी टीव्ही बसवल्यानंतर त्याच्या देखभालीचे काम महापालिकेला करावे लागणार आहे. परंतु या सीसी टीव्हींचे नियंत्रण केंद्र नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात असेल.

       अतिरिक्त सीसी टीव्हींमुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसून नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. सोनसाखळी खेचणे, दरोडा यांसारख्या घटनांवर अंकुश बसण्यास मदत होईल आणि रोडरोमिओंकडून दिल्या जाणार्‍या त्रासातून महिलांची सुटका होईल.

१३ नोव्हेंबर २०१७

इराण-इराकच्या सीमेवर भूकंप

      इराण-इराकच्या सीमेवर झालेल्या भीषण भूकंपात 129 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून त्याचा केंद्रबिंदू इराकमधील हलबजा येथून 31 किलोमीटर लांब आहे.

      कुर्दीस्तानपासून जवळ असलेल्या पेंजविन परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. इराकच्या उत्तरेकडील भाग आणि राजधानी बगदादला सर्वाधिक फटका बसला. इराण सीमेवरील गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. इराणमधील एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, देशातील 14 राज्यांना भूकंपाचा तडाखा बसला. या सर्व राज्यांमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा अधिकार्‍यांनी केली आहे. इराणमध्ये याआधी 2003 मध्ये भूकंपात 26 हजार लोक मृत्युमुखी पडले होते.

उत्तर कोरियाबद्दल अमेरिकेची जपान, ऑस्ट्रेलियाशी चर्चा

       उत्तर कोरियाकडून घेण्यात येत असलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा मुद्दा अमेरिकेने जपान आणि ऑस्ट्रेलियासमोरही उपस्थित केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यात नुकतीच भेट झाली. या भेटीत त्यांनी उत्तर कोरियाच्या आण्विक शस्त्रास्त्रांबाबतच्या नीतीविषयी प्रामुख्याने चर्चा केली.

      फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे आशियाई शिखर परिषद पार पडली. पूर्व आणि आग्नेय आशियातील राष्ट्रप्रमुख हजेरी लावलेल्या या परिषदच्या निमित्ताने झालेल्या भेटीत तिन्ही राष्ट्रप्रमुखांनी कोरियन द्वीपकल्प आणि व्यापार या मुद्यांवर चर्चा केली. या परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना टर्नबुल यांनी सांगितले की, उत्तर कोरियाच्या ’बेफिकीर’ व्यवहाराला लगाम घालणे गरजेचे आहे. दरम्यान, प्रादेशिक शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे मोठे आव्हान आहे, असे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी म्हटले आहे.

केम्ब्रिज विद्यापीठाच्या पुरुषांच्या क्लबमध्ये महिलांना प्रवेश

    ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठाच्या 182 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक मोठा बदल झाला आहे. या विद्यापीठाच्या प्रायव्हेट मेंबर्स क्लबमध्ये प्रथमच महिलांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. 1835 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेसोबतच तेथे या क्लबची स्थापनाही झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत क्लबमध्ये फक्त पुरुषांनाच सदस्यत्व दिले जात होते. हा राजकीय क्लब मानला जात आहे. त्यात पुरुष एकाधिकार संपवण्यासाठी मतदान झाले. त्यात महिलांच्या बाजूने मते पडली.

     आतापर्यंत महिला क्लब हाउसच्या पुरुष सदस्यांसोबत मिळून आपले कार्यक्रम आयोजित करू शकत असत. पण त्यांना येथे सदस्यत्वाचा हक्क नव्हता. क्लबमध्ये बरोबरीने सहभागाची मागणी महिलांनी अनेकदा केली होती. त्यावर निर्णयासाठी गेल्या आठवड्यात विद्यापीठाच्या क्लबमध्ये मतदान झाले. त्यात पुरुष एकाधिकाराच्या विरोधात निर्णय आला.

      विल्यम पिट यांच्या नावावर ठेवले क्लबचे नाव विद्यापीठाचा प्रायव्हेट मेंबर्स क्लबची ओळख राजकीय क्लब अशीच आहे, कारण सुरुवातीपासूनच तेथे राजकीय घडामोडी होत आहेत. क्लबचे नाव 18 व्या शतकातील तरुण ब्रिटिश पंतप्रधान विल्यम पिट यांच्या नावावर ठेवले आहे. विल्यम या विद्यापीठाच्या पेम्ब्रोक कॉलेजचे विद्यार्थी होते. हा क्लब विद्यार्थ्यांची पार्टी आणि इतर उपक्रमांसाठी प्रख्यात आहे. असेच उपक्रम ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बुलिंगडन विद्यापीठातही होतात.

     पिट क्लबच्या सदस्यांत किंग एडवर्ड सहावे, जॉर्ज पंचम, युवराज अल्बर्ट व्हिक्टर, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता डेव्हिड सेसिल आणि अर्थतज्ज्ञ मेनार्ड कीनेस यांचा समावेश आहे. केम्ब्रिज विद्यापीठ ब्रिटनचे दुसरे सर्वात जुने आणि युरोपातील चौथे सर्वात जुने विद्यापीठ आहे. सध्या त्याच्याशी 31 कॉलेज, 100 विभाग, प्राध्यापक, सिंडिकेट आणि 6 शाळा जोडलेल्या आहेत. त्यात 17 हजार विद्यार्थी शिकतात. त्यात 120 देशांचे 1000 आंतरराष्ट्रीय विद्यार्थीही आहेत. विद्यापीठात अभ्यास केलेल्या 85 जणांना आतापर्यंत नोबेल पुरस्कारही मिळाला आहे.

प्रीती पटेल यांचा राजीनामा

     ऑगस्ट महिन्यात इस्रायलमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेल्या असताना इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्यासह त्या देशाच्या अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणार्‍या आणि त्याबाबत देशाच्या परराष्ट्र खात्याला अंधारात ठेवणार्‍या भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी राजीमाना दिला. या भेटींवरून वादंग झाल्यानंतर त्यांचे आंतरराष्ट्रीय विकास मंत्रिपद धोक्यात आले होते. आफ्रिका दौर्‍यावर असलेल्या प्रीती पटेल यांना पंतप्रधान थेरेसा मे यांनी तडकाफडकी परत बोलावले होते. त्यांनी थेरेसा यांची भेट घेतली आणि त्यानंतर राजीनाम्याची घोषणा केली.

१० नोव्हेंबर २०१७

महाराष्ट्राच्या लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार

      दिव्यांग या विषयावरील राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पुण्यातील दंतवैद्यक व दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे यांच्या कर्णबधीर मुलावर आधारित ‘अजान’ या लघुपटाला 4 लाख रुपये आणि प्रशस्तिपत्राने गौरविले. मुंबईच्या ज्योत्स्ना पुथरा दिग्दर्शित ‘झेब्रा क्रॉसिंग’ या टीव्ही स्पॉटला अव्वल पुरस्कारासह 5 लाख रुपये आणि प्रशस्तिपत्राने, तर मुंबईच्या सीमा आरोळकर दिग्दर्शित ‘धीस इज मी’ या टीव्ही स्पॉटला द्वितीय पुरस्काराने गौरविले.

      सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण आणि चित्रपट महोत्सव विभागाच्यावतीने सिरीफोर्ट येथे आयोजित केलेल्या ‘दिव्यांग सक्षमीकरण लघुचित्रपट स्पर्धा-2017’चे सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

‘सुनो आरबीआय क्या कहता है’ मोहीम

      बनावट कॉलच्या माध्यमातून आमिष दाखवून पैसे उकळणार्‍यांविरोधात सेबीपाठोपाठ रिझर्व्ह बँकेनेही दंड थोपटले आहेत. नागरिकांना सतर्क करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून लवकरच ‘सुनो आरबीआय क्या कहता है’ ही मोहीम राबवली जाणार आहे.

     ई-मेल्स, मेसेज आणि फोन कॉल्समधून होणारी फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक या उपक्रमातून जनजागृती करणार आहे. बँकिंग कायदे आणि त्यांना देण्यात येणार्‍या सुविधांविषयीची माहिती या उपक्रमातून दिली जाणार आहे. बनावट कॉल तसेच आमिष दाखविणारे मेसेज कसे ओळखावे याबाबत मेसेज आणि ई-मेलमधून सर्तक केले जाणार आहे.

९ नोव्हेंबर २०१७

ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांचा राजीनामा

     प्रीती पटेल या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म 29 मार्च 1972 साली इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे आई-वडिल युगांडामधून आशियाई नागरिकांना हाकलण्याच्या इदी अमिन दादाच्या मोहिमेच्या थोडे आधीच इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक झाले. पटेल यांना सर्वात प्रथम डेव्हिड कॅमेरुन यांनी कॅबिनेटमध्ये संधी दिली तर थेरेसा मे यांनीही त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम ठेवले.

       मूळ भारतीय निवासी असलेल्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौर्‍यानंतर राजीनामा दिला. आफ्रिका दौर्‍यावर असलेल्या प्रीती पटेल यांना पंतप्रधान थेरेसा मे यांनी परत बोलावले होते. प्रीती पटेल यांनी इस्रायल दौर्‍यात पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. आपल्या राजीनाम्या संदर्भात सांगताना प्रीती पटेल म्हणाल्या की, ”मंत्री परिषदेत काम करणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. तथापि, एक मंत्री म्हणून ज्या उच्च परंपरा पाळण्याचे संकेत आहेत, ते मात्र माझ्या कार्याला अनुकूल नव्हते. जे झाले त्याबद्दल मी सरकारची माफी मागते.”

     प्रीती पटेल यांनी ऑगस्ट महिन्यातील इस्रायलमध्ये झालेल्या बैठकांनंतर पुन्हा 7 सप्टेंबर रोजी इस्रायलचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गिलाड एर्डेन यांची लंडनमध्ये तर परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी युवल रोटेम यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. इस्रायलच्या बैठकांमध्ये कोणतेही ब्रिटिश अधिकारी उपस्थित नव्हते किंवा पटेल यांनी या बैठकांची योग्य नियमांनुसार कोणतीही माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली नव्हती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासह अनेक इस्रायली नेते, अधिकार्‍यांशी झालेल्या 12 हून अधिक बैठकांबाबत पटेल यांनी योग्य स्पष्टीकरण न दिल्याबद्दल त्यांना आता आपले पद गमवावे लागणार असे मत इंग्लंडमध्ये व्यक्त केले होते. पटेल यांच्या निमित्ताने इंग्लंडमधील विरोधी पक्षांना थेरेसा मे यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली. पटेल यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती आहे. त्यांनी इस्रायली नेत्यांच्या बैठका घेऊन इस्रायलला गोलन हाईटसमध्ये आर्थिक मदत देण्यासाठी बोलणी केली असा आरोप विरोधी पक्षांनी केला.

मंगळावर जाण्यासाठी तब्बल 1 लाख भारतीयांनी केले बुकिंग

      मंगळावर जाण्यासाठी तब्बल 1,38,899 भारतीयांनी बुकिंग केले आहे. 2018 मध्ये मंगळावर जाण्याचे नासाचे मिशन सुरू होणार असून त्यासाठी तिकीटांचे बुकिंग सुरू झाले आहे. नासाने तिकीट बुकिंग सुरू करताच जगभरातून या तिकीट खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. यात तब्बल 1,38,899 भारतीयांनी मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक केले आहे. मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक करणार्‍या देशांमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

        नासाने खपीळसहीं मिशन अंतर्गत मंगळावर जाण्याची मोहीम आखली आहे. ज्या लोकांनी मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक केले आहे, त्यांना नासाकडून ऑनलाइन बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. मंगळावर जाणार्‍यांची नावे एका सिलिकॉन चिपवर इलेक्ट्रॉनिक्स बीमच्या मदतीने कोरण्यात येणार आहेत. चिपवर कोरलेली ही अक्षरे केसांच्या हजाराव्या भागाहून पातळ असतील, असे सूत्रांनी सांगितले.

      मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक करणार्‍या देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानी आहे. या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतून 6,76,773 लोकांनी मंगळ मिशनसाठी तिकीट बुकिंग केले आहे, तर दुसर्‍या स्थानावर चीन असून चीनमधून 2,62,752 लोकांनी मंगळावर जाण्यासाठी बुकिंग केल आहे.

      दरम्यान, मंगळ मोहीम हे नासाचे मिशन असल्याने अमेरिकेतून त्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळणे अपेक्षितच होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर भारत-अमेरिकेमधील अंतराळ तंत्रज्ञानातील परस्पर संबंधामुळे भारतीयांनीही मंगळावर जाण्यासाठी सर्वाधिक उत्सूकता दाखविल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

       मंगळयान मोहीमेसाठी नाव नोंदणी गेल्या आठवड्यात बंद झाली. त्यामुळे आता नवीन नोंदणी होणार नाही. हे मिशन 2018 ला सुरू होणार असून 26 नोव्हेंबर 2018 रोजी सर्वजण मंगळावर पोहचतील. एकूण 720 दिवसाचे हे मिशन आहे. यावेळी मंगळावर होणार्‍या भूकंपाचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल)ने सांगितले. 

महावितरणकडून वीज देयक थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी संजीवनी योजना जाहीर

      जिल्ह्यातील कृषीपंपाची थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांसाठी महावितरणने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 अंमलात आणली आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना महावितरणकडून 1 नोव्हेंबरपासून नवीन स्वरुपाची वीज देयके देण्यात येत आहेत. त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्प्त्यात भरावयाची आहे, याची माहिती दिलेली आहे.

        वीज वितरण कंपनीचे जिल्ह्यात 92 हजार कृषीपंपधारक ग्राहक आहेत. या ग्राहकांना 10 उपविभागांतर्गत महावितरणच्या वतीने वीज पुरवठा केला जातो. या कृषीपंपधारक शेतकर्‍यांना महावितरण महिन्याकाठी वीज बिल देते. परंतु, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. परिणामी महावितरणकडून आलेल्या वीज बिलाची परतफेड करू शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यात महावितरणच्या थकबाकीचा डोंगर वाढला. सध्या जिल्ह्यातील 92 हजार कृषीपंपधारकांकडे 750 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी शेतकर्‍यांकडून वसूल करण्यासाठी ऊर्जा विभागाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 अंमलात आणली. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या एका वर्षात आपल्याकडे असलेली थकबाकीची रक्कम 5 हप्प्त्यात भरावी लागणार आहे.

        या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकर्‍यांना महावितरणकडून 1 नोव्हेंबरपासून नवीन स्वरुपात वीज देयके देण्यात येत आहेत. या बिलात महावितरणच्या बोधचिन्हा शेजारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी 2017 असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या देयकात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकांचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. देयकाच्या डाव्या बाजूस 15 नोव्हेंबरपूर्वी शेतकर्‍यांनी किती रक्कम भरावयाची आहे, याची माहिती दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेंतर्गत थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सुलभ झाले आहे.

८ नोव्हेंबर २०१७

मेरी कोमने पटकाविले सुवर्ण पदक

      मेरीने आतापर्यंत 6 वेळा आशियाई स्पर्धेत भाग घेतलेला आहे. यामध्ये 5 स्पर्धांत तिने सुवर्णपदक मिळविले आहे. मेरी कोम यापूर्वी 51 किलो वजनगटातून खेळत होती. यंदा ती 48 किलो वजनी गटातून स्पर्धेत उतरली होती. 5 वेळच्या जगज्जेत्या भारताच्या मेरी कोमने आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत (48 किलो) वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले.

       मेरीने यापूर्वी आशियाई स्पर्धेत 4 सुवर्णपदके मिळविली आहेत. उपांत्य फेरीत तिने जपानच्या त्सुबासा कोमुरा हिचा 5-0 असा पराभव केला होता. सहाव्यांदा आशियाई स्पर्धेत खेळताना मेरीने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत तिची गाठ उत्तर कोरियाच्या किम हयांग मी हिच्याशी पडली. मेरीने किमचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर

      भेंडीबाजार घराण्याचे बुजुर्ग गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या आणि ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे अल्पशा आजाराने 7 नोव्हेंबर रोजी रात्री पुण्यात निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1944 रोजी झाला.

       पं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी हे त्यांचे गुरू होत. सूर-सिंगार संसद, मुंबई तर्फे त्यांना सुरमणी पुरस्कार तर गानवर्धन पुणेतर्फे स्वर-लय भूषण, संगीत शिरोमणी पुरस्कार, पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठानतर्फे संगीत मर्मज्ञ पुरस्काराने गौरविले होते. भेंडीबाजार घराण्याची गायकीचा वारसा पुढे नेत निगुनी या टोपणनावाने त्यांनी बंदिशींची रचना केली. आकाशवाणीच्या अ.भा.गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य ही सर्वाच्च पदवी त्यांना बहाल केली होती.

७ नोव्हेंबर २०१७

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत सत्येंद्र सिंगला सुवर्ण

      सत्येंद्र सिंगच्या सुवर्ण आणि संजीव राजपूतच्या रौप्यपदकाच्या जोरावर भारताने राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत दोघांनीही पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोजिशन्स प्रकारात पदके मिळवली. या 2 पदकांसह भारताची पदकांची संख्या 20 वर गेली आहे. 50 मीटर रायफल थ्री पोजिशन्स प्रकाराच्या अंतिम फेरीत सत्येंद्रने 454.2 गुण मिळवले. एका गुणाच्या फरकाने राजपूत (453.3 गुण) दुसर्‍या स्थानी राहिला. ऑस्ट्रेलियाच्या डेन सॅम्पसनने कांस्यपदक मिळवले.

      अंतिम फेरीच्या सुरुवातीला चेन सिंग अव्वल तीनमध्ये असल्याने या प्रकारात भारत तिन्ही पदके मिळवेल, असे वाटले. मात्र सॅमसनने चेन सिंगला मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला. पात्रता फेरीत सत्येंद्र दुसर्‍या, अनुभवी राजपूत तिसर्‍या आणि चेन सिंग चौथ्या स्थानी होता. मात्र अंतिम फेरीत सत्येंद्रने खेळ उंचावत वर्चस्व गाजवले. पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात बिरेनदीप सोधी हा भारताचा एकमेव नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. मात्र तो चौथ्या स्थानी गेला. या फेरीत सोधीला 125 पैकी 118 गुण मिळवता आले.

      सत्येंद्र आणि संजीवच्या पदकांमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 20 पदकांची कमाई केली. त्यात 6 सुवर्णपदकांसह प्रत्येकी 7 रौप्य आणि कांस्यपदकांचा समावेश आहे. सत्येंद्रपूर्वी हिना सिधू (महिला 10 मीटर एअर पिस्तूल), पूजा घाटकर (महिला 10 मीटर एअर रायफल), अंकुर मित्तल (महिला डबल ट्रॅप), शाहझार रिझवी (10 मीटर एअर पिस्तूल), प्रकाश नंजप्पा (50 मीटर पिस्तूल प्रकार) यांनी सुवर्ण कामगिरी केली आहे.

विक्रम काकडेला ट्रॅपमध्ये रौप्य, तर डबल ट्रॅपला ब्राँझ

      राज्य शॉटगन अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुण्याच्या विक्रम काकडे याने ट्रॅपमध्ये रौप्य, तर डबल ट्रॅप प्रकारात ब्राँझपदकाची कामगिरी केली. या कामगिरीसह तो 10 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या राष्ट्रीय शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातील रेंजमध्ये आयोजित शॉटगन स्पर्धेत ट्रॅप प्रखारात प्रणव गुप्ता याने 106 गुणांसह सुवर्णपदकाचा मान मिळविला. विक्रम काकडे 100 गुणांसह रौप्य, तर सिद्धार्थ पवार 99 गुणांसह ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

      डबल ट्रॅपमध्ये विक्रम आणि विजय जाधवर यांचे समान गुण झाले होते. त्यामुळे त्यांच्यात ब्राँझपदकासाठी झालेल्या शूटआऊटमध्ये विक्रमने बाजी मारली. या प्रकारात सिद्धार्थ पवार (113) सुवर्ण, तर प्रणव गुप्ता (108) रौप्यपदकाचा मानकरी ठरला. 3 वर्षे सरावापासून दूर राहिल्यानंतरही राज्य स्पर्धेत 2 पदकाला गवसणी घातल्याने विक्रम समाधनी होता. आता अधिक चांगला सराव करून राष्ट्रीय स्पर्धेत छाप पाडायची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात मनमोहन सिंग करणार दौरा

      गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जातो आहे. इतकेच नाही, तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे बडे नेते मैदानात उतरवले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारात नोटाबंदी आणि जीएसटीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवलेला आहे. यावरून काँग्रेसला सरकारविरोधी वातावरणनिर्मिती करण्यात काही प्रमाणात यशही मिळाले आहे. त्यामुळे टीकेचा हा मारा आणखीनच तीव्र करण्यासाठी मनमोहन सिंग यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

      गुजरातमध्ये एका दिवसाच्या दौर्‍यावर मनमोहन सिंग आहेत. आजच्या या दौर्‍यामध्ये मनमोहन सिंग तेथील व्यापार्‍यांशी जीएसटीच्या मुद्यावर बोलणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा विकासदर 2 टक्क्यांनी घसरेल, हे मनमोहन सिंग यांचे भाकीत खरे ठरले होते. पण, जागतिक बँकेकडून नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारताने व्यवसाय सुलभता निर्देशांकात मोठी झेप घेतल्याचे स्पष्ट झाले. पण विरोधकांनी जमिनीवरील चित्र प्रत्यक्षात वेगळे असल्याची शंका यावेळी उपस्थित केली. यावरून नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे मनमोहन सिंग यांना लक्ष्य केले. मी असा पंतप्रधान आहे की, ज्याने अजूनही जागतिक बँकेची इमारतही बघितलेली नाही.

      पण, यापूर्वी जागतिक बँकेत काम केलेले लोक या पदावर होते. हेच लोक आता जागतिक बँकेच्या अहवालाविषयी शंका घेत असल्याची टीका मोदींनी केली होती. गुजरातमध्ये प्रचाराला आल्यावर मनमोहन सिंग हे अहमदाबाद येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदही घेणार आहेत. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. तो दिवस काँग्रेस ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करणार आहे. त्यापूर्वीच एक दिवस आधी मनमोहन सिंग यांचा गुजरात दौरा होणार आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या गुजरात दौर्‍याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गुजरात दौर्‍यावर असणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लघु उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. तसेच मनमोहन सिंग पत्रकार परिषदही घेणार आहेत. अर्थव्यवस्थेतवर आधारीत एका चर्चासत्रातही मनमोहन सिंग सहभाग घेतील.

      ठळक मुद्दे -

      * गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जातो आहे.

      * जरात निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे बडे नेते मैदानात उतरवले आहेत.

      * या पार्श्वभूमीवर आता देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेसचा प्रचार करणार आहेत.

अतिरिक्त निधीची ट्रम्प यांची मागणी

      उत्तर कोरियामुळे निर्माण झालेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी सुमारे 4 अब्ज डॉलरची अतिरिक्त मदत देण्याची मागणी अमेरिकी काँग्रेसकडे केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ट्रम्प हे पहिल्यांदाच दक्षिण कोरियाच्या दौर्‍यावर जात असून, त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त निधीची मागणी केली असल्याचे मानले जाते.

      या प्रकरणी ट्रम्प यांनी काँग्रेसला एक पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, की उत्तर कोरियामुळे निर्माण झालेल्या संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याला तोंड देण्यासाठी, प्रतिकार करण्यासाठी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अधिक बळकट करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी अतिरिक्त 4 अब्ज डॉलरचा निधी मंजूर करण्यात यावा. दक्षिण आशियामध्ये अतिरिक्त साडेतीन हजार सैनिक तैनात करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे.

६ नोव्हेंबर २०१७

बाबा पार्सेकर व निर्मला गोगटे यांना जीवनगौरव पुरस्कार’

      राज्य शासनामार्फत देण्यात येणार्‍या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना, तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांची निवड केल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. 5 लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

      विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, फैयाज, जनार्दन लवंगारे, रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, राजन ताम्हाणे आणि डॉ. वंदना घांगुर्डे हे सदस्य आहेत. बाबा पार्सेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार आहेत.

      हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा रंगभूमीच्या तिन्ही प्रकारांमध्ये बाबांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. निर्मला गोगटे यांचा जन्म मुंबईचा असून पं. कृष्णराव चोणकर, प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून आवाज साधना शास्त्राचे विशेष मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे. सुरवातीच्या काळात महिला कला संगम या स्त्रियांच्या संगीत नाटकांतून नायिकेच्या भूमिका त्यांनी केल्या. या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना हे पुरस्कार येत्या 20 नोव्हेंबर रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर येथे प्रदान केले जाणार आहेत.

13 वर्षांनी दुहेरी जेतेपदाचा योग’

      भारतीय पुरुष, तसेच महिला हॉकी संघ एकाच वेळी आशिया विजेता असणे हा योग 13 वर्षांनी साधला गेला आहे. यापूर्वी हे 2004 मध्ये असे घडले होते, तर आता महिला संघाच्या यशामुळेच हे 13 वर्षांनी घडले आहे. जपानमध्ये झालेल्या लढतीत भारतीय महिलांनी चीनचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असे परतवून लावले. भारतीय पुरुष हॉकी संघाने 2003 मध्ये क्वालालंपूर आशिया कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एका वर्षाने भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदा आशिया कप जिंकला, त्यावेळी पुरुष विजेतेपद भारताकडेच होते.

      आता 13 वर्षांनी भारतीय महिला हॉकी संघ जिंकला. त्यापूर्वी केवळ 15 दिवसांपूर्वी भारतीय पुरुष संघाने ढाक्यात आशिया कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. भारतीय महिलांनी यापूर्वी 2004 मध्ये भारतातच झालेल्या स्पर्धेत जपानचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. 2009 मध्ये विजेतेपदाच्या लढतीत चीनकडूनच झालेल्या पराभवाचा परतफेड या विजयाने केली. 1999 मध्ये देखील त्या उपविजेत्या राहिल्या होत्या.

४ नोव्हेंबर २०१७

8 भाषा बोलणारी भारताची ‘वंडर गर्ल’

      भारतात अशी एक वंडर गर्ल आहे. जी वेगळी ओळख भारताची वंडर गर्ल केली जाते. या मुलीचे वय अवघे 13 वर्षे आहे. हरियाणामधील समालखामधील मालपुर गावच्या जान्हवी पवार 13 वर्षांच्या मुलीला ‘भारताची वंडर गर्ल’ हा किताब दिला आहे. जान्हवीला तब्बल 8 भाषा बोलता येतात.

      * जान्हवीने 13 वर्षाची असतानाच 12 वीची परीक्षा पास केली आहे. तिला हरियाणवी, हिंदी, ब्रिटिश, अमेरिकन, फ्रेंच, जॅपनिज यांसारख्या अनेक भाषा फक्त बोलताच येत नाहीत तर त्या समजतात देखील.

      * जान्हवी अमेरिकन आणि ब्रिटिश भाषांमध्ये टीव्ही निवेदकासारखे बातम्याही वाचू शकते.

      * 8 राज्यांच्या आयएएस अधिकार्‍यांनादेखील जान्हवीने मार्गदर्शन दिले आहे.

      * एका वर्षात दोन इयत्ता पास होत जान्हवीने 13 व्या वर्षीच 12 वीची परीक्षा पास केली आहे.

      जान्हवी 2 वर्षाची असताना भाजी विकणारे तिचे वडिल तिला प्राण्यांची जनावरांची नावे इंग्रजी भाषेतून शिकवत होते. तेव्हापासूनच जान्हवीने इंग्रजी बोलायला सुरूवात केली. जान्हवीला इंग्रजी इतकी आवडली की, तिने प्रत्येकाशीच इंग्रजीमधून बोलायला सुरूवात केली. हरियाणामध्ये आलेल्या परदेशी पाहूण्यांना जान्हवी त्यांच्याच भाषेत उत्तर देत असते. फास्ट इंग्रजी बोलण्याचे हे कौशल्य पाहून ते पर्यटकही आश्चर्यचकीत होतात. जान्हवीने भाषा शिकण्यासाठी इंटरनेटचीदेखील मदत घेतली. अमेरिकन आणि ब्रिटन उच्चार शिकण्यासाठी ती इंग्रजी बातम्या देखील ऐकते. इतक्या लहान वयात 12 वी उत्तीर्ण झालेल्या जान्हवीला आयएएस अधिकारी व्हायचे आहे.

ओरांगऊटानच्या नव्या प्रजातीचा शोध

      एप वर्गातील जीव म्हणजे बिनशेपटीची माकडे. याच वर्गात मनुष्यप्राण्याचाही समावेश होतो. चिम्पांझी, गोरीला, बोनोबो, बोर्नियन माकडे हेही एप वर्गातीलच आहेत. यामधीलच आणखी एक सदस्य म्हणजे इंडोनेशियात आढळणारे ओरांगऊटान. सध्या ओरांगऊटान वेगाने नामशेष होत चालले आहेत. सध्या केवळ 800 ओरांगऊटान शिल्लक आहेत. मात्र, आता ओरांगऊटानच्याच एका नव्या प्रजातीचाही शोध लावला आहे.

      ‘ओरांगऊटान’ या इंडोनेशियन शब्दाचा अर्थ ‘वनमाणूस’ असा होतो. नारिंगी, सोनेरी रंगाची ही केसाळ माकडे आता वेगाने नष्ट होणार्‍या प्रजातींमध्ये मोडतात. इंडोनेशियाच्या उत्तर सुमात्रामध्ये आढळणारे तपानुली ओरांगऊटान ही एक वेगळीच आणि दुर्मीळ प्रजाती असल्याचे आता संशोधकांनी म्हटले आहे. आतापर्यंत त्यांचा सुमात्रन ओरांगऊटानमध्येच समावेश केला जात होता. जर या माकडांचा नैसर्गिक निवारा असलेली जंगले वाचवली गेली नाहीत तर त्यांचा र्‍हास अटळ आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

३ नोव्हेंबर २०१७

लडाखमध्ये सर्वाधिक उंच रस्ता

      आधुनिक तंत्रज्ञान, मानवी कौशल्य आणि जिद्दीच्या बळावर ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन’ (बीआरओ) लहरी निसर्गाला नमवून रस्तंबांधणी करत असते. आत्ताही ‘बीआरओ’ने जम्मू-काश्मीरमधील लडाख भागात चिसुमले आणि डेमचॉक या दोन गावांदरम्यानचा 86 कि.मी. रस्ता तयार केला आहे. हा रस्ता जगातील सर्वाधिक उंचीवरील गाडीरस्ता ठरला आहे. तब्बल 19,300 फूट उंचीवरील हा रस्ता उमलिंगला भागातून जातो. ‘हिमांक प्रकल्पा’च्या अंतर्गत ‘बीआरओ’ने ही मोहीम फत्ते केली. हॅनले या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्या ठिकाणापासून हा रस्ता जवळ असून लेहपासून 230 कि.मी. दूर आहे.

      चीनच्या सीमेपासून ही ठिकाणे हाकेच्या अंतरावर आहेत. हा प्रकल्प यशस्वी करणार्या ‘बीआरओ’ कर्मचार्यांचा ब्रिगेडीअर डी. एम. पूर्वीमठ यांनी सत्कार केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘19,300 फुटांवरील रस्तेबांधणी हे जिवावरचे साहस होते. या ठिकाणचे हवामान बांधकामामध्ये नेहमीच व्यत्यय आणणारे ठरते. उन्हाळ्यात तापमान 10 ते 20 अंश असते तर हिवाळ्यात पारा उणे 40 अंशापर्यंत घसरतो. ऑक्सिजनची पातळी 50 टक्क्यांहून कमी असते.’ ‘खडतर हवामानामुळे यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळाची कार्यक्षमता अर्ध्यावर येते.

      मशीन ऑपरेटरला दर 10 मिनिटांनी ऑक्सिजनसाठी खाली उतरावे लागते, असे ते म्हणाले. इतक्या उंचीपर्यंत साधनसामुग्री घेऊन जाणे हे आणखी एक मोठे आव्हान होते. येथे काम करणार्या कर्मचार्यांना गंभीर स्मृतीभ्रंश, दृष्टी कमी होणे, उच्च रक्तदाब अशा आरोग्यसमस्यांनाही तोंड द्यावे लागले. अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्येही कर्मचार्यांनी रात्रंदिवस काम करून हा प्रकल्प पूर्ण केला.’ हिमांक प्रकल्पाअंतर्गत यापूर्वी खार्दुंग ला येथे 17,900 फूट उंचीवर तसेच चांगला पास येथे 17,695 फूट उंचीवर रस्ते बांधण्यात आले आहेत. यामुळे नोब्रा व्हॅली आणि डुर्बुक व्हॅली एकमेकांशी जोडले गेले.

जगातील सर्वाधिक कुपोषित बालके भारतात

      असोचेम आणि ईवाय या संस्थेने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणानुसार जगातील एकूण कुपोषित बालकांपैकी 50 टक्के बालके भारतात आहेत. या सर्वेक्षणाने कुपोषणाबाबतच्या चिंतेत भर पडली आहे. या सर्वेक्षणानुसार देशातील 2005 ते 2015 या कालावधीत बालमृत्यूचे प्रमाण कमी आले, पण कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले होते. 2015 मध्ये देशातील एकूण बालकांपैकी 40 टक्के बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे.

      देशातील 37 टक्के मुलांचे वजन अतिशय कमी आहे, तर 39 टक्के मुलांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी आहे. तसेच उंचीच्या तुलनेत कमी वजन असणार्या मुलांचे प्रमाण 21 टक्के होते. कुपोषणाबाबत ही परिस्थिती असताना दुसर्या बाजूला देशातील अनेक नागरिक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. याबाबत देशाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक अमेरिकेचा तर दुसर्या क्रमांकावर चीन असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात यापूर्वी सांगितले आहे. तसेच मधुमेह रुग्णांचे प्रमाणही देशात कमालीचे वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे.

२ नोव्हेंबर २०१७

निवृत्तीनंतरही ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीची संधी

      नवीन पेन्शन योजना (एनपीएस) सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने वयोमर्यादा वाढवून 60 वरून 65 वर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत पेन्शन योजनेअंतर्गत खाते उघडता येणार आहे. त्यामुळे वय वर्ष 60 ते 65 दरम्यानची कुणीही व्यक्ती ‘एनपीएस’मध्ये खाते उघडून 70 व्या वर्षापर्यंत त्याचा लाभ घेऊ शकणार आहे. ‘एनपीएस’मध्ये सहभागी होण्यासाठीची वयोमर्यादा वाढल्याने आता अतिज्येष्ठ नागरिकांनाही खाते उघडता येणार आहे.

    ‘एनपीएस’मध्ये रक्कम गुंतवल्यानंतर 3 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच बाहेर पडण्याची मुभा संबंधितांना दिली आहे. मात्र, तसे करताना गुंतवणूकदाराला एकूण फंडातील रकमेच्या 80 टक्के अ‍ॅन्युटी खरेदी करावी लागणार आहे. उर्वरित 20 टक्के रक्कम त्याला एकत्रित दिली जाईल. ‘एनपीएस’मधील गुंतवणुकीच्या कालावधीत गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास सर्व रक्कम वारसदाराला मिळण्याची सोय केली आहे.

एनटीपीसीत स्फोट, 18 जणांचा मृत्यू

      उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी) उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून, 100 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

     बॉयलरचा स्टीम पाइप फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 500 मॅगावॅटच्या वीज निर्मिती केंद्रात हा स्फोट झाला आहे. अनेक कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात येत आहे.

जीवसृष्टीसाठी पोषक 20 नवे ग्रह सापडले

      जीवसृष्टीचे अस्तित्व असू शकेल, अशा 20 नव्या ग्रहांचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या ग्रहांवरील जीवसृष्टीची शक्यता आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

    ‘नासा’च्या केप्लर मोहिमेतून या ग्रहांचा शोध लागला आहे. सूर्यमालेबाहेरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठीच ‘नासा’ने केप्लर ही मोहीम हाती घेतली होती. या संशोधनामध्ये आणखी काही महत्त्वाचे निष्कर्ष हाती येतील, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. या निरीक्षणांवर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांनी जीवसृष्टी असू शकण्याची शक्यता असणार्‍या 20 नव्या ग्रहांवर शिक्कामोर्तब केले आहे. यातील काही ग्रहांची वैशिष्ट्ये पृथ्वीसारखीच आहेत.

      अनेक ग्रहांचा पितृतार्‍याभोवती फिरण्याचा कालावधी कमी असतो, त्यामुळे, ग्रहांवरील वर्ष कमी कालावधीचे होते आणि त्यातून जीवसृष्टीच्या अस्तित्वाविषयी समस्या निर्माण होऊ शकतात. तुलनेने या 20 ग्रहांपैकी अनेक ग्रहांचा वर्षाचा कालावधी पृथ्वीवरील वर्षाच्या कालावधी एवढाच आहे. तसेच, त्यांवरील तापमानही पृथ्वीच्या सरासरीएवढेच आहे, याकडे शास्त्रज्ञ लक्ष वेधत आहेत. यातील सर्व ग्रहांचा 70 ते 80 टक्के पृष्ठभाग घन स्वरूपातील आहे. यावर आणखी संशोधन करण्यात येत होते. मात्र, केप्लर यानामध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे, अडचणी निर्माण झाल्या आहेत.

     जीवसृष्टीची सर्वाधिक शक्यता असणार्‍या ग्रहांपैकी ‘केओआय-7923.0’ या ग्रहावरील परिस्थिती सर्वाधिक आश्वासक असल्याचे मानण्यात येते. या ग्रहाचा एका वर्षाचा कालावधी 395 दिवसांचा असून, त्याचा आकार पृथ्वीपेक्षा 97 टक्के आहे. मात्र, हा ग्रह तार्‍यापासून थोडा जास्त असल्यामुळे, त्यावरील सरासरी तापमान कमी आहे.

खिचडी आता भारताचे राष्ट्रीय खाद्य

      येत्या 4 नोव्हेंबर रोजी साजर्‍या होणार्‍या खाद्यदिनी दिल्लीत मुगाच्या खिचडीला राष्ट्रीय खाद्याचा दर्जा दिला जाणार आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. श्रीमंत असो वा गरीब, मुगाची खिचडी सर्वांनाच आवडत असल्यानेच या पदार्थाला सुपरफूडचा दर्जा मिळाला आहे. खिचडी आरोग्यासाठी गुणकारी आहे. डाळ, तांदूळ आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी ही डिश आहे. मुगाची खिचडी चविष्ट, कमी वेळात आणि कमी खर्चात तयार होत असल्याने तिला हा दर्जा मिळत आहे.

      3 ते 5 नोव्हेंबर चालणार्‍या वर्ल्ड फूड इंडिया 2017 या आंतरराष्ट्रीय महोत्सवात जगातील 200 तर देशातील 450 कंपन्या सहभागी होतील आणि त्यात राष्ट्रीय डिश म्हणून मिरवेल ती खिचडी.

      या खाद्यमेळ्यात ख्यातनाम शेफ संजीव कपूर 7 फूट व्यासाच्या आणि 1000 लीटर क्षमतेच्या भव्य कढईत 800 किलोहून अधिक खिचडी शिजवतील. खाद्यमेळ्यात ‘ग्रेट इंडिया फूड स्ट्रीट’वर ही खिचडी मुख्य आकर्षण असेल. संजीव कपूर भारतीय खाद्यसंस्कृतीचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर’ म्हणून प्रतिनिधित्व करतील.

     ‘वर्ल्ड फूड इंडिया’ या जागतिक खाद्यमेळ्याचे आयोजन भारत सरकारचे अन्नप्रक्रिया मंत्रालय व ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज’ (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. 

१ नोव्हेंबर २०१७

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : मुकेश अंबानी

     देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी हे आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या रियल टाइम बिलियनर्सच्या यादीत 42.1 अरब डॉलर इतक्या संपत्तीसह मुकेश अंबानींनी चीनच्या हुइ का यान यांना मागे सारले आणि ते आशियातील श्रीमंतांच्या यादीत सर्वोच्च स्थानी विराजमान झाले आहेत.

       रिलायन्स इंडस्ट्रीच्या समभागांमध्ये 1.22 टक्क्यांच्या वृद्धी झाली. याबरोबरच समभागाची किंमत 952.30 रुपयांच्या स्तरावर पोहोचल्यामुळे मुकेश अंबानींच्या खाजगी संपत्तीत 466 मिलियन डॉलर्सचा नफा मिळाला आहे. तर, दुसरीकडे चीनच्या एव्हरग्रँडे ग्रुपचे चेअरमन हुइ का यान यांच्या संपत्तीत 1.28 बिलियन डॉलरची घट होत ती 40.6 अरब डॉलर इतक्यावर आली आहे. सध्या जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानी हे 14 व्या स्थानावर विराजमान आहेत.  ही यादी उद्योजकांचे स्टॉक होल्डिंग आणि रियल टाइम अ‍ॅसेट्सच्या आधारे तयार केली गेली आहे.

      2017 मध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. गेल्याच महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सप्टेंबर तिमाहीत मोठा नफा कमावला होता. कंपनीला रिफायनींग आणि पेट्रोकेमिकलच्या महसुलात मोठी वाढ झाल्याने हा नफा मिळाला आहे. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 12.48 टक्क्यांचा नफा मिळाला आहे. कंपनीला 30 सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत 8,109 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. यापूर्वी गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 7,209 कोटी रुपये इतके होते. विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज 6 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेली भारतातील पहिली कंपनी बनली आहे.

मुंबईतील 4 हेरिटेज वास्तूंना पुरस्कार

     युनेस्कोने आपल्या सांस्कृतिक वारसा पुरस्कारांची घोषणा केली असून यंदा भारतातील 7 वारसा स्थळांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे यात मुंबईतील 4 वारसा स्थळांनी पुरस्कार पटकावला आहे. सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.

युनेस्कोने जाहीर केलेल्या युनेस्को वारसा पुरस्कारांमध्ये श्री रंगनाथस्वामी मंदिर (श्रीरंगम, तामिळनाडू), गोहड फोर्ट (मध्य प्रदेश), हवेली धर्मपुरा (दिल्ली) या स्थळांचा समावेश आहे.

युनेस्कोच्या वारसा पुरस्कारांमध्ये मुंबईतील चार वारसा स्थळांचाही समावेश आहे. यामध्ये ख्रिस्त चर्च (भायखळा चर्च), रॉयल बॉम्बे ऑपेरा हाऊस, या दोन वारसा स्थळांना गुणवत्ता पुरस्कार जाहीर केला आहे, तर बोमोनजी होरमर्जी वाडिया फाउंटन अँड क्लॉक टॉवर आणि वेलिंग्टन फाउंटन या दोन वारसा स्थळांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर केला आहे.