Menu

Study Circle

*  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षा

*  2016 सालातील एमपीएससी परीक्षांची तयारी कशी करायची?    

 *  प्रशासकीय अधिकारी परीक्षा

 *  वनसेवा परीक्षा

 *  राज्यसेवा परीक्षा

 *   पूर्वपरीक्षा पेपर - 1 ची तयारी

 *   पूर्वपरीक्षा पेपर - 2 ची तयारी

 *  प्राचार्य/वरिष्ठ अधिव्याख्याता, गट-अ आणि अधिव्याख्याता, गट-ब जिल्हा शिक्षण व      प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र शिक्षण सेवा परीक्षा

 *  दिवाणी न्यायाधीश व दंडाधिकारी परीक्षा

 *  विक्रीकर निरीक्षक परीक्षा

 *  पोलीस भरती परीक्षा

 

 *  तांत्रिक सहायक परीक्षा

 *  लिपिक  टंकलेखक परीक्षा

 *  कर सहाय्यक परीक्षा

 * सहाय्यक परीक्षा

 * पोलीस उपनिरीक्षक परीक्षा

 * महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा

 * पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित परीक्षा

 * महाराष्ट्र स्थापत्य अभियाांत्रिकी सेवा परीक्षा

 * असिस्टंट मर्यादित विभागीय परीक्षा

 * महाराष्ट्रविद्युत अभियाांत्रिकी सेवा परीक्षा

 * एसटीआय मर्यादित विभागीय परीक्षा

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षा    

     1) राज्यसेवा परीक्षा - 

      2) विक्रीकर निरीक्षक परीक्षा

      3) सहायक कक्ष अधिकारी परीक्षा

      4) पोलीस उपनिरीक्षक परीक्षा

      5) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा

      6) महाराष्ट्र कृषीसेवा परीक्षा

      7) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा

      * महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत घेतल्या जाणार्‍या सर्व परीक्षाबाबत असणार्‍या काही शंकाचे निरसण -

      1) अभ्यास नेमका कसा करावा?

      2) अभ्यासाची सुरवात कोठून करायची? हे दोन प्रश्न खूप जास्त वेळ खातात. 10 वी आणि 12 वीला असताना ज्या तन्मयतेने आणि नियमितपणे (sincerity) अभ्यास करायचो त्याच पद्धतीने अभ्यास करायचा.

      सुरुवात करताना खाली दिलेल्या पद्धतीने जावे -

      1) अभ्यासक्रम व्यवस्थित वाचणे व समजावून घेणे.

      2) मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्‍लेषण करणे.

      3) कोणतेही एक वर्तमानपत्र वाचा आणि वेगवेगळ्या क्लासेसची मासिके वाचून काढणे.

      4) महाराष्ट्र शासनाच्या मासिकांपैकी लोकराज्य वाचणे.

      5) राज्य शासनाची क्रमिक पुस्तके कमीत कमी 2-3 वेळेस वाचावीत.

      यापुस्तकांमध्ये -

      अ) भूगोल - 6 वी ते 10 वी

      ब) पर्यावरण - 9, 10 व 11 वी

      क) इतिहास - 8, 11 वी

      ड) विज्ञान - 8 वी ते 10 वी (फक्त राज्यसेवा पूर्वपरीक्षेकरिता)

      इ) नागरिकशास्त्र - 6 वी आणि 7 वी.

 

      1) राज्यसेवा परीक्षा - 

      महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी ही एक महत्त्वाची परीक्षा आहे. मागील काही वर्षांपासून या परीक्षेचे स्वरूप खूप स्पर्धात्मक होत चालले आहे. प्रश्न विचारण्याची व्याप्ती वाढत आहे आणि नियमित अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन प्रश्न विचारण्याचासुद्धा प्रकार खूप वाढलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमाबरोबरच थोडेसे अभ्यासक्रमाशी निगडित अवांतर वाचन असणे आवश्यक आहे.

      या परीक्षेमार्फत खालील पदे भरली जातात -

      1) उपजिल्हाधिकारी गट-अ

      2) तहसीलदार गट-अ

      3) पोलीस उपअधीक्षक गट-अ

      4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट-अ

      5) अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-अ

      6) उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-ब

      7) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब

      8) मुख्याधिकारी गट-अ

      9) सहायक विक्रीकर आयुक्त गट-अ

      10) उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ

      11) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ

      12) नायब तहसीलदार गट-ब

      13) कक्ष अधिकारी गट-ब

      14) सहाय्यक गटविकास अधिकारी गट-ब (Assistant BDO)

      15) मुख्याधिकारी गट-ब

      16) उपअधीक्षक भूमी अभिलेख गट-ब

      पात्रता -

अ) वयोमर्यादा -

      - साधारण प्रवर्गासाठी (open category) साठी वयोमर्यादा कमीत कमी 19 वर्षे ते जास्तीत जास्त 38 वर्षे एवढी आहे.

      - अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 वर्षे एवढी आहे.

      - अपंग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 45 वर्षे एवढी आहे.

      - पात्र खेळाडूंसाठी वयोमर्यादा 38 वर्षे एवढी आहे.

ब) शैक्षणिक पात्रता -

      - कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

      - पदवी शिक्षण घेतानासुद्धा परीक्षा देण्यास पात्र असतो. मात्र, मुख्य परीक्षेचा फॉर्म भरतेवेळी आयोगाने सांगितलेल्या पदवीबाबतीत पात्रता पूर्ण केलेली असावी.

      - RTO या पदासाठी अभियांत्रिकी किंवा गणित व भौतिकशास्त्र या विषयांसह विज्ञान शाखेतील पदवी असावी.

क) शारीरिक पात्रता - 

      1) पोलीस उपअधीक्षक गट-अ -

      पुरुष उमेदवार + महिला उमेदवार उंची - 165 सें.मी. (अनवाणी) छाती - 84 सें.मी. न फुगविता फुगविण्याची क्षमता - कमीत कमी 5 सें.मी. आवश्यक + उंची - 157 सें.मी. (अनवाणी)

      2) अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-अ व उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-ब -

      पुरुष उमेदवार + महिला उमेदवार उंची - 165 सें.मी. (अनवाणी) छाती - 79 सें.मी. न फुगविता फुगविण्याची क्षमता - कमीत कमी 5 सें.मी. आवश्यक + उंची - 155 सें.मी. (अनवाणी)

      3) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब -

      पुरुष उमेदवार + महिला उमेदवार उंची - 163 सें.मी. (अनवाणी) छाती - 79 सें.मी. न फुगविता फुगविण्याची क्षमता - कमीत कमी 5 सें.मी. रंगांधळेपणा नसावा + उंची - 163 सें.मी. कमीत कमी रंगांधळेपणा नसावा.

      परीक्षेचे स्वरूप -

      राज्यसेवा परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते -

      1) पूर्व परीक्षा

      2) मुख्य परीक्षा

      3) मुलाखत

      पूर्व परीक्षा -

-    ही चाळणी परीक्षा असते. या परीक्षेमधील गुण अंतिम निवड करताना ग्राह्य धरले जात नाहीत.

-    ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असते.

-    या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात.

      1) सामान्य अध्ययन पेपर 1

      2) सामान्य अध्ययन पेपर 2

      सामान्य अध्ययन पेपर-1 - 

-    या पेपरमध्ये विद्यार्थ्याच्या ज्ञानाचा तपास केला जातो.

-    हा पेपर सोडविण्यासाठी मूलभूत माहिती असणे आवश्यक असते.

-    या पेपरमध्ये खालील विषय येतात -

      अ) राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी.

      ब) भारतीय इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भात) व राष्ट्रीय चळवळ.

      क) महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल.

      ड) महाराष्ट्राची व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन.

      इ) आर्थिक व सामाजिक विकास.

      ई) पर्यावरण व परिस्थितीकी.

      उ) सामान्य विज्ञान.

-    या विषयांवरील येणार्‍या प्रश्नांचे प्रमाण बदलत असते.

-    एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजेच हा पेपर 200 गुणांचा असतो.

-    या पेपरसाठी 2 तास वेळ असतो आणि हा पेपर सकाळच्या सत्रात घेतला जातो.

-    प्रत्येक चूक प्रश्नासाठी एक-तृतीयांश एवढ्या गुणांची कमी केले जातात.

      सामान्य अध्ययन पेपर-2 -

-    यालाच नागरी सेवा कल चाचणी (Civil Services Aptitude Test) असे म्हणतात.

      या पेपरमध्ये खालील विषय येतात -

      अ) आकलन क्षमता (Comprehension) - उतार्‍यावरील प्रश्न सोडविणे.

      ब) परस्पर संवादासह आंतव्यक्ती संवाद कौशल्ये (Interpersonal skills including communication skills)

      क) तार्किक व विश्‍लेषण क्षमता (Logical Reasoning  -nalytical Ability) 

      ड) निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण (Decision Making  Problem Solving) 

      इ) सामान्य बौद्धिक क्षमता (General Mental Ability)

      ई) पायाभूत अंकगणित आणि माहितीचे अर्थांतरण (Basic Numeracy) 

      उ) मराठी व इंग्रजी भाषिक आकलन कौशल्य (Marathi  English Language Comprehension) 

-    या पेपरमध्ये प्रत्येकी 80 प्रश्न असतात.

-    प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण दिले जातात. म्हणजेच एकूण 200 गुण.

-    प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1/3 गुण वजा केले जातात. (Negative Marking)

-    या पेपरमध्ये चांगले गुण येण्यासाठी जास्तीत जास्त सराव करणे अपेक्षित असते.

-    निर्णयक्षमतेवरील प्रश्नांना (Negative Marking) पद्धत लागू नाही.

-    पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये एकूण 400 गुणांची ही परीक्षा असते.

-    या दोन्ही पेपरमध्ये एकत्रितपणे जास्तीत जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र ठरतात.

      मुख्य परीक्षा -

-    पहिला टप्पा पार केल्यानंतर हा टप्पा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो.

-    ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची आहे.

-    अंतिम निवड यादी ठरविताना मुख्य परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.

-    या परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरास 1/3 मार्क कापले जातात. (Negative Marking)

      मुख्य परीक्षेचा आराखडा खालीलप्रमाणे आहे -

      (अ.क्र. विषय आणि गुण)

      1) + सामान्य अध्ययन पेपर 1 - इतिहास - भूगोल - कृषी - पर्यावरण + 150 गुण

      2) + सामान्य अध्ययन पेपर 2 - भारतीय राज्यघटना व राजकारण + 150 गुण

      3) + सामान्य अध्ययन पेपर 4 - अर्थशास्त्र व नियोजन - विकास व कृषी यांचे अर्थशास्त्र - वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र - भारतीय कृषी व्यवस्था, ग्रामविकास व सहकार - कृषी - विज्ञान व तंत्रज्ञान + 150 गुण

      4) + सामान्य अध्ययन पेपर 3 - मानव संसाधन विकास - मानवी हक्क + 150 गुण

      + एकूण गुण + 600

      राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या मराठी आणि इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपाबाबत बद्दल करण्याची बाब आतोगाच्या विचाराधीन होती. याबाबत आयोगाच्या संकेत स्थळावर 3 फेब्रुवारी 2016 रोजी दिलेल्या घोषण अनुसरून नवीन बदलानुसार खालील पद्धतीने पेपर घेण्यात येतील. व या पेपरमधील गुण अंतिम निवडयादी जाहीर करताना ग्राह्य धरले जातात.

      मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर मधील अर्धा भाग वर्णात्मक/परंपरागत राहिल व अर्धा भाग वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी राहिल.

      भाषा पेपर क्रं - 1 पारंपरिक /वर्णनात्मक -

      एकूण गुण - 100

      भाग 1 मराठी (50 - गुण)

      निबंध लेखन - 25 गुण

      भांषातर - 15 गुण

      लेखन सारांश - 10 गुण

      भाग - 2 इंग्रजी (50 - गुण)

      1) Essay Writing - 25 Marks

      2) Translation - 15 Marks

      3) Precis Writing - 10 Marks

      भाषा पेपर क्रमांक 1 मधील, दोन्ही भागांसाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहिल. मात्र उत्तरपुस्तिका दोन्ही भागांसाठी स्वतंत्र राहत्रील. दोन्ही भागांसाथी एकत्रित 3 तास वेळ असेल.

      भाषा पेपर क्रं- 2 वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी

      भाग - 1

      मराठी - 50 प्रश्न, 50 गुण

      भाग - 2

      इंग्रजी - 50 प्रश्न, 50 गुण

      भाषा पेपर - 2 च्या दोन्ही भांगाची मिळून एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहील.

      भाषा पेपर 1 व 2 या दोन्ही पेपर्सचे गुण अंतिम यादीमध्ये ग्राह्य धरले जातील.

-    मुलाखत

-    हा महत्त्वाचा तिसरा टप्पा.

-    या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व तपासले जाते.

-    या टप्प्यामध्ये एकूण 100 गुण असतात.

-    मार्क देण्याची रेंज - 20 पासून ते 75 एवढी असते.

 

 

पोलिस उपनिरीक्षक (PSI)/सहायक कक्ष अधिकारी (ASO)/विक्रीकर निरीक्षक अधिकारी (STI) 

-    राज्य लोकसेवा आयोग या पदांसाठी एक वेगळी परीक्षा घेते.

-    प्रत्येक पदासाठी वेगवेगळी परीक्षा होते.

-    पण महत्त्वाचे म्हणजे या तीनही परीक्षांचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम एकच आहे.

-    मुख्य परीक्षेमध्ये मात्र यांचा अभ्यासक्रम वेगवेगळा आहे आणि प्रत्येक पदासाठी एका विशिष्ट विषयावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आलेले आहे. ते खालीलप्रमाणे -

-    सहायक कक्ष अधिकारी - राज्यव्यवस्था

-    विक्रीकर निरीक्षक - अर्थव्यवस्था

-    पोलीस उपनिरीक्षक - कायदे

     पूर्व परीक्षा -

-    एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येकी 1 याप्रमाणे 100 गुण असतात.

-    पूर्वपरीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरास 1/4 गुण वजा केले जातात. (Negative Marking) 

-    विचारले जाणारे प्रश्न Mostly Factual आणि informative असतात.

     मुख्य परीक्षा -

-    मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरास 1/4 मार्क कापले जातात. (Negative Marking) 

-    पोलिस उपनिरीक्षक (PSI)/विक्रीकर महसूल अधिकारी (STI)/सहायक कक्ष अधिकारी (ASO).

      पूर्व परीक्षा अभ्यासक्रम -

      परीक्षा योजना -

      प्रश्नपत्रिका - एका प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे- विषय व संकेतांक + प्रश्नसंख्या + एकूण गुण + दर्जा + माध्यम + परीक्षेचा कालावधी + प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

      सामान्य क्षमता चाचणी + 100 + 100 + पदवी + मराठी व इंग्रजी + एक तास + वस्तुनिष्ठ

      अभ्यासक्रम -

      सामान्य क्षमता चाचणी - (विषय संकेतांक - 012) या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेलः

      1) चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील.

      2) नागरिकशास्त्र - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).

      3) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.

      4) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह)

      - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश - रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

      5) अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्य्र व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोशीय नीती इत्यादी.

      शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.

      6) सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झूलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन).

      7) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित.

      पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-

      परीक्षा योजना - 

      प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण गुण - 200

      प्रश्नपत्रिकांची संख्या - 2 प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे -

      पेपर क्र. व संकेतांक + विषय + गुण + प्रश्नसंख्या + दर्जा + माध्यम + कालावधी

      1 + मराठी व + 60 + 60 + मराठी - बारावी + मराठी + 1 तास

      + इंग्रजी + 40 + 40 + इंग्रजी - पदवी + इंग्रजी

      2 + सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान + 100 + 100 + पदवी + मराठी व इंग्रजी + 1 तास

       अभ्यासक्रम -

      पेपर क्रमांक - 1 मराठी व इंग्रजी - 

      मराठी - सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्‍यावरील प्रश्नांची उत्तरे.

      पेपर क्रमांक - 2

      सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान - या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

      1) चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील

      2) बुद्धिमत्ता चाचणी

      3) महाराष्ट्राचा भूगोल

      4) महाराष्ट्राचा इतिहास

      5) भारतीय राज्यघटना

      6) माहिती अधिकार - अधिनियम-2005

      7) संगणक व माहिती-तंत्रज्ञान

      8) मानवी हक्क व जबाबदार्‍या

      9) मुंबई पोलिस कायदा

      10) भारतीय दंड संहिता

      11) फौजदारी प्रक्रिया संहिता - 1973

      12) भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act) विक्रीकर निरीक्षक गट - ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा

      परीक्षा योजना -

      प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण गुण-200

      प्रश्नपत्रिकांची संख्या - 2, प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे -

      पेपर क्र. व संकेतांक + विषय + गुण + प्रश्नसंख्या + दर्जा + माध्यम + कालावधी

      1 + मराठी व + 60 + 60 + मराठी - बारावी + मराठी + एक तास

      + इंग्रजी + 40 + 40 + इंग्रजी - पदवी + इंग्रजी

      2 + सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान + 100 + 100 + पदवी + मराठी व इंग्रजी + 1 तास

      अभ्यासक्रम -

      पेपर क्रमांक - 1

      मराठी व इंग्रजी मराठी - सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्नांची उत्तरे.

      पेपर क्रमांक - 2

      सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान - या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

      1) चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील

      2) बुद्धिमत्ता चाचणी

      3) महाराष्ट्राचा भूगोल

      4) महाराष्ट्राचा इतिहास

      5) भारतीय राज्यघटना

      6) माहिती अधिकार - अधिनियम-2005

      7) संगणक व माहिती-तंत्रज्ञान

      8) नियोजन

      9) शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास

      10) आर्थिक सुधारणा व कायदे

      11) आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ

      12) सार्वजनिक वित्त व्यवस्था

      सहायक, गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा

      परीक्षा योजना -

      प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण गुण - 200

      प्रश्नपत्रिकांची संख्या - 2, प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे -

      पेपर क्र. व संकेतांक + विषय + गुण + प्रश्नसंख्या + दर्जा + माध्यम + कालावधी

      1 (संकेतांक 002) + मराठी व + 60 + 60 + मराठी - बारावी + मराठी + 1 तास

      + इंग्रजी + 40 + 40 + इंग्रजी - पदवी + इंग्रजी

      2 (संकेतांक 025) + सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान + 100 + 100 + पदवी + मराठी व इंग्रजी + एक तास

      अभ्यासक्रम -

      पेपर क्रमांक - 1 मराठी व इंग्रजी

      मराठी - सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग; तसेच उतार्‍यावरील प्रश्नांची उत्तरे.

      पेपर क्रमांक - 2

      सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान - या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

      1) चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील

      2) बुद्धिमत्ता चाचणी

      3) महाराष्ट्राचा भूगोल

      4) महाराष्ट्राचा इतिहास

      5) भारतीय राज्यघटना

      6) माहिती अधिकार - अधिनियम-2005

      7) संगणक व माहिती-तंत्रज्ञान

      8) राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्ये) केंद्र सरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)

      9) जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन

      10) न्यायमंडळ

 

 

      महाराष्ट्र कृषी सेवा

      मुख्य परीक्षेसाठी 600 गुण असून, 75 गुण हे मुलाखतीसाठी आहे, अशाप्रकारे एकूण 675 गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते.

      मुख्य परीक्षेचे स्वरूप -

      पेपर विषय प्रश्नसंख्या गुण माध्यम कालावधी

      पेपर क्रमांक 1 (अनिवार्य) कृषी-विज्ञान 100 200 इंग्रजी 1 तास

      पेपर क्र. 2 (वैकल्पिक) कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी 200 400 इंग्रजी 2 तास

      अशा प्रकारे मुख्य परीक्षेसाठी दोन पेपर असतात. पेपर क्रमांक 1 हा अनिवार्य असून, कृषी शास्त्र किंवा कृषी विज्ञान या घटकाशी संबंधित असून, पेपर क्रमांक 2 हा वैकल्पिक असून, तो कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी या घटकाशी संबंधित आहे.

      परीक्षेसाठी पात्रतेच्या अटी -

      1) वयोमर्यादा किमान 19 वर्षे, कमाल 33 वर्षे (मागासवर्गीयांकरिता 5 वर्षांपर्यंत सूट, अपंगांना 45 वर्षांपर्यंत, माजी सैनिक, पात्र खेळाडू यांनी 5 वर्षांपर्यंत सूट).

      2) शैक्षणिक अर्हता -  BSc (Agril.), BSc (Horticulture), BSc (Forestry), B.Tech (Agri engineering). 

      3) पदवी परीक्षेस बसलेले उमेदवारसुद्धा पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. मात्र मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकपर्यंत पदवीपूर्ण आवश्यक आहे.

      पदाविषयी माहिती - 

      महाराष्ट्र कृषी सेवा गट अ, महाराष्ट्र कृषी सेवा गट-ब (वरिष्ठ), महाराष्ट्र कृषी सेवा गट-ब (कनिष्ठ) इत्यादी तत्सम पदासाठी भरती केली जाते.

      गट-अ पदास उपविभागीय कृषी अधिकारी (SDO), गट-ब (वरिष्ठ) या पदास तालुका कृषी अधिकारी, गट-ब (कनिष्ठ) या पदास मंडल कृषी अधिकारी असे साधारणपणे संबोधले जाते.

      उपविभागीय कृषी अधिकारी हे पद 3-4 तालुक्यांसाठी असते, तालुका कृषी अधिकारी हा तालुक्यातील कृषी बाबी संबंधीचे नियंत्रण करतो तसेच मंडल कृषी अधिकारी हा साधारणतः तालुक्यातील जास्त लोकसंख्येची अनेक गावे मिळून बनलेल्या मंडल (सर्कल) क्षेत्राचे काम पाहतो.

-    कृषी आयुक्त - कृषी सहसंचालक

-    सह कृषी सहसंचालक

-    जिल्हा कृषी अधिकारी

-    उपविभागीय कृषी अधिकारी

-    तालुका कृषी अधिकारी

-    मंडल कृषी अधिकारी

-    कृषी सहायक

-    कृषी पर्यवेक्षक

      कृषी अधिकार्‍यांची कार्ये (Function Agriculture Officer) 

      1)     Plant Auarantine ------

      2)     matters relating to damage to crops due to natural calamities. 

      3)     Co-ordination of relief measures necessited by drought 

      4)     Technology mission on agriculture crops. 

      5)     Agriculture protection against pest and preveantion -------- of plant diseases..... 

      6)     Co-operation in agriculturel sector, agriculture credit and indebtness. 

      7)     Control of all atteched and subordinate offices or other organization concern -------- with any of the subject specified. 

      8)     Quality control of Fertul --------. 

      9)    Organisation and Development of extension deucation and training in the state. 

      10)     Price control of agricultural commodities. 

      11)     Imptementation of various control and State Government scheme in agriculrure sector. 

      12)     Enhance the agriculture production throught various medium and awakening -------- the Farmer.

 

 

      * तयारी कशी करावी - PSI 

      कोणत्याही परीक्षेची असो, ज्या पदासाठी आपण तयारी करीत आहोत, त्याविषयी प्राथमिक माहिती आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे. त्या संबंधित पदाचे कार्य, कर्तव्य, जबाबदार्‍या, अधिकार इ. बाबी आपल्याला तयारी करण्यासाठी प्रोत्साहित करीत असतात. प्रस्तुत लेखात आपण तयारी कशी करावी या बरोबर PSI या पदाशी संबंधित इतर बाबींचा आढावा घेणार आहोत. PSI-Police sub-Inspector (पोलीस उपनिरीक्षक) पद मिळविण्यासाठीची रणनीती आपण येथे अभ्यासणार आहोत.

      PSI परीक्षेचे टप्पे -

      PSI परीक्षा ही 3 टप्प्यांची परीक्षा आहे, यामध्ये -

      1) पूर्व परीक्षा (वस्तुनिष्ठ) - 100 गुणांचा 1 पेपर

      2) मुख्य परीक्षा (वस्तुनिष्ठ) - 100 गुणांचे 2 पेपर (एकूण गुण 200).

      3) शारीरिक चाचणी व मुलाखत - शारीरिक चाचणी - 100 गुण - मुलाखत (आता रद्द करण्यात आली आहे.)

      पूर्व परीक्षा स्वरूप -

      PSI पदाकरिता घेण्यात येणारी पूर्व व मुख्य दोन्ही परीक्षा या वस्तुनिष्ठ (objective) स्वरूपाच्या आहेत. परीक्षेच्या स्वरूपासंबंधी खालील तक्ता बघा.

              एकूण विषय             प्रश्नसंख्या     गुण            माध्यम दर्जा          परीक्षेचा कालावधी     प्रश्नपत्रिका स्वरूप

      सामान्य क्षमता चाचणी         100        100      मराठी व इंग्रजी पदवी             1 तास                वस्तुनिष्ठ प्रश्न

      वरील तक्त्याचे विश्‍लेषण केल्यास -

      1) पूर्व परीक्षेत एकच पेपर असतो.

      2) 1 प्रश्नासाठी एक गुण (सर्व प्रश्नांना समान गुण).

      3) परीक्षेमध्ये प्रश्न इंग्रजी व त्याचे मराठी भाषांतर अशा दोन भाषांमध्ये असतात.

      4) परीक्षेचा दर्जा पदवीपर्यंतचा असल्यामुळे अभ्यासाची दिशा निर्धारित करता येते (ते आपण पुढे बघणार आहोत.)

      5) परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे असल्यामुळे एका प्रश्नाला 36 सेकंद मिळतात (याचेही नियोजन पुढे दिले आहे.)

      6) परीक्षेमध्ये प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले असतात व आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो.

      नकारात्मक (Negative) गुणपद्धती -

      पूर्व व मुख्य परीक्षेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे 1/3 (एक तृतीयांश) नकारात्मक गुण पद्धती. यामध्ये तुमच्या चुकलेल्या प्रत्येक तीन प्रश्नांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील. म्हणजे जर तुम्ही 100 प्रश्न सोडवले व त्यातील तीन चुकले तर तुमच्या बरोबर 97 प्रश्नांमधून एक प्रश्न वजा होईल व तुम्हाला 97 - 1 = 96 प्रश्नांचे गुण दिले जातील.

      - परीक्षा पास होण्याचे एख प्रमुख सूत्र म्हणजे कमीत कमी Negative कसे करता येतील आणि त्याचा उपाय म्हणजे परीक्षेच्या अगोदरचा सराव.

      - भरपूर प्रश्नपत्रिकांचा सराव

      - अनभिज्ञ (माहिती नसलेल्या) प्रश्नांशी न खेळणे.

      - अभ्यास करताना नेमकेपणा.

      - परीक्षेच्या अगोदरची उजळणी (Revision)

      - अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा 1-2 पुस्तकांनाच परत परत उजळणी देणे.

      - स्वतःच्या संक्षिप्त (Short Notes) नोट्स काढणे.

      - प्रश्नपत्रिका सोडविण्याची रणनीती अगोदरच मनात तयार ठेवणे.

      आदी गोष्टीवर काम केल्यास नकारात्मक गुणांच्या जाळ्यातून पुढे जाण्यास मदत होईल.

      परीक्षेसाठीची पात्रता - प्रत्येक पदासाठी काही शैक्षणिक व शारीरिक गुणवत्ता असणे आवश्यक असते.

      1) नागरिकत्व - तो भारतीय नागरीक असावा.

      2) वयोमर्यादा - कमीत कमी 19 वर्षे व जास्तीत जास्त 28 वर्षे वयापर्यंत (वयामध्ये सवलती लागू).

      * महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांकरिता 3 वर्षांपर्यंत शिथिलक्षम.

      * पात्र खेळाडूंच्या बाबतीत 5 वर्षांपर्यंत शिथिलक्षम.

      * आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ठ अधिकारी यांच्यासाठी 5 वर्षांपर्यंत वय शिथिलक्षम.

      3) शैक्षणिक अर्हता -

      * मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अथवा महाराष्ट्र शासनाने पदवीच्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

      * मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

      * जे उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षेस बसले आहेत, असे उमेदवारसुद्धा पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, परंतु PSI मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी PSI मुख्यचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

      * ज्या पदवीसाठी अंतर्वासिता (Internship) निर्धारित केली असेल अशी पदवी धारण करणार्‍या उमेदवारांनी अंतर्वासिता PSI मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनापर्यंत पूर्ण केली असेल तरच त्याला पदवीधर समजण्यात येईल.

      4) शारीरिक पात्रता -

       पुरुषांसाठी -

       उंची - 165 सें.मी. (अनवाणी)

       छाती - किमान 79 सें.मी. (न फुगवता) - फुगवून 84 सें.मी. (कमीत कमी विस्तार 5 सें.मी.)

      स्त्रियांसाठी -

       उंची - 157 सें.मी. (किमान) अनवाणी.

      (टीप - PSI परीक्षेसाठी अपंग विद्यार्थी पात्र नसतील.)

      परीक्षा शुल्क -

      अमागास (General) वर्ग - 365 रु.

      मागासवर्ग (OBC, SC, ST, etc.) - 265 रु.

      माजी सैनिक - 015 रु.

      (टीप - परीक्षा शुल्कामध्ये आयोग वेळोवेळी बदल करू शकते. संबंधित माहिती त्या-त्या वेळी पडताळून घेणे.)

      अभ्यासक्रमातील घटक निहाय प्रश्न - अभ्यासक्रमात एकूण सात मुख्य घटक दिलेले आहेत व 40 उपघटक दिलेले आहेत.

      उदा. सामान्य विज्ञान हा मुख्य घटक तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र हे उपघटक आहेत. आपण मुख्य घटकनिहाय परीक्षेत विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची सरासरी संख्या बघू.

              विषय                                 2013         2014

      1) चालू घडामोडी                            12             13

      2) नागरिकशास्त्र                              -              12

      3) इतिहास                                     -              15

      4) भूगोल                                       -              15

      5) अर्थव्यवस्था                               -              15

      6) सामान्य विज्ञान                          -              15

      7) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित     -              15

      वरील तक्त्यावरून आपण असे स्पष्ट अंदाज बांधू शकतो, की परीक्षेत अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयावर सारख्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात म्हणजे प्रत्येक विषय हा (सरासरी) 15 मार्क मिळवून देणारा आहे.

      शारीरिक चाचणी -

      - एकूण चाचण्या 5 (पुरुष) व 3 (स्त्री महिलांसाठी)

      - एकूण गुण - 100

      - शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 गुण मिळाल्यास तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाते.

      A) पुरुष शारीरिक चाचण्यांचे सविस्तर विश्‍लेषण -

      1) धावणे (Running) - 50 गुण

      या स्पर्धेत तुम्हाला 800 मीटरचे अंतर 2 मिनिटे 30 सेकंदांत पूर्ण करावयाचे असते.

      I) 800 मीटर अंतर जर 2 मी. 30 सें. पूर्ण केल्यास 50 गुण.

      II) 800 मीटर अंतर जर 2 मी. 31 सें. ते 2 मी. 40 सेकंदांत पूर्ण केल्यास 44 गुण.

      III) 800 मीटर अंतर जर 2 मि. 40 सें. ते 2 मि. 50 पूर्ण केल्यास 35 गुण.

      IV) 800 मीटर अंतर जर 3 मि. 20 सें. ते 3 मि. ......सेकंदांत पूर्ण केल्यास 12 गुण.

      IV) 800 मीटर अंतर जर 3 मि. 30 सेकंदांपेक्षा जास्त काळात पूर्ण केले तर 00 गुण.

      2) 8 पुलअप्स (Pull ups) - 20 गुण.

      - प्रत्येक Pull up साठी 2.5 गुण (2.5 8 = 20)

      3) लांब उडी (long jump) - 15 गुण (4.5 मीटर)

      - 2.5 मि. पेक्षा कमी उडी गेल्यास 0 गुण

      4) गोळाफेक (Shot Pull) -

      - 7 किलो 260 ग्रॅमचा गोळा.

      - 7.5 मिटर फेकल्यास 15 गुण

      - 5 मीटरपेक्षा कमी फेकल्यास 0 गुण.

      B) हिला शारीरिक चाचण्यांचे सविस्तर विश्‍लेषण -

      1) धावणे (Running) - 40 गुण

      - 200 मीटर

      2) चालणे (Walking) - 40 गुण

      - 3 कि.मी.

      3) गोळाफेक (Shot pull) - 4 k.g. - 20 गुण.

 

 

 

 

      महाराष्ट्र वनसेवा परीक्षा

      महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र वनसेवा परीक्षामार्फत सहायक वनसंरक्षक (गट-अ) आणि वनक्षेत्रपाल (गट-ब) ही राजपत्रित प्रकारची पदे भरण्यात येतात. सध्या वनक्षेत्रामध्ये होत असलेली घट आणि वनसंरक्षण हा मुद्दा चर्चेत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून ही दोन महत्त्वाची पदे भरली जातात. ही पदे राज्यसेवा परीक्षेमधून भरल्या जाणार्‍या पदासारखी दरवर्षी भरत नाहीत, तर या पदाची जाहिरात दर 2 ते 3 वर्षांनी निघते. यापूर्वी 2012 मध्ये जाहिरात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये जाहिरात आली. आयोगाच्या 2015 च्या वेळापत्रकानुसार वनसेवा पूर्व परीक्षा ही एप्रिल 2015 मध्ये होणार होती. मात्र काही कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे उमेदवारांनी या वर्षासाठीच्या परीक्षेची तयारी करताना नियोजनपूर्वक करणे गरजेचे आहे. जेव्हा जेव्हा या पदांसाठी जाहिरात येईल तेव्हा तेव्हा उमेदवारांनी या संधीचा लाभ घेणे गरजेचे आहे.

      निवडक पदवीधारकांनाच संधी -

      महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतर परीक्षा म्हणजे STI, PSI, ASSISTANT, राज्यसेवा यांना पात्रता ही कुठलाही पदवीधारक आहे. मात्र या परीक्षेसाठीची पात्रता ही फक्त काही निवडक पदवीधारकांनाच आहे. त्यामुळे इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा ही काही प्रमाणात कमी असेल, त्यामुळे उमेदवारांनी याचा फायदा घेणे गरजेचे आहे.

      वेतनश्रेणी -

      1) गट-अ (सहायक वनसंरक्षक) - रुपये 9300-34,800 + ग्रेड पे 5000

      2) गट-ब (वनक्षेत्रपाल) - रुपये 9300-34,800 + ग्रेड पे 4400

      पदासाठीची पात्रता -

      1) भारतीय नागरिकत्व.

      2) वयाची मर्यादा ही किमान 18 वर्षे व 33 वर्षांपेक्षा जास्त नको. (मागासवर्गीयांसाठी 38 वर्षे).

      3) शैक्षणिक अर्हता - वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या, पशुपालन, पशुवैद्यकीय शास्त्र, कृषी, अभियांत्रिकी यातील पदवीधर असावा.

      4) शारीरिक मानके -

      उमेदवाराचा प्रवर्ग + उंची + छातीचा घेर (न फुगविता) + छातीचा घेर फुगविता

      पुरुष उमेदवार + 163 सें.मी. + 79 सें.मी. + 5 सें.मी.

      स्त्री उमेदवार + 150 सें.मी. + 74 सें.मी. + 5 सें.मी.

      अनुसूचित जमातीमधील उमेदवारांच्या बाबतीत शिथिल

      पुरुष उमेदवार + 152.5 सें.मी. + 79 सें.मी. + 5 सें.मी.

      स्त्री उमेदवार + 145 सें.मी. + 74 सें.मी. + 5 सें.मी.

      1) पदाविषयी माहिती -

      वनअधिकारी हा वनासंबंधित कायदेविषयक बाबींचे आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात नियमांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असतात.

      वनसेवा व त्यासंबंधित असलेली पदाची रचना खालीलप्रमाणे -

      डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट

      प्रधान मुख्य वनसंरक्षक (Principal Chief Conservator of Forests) 

      अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक (Additional Principal Chief Conservator of Forest) 

      मुख्य वनसंरक्षक (Chief Conservator of Forests) 

      वनसंरक्षक (Conservator of Forest)

      उपवनसंरक्षक (Deputy Conservator of Forest)

      सहायक वनसंरक्षक (Assistant Conservator of Forest) 

      वनक्षेत्रपाल (Range Forest Officer)

      पूर्वपरीक्षेच्या घटकांवर नजर टाकल्यास असे लक्षात येते, की हे घटक इतर आयोगाच्या परीक्षेतही असतात त्यामुळे उमेदवारांना पूर्वपरीक्षेसाठी पात्र होण्याची संधी सोपी आहे.

      2) मुख्य परीक्षा -

      मुख्य परीक्षा ही आव्हानात्मक स्वरूपाची असून, यामध्ये प्रामुख्याने दोन पेपरचा समावेश आहे व मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाते.

      पेपर क्र. 1 -

      विषय + गुण आणि प्रश्नांची संख्या + वेळा + दर्जा + माध्यम

      सामान्य अध्ययन + 200 गुण 100 प्रश्न (वस्तुनिष्ठ स्वरूप) + 1 तास + पदवी + मराठी व इंग्रजी

      घटक - पेपर क्र. 1 -

      1) भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.

      2) प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, भूगोल (भारत, जग, महाराष्ट्राच्या संबंधित).

      3) भारतीय राज्यघटना, राज्यव्यवस्था, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था.

      4) आर्थिक आणि सामाजिक विकास.

      पेपर क्र. 2 -

      विषय + गुण + प्रश्न संख्या + वेळा + दर्जा + माध्यम

      Nature Conservation + 200 + 100 + 1 तास + पदवी + इंग्रजी

      घटक - पेपर क्र. 2 -

      1) मृदा - प्राकृतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म, मृदानिर्मिती, पोषणद्रव्ये.

      2) मृदा आणि संवर्धन - मृदा धूप व संरक्षण, पाणलोट व्यवस्थापन.

      3) पर्यावरण परीसंस्था, अन्नसाखळी, अन्नजाळे, अन्नस्तूप, कार्बन नायट्रोजन चक्र, ऊर्जाप्रवाह.

      4) सेंद्रिय व रासायनिक खते, प्रकार.

      5) वनस्पती व प्राण्यांवरील महत्त्वाचे रोग व कीड.

      6) कीटकनाशके आणि पेस्टीसाईड.

      7) पर्यावरणीय प्रदूषण.

      8) खाणकाम व उत्खननामुळे पर्यावरण प्रदूषण व त्याचा परिणाम.

      9) भारतातील महत्त्वाच्या वन्यप्राण्यांच्या जाती.

      10) महत्त्वाचे मूळ प्रजाती, परकीय प्रजाती, वनोत्पादन, औषधी वनस्पती, Energy Plantation, ग्रुव्ह, वनांवर आधारित उद्योगधंदे.

      11) पिकांच्या वाढीसाठी आणि वितरणासाठी महत्त्वाचे कारक घटक.

      12) वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, जागतिक वारसा स्थळे.

      13) गुरांच्या जाती, त्यांचे महत्त्व, चारा व्यवस्थापन.

      14) हानिकारक व घातक वनस्पती व तणे.

      15) ऊती संवर्धन, वनस्पती प्रजनन.

      16) ग्रीनहाउस परिणाम, कार्बन ट्रेडिंग, वातावरण बदल.

      17) Use of aerial photograph, Thematic map, Satellite imageries, Principle  application of GIS.

      18) जैवविविधता, त्याच्या र्‍हासाची कारणे, संवर्धन.

      19) सामाजिक वनीकरण, संयुक्त वन व्यवस्थापन, कृषी...

      20) आदिवासी व वने, भारतातील महत्त्वाच्या आदिम वन्यजमाती.

      21) कायदे - Indian Forest Pollicy, Indian Forest Act, Wildlife pretection Act, Forest Conservation Act, 1980.

      22) पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था.

      वरील पॅटर्नचे विश्‍लेषण केल्यास असे दिसून येते, की पूर्वपरीक्षेत पेपर हा एकच असतो व त्यामध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्नसंख्या आहे, त्यामुळे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असतो, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो.

      याउलट मुख्य परीक्षेचा आवाका मोठा आहे. यामध्ये दोन पेपर प्रत्येकी 200 गुणांसाठी म्हणजेच एकूण 400 गुण, मात्र प्रश्नसंख्या 100 अजून वेळ हा एक तास आहे, त्यामुळे परीक्षार्थी / विद्यार्थ्यांनी जागरूक राहून नियोजन पद्धतीने पेपरची तयारी करणे गरजेचे आहे. तसेच पेपर क्रमांक दोनमध्ये पर्यावरण, कृषी, फॉरेस्ट्री या तीन घटकांना संतुलित दिले आहे. त्यामुळे कुठल्याही एका पदवीधारकाला या परीक्षेचा फायदा होणार नसून सर्व विज्ञान शाखेतील परीक्षार्थी/ विद्यार्थ्यांना समान संधी आहे.

      वन अधिकार्‍यांची कर्तव्ये व अधिकार -

      1) वन कायद्यांची माहिती करून घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.

      2) कार्यक्षेत्रामधील वनक्षेत्र जे आरक्षित किंवा अनारक्षित असेल त्याची देखरेख करणे व उपाययोजना करणे.

      3) वनपरिक्षेत्राची पाहणी करणे व संलग्न अधिकार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

      4) कार्यक्षेत्रातील वनासंबंधीच्या माहितीचा आढावा विभागीय वनसंरक्षकाकडे पाठवणे.

      5) कनिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामगिरीचे वेळोवेळी मूल्यमापन करणे आणि त्यांच्या इतिवृत्ताची नोंद घेणे.

      6) वनउत्पादनांपासूनचा महसूल व त्यांचे उत्पादन याविषयी माहिती संकलित करणे आणि वरिष्ठांकडे पाठविणे.

      7) वन्यजीव व वन्य वनस्पती यांचे बेकायदेशीर व्यापारापासून संरक्षण करणे व कायद्याची कडक अंमलबजावणी करणे.

      8) पेसा (PESA - Panchayat Extension in Scheduled Area) कायद्याअंतर्गत येणार्‍या बाबींचे वेळोवेळी आदिवासींना मार्गदर्शन करणे व धोरण राबवण्यासाठीची उपाययोजना करणे.

      परीक्षेच्या पॅटर्नविषयी -

      महाराष्ट्र वनसेवा ही 3 टप्प्यांवर आधारित आहे. गेल्याच वर्षी या पद्धतीच्या स्वरूपामध्ये आयोगाने आमूलाग्र बदल घडवून आणला आहे व त्यामुळे ही परीक्षा खरोखर आव्हानात्मक आणि नियोजनबद्धतेला वाव देणारी आहे. ही परीक्षा पूर्व, मुख्य, मुलाखत अशा 3 टप्प्यांवर घेतली जाते.

      अ.क्र. + टप्पा + परीक्षेचे स्वरूप + गुण

      1 + पूर्व परीक्षा + बहुपर्यायी प्रश्न + 100 गुण

      2 + मुख्य परीक्षा + बहुपर्यायी प्रश्न + पेपर 1 - 200 पेपर 2 - 200 गुण

      3 + मुलाखत + + 50 गुण

      ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असल्याने योग्य संदर्भग्रंथ, नोट्स आणि मार्गदर्शनाद्वारे या परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त होऊ शकते.

      1) पूर्वपरीक्षा - साधारणपणे जाहिरात आल्यानंतर 2-3 महिन्यांमध्ये पूर्वपरीक्षा घेतली जाते. ही परीक्षा 100 गुणांची असून, चाचणी परीक्षा म्हणून ओळखली जाते. कारण याचे गुण हे पद निवडताना लक्षात घेतले जात नाहीत.

      पूर्वपरीक्षेमध्ये प्रमुख घटक -

      1) मराठी भाषा - व्याकरण

      2) इंग्रजी भाषा - व्याकरण

      3) राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी

      4) सामान्य बुद्धिमापन चाचणी

      5) सामान्य विज्ञान

      महाराष्ट्र कृषी सेवा गट - अ व ब

      परीक्षेचे टप्पे -

      1) पूर्वपरीक्षा - 200 गुण

      2) मुख्य परीक्षा - 600 गुण

      3) मुलाखत - 75 गुण

      1) पूर्वपरीक्षा -

      महाराष्ट्र कृषी सेवामार्फत राजपत्रित गट-अ व गट-ब पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येते. या परीक्षेचे 3 टप्पे असून, पहिला टप्पा हा पूर्वपरीक्षेचा असून, ही परीक्षा चाळणी परीक्षा म्हणून घेतली जाते. या परीक्षेचे गुण मुख्य परीक्षेत धरले जात नाहीत. मात्र दिवसेंदिवस पूर्वपरीक्षा ही आव्हानात्मक व परीक्षार्थी/विद्यार्थ्यांचा कस पाहणारी ठरत असून, त्यामुळे पूर्वपरीक्षेचे नियोजन करणे गरजेचे आहे.

      पूर्वपरीक्षा योजना व अभ्यासक्रम -

      विषय + गुण + प्रश्नसंख्या + कालावधी + दर्जा + माध्यम + स्वरूप

      मराठी + 35 + 35 + + शालान्त + मराठी + वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

      इंग्रजी + 35 + 35 + 2 तास + पदवी + इंग्रजी + वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

      सामान्य अध्ययन + 80 + 80 + + पदवी + मराठी व इंग्रजी + वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

      कृषीविषयक घटक + 50 + 50 + + पदवी + मराठी व इंग्रजी +वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

      पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम व घटक - 

      1) मराठी - शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, उतार्‍यावरील प्रश्न.

      2) इंग्रजी - Common vocabulary, sentence structure, Grammer, Use of Idioms, Phrases, Comprehension of passage. 

      3)    General Studies : 

      i)    Current event 

      ii)     History of Modern India (1857-2000) 

      iii)     Indian Political System 

      iv)     Geography of India 

      v)     Social Reforms of Maharashtra 

      vi)     Indian economy 

      vii)     Sustainable Development 

      viii)     Computers and Information Technology 

      ix)     Impact of Political, Economical, Social, Communication, Public Health Developments on Rural life 

      4)     Agriculture :

      A)     Land ...... Hillsation and major crops 

      B)    Irrigation sources and methods 

      C)    Animal Husbundary and Dairy 

      D)    Horticulture, Forest Development and produce 

      E)    Fisheries 

      F)    Agricultural Economics 

      पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम हा आव्हानात्मक असल्याने परीक्षार्थी/विद्यार्थी यांचा अभ्यास नियोजनपूर्वक व योग्य संदर्भसाहित्याचा वापर करून करावा.

      2) मुख्य परीक्षा -

      पूर्वपरीक्षेनंतर साधारणतः 3-4 महिन्यांनी पूर्वपरीक्षेतून पात्र विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी बसतात. मुख्य परीक्षा ही पद ठरवण्यासाठी महत्त्वाची असल्याने मुख्य परीक्षेला सखोल वाचन व संकल्पनांचे सविस्तर वाचन आवश्यक आहे. मुख्य परीक्षेसाठी दर्जा हा पदवी स्तरावरील कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी स्तराचा असून, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेसाठी संदर्भ साहित्याचा वापर करताना कृषी पदवीधारकांनी शक्यतो तज्ज्ञ व्यक्तींच्या नोट्स, संदर्भपुस्तके व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.