Menu

Study Circle

३१ मार्च २०१७

’शरद पवारांना ’पद्मविभूषण’ प्रदान

        ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपतिभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ’पद्मविभूषण पुरस्कार’ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पवार यांच्यासह अन्य 33 मान्यवरांना पद्म-पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ पार पडला. ज्येष्ठ भाजप नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी (पद्मविभूषण), मुंबईतील शल्यविशारद डॉ. टी. ई. उदवाडिया (पद्मभूषण), क्रिकेटपटू विराट कोहली (पद्मश्री), गायिका अनुराधा पौडवाल (पद्मश्री) यांचा त्यात समावेश होता. सायंकाळी 6.30 वाजता राष्ट्रपतिभवनातील दरबार हॉलमध्ये हा पुरस्कार-वितरण-सोहळा पार पडला.
          या समारंभास उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, गृहमंत्री राजनाथसिंह, संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार, ऊर्जामंत्री पीयूष गोयल, क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल, लघू-मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आदी उपस्थित होते. पवार यांच्या संदर्भातील गौरवपत्रात त्यांच्या शेतकरी कुटुंबातील जन्माचा उल्लेख करतानाच अवघे 24 वर्षांचे वय असतानाच युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षपद आणि 27 व्या वर्षी आमदार म्हणून निवड झाल्याचा उल्लेख आहे.
          32 व्या वर्षी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद आणि 38 व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्रिपद याचा उल्लेख करून देशातील सर्वांत ’तरुण मुख्यमंत्री’ होण्याचा मान त्यांना मिळाल्याचा विशेष उल्लेख, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद 4 वेळेस भूषविण्याची त्यांना मिळालेली संधी, या कामगिरीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. 1991 मध्ये संरक्षणमंत्रिपद, 1995 मध्ये काँग्रेसचे संसदीय नेतेपद, 2004 मध्ये केंद्रीय कृषिमंत्रिपद याचाही उल्लेख या गौरवपत्रात करण्यात आला आहे.
          ’उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून मिळालेला पुरस्कार, सार्वजनिक क्षेत्रातील कामाची प्रदीर्घ मालिका, डेट्रॉईट विद्यापीठाने प्रदान केलेली सन्माननीय डॉक्टरेट, क्रिकेटच्या क्षेत्राबरोबरच कबड्डी, कुस्ती व अन्य क्रीडाक्षेत्रातील योगदानाचाही यामध्ये समावेश केला आहे.
           या समारंभात कुमारी निवेदिता रघुनाथ भिडे (विवेकानंद केंद्र उपाध्यक्षा), डॉ. सुहासचंद्र विठ्ठल मापुस्कर (मरणोत्तर - पुण्याजवळच्या देहू येथे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कामगिरी), भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ चंद्रकांत पीठावा या महाराष्ट्राशी संबंधित मान्यवरांचा समावेश होता.

पेगी व्हिटसन

        अवकाशात सर्वांत अधिक काळ चालण्याचा विक्रम सुनीता विल्यम्स यांच्या नावावर असून त्या आतापर्यंत 50 तास 40 मिनिटे अवकाशात चालल्या आहेत.
        सर्वांत ज्येष्ठ व अनुभवी महिला अवकाशवीर असलेल्या पेगी व्हिटसन (वय 57) यांनी आठव्यांदा अवकाशातून चालत जात (स्पेस वॉक) नवा विक्रम प्रस्थापित केला. इतक्या वेळा ’स्पेस वॉक’ करणार्‍या त्या पहिल्याच महिला अवकाशवीर ठरल्या आहेत.
        व्हिटसन आणि त्यांचे सहकारी शेन किमबरो यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून बाहेर पडत येथे येणार्‍या अवकाशयानांसाठी पार्किंगसाठी जागा (डॉकिंग पोर्ट) तयार करण्याच्या कामास सुरवात केली.
         या ’स्पेस वॉक’ दरम्यान व्हिटसन या हा विक्रमही मोडतील. व्हिटसन या गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून अवकाशस्थानकात असून त्या तिसर्‍यांदा अवकाशस्थानकात आल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत 500 हून अधिक दिवस अवकाशात व्यतित केले असून असे करणार्‍याही त्या पहिल्या महिला आहेत.

नासाचे स्टॉपवॉच मोजणार सेकंदाचा अब्जावा भाग

        अवकाशात सर्वांत अधिक काळ चालण्याचा विक्रम सुनीता विल्यम्स यांच्या नावावर असून त्या आतापर्यंत 50 तास 40 मिनिटे अवकाशात चालल्या आहेत.
        सर्वांत ज्येष्ठ व अनुभवी महिला अवकाशवीर असलेल्या पेगी व्हिटसन (वय 57) यांनी आठव्यांदा अवकाशातून चालत जात (स्पेस वॉक) नवा विक्रम प्रस्थापित केला. इतक्या वेळा ’स्पेस वॉक’ करणार्‍या त्या पहिल्याच महिला अवकाशवीर ठरल्या आहेत.
        व्हिटसन आणि त्यांचे सहकारी शेन किमबरो यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून बाहेर पडत येथे येणार्‍या अवकाशयानांसाठी पार्किंगसाठी जागा (डॉकिंग पोर्ट) तयार करण्याच्या कामास सुरवात केली.
         या ’स्पेस वॉक’ दरम्यान व्हिटसन या हा विक्रमही मोडतील. व्हिटसन या गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून अवकाशस्थानकात असून त्या तिसर्‍यांदा अवकाशस्थानकात आल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत 500 हून अधिक दिवस अवकाशात व्यतित केले असून असे करणार्‍याही त्या पहिल्या महिला आहेत.

३० मार्च २०१७

’भारतीयांना ग्रीन कार्डवर आता थेट दुबईत प्रवेश

        अमेरिकेचा व्हिजा किंवा ग्रीन कार्ड असलेल्यांना आता थेट यूएईमध्ये प्रवेश करता येणार आहे. यूएईत प्रवेश केल्यावर त्यांना व्हिजा मिळणार आहे. यूएईच्या कॅबिनेटने या विधेयकाला मंजुरी दिली असून, त्याची घोषणा केली.
       ज्या भारतीय नागरिकांकडे साधा पासपोर्ट किंवा ग्रीन कार्ड आहे, अशा नागरिकांना यूएईमध्ये प्रवेश केल्यानंतर व्हिजा मिळणार आहे.  मात्र हा व्हिजा फक्त 14 दिवसांपुरता मर्यादित असेल. तसेच अतिरिक्त शुल्क देऊन तुम्हाला हा व्हिजा आणखी वाढवता येणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय राजकीय, आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याच्यादृष्टीने यूएईने हे पाऊल उचलले आहे. त्याप्रमाणेच जागतिक पर्यटनालाही चालना देण्याचा यूएईचा उद्देश आहे.
         भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास 6 हजार कोटी डॉलरची उलाढाल होते. मेकिंग इंडियासाठी भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश हा यूएई आहे. यूएई भारतात 2700 कोटी डॉलरचा माल निर्यात करतो, तर भारत 45,000 कंपन्यांच्या माध्यमातून 3300 कोटी डॉलरचा माल यूएईमध्ये निर्यात करतो. त्याचप्रमाणे यूएई भारतात ऊर्जा, धातू उद्योग, सेवा, तंत्रज्ञान आणि बांधकाम आदी क्षेत्रात एक हजार कोटी डॉलरची गुंतवणूक करत आहे.

’ख्यातनाम कायदेतज्ज्ञ टी.आर. अंध्यारूजीना यांचे निधन

        सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, विख्यात विधिज्ञ आणि घटनातज्ज्ञ थेम्प्टन रुस्तमजी (टी.आर.) अंध्यारुजिना यांचे 28 मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
         राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पहिल्या सरकारच्या काळात 1996 ते 1998 पर्यंत अंध्यारुजिना भारताचे सॉलिसिटर जनरल होते. त्याआधी 1993 ते 1995 या काळात ते महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल होते.
        अंध्यारुजिना यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून सर चार्लस सार्जंट शिष्यवृत्ती व विष्णू धुरंधर सुवर्णपदकासह कायद्याची पदवी प्राप्त केली. यानंतर लगेचच त्यांनी अ. भा. सेवा परीक्षा दिली व त्यात तिसरे आल्याने त्यांची भारतीय विदेश सेवेसाठी निवड झाली. परंतु त्यांनी वकिलीच करण्याचे ठरविले. सुरुवातीची 16 वर्षे ख्यातनाम वकील एच. एम. सिरवई यांच्यासोबत काम केल्यानंतर अंध्यारुजिना यांनी स्वतंत्रपणे वकिली सुरु केली. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून अधिनामित करण्यात आले.
         सुमारे 60 वर्षांच्या वकिली कारकिर्दीत त्यांनी खास करून सर्वोच्च न्यायालयात किचकट घटनात्म मुद्दे असलेली असंख्य प्रकरणे हाताळली. त्यात संसदही राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलू शकत नाही, असा निकाल दिला गेलेले केशवानंद भारती प्रकरण, कर्नाटक राज्य सरकार बरखास्तीचे एस.आर. बोम्मई प्रकरण, कामाच्या ठिकाणी होणार्‍या स्त्रियांच्या लैंगिक शोषणासंबंधीचे विशाखा प्रकरण, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविरुद्धचे विश्‍वासदर्शक ठरावासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच दिल्याचे प्रकरण, संसदेत प्रश्‍न विचारण्यासाठी पैसे घेतल्यावरून 14 खासदारांना बडतर्फ केले गेल्याचे प्रकरण, अरुणा शानभाग हिचे इच्छामरण प्रकरण यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
         अंध्यारुजिना मृत्यूदंडाची शिक्षा कायद्यातून कायमची रद्द करण्याचे कट्टर पुरस्कर्ते होते व याकूब मेनन याच्या फाशीच्या अपिलाच्या वेळीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्या अनुषंगाने स्वतंत्र युक्तिवाद केला होता.
         मुंबई विद्यापीठ, भारतातील अनेक राष्ट्रीय विधी विद्यापीठे, पुण्याचे सिम्बॉयसिस लॉ कॉलेज आणि इंग्लंडमधील बेलफास्ट विद्यापीठातही त्यांनी कायद्याचे अध्यापन केले. त्यांनी अनेक महत्त्वाच्या सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम केले व त्यांच्याच समितीने केलेल्या शिफारशीनुसार आताचा ‘सरफासी’ कायदा केला गेला. अंध्यारुजिना यांनी अनेक पुस्तकांखेरीज कायदा आणि न्यायालये या विषयांवर वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून विपूल लेखन केले.

२९ मार्च २०१७

’उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ योजना

           मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शेती आणि शेतकर्‍यांच्या विकासासाठी राबविण्यात येणार्‍या ’उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानाचा शुभारंभ केल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. आकाशवाणीवरून शेतकर्‍यांना संदेश प्रसारीत करून कृषिमंत्र्यांनी अभियानाची सुरूवात केली आहे.
         या अभियानाविषयी अधिक माहिती देताना फुंडकर यांनी सांगितले की, शेतकरी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पुढील वर्षाच्या शेतीचे नियोजन सुरु करतो. त्याप्रमाणे शासनानेदेखील खरीप हंगामाच्या शेतीचे नियोजन केले आहे. शेतकर्‍यांना पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा आणि घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न मिळावे हा या नियोजनाचा मुख्य हेतू आहे.
           2017 पासून कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी तालुका हा विकास घटक ठरवून नियोजन करण्यात आले. शासनाने खरीप हंगामामध्ये लागणारे उत्तम प्रकारचे बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले. त्यासाठी पुढील 5 वर्षांचा बियाणे पुरवठ्याचा आराखडादेखील तयार केला आहे. खतांचा शेतकर्‍यांना मुबलक पुरवठा वेळेत होईल याबाबतही नियोजन केले आहे. दर्जेदार कंपन्यांची कीटकनाशके, शासकीय प्रयोगशाळेतून जैविक द्रवरूप खते व जैविक कीटक नाशकांच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे. कृषी विभागासह सर्व कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र आणि सर्व संशोधन संस्था यांनी त्यांच्याकडील कामाचे नियोजन केलेले आहे.
  कृषी यांत्रिकीकरणाची मोहीम -
            शेतकरी बांधवाना खरीप पूर्व मशागतीची व पेरणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी, शेतीतील बैलांची कमी झालेली संख्या व ऐन हंगामात निर्माण होणारी मजुरांची टंचाई यावर मात करून पिकांच्या काढणी पर्यंतची कामे सुकरपणे करणे शक्य व्हावे यासाठी कृषी यांत्रिकीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यात शेतकर्‍यांना 4 बैलांचे काम करू शकणारे छोटे ट्रॅक्टर, पॅावर टिलर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, थ्रेशर, तसेच भातासाठी ट्रान्सप्लांटर, रिपर, ऊसासाठी पाचट कुट्टी यंत्र, फळबागेसाठी स्प्रेअर, मिस्ट ब्लोअर इ. यंत्र खरेदीसाठी वर्षाच्या सुरुवातीपासून शासन अनुदान उपलब्ध करून देणार आहे. ही यंत्रे शेतकर्‍यांना त्यांच्या पसंतीने खरेदी करण्याची मुभा शासन देणार आहे आणि त्याचे अनुदान शेतकर्‍यांच्या आधार क्रमांक संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
   उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवडा -
           या वर्षी संपूर्ण ‘रोहिणी’ नक्षत्रातील 15 दिवस कृषी विभाग ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवडा’ साजरा करणार आहे. या पंधरवड्यात सर्व कृषीशास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी गावोगावी जाऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणार असून शेतकर्‍यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देतील. या वर्षात राज्यातील सुमारे 2 लाख शेतकर्‍यांना विविध पिकांच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येईल.
5 कोटी 6 लाख शेतकर्‍यांना जमीन आरोग्यपत्रिकेचे वाटप -
          शासनाने राज्यातील शेतजमीनींची आरोग्यपत्रिका तयार करून 5 कोटी 6 लाख शेतकर्‍यांना वितरीत केल्या आहेत. सदर आरोग्य पत्रिकांच्या आधारे शेतकर्‍याने आपल्या जमिनीत घेणार्‍या पिकांकरीता आवश्यक मात्रेतच खते द्यावीत व उत्पादन खर्चामध्ये बचत करावी. याकामी शेतकर्‍यांना गावातील कृषी सहाय्यकांचे सहाय्य मिळणार आहे.
          कृषी विभाग नवीन वर्षामध्ये गाव पातळीवर 10 हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहे. यामध्ये शेतकरी गटास प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण शास्त्रज्ञांमार्फत देण्यात येणार आहे. या प्रात्यक्षिकांसाठी लागणारे खते, बियाणे, औषधे याची खरेदी शेतकर्‍यांनीच करावयाची आहे आणि त्याचे अनुदान शेतकर्‍यांच्या आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येईल.
          शेतकर्‍यांना शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करून मूल्यवर्धित माल बाजारपेठेत विक्रीस नेणे शक्य व्हावे म्हणून शेतकर्‍यांना प्राथमिक प्रक्रिया युनिट उभारण्याकरीता अर्थसहाय्य करण्याची नवीन योजना कृषी विभागामार्फत या वर्षापासून सुरु करणार आहे.
           शेतकर्‍यांच्या शेतावर ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, आधुनिक औजारे, कांदा चाळी, शेड नेट, विहिरी, पंप इ. पायाभूत सुविधा निर्माण करून शेतकर्‍यांना आधुनिक शेती करता यावी व त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ व्हावी ही शासनाची भूमिका आहे. त्याकरीता नवीन वर्षात शेतकर्‍यांना शासन मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य पुरविणार आहे. शासनाचे सदर अनुदान थेट शेतकर्‍यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर देण्याचे नियोजन केले असून त्याकरिता शेतकरी बांधवांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करून घ्यावे तसेच, ज्यांच्या आधार क्रमांक नसतील त्यांनी तातडीने नजीकच्या सेवा केंद्रातून आपले आधार कार्ड काढून घ्यावे. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारीत फळ पीक योजनेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

’महावितरण 3 व 4 वर्ग कर्मचार्‍यांसाठी ’मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना’

            महावितरणच्या वर्ग 3 आणि 4 च्या लाईन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ इत्यादी पदांना 1 एप्रिल 2017 पासून मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचार्‍यांच्या वयाची 45 वर्षे पूर्ण होणे बंधनकारक आहे. ही योजना राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित केली आहे.
           जे तारमार्ग कर्मचारी आपली दैनंदिन कर्तव्ये आजारपण, अपघात इत्यादी कारणांनी पार पाडू शकत नाहीत अशा वर्ग-3 आणि 4 च्या संवर्गासाठी मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्ग-3 मध्ये मोडत असलेल्या कर्मचार्‍यांची वयोमर्यादा 45 वर्षे पूर्ण आणि 53 वर्षांपर्यंत असणे आणि वर्ग-4 साठी 45 वर्षे पूर्ण आणि 55 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे.
           या योजनेत पात्र होण्यासाठी ’दैनंदिन कामे सुरळीत पार पाडू शकत नाही’ अशा आशयाचे सिव्हील सर्जनचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्मचारी मुदतपूर्व सेवानिवृत्ती त्यांच्या पाल्यासाठी ’विद्युत सहाय्यक’ पदावरील नोकरी हा विकल्प शाबूत ठेऊन घेत आहेत, त्यांनी त्यांच्या पाल्याची शैक्षणिक माहिती देणेही गरजेचे आहे. यासाठी पाल्य 10वी, 12वी उत्तीर्ण असणे अथवा 10वी, 12वी नंतर ईलेक्ट्रीकल/वायरमनचा आयटीआय हा कोर्स महाराष्ट्र राज्य व्यावसायीक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
           जे कर्मचारी आपल्या ’पाल्यांना नोकरीचा विकल्प न ठेवता या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांना या योजनेनुसार सेवा झालेल्या प्रत्येक वर्षासाठी 35 दिवसाचा पगार आणि विहित सेवानिवृत्ती पूर्वी राहिलेल्या प्रत्येक वर्षांसाठी 25 दिवसांचा पगार अशा सूत्रानुसार एकूण लाभ मिळणार आहे. हा लाभ एकूण जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंतच मिळणार आहे.
           कर्मचार्‍यांनी पाल्यांना ’विद्युत सहाय्यक‘ पदावरील नोकरीचा विकल्प शाबूत ठेवून या योजनेचा लाभ घेतल्यास, ज्यांचे पाल्य 10 वी व 12 उत्तीर्ण आहेत त्यांना 3 वर्षांत इलेक्ट्रिकल/वायरमनचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण अथवा समतुल्य शैक्षणिक अर्हता धारण करावयाची आहे. या कालावधीत त्यांनी कंपनीचे काम करावयाचे नसून फक्त त्यांनी त्यांची कार्यालयीन कामकाजाच्या दिवसाची हजेरी संबंधित विभाग/उपविभागीय कार्यालयात द्यायची आहे.
             अशा उमेदवारांना सुरुवातीला 3 वर्षाच्या कंत्राटाच्या कालावधीसाठी रु. 7,500 असे प्रतिमहा एकत्रित वेतन मिळणार आहे. शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर त्यांना ’विद्युत सहाय्यक’ या पदावर नेमण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना 3 वर्षाच्या कालावधीकरिता पहिल्यावर्षी प्रतिमहा रु. 7,500 तर दुसर्‍या वर्षासाठी रु. 8,500 आणि तिसर्‍या वर्षासाठी रु. 9,500 असे एकत्रित वेतन मिळणार आहे. त्यांना जागेच्या उपलब्धतेनुसार ’तंत्रज्ञ’ या पदावर नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. परंतु या पाल्यांनी त्यांची शैक्षणिक अर्हता व त्यांचा ’विद्युत सहाय्यक’ पदावरील कंत्राटी सेवा, महावितरणच्या नियम व अटीस आधीन राहून पूर्ण करावयाची आहे.
               जे पाल्य 3 वर्षांच्या कालावधीत इलेक्ट्रिकल/वायरमनचा आयटीआय कोर्स महाराष्ट्र राज्य व्यावसायीक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण करू शकले नाहीत तर त्यांना दिलेले एकत्रित वेतन या योजनेनुसार मिळणार्‍या एकूण रक्कमेतून वजा करून उर्वरित रक्कम संबंधित कर्मचार्‍यांस अदा करण्यात येणार आहे. या रक्कमेवर व्याज देण्यात येणार नाही. अथवा सदर कर्मचार्‍यास पुन्हा नोकरीवर सामावून घेण्यात येणार नाही.
             जे पाल्य 10वी, 12वी अधिक इलेक्ट्रिकल/वायरमनचा आयटीआय कोर्स महाराष्ट्र राज्य व्यावसायीक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण केलेली आहेत त्यांना ’विद्युत सहाय्यक’ या पदावरील कंत्राटाच्या कालावधीत पहिल्यावर्षी प्रतिमहा रु. 7,500 तर दुसर्‍या वर्षासाठी रु. 8,500 आणि तिसर्‍या वर्षासाठी रु. 9,500 एकत्रित वेतन मिळणार आहे. अशा उमेदवारांना जागेच्या उपलब्धतेनुसार ’तंत्रज्ञ’ या पदावर सामावून घेण्यात येणार आहे.
              कर्मचार्‍याच्या पाल्याच्या नोकरीसाठी या योजनेत वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे (मागास उमेदवारासाठी 5 वर्षे शिथील) अशी असून या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2017 पासून 30 सप्टेंबर 2017 पर्यंतच घेता येणार आहे.

२८ मार्च २०१७

100 किलोचे सोन्याचे नाणे चोरीला

           बर्लिनच्या बोड म्युझियममधून एक महाकाय सोन्याचे नाणे चोरीला गेले आहे. जवळपास 6 कोटी रूपये इतकी त्या नाण्याची किंमत सांगितली जात आहे.
        कॅनडामधून हे नाणे येथे आणण्यात आले होते. जवळपास 100 किलोग्राम इतके त्याचे वजन होते. इतके वजनदार आणि मोठे नाणे चोरांनी कसे चोरले असेल याबाबत तपास सुरू आहे. हे नाणे बनवण्यासाठी उच्चप्रतीच्या सोन्याचा वापर केला होता त्यामुळे नाण्याची किंमत आणखी जास्त असण्याची शक्यता आहे.
        या नाण्यावर क्वीन एलिजाबेथचे चित्र आहे, तर एखाद्या कारच्या टायर इतके हे नाणे मोठे आहे. जगामध्ये अशाप्रकारची केवळ 5 नाणी आहेत. 2010 सालापासून हे नाणे बोड म्युझियममध्ये ठेवले होते. 2007 मध्ये रॉयल कॅनेडियन मिंटने हे नाणे जारी केले होते. त्यावेळचे सर्वात मोठे सोन्याचे नाणे असल्याचा पुरस्कारही मिळाला होता.

17 महिन्यांच्या उच्चांकी पातळी

           अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 17 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. बँका आणि निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्याने रुपयाला बळ मिळाले आहे. रुपया आजच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत 28 पैशांनी वाढून 65.13 रुपये प्रतिडॉलरवर पोचला आहे. भारतीय शेअर बाजारात देखील तेजीचे वातावरण असल्याने रुपयाला आधार मिळाला आहे.
        चालू वर्षात रुपया डॉलरच्या तुलनेत 4.05 टक्क्यांनी वाढला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकात 208 अंशांची घसरण झाली असून 29,213.39 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 70 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी सध्या 9,038.2 पातळीवर आहे.

सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आता सक्तीचे नाही

           मोदी सरकारने सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले असतानाच सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या या निर्णयावर ताशेरे ओढले. सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी केंद्र सरकार आधार कार्ड सक्तीचे करू शकत नसल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
         मात्र बँक अकाऊंट उघडणे किंवा प्राप्तिकर भरण्यासाठी सरकार आधार कार्ड मागू शकते. तसेच आधार कार्डला आव्हान देण्यासाठी 7 न्यायाधीशांचे खंडपीठ बनवले गेले पाहिजे. मात्र सध्या तरी ते शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत म्हटले आहे. आधार कार्डच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
         जे. एस. खेहर म्हणाले, बँक खाती उघडण्यासारख्या आणि आर्थिक फायदा मिळवणार्‍या योजनांमध्ये आधार कार्डची सक्ती सरकार करू शकते. मात्र, गरिबांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधारची सक्ती सरकारला करता येणार नाही. सरकारी पेन्शन आणि इतर कोणत्याही प्रकारचा लाभ मिळवण्यासाठी सरकार आधारची सक्ती करू शकत नाही. त्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

२७ मार्च २०१७

आयआरडीएआय नियामक कायदा 2016

           मोटार, दुचाकी आणि आरोग्य विम्याचा हप्ता 1 एप्रिलपासून वाढणार आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) एजंटांचे कमिशन वाढविण्याचा निर्णय घेतल्याने हप्ता महागणार आहे.
              एजंटांचे कमिशन वाढल्यामुळे विमा हप्त्यात होणारा बदल अधिक अथवा उणे 5 टक्क्यांच्या आतमध्ये असेल. वाहनांच्या ‘थर्ड पार्टी’ विमा हप्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. आता एजंटांचे कमिशन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यामध्ये आणखी वाढ होणार आहे. ’आयआरडीएआय नियामक कायदा 2016’ हा 1 एप्रिलपासून लागू होत आहे.
               या कायद्यात एजंटांना देण्यात येणार्‍या कमिशनचा आढावा आणि त्यांना बक्षीस देण्याची तरतूद आहे. यामुळे विमा कंपन्यांना हप्त्यामध्ये वाढ करावी लागणार आहे. आधी विक्री केलेल्या विमा पॉलिसींसाठी हप्त्यामध्ये बदल होणार नाही, असे ‘आयआरडीएआय’ने म्हटले आहे.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स

           विश्‍वदीप रॉयचौधरी म्हणाले, ’देशातील विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी 10 वर्षांपूर्वी ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत पंधरा हजार विक्रमांची नोंद यात केली आहे. त्यात सांगलीतील चौघांनी नव्याने नोंद होईल. या विक्रमांची जागतिक पातळीवर नोंद घेतली जाते.’’
         क्रीडा भारती आणि श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट (तासगाव) यांच्या संयुक्त वतीने कार्यक्रम घेण्यात आला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्चे निरीक्षक विश्‍वदीप रॉयचौधरी यांनी खेळाडूंचे परीक्षण करीत त्यांची रेकॉर्डला नोंद केली. पद्माळे (ता. मिरज) येथील जलतरणपटू नीलेश जगदाळे याने रोटरी क्लबच्या रामभाऊ भिडे जलतरण तलावात सकाळी 11 वाजता रेकॉर्डला सुरवात केली. तब्बल 2 तास पाण्यावर तरंगत योगासने केली. त्यात 70 प्रकारांच्या आसनांचा समावेश होता. पुरुष गटात असा विक्रम नोंदवणारा भारतातील पहिलाच म्हणून त्याची नोंद झाली.
         पाण्यात 2 तास राहून 70 प्रकारच्या योगासनांचे प्रकार दाखवले. पाठीमागे टाळी वाजवून डिप्स मारणारा बहाद्दरही तेथे होता. पाठीवर वजन घेऊन डिप्स मारणारे 2 जिद्दींनीही कमाल दाखवली. एकाच दिवशी एकाच शहराच चार नवे रेकॉर्ड नोंदवत सांगलीचा बहुमान देशपातळीवर उंचवला गेला.
         त्यानंतर दुपारी 3 वाजता मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात उर्वरित तिघांची चाचणी घेण्यात आली. त्यात सांगलीतील आकाश जुगळे या खेळाडूने पाठीमागे टाळी वाजवून जर्क मारून डिप्स मारण्याचा नवा विक्रम नोंदवला. 1 मिनिटात 30 वेळा करण्याचे उद्दिष्ट होते. आकाशने 36 वेळा तो प्रकार करत आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली.
         हरी महाबळ आणि वैभव माईणकर या खेळाडूंनी पाठीवर वजन घेऊन डिप्स मारण्याच्या प्रकार देशपतळीवर नोंद केली. हरी महाबळ याने 45 किलो वजन पाठीवर घेऊन 1 मिनिटात 39 डिप्स, तर वैभवने 27 किलो वजन पाठीवर घेऊन 46 डिस्प मारले. सांगलीच्या चौघांनी एकाच वेळी आपली नोंद केली.
          तासगावचे रामचंद्र काळे यांनी रिव्हर्स गिअर नसलेली दुचाकी रिव्हर्समध्ये चालवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. रेकॉर्ड बनवण्यासाठी त्यांनी योग्य त्या सूचना श्री. रॉयचौधरी यांनी दिल्या. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, क्रीडा भारतीचे दीपक लेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी श्री. कोटणीस, नाना सिंहासने, रामकृष्ण चितळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

२६ मार्च २०१७

जर्मनीमध्ये ’उगवला’ कृत्रिम सूर्य

           जर्मनीमधील शास्त्रज्ञांनी अतिउच्च क्षमतेचे अनेक स्पॉटलाइट एकत्र तयार केलेला कृत्रिम सूर्य ’सुरु’ केला आहे. ’सिनलाइट’ असे या प्रयोगाचे नाव असून जर्मनीतील युलीश येथे त्याची अंमलबजावणी होत आहे. प्रदूषणमुक्त ऊर्जानिर्मिती करणे, हा प्रयोगाचा मुख्य उद्देश आहे.
           या प्रयोगासाठी जगातील सर्वाधिक क्षमता असलेले 149 फिल्म प्रोजेक्टर (झेनॉन शॉर्ट-आर्क लॅम्प) एकत्र केले आहेत. मधमाशांच्या पोळ्याच्या रचनेप्रमाणे या सर्वांची जोडणी केली असून या प्रत्येक प्रोजेक्टरची क्षमता सरासरी बल्बपेक्षा 4 हजार पटीने अधिक आहे.
            जर्मन एअरोस्पेस सेंटर (डीएलआर) यांनी या प्रयोगाची जुळणी केली असून पृथ्वीवर पोचणार्‍या सूर्यप्रकाशाच्या 10 हजार पट अधिक ऊर्जा असलेला प्रकाश निर्माण करण्याचे या प्रयोगाचे ध्येय आहे. सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न होत असला तरी सध्याचे सौरघट फारसे परिणामकारक ठरत नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकाधिक ऊर्जेचा वापर करता यावा, यासाठी हा प्रयोग करणार असल्याचे सांगण्यात आले.
           प्रयोगादरम्यान सर्व प्रोजेक्टरची दिशा 20 सेमी बाय 20 सेमी आकाराच्या चौरस क्षेत्रावर केंद्रित केली जाणार आहे. यामुळे जगातील सर्वांत मोठा असलेला हा कृत्रिम सूर्य सुरू करताच त्यामुळे तब्बल 3500 अंश सेल्सिअस तापमान निर्माण होण्याचा अंदाज आहे. हा प्रयोग अत्यंत धोकादायक असल्याने तो बंद खोलीत केला जाणार आहे. या प्रयोगातून वीजनिर्मितीही केली जाणार आहे. या प्रयोगाचा निष्कर्ष लवकरच जाहीर केला जाणार आहे.

स्पॅनिश बॅडमिंटन स्पर्धा

           अपंगांच्या स्पॅनिश आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सुकांत कदम याने पुरुषांच्या ‘एसएल 4’ या प्रकारात एकेरीसह दुहेरीत ब्राँझपदक पटकावले.
            या दोन्ही प्रकारांत सुकांतने उपांत्य फेरी गाठून ब्राँझपदक निश्‍चित केले. एकेरीची उपांत्य फेरी गाठताना सुकांतने इंग्लंडच्या बॉबी ग्रिफिन याचा 21-9, 21-11 असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याला फ्रान्सच्या ल्युकास माझूर याने पराभूत केले. ल्युकासने ही लढत 21-10, 21-10 अशी सहज जिंकली. युरोपियन चँपियन असलेल्या ल्युकासने नंतर मलेशियाच्या बाक्री ओमर याचा 21-17, 21-6 असा पराभव करून विजेतेपददेखील पटकावले.
           सुकांतने दुहेरीत विक्रम कुमारच्या साथीत उपांत्य फेरी गाठली. त्यांनी मार्सेल डम (जर्मनी)-सिमन क्रूझ माँजेअर (स्पेन) या जोडीचा 21-13, 21-16 असा पराभव केला. उपांत्य फेरीत सुकांत-उमेश यांनी इंग्लंडच्या डॅनिएल बेथेल-बॉबी ग्रिफिन या जोडीने 17-21, 21-13, 21-13 असे हरविले.

भारताचा 33 वा कसोटी कर्णधार

           खांद्याच्या दुखापतीमुळे विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात खेळत नसल्याने अजिंक्य रहाणेला नेतृत्वाची संधी मिळाली. मुंबईकर अजिंक्य भारताचा 33 वा कसोटी कर्णधार आहे.
           फक्त बंगळुरुच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात त्याने केलेली 52 धावांची अर्धशतकी खेळी निर्णायक ठरली होती. फॉर्मसाठी चाचपडणार्‍या अजिंक्य समोर कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी असेल. संघातील विराट कोहलीची जागा भरुन काढणे सोपे नाही. अजिंक्यला त्या ताकदीचा खेळ करावा लागेल तसेच संघनायक म्हणून अचूक निर्णय घ्यावे लागतील. रांची कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती. सामन्याच्या पूर्वसंध्येलाच कोहलीने आपण चौथा कसोटी सामना खेळणार नसल्याचे संकेत दिले होते. कोहलीने नेटवर सराव केला पण फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हेच माझ्या खेळण्याचा निर्णय घेतील.
         कर्णधारपदाची धुरा संभाळून अजिंक्यने पॉली उमरीगर, नरी कॉन्ट्रॅक्टर, जीएस रामचंद, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. मुंबईच्या या दिग्गजांनी भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटले जाते. मुंबईने देशाला अनेक उत्तम क्रिकेटपटू दिले आहेत.
           संघात दोन बदल केले आहेत. कोहलीच्या जागी डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कसोटी पदार्पण करत आहे. इशांत शर्माच्या जागी भुवनेश्‍वर कुमारची निवड केली आहे.

२५ मार्च २०१७

गोवा होणार पहिले भिकारीमुक्त राज्य

        गोवा हे देशातील पहिले भिकारीमुक्त राज्य करण्याचा संकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला. पर्रीकर यांनी विधानसभेत कचरामुक्त राज्याची हमी देणारा 2017-18 चा 202.48 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सादर केला. एकूण 16 हजार 27 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 9.07 टक्क्यांनी जास्त आहे. राज्यात पेट्रोलवरील मूल्यवर्धीत कर 15 टक्क्यांनी वाढविला आहे. जीएसटी लागू होताच वाहनांसाठी असलेला प्रवेश कर रद्द करण्याची ग्वाही सुद्धा पर्रीकर यांनी दिली.

        2016 चा अर्थसंकल्पाचा आकार 14,694 कोटी होता. एकूण 10,872 कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न आणि 10,670 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. केंद्रीय निधीत तीनपट वाढ झाली आहे. केंद्रीय करातील गोव्याचा वाटा 3,224.61 कोटी आहे. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत हे प्रमाण 22.4 टक्के आहे.

        कर्नाटक व महाराष्ट्रात पेट्रोलचा दर अनुक्रमे 72 व 76 रुपये प्रतिलिटर आहे. गोव्यात आता पेट्रोल साधारणतः 61 रुपये प्रतिलिटर आहे. पेट्रोलवरील व्हॅट 15 टक्क्यांनी वाढविल्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 65 रुपये होणार आहे. 1 एप्रिलपासून ही वाढ लागू होईल. त्यामुळे सरकारला 50 ते 60 कोटींचा महसूल मिळेल.

वैभव रास्कर

        सांगलीचा पैलवान वैभव रास्कर याने सातार्‍याच्या विकास पाटीलवर तांत्रिक गुणाच्या आधारे मात करुन प्रतिष्ठेच्या कामगार कुस्ती स्पर्धा विजेतेपदावर कब्जा केला. त्याचवेळी, कुमार केसरीसाठी झालेल्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या विक्रम मोरेने बाजी मारली.

        महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने ना. म. जोशी मार्गावरील कामगार मैदानात रंगतदार कुस्ती पार पडल्या. मुंबई शहर तालिम संघाच्या सहकार्याने खेळवण्यात आलेल्या कामगार केसरीच्या अंतिम सामन्यात कुंडल येथील पैलवान वैभवने आक्रमक सुरुवात केली. प्रत्युत्तरात सातार्‍याचा विकासने शानदार बचाव करत प्रतिडाव रचत वैभवला झुंजवण्याचा चांगला प्रयत्न केला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात निर्णायक गुणांची कमाई करताना तांत्रिक गुणाच्या आधारे वैभवने बाजी मारत मानाची गदा उंचावली.

        कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या कुमार केसरी स्पर्धेतही तांत्रिक गुणांच्या आधारे कोल्हापूर, कुंभी कासरीच्या विक्रम मोरेने विजय मिळवला. सरदार बरगेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कामगार केसरी आणि कुमार केसरी विजेत्या रोख रक्कम, गदा, मानाचा पट्टा व आकर्षक चषक देऊन गौरविले.

        स्पर्धेतील अन्य लढतीत 57 किलो वजनी गटात नामदेव घाडगे, 61 किलो वजनी गटात दिलीप शेंबडे, 65 किलो गटात अमोल पवार, 70 किलो गटात दिग्विजय जाधव आणि 74 किलो वजनी गटात भगतसिंग खोत यांनी अव्वल क्रमांक पटकावला.

२४ मार्च २०१७

ओबीसींसाठी नवा राष्ट्रीय आयोग

        देशभरातील विविध जातींकडून आपला ओबीसींमध्ये समावेश व्हावा, आपणास आरक्षण मिळावे, अशी मागणी होत असल्याने केंद्र सरकारने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली आहे. ते करताना आधीचा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग रद्द करण्याबरोबरच नव्या आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णयही घेतला. ओबीसींमध्ये नव्या जातींचा समावेश करण्याचे अधिकारही या आयोगाला मिळणार आहेत.

        या आयोगाला घटनात्मक दर्जा मिळणार असल्याने त्याच्या शिफारशी व सल्ला केंद्र सरकारवर बंधनकारक असेल. सध्या अनुसूचित जाती तसेच जमाती यांच्या आयोगांनाच घटनात्मक दर्जा आहे. नव्या आयोगाला ओबीसींमधील विविध जातींकडून येणार्‍या भेदभावांच्या तक्रारींची दखल घेणे, आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास त्यात लक्ष घालणे, मागासवर्गीयांच्या अधिकारांचे रक्षण करणे यासाठीचेही अधिकार असतील. 

एस. रामास्वामी होणार नवे आयुक्त

        नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली केली असून त्यांच्या जागी आता एस. रामास्वामी हे आयुक्त होणार आहेत. मुंढे यांच्याविरोधात नवी मुंबई महापालिकेने अविश्‍वास ठराव पारित केला होता. तेव्हापासून मुंढे हे चर्चेत होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बदली टाळली होती. त्यांची बदली आता कुठे झाली आहे हे अद्याप समजले नाही. एस. रामास्वामी हे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते. आपत्ती निवारण, महसूल आणि वन विभाग, मंत्रालयाचे संचालक एस. के. दिवसे यांची बदली भंडार्‍याला जिल्हाधिकारी म्हणून केली आहे. तर भंडार्‍याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची बदली कोल्हापूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी केली आहे. 

२३ मार्च २०१७

3 वर्षांपूर्वी बुडालेले महाकाय जहाज

        शालेय सहलीसाठी गेलेले 300 हून अधिक विद्यार्थी या अपघातात बुडून मृत्युमुखी पडले होते. सेवोल नावाचे हे जहाज 16 एप्रिल 2014 रोजी बुडाले होते.
        सुमारे 6800 टन वजनाचे जहाज खवळलेल्या समुद्राच्या प्रचंड लाटांनी उलटून बुडाल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी वर काढण्यात यश आले आहे.
        प्रवासी वाहूतक करणारे हे जहाज दक्षिण कोरियाच्या नैऋत्य किनारपट्टीवर बुडाले होते. या देशाच्या समुद्री हद्दीतील ही सर्वांत मोठ्या आपत्ती असल्याने हे जहाज वर काढणे हा एक येथील देशवासीयांसाठी भावुक करणारा क्षण होता.
           प्रदीर्घ काळापासून दुर्लक्षित राहिलेला सार्वजनिक सुरक्षितता आणि नियमनाचा प्रश्‍न ऐरणीवर आला. सरकारच्या ढिसाळ कारभाराविरोधात येथील लोकांमध्ये असंतोष वाढला आणि त्याची परिणती म्हणजे अलीकडेच दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क गेऊनहै यांची गच्छंती झाली.
           या जहाजाचा कप्तान त्या अपघातातून बचावला होता. त्याने इतरांना बाहेर पडण्याच्या सूचना न देता स्वतः जहाजातून पळून गेला. त्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सदोष मनुष्यवध केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ब्रिटिश संसदेसमोर दहशतवादी हल्ला

        मोटारीखाली नागरीकांना चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न दहशतवाद्याने लंडनमध्ये ब्रिटीश पार्लमेंटसमोरील प्रसिद्ध वेस्टमिन्स्टर ब्रिजवर केल्याचे उघडकीस येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने चाकूने पोलिसावरही वार केले आहेत. पोलिसांनी तातडीने हल्लेखोराला गोळ्या घालून संपविले.
       हल्ल्यामध्ये किमान 12 लोक जखमी झाले असून त्यापैकी एका जखमी महिलेचा मृत्यू झाला आहे. करड्या रंगाच्या ह्युंडाई आय 40 कारने अचानक पादचार्‍यांच्या दिशेने मोर्चा वळवला आणि लोकांना गाडीखाली चिरडण्यास सुरूवात केली. हल्ल्याची घटना घडली, तेव्हा ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे संसदेतच होत्या. त्या सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे कामकाज स्थगित केले. अनेक संसद सदस्य सभागृहांमध्येच अडकून पडले आहेत.
       बेल्जियमधील ब्रुसेल्समध्ये 2016 मध्ये 22 मार्च रोजी आत्मघाती दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडविले होते. त्या हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच ब्रिटीश संसदेसमोर हल्ल्याची घटना घडली आहे.

फिरते प्रसूतिगृह

       आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा 3 वर्षांपूर्वी सुरू केली. रस्ते अपघातातील जखमी, विविध हल्ल्यांत जखमी होणे, हृदयविकार असणारे, आगीत जखमी होणे, विषबाधा अशा इत्यादी रुग्णांना जवळच्याच रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी पोहोचता यावे, हा उद्देश त्यामागे ठेवण्यात आला.
        ही सेवा सुरू केल्यानंतर, आतापर्यंत 14 लाख जणांना या रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यात आली. विशेषत: गरोदर महिलांसाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका वेळावेळी मदतीला धावून आल्याचे दिसते. गेल्या 3 वर्षांत 13 हजार महिलांची प्रसूती या रुग्णवाहिकेतच झाली आहे. त्यामुळे गरोदर महिलांसाठी ही रुग्णवाहिका ‘प्रसूतिगृह’च बनली आहे.
सध्या 108 क्रमांकाच्या राज्यात 937 रुग्णवाहिका कार्यरत असून, यात 704 रुग्णवाहिका प्राथमिक वैद्यकीय सुविधा, तर 233 रुग्णवाहिका या अत्याधुनिक व सुसज्ज अशा आहेत. ग्रामीण भागात 1 लाख लोकसंख्येमागे 1 रुग्णवाहिका, तर शहरी भागात 2 लाख लोकसंख्येमागे 1 रुग्णवाहिका असे प्रमाण या रुग्णवाहिकेचे ठरवण्यात आले.
       108 या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यावर, अवघ्या 20 मिनिटांत ही रुग्णवाहिका मदतीसाठी उपलब्ध होते. या रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचार करण्यासाठी आणि जवळच्याच रुग्णालयापर्यंत रुग्णांना नेण्यासाठी एक डॉक्टरही उपलब्ध करण्यात आला आहे. जानेवारी 2014 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत या रुग्णवाहिकेने 14 लाख 10 हजार 709 जणांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, गरोदर महिलांना या रुग्णवाहिकेची चांगलीच मदत मिळाली आहे. त्याचप्रमाणे, प्रसूती वेदना होणार्‍या 4,36,512 महिलांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मोठी मदत राज्यातील लोकांना होत आहे. खासकरून अपघातग्रस्त आणि गरोदर महिलांना याची मदत मिळत आहे.
* राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा-प्रकल्प संचालक - डी. जी. जाधव

२२ मार्च २०१७

अमूल थापर

        भारतीय वंशाचे अमेरिकी कायदेतज्ज्ञ अमूल थापर (वय 47) यांची अमेरिकेतील अपिली न्यायालयात प्रमुख पदावर नियुक्ती केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नियुक्ती केली. सिनेटच्या मंजुरीनंतर थापर हे अपिलीय न्यायालयाचा एक महत्त्वाचा भाग बनतील.         केंटकी, टेनिसी, ओहियो आणि मिशीगन येथील अपिलांवर येथे सुनावणी होते. या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होणारे थापर हे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत.

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर यांचे निधन

        ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकर (वय 92) यांचे अमेरिकेत वृद्धापकाळाने निधन झाले. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तळवलकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी. डी. गोएंका. दुर्गारतन अशा विविध पुरस्कारांनी गौरविले होते.
         मराठीसह इंग्रजी भाषेतील स्तंभलेख आणि अग्रलेखांसाठी गोविंद तळवलकर यांचे नाव प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी केलेले सडेतोड लिखाण आजही वाचकांच्या स्मरणात आहे. तळवळकर यांनी ’नवभारत’मधून पत्रकारिता क्षेत्रातील कारकीर्दीची सुरूवात केली. लोकसत्ता वृत्तपत्रात त्यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले, तर महाराष्ट्र टाईम्सचे ते 28 वर्षे संपादक होते. याशिवाय अनेक इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी स्तंभलेखन केले होते.

नॉर्वे जगातील सर्वांत आनंदी देश; भारत 122 वा

        दहशतवादाने त्रस्त पाकिस्तानने भारतावर मात करीत 80 वे स्थान मिळविले आहे, तर गरीब समजला जाणारा नेपाळही भारतापेक्षा आनंदी ठरला आहे. त्याचा क्रमांक 99 वा असून भूतान 97, बांगला देश 110 व श्रीलंका 120 व्या क्रमांकावर आहे.
       भारत पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा दुःखी देश आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) ’वर्ल्ड हॅपिनेस्ट रिपोर्ट 2017’मध्ये जागतिक आनंदी अहवाल काढलेला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक अहवालात 122 वा आहे. जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून नॉर्वेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वेळी प्रथम असलेला डेन्मार्क आता दुसर्‍या स्थानावर आहे.
       ’यूएन’च्या अहवालात एकूण 155 देशांचा समावेश केला आहे. 13 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा केला. त्यावेळी या अहवालाचे प्रकाशन केले. यात भारताचा क्रमांक 122 वा असून गेल्या वर्षी तो 118 व्या स्थानी होता. यंदा त्यात चार क्रमांकाने घसरण झाली आहे. यंदा चीन, पाकिस्तान, नेपाळ, इराक हे देश भारताच्या पुढे गेले आहेत. हे क्रमांक ठरविताना संबंधित देशांमधील नागरिकांचे उत्पन्न, आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार व निस्वार्थीपणा या घटकांची पाहणी केली होती. असमतोल, विश्‍वासाचे नाते म्हणजेच सरकारी व उद्योग पातळीवर भ्रष्टाचार मुक्त कारभार, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत दरडोई उत्पन्न हेही लक्षात घेण्यात आले. तसेच आनंदाचे मूल्यमापन 1 ते 10 क्रमांकात केले आहे.
       सर्वांत आनंदी देशांचा अहवाल तयार करण्यास ’यूएन’ने 2012 पासून सुरुवात केली. जे देश विकासात मागे पडले आहेत त्यांना मार्ग दाखविणे हा याचा उद्देश आहे. अहवालात नॉर्वे, डेन्मार्क, आइसलंड, स्विर्त्झंलंड व फिनलंड या देशांनी पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हा देश शेवटच्या क्रमांकावर आहे. पश्‍चिम युरोप व उत्तर अमेरिकेनेही यात वरचे स्थान मिळविले आहे. यानुसार अमेरिका 14 व्या तर ब्रिटन 19 व्या स्थानावर आहे.

‘एचसीएल’ची 3500 कोटींची शेअर बायबॅक योजना जाहीर

        माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या संचालक मंडळाने 3,500 कोटी रुपयांच्या कोटींच्या शेअर बायबॅक योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. याअंतर्गत कंपनी सुमारे 3,500 कोटी रुपयांच्या साडेतीन कोटी शेअर्सचे बायबॅक करण्याचा प्रस्ताव आहे. यावर आता कंपनीचे भागधारक आणि इतर नियामक मंडळांची परवानगी घेतली जाणार आहे.
       कंपनीच्या संचालक मंडळाने 2 रुपये दर्शनी मूल्य असणार्‍या साडेतीन कोटी शेअर्सची पुन्हा खरेदी करण्यास मंजुरी दिली. प्रतिशेअर 1 हजार रुपयांप्रमाणे सुमारे 3,500 कोटी रुपयांना हा व्यवहार पार पडेल, अशी माहिती एचसीएलने मुंबई शेअर बाजारात सादर निवेदनात दिली. शेअर बायबॅकचे नेमके वेळापत्रक वेळोवेळी जाहीर केले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. एचसीएलमध्ये प्रवर्तकांची 59.69 टक्के हिस्सेदारी आहे.
         आयटी कंपन्यांकडे सध्या रोखीचा साठा वाढत चालला असून भागधारकांना तसेच गुंतवणूकदारांना यात वाटा मिळावा या मागणीला प्रतिसाद अनेक कंपन्यांनी शेअर बायबॅक योजना हाती घेतली आहे. गेल्या महिन्यात टीसीएस आणि कॉग्निजंट या दोन बड्या कंपन्यांनी शेअर बायबॅक योजनेस मंजुरी दिली होती.
          मुंबई शेअर बाजारात एचसीएलचा शेअर सध्या 864.00 रुपयांवर व्यवहार करत असून 0.08 टक्क्याने वाढला आहे.

1 एप्रिलपासून 5 बँकांचे होणार SBI मध्ये विलीनीकरण

        1 एप्रिलपासून देशातील 5 बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण होणार आहे. 1 एप्रिलपासून या 5 बँका स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक भाग असणार आहेत. या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ पतियाळा या बँकांचा समावेश आहे.
       1 एप्रिलपासून या सर्व बँकांच्या शाखा एसबीआयच्या ब्रँचच्या स्वरुपात काम करणार आहेत. तसेच भारतीय महिला बँकेचेसुद्धा एसबीआयमध्ये विलीनीकरण होणार आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय महिला बँकेचेही स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. भारतीय महिला बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण केल्यामुळे महिलांना चांगल्या प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत. असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
         या बँकांच्या विलीनीकरणामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी शक्तिशाली होणार असून, सर्वात मोठी बँक म्हणून समोर येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाला या बँकांच्या विलीनीकरणामुळे 5000 कोटींचा फायदा होणार आहे. या विलीनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ 21 लाख कोटींहून अधिकच्या ठेवी असणार आहेत. तसेच कर्जपुरवठाही 17.5 लाखांच्या घरात जाणार आहे.
         2016 मध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच महिलांनी बँकिंग सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) प्रत्येक जिल्ह्यात बँकेची महिला शाखा सुरू केल्या होत्या. एसबीआयने या बँकांमध्ये महिलांना कामकाज करणे सोयीचे होईल, अशा पद्धतीने या सर्व व्यवस्था ठेवली आहे. महिलांसाठी कामकाजासाठीच्यादृष्टीने सुरक्षित आणि योग्य वातावरण निर्माण करण्याबाबत आम्ही दक्ष आहोत, असेही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य म्हणाला होत्या. आता भारतीय महिला बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण केल्यामुळे महिलांना त्याचा अधिक चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे.

मार्च २०१७

जीएसटीच्या चार विधेयकांना केंद्राची मंजुरी

        वस्तू व सेवा कर (जीएसटी) व्यवस्था लागू करण्यासाठी चार पूरक विधेयकांच्या मसुद्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही विधेयके आता संसदेत सादर केली जातील.

        केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत 1 जुलैपासून देशभर जीएसटी लागू करण्याचे ठरविले असून, त्यासाठी जोरदार तयारीही सुरू केली आहे. या चार विधेयकांना मंत्रिमंडळाची मंजुरी हा त्याचाच भाग आहे. राज्य सरकारांना भरपाई देण्यासाठीचे भरपाई विधेयक.

        केंद्रात जीएसटी लागू करण्यासाठीचे केंद्रीय जीएसटी (सी-जीएसटी) विधेयक, आंतरराज्यीय व्यापारांसाठीचे एकिकृत जीएसटी (आय-जीएसटी) विधेयक आणि केंद्रशासित प्रदेशांसाठीचे युटी-जीएसटी विधेयक ही ती विधेयके होत. यांना धन-विधेयकाच्या (मनी बिल) स्वरूपात सादर केले जाणार आहे.

        केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ जीएसटी विधेयकेच मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. सरकारच्यावतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लवकरात लवकर जीएसटी लागू करण्यास सरकार वचनबद्ध आहे.

नव्या संशोधनाने आइनस्टाइनच्या गुरुत्व सिद्धांताला आव्हान

        दीर्घिकांचा समावेश असलेली महाकाय चकती प्रचंड वेगाने आपल्या पृथ्वीपासून अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने दूर जाताना दिसली असून ती लघु महाविस्फोटाप्रमाणे प्रसरण पावत असल्याची शक्यता आहे त्यामुळे आइनस्टाइनच्या गुरुत्व सिद्धांताला आव्हान मिळाले आहे. या संशोधनात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. ही चकती 10 दशलक्ष प्रकाशवर्षे इतकी रूंद आहे व प्रसरण पावत आहे, त्याचे साधर्म्य लघु महाविस्फोटाशी दाखवता येईल.

        संशोधकांच्या मते आपल्या शेजारची देवयानी दीर्घिका आपल्या आकाशगंगेजवळून गेली होती त्यावेळी काही लघु दीर्घिका तयार झाल्या होत्या. जर आइनस्टाइनचा गुरुत्व सिद्धांत खरा असेल तर आपली आकाशगंगा कधीही देवयानीच्या जवळ यायला नको असे ब्रिटनच्या सेंट अँड्र्यूज विद्यापीठाचे डॉ. होंगशेंग झाओ यांनी सांगितले. जर नवीन संशोधन खरे असेल तर आपले गुरुत्वाचे व विश्‍वाचे ज्ञान बदलणार आहे. दीर्घिकांचा चकतीसारखा संच ही वेगळी बाब नाही. या दीर्घिका पावसाच्या थेंबाची दोर्‍यात गुंफण करावी तशा फिरत्या छत्रीसारख्या अवकाशीय वस्तूतून फेकल्या गेल्या असे याच विद्यापीठाचे पीएचडी विद्यार्थी इंद्रनील बानिक यांनी म्हटले आहे. ते या संशोधनाचे नेतृत्व करीत आहेत.

        दीर्घिका आपण सध्या पाहतो आहोत त्या चकतीसारख्या आकारात बांधल्या जाण्याची शक्यता 640 मध्ये 1 इतकी कमी असते, विश्‍व आतापेक्षा निम्म्या वयाचे होते तेव्हाच्या गतीकीय घटनांच्या मुळाचा अभ्यास आपण केला आहे, असा बानिक यांचा दावा आहे. आपल्या जवळच्या देवयानी दीर्घिका आकाशगंगेवर धडकताना राहिली त्यामुळे त्सुनामीसारख्या वैश्‍विक लाटा निर्माण झाल्या.

        दोन जास्त वस्तुमानाच्या दीर्घिका त्यावेळी एकमेकांभोवती एका प्रतलात फिरत होत्या त्यामुळे बटू दीघका त्यांच्या मार्गापासून ढळल्या. त्यामुळे वेगवान बटू दीघका या आकाशगंगा व देवयानी दीर्घिका यांच्या प्रतलात आहेत. आइनस्टाइनच्या सिद्धांतानुसार कृष्णद्रव्याचे अस्तित्व आहे. या बटू दीघका ज्या वेगाने फिरत आहेत त्यावरून त्या आकाशगंगा व देवयानीपेक्षा जास्त वस्तुमानाच्या असाव्यात पण त्यांच्यातील कृष्णद्रव्याच्या घर्षणाने त्या अपेक्षेप्रमाणे अडीच दशलक्ष प्रकाशवर्षे दूर जाण्याऐवजी एकत्र झाल्या.

२० मार्च २०१७

सिंधू पाणी करार : भारतीय शिष्टमंडळ पाकमध्ये दाखल

        सिंधू पाणी करारावरील वादांवर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सिंधू आयोगाच्या बैठकीसाठी 10 भारतीय अधिकार्‍यांचे शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये दाखल झाले. पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकार्‍यांनी वाघा सीमेवर भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. माध्यमांचे प्रतिनिधी वाघा सीमेवर आले होते, परंतु त्यांना शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. तिथून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये हे शिष्टमंडळ भूमार्गानेच राजधानी इस्लामाबादकडे रवाना झाले.
        इस्लामाबाद येथे ही दोनदिवसीय बैठक सुरू होत आहे. सिंधू आयोगाचे भारतातील आयुक्त पी. के. सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली दहाजणांचे शिष्टमंडळ या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. या बैठकीमध्ये पाणीवाटप करारानुसार भारताला मिळालेल्या हक्कांची जाणीव पाकिस्तानला करून देण्याचा भारत सरकारचा उद्देश आहे.

सौम्या स्वामिनाथन

        भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संचालक सौम्या स्वामिनाथन यांची संयुक्त राष्ट्रांच्या जीवाणूविरोधी लढ्यासाठीच्या उच्चस्तरीय गटात नेमणूक केली आहे. त्या जिवाणू प्रतिरोध तज्ज्ञ म्हणून या गटात सल्लागाराची भूमिका पार पाडणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यानी त्यांची नेमणूक केली आहे. स्वामिनाथन (वय 57) यांची जीवाणूरोधक समन्वय गटात नेमणूक झाली असून या गटात उपसरचिटणीस अमीन महंमद या सहअध्यक्ष असतील.
        स्वामिनाथन या भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव आहेत. त्या प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. क्षयावर त्यांनी संशोधन केले असून 1992 मध्ये त्या चेन्नईतील क्षयरोग संशोधन केंद्रात काम करू लागल्या. गेली 23 वर्षे त्या आरोग्य संशोधनात काम करीत आहेत.
         निओनॅटोलॉजी अँड पेडिअट्रिक पलमॉनॉलॉजी या विषयात त्यांना दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एंजल्स रुग्णालयाची शिष्यवृत्ती मिळाली. इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस अँड लंग डिसिजेस या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या एचआयव्ही विभागाच्या त्या अध्यक्ष आहेत.
         पुण्याच्या एएफएमसी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आर्युविज्ञान केंद्रातून बालवैद्यकीत एमडी केले.
         जिवाणू प्रतिबंध उपाययोजना गटात संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांचे प्रतिनिधी, आरोग्य तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ यांचा समावेश आहे. यात जीवाणू प्रतिरोधकता वाढवण्यासाठी जागतिक कृती योजना तयार केली जाणार आहे. गटाची बैठक येत्या काही आठवड्यात होणार असून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला त्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे.
जिवाणू, बुरशी, विषाणू व परोपजीवी सजीव यांना जेव्हा प्रतिजैविकांची सवय होते तेव्हा ते औषधांना दाद देत नाहीत. त्यामुळे कुठल्याही औषधांना दाद न देणारे महाजीवाणू म्हणजे सुपरबग्ज तयार होत आहेत. त्यामुळे औषधे निष्प्रभ ठरून संसर्ग वाढत आहे.
* जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालक - मार्गारेट चॅन

देशातील सर्वांत मोठा बोगदा सुरू होणार

        भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू-काश्मीरमध्ये सुरू होणार असून, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. काश्मीरवासीयांसाठी हा आशेचा बोगदा असल्याचे संबोधले गेले असून, या बोगदा खुला झाल्यानंतर जम्मू ते काश्मीर या मार्गातील 38 किमीचा खडतर मार्ग खुला राहणार आहे. विशेष म्हणजे या बोगद्याचे भूमिपूजन 2011 साली राहुल गांधी यांच्या हस्ते झाले होते.
जम्मू-काश्मीर समस्या मिटणार -
*    बर्फवृष्टी व हिमस्खलनामुळे वारंवार ठप्प होणार्‍या राष्ट्रीय महामार्ग 1-अ ची या बोगद्यामुळे वाहतुकीची समस्या मिटणार आहे.
*    38 किमीचा फेरा वाचणार आहे.
*    बोगद्यामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क व मनोरंजनासाठी एफएम सिग्नलही मिळावी, अशी व्यवस्था केली आहे.
*    बोगद्यामुळे जम्मूहून काश्मीर अडीच तासांत गाठता येणार.
*    9 मार्च आणि 15 मार्चला पहिले ट्रायल घेण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक 75 मीटरवर एक असे 124 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी एक सेंट्रलाइज्ड रूमदेखील तयार केली आहे.

मंगळावर कधी काळी पाणी होते

         नासाने मंगळ ग्रहावरील खोर्‍यातील अत्यंत गुंतागुंतीच्या मातीच्या थरांचे हाय डेफिनिशन छायाचित्र प्रसिद्धीस दिले आहे. या छायाचित्रावरून मंगळावर कधी काळी पाणी वाहिले होते याचा आणखी एक पुरावा उपलब्ध झाला.
         मंगळावरील मार्गारिटी सायनस क्वॅड्रँगलमध्ये उझबोई व्हॅलीस आहे व हे खोरे या ग्रहावर पाणी होते, असे समजले जाते त्या पाण्यातून ती अस्तित्वात आली. या खोर्‍यातून पाणी वाहणे दोन फार मोठ्या वस्तूंची एकमेकांशी धडक झाल्यामुळे बंद पडले व मंगळवार होल्डन विवर जन्मले. काळ जसा पुढे सरकत गेला तसे खोर्‍यातील पाण्याची पातळी एवढी वाढली की ती विवराच्या वरच्या भागावरून वाहून सरोवरात आली. पाण्याच्या या प्रवासाने जे थर जमा झाले होते त्यांची खूप झीज झाली. अर्थात त्यातील काही थर हे पाण्याच्या या प्रवाहालाही तोंड देऊ शकल्यामुळे त्यांची झीज झाली नाही व ते आज अखंडित दिसतात.
         नासाच्या अत्यंत शक्तिशाली व हाय डेफिनिशन उपकरणांनी या थरांचा उत्कृष्ट असा तपशील टिपला आहे. खोर्‍यामधील पुराची जी विविधता दिसते त्यावरून माती आजूबाजूच्या भागांतून वाहून गेली असे सूचित होते. या महिन्याच्या प्रारंभी युरोपियन स्पेस एजन्सीनेदेखील मंगळावर फार मोठ्या प्रमाणावर साधारण तीन अब्ज वर्षांपूर्वी पूर आल्याचे सूचित होते, असे म्हटले होते. हे सूचित करणारे अवशेष एजन्सीच्या मंगळावरील मार्स एक्स्प्रेस या हाय डेफिनिशन कॅमेर्‍याने टिपले.

चक बेरी

        गिटारवादनाने सर्वांना खिळवून ठेवणारे आणि आपल्या संस्मरणीय गाण्यांनी संगीताची नवी उंची दाखवून देणारे अमेरिकेतील महान गिटारवादक, गायक आणि गीतलेखक चक बेरी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेतील मिसुरी येथे निधन झाले.
       1950 मध्ये आपल्या कारकिर्दीस प्रारंभ करणार्‍या चार्लस् एडवर्ड्स अँडरसन बेरी यांनी नंतरच्या कालावधीत गिटारवादन आणि गाण्यांच्या माध्यमातून तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजविले. या कृष्णवर्णीय संगीतकाराने आपल्या गाण्यांच्या माध्यमातून श्‍वेतवर्णीय संगीत चाहत्यांनाही भुरळ पाडली. एल्व्हिस प्रेसली ‘रॉक अ‍ॅन रोल’चे सर्वोत्कृष्ट संगीतकार, गायक होते. मात्र त्यांच्यानंतर हा मान केवळ बेरी यांना मिळाला.
         ‘जॉनी बी. गुड’, ‘रोल ओव्हर बीथओव्हेन’, ‘स्वीट लिटल सिक्स्टीन’, ‘मेबेलेन’ आणि ‘मेमफीस’ या गाण्यांच्या माध्यमांतून विसाव्या शतकात बेरी यांनी संगीत चाहत्यांना नित्यानंद दिला. गिटारवादनामुळे काही मोजक्या संगीतकारांसह बेरी यांच्याकडून युवकांना प्रेरणा मिळाली.
         अमेरिकेतील प्रसिद्ध संगीतकार बॉब डायलान यांनी बेरी यांना ‘रॉक अ‍ॅन रोल’चे शेक्सपिअर म्हटले आहे. या दोघांनी सोबत मिळून संगीतनिर्मिती केली आहे. तरुण, प्रेम, आयुष्यातील चांगले क्षण यावर आधारित गाण्यांची त्यांनी निर्मिती केली होती.
पहिला अल्बम -
        5 महिन्यांपूर्वीच बेरी यांनी पहिला संगीत अल्बम प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते. यामध्ये काही जुन्या आणि बर्‍याचशा नव्या गाण्यांचा समावेश केला होता. या अल्बमला त्यांनी ‘चक’ असे नाव दिले होते. तो त्यांनी पत्नीला अर्पण केला होता.

१९ मार्च २०१७

शंभर पट गती वाढवणार्‍या ’वाय-फाय’चा शोध

        सध्या अस्तित्वात असलेल्या वाय-फाय पद्धतीपेक्षा शंभर पट अधिक क्षमता असलेल्या वाय-फायचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. या वाय-फाय अधिक डिव्हाईसेसला जोडण्याची क्षमता असून त्यातून मानवी आरोग्याला कोणताही धोका नसल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.
        एंडहोवॅन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने या वाय-फायचा लावला आहे. ही नवी पद्धत अत्यंत साधी, सोपी आणि स्वस्त आहे. या पद्धतीद्वारे डिव्हासेस कनेक्ट करण्यासाठी प्रकाशाचा वापर अँटेना म्हणून करण्यात येतो. त्यामुळे कोणतेही डिव्हाईस अगदी सहजपणे कनेक्ट करता येऊ शकतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. प्रतिसेकंद 40 गेगाबाईटस् एवढी या वाय-फायची क्षमता आहे.
       डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी सुरक्षित इन्फ्रारेड तरंग (वेव्हलेंथ) वापरण्यात आल्याने त्याचा मानवी डोळ्यांच्या पडद्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. युजरला कनेक्ट केलेल्या प्रकाशाच्या किरणापासून जर वाय-फायचा डिव्हाईस दूर नेला, तर वाय-फाय पोचत असलेल्या ठिकाणावरील प्रकाशाचे किरण डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी वापरले जातील. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय युजर कनेक्ट राहू शकेल, असा दावाही संशोधकांनी केला आहे. प्रकाशाचा किरणाचा वापर हा केवळ माहिती डाऊनलोड करण्यासाठी केला जाईल. तर अपलोडिंगसाठी पारंपारिक रेडिओ सिग्नलचाच वापर करण्यात येईल.

उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री

         राष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्षाने गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले होते. याचबरोबर प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा या दोघांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचेही यावेळी जाहीर केले होते. उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी शपथ घेतली. तर, केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदासह अन्य 44 जणांनी शपथ घेतली.
             लखनौमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि सर्व प्रमुख भाजप नेते, आमदार उपस्थित होते. याबरोबरच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव व ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव हेही उपस्थित होते.
          उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर कोण असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार झालेल्या या बैठकीत आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजप नेते सुरेश खन्ना यांनी आदित्यनाथ यांच्या नावाची शिफारस केली आणि नायडू यांनी त्याला पाठिंबा दिला. सर्व सहमतीनेच आदित्यनाथ यांना निवडल्याचे आणि या पदासाठी इतर कोणाचेही नाव पुढे न आल्याचे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग 5 वेळेस खासदार म्हणून निवडून आले. गोरखपूरमधील गोरखनाथ मठाचे प्रमुख असलेले आदित्यनाथ हे विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत.

१८ मार्च २०१७

अधिकार्‍यांनो, कन्नड शिका - कर्नाटकात आदेश

        कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय अधिकार्‍यांना कन्नड ही प्रशासकीय भाषा म्हणून वापरण्याचे निर्देश दिले आहेत. जे कोणी असे करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे. कर्नाटकमधील सार्वजनिक उपक्रम विभागाचे सचिव श्रीवास्तव कृष्णा यांनी त्यांच्या सहकार्‍यांना इंग्रजी भाषा वापरण्याचे आदेश दिले होते. कृष्णा यांनी त्यांच्या सहकार्‍यांना सर्व नस्त्या (फाईल्स), शासकीय आदेश, परिपत्रके इंग्रजी भाषेत सादर करण्याचे निर्देश दिले होते.

        जर तसे केले नाही तर परत पाठवले जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक विकास प्राधिकरणाने कृष्णा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कृष्णा यांनी आपले निर्देश तातडीने मागे घ्यावेत, असे आदेश कृष्णा यांना नोटीसमध्ये दिले आहेत. हा प्रकार निंदनीय असल्याचे म्हणत कर्नाटकमध्ये कन्नड ही प्रशासकीय भाषा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ती प्रत्येक ठिकाणी वापरण्यात यावी, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.  

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री : त्रिवेंद्र सिंग रावत

       भाजपचे माजी अध्यक्ष त्रिवेंद्र सिंग रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्रिवेंद्र सिंग रावत त्यांच्या डोईवाला या पारंपारिक मतदारसंघातुन 24,000 मतांनी निवडून आले आहेत. डेहराडूनमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षनेतेपदी आमदार त्रिवेंदसिंह रावत यांची निवड केली आहे. त्रिवेंद्र सिंग रावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. तसेच ते अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात.

       2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी रावत उत्तर प्रदेशात अमित शहांबरोबर काम करत होते. नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपने उत्तराखंडमधील 70 पैकी 57 जागांवर विजय मिळवला. 

१७ मार्च २०१७

ज्वालाची ‘साई’ संचालन संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती

        भारताची दुहेरीतील बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) संचालन संस्थेची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
        14 वेळेस राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेली ज्वाला गुट्टा म्हणाली, ‘मी ‘साई’ संचालन संस्थेची सदस्य म्हणून नियुक्त झाल्याने खूप आनंदीत झाली आहे. मला दोन दिवस आधीच दूरध्वनी आला होता. तेव्हा मला याविषयी सूचित करण्यात आले. मी नेहमीच खेळासाठी काही करू इच्छित होते. खेळाच्या चांगल्या व विकासासाठी मी नेहमीच तयार आहे.
         ‘साई’ केंद्राचे सचिव एस. एस. छाबडा यांनी ज्वालाला लिहिलेल्या पत्रात म्हटले, ‘आपल्याला माहीत करण्यास आनंद होत आहे की, आपल्याला साई संचालन संस्थेचे सदस्य म्हणून नियुक्त केले जात आहे. संचालन संस्थेच्या बैठकीसाठी आपण वेळ काढू शकाल याचा मला पूर्ण विश्‍वास आहे.’ दोन वेळेस ऑलिम्पियन ज्वालाने 2011 मध्ये विश्‍व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. ती म्हणाली, ‘पहिली बैठक नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 28 मार्चला होईल आणि त्यात सहभागी होण्यास मी तयार आहे. मला माझ्या जबाबदारीविषयी जास्त माहिती नाही, परंतु मी सर्वोत्तम कार्य करील.’

एमपीएससीत नाशिकचा भूषण अहिरे पहिला

        महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2016 चा अंतिम निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील भूषण अशोक अहिरे याने राज्यात प्रथम कमांक पटकावला. सातारा जिल्ह्यातील पूनम संभाजी पाटील हिने महिलांमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
         भूषण अहिरे अभियांत्रिकी विद्याशाखेचा पदवीधर असून त्याची उपजिल्हाधिकारी पदाकरिता निवड झाली आहे. तर पूनम पाटील हिची पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त या पदाकरिता निवड झाली आहे. उपजिल्हाधिकारी पदासाठी भूषण अहिरेसह श्रीकांत गायकवाड, संजयकुमार ढवळे, संदीप भास्के आणि नीलम बाफना यांची निवड झाली आहे. तर पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त या पदाकरिता पूनमसह अमोल ठाकूर, सागर पवार, अमोल मांडवे हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले आहेत.
         एमपीएससीतर्फे 10 एप्रिल 2016 रोजी मुंबईसह राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर राज्य सेवा (पूर्व) परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस 1,91,563 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे 1,575 उमेदवार मुख्य परीक्षा देण्याकरिता यशस्वी ठरले होते. 418 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. यशस्वी 130 उमेदवारांची यादी आयोगाने जाहीर केली आहे. त्यामध्ये 34 महिला आणि 2 दिव्यांग उमेदवारांची शिफारसही आयोगाने सरकारकडे केली आहे.

रायगडावरील 9000 झाडांचा पाण्याअभावी मृत्यू

       रायगड किल्ल्यावरील जवळपास 9,000 झाडांचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. जुलै 2016 मध्ये जवळपास 16,000 औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड केली होती. मात्र त्यांची योग्य काळजी न घेण्यात आल्याने या झाडांचा मृत्यू झाला आहे.
       एकीकडे गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष निधी मंजूर केला जात असताना गडावरील या नैसर्गिक संपत्तीकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य करण्याचे आश्‍वासन दिलेल्या भाजपा-शिवसेनेच्या सरकारमध्येच किल्ले रायगडावरील 8,825 हून अधिक औषधी वनस्पती पाण्याअभावी नष्ट झाल्या आहेत.
किल्ले रायगडसाठी 607 कोटी -

       जुलै 2016 मध्ये जवळपास 16,000 औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड केली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत झाडांना पाणी देण्यासाठी मजूर लावण्यात आले होते. मात्र, अपुर्‍या मजुरीअभावी त्यांनी कामाकडे पाठ फिरवली. यानंतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत घेण्यात आली. मात्र, त्यांनीही सहकार्य न केल्यान अखेर 9,000 झाडांचा पाण्याअभावी मृत्यू झाला आहे.
       विशेष म्हणजे नुकतेच शिवकाळात स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या विकासासाठी 607 कोटींचा घसघशीत निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. याशिवाय म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन आणि लोणार (बुलडाणा) तसेच माहूर देवस्थान (नांदेड) यांच्या विकास आराखड्यांनाही मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
       विकास आराखड्यात पर्यटकांसाठी मुलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याचे फडणवीस यांनी निर्देश दिले. रायगडला शिवसृष्टीसारख्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. रायगड किल्ल्यावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पद्धतीने डेब्रिज काढणे व उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा आराखड्यात समावेश आहे.

जीएसटी

       स्वातंत्र्योत्तर भारतातील अप्रत्यक्ष कर व्यवस्थेतील सर्वांत मूलगामी सुधारणा म्हणून अपेक्षित असलेला ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) येत्या 1 जुलैपासून लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर कायद्याला जीएसटी परिषदेने मंजुरी दिली आहे. यासोबत आता जीएसटीच्या सर्व 5 मसुद्यांना परिषदेची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे 1 जुलैपासून या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
       परिषदेच्या बाराव्या बैठकीत केंद्रशासित प्रदेश जीएसटी आणि राज्य जीएसटीला हिरवा कंदील मिळाला असून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर 1 जुलैपासून जीएसटी कायदा लागू करणार असल्याची माहिती जीएसटी परिषदेचे अध्यक्ष आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. तसेच जीएसटीच्या सर्व मसुद्यांना मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात येईल.
       या नव्या करप्रणालीच्या अंमलबजावणीबाबत सर्व राज्यांमध्ये सहमती झाल्याने ती लागू करण्यास विलंब होण्याचे काही कारण नाही. परिणामी, येत्या 1 जुलैपासून ‘जीएसटी’ लागू होऊ शकेल, अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयातील आर्थिक बाबींचे सचिव शक्तिकांत दास यांनी 1 मार्च रोजी दिली होती. ‘जीएसटी’ खरंच लागू झाला तर अशा प्रकारच्या क्रांतिकारी करप्रणालीसाठीची भारताची एका दशकाची प्रतीक्षा संपुष्टात येईल.
       अशा प्रकारचा नवा कर लागू करण्यास मुभा देणारी घटनादुरुस्ती संसदेने याआधीच मंजूर केली आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्याआधी केंद्रीय पातळीवर तीन व राज्यांच्या पातळीवर प्रत्येकी एक कायदा मंजूर व्हावा लागेल.
केंद्रीय पातळीवर ‘इंटेग्रेटेड जीएसटी’, ‘सेंट्रल जीएसटी’ आणि महसुलात येणार्‍या तुटीबद्दल राज्यांना भरपाई देण्यासंबंधीचा कायदा असे तीन कायदे करावे लागणार आहेत.

       यापैकी भरपाईसंबंधीच्या कायद्याच्या मसुद्यास ‘जीएसटी’ कौन्सिलच्या 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी मिळालेली आहे. मध्यावधी सुटीनंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र 9 मार्चपासून सुरू व्हायचे आहे. त्याआधी 4 आणि 5 मार्च रोजी होणार्‍या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत इतरही दोन कायद्यांचे मसुदे मंजूर करून घेण्याची सरकारची योजना होती. केंद्राप्रमाणे राज्यांनाही आपापल्या पातळीवर राज्य जीएसटी कायदे त्यांच्या विधिमंडळांत मंजूर करून घ्यावे लागतील
दरांचे टप्पे -

       * 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे ‘जीएसटी’च्या दराचे टप्पे याआधीच ठरविण्यात आले.
       * प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्याआधी सर्व करपात्र वस्तूंची कराच्या या टप्प्यांनुरूप वर्गवारी करावी लागेल.
       * जीएसटी कौन्सिलची आगामी बैठक उरकल्यावर अधिकारी हे काम करतील, असे अपेक्षित आहे.
       जीएसटी अर्थातच वस्तू व सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. राज्य व केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिले जात आहे. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही.
       या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र व राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे.

१६ मार्च २०१७

ऑस्ट्रेलियाच्या व्होजेस, डोहेर्टीची एकाच दिवशी क्रिकेटमधून निवृत्ती

         ऑस्ट्रेलियाच्या ऍडम व्होजेस आणि झेवियर डोहेर्टी या दोघा क्रिकेटपटूंनी एकाच दिवशी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेटमधील शेफिल्ड शिल्ड स्पर्धा सुरू असून, ती संपल्यावर आम्ही स्थानिक क्रिकेट स्पर्धेतही खेळणार नाही, असे त्यांनी सांगितले. व्होजेसने 20 कसोटी सामने खेळताना 5 शतके, 4 अर्धशतकांसह 1485 धावा केल्या. त्याने 31 एकदिवसीय सामने खेळताना एका शतकासह 870 धावा केल्या आहेत.
         झेवियर डोहेर्टी याने चारच कसोटी सामने खेळले असून, यात 7 गडी बाद केले आहेत. झेवियर 60 एकदिवसीय सामने खेळला. यात त्याने 55 गडी बाद केले आहेत. या दोघांबरोबरच ख्रिस हार्टले या स्थानिक खेळाडूनेही निवृत्ती जाहीर केली आहे.

भाजपच्या सभागृहनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती

         महापालिकेच्या नव्या सभागृहातील भारतीय जनता पक्षाच्या सभागृहनेतेपदी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती झाली.  नव्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर महापालिकेतील अन्य पदांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत, त्यानुसार सभागृहनेते म्हणून भिमाले यांना पत्र देण्यात आले.
        भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, माजी नगरसेविका वंदना भिमाले यांच्यासह पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या आदेशानुसार भिमाले यांना नियुक्तीचे पत्र दिल्याचे महापौरांनी सांगितले. तर, सभागृहातील सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांना विश्‍वासात घेऊन कामकाज केले जाईल,’ असे भिमाले यांनी सांगितले.
      दरम्यान, महापौरपदी निवड झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी, सकाळपासून महापौर मुक्ता टिळक यांनी कामकाजाला सुरवात केली. महापालिकेत आलेल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत, त्या सोडविण्याबाबत लगेचच संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली. शहरातील वाहतुकीच्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला.

१५ मार्च २०१७

सीमा वर्मा

         डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील आरोग्याशी संबंधित एक महत्वाचं पद सांभाळण्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या सीमा वर्मा यांना उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी शपथ दिली. सीमी वर्मा यांनी यावेळी भगवद्गीतेवर हात टाकून शपथ घेतली. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकन प्रशासनातील सेंटर्स फोर मेडिकेयर अँण्ड मेडिकएडच्या प्रमुखपदाची धुरा भारतीय वंशाच्या सीमा वर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली.
शपथ देत असताना ‘पेंस यांनी अमेरिकेला जगातील सर्वात उत्तम आरोग्य व्यवस्था बनवण्यात तुम्ही मदत कराल’, असे म्हटले आहे.
        डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य विमा कारभार सांभाळण्यासाठी सीमा वर्मा यांची निवड केली. त्यांच्या या निवडीला अमेरिकी सिनेटर्सकडून मंजुरी दिली.

शशांक मनोहर यांनी दिला आयसीसीच्या चेअरमनपदाचा राजीनामा

         8 महिन्यांपूर्वीच मनोहर यांनी आयसीसीच्या चेअरमनचा कार्यभार स्वीकारला होता. मे 2016 रोजी मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती.  मनोहर यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले  आहे. 

         मनोहर यांनी आपले राजीनामा पत्र आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पाठवले आहे. त्यात ते म्हणतात, ''गेल्या वर्षी माझी आयसीसीच्या चेअरमनपदी एकमताने निवड झाली होती. मी आयसीसीचा पहिला स्वतंत्र चेअरमन बनलो. समितीच्या प्रत्येक निर्णयात आपले सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा आणि निष्पक्षपातीपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. मात्र आता वैयक्तिक कारणांमुळे या पदावर राहणे मला शक्य होणार नाही. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.'' 

         कर्तव्यकठोर प्रशासक अशी ओळख असलेल्या मनोहर यांनी दोन वेळा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषवले होते. 25 सप्टेंबर 2008 ते 19 सप्टेंबर 2011 दरम्यान मनोहर यांनी पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर 2015 साली जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा शशांक मनोहर यांच्याकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते.

         मात्र आयसीसीच्या चेअरमनपद भूषणवण्याची संधी मिळाल्यावर मनोहर यांनी 10 मे 2016 रोजी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, 12 मे 2016 रोजी त्यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती.

१४ मार्च २०१७

शास्त्रज्ञांना चीनमध्ये सापडले डायनासोरचे ठसे

         चीनमधील जिलीन प्रांतामध्ये शास्त्रज्ञांनी हजारो वर्षांपूर्वी अस्तित्व असलेल्या डायनासोर या प्राण्याचे ठसे शोधून काढले आहेत.

     डायनासोरच्या पायाचे ठसे २१ से.मी. आणि ४३ से.मी. असल्याचे छायाचित्रणात दिसून आले आहेत. लाँजिग सिटीमधील डोंगरावरील रस्त्यावर विविध आकारांमध्ये हे ठसे सापडले असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. मात्र, डायनासोरचे वय, ठसे किती वर्षांपूर्वीचे किंवा त्यांच्या कालावधीबाबत त्यांनी माहिती दिली नाही. आॅगस्ट २0१५ मध्ये शास्त्रज्ञांना याची माहिती मिळाली होती. या शोधकार्याला चीन, रिपब्लिक आॅफ आणि युनायटेड स्टेट्सच्या शास्त्रज्ञांनी दुजोरा दिला आहे. तसेच ५५ सें. मी. लांब आकाराचे सापडलेले ठसे हॅडसोर्स प्राण्याचे असल्याचे चीन विद्यापीठाचे प्राध्यापक झिंग लिडा यांनी सांगितले.

इंडियन ओपन गोल्फ स्पर्धेत चौरासिया विजेता

         डीएलएफ गोल्फ अँड कन्ट्री क्लबवर झालेल्या हिरो इंडियन ओपन गोल्फ स्पर्धेत भारताच्या एसएसपी चौरासियाने सात स्ट्रोक विजय मिळवित जेतेपद पटकावले. त्याचे हे या स्पर्धेचे सलग दुसरे जेतेपद असून असा पराक्रम करणारा तो केवळ दुसरा भारतीय गोल्फर आहे.

         तिस-या दिवसाअखेर चौरासिया स्पेनचा कार्लोस पिगेम व इंग्लंडचा एडी पेपेरेल यांच्यासह संयुक्त आघाडीवर होता. रविवारी मात्र त्याने एकटय़ानेच आघाडीचे स्थान मिळविले. रविवारच्या तिसऱया फेरीसाठी 69 जण पात्र ठरले होते. त्यापैकी 42 जणांनाच तिसरी फेरी पूर्ण करता आली. ‘मी अतिशय खुश आहे. कारण हा अतिशय कठीण कोर्स आहे. त्यात सुदैवानेच मी यशस्वी ठरलोय, असे मला वाटते. 18 व्या टी नंतरच मला ही स्पर्धा जिंकून शकेन असा विश्वास वाटू लागला. 10 अंडरबाबत मी जो अंदाज केला तो खरा ठरला याचा मला जास्त आनंद वाटतो,’ अशा भावना चौरासियाने व्यक्त केल्या. जीव मिल्खा सिंगनंतर चार युरोपियन टूर टायटल्स जिंकणारा तो दुसरा भारतीय गोल्फर आहे. त्याने 10 अंडर 278 गुण मिळविले. येथील जेतेपदाचे त्याला 291,660 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले. आशियाई टूरवरील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचे हे सहावे जेतेपद आहे.

       इंडियन ओपन स्पर्धा सलग दोनदा जिंकणारा तो तिसरा खेळाडू असून याआधी ज्योती रंधवा (2006, 2007), जपानचा केन्जी होसोइशी (1967, 1968) यांनी असा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे इंडियन ओपन स्पर्धा भारतीय खेळाडूने जिंकण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2015 मध्ये अनिरबन लाहिरीने तर गेल्या वर्षी चौरासियाने ही स्पर्धा जिंकली होती. येथील स्पर्धेत स्पेनच्या पिगेमने दुसरे तर स्कॉटलंडचा स्कॉट जेमीसन व इटलीचा मॅटेव मनासेरो यांनी 2 अंडर 286 गुण घेत संयुक्त तिसरे स्थान मिळविले. भारताच्या चिराग कुमारने 22 व एस. चिक्करंगप्पाने 34 वे स्थान मिळविले.

१३ मार्च २०१७

कसोटीतील अष्टपैलूंमध्ये आश्विन पुन्हा ’नंबर वन’!

        ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी आश्‍विनच अष्टपैलूंच्या क्रमवारीत अग्रस्थानी होता. मात्र, पुणे कसोटीत अष्टपैलू कामगिरी करण्यात त्याला अपयश आले होते
         ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्यातील भारताच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारा फिरकी गोलंदाज आर. आश्‍विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटीतील अष्टपैलूंच्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले. याआधी बांगलादेशचा शकीब अल हसन प्रथम क्रमांकावर होता.
         ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी आश्‍विनच अष्टपैलूंच्या क्रमवारीत अग्रस्थानी होता. मात्र, पुणे कसोटीत अष्टपैलू कामगिरी करण्यात त्याला अपयश आले होते. गोलंदाजीत त्याने 7 बळी घेतले, मात्र फलंदाजीत तो उपयुक्त योगदान देऊ शकला नव्हता. यामुळे त्याचे मानांकन खालावले आणि शकीब अल हसनला प्रथम क्रमांक मिळाला. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शकीबचीही कामगिरी खराब झाली. त्यामुळे या कसोटीनंतर त्याचेही मानांकन कमी झाले. यामुळे आश्‍विन पुन्हा एकदा शकीबपेक्षा सरस ठरला. बंगळूर कसोटीत आश्‍विनने 8 गडी बाद केले; तर गॉल कसोटीत शकीबला तीनच गडी बाद करता आले होते.
फलंदाजांच्या क्रमवारीत कोहलीची घसरण -
        कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा ज्यो रूट या दोघांच्याही मानांकनात घट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने 130 धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे त्याचे गुण वाढले आणि त्याने दुसर्या क्रमांकावरील ज्यो रूटला मागे टाकले. यामुळे कोहली चौथ्या स्थानावर गेला.
कसोटीतील फलंदाजांची क्रमवारी -

        1) स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
        2) केन विल्यम्सन (न्यूझीलंड)
        3) ज्यो रूट (इंग्लंड)
        4) विराट कोहली (भारत)
        5) डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
        6) चेतेश्‍वर पुजारा (भारत)
        7) अझर अली (पाकिस्तान)
        8) युनूस खान (पाकिस्तान)
        9) हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)
        10) एबी डिव्हिलर्स (दक्षिण आफ्रिका)
कसोटीतील गोलंदाजांची क्रमवारी -

        1) आर. आश्‍विन (भारत)
        2) रवींद्र जडेजा (भारत)
        3) जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया)
        4) रंगना हेराथ (श्रीलंका)
        5) कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)
        6) डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
        7) जेम्स अँडरसन (इंग्लंड)
        8) स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
        9) व्हरनॉन फिलँडर (दक्षिण आफ्रिका)
        10) नील वॅग्नर (न्यूझीलंड)
कसोटीतील अष्टपैलूंची क्रमवारी -

        1) आर. आश्‍विन (भारत)
        2) शकीब अल हसन (बांगलादेश)
        3) रवींद्र जडेजा (भारत)
        4) मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
        5) बेन स्टोक्स (इंग्लंड)

काबूलमध्ये बॉम्बस्फोट

        अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे एका बसला लक्ष करुन बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत.काबूलमध्ये देशातील एका मोठ्या नामांकित टेलिकॉम कंपनीच्या बसला लक्ष करुन हा बॉम्बस्फोट घडवून आणला. यामध्ये या कंपनीच्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. तर 8 कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी बसला वेढा घातला. मात्र, स्फोटात बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. दरम्यान, एका व्यक्तीने बसच्या खाली जाऊन आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणलाचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. मात्र, गृहमंत्रालयाचे प्रवक्ते सेदिक सिदिक्की म्हणाले की, हा स्फोट रोडच्या बाजूला बॉम्ब ठेवून घडवून आणला.

पाकिस्तानात 19 वर्षांनंतर जनगणना

        पाकिस्तानमध्ये 1998 नंतर तब्बल 19 वर्षांनी जनगणना होणार आहे. या जनगणनेसाठी पाकिस्तान लष्कराची मदत घेण्यात येणार आहे. 15 मार्चपासून या जनगणनेला सुरुवात होणार असल्याची माहीती पाकिस्तान लष्करातील अधिकारी मेजर जनरल आसिफ गफुर व पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री मरिअम औरंगजेब यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
        25 मेपर्यंत दोन टप्प्यांमध्ये ही जनगणना पूर्ण केली जाणार असून त्यासाठी 1850 कोटी रुपये खर्च येणार आहे. जवळपास 2 लाख पाकिस्तानी सैनिकांची मदत यावेळी घेतली जाणार आहे. जनगणने दरम्यान घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाच्या माहीतीची नोंद घेणार्‍या कर्मचार्‍यासोबत किमान एक सैनिक असणार आहे. कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी असणारे हे सैनिक त्यांना माहीती गोळा करण्यासाठी मदतही करणार आहेत.
        जनगणनेसाठी प्रशासनातर्फे आणि लष्करातर्फे पूर्ण तयारी करण्यात आल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या जनगणनेसाठी पाकिस्तान सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील जवळपास 1 लाख कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जनगणनेमध्ये चुकीची माहिती देणार्‍यास 50 हजार रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणार आहे.

१२ मार्च २०१७

जिल्ह्यात 65 लाख क्विंटल साखर निर्मिती

        जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. 15 कारखान्यांकडून 54 लाख 36 हजार 302 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. त्यातून 65,16,817 क्विंटल साखर निर्मिती झाली असून, सरासरी 11.99 टक्के उतारा मिळाला आहे. या हंगामात जयवंत शुगर कारखान्याने प्रतिटनास सर्वाधिक 2,850 रुपये दर दिला आहे.
        जिल्ह्यातील 9 सहकारी व 6 खासगी कारखान्यांनी ऊस गाळप झाले. जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात घट झाल्याने हा हंगाम मार्चच्या सुरवातीस संपला आहे. सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक 9,42,191 मेट्रिक टन इतके गाळप केले असून, 12,17,470 क्विंटल साखर निर्मिती केली. साखर उतार्‍यात कृष्णा कारखान्याची आघाडी असून, या कारखान्याचा सरासरी उतारा 12.70 टक्के आला आहे. जयवंत शुगर या खासगी कारखान्याने सर्वाधिक दर दिला. या कारखान्याने प्रती टनास 2,850 रुपये दिला आहे. जिल्ह्यात खासगी कारखान्यांच्या संख्येत वाढ झाल्याने या कारखान्यांकडून गाळपाचे प्रमाण वाढले आहे. सहा खासगी कारखान्यांनी 18,57,384 मेट्रिक टन उसाचे गाळप करत 21,75,781 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे, तसेच 9 सहकारी कारखान्यांनी 35,78,918 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 43,41,090 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

प्रकाशसिंह बादल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

        पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी राज्यपाल व्ही. पी. बदनोर यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला आहे.

       पंजाब विधानसभा निवडणुकीत अकाली दल-भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अकाली दल-भाजप या युतीला विधानसभेच्या 117 जागांपैकी 18 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे या पराभवामुळे मुख्यमंत्री बादल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

११ मार्च २०१७

‘आइस हॉकी’मध्ये भारतीय महिला संघाने रचला इतिहास

         बंगळुरू कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला रोमांचक विजय किंवा फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनाने मिळवलेला विजय याचीच सर्वत्र चर्चा होत असताना थायलंडमध्ये झालेल्या आयआयएफएफ आइस हॉकी आशियाई स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय विजय पडद्याआडच राहिला.
         भारताच्या महिला संघाने आइस हॉकी स्पर्धेत आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत विजयासाठी जिवाचे रान केले. एकूण 20 जणांचा समावेश असलेला भारतीय महिला संघ या स्पर्धेसाठी थायलंडमध्ये दाखल झाला होता. अपुरा निधी आणि इतर अनेक अडथळ्यांचा सामना करत आइस हॉकीचा संघ मोठ्या जिद्दीने आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी थायलंडमध्ये गेला. संघाची मेहनत देखील फळाला आली. भारतीय संघाने फिलिपिन्सच्या संघावर 4-3 असा थरारक विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला आइस हॉकी संघाचा हा पहिलावहिला विजय ठरला आहे.
          2016 साली भारतीय संघाने आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण संघाला सपाटून मार खावा लागला आणि पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाद ठरला होता. त्यानंतर संघावर चहूबाजूंनी टीका झाली. यावेळीच्या स्पर्धेसाठी सहभाग घेण्यासाठी देखील निधी मिळणे कठीण झाले होते. अशावेळी लोकांकडून आर्थिक मदत मिळवून भारतीय महिला आइस हॉकी संघाने थायलंड गाठले. तब्बल 3,000 लोकांकडून मदत मिळवण्याचेही कष्ट संघाने घेतले. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात निराशा झाली. पण फिलिपिन्सविरुद्धच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत संघाने विजय प्राप्त केला.

आयपीएल : पंजाबच्या कर्णधारपदी ग्लेन मॅक्सवेल

         ’इंडियन प्रिमिअर लीग’च्या (आयपीएल) आगामी दहाव्या मोसमासाठी ’किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलकडे सोपविले आहे. गेल्या मोसमात पंजाबच्या संघाने डेव्हिड मिलरकडे नेतृत्व सोपविले होते. 6 सामन्यांनंतर मिलरला वगळून मुरली विजयला कर्णधारपदी नियुक्त केले होते. यंदा 5 एप्रिलपासून ’आयपीएल’ सुरू होत आहे.
दोन कर्णधार बदलूनही गेल्या मोसमात पंजाबच्या संघाला यश आले नव्हते. सलग दोन स्पर्धांमध्ये पंजाब शेवटच्या स्थानी राहिले. त्यामुळे यंदा पंजाबने संघात आमूलाग्र बदल करण्याचे ठरविले आहे. वास्तविक पंजाबच्या संघात इऑन मॉर्गन आणि डॅरेन सॅमीसारखे आंतरराष्ट्रीय संघांचे अनुभवी कर्णधार आहेत, तरीही त्यांनी मॅक्सवेलकडे नेतृत्व सोपविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत मॅक्सवेलने कधीही कुठल्याही संघाचे नेतृत्व केलेले नाही.
        नव्या कर्णधाराबरोबरच पंजाब संघाने घरच्या सामन्यांसाठी आणखी एक मैदानही निवडले आहे. मोहाली हे पंजाबचे ’होम ग्राऊंड’ आहे. त्याच्या जोडीला आता यंदाच्या मोसमातील पंजाबचे तीन सामने इंदूरमधील होळकर स्टेडियमवर होणार आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ :
         वरुण ऍरॉन, हाशिम आमला, अनुरित सिंग, अरमान जाफर, के. सी. करिअप्पा, मार्टिन गुप्टील, गुरकीरतसिंग मान, मॅट हेन्री, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल (कर्णधार), डेव्हिड मिलर, इऑन मॉर्गन, निखिल नाईक, टी. नटराजन, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), प्रदीप साहू, डॅरेन सॅमी, संदीप शर्मा, मोहित शर्मा, रिंकू सिंग, मार्कस स्टॉईनिस, स्वप्निल सिंग, राहुल तेवाटिया, शार्दूल ठाकूर, मुरली विजय, मनन व्होरा.

‘एक्झिट पोल्स’चा उत्साह, सेन्सेक्स 150 अंशांनी वाढ

         जाहीर होणार्‍या निवडणूक निकालांच्या ’एक्झिट पोल्स’मुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 150 अंशांची वाढ झाली असून निफ्टीचा 9000 अंशांच्या पातळीच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनुसार उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
        सध्या सेन्सेक्स 54.87 अंशांनी वाढला असून 28,984.00 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8,944 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत असून 17.90 अंशांनी वाढला आहे. बाजारात ऑईल अँड गॅस क्षेत्रात विक्रीचा किंचित दबाव दिसून येत आहे. इतर सर्व क्षेत्रांमध्ये मात्र तेजीसह व्यवहार सुरु आहे.
          निफ्टीवर आयडिया सेल्युलर, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट्स, अदानी पोर्ट्स आणि टेक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर पॉवरग्रिड कॉर्पोरेशन, बीपीसीएल, ओएनजीसी, गेल आणि ग्रासिमचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

‘मुंबईच्या सूरजची राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी निवड

         बेंगळूरु येथे 14 मार्चपासून सुरू होणार्‍या वरिष्ठ पुरुष हॉकी संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियाने संभाव्य 33 खेळाडूंची यादी जाहीर केली. प्रमुख प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार्‍या या शिबिरासाठी मुंबईचा 20 वर्षीय गोलरक्षक सूरज करकेराला स्थान दिले आहे. गतवर्षी व्हेलेन्सिया येथे झालेल्या 4 देशांच्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ हॉकी स्पर्धेत सूरजचा भारतीय संघात समावेश केला होता.
         उत्तर प्रदेशमध्ये डिसेंबर महिन्यात झालेल्या कनिष्ठ विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघातल्या सर्व 11 खेळाडूंचीही शिबिरासाठी निवड झाली आहे. तसेच हॉकी इंडिया लीगमध्येही युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे भारतीय संघ निश्‍चित करताना निवड समितीची चांगलीच कसोटी लागणार आहे. या शिबिरात सर्वोत्तम कामगिरी करून एप्रिलमध्ये होणार्‍या सुल्तान अझलन शाह चषक आणि जूनमध्ये होणार्‍या पुरुष हॉकी विश्‍व लीग उपांत्य फेरी स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी चढाओढ रंगणार आहे.
         ‘‘हॉकी इंडिया लीगमध्ये काही खेळाडूंनी तणावाच्या परिस्थितीतही चांगला खेळ केला. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 2016 च्या मोसमातील आणि यंदाच्या हॉकी इंडिया लीगमधील कामगिरीच्या जोरावर या संभाव्य खेळाडूंची निवड केली आहे. हॉकी विश्‍व लीग उपांत्य आणि विश्‍व लीग अंतिम या स्पर्धाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष भारतीय संघासाठी फार महत्त्वाचे आहे. युवा खेळाडूंचा समावेश असल्यामुळे 2018 च्या विश्‍वचषक स्पर्धेसाठीच्या तयारीसाठी आमच्यासमोर पर्याय उपलब्ध आहेत. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या समर्थ खेळाडू नवीन आव्हानांसाठी सज्ज आहेत, असे मला वाटते,’’ असे ओल्टमन्स यांनी सांगितले.
         संभाव्य खेळाडू -
         गोलरक्षक : आकाश चिकटे, पी. आर. श्रीजेश, विकास दाहिया, सूरज करकेरा
         बचावपटू : दीपसन तिर्की, प्रदीप मोर, बिरेंद्र लाक्रा, कोठाजीत सिंग, सुरेंदर कुमार, रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग, जसजित सिंग कुलर, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास
         मध्यरक्षक : चिंग्लेनसाना सिंग, एस. के. उथप्पा, सुमित, सतबिर सिंग, सरदार सिंग, मनप्रीत सिंग, हरजित सिंग, निलकंत शर्मा, मनप्रित, सिमरनजीत सिंग.
         आघाडीपटू : रमणदीप सिंग, एस. व्ही. सुनील, तलविंदर सिंग, मनदीप सिंग, अफ्फान युसूफ, निक्कीन थिमैयाह, गुरजंत सिंग, आकाशदीप सिंग, ललित उपाध्याय.

‘युकीचा सनसनाटी विजय

         बिगरमानांकित भारताच्या युकी भांब्रीने एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत सनसनाटी विजय नोंदविला. त्याने पाचव्या मानांकित तसेच जागतिक क्रमवारीत 147 व्या क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या ब्लाझ कॅविचला 6-1, 6-4 असे दोन सेटमध्येच हरविले. त्याने 1 तास 14 मिनिटांतच विजय मिळविला. त्याने 5 सर्व्हिसब्रेक नोंदविले, तर एकदाच सर्व्हिस गमावली. 
        युकीने पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक मॉटला 6-2, 6-0 असे हरविले होते. युकी जागतिक क्रमवारीत 341 व्या स्थानावर घसरला आहे, मात्र त्याने ‘टॉप हंड्रेड’पर्यंत वाटचाल केली आहे. आता त्याची अर्जेंटिनाच्या आगुस्टीन वेलोट्टी याच्याशी लढत होईल. वेलोट्टी 190 व्या स्थानावर आहे.

१० मार्च २०१७

पद्माकर शिवलकरांना पुरस्कार प्रदान

        भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि स्टार फिरकी गोलंदाक रविचंद्रन आश्‍विन यांना 2015-16 मोसमातील शानदार कामगिरीच्या प्रदर्शनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरविले. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी पॉली उम्रीगर पुरस्कार कोहलीला प्रदान करण्यात आला.
          यावेळी माजी दिग्गज क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांना भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या हस्ते सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे, कोहलीने तिसर्‍यांदा या पुरस्कारावर नाव कोरले असून, अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर 2016 साली वेस्ट इंडिज दौर्‍यात केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर आश्‍विनने प्रतिष्ठेचा दिलीप सरदेसाई पुरस्कार पटकावला.
          गेल्यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्चस्व राखलेल्या आणि विक्रमी 41 व्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) सर्वोत्कृष्ट राज्य संघटनेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी भारताचा भरवशाचा फलंदाज आणि मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणे याने एमसीएच्यावतीने हा पुरस्कार माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांच्याहस्ते स्वीकारला.
          देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोर्‍याने धावा काढणार्‍या मुंबईच्या श्रेयस अय्यरला रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा काढल्याबद्दल माधवराव शिंदे चषक प्रदान करण्यात आला.
          मुंबईचा सलामीवीर जय बिस्त यालाही 23 वर्षांखालील सी. के. नायडू स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्यासाठी एम. ए. चिदंबरम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
          महाराष्ट्राचा गोलंदाज सत्यजित बच्चाव याने 23 वर्षांखालील सी. के. नायडू सर्वाधिक बळी घेत एम. ए. चिदंबरम चषक पटकावला.

आयएनएस तिल्लनचांग नौदलात दाखल

        ‘वॉटर जेट फास्ट अ‍ॅटेक क्राफ्ट’ प्रकारातील आयएनएस तिल्लनचांग नावाच्या जहाजाला भारतीय नौदलात दाखल करण्यात आले. कर्नाटकातील कारवार येथील नौदलाच्या मुख्यालयात हा समारंभ झाला. व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांनी तिल्लनचांगला नौदलाच्या ताफ्यात सामील केले.
           सागरी सेवेचा जागतिक विक्रम करणारी आणि तब्बल 30 वर्षे भारतीय नौदलाची शक्तिस्थळ म्हणून मिरवणारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट गेल्या काही दिवसांपूर्वी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आयएनएस तिल्लनचांगला नौदलात दाखल करण्यात आले. दरम्यान, आयएनएस तिल्लनचांग हे तिसरे जहाज असून यापूर्वी आयएनएस तरमुगली व आयएनएस तिहायू या दोन जहाजांना 2016 मध्ये नौदलात दाखल करण्यात आले आहे. याच प्रकारातील आणखी एक जहाज येत्या काळात दाखल होणार आहे.

’कोरियां’च्या संघर्षात मध्यस्थीचा चीनचा प्रयत्न

       उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे जागतिक राजकारणामध्ये निर्माण होणारा तणाव निवळावा, या उद्देशार्थ चीनने उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रे व अण्वस्त्रांच्या घेतल्या जाणार्‍या चाचण्या थांबवाव्यात, असे आवाहन केले आहे. याचबरोबर, अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्याकडून करण्यात येणारे संयुक्त लष्करी सरावही तत्काळ थांबविण्यात यावेत, असेही चीनने म्हटले आहे. या लष्करी सरावांमुळे उत्तर कोरिया संतप्त असल्याचे मानले जात आहे.
       चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी यासंदर्भातील आवाहन केले आहे. उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय निर्बंध झुगारुन देत चार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनकडून हे आवाहन केले आहे. उत्तर कोरियाचे आक्रमक धोरण व दक्षिण कोरिया व अमरिकेकडून त्यास देण्यात येणार्‍या उत्तरामुळे या भागात संघर्षाचा स्फोट होण्याची भीती वांग यांनी व्यक्त केली आहे. यामुळेच, लष्करी सराव वा क्षेपणास्त्र चाचण्या थांबविणे हे राजनैतिक चर्चा पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील प्रयत्नाचे पहिले पाऊल ठरु शकेल, अशी भूमिका चीनकडून व्यक्त केली आहे.

९ मार्च २०१७

लहान बेडकांच्या 7 नवीन प्रजाती

        मुलाच्या अंगठ्यावर बसू शकतील इतक्या लहान आकाराच्या निशाचर बेडकांच्या 7 नवीन प्रजाती गेल्या 5 वर्षांच्या संशोधनात पश्‍चिम घाट भागात शोधण्यात आल्या आहेत.
        दिल्ली विद्यापीठाच्या दोन वैज्ञानिकांनी पश्‍चिम घाट परिसरात हे बेडूक शोधले असून ते आतापर्यंत सापडले नव्हते. या बेडकांचा अधिवास माहिती नव्हता. त्यांचे संदेशवहन हे कीटकांसारखे असते. संशोधनाचे नेतृत्व करणारे एस. डी. बिजू यांनी सांगितले की, अतिशय लहान भौगोलिक क्षेत्रात हे बेडूक सापडले आहेत.
        पश्‍चिम घाटातील 32 टक्के बेडूक हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नवीन 7 प्रजातींपैकी 5 वांशिक धोक्याच्या मार्गावर असून त्यांचे संवर्धन तातडीने गरजेचे आहे. हे बेडूक रात्री व दिवसा कार्यरत असतात. काही बेडूक हे रात्रीच कार्यरत राहतात.
        बेडकांच्या 7 प्रजातींपैकी 4 प्रजाती 12.2 ते 15.4 मि.मी या आकाराच्या आहेत. आतापर्यंत या गटातील फार थोड्या प्रजाती माहिती होत्या. बेडकाच्या या प्रजाती प्राचीन काळातील असून त्या पश्‍चिम घाटात आढळतात, असे दिल्ली विद्यापीठाच्या सोनाली गर्ग यांनी सांगितले.
        बेडकांच्या लहान प्रजाती या स्थानिक पातळीवरही असतात पण त्यांच्याकडे त्यांच्या आकारामुळे दुर्लक्ष होते. भारतात लहान बेडकांचे संवर्धन गरजेचे आहे. नवीन प्रजाती या ओलसर पानांमध्ये आढळणार्‍या आहेत. आतापर्यंत निशाचर बेडकात 28 प्रजाती माहिती होत्या, त्यात तीन 18 मि.मी आकाराच्या होत्या. आता ही संख्या 35 झाली असून त्यातील 20 टक्के लहान आकाराच्या प्रजाती आहेत. 70-80 दशलक्ष वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या प्रजातींचे प्रतिनिधित्व या प्रजाती करतात.

नाट्यसमीक्षक वि. भा. देशपांडे यांचे निधन

      ज्येष्ठ नाट्य समीक्षक व लेखक वि. भा. देशपांडे यांचे निधन झाले ते 79 वर्षांचे होते. पुण्यातील एरंडवणे येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
       ते पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात 35 वर्षे मराठी आणि नाट्यशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी अनेक पुस्तके संपादित केली, तसेच स्वतंत्र लेखन केले. संपादित व स्वतंत्र अशी एकूण 43 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
      मराठी नाट्यकोश-मराठीतला आणि भारतीय स्तरावरचा पहिला नाट्यकोश, ’मराठी नाटक- नाटककार काळ आणि कर्तृत्व’ याचे 3 खंड, रंगयात्रा, आचार्य अत्रे ः प्रतिमा आणि प्रतिभा, पु. ल. पंच्याहत्तरी, गाजलेल्या रंगभूमिका, माझा नाट्यलेखन-दिगदर्शनाचा प्रवास अशी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. निळू फुले-व्यक्ती, कार्यकर्ता, कलावंत या पुस्तकाचे त्यांनी संपादन केले होते.

८ मार्च २०१७

8 मार्च : महिला दिन

        * 8 मार्च 1857 - न्यूयॉर्क शहरात कामकरी महिलांचा पहिला मोर्चा निघाला होता. कामाचे तास कमी करावेत, योग्य मोबदला मिळावा, पाळणाघरी असावीत इत्यादी मागण्यांसाठी निघालेला हा मोर्चा होता.

        * 8 मार्च 1909 - कापड गिरण्यांमध्ये काम करणार्‍या महिलांनी संप केला होता.

        * 8 मार्च 1911 - पासून संपूर्ण जगात हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला व जगातील सर्व स्तरांवरील स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडून त्याला समर्पक अशी उत्तरे शोधण्यात संयुक्त राष्ट्रसंघाचा मोठा वाटा आहे.

        * डेन्मार्कला झालेल्या ‘वुमेन्स सोशलिस्ट इंटरनॅशनल’च्या बैठकीत हा ‘महिलांच्या लढ्याचा दिवस’ म्हणून जाहीर झाला.

        * 1975 - आंतरराष्ट्रीय महिला वर्ष

        * 1977 - संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनं ठराव करून 8 मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून जाहीर केला.

        * जागतिक महिला दिनानिमित्त अमेरिकेसह काही देशांमध्ये मार्च 2017 हा महिना ’वुमेन्स हिस्ट्री मंथ’ म्हणून साजरा झाला. स्त्रियांच्या कर्तबगारीचे अनेक संदर्भ असलेला मार्च महिना असा साजरा करण्याचा ठराव 1987 मध्ये अमेरिकन काँग्रेसने संमत केला होता. अमेरिकेसोबत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे देशदेखील हा महिना साजरा करतात.

       महिला दिन निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाची बोधवाक्ये -

        * 2014 - महिलांना समानता मिळाली, तर सर्वांचीच प्रगती होईल. (Equality for Women is Progress for all)

        * 2015 - करून दाखवा (Make it happen )

        * 2016 - समानता देण्याचे वचन द्या (Pledge for Parity )

        * 2017 - स्वतःच्या आयुष्यात बदल करण्यासाठी सज्ज व्हा आणि समोर आलेल्या नवीन बदलांना धीटपणे स्वीकारा. (Be Bold for Change) महिलांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण आणि वाढत्या असहिष्णुतेला विरोध.

       बोधचिन्ह - सर्व गोष्टी लक्षात घेऊन महिला दिनासाठी अतिशय अर्थपूर्ण व समर्पक असे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे.

       एक वर्तुळ व त्याला लागून असलेला क्रॉस असेे बोधचिन्ह म्हणजे प्रेम व सौंदर्याची देवता समजल्या जाणार्‍या व्हीनसचे प्रतीक आहे. व्हीनस ही स्त्रीत्वाची प्रातिनिधिक खूण समजली जाते. हे बोधचिन्ह जांभळ्या व पांढर्‍या रंगात काढलेले असून त्यातला पांढरा रंग हा स्त्रीची शुद्धता दर्शवतो, तर जांभळा रंग स्त्रीचा शांत व समजूतदारपणा आणि स्वाभिमान दर्शवतो.

       या बोधचिन्हाप्रमाणे 1996 पासून महिला दिनासाठी दरवर्षी एक बोधवाक्य (theme) ठरवले जाते व त्याला अनुसरून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बहुतेक बोधवाक्यांत स्त्री-पुरुषांत केला जाणारा भेदभाव व स्त्रियांवर होणारे अत्याचार यासारखे विषय प्रतिबिंबित होतात, तर काहींमध्ये त्यावेळी असलेली सामाजिक व्यथा उतरलेली असते. त्या त्या वर्षीचे बोधवाक्य डोळ्यासमोर ठेवून जगभरात महिलांसाठी त्यानुसार काम केले जाते.

बी बोल्ड फॉर चेंज

        2017 वर्षीच्या महिला दिनाची थीम - Be Bold for Change. या थीमद्वारे महिलांना स्वतःच्या आयुष्यात बदल करण्यासाठी सज्ज व्हा आणि समोर आलेल्या नवीन बदलांना धीटपणे स्वीकारा, असे आवाहन केले आहे. अतिशय अर्थपूर्ण अशा या थीमनुसार स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत दाखवलेले धाडस व त्यानुसार स्वतःच्यात केलेले अनुकूल बदल या गोष्टी त्यांनी केलेल्या प्रगतीमध्ये व मिळवलेल्या यशामध्ये नक्कीच प्रतिबिंबित होतील.

        स्त्रीच्या दृष्टिकोनातून बघितले असता, बोल्ड’ या शब्दाचा अर्थ कोणत्याही प्रकारचे धोके पत्कारण्यास न घाबरणारी, धीट व धाडसी स्त्री असा लावता येईल. चेंज म्हणजे बदल किंवा बदलण्याची कृती. आज स्त्रियांनी स्वतःच्यात बदल घडवून आणण्याची, स्वतःची वृत्ती अथवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची, स्वतःचे मत, निर्णय व वागणूक बदलण्याची, तसेच जुन्या पद्धती बदलून नवीन पद्धती अंगीकारण्याची नितांत जरुरी आहे.

        या थीमचा लक्ष्यबिंदू आहे ''Women in the Changing World of Work.'' कामाच्या ठिकाणचे जग रोज बदलत आहे. त्याच्यात विविध प्रकारचे बदल घडत आहेत. जमेची बाजू म्हणजे त्यातील अनेक बदल हे स्त्रियांच्या दृष्टीने अर्थपूर्ण व विशेष महत्त्व असलेले असे आहेत. ते बदल जर स्त्रियांनी आत्मसात केले, तर प्रगतीच्या रस्त्याने जाण्यास त्यांना वेळ लागणार नाही. त्यांच्या आशा व आकांक्षा फलद्रूप झाल्या तर स्त्रियांचा प्रगतीकडे जाण्याचा मार्ग सोपा होईल.

        आज घर, संसार, मुले हे सर्व सांभाळून सगळ्याच क्षेत्रांत बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यांच्या बरोबरीने अनेक आव्हाने समर्थपणे पेलत आहेत. काही क्षेत्रांत त्या अग्रस्थानीदेखील आहेत, तर काही क्षेत्रांत त्यांनी पुरुषांची मक्तेदारी मोडली आहे. यामुळे स्त्री-पुरुष असा भेदभाव आता राहिला नाही, असे वाटते; पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचे जाणवते. काही सामाजिक स्तरांवरील स्त्रिया अद्यापही त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करत असल्या, तरीही त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचे दिसून येते.

        प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हे अनेक रूपांतील स्त्रीभोवती फिरत असते. मग ती स्त्री सुशिक्षित असो वा अशिक्षित, घराबाहेर पडून काम करणारी असो वा गृहिणी असो. आई, बहीण, मुलगी, बायको वा मैत्रीण असो. तिची प्रत्येक भूमिका त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण अशीच असते. बालकाचा जन्म एका स्त्रीच्या उदरातून झालेला असतो. प्रेम, माया, वात्सल्य, ममता हे सर्व गुण त्याच्यात जन्मदातीकडून उपजत येतात. कणखरपणा, लढाऊ वृत्ती, चिकाटी, हळुवारपणा हे स्वभाव विशेष म्हणजे तर स्त्रीला जन्मतः मिळालेली एक देणगीच आहे. आपल्याकडे असे म्हटले जाते, पुरुष म्हणजे शरीर व स्त्री म्हणजे शक्ती आणि ही शक्तीच त्या शरीराला जिवंत, ताजेतवाने ठेवते.’ हेच तर स्त्रीचे व्यक्तिवैशिष्ट आहे.

वुमेन्स हिस्ट्रीमंथ

        स्त्री शारीरिकदृष्ट्या दुबळी आहे, असा युक्तिवाद करताना रणांगणावरच्या पुरुषांच्या पराक्रमाचे दाखले दिले जातात. परंतु युक्तिवादाला छेद देणारी अनेक उदाहरणे ’वुमेन्स हिस्ट्रीमंथ’च्या माध्यमातून पुढील समोर आली आहेत.

        * पहिल्या शतकातला रोमन सम्राट डोमिटिअनच्या काळातल्या अ‍ॅमेझॉन व अचिलिया या समशेरबाज वीरांगनांचे ब्रिटिश म्युझियममधील शिल्प

        * अमेरिकन मिलिटरी अकादमीची पहिली कमांडंट ऑफ कॅडेट्स, ब्रिगेडिअर जनरल डायना होलांड

        * ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडजवळच्या फांगणेच्या आजीबाईंच्या शाळा.

        * भारताच्या डॉ. आनंदीबाई जोशी, जपानच्या डॉ. केई ओकामी व सीरियातल्या दमास्कसच्या डॉ. तबत एम इस्लामबूलाई या तिघी अन्य देशांतून अमेरिकेला जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या पहिल्या महिला. सॅम मॅग्गज यांच्या ’वंडर वुमेन’ पुस्तकाच्या आधारे तिघींच्या कर्तबगारींची नोंद सोशल मीडिया’ने घेतली.

        * व्हीटनी म्युझियम ऑफ अमेरिकन आर्ट’मध्ये पहिले सोलो एक्झिबिशन’ लावणार्‍या अल्मा थॉमस

        * अरब जगतातल्या पहिल्या छायाचित्रकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या पॅलेस्टाइनच्या करिमा अबद

        * ’अ‍ॅनिमेशन’ जगताचा प्रारंभ करणार्‍यांच्या पहिल्या पिढीतल्या जर्मनीच्या लॉट रिनिजर

        * परिचारिका ते शिल्पकार असा प्रवास केलेल्या अन् फ्रँकलिन डी रुझवेल्टचे मूळ शिल्प घडविणार्‍या कृष्णवर्णीय सलमा बुर्क

        * काटे चमच्याचा शोध लावणार्‍या (1 मार्च 1892 ला त्याचे पेटंट मिळाल्याचे आगळे महत्त्व) आफ्रिकन वंशाच्या अ‍ॅना मॅनजिन.

        * पद्मश्री सीतादेवी - यांच्यामुळे भारतात बर्‍यापैकी ओळख असलेली मिथिला किंवा मधुबनी शैलीतली देवीदेवतांची चित्रे असे या कलेचे स्वरूप असले, तरी तिची अन्य वैशिष्ट्ये जगाला भावली आहेत.हिमालयाच्या पायथ्याला, गंगा-कोशी-नारायणी नद्यांच्या खोर्‍यात, भारत-नेपाळ सीमेवरील तराई प्रदेशातल्या महिलांनी तीन हजार वर्षांहून अधिक काळ मधुबनी किंवा मिथिला किंवा मधुबनी चित्रकलेचे संगोपन केल्याची विशेष दखल जगाने मार्च मासाच्या निमित्ताने घेतली. शेकडो वर्षे ब्राह्मण, दुसाध किंवा कायस्थ समूहातल्या केवळ महिलाच ही चित्रे काढत आल्या आहेत. मूळ रंगांचाच वापर हा आणखी विशेष आहे.

        * इंग्लंडमध्ये एमिली पॅख्स्टन यांच्या नेतृत्वात मतदान अधिकारासाठी झालेल्या ‘सफ्रेजेट आंदोलनानं’ जगभरातल्या स्त्रियांना प्रेरणा दिली.

        * अनुशेह अन्सारी - ऑस्कर सोहळ्यात विदेशी भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट ’द सेल्समन’चा पुरस्कार स्वीकारायला इराणी दिग्दर्शक असगर फरहादी उपस्थित नव्हते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या परकी नागरिकांसदर्भातील धोरणाचा निषेध म्हणून ते गैरहजर राहिले. तेव्हा, अनुशेह अन्सारी यांनी तो पुरस्कार स्वीकारला. इराणमध्ये जन्मलेल्या श्रीमती अन्सारी 2006 मध्ये चाळिसाव्या वाढदिवसानंतर स्वत:च्या खर्चाने अंतराळ स्थानकावर पोचलेल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. पर्शियन वंशाच्या पहिल्या अंतराळवीर.

        * थेरेसा कचिंडामोटो - मलावीमधील थेरेसा या ’टर्मिनेटर ऑफ चाइल्ड मॅरेजेस’ म्हणून ओळखल्या जातात. त्या स्वत: बारा भावंडांपैकी सर्वांत धाकट्या. 850 हून अधिक बालविवाह मोडल्याची नोंद त्यांच्या नावावर आहे.

        * प्रकाशबीबी कौर - भारतात जालंधरच्या प्रकाशबीबी कौर गेली 23 वर्षे ’नकोशी’ झाली म्हणून मातापित्यांनी रस्त्याच्या कडेला, मंदिरे किंवा गुरुद्वारांच्या पायर्‍यांवर टाकून दिलेली बालके, विशेषत: मुली सांभाळतात.

        * गुरमेहर कौर - गुरमेहर कौर या विद्यार्थिनीचं प्रकरण ताजं आहे; पण या सगळ्या प्रकरणात तिची निर्भयता वाखाणण्यासारखी आहे.

        * स्वाती चतुर्वेदी - ही तरुणी भारतीय जनता पक्षासाठी सहा वर्षे काम करत होती. तिने ‘आय एम अ ट्रोल’ नावाचं पुस्तक लिहिलंय. असंस्कृत भाषेत समाजमाध्यमांवर ट्विट करणार्‍यांना ‘ट्रोल’ म्हणतात. स्वातीही काही काळ या ट्विटर योद्ध्यांत सहभागी होती. या मोहिमेतली भयावहता लक्षात आल्यानंतर तिनं या ट्रोलना विरोध केला, म्हणून त्यांनी तिलाही शिकार बनवलं. तिला आलेले क्लेशकारक अनुभव तिनं आपल्या पुस्तकात सविस्तर आणि खुलेपणानं लिहिले आहेत.

        * भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) 104 उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्याच्या केलेल्या प्रयोगात 8 संशोधक स्त्रियांचा मोठा वाटा होता.

        * 1972 मध्ये एकात्मिक बालविकास प्रकल्पाची स्थापना झाली. या प्रकल्पात सगळ्या महिला कर्मचारी आहेत. अंगणवाडी काम करणार्‍या या महिलांनी आपल्या कामातून गावातलं कुपोषण, बालमृत्यू, गरोदर महिलांच्या मृत्यूचं प्रमाण कमी केलं. शाळांमधली गळती थांबवली. स्त्रियांमध्ये आरोग्यभान निर्माण केलं. शासनाच्या या एकमेव प्रतिनिधी गावात राहून प्रभावी काम करत आहेत.

        * देशात 1993 पासून स्थानिक स्वराज्य संस्थेत स्त्रियांना आरक्षण मिळालं.

        * स्त्रियांच्या चळवळीमुळं राजकीय पक्षांना दारूबंदीचा मुद्दा कार्यक्रमपत्रिकेत घ्यावा लागला आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत हाच प्रमुख मुद्दा ठरला होता. परिणामतः निवडणुकीनंतर नितीशकुमार सरकारला बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घ्यावा लागला. देशात इतरत्रही महिला दारूबंदीची चळवळ चालवत आहेत.

        * महाराष्ट्र सरकारची बलात्कार पीडितांना भरपाई देण्यासाठी ‘मनोधैर्य’ नावाची योजना आहे. निधीअभावी ही योजना कागदावरच राहिली आहे.बोरिवलीच्या एका 14 वर्षांच्या बलात्कारपीडित मुलीनं या योजनेअंतर्गत 3 लाख रुपये भरपाई मिळावी म्हणून अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेच्या सुनावणीत सरकारची भावनाशून्यता आणि निर्दयतेवर ताशेरे ओढले आहेत. बलात्कारपीडितेचे मनोबल वाढेल, असं वागण्याची समज न्यायमूर्तींनी सरकारला दिली.

        * स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांच्या विविध समित्या कार्यरत आहेत. स्त्रियांना त्यांचे कायदेशीर अधिकार मिळवून देणे, त्यांना त्यांच्या प्रमाणभूत गोष्टी मिळवून देणे व समाजात त्यांचे असे वेगळे स्थान निर्माण करणे, अशासारखी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ही संस्था अविरत झटत आहे. आज विविध सामाजिक संस्था स्त्रियांच्या प्रगतीसाठी व त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहेत. स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराशी लढा देत आहेत.

        * अनेक देशांतील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व समान संधी मिळत नाही. प्रत्यक्षातले हे चित्र फारच धक्कादायक असून, ते बदलण्यासाठी ठोस मार्ग शोधण्याची नितांत गरज आहे.

        * महिलांच्या हक्कांप्रति बांधीलकी दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. अनेक वर्षं समाजवादी आणि डाव्या विचारांच्या महिला संघटना हा दिवस ‘लढा दिवस’ म्हणून विविध मोर्चे आणि आंदोलनांच्या मार्गानं साजरा करतात. या चळवळीचा परिणाम म्हणून प्रशासन, माध्यम आणि विविध क्षेत्रांत आता महिला दिनाला मान्यता मिळाली आहे.

        * 1857 ते 2017 दरम्यान खूप मोठा प्रवास झाला आहे. सुरवातीला परिवर्तनाची गती मंद होती. भारतात महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजा राममोहन रॉय, गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, र. धों. कर्वे इत्यादी सुधारकांनी स्त्रियांची बाजू घेतली. त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.

        * महात्मा गांधी यांनी घर-संसाराशी जोडलेल्या स्त्रीला घराबाहेरच्या जगाशी जोडलं. स्वातंत्र्य आंदोलनात लक्षावधी स्त्रिया सहभागी झाल्या.

        * डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल आणि भारतीय राज्यघटनेच्या रूपानं स्त्री-पुरुष भेदभाव संपवण्याचा प्रयत्न केला. विविध धर्मांतल्या परंपरावादी आणि सनातनी शक्तींनी या परिवर्तनाला कायम विरोध केला.

        * डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर काही तासांतच अमेरिकेतल्या 600 शहरांमध्ये लक्षावधी स्त्रिया रस्त्यावर आल्या. वॉशिंग्टन शहर या आंदोलनाचं प्रमुख केंद्र होतं. वॉशिंग्टनच्या मोर्चात 5 लाख स्त्रिया एकजुटीनं आल्या होत्या. कॅनडा, मेक्सिको, जर्मनी आणि ब्रिटनमध्ये विविध शहरांमध्ये ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध मोर्चे निघाले. या आंदोलनातल्या सहभागी स्त्रिया राजकीयदृष्ट्या जागरूक आहेत. त्यांना राजकारणाची जाण आहे. स्त्रियांविषयी प्रतिगामी विचार करणारं नेतृत्व स्त्रियांसाठी आणि देशासाठी हानिकारक आहे, हे या स्त्रियांना समजलं आहे. अशी समज जगभरातील स्त्रियांमध्ये निर्माण होण्यासाठी या आंदोलनांनी दिशा दाखवलेली आहे.

        * निर्भया प्रकरणानंतर तत्कालीन केंद्र सरकारनं बलात्कारपीडित स्त्रियांसाठी 2014 साली ‘निर्भया फंड’ ची घोषणा केली. त्याप्रमाणं निधीही जमा झाला. 2015 पासून या निधीचं काम ठप्प झालं आहे.

        * 2017-18 च्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय महिला आयोगाच्या खर्चासाठी केवळ 25 कोटी, तर राष्ट्रीय महिला कोशासाठी केवळ 1 कोटी रुपयांची तरतूद आहे. महिला बालकल्याणावरची अर्थसंकल्पी तरतूद गेल्या दोन वर्षांत 60 टक्क्यांपेक्षा कमी झालेली आहे.

8 मार्चलाच महिला दिन का साजरा केला जातो?

           जगभरात 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता यादृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.
           1909 पर्यंत महिला दिन 28 फेब्रुवारीला साजरा केला जायचा. आंतरराष्ट्रीय महिला वस्त्रे निर्मिती कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर या दिवशी महिला दिन साजरा करण्यात आला होता.
ऑगस्ट 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते. याच परिषदेत जगभरात एक दिवस जागतिक महिला दिन साजरा केला जायला हवा, असे ठरविण्यात आले होते. पण तो दिवस त्यावेळी निश्‍चित केला नव्हता.
           1914 मध्ये पहिल्यांदा 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यादिवशी रविवार असल्यामुळे हा दिवस निवडण्यात आला होता. पण त्यानंतर 8 मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्याचा प्रघात पडला. महिला दिन हा कोणत्याही संघटनेचा म्हणून ओळखला जात नाही. तर जगभरातील वेगवेगळ्या देशांतील सरकारांकडून महिला दिन साजरा केला जातो. या निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. ज्यामध्ये व्याख्याने, परिसंवाद, रॅली यांचे आयोजन केले जाते. महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याच्यादृष्टीने महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.
         2016 मध्ये गूगलने गूगल डुडलच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्त्वाला सलाम केला होता. ‘मी विल विन’ या विचारावर आधारित डुडल गेल्या वर्षी 8 मार्च रोजी तयार करण्यात आले होते. 2016 साली जगभरात महिला दिन स्त्री-पुरुष समानतेला वाहण्यात आला होता. विविध सरकारांकडून त्याचबरोबर कॉर्पोरेट ऑफिसेसमधूनही या विचाराला प्रोत्साहन देण्यात आले होते.
महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचार्‍यांना सुटी देण्यात येते. तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचार्‍यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांनी मिळवलेल्या यशाचा, अतुलनिय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते. महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने काही मार्गदर्शक तत्त्वे, कार्यक्रम निश्रि्चत केले आहेत.

जेंडर बजेट (लिंगाधारित अर्थसंकल्प)

        दारिद्य्रनिर्मूलनाचे आव्हान पेलणे, शाश्‍वत विकासाकडे वाटचाल व चांगली शासनव्यवस्था निर्माण करणे या तीन महत्त्वाच्या गोष्टींसाठी समाजात लिंगभाव समानता असणे ही प्राथमिक गरज आहे - कोफी अन्नान (माजी सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रसंघ)
       स्त्री -पुरुष समताविचाराचे महत्त्व किती व्यापक आहे, याची नेमकी कल्पना या विधानावरून येते. जगात आज सर्व क्षेत्रांतील महिलांचे योगदान तत्त्वतः मान्य करण्यात आले आहे, परंतु कळीचा मुद्दा असतो तो संपूर्ण धोरण-निर्णयप्रक्रियेत महिलांना काय स्थान असते हा.  
       स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता शिक्षण व राजकीय प्रतिनिधित्व या बाबतीत भारताची स्थिती सुधारली असली, तरी आर्थिक स्तर व आरोग्य या क्षेत्रांत अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. या दोन्ही बाबतींत सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी हा त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणता येईल. अर्थसंकल्प सर्व नागरिकांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे परिणाम करत असतो, परंतु आजच्या काळाच्या संदर्भात त्याचे मूल्यमापन लिंगाधारित दृष्टिकोनातून होणे महत्त्वाचे. सरकारची ध्येयधोरणे व अर्थसंकल्पी बांधीलकी यात अभिप्रेत असणारा लिंगाधारित दृष्टिकोन हा ‘जेंडर बजेट’चा (लिंगाधारित अर्थसंकल्प) पाया आहे.
         अर्थसंकल्पामधील तरतुदींचा स्त्री-पुरुष यांच्यावर होणारा परिणाम, विकास योजनांचे फायदे व त्यातील समानता इ. विषय जाणून घेण्याचे प्रभावी माध्यम म्हणून विकसित झालेले हे एक साधन आहे.
          कोणताही अर्थसंकल्प हा उपलब्ध साधनसंपत्तीचे सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून समान वाटप करण्याचे उद्दिष्ट साध्य करत असतो. ही संसाधने व त्यांची मालकी यांच्या स्त्री-पुरुषांमधील वाटपात मुळातच असमानता असते व त्यामुळेच या अर्थसंकल्पाचे स्त्रिया व पुरुष यांच्यावर होणारे परिणामही असमान असण्याची शक्यता असते. हे परिणाम अभ्यासण्याचे प्रमुख साधन म्हणून लिंगाधारित अर्थसंकल्पाचा उगम झाला.
         ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या 2016 च्या स्त्री- पुरुष समानताविषयक निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक 144 देशांमध्ये 87 वा आहे. हा निर्देशांक आर्थिक स्तर, शिक्षण, आरोग्य व राजकीय प्रतिनिधित्व या चार निकषांच्या आधारे स्त्री-पुरुष समानतेची निश्‍चिती करतो.
         भारताचा क्रमांक 2015 वर्षाच्या तुलनेत (108 वरून 87 वर) सुधारला. शिक्षण व राजकीय प्रतिनिधित्व या बाबींवर हा क्रमांक वर गेला आहे, पण आर्थिक स्तर व आरोग्य या घटकांबाबत मात्र बराच पल्ला गाठायचा आहे.
         या दोन्ही बाबतींत सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. भारतात स्त्रिया व मुली त्यांच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक व सामाजिक असुरक्षितता झेलतात. यात शारीरिक शोषण, घरेलू हिंसा, हीन सामाजिक दर्जा, मोबदल्यातील असमानता, असंघटित क्षेत्रांतील स्त्रियांचे वाढते प्रमाण आदी घटक आहेत. या समस्यांना वाचा फोडणे व त्यानुसार पुढील धोरण निश्‍चित करणे, या भूमिकेतून लिंगाधारित अर्थसंकल्पाचा विचार समर्पक ठरतो.
         भारतात लिंगाधारित अर्थसंकल्पाची औपचारिक सुरवात 2001 पासून झाली. त्या वर्षीच्या अर्थसंकल्पी भाषणात याचा उल्लेख सापडतो.
         2004 मध्ये अर्थ मंत्रालयाच्या विशेष अभ्यासगटाने लिंगाधारित अर्थसंकल्प विभाग प्रत्येक मंत्रालयात/विभागात स्थापन करण्याची गरज स्पष्ट केली आणि नियोजन मंडळाच्या तत्कालीन सचिवांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून अर्थ मंत्रालयाने ‘खर्च’ विभागात लिंगाधारित अर्थसंकल्प अशी वेगळी टिप्पणी देण्यास सुरवात केली. त्याचे दोन भाग करण्यात आले -
विभाग अ : फक्त महिलांसाठीच्या योजना (100 टक्के महिलांसाठीच वाहिलेल्या)
विभाग ब : महिलाप्रणीत योजना (किमान 30 टक्के विभाजन तरी महिलांसाठी असलेल्या)
       2010 मध्ये अर्थमंत्रालयाच्या खर्च विभागाने ‘फलित अर्थसंकल्पाची’ संकल्पना पुढे आणली व त्यानुसार विकासाच्या वेगवेगळ्या योजनांतून महिलांना किती फळे मिळाली या संदर्भाने अर्थसंकल्पाचा विचार होऊ लागला.
        2013 पासून तर प्रत्येक राज्याच्या पातळीवर याचा विचार करणे गरजेचे झाले व त्यानुसार प्रत्येक राज्याने लिंगाधारित अर्थसंकल्पाच्या आधारे निश्‍चित दिशादर्शक धोरण ठरविणे बंधनकारक केले गेले.
         केंद्र सरकारच्या अखत्यारीतील 56 विभाग अशा लिंगाधारित अर्थसंकल्प विभागाची पूर्तता करीत आहेत.
         भारताच्या महिलाविषयक योजनांवर आणि प्रकल्पांवर लिंगाधारित अर्थसंकल्पाचा खर्च वाढून तो अर्थसंकल्पाच्या 18 टक्क्यांवर गेला आहे. एका वर्षात 96,331 कोटी (2016-17) वरून हा खर्च रुपये, 1,13,326 कोटीवर गेला आहे.
         ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, महिलांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा, महिला कामगारांच्या मजुरी संदर्भातील धोरणे अशा तरतुदी आणि यातही अनुसूचित जाती-जमातींच्या महिलांसाठी वेगळी तरतूद आहे.
          महिला योजनांवरील खर्चातही गेल्या 10 वर्षांत चारपटींनी वाढ झाली.
          अनेक महिलांना आजही त्यांचे हक्क व अधिकार यांची पुरेशी जाणीव नाही. त्यामुळे आपले हक्क डावलले जाताहेत याचे भान दिसत नाही. त्यामुळे मग या हक्कांसाठी लढणे व ते मिळविणे या गोष्टी दुरापास्त होतात. आजच्या समाजातील स्त्री, तिचे प्रश्‍न, तिचे समाजातील, अर्थव्यवस्थेतील स्थान या सगळ्यांची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येत आहे, ही कल्पनाच स्त्रियांना उभारी देणारी आहे. मात्र महिला सक्षमीकरण ही दुसर्‍याने करण्याची गोष्ट नसून, ती स्त्रीची अंतःप्रेरणा असायला हवी, हेही लक्षात घ्यायला हवे. भारतीय समाजातील एकूण स्त्रियांच्या सक्षमीकरणात लिंगाधारित अर्थसंकल्प हा मैलाचा दगड ठरावा.

परिवर्तनाची वाढलेली गती

        जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. घर, संसार, मुले अशा विविध जबाबदार्‍या पेलत त्या आपली क्षमता सिद्ध करत आहेत. शिक्षण, संशोधन, राजकारण, उद्योग आणि विविध कलांच्या क्षेत्रांत स्त्रियांनी मोलाची कामगिरी केली आहे.
        विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत असताना स्त्रियांना स्वतःशी आणि पुरुषप्रधान व्यवस्थेशी झगडावे लागले आहे. त्यातून त्या तावूनसुलाखून निघाल्या आहेत. स्त्रियांनी आपला अवकाश निर्माण केला आहे. त्यामुळे परिवर्तनाची गतीही वाढली आहे.
        स्त्री माणूस आहे. तिला पुरुषांच्या इतकेच अधिकार आणि स्वातंत्र्य आहे, अशी भूमिका जनमानसात रुजायला लागली आहे. स्त्री जीवन बदलले आहे. मुली आहेत म्हणून विषाद न मानता पालक मुलींना मुक्तपणे वाढवत आहेत. शिक्षण, नोकरीसाठी त्यांना घरापासून दूर पाठवायची तयारी दाखवत आहेत. अनेक कुटुंबांमध्ये मुलींसाठी आश्‍वासक वातावरण निर्माण झालेले आहे.
        फार चिवटपणे स्त्रिया जगण्याची धडपड करतात. परिस्थितीतून मार्ग काढतात, खेड्यापाड्यांत राहणार्‍या आणि कोणतेही आर्थिक, सामाजिक पाठबळ नसणार्‍या अनेक मुली जिद्दीने शिक्षण घेताना दिसतात. त्यांच्या यशाच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. या मुलींनी प्रशासनामध्ये आपली जागा निर्माण केली आहे. आपले आयुष्य बदलवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या स्त्रिया आपले घर तर बदलवतातच, पण समाज आणि देशातही त्या परिवर्तन करत आहेत. स्त्रियांची ही क्षमता फार मोठी आहे.
 अपेक्षांमध्ये बदल -

        स्त्रियांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. त्या स्वाभिमानाने जगू इच्छितात. कोणाची मुलगी, पत्नी, आई म्हणून ओळखले जाण्यापेक्षा स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. या मार्गात येणार्‍या जुन्या प्रथा, परंपरांना नाकारत आहेत. परिवर्तनशीलतेच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत.
        स्त्री नागरिक आहे, हा विचार स्त्रीवादी चळवळीने रुजवला. स्त्रीला पुरुषांइतकेच अधिकार मिळाले पाहिजेत, या विचारासाठी जगभर चळवळी झाल्या आणि होत आहेत. मतदानाच्या अधिकारासाठी झालेल्या चळवळींनी पुरुषकेंद्री राजकारणाचा चेहराच बदलवला. अर्थातच त्यासाठी स्त्रियांना आणि त्यांच्या समर्थक पुरुष मित्रांना प्रचंड संघर्ष करावा लागला.
आज कोणताही राजकीय विचार न करता सहजपणे धर्म, जात, नाते, पैसा, भेटवस्तू इत्यादींच्या आमिषाने आणि आधारावर मतदान करणार्‍या स्त्रियांनी हा इतिहास जाणून घेतला पाहिजे. अधिक सजगपणे आणि राजकीय विचार करून मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे.
जग बदलण्याची ताकद -

        आपले काम करत असतानाच जग बदलण्याची ताकद स्त्रियांमध्ये आहे. कष्टकरी समूहातल्या अनेक स्त्रिया जवळजवळ एकट्या घर चालवतात. त्यांना जोडीदाराची साथ नसते. मुले शिकावीत म्हणून त्या अपार कष्ट करतात. वास्तविक व्यसनी पतीच्या त्रासामुळे त्यांचे जगणे मुश्कील झालेले असते, परंतु सगळ्या त्रासातून बाहेर येत त्या दारूबंदीची चळवळ करत आहेत.
        1990 नंतर आलेल्या आर्थिक धोरणामुळे शेतीतली संकटे वाढली आहेत. सगळ्या बाजूंनी नाडल्या गेलेल्या शेतकर्‍यांचे जगणे अवघड झाले आहे. देशात शेतकर्‍यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी पुरुष आत्महत्या करतात, पण शेतकरी स्त्रिया मात्र सर्व संकटांना झेलत चिवटपणे शेतीत उभ्या राहून जबाबदारी निभावत आहेत. आज देशातली शेती आणि शेतीव्यवस्था वाचवण्यात स्त्रियांचा वाटा फार मोठा आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून शेतीत होणार्‍या प्रयोगांमध्ये स्त्रिया उत्साहाने सहभागी होताना दिसतात.
राजकीय आरक्षणामुळे बळ -

        देशात 1993 पासून स्थानिक स्वराज्य संस्थेत स्त्रियांना आरक्षण मिळाले. राजकीय आणि सामाजिक परिवर्तनासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट घडली. लक्षावधी स्त्रियांना सत्तेची दारे खुली झाली. या प्रवासात प्रस्थापित राजकीय कुटुंबातल्या स्त्रियांना सत्तेत येण्याची संधी मिळाली, तशीच सर्वसामान्य कुटुंबातल्या स्त्रियांनाही मिळाली. अनेक स्त्रियांनी आपले गाव, शहर बदलवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम गावोगावी दिसतो आहे. आपले काम करताना त्यांना पुरुषप्रधान राजकारणाशी आणि प्रशासनाशी कडवी झुंज द्यावी लागते.
        औद्योगिक क्रांतीने स्त्रीचे आयुष्य बदलले. सुरवातीला उद्योगासाठी आवश्यक श्रम म्हणून स्त्रियांच्या कामाकडे पाहिले गेलं. कुटुंबाची गरज भागावी म्हणून छोटी-मोठी कामे करणार्‍या स्त्रियांकडे ‘पिठाला मिठाची मदत’ म्हणून पाहिले जात होते. हळूहळू हा दृष्टिकोन बदलला. आज अनेक स्त्रिया कुटुंबाच्या प्रमुख मिळवत्या झाल्या आहेत. पीठ आणि मीठही त्याच मिळवत आहेत. अर्थात त्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागत आहे.
सुरक्षिततेचा प्रश्‍न -

        स्त्री बदलली त्या प्रमाणात पुरुष बदलला नाही, हे वास्तव आहे. कट्टर पुरुषप्रधान मानसिकता सतत डोके वर काढत असते. आपल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेवर पुरुषप्रधानतेचा पगडा आहे. ही मानसिकता स्त्रियांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असते. फार कौशल्याने आणि संयमाने स्त्रिया या व्यवस्थेला टक्कर देत आहेत. स्त्रियांची बरीच ऊर्जा त्यात खर्च होते.
        स्त्रियांचा सार्वजनिक जीवनातला वावर वाढला आहे. त्यांचे जीवन गतिमान बनले आहे. स्त्रियांना कामासाठी वेळी-अवेळी घराबाहेर पडावे लागते. घराबाहेर राहावे लागते. अशा वेळी त्यांना सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकार आणि विविध सामाजिक संस्थांवर आहे, परंतु दिल्लीतले निर्भया प्रकरण, 31 डिसेंबर 2016 ची बंगळूरची घटना, महानगरांमध्ये एकट्या स्त्रीवर होणार्‍या हिंसक हल्ल्यांच्या घटना, खैरलांजी व कोपर्डीमधल्या अत्याचारा सारख्या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
        नवआधुनिक व्यवस्थेतल्या भौतिक साधनांचा स्वीकार सगळीकडे होतो आहे, परंतु या व्यवस्थेतली आवश्र्यक नवमूल्यव्यवस्था स्वीकारण्याची मानसिकता अद्याप तयार झालेली नाही. उलट मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर स्त्रीला लज्जित करण्यासाठी आणि तिच्या देह-मनाची विटंबना करण्यासाठी होतो आहे. एक नवी गुन्हेगारी वाढत आहे. मुलींचे नकळत फोटो घेणे, लॉजमध्ये गुप्त कॅमेरे बसवून चित्रफिती तयार करणे, ब्लॅकमेलिंगसाठी या माध्यमांचा वापर करणे अशा घटनांच्या संख्येत भर पडते आहे. आपले भविष्य उभे करण्यासाठी धडपडणार्‍या या मुलींना या भयावह वास्तवाचा सामना करावा लागत आहे. या मुली कोणी बाहेरच्या नाहीत, त्या तुमच्या-आमच्या घरातीलच आहेत. मुलींच्या असुरक्षिततेचा प्रश्‍न आपल्या प्रत्येकाच्या घरात येऊ घातला आहे. गाफील राहून चालणार नाही. मुलींनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे.
        नाट्य, चित्रपट, प्रसारमाध्यम या क्षेत्रांत काम करणार्‍या स्त्रियांपुढे वेगवेगळी आव्हाने सतत असतात. त्या स्त्री आहेत म्हणून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सतत होतो.
        स्त्रीच्या लैंगिक शोषणाच्या आणि अत्याचारांच्या विरोधात स्त्री चळवळीने सतत केलेल्या आंदोलनामुळे कायदे बदलले आहेत. एक आश्‍वासक वातावरण तयार झाले आहे. आपल्यावर होणार्‍या कौटुंबिक छळाविरोधात आणि लैंगिक अत्याचाराविरुद्ध स्त्रिया तक्रारी नोंदवत आहेत. पूर्वी अशा तक्रार करणार्‍या स्त्रियांकडे उपेक्षेने पाहिले जात होते. आता ही उपेक्षा कमी झाली आहे.
        1975 नंतर देशात झालेल्या स्त्री चळवळीने अनेक कायदे बदलवले. महिला आयोग, महिला धोरण, ‘जेंडर बजेट’सारख्या कल्पना सरकारला स्वीकारायला लावल्या. महिलांसाठी विविध योजना निर्माण झाल्या. अनेक महिलांना त्याचा लाभही मिळाला, परंतु गेल्या 2 वर्षांमधले केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण या योजनांच्या विरोधी आहे.
        केंद्र व राज्य सरकारच्या संवेदनशून्यतेमुळे सरकारविषयी स्त्रियांच्या मनात आधार निर्माण होऊ शकत नाही, हे वास्तव नजरेआड करता येणार नाही.
        भारतीय राज्यघटनेनं स्त्री-पुरुष समतेचा विचार स्वीकारला आहे. त्याचे फायदे स्त्रियांना मिळत आहेत. विषमतेच्या अनुभवाच्या विरोधात त्या न्यायालयात आणि चळवळीकडं धाव घेत आहेत.
        स्त्रियांसाठी सकारात्मक पार्श्‍वभूमी तयार होत असताना काही मंडळींच्या असहिष्णू वर्तनामुळे स्त्रियांना मिळालेल्या घटनात्मक हक्कांच्या रक्षणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.
        बलात्काराची, छेडछाडीची, बदनामीची धमकी देऊन स्त्रीला गप्प बसवण्याची परंपरा जुनीच आहे. याच परंपरेने संत मीराबाई, संत जनाबाईंना त्रास दिला. हीच परंपरा कधी तालिबान्यांच्या नावाने मुलींना शाळेत जायला रोखते, बुरख्याची सक्ती करते, मुलींना घरातच डांबते, तर कधी श्रीराम सेनेच्या नावाने ‘व्हॅलेंटाइन डे’ला विरोध करते. ‘लव्ह जिहाद’ म्हणत विविध धर्मांमध्ये द्वेष पसरवते. धर्माच्या नावाने उभ्या राहिलेल्या अनेक संघटना स्त्री-स्वातंत्र्याची गळचेपी करत आहेत. स्त्री-पुरुष समतेच्या चळवळींपुढे, व्यक्तिस्वातंत्र्याच्या भूमिकेपुढे आणि भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आज ‘धर्म, संकुचित राष्ट्रवाद आणि युद्धखोरीने’ एक भयानक आव्हान उभं केलं आहे.
        हा केवळ आपल्या देशापुरता प्रश्‍न नाही, जगभरच अशा शक्तींचे आव्हान उभे राहिले आहे. अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक अनेक कारणांनी गाजली. या निवडणुकीत विजयी झालेले डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचाराची उद्दाम भाषणे, स्त्रियांच्या विरोधातल्या वक्तव्यांमुळे त्यांच्या विरोधातलं वातावरणही तयार होत होते. स्त्रियांसंबंधित विकृत शेरेबाजी, स्त्रियांशी अपमानास्पद वर्तनामुळं प्रचाराच्या काळातच त्यांच्या विरोधातल्या अनेक तक्रारी पुढे आल्या. आपल्या भाषणांमधून त्यांनी स्त्रियांच्या हक्कांची खिल्ली उडवली. अमेरिका स्त्री-स्वातंत्र्याच्या चळवळीचे केंद्र राहिली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या स्त्रीविरोधी बोलण्याला तिथे विरोध होतच होता. या विरोधाने संघटित स्वरूप धारण केले आहे.
        आज भारतीय स्त्रियांपुढे जातीयवादी शक्तींच्या असहिष्णुतेमुळं कलुषित होणारं सामाजिक वातावरण हा गंभीर प्रश्‍न आहे. स्त्रियांनी हा धोका ओळखायला हवा. नाही तर या शक्ती जगभरातल्या परिवर्तनवादी चळवळी, स्वातंत्र्य आंदोलन, भारतीय राज्यघटना यांतून निर्माण झालेल्या स्त्री अधिकारांना नष्ट करण्याचा धोका आहे.

अमेरिकेचा प्रवेशबंदीचा नवा आदेश

       5 मार्च 2017 रोजी प्रवेशबंदीबाबतच्या नव्या आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. त्यावेळी बंदी घालण्यात आलेल्या देशांच्या यादीतून इराकला वगळण्यात आले.
*    येमेन, सीरिया, इराण, सुदान, लीबिया आणि सोमालिया या मुस्लीम देशांतील नागरिकांना 90 दिवसांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आली. या 6 देशांतील नागरिकांनी पुढील 90 दिवसांत अमेरिकेत प्रवेशासाठी व्हिसा देण्यात येणार नाही.
*    ट्रम्प यांनी यापूर्वी सात देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. न्यायालयानेही ट्रम्प यांच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर ट्रम्प प्रशासनाकडून नव्याने अध्यादेश काढण्यात आला.

डॉ. साळुंखे, सचिन पिळगावकर यांना दमाणी पुरस्कार

        सोलापूर येथील दमाणी-पटेल प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा कर्मयोगी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे व चित्रपट अभिनेता-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांना जाहीर झाला आहे. 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
        माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते 14 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता पुरस्कारांचे वितरण होईल. मराठी साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल डॉ. साळुंखे यांचा, तर कला क्षेत्रात 50 हून अधिक वर्षे दिलेल्या योगदानाबद्दल पिळगावकर यांचा सन्मान करण्यात येत आहे. डॉ. साळुंखे यांनी मराठी विश्‍वकोशात धर्मशास्त्र, संस्कृत या विषयांत 100 हून अधिक लेख लिहिले आहेत. पिळगावकर कलाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांतही त्यांनी उल्लेखनीय भूमिका करीत स्वतःचे स्थान निर्माण केले.

विको लॅबोरेटरीज ‘कल्ट ब्रँड’ने सन्मानित

       बीबीसी नॉलेज प्रस्तुत आणि आशिया सी.एम.ओ.द्वारा शिक्कामोर्तब केलेल्या ‘द ग्रेटेस्ट मार्केटिंग इन्फ्लुएन्सर 2016’करिता विको लॅबोरेटरीजची निवड केली.
       15 फेब्रुवारी रोजी वांद्रे येथील ताज लॅण्ड्स एण्ड येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला. ग्राहकांची उत्पादनासह सेवेप्रति असलेली वचनबद्धता म्हणजे ‘कल्ट ब्रँड’ची ओळख आहे.
       या कल्ट ब्रँडची विक्री ही उत्पादनांपेक्षा ग्राहकांच्या एकनिष्ठतेवर आधारित असते. कल्ट ब्रँड हा असा ब्रँड आहे, ज्याचा निष्ठावंत ग्राहक हाच खरा आधार असतो.
* विको लॅबोरेटरीजचे संचालक - संजीव पेंढरकर

जगातील सर्वोत्तम विमानतळ हैदराबाद

       एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलतर्फे (एसीआय) दरवर्षी जगभरातील सर्वोत्तम विमानतळांची निवड केली जाते. विमानतळावर मिळणार्‍या सुविधेच्या (एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी -एएसआय) आधारे ही निवड केली जाते. यात विमान तळावरील प्रवाशांच्या संख्येच्या आधारे विमानतळांची विभागणी केली जाते.
*    वर्षाला 50 लाख ते 1.50 कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात हैदराबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय विमातळाने 2016 मधील जगातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत पहिले स्थान पटकावले. हैदराबामधील विमानतळाला यंदा 9 वर्षे पूर्ण झाली. 2016 मध्ये प्रवाशांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाली.
*    वर्षाला 4 कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमान तळाच्या श्रेणीत दिल्लीतील दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील सर्वोत्तम विमान तळांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले.
*    दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे सीईओ प्रभाकर राव.
*    जीएमआर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ एसजीके किशोर.

फ्रान्सची निवडणूक

          फ्रान्समध्ये एप्रिल 2017 मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यापाठोपाठ जर्मनीत निवडणुका होणार आहेत. ब्रिटनमधले सार्वमत आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीनंतरची ही निवडणूकसुद्धा महत्त्वाची असणार आहे. पुढच्या काळात जगाची वाटचालीची दिशा या निवडणुकीने समजू शकेल. युरोपियन युनियनपासून अलग होण्याचा पुरस्कार करणारे ब्रेक्झिट असो, की अमेरिका फर्स्ट आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन हा नारा देत राष्ट्राध्यक्ष झालेले ट्रम्प असोत, या दोन्ही निवडणुकांनी जग अधिकाधिक जागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर एक प्रकारचा संकुचित आणि स्वयंकेंद्रित विचारप्रणाली जगभरात अधिक प्रभावी होते आहे हे दाखवून आहे. एका बाजूने इसिसच्या रूपाने अतिरेकी दहशतवाद्यांचे वाढते संकट आणि दुसर्‍या बाजूने उद्योग आणि व्यापारातली जागतिक स्तरावरची मंदी यामध्ये सापडलेल्या जगासाठी या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. या दोन्ही निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागलेले आहे.

         फ्रान्समधल्या निवडणुका एप्रिल महिन्यात आहेत. त्यावर विविध प्रसारमाध्यमांमधून बरीच चर्चा होते आहे. इसिसशी मुकाबला करण्यात फ्रान्स आघाडीवर आहे. त्याची जबर किंमतदेखील त्याने चुकवलेली आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर लगेचच फ्रान्समधल्या उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंटच्या नेत्या मरिन ली पेन यांनी आपणच पुढील अध्यक्ष होणार असे घोषित केले होते. त्यांचा स्थलांतरितांना, युरोपियन युनियन, तसेच इसिसला असलेला विरोध सध्या त्यांच्या पक्षाला फायदेशीर ठरतो आहे. तसं घडल्यास फ्रान्सही नव्या वळणावर येऊन उभा राहणार आहे. ट्रम्प यांच्या निवडणुकीत रशियाने ढवळाढवळ केली होती, असा आरोप होतो आहे आणि त्याची रितसर चौकशीदेखील केली जाते आहे. रशिया फ्रान्सच्या निवडणुकीतदेखील हस्तक्षेप करतो आहे, असा आरोप व्हायला लागलेला आहे. स्काय न्यूजच्या संकेतस्थळावर त्याबद्दलचे मार्क स्टोन यांचे वार्तापत्र वाचायला मिळते आहे. आपल्या विरोधात टीकेचा भडिमार होणे, खोट्यानाट्या बातम्या दिल्या जाणे आणि हॅकिंगच्या द्वारे आपल्या प्रचारात हस्तक्षेप केला जाणे यासारख्या प्रकारांच्या पाठीमागे रशिया असल्याचा आरोप इमानोल मारक्वाँ यांनी केलेला आहे.

         मारक्वाँ हे सध्या या निवडणुकीत आघाडीवर आहेत हे लक्षात घेतले आणि अमेरिकेत जे झाले त्याच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर या आरोपांमधले गांभीर्य कुणाच्याही लक्षात येईल. रशिया टुडे आणि स्पुटनिक न्यूजवर त्यांनी स्पष्टपणाने आरोप केलेले आहेत. ली पेन यांना पुतीन यांचे अप्रत्यक्ष सहाय्य मिळते आहे, असा आरोप केला जातो आहे. म्हणजे फ्रान्समध्येदेखील अमेरिकन निवडणुकांची पुनरावृत्तीच होण्याची शक्यता नजरेआड करता येणार नाही. डेली एक्स्प्रेसमध्ये ली पेन यांनी पुतीन यांची तरफदारी करीत त्यांची बाजू उचलून धरल्याची बातमी प्रकाशित झाली आहे. जुन्या काळातल्या शीतयुद्धाची मानसिकता अजूनही युरोप बाळगतो आहे असे मत त्यांनी व्यक्त केलेले आहे. एकूणच ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्या भूमिका ली पेन आणि इमानोल मारक्वाँ यांनी स्वत:कडे घेतलेल्या आहेत असे दिसते आहे. जागतिकीकरणाचा अपेक्षित लाभ पदरी पडलेला नाही, त्यामुळे आपल्या देशात बाहेरून लोक येत आहेत आणि त्यांच्यामुळे देशांतर्गत बेकारी वाढते आहे असा समज अनेक प्रगत देशांमध्ये पहायला मिळतो आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी जागतिकीकरणाच्या विरोधातली भूमिका घेतली जाते आहे. फ्रान्सदेखील त्याला अपवाद नाही. मोंद या फ्रेंच वृत्तपत्रात मारी चार्रेल यांचा लेख प्रकाशित झालेला आहे.

         लोकप्रियतेसाठी दिली जाणारी आश्‍वासने कितपत खरी आहेत या विषयावरच्या या लेखात ली पेन यांच्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत अनेक देशांमधल्या अशा लोकानुरंजन करणार्‍या नेत्यांच्या आर्थिक धोरणांचा आढावा घेत लोकांमध्ये असलेल्या धास्तीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न असे लोकानुनय करणारे नेते करीत असतात, असे त्यांनी सांगितलेले आहे. या विषयावर दि इकॉनॉमिस्टने फ्रान्समधली पुढली राज्यक्रांती : युरोपियन युनियनच्या मुलावर येऊ शकणार्‍या निवडणुका हा अग्रलेख लिहिलेला आहे. फ्रान्समधल्या निवडणुका केवळ त्या देशासाठी महत्त्वाच्या नाहीत तर त्याचा परिणाम फ्रान्सच्या बाहेरदेखील जाणवणार आहे असे सांगत त्यात जागतिक परिस्थितीच्या संदर्भात या निवडणुकांबद्दल चर्चा केलेली आहे. यावेळच्या निवडणुकांमध्ये सोशालिस्ट आणि रिपब्लिकन हे नेहमीचे पक्ष खूपच मागे पडलेले आहेत, असे सांगत खरी लढत नॅशनल फ्रंटच्या ली पेन आणि एन मार्च या अगदी नव्याने स्थापन झालेल्या गटाचे इमानोल मारक्वाँ यांच्यातच होणार असल्याचे इकॉनॉमिस्ट सांगतो आहे.

         डावे आणि उजवे या दोन पारंपरिक विचारप्रवाहांऐवजी खुले आणि बंदिस्त अशा दोन विचारसरणींचा संघर्ष यावेळी होणार असल्याचे त्याने भाकीत केलेले आहे. साहजिकच या निवडणुकांचा जो काही निकाल लागेल त्याचा परिणाम फ्रान्समध्ये जितका जाणवेल त्यापेक्षाही तो फ्रान्सच्या बाहेर जाणवेल, असेही त्याने नमूद केलेले आहे. सध्याचे राजकीय नेते आणि त्यांच्या राजकारणाची ठरावीक पठडी बिनकामाची ठरलेली आहे आणि त्यावरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष आणि चीड आहे हे नमूद करून इकॉनॉमिस्टने पुढे म्हटले आहे की, जगातल्या सर्वात असंतुष्ट लोकांमध्ये फ्रान्सच्या जनतेचा समावेश होतो आहे असे एका सर्वेक्षणानुसार दिसलेले आहे. तिथे जवळपास 81 टक्के लोक असमाधानी आहेत. फ्रान्सची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. देशात इस्लामी घुसखोर आणि अतिरेक्यांनी असुरक्षेचे वातावरण निर्माण केलेले आहे. या परिस्थितीमध्ये लोकांना दिलासा वाटेल अशा पद्धतीचा प्रचार ली पेन आणि मारक्वाँ हे करीत आहेत. त्यामुळे निवडणुका हळूहळू त्यांच्यामध्ये सीमित होत आहेत. तिसरे उमेदवार फ्रान्स्वा फियाँ हे सध्या स्वत:च्या समोरच्या कायदेशीर प्रकरणांमध्ये गुरफटत चाललेले आहेत. निवडणुकांमधून माघार घेण्याची सूचना जर त्यांनी स्वीकारलेली नसली तरी ते मागे पडत आहेत हे नक्की.

       ली पेन यांची भूमिका युरोपियन युनियनच्या विरोधातली आहे. युरोपियन युनियनमुळे फ्रान्सला आपले सार्वभौमत्व गमवावे लागते, आपल्या स्वत:च्या हिताचा बळी देऊन इतर देशांसाठी फायद्याची ठरणारी धोरणे राबवावी लागतात, त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो आहे, जागतिकीकरणाचा कोणताही लाभ फ्रान्सला होत नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तर मारक्वाँ यांची भूमिका त्याच्या अगदी उलटी आहे. सध्या तरी ली पेन काहीशा पिछाडीवर गेल्याचे दिसते आहे. ते काहीही असले तरी इतिहासातल्या फ्रेंच राज्यक्रांतीप्रमाणेच यावेळच्या राज्यक्रांतीचेदेखील जगावर खूप दूरगामी परिणाम होतील, अशी भविष्यवाणी इकॉनॉमिस्टने वर्तवलेली आहे ती योग्यच आहे.

मुंबई महानगरपालिका

          मुंबई महानगरी प्रदेशापुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते आधुनिक नागरी, द्रष्टे आणि भविष्यवेधी नेतृत्व नसण्याचे. प्रत्येक राजकीय पक्ष हा केवळ स्थानिक, जातीय, वर्गीय किंवा धार्मिक मर्यादा असणार्‍या नेत्यांच्या आदेशाने चालतो. स्वतंत्र बुद्धी आणि वृत्ती, तसेच मुंबई प्रदेशाचे जागतिक महत्त्व जाणणार्‍या नेत्यांचा दुष्काळ फार तीव्र आहे.
         मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, येथे जागतिक कीर्तीचे असंख्य अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, बुद्धिमान आणि प्रामाणिक विकास करणारे लोक असूनही त्यांना राजकारणात स्थान देण्याची वृत्ती एकाही राजकीय पक्षात नाही. ही उणीव दूर झाल्याशिवाय मुंबई महानगर जागतिक स्थान मिळवू शकणार नाही आणि महाराष्ट्रालाही दारिद्य्र, दुष्काळापासून वाचवू शकणार नाही. मुंबई प्रदेश हे महाराष्ट्राचे हृदय आहे तसेच मेंदू व मज्जासंस्था आहे. आज हे अवयव दुर्बल झाले आहेत. त्यांना बळकटी देणारे राजकीय नेतृत्व असणारा एकही राजकीय कुशल नेता मुंबईत नाही हे या महाराष्ट्राचे मोठे दुर्दैव आहे
* निर्णायक लोकसहभाग -
          2009 मध्ये काँग्रेस सरकारने क्षेत्र सभा याची तरतूद महापालिका कायद्यात केली. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्राच्या स्तरावर मतदारांची मते जाणून त्यावर अंमल होणे अपेक्षित होते. पण त्याची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. विशेष म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी क्षेत्र सभेचा हट्ट धरला होता. मात्र त्यांना आता याचा विसर पडला आहे. महापालिकेच्या प्रभाग समित्यांमध्ये नगरसेवकांबरोबरच समाजसेवी संस्थांचे दोन प्रतिनिधी असावे असा नियम आहे. मात्र त्याचेही राजकीयकरण करण्यात आले आहे. विकास आराखड्यात स्थानिक विकास योजनांची तरतूद असेल तरच लोक सहभाग शक्य होईल.
* तिसरे सरकार म्हणून मान्यता मिळावी -
          पायाभूत सुविधांच्या नावाखाली मोठमोठे देखावे करण्यापेक्षा मानवी विकास निर्देशांक यावर विकासाचे गणित मोजले गेले पाहिजे. याचे निकष ठरवून प्रत्येक विभागाचा अभ्यास करून त्यावर आधारित विकासाची योजना तयार करावी. मात्र त्याचे प्रत्येक 2 वर्षांनी मूल्यमापन केले जावे. लोकांनाही त्यात सहभाग घेऊन बर्‍याच गोष्टी सुचवता येतील. मुंबईचा विकास म्हणजे मुंबईकरांचा विकास अशी गफलत केली जाते. या विकासाची घोषणाबाजी करून मुंबईकरांना मूर्ख बनवले जाते. मुंबईचा विकास म्हणजे येथील जमिनींचा विकास असा त्याचा अर्थ होतो. मुंबईकरांचा विकास म्हणजे माणसांच्या विकासासाठी जमिनींचा विकास असे अभिप्रेत आहे. 74 दुरुस्तीनुसार महापालिकांना तिसरे सरकार म्हणून त्यांना जशी जबाबदारी दिली तशी वागणूकही मिळावी. महापालिकेकडे मुख्य भूमिका राहिल्यास मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी समन्वय साधणे सोपे होईल.
* कामाचे मूल्यांकन व्हावे -
         1992 पासून पारदर्शक, जबाबदार आणि प्रभावी प्रशासनाची मागणी होत आहे. पण अभियंते घोटाळ्यात अडकले, की युनियन धावून येते. प्रत्येक माणसाच्या कामाचे मूल्यांकन महापालिकेत होत नाही. वार्षिक नियोजन आणि नियमित मूल्यांकन झाल्यास पाणी कुठे मुरतेय हे कळेल. दुसरे म्हणजे संसद, अधिवेशनाचे कामकाज जनतेला पाहता येते. पण महापालिकेच्या कामकाजाचे साधे इतिवृत्तातही मिळत नाहीत. हे कामकाज सार्वजनिक असूनही जनतेला त्यात स्थान नाही. सभागृहातील चर्चा जनतेला कळत नाही. हा कारभार लाइव्ह केल्यास पारदर्शकता येईल. महापालिकेचे संकेतस्थळ चकाचक आहे, परंतु त्यात पारदर्शकता नाही. कार्यादेश निघाल्यानंतर त्याची माहिती, संकेतस्थळावर टाकावी.
* फेरीवाला धोरणाचे काय?
           महापालिकेत 126 महिला निवडून आल्या आहेत. शहराच्या विकासातील महिलांचे योगदान मान्य करून त्यांना विकास प्रक्रि येत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न व्हावे. यासाठी त्यांना रोजगार अभिमुख प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. पण प्रशिक्षणाच्या नावाखाली आपल्याकडे मेणबत्ती बनवणे अशा प्रकारचे प्रशिक्षण मिळते. बँकिंग क्षेत्रात आता संधी आहे, अशी अनेक क्षेत्रे आहेत त्यांचा विचार करून प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. फेरीवाले हे स्वयंरोजगार मिळवत असताना त्यांना बेकायदा ठरवले जाते. राष्ट्रीय फेरीवाला धोरणावर अंमल होत नाही.
* झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत अनेकांचे बळी -
            आदिवासी, गावठाण, कोळीवाडे यांच्यासाठी अनेक घोषणा होतात, पण करत कोणी नाही. 2012 पासून त्यांचे सीमांकन झालेले नाही. ते तातडीने करणे अपेक्षित आहे. सीमांकनाच्या प्रतीक्षेत असलेल्या सायन कोळीवाड्याला झोपडपट्टी केले. कोळीवाडे-गावठाण यासाठी विशेष विकास नियंत्रण आराखडा असावा. दहा लाख घरे हेदेखील थोतांडच आहे. खरे तर याची गरज पण नाही. लोकांना आहे त्या ठिकाणी मूलभूत सुविधा द्या. त्यांना पोटमाळा वाढवण्याची परवानगी द्या. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत अनेकांचे बळी गेले, म्हाडाच्या माध्यमातून बांधकाम व त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी.
* कारभार पारदर्शी हवा -
           प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष आपला अजेंडा जाहीर करतात. पण ज्यांच्यासाठी हा जाहीरनामा तयार होतो त्यांचे मत कधी विचारात घेतले जात नाही. या वेळेस पहिल्यांदाच जनतेनेही आपल्याला काय अपेक्षित आहे हे त्यांच्या जाहीरनाम्यातून मांडले. महापालिकेचा कारभार पारदर्शी, दर्जेदार आणि प्रभावी करताना या मुद्द्यांवर धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे.
           गलिच्छ, अनधिकृत, अपात्र, परप्रांतीय, अतिक्र मण, गुन्हेगार, विकासातील अडथळे असे गरीब वस्तीतील सर्वसामान्यांसाठी वापरण्यात येणारे हे शासकीय शब्द काढून टाकण्यात यावे. मतदारराजा म्हणून महिनाभर ज्यांच्या पाया पडलात त्यांना किमान भारतीय नागरिक म्हणून स्वीकारावे. जेणेकरून त्यांना बेकायदा ठरवून मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही.
            मुंबई पोर्ट ट्रस्ट असो किंवा समुद्रकिनार्‍यालगतची वस्ती, सर्वांना दर्जेदार सेवा-सुविधा मिळण्यात अडथळा येणार नाही. अटींचा बाजार बाजूला करून आरोग्य, शिक्षण, मोकळ्या जागा समान व दर्जेदार उपलब्ध होणे अपेक्षित आहे. केवळ शहरात नव्हे तर उपनगरातही आरोग्य सेवेची व्याप्ती वाढावी, मराठी शाळांचा दर्जा उंचवावा, शिक्षण हक्क कायद्यावर अंमल करीत आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करावे, खेळाचे मैदान, वाचनालयाची सोय असावी.

मुंबई नगरी

        1947 सालची मुंबई आज मला आठवते आहे. तेव्हाचा बॉम्बे इलाखा ब्रिटिश वसाहतीचा, आर्थिक दृष्टीने सर्वात महत्त्वाचा विभाग होता. त्यामध्ये कोकण, नाशिक, खान्देश, पुण्याचा समावेश होता. तसेच अहमदाबाद, आनंद, भडोच, गांधीनगर, खेडा, पंचमहाल आणि सुरत या गुजरातमधील जिल्ह्यांचा, तर उत्तर कर्नाटकातील बागलकोट, बेळगाव, विजापूर, धारवाड, गदग हवेली जिल्ह्यांचा आणि पाकिस्तानमधील सिंध प्रदेशाचाही समावेश होता. आजच्या येमेन या देशातील एडनची वसाहत त्यात समाविष्ट होती. या विशाल इलाख्याची राजधानी असलेल्या मुंबईचे स्वरूपच मुळी जागतिक होते. बंगाल, मद्रास आणि मुंबई इलाख्यात ब्रिटिश वसाहतीच्या साम्राज्याचे प्राण सामावलेले होते.
        70 वर्षांपूर्वी मुंबई इलाख्यातून सिंध प्रदेश बाद झाला. 1960 साली गुजरात आणि उत्तर कर्नाटकातील जिल्हे इलाख्यातून बाद झाले. मात्र मध्य इलाख्यातील विदर्भ आणि निजामाच्या हैदराबादमधील मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाले. मुंबईसह महाराष्ट्राच्या मराठी लोकांनी पाहिलेले भौगोलिक-राजकीय स्वप्न पुरे झाले. मात्र त्याचवेळी मुंबईचा अर्थ-राजकीय प्रवास जागतिकतेकडून स्थानिकतेकडे सुरू झाला. 1951 साली मुंबई महापालिकेचा विस्तार सात लहान बेटांना जोडलेल्या 75 चौ.कि.मी क्षेत्रफळापुरता मर्यादित न राहता ठाणे जिल्ह्यातील भाग आणि लोकसंख्या जोडून घेत सुमारे 465 चौ. कि.मी. झाला.
        गेली 25 वर्षे स्थानिकांची मराठी अस्मिता जपणारी शिवसेना मुंबई महानगरावर राज्य करीत राहिली. 1961 साली या मुंबईची लोकसंख्या होती केवळ (41,52,056) साडे एकेचाळीस लाख. आज आहे सुमारे एक कोटी. मुंबई महापालिकेची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जबाबदारी खूप वाढली असली तरी प्रत्यक्षात प्रशासन क्षमता मात्र ढासळत गेली आहे. शरीर वाढले पण बौद्धिक वाढ न झाल्याचेच हे लक्षण समजायला हवे. शिवाय आजची मुंबई केवळ महानगराच्या मर्यादेत राहिलेली नाही तर तिची पाळेमुळे मुंबई नागरी प्रदेशात विस्तारली आहेत आणि या विस्तारित प्रदेशाचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे मुंबईच्या दहापट, सुमारे 4355 चौ.कि.मी. आहे. त्यात 9 महापालिका आणि 9 नगरपालिका आणि सुमारे 900 खेडी आहेत. हा महानगरी प्रदेश आहे आणि मुंबई हे या प्रदेशाचे केंद्र आहे. तेच महानगरी प्रदेशाचे हृदय आहे आणि मेंदूही आहे.

        संपूर्ण प्रदेशावर नियंत्रण करणार्‍या मुंबई महानगरपालिकेची नागरी जबाबदारी आता केवळ मुंबई पालिकेपुरती मर्यादित राहिलेली नाही. मुंबई प्रदेश केवळ महाराष्ट्राचा नसून देशाच्या भवितव्याचा आणि अर्थकारणाचाही तो केंद्रबिंदू आहे.
दुर्दैवाने केवळ मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महापालिका, नगरपालिका आणि येथील बहुसंख्य नागरिकांची मनोवृत्ती मात्र संकुचित होत गेली आहे. भाषा, समूह, जात, धर्म किंवा वैयक्तिक संकुचित मर्यादेतच प्रत्येक राजकीय पक्षाची अस्मिता बंदिस्त झाली आहे. 1947 पूर्वीची जागतिक, बहुभाषिक, बहु-सांस्कृतिक आणि धगधगते आर्थिक हृदय, उद्योजकता आणि मनोवृत्ती असलेली मुंबईकरांची मने आणि बुद्धी संकुचित होत गेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे महत्त्व आज देशाच्या पातळीवर क्षीण झाले आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारतामधील मोठे राज्य म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र आणि त्याहीपेक्षा येथील मुंबई प्रदेश हा आपले राजकीय स्थान झपाट्याने गमावून बसला आहे. महाराष्ट्राचे केंद्र शासनातील नेतृत्वच अतिशय दुर्बल आणि निष्प्रभ झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईपुढील भविष्यातील आव्हानांचा वेध घेणे सत्तेवर येणार्‍या तसेच विरोधी पक्ष म्हणून काम करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांनी करणे आवश्यक आहे.
* मुंबईपुढील नागरी आव्हाने -

        मुंबई प्रदेशातील सर्व स्थानिक महापालिका आणि नगरपालिकांचा आर्थिक आणि प्रशासकीय कारभार प्रभावी करणे तसेच मूलभूत सार्वजनिक नागरी सेवांच्या क्षमता आणि त्यांचा दर्जा सुधारणे व सर्व नागरिकांपर्यंत त्या पोहोचतील याची खातरजमा करणे हे आव्हान आहे. हे आर्थिक, तांत्रिक तसेच सामाजिक समावेशक स्वरूपाचे असल्याने त्यात जात, धर्म, गरिबी आडवे येतात. त्यासाठी पालिकेने रास्त दराने नागरिकांकडून सेवा कर वसूल करावा. तसेच मुलांना शिक्षण आणि नागरिकांना आरोग्यसेवेत सामील करून घेणे हे नगरसेवकांचे कर्तव्य मानले पाहिजे.
        पाणीपुरवठा आणि प्रादेशिक वाहतूक. त्यांचे आर्थिक, प्रशासकीय आणि तांत्रिक नियोजन हे प्रादेशिक पातळीवर होणे आवश्यक आहे. विशेषत: सार्वजनिक वाहतूक सुधारणा करण्यासाठी आणि त्यात आर्थिक, प्रशासकीय आणि तांत्रिक समन्वय आणि कार्यक्षमता प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र प्रादेशिक संस्था आवश्यक आहे. त्यामुळे उपनगरी रेल्वे, मेट्रो, बस सेवा अशा आधुनिक सेवांचे प्रशासकीय, आर्थिक आणि भौगोलिक नियमन आणि नियंत्रण करणे शक्य होईल. शिवाय खासगी वाहनांवर नियंत्रण आणून सुरक्षित वाहतूक उपाय अशी संस्थाच करू शकते हा जागतिक अनुभव आहे. मुंबई प्रदेशासाठी ‘उम्टा’ (Urben metropolitan transport Authority)  स्थापन होणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
        तिसरे आव्हान आहे ते सामान्य नागरिकांना न परवडणार्‍या विकतच्या किंवा भाड्याच्या घरांचे. हे आव्हान पेलण्यासाठी भाडे नियंत्रण कायद्यात सुधारणा करणे, फुकट घरांची योजना रद्द करून लहान घरबांधणीसाठी नवीन प्रोत्साहन योजना तयार करणे तसेच म्हाडा या संस्थेची सिंगापूरसारख्या शासकीय व्यावसायिक तत्त्वावर पुनर्रचना करणे आवश्यक आहे. एकीकडे लाखो श्रीमंती घरे रिकामी पडली आहेत आणि दुसरीकडे लोकांना डोक्यावर छप्पर मिळवणे आणि टिकवणे मुश्कील झाले आहे. अशीच अवस्था असंख्य वाहने बाळगणार्‍या श्रीमंत लोकांच्या बाबतीत आहे. गाड्या पार्क करून सार्वजनिक रस्ते आडविणार्‍या वाहनांवर आणि रिकाम्या ठेवणार्‍या घर मालकांवर जबरदस्त कर लावून वसूल करण्याचा अधिकार महापालिकांनी बजावणे महत्त्वाचे आहे.

टोमॅटोची साल व अंड्याची टरफले वापरून मजबूत टायर निर्मिती

        अमेरिकेतील ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकाच्या मते, वाया गेलेल्या अन्नाचा वापर पेट्रोलियम मिश्रणात करता येतो. टायरसाठी लागणारे चांगले रबर तयार करताना त्यात पेट्रोलियम आधारित मिश्रण वापरले जाते त्यात या पदार्थाची जोड देता येते. कार्बन ब्लॅकला पर्याय म्हणू अंड्याचे टरफले व टोमॅटोची साले योग्य आहेत, त्यांचा वापर करून बनवलेले टायर काळे नसतील तर लालसर तपकिरी असतील. त्यात अंड्याची टरफले व टोमॅटोची साल किती यावर त्यांचा रंग अवलंबून राहील.
        पेट्रोलियम मिश्रण टायर तयार करण्यासाठी वापरले जाते, त्याला टाकाऊ अन्नपदार्थ कालांतराने पर्याय ठरू शकतात. नवीन टाकाऊ पदार्थ वापरून तयार केलेले रबर हे औद्योगिक दर्जा मानकाचे ठरले आहे. त्यामुळे त्याचे इतर काही उपयोग शक्य आहेत.
        * अंड्याची टरफले व टोमॅटोच्या साली यांचा वापर कार्बन ब्लॅक या पेट्रोलियम मिश्रणाला पर्याय म्हणून करता येतो.
        * वाहनांच्या टायरमध्ये 30 टक्के कार्बन ब्लॅकचा वापर केलेला असतो, त्यामुळे टायर नेहमी काळे दिसतात त्यामुळे रबर टिकाऊ बनते व पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीनुसार टायरच्या किमती बदलतात.
        * कार्बन ब्लॅक हे टणक असते त्यामुळे टायर लगेच झिजत नाहीत. केवळ नैसर्गिक रबर वापरून चालत नाही, त्यात मिश्रणे टाकावी लागतात. यात टायरसाठी वेगळे टोमॅटो व्यावसायिक पातळीवर वाढवले जाऊ शकतात. त्यांची साले धाग्यांनी युक्त असतील व ते लांब अंतरावरील कारखान्यात पाठवले जाऊ शकतील.
        * टोमॅटो सॉस तयार करताना त्याची साल काढून टाकली जाते कारण ती पचायला सहज नसते पण त्या सालीचा टायरमध्ये उपयोग होऊ शकतो.
        * अंड्याची टरफले ही सच्छिद्र रचनांची असतात व त्यामुळे रबराशी त्याचा संपर्क घट्ट होऊ शकतो व त्याला वेगळे गुणधर्म प्राप्त होतात. टोमॅटोची साले उच्च तपमानालाही टिकून राहतात व त्याचा वापर चांगल्या परिणामांच्या साध्यतेसाठी होतो.भराव मिश्रणे वापरल्याने रबर मजबूत बनते व लवचीकही होते.

आयसीसी क्रमवारीत आर. अश्‍विन - रवींद्र जडेजा

        आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा दोघांनाही 892 रेटिंग मिळाले आहेत. त्यांच्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा जॉश हेझलवूड (863) आणि त्यानंतर श्रीलंकेचा रंगना हेराथ  (827) आहे.
        * ऑस्ट्रेलियाचा स्मिथ या क्रमवारीत अव्वल आहे तर त्याच्याखाली न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा नंबर आहे.    
        * अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत आर. अश्‍विनची एका स्थानाने घसरण होऊन तो दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने पहिले स्थान मिळवले असून त्याचे 441 रेटिंग आहेत.

विराट कोहली

        आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीची तिसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी कायम आहे. दुसर्‍या स्थानावर इंग्लंडच्या जो रुटने कब्जा केला. जो रुट आणि कोहली यांच्या गुणांमध्ये फक्त 1 गुणाचा फरक आहे.
          कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्टीव्ह स्मिथकडे 939 गुण आहेत, तर कोहली 847 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आणि 848 गुणांसह जो रुट दुसर्‍या स्थानावर आहे.

अश्‍विन-जडेजा जोडीचा पराक्रम

        रविचंद्रन अश्‍विन आणि रवींद्र जडेजा या भारतीय संघाच्या फिरकी जोडीने कसोटी विश्‍वात इतिहास रचला. अश्‍विन-जडेजाला कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत सामाईकरित्या अव्वल स्थान मिळाले. एकाच संघाच्या फिरकीजोडीने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी क्रिकेट विश्‍वात कोणत्याही संघाच्या फिरकी जोडीला एकाच वेळी अव्वल स्थानावर कब्जा करण्याची किमया करता आली नव्हती.
        ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बंगळुरू कसोटीत अश्‍विनने दोन्ही डावात एकूण 8 विकेट्स घेतल्या, तर जडेजाच्या खात्यात 7 विकेट्स जमा झाल्या. बंगळुरू कसोटी सुरू होण्याआधी अश्‍विन कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर, तर जडेजा दुसर्‍या स्थानावर होता. जडेजाने बंगळुरू कसोटीत 63 धावांवर मिळवलेल्या 6 विकेट्सच्या मदतीने तो अव्वल स्थानापर्यंत पोहोचला.
        याआधी 2008 साली दोन गोलंदाजांना एकाच वेळी अव्वल स्थान मिळाले होते. द. आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन आणि श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरन यांना सामाईकरित्या अव्वल स्थान मिळाले होते. पण एकाच संघातील दोन गोलंदाजांनी नंबर एकच्या स्थानावर झेप घेण्याची किमया अश्विन-जडेजाने केली आहे.

         गेल्या वर्षभरातील भारतीय कसोटी संघाची कामगिरी पाहता संघाच्या विजयात अश्‍विन-जडेजा जोडीचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. जडेजा-अश्‍विन यांच्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या डावातील आश्‍वासक गोलंदाजीने भारतीय संघाने बंगळुरू कसोटी 75 धावांनी जिंकली.

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी

        सोलापूर महापालिका महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची निवड झाली. 102 सदस्यांच्या पालिका सभागृहात भाजपच्या नवनिर्वाचित महापौर शोभा बनशेट्टी यांना सर्वाधिक 49 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांना 21 मते पडली. काँग्रेसच्या प्रिया माने यांना 18 मते मिळाली.
        बनशेट्टी यांच्या रूपाने सोलापुरात लिंगायत समाजाला 25 वर्षांनंतर महापौरपदाची संधी मिळाली. यापूर्वी विश्‍वनाथ चाकोते हे 1992-93 मध्ये महापौर झाले होते. एकाच घरात महापौरपद दुसर्‍यांदा जाण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी शोभा बनशेट्टी यांचे सासरे विश्‍वनाथ बनशेट्टी हे 1971 साली महापौर झाले होते. ते सुमारे 50 वर्षे नगरसेवकपदी सलग निवडून आले होते.
सोलापूर महापालिकेतील पक्षीय बलाबल -
* भाजप-49,     
* शिवसेना-21,     * काँग्रेस-14,     * एमआयएम-9,    * राष्ट्रवादी-4,    * बसपा-4,    * माकप-1.

 

चंदा कोचर

         लक्ष्मीच्या चंचलतेशी व्यूहरचनात्मक पद्धतीने लीलया खेळू शकलेले एक नाव भारतभरात अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. बँकिंगचे क्षेत्र एकेकाळी महिलांच्या कर्तृत्वाला म्हणावी तशी साद घालत नव्हते. ही परिस्थिती आमूलाग्र बदलण्यात चंदा कोचर यांचा वाटा मोठा आहे. आयसीआयसीआय बँकेच्या प्रगती आणि विस्ताराला आकार देण्याला त्यांची दृष्टी कारणीभूत आहे. आयसीआयसीआय समूहात 1984 साली दाखल झालेल्या चंदा कोचर यांनी स्वकर्तृत्वाने भरारी घेतली. एकविसाव्या शतकात प्रवेश करताना त्या आयसीआयसीआयच्या संचालक मंडळाचा भाग बनल्या होत्या. तो काळ बोर्डात एक तरी महिला संचालक असली पाहिजे, या तरतुदीचा नव्हता. त्यांचे योगदान त्यांना या सन्मानापर्यंत घेऊन गेले.
       1990 च्या दशकात आयसीआयसीआय बँक स्थापन करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. बँक स्थापन झाल्यानंतर विज्ञान-तंत्रज्ञानातून सिद्ध झालेल्या प्रणालींचा खुबीने वापर करून रिटेल बँकिंगला नवा चेहरा देण्याचे आगळेवेगळे काम त्यांच्या नावावर जमा आहे. रिटेल बँकिंगकडून या संस्थेला जागतिक व्यवसायाची गरुड झेप घेण्याची दृष्टीही चंदा यांनीच दिली. या समूहाच्या बहुतेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्या महत्त्वाच्या भागीदार राहिल्या आहेत.
        थोडक्यात सांगायचे, तर प्रयत्न आणि जिद्दीचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे चंदा कोचर. मॅनेजमेंट ट्रेनीच्या स्तरावरून सुरुवात केल्यावर निव्वळ स्वकर्तृत्वाच्या बळावर यश आणि पदांची नवनवी शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. बँकेतील जवळपास प्रत्येक विभागातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांचा हा प्रवास अलौकिक आहे. म्हणूनच त्यांना जागतिक पातळीवर प्रतिष्ठेसोबत अनेक सन्मान मिळाले. कॅनडातील कार्लटन विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट बहाल केली. शिवाय भारतानेही पद्मभूषण किताबाने त्यांना सन्मानित केले. जगातल्या पहिल्या शंभर प्रभावशाली महिलांमध्ये समावेश होऊ लागलेल्या चंदा यांच्या कामगिरीचे उभ्या जगाला अप्रूप आहे.

प्रा. जी. एन. साईबाबा

         नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याबद्दल दोषी ठरवत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) प्रा. जी. एन. साईबाबा याच्यासह जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिरकी व पांडू नरोटे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याशिवाय विजय तिरकी यास 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
         बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवत न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. नक्षलवादी हिंसक कारवायांसाठी दिल्ली विद्यापाठीतील युवा कार्यकर्त्यांना तयार करणे, त्यांना गडचिरोलीतील जंगलांमध्ये कारवायांसाठी पाठवणे, नक्षल्यांसाठी थिंक टँक म्हणून काम करणे, असे प्रा. साईबाबा याच्यावरील आरोप सिद्ध झाले. जामिनावर असलेल्या साईबाबाला शिक्षा ठोठावल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींचे वकील सुरेंद्र गडलिंग यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाच्या आवारात लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांचा फौजफोटाही होता.
         गडचिरोली पोलिसांनी ऑगस्ट 2013 मध्ये जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा याला महेश तिरकी व पांडू नरोटे यांच्यासह अटक केली होती. मिश्राच्या माहितीवरुन सप्टेंबर 2013 मध्ये प्रशांत राही यास अटक केली. त्यानंतर 9 मे 2014 रोजी साईबाबालाही अटक केली होती. प्रा. साईबाबा 90 टक्के अपंग असल्याने त्याच्या प्रकृतीबाबत सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा उपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. या पत्राला रिट याचिका म्हणून दाखल करुन घेत न्यायालयाने प्रा. साईबाबाला 30 जून 2015 रोजी 3 महिन्यांचा तात्पुरता जामीन दिला. तो पुढे 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला.
         अशातच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 8 सप्टेंबर 2015 रोजी हेम मिश्राची जामिनावर मुक्तता केली. मात्र, खंडपीठाचे न्या. अरुण चौधरी यांनी मुंबई खंडपीठाचा हस्तक्षेप अमान्य करीत 23 डिसेंबर 2015 रोजी साईबाबा याचा जामीन अर्ज नामंजूर केला आणि 48 तासांमध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर साईबाबाने 25 डिसेंबर 2015 रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्याचदिवशी त्याची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
         नक्षलवादी चळवळीला जबर धक्का -
         * प्रा. साईबाबाला झालेली शिक्षा ही नक्षलवादी संघटनेसाठी एक जबर धक्का मानला जात आहे. यामुळे साईबाबा याच्याप्रमाणे जे इतर माओवादाचा प्रसार करणारे आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत. शिक्षण क्षेत्रात राहून माओवादाचा प्रसार करणार्‍या व्यक्तीला शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
         * जिल्हा न्यायालयाने 4 मार्च 2016 पासून नियमीत सुनावणी सुरु केली. 31 मार्चपर्यंत आठही साक्षीदारांची साक्ष नोंदविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 4 एप्रिल 2016 रोजी साईबाबाला जामीन मंजूर केला होता.
         * शिक्षेवरील सुनावणीत विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर प्रशांत सत्यनाथन यांनी केवळ अपंग असल्याच्या कारणाने साईबाबाला माफ करु नये, त्याचे गुन्हे गंभीर आणि समाजविघातक असल्याने कडक शिक्षेची मागणी केली. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सत्यनाथन, अ‍ॅड. सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.

कविता राऊत - सावरपाडा एक्सप्रेस

         सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणारी कविता राऊत. लांब पल्ल्याची भारताची धावपटू. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत कविता हिने गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती. रियोत ती धावली मात्र यश पदरी आले नाही. पण नाशिकच्या ग्रामीण टापूतून आलेल्या या मुलीची धाव आकांक्षांचे परिमाण बनली. कविता राऊत हिने 2010 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी ब्रॉन्झ मेडल पटकावले होते.
         सावरपाडा हे गाव तसे कुणाच्या खिजगणतीत नसलेले खेडे. मात्र कविता राऊत हिने आपल्या धावण्याने जगाचे लक्ष वेधले आणि गावाचे नाव जागोजागी झळकले. शाळेत शिकत असताना कविता धावण्याच्या स्पर्धेसाठी नाशिकला आली. अनवाणीच धावली. विजय मिळाला नसला तरी पूर्वतयारी नसताना झालेली तिची कामगिरी प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या नजरेत भरली. त्यांनी कविताची प्रतिभा ओळखली आणि मग सुरू झाला तो कविता राऊत हिचा सावरपाडा एक्सप्रेस बनण्याचा प्रवास. कविताने 12 व्या दक्षिण आशियाई स्पर्धेतून रियो स्पर्धेचे तिकीट मिळवले होते. कविताने            

         अर्धमॅरेथॉनमध्ये 1 तास 12 मिनिटे 50 सेकंदाची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला आहे. त्यासोबतच 10000 मीटर अंतराच्या स्पर्धेत 34 मिनिटे 32 सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवणारी पहिली महिला अ‍ॅथलीट ठरली होती. 2010 मध्ये 10 हजार मीटरच्या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. त्याच वर्षी आशियाई स्पर्धेत 10 हजार मीटरमध्ये तीने रौप्य पदक पटकावले होते. तिला 2012 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील गौरवले आहे.
         एका जिद्दीचा प्रवास काय असतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कविता राऊत. ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ या नावानं ओळखल्या जाणार्‍या कवितासाठी विक्रम नवे नाहीत. पण याच कविताकडे एकेकाळी पायात घालण्यासाठी साधे बूटही नव्हते. डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन काट्याकुट्यांचे, खाचखळगे आणि डोंगरमाथे ती तुडवत होती. याच ‘रॉ टॅलण्ट’मधून आंतरराष्ट्रीय ख्यातीची धावपटू निर्माण झाली. असे की आजही ती अंतर्बाह्य साधीभोळी, शिकण्यासाठी आसुसलेली आणि पाय जमिनीवर ठेवून ‘वार्‍याच्या वेगात पळणारी’ मुलगी आहे. बघता बघता भारतीय तरुणाईची ती आयकॉन कधी झाली हे तिलाही कळले नसेल.
 कविताचा सावरपाडा एक्सप्रेस बनण्याचा प्रवास खडतर होता. बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत योग्य प्रशिक्षण, हजारो तासांचा सराव हा जिद्दीने पूर्ण करत तिने यश मिळवले. कविता सध्या नाशिकलाच पुढील स्पर्धांचा सराव करत आहे.

भारताची पहिली ’लेडी बाँड’

         हेरगिरीच्या कामामध्ये कितीही  थरार, उत्कंठा आणि आव्हान असले तरी, जीवाला नेहमी जोखीम लागून राहिलेली असते. देशांतर्गत माहिती काढण असो किंवा देशाबाहेरची गुप्तहेराच्या जीवाला नेहमीच धोका असतो. पण हे सर्व माहित असूनही तिचा गुप्तहेर बनण्याचा निर्णय पक्का होता. आपल्या लक्ष्यापासून अजिबात विचलित न होता तिने हेरगिरीच्या क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला. आज ती भारतातील पहिली महिला गुप्तहेर म्हणून ओळखली जाते. तिचे नाव आहे रजनी पंडित. विशेष कौतुकाची बाब म्हणजे पहिली महिला गुप्तहेर बनण्याचा मान एका मराठी मुलीकडे जातो.  
       30 जुलै 1960 रोजी रजनी पंडित यांचा जन्म मुंबईत झाला. रुपारेल कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हेरगिरीलाच करीयर बनवले. महाविद्यालयात असताना मुलींची अकारण छेड काढणारे तरुण, वृद्धांची होणार अवहेलना, आडदांडपणा, गुंडगिरी अशा समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी गुप्तहेर बनण्याचा निर्णय घेतला. रजनीने आपल्या आई-वडिलांना हा निर्णय सांगिल्यानंतर त्यांनी तिला प्रोत्साहनच दिले. लग्न करुन विवाहीत आयुष्यात आणखी एका कुटुंबाला धोक्यात घालू नये हा विचार करुन त्या अविवाहीत राहिल्या.  
    समाजातील धार्मिक तेढ, पती-पत्नींच्या मनातील संशयाचे भूत अशा प्रश्नांची उकल त्यांनी केली. कधी मोलकरीण बनून त्यांनी रहस्यभेद केला. जिवावर बेतणार्‍या प्रसंगातही त्यांनी चार्तुयाने मात केली. भारतात तसेच ऑस्ट्रेलिया, युके, दुबई, न्यूझीलंडमधील विविध वाहिन्यांनी त्यांच्यावर माहितीपट बनवले. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या रजनीताईंना मनापासून सलाम.

मेधा पाटकर

         शोषित-पीडितांच्या हक्कासाठी सर्वस्व पणाला लावणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांमधील एक आघाडीचे नाव म्हणजे मेधा पाटकर. मेधा पाटकर म्हटले की सर्वात पहिल्यांदा आठवते ते नर्मदा आंदोलन. सरदार सरोवर आणि नर्मदा आंदोलनातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण. पण हा आलेख तिथेच थांबत नाही. ज्याच्याकडे सत्ता नाही, संपत्ती नाही, सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचा ज्याचा हक्कही नाकारला जातोय, ज्यांना कुणीच वाली नाही, अशांचा ‘आवाज’ आणि हा आवाज आणखी बुलंद करणारी प्रेरणा म्हणून मेधा पाटकरांकडे पाहिले जातंय. फाटक्या, दरिद्री म्हणवल्या जाणार्‍या याच कफल्लक लोकांना हाताशी धरून त्या अनेक लढे लढल्या. सत्तास्थानांना मुळापासून हादरे दिले. एका विचारवंतातून जागा झालेला त्यांच्यातला कार्यकर्ता अजूनही जागोजागी निखारे पेटवतो आहे, लोकाना ‘जागवतो’ आहे.
      सामाजिक लढ्याला आशयगर्भ परिमाण देण्याचे काम करताना हक्काच्या लढाईचे नवे मापदंड यांनी तयार केले. पर्यावरणवादी व नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रणेत्या ही त्यांची लौकिक ओळख म्हटले तर पुरेशी आणि म्हटले तर फारच अपुरी. स्वातंत्र्यसैनिकाच्या घरात जन्माला आल्याने लहान वयातच लोक चळवळीशी संबंध आलेल्या मेधा पाटकर राष्ट्र सेवा दलाच्या कामात सहभागी झाल्या. वैद्यक व्यवसायात जाण्याची इच्छा बाजूला ठेवून समाजकार्यातच पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले. 1985 साली नर्मदेवर अनेक छोटी-मोठी धरणे बांधण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली. त्याने नर्मदेच्या खोर्‍यातील अनेक आदिवासी विस्थापित होणे अटळ होते. प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाशी हा प्रश्‍न निगडीत होता. आधी पुनर्वसन मगच प्रकल्प अशी भूमिका घेत मेधा पाटकरांनी सामाजिक न्यायाची नवी लढाई सुरू केली.
        त्याचेच पुढचे पाऊल म्हणून त्यांनी पर्यावरणाचा र्‍हास करणारे प्रकल्प रद्द करा, असा आग्रह धरला. त्यातून ही चळवळ वेगाने फोफावली. नर्मदा बचाओ आंदोलनाची व्याप्ती अफाट वाढली. विस्थापितांच्या हक्कासाठी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी उपोषणाद्वारे अहिंसात्मक सत्याग्रह केला. नर्मदेच्या पाण्यात आत्मसमर्पण करण्याचे टोकाचे पाऊल उचलणार्‍या मेधा पाटकरांच्या शब्दाला त्यानंतर नैतिक वजन लाभले. एकीकडे हा असा तळागाळातला लढा आणि दुसरीकडे कायदेशीर लढाई अशी दुधारी किमया त्या साधू शकल्या. त्यातून त्यांना बर्‍यापैकी यशही लाभले. त्यापेक्षाही, आधी पुनर्वसन मगच प्रकल्प हे त्यांचे सूत्र देशभरात रुजले. अव्याहत सुरू असलेल्या त्यांच्या या कार्यासाठी त्यांना देशातले आणि परदेशातले अनेक पुरस्कार मिळाले. अर्थात अत्यंत प्रतिष्ठेच्या मॅगसेसे पुरस्काराने त्यांच्या लढ्यावर शिक्कामोर्तब झाले आणि मेधा पाटकर या नावाभोवती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वलयही निर्माण झाले.

मीरा बोरवणकर

         पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये चढ्ढा कुटुंबात जन्मलेली ही कन्या पुढे आयपीएस अधिकार्‍याच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाली. क्रिकेटमध्ये करिअर करण्याची आलेली संधी बाजूला सारून आयएएस वा आयपीएस होण्याचा पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांचा सल्ला मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मीरा यांचे विश्‍व पूर्णत: बदलले. आयपीएस चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नाशिकमध्ये ते सेवेत रुजू झाल्या.
         पुढे संपूर्ण कारकीर्दीतून त्यांनी पोलीस दलातील कार्यक्षम महिला अधिकारी हा लौकिक संपादन केला. मुंबईतील अतिशय संवेदनशील भागात उपायुक्त म्हणून प्रभावी काम केल्यानंतर त्यांना काहीशा संघर्षानंतर अधीक्षक म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची स्वतंत्र जबाबदारी मिळाली. स्त्री-पुरुष समानतेत किंवा समान हक्कात दयाबुद्धी नव्हे, तर कर्तृत्व हाच पाया कसा असू शकतो, याचा वस्तुपाठ घालून देणारी महिला म्हणून इतिहासाला मीरा बोरवणकर यांची दखल घ्यावी लागेल.
         इंग्रजी साहित्यात एम.ए. केलेल्या मीरा बोरवणकर यांनी जेथे संधी मिळाली तेथे वाचन, करिअर आणि कुटुंब व करिअर यातील समतोलाबाबत हिरीरीने सार्वजनिक प्रबोधन केले. धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ ही विशेषणे त्यांच्या नावामागे कायम जोडली गेली. मुंबईतील सह-आयुक्तपद असो, की दिल्लीचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग असो, महत्वाच्या प्रत्येक जबाबदारीच्या पदावर त्यांनी कामाद्वारे ठसा उमटविला. त्याचवेळी त्यांनी जळगाव सेक्स रॅकेटची चौकशी करताना त्यांनी सर्‍हदयतेचा परिचयही दिला. राष्ट्रपतींच्या पोलीस पदकासह अनेक सन्मानांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.

डॉ. राणी बंग

         सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात डॉ. अभय बंग हे नाव आज एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे घेतले जाते. या दीपस्तंभालाही दिशा दाखवण्याचे काम कुणी केले असेल तर ते डॉ. राणी बंग यांनी. आपले सारे आयुष्य या डॉक्टर दाम्पत्याने सार्वजनिक आरोग्यासाठी वाहून घेतले. आपल्या ‘सर्च’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गडचिरोलीसारख्या अतिमागास आणि आदिवासी भागातून कार्य सुरू केले. पण त्याचा विस्तार देशपातळीच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहे. बालमृत्यू रोखण्याचे त्यांचे मॉडेल आज ‘युनिसेफ’नेही उचलून धरलेय. त्यामुळेच जन्माला येण्यापूर्वीच किंवा जन्म घेताच जगाचा निरोप घेणारी अनेक बालके आज मुक्तीचाच नव्हे तर स्वातंत्र्याचाही श्‍वास घेत आहेत.
        राणी बंग यांची वैद्यकीय शिक्षणातील कारकीर्द हेवा वाटण्याजोगी लखलखीत होती. प्रसूतिशास्त्र म्हणजे गायनॅकॉलॉजीत एम.डी. ला गोल्ड मोडल मिळविणार्‍या राणी यांना घसघशीत पैसा मिळवून देणार्‍या मार्गाचा मोह झाला नाही. त्याऐवजी त्यांनी बाळंतपण आणि त्याच्याही पल्याड असलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर काम करून समाजऋण फेडण्यात धन्यता मानली. स्त्री रोगाचे एक भयानक अवजड ओझे ग्रामीण महिला कसे हकनाक अंगावर वागवत आहेत, हे सर्वात आधी जगाला सप्रमाण दाखवून दिले, ते राणी बंग यांनी.
        ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांचे आरोग्यविषयक प्रश्‍न, सेक्सच्या निमित्ताने अज्ञानापोटी मिळणारे रोग, बाळंतपणाच्या समस्या, आरोग्यातील व्यक्तिगत स्वच्छता इथपासून सेक्स एज्युकेशन, एड्स नियंत्रण अशा अनेकानेक क्षेत्रात काही दशके झोकून देऊन केलेल्या यांच्या कामाची देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा दखल घेतली गेली. पण राणी बंग यांची ही लढाई प्रतिष्ठा आणि पुरस्कारांसाठी कधीच नव्हती. विज्ञान-तंत्रज्ञानाची मधुर फळे तळागाळातल्या महिलांनाही चाखता यावीत, ज्यातून त्यांचे आरोग्य व एकूणच जगण्याचा पोत सुधारेल, या इच्छेतून राणी बंग यांचे काम आकाराला आले आहे.

स्वाती साठे

         तब्बल 22 वर्षांपूर्वी पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नागपूरच्या एका मुलीने ठरवून वेगळा पेशा निवडला. तुरुंगाधिकार्‍याची वर्दी तिने 1995 साली अंगावर चढविली तेव्हा ती काहीसा चेष्टेचा विषय बनली. पण तिची जिद्द अपूर्व होती. ध्येय निश्‍चित होते. मुख्य म्हणजे हेतु शुद्ध होता. तुरुंग हाच आपला पत्ता असणार आणि निर्ढावलेले संघटित गुन्हेगार आपले शेजारी असणार, याची पूर्ण कल्पना असतानाही तिने हा पेशा निवडला. आता दोन दशकांनंतर फक्त महाराष्ट्रालाच नव्हे, तर उभ्या देशाला तिचा अभिमान वाटतो. स्वाती साठे हे नाव तुरुंग सेवेमध्ये दबदबा निर्माण करून राहिलं आहे.
         स्वाती यांच्या मूळ अभ्यासाचा विषयच त्यांना या सेवेकडे आकर्षित करून गेला. गुन्हेगारांची मानसिकता आणि सुधारणेतून त्यांचे पुनर्वसन हा विषय त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या आवारात मागे सोडला नाही. तो सोबत घेऊनच त्या तुरुंग सेवेत रुजू झाल्या. तुरुंगवास ही गुन्हेगाराला सुधारण्यासाठी दिलेली संधी असायला हवी, ही धारणा असलेल्या स्वाती यांनी कायमच त्यादृष्टीने विचार केला. त्याच्याशी सुसंगत कृती केली. कैद्यांना सुधारण्याला वाव असायला हवा, या मताशी त्या ठाम असल्या तरी त्यांनी तुरुंगात आलेल्यांमध्ये कधी भेदाभेद नाही केला. गजाआड आल्यावर सेलिब्रिटीही त्यांच्यासाठी कायमच इतर कैद्यांसारखा कैदीच राहिला. दो आँखे बारह हात सिनेमातल्या सारखा प्रयोग त्यांनी केला नाही. पण कैदी सुधारून तुरुंगाबाहेर जावा, यासाठी भरपूर प्रयत्न केले.
           संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीला स्वाती यांनी कधीही भीक घातली नाही. त्यांच्यावर तुरुंगातल्याच कार्यालयात हल्ला करण्याचा प्रयत्नही झाला. गँगस्टरनी तेव्हा केलेल्या गोळीबारात स्वाती यांचा एक सहकारी जखमीही झाला. पण त्याने स्वाती यांच्या हिमतीवर काडीचा परिणाम झाला नाही. उलट त्यांचा निश्चय अधिकच दृढ झाला. केवळ पहिली महिला तुरुंगाधिकारी म्हणून नव्हे, तर कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. बंदिवानांच्या शिक्षण-प्रशिक्षणाचा, त्यांना सन्मार्गाला आणून त्यांच्याआयुष्यात परिवर्तन घडविण्याचा त्यांचा ध्यास कायम आहे.

विजया राजाध्यक्ष

         यंदाच्या जनस्थान पुरस्काराच्या मानकरी. या निमित्ताने त्यांची साहित्य क्षेत्रातील उंची नव्याने अधोरेखित झाली. विजया राजाध्यक्ष हे मराठी सारस्वताच्या दरबारातील एक मानाचे पान. मराठी स्त्री लेखनात, कथा लेखनात जो धैर्याचा बाज आहे, तो विजयाबाईंच्या लेखणीतून उतरलेल्या शब्दांमधून सातत्याने जाणवतो. भाषा-विचार आणि भाषा-व्यवहार या बाबतीत संवेदनशील असलेल्या विजयाबाई मराठी भाषा जगण्याविषयी कमालीच्या सजग आणि आग्रही आहेत.
          मराठीकडे मातृभाषा म्हणून पाहतानाचा त्यांचा दृष्टिकोन मराठी जगविण्यास उपयुक्त आहे. शाळा हा जीवनाचा पाया आहे. त्या पायापाशीच मराठी शिक्षणाचा नीट संस्कार व्हायला हवा, हे त्यांचे केवळ मत नव्हे, तर ती त्यांची धारणा आहे. चौफेर आणि विपुल लेखन केले असले, तरी विजयाबाईंचा वैचारिक गाभा हा समीक्षकाच्या जातकुळीतला आहे. विद्यार्थी दशेतच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यांची पहिली कथा स्त्री मासिकात प्रसिद्ध झाली. साहित्याविषयी ओढ असलेल्या विजयाबाईंना त्याला पोषक असा शिक्षकी पेशाच निवडला. उभी हयात त्यांनी अध्यापन केले. एसएनडीटी आणि एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडविले.
         विजयाबाईंच्या साहित्याचा आकृतिबंध कथेचा असला, तरी त्याचा सोलीव गाभा कथेकरी नव्हे, तर वैचारिक राहिला. हे त्यांचे वैशिष्ट्य कायम राहिले. त्यांच्या समीक्षा लेखनातील धैर्याचा भाग त्याचेच प्रत्यंतर देतो. त्यांची समीक्षा शोधक वृत्तीची राहिली. त्यामुळेच कथांमधील स्त्री चित्रण वरपांगी मध्यमवर्गीय वाटले तरी त्यातून वेगळा विचार सतत डोकावत राहिला. विचारवंतांच्या नसण्याची पोकळी विजयाबाईंच्या सर्‍हदय वैचारिक लेखणीने कायमच भरून काढली. जवळपास वीस-एक कथासंग्रहांमधून मराठी साहित्यात मोलाची भर टाकणार्‍या विजयाबाई 2000 साली इंदूरला झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या.

७ मार्च २०१७

भारतीय संघात लिएंडर पेसची निवड

        उझबेकिस्तानविरुद्धच्या आगामी डेव्हिस चषक लढतीसाठी स्टार खेळाडू लिएंडर पेसचे भारतीय संघातील स्थान कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे पेसचा एके काळचा दुहेरीतील साथीदार आणि भारताचा कर्णधार महेश भूपतीवर पेसच्या स्थानाविषयी अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी सोपविली आहे.
         बंगळुरूमध्ये 7 एप्रिलपासून आशिया ओशियाना गट एकमधील दुसर्‍या फेरीत भारत-उझबेकिस्तान आमनेसामने येतील. या सामन्यासाठी पेस भारताच्या अंतिम संघात असेल की नाही, याचा निर्णय सामन्याच्या दहा दिवसआधी घेण्यात येईल. अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या (एआयटीए) एस. पी. मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यांच्या निवड समितीने 6 खेळाडूंच्या भारतीय संघात चार एकेरी खेळाडू रामकुमार रामनाथन, युकी भांबरी, प्रजनेश गुणेश्‍वरन आणि एन. श्रीराम बालाजी यांच्यासह दोन दुहेरी खेळाडू रोहन बोपन्ना आणि पेस यांची निवड केली. यानंतर अंतिम संघाची निवड करण्याची जबाबदारी कर्णधारावर आहे.
* आयटीए महासचिव - हिरणमय चॅटर्जी

चीनचा संरक्षण खर्च भारताच्या तीनपट

          अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण खर्चात 10 टक्के वाढ  करण्याची घोषणा केली. संरक्षण खर्चात मोठी वाढ करून चीनने एकप्रकारे अमेरिकेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या संरक्षण खर्चाच्या आकडेवारीने प्रथमच ट्रिलियन युआनचा टप्पा पार केला.    
           भारताशी सीमाप्रश्‍नांवरून सुरू असलेले वाद व दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त बेटांच्यामालकी हक्कावरून अमेरिकेसह इतर अनेक देशांशी असलेल्या संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याने चीनचा संरक्षण खर्च वाढला आहे. अर्थसंकल्पातील मोठा भाग नौदलासाठी वापरला जाणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण खर्चात 10 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे.

*    2016 च्या तुलनेत चीनच्या संरक्षण खर्चात 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, तो 1.04 ट्रिलियन युआन (152 अब्ज डॉलर) वर पोचला आहे.
*    संरक्षणावरील एकूण खर्चापैकी 1.02 ट्रिलियन युआन हे केंद्रीय अर्थसंकल्पातून देण्यात येणार आहे.
*    चीनच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) 1.3 टक्के भाग हा संरक्षणावर खर्च केला जाणार आहे.
*    चीनचा संरक्षण खर्च  भारताच्या तिप्पट झाला आहे.
*    चीनच्या पंतप्रधानांनी नॅशनल पीपल्स काँग्रेससमोर (एनपीसी) वार्षिक अहवाल सादर केला.
आकडेवारी -

*    53.5 अब्ज डॉलर : भारताचा एकूण संरक्षण खर्च
*    152 अब्ज डॉलर : चीनचा एकूण संरक्षण खर्च
*    654 अब्ज डॉलर : अमेरिकेचा प्रस्तावित संरक्षण खर्च.

गुरमेहर व निष्पक्ष अभिव्यक्ती

          समाज प्रगल्भ होत जाणे - ही प्रक्रिया एका कुठल्या घटनेने किंवा नेत्याकडून वा संघटनेकडून पूर्णत्वास येत नसते. ती एक सतत घडत जाणारी प्रक्रिया असते. अनेक छोट्या छोट्या घटनांमधून समाजाच्या मानसिकतेचा प्रवाह वळणे घेत जात असतो. ही वळणे प्रगतीकडे, अधिकाधिक वैचारिक स्वातंत्र्याकडे आणि निष्पक्षतेकडे नेणारी असतील तर आणि तरच समृद्ध समाज निर्माण होत असतो.
            अति डावे आणि अति उजवे ह्या दोघांकडून हा मध्य साधला जाणं दिवास्वप्न आहे. कारण टोकांवर असणे, हीच त्यांची ओळख आहे. परंतु सौम्य उजवे आणि सौम्य डावे असणार्‍यांनी अशा प्रकरणात पुढे येऊन वातावरणातील कटुता dilute करण्याकडे लक्ष द्यायला हवे.
           गुरमेहर कौरवरून तापलेल्या राजकीय वातावरणाने आपल्या समाजाच्या प्रगल्भ असण्यावर आणि अधिकाधिक प्रगल्भ होत जाण्यावर काही नवी संकटे उभी केली आहेत. त्या निमित्ताने काही महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. हे प्रश्‍न प्रस्थापित विचारवंत विश्‍व किंवा राजकीय व्यक्तींसाठी नसून, आपल्यातील अनेकांसाठी आहे.
            गुरमेहर, एका हुतात्म्याची कन्या, डाव्या किंवा समाजवादी विचारांनी प्रभावित झालेली आयडियलिस्ट आहे. तिचे युद्धखोरी थांबवा, माझ्या बाबांना पाकिस्तानने नव्हे, युद्धाने मारले आहे ही वाक्ये त्याच प्रभावातून आली आहेत.
            गुरमेहरला विरोध करणारे या दोन प्रकारचे लोक आहेत-  सध्याच्या राष्ट्रवादाच्या उन्मादात वहावत असलेल्या काही टोळक्यांना असे तत्त्वज्ञान मंजूर नाही, शिवाय हे तत्त्वज्ञान उच्चारणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी देशद्रोही आहे.
           या टोळक्यापेक्षा थोडासा वेगळा असलेला एक मोठा समुदाय आहे. जो राष्ट्रवादी आहे, पण उन्मादी नाही, आततायी नाही.
            वरकरणी हे प्रकरण देशद्रोही वक्तव्यांचा आरोप असलेल्या तरुणांच्या कार्यक्रमावरून सुरू झालेले असले तरी त्याचे मूळ या वैचारिक फरकात आहे. गेल्या 3 वर्षात असे अनेक वैचारिक युद्ध आपण अनुभवले आहेत. इतर प्रकरणांप्रमाणे हे प्रकरण देखील काही दिवसांनी निवळेल.
           सोशल मिडीयावर जसजशी गुरमेहरच्या विरोधाची लाट वाढायला लागली, तसतसे, तिच्या समर्थनार्थ विविध तर्क उभे राहिले. एक स्त्री आहे, तरुणी आहे - म्हणून तिला विरोध करू नये तसेच, एका हुतात्म्याच्या पुत्रीला असं वागवू नये आहे हे तर्क होते. या सर्व तर्कांमध्ये तिला तिचं म्हणणं मांडायचा हक्क आहे हा अभिव्यक्तीचा एक मुद्दा अनुस्यूत होता. परंतु, गुरमेहरला बलात्काराची धमकी दिली गेली आणि तेव्हापासून चित्र अधिक गडद झाले.
              मानवता की राष्ट्रवाद - या मूळ मुद्यावरून ही चर्चा  भरकटली होतीच. हुतात्म्याची पुत्री, तरुण स्त्री या कारणांद्वारे गुरमेहर ज्या तत्त्वज्ञानाला पुढे आणत आहे, ते तत्त्वज्ञान  criticism-proof   करण्याचा प्रयत्न चालू होता. म्हणजे, गुरमेहर ही अशी कुणीतरी आहे म्हणून तिचं म्हणणं ऐका आणि मान्य करा - हा तो होरा होता.
              गुरमेहरला तिचे म्हणणे मांडायचा अधिकार आहे हे म्हणत असताना इतरांना तिच्या म्हणण्याला विरोध करण्याचा अधिकार देखील आहे - हे बाजूला सारले गेले. अभिव्यक्ती केवळ गुरमेहरला असते, विरोध करणार्‍यांना नाही - असा काहीसा तर्क होता. परंतु कुणीतरी बलात्काराची धमकी दिली, व  हा लपलेला प्रवाह विचित्र रूप धारण करून समोर आला. ती धमकी आल्यानंतर, जो कुणी गुरमेहरच्या म्हणण्याला, तर्काला विरोध करेल - तो त्या बलात्काराच्या धमकीच समर्थन करतोय - असा प्रचार सुरू झाला. आधी अभाविप ने धुडगूस घालून ही चर्चा गुंडगिरीची चर्चा करून टाकली होती. धमकी आल्यानंतर तर सर्व विरोधक निकालात निघाले.
            तुमचे विचार डावे असोत वा उजवे - ते व्यक्त करण्यात आणि ते पटवून देण्यात प्रामाणिकपणा असायला हवा. या प्रामाणिकपणावर तडजोड नको.
            अभिव्यक्ती स्वातंत्र्यात, हिंसेला स्थान नाही हे जितके स्पष्ट आहे तितकेच - अभिव्यक्ती स्वातंत्र्य दोन्ही बाजूंना असते - हे सत्य आहे. त्यामुळे हुतात्म्याची पुत्री असो वा स्वतः सैन्यातील अधिकारी असोत - त्यांचे म्हणणे मांडण्याच्या अधिकाराचा आपण जेव्हा सन्मान करतो तेव्हा त्या म्हणण्याला होणार्‍या विरोधाचा देखील सन्मान करायला हवा. आता हा विरोध आम्ही म्हणून तसाच, आम्ही ठरवू तेवढा सौम्य हवा - हे म्हणणे म्हणजे श्रीराम सेनेने  valentine day साजरा कसा करावा याबद्दल नियमांची सूची प्रसिद्ध करण्यासारखे आहे. त्यांची ही सूची प्रसिद्ध करण्याची कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येते. पण ते नियम न पाळणारे व्यभिचारी किंवा बलात्कारी आहेत असा आरोप त्यांनी केला तर तो चूक ठरतो.
             जर विरोधाची तीव्रता समोरची व्यक्ती बघून ठरायला हवी असेल तर भारताचे पंतप्रधान, अमेरिकेचे राष्ट्रपती, विविध धर्मातील अंधश्रद्धांवर पोसले जाणारे बाबा/पादरी/मौलवी हे सर्वच टीकेच्या कक्षाबाहेर जातील. हे आम्हाला परवडणारं तर नाहीच, शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूळ स्पिरिटला मारून टाकणारं आहे.
             राष्ट्रवाद की मानवतावाद, युद्धखोरी की संरक्षण सिद्धता, पाकिस्तानसोबत शत्रुत्व की वैश्‍विक बंधुत्वाच्या तत्त्वाखाली पाकिस्तानबद्दल आपुलकी - या दोन्ही विचाराच्या टोकांनी, आपापसातील फरकातील सुवर्णमध्य गाठणे, आणि हा सुवर्णमध्य समाजातील बहुमतावर बिंबवणे हे भारतीय समाजासाठी अत्यावश्र्यक आहे, दोन्हीकडील टोकांना असा सुवर्णमध्य शोधणे आणि गाठणे अशक्य आहे.

जागतिक व्यापार सुलभ करार

          जागतिक व्यापार संघटनेने (डब्ल्यूटीओ)  22 फेब्रुवारी 1987  चा व्यापार सुलभ करार स्वीकारला आणि भारतासाठी नवीन संधी आणि आव्हाने तयार झाली. 21 वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर हा करार स्वीकारला गेलेला आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व आणि तीव्रता सहज लक्षात येण्यासारखी आहे.
         भारत हा ‘डब्ल्यूटीओ’चे सभासद राष्ट्र आहे आणि भारतानेही हा ‘डब्ल्यूटीओ’चा व्यापार सुलभ करार स्वीकारला आहे. मोठ्या प्रमाणात निर्यात संधी आपल्याला या करारामुळे निर्माण होईल अशी आशा आहे. त्याचप्रमाणात अधिक तीव्रतेने अनेक पदार्थांची आयात वाढण्याची भीती या करारामुळे निर्माण झालेली आहे.
         ‘डब्ल्यूटीओ’च्या बाली मंत्री परिषदेत सर्व सभासद राष्ट्रांनी एकमताने स्वीकारण्यासाठी अंगीकारलेला करार म्हणजे व्यापार सुलभ करार. या करारानुसार ‘डब्ल्यूटीओ’च्या कोणत्याही सभासद राष्ट्राला इतर सभासद राष्ट्रात आपले पदार्थ अडचणीविना, सहज व सुलभतेने नेता येतील. सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या गतीला अडथळा मानला जातो तो म्हणजे कस्टम्स किंवा आयात पदार्थ दिरंगाई करणारी यंत्रणा आदी.
            व्यापार सुलभ करारानुसार सदर यंत्रणेमध्ये बदल करून, तसेच कस्टम्सच्या दिरंगाई करणार्‍या अडचणी दूर करण्याबाबत सभासद राष्ट्रांनी एकमत दर्शविले आहे. भारतातर्फे सदर कराराचा मसुदा स्वीकारण्यात आला आहे याचे कारण म्हणजे, आपल्याला अमेरिका किंवा इतर ‘डब्ल्यूटीओ’च्या सभासद राष्ट्रांत सहज गतीने आपला पदार्थ निर्यात करून त्याच्या बाजारपेठेत आणण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणारा आहे आणि इतर राष्ट्रांनासुद्धा तेवढाच फायदा भारतातील बाजारपेठेत घेण्यासाठी होणार आहे.
            सदर व्यापार सुलभ करार ‘डब्ल्यूटीओ’मध्ये घेतल्यानंतर 2/3 सभासद राष्ट्रांनी तो वैयक्तिकरीत्या स्वीकारपत्राने अंगीकृत करणे क्रमपात्र असते. त्यानुसार ‘डब्ल्यूटीओ’च्या आवश्यक संख्या सभासद राष्ट्रांनी फेब्रुवारी 2017 अखेर स्वीकारपत्र दिली आहेत आणि व्यापार सुलभ करार अस्तित्वात आला आहे.
           ‘डब्ल्यूटीओ’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचा भारत हा या संघटनेच्या अस्तित्वातील प्रथम सभासदांपैकी एक आहे. खर्‍या अर्थाने जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती एक जानेवारी 1995 रोजी झाली व आता ही संघटना जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या रांगेत येऊन पोचली आहे. जागतिक व्यापार संघटनेची आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. खुल्या बाजारपेठ या मूळ उद्देशासाठी अस्तित्वात आलेली ही संघटना भारतासाठी अधिक उपयुक्त ठरलेली नाही. उलट भारतासाठी अधिक आव्हाने ती तयार करत गेली. याच्या अनेक कारणांपैकी कराराविषयीचे अज्ञान हे एक आहे; पण आता आपल्याला योग्य वेळीच याची माहिती मिळाली आहे.
         ‘जनरल अ‍ॅग्रिमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ’ (गॅट) करार भारताने 1947 मध्ये स्वीकारला. त्याच्यातून निर्माण संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकलो नाही. तसाच जगभरातील जवळपास 95 टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार होईल अशी योजना असलेल्या या ‘डब्ल्यूटीओ’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचा करारसुद्धा भारताने 1995 मध्ये स्वीकारला, पण गेल्या दोन दशकांत बोटांवर मोजण्याइतक्या इंडस्ट्री सोडल्यास कोणीच या कराराचा योग्य फायदा घेतला नाही.
          चीन, अमेरिका यांच्यापाठोपाठ युरोपनेही भारत आपल्या औद्योगिक वस्तू आणि बँकिंग सेवांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात भारताची बाजारपेठ ‘डब्ल्यूटीओ’च्या करारातून काबीज केली; पण आपण मात्र त्याच्या अनेक संधींपासून दूर आहोत. असे घडले या मागे आंतरराष्ट्रीय करारांविषयची अनभिज्ञता हेच प्रमुख कारण असले पाहिजे.
           ‘डब्ल्यूटीओ’मध्ये 164 राष्ट्रे सभासद आहेत आणि 60 पेक्षा अधिक विविध विषयांवरील करार आहेत. बहुतेक करार हे ‘डब्ल्यूटीओ’च्या निर्मितीपासून, म्हणजे 1995 पासून आहेत. त्यामध्ये शेतीविषयक करार, सेवा क्षेत्र, व्यापारविषयक करार, बौद्धिक संपदा म्हणजे पेटंट, कॉपी राइट, ट्रेड मार्कविषयक व्यापार करार इत्यादी होय.
          ‘डब्ल्यूटीओ’ची मंत्री परिषद हा निर्णय घेणारा सर्वोच्च स्तर मानला जातो आणि अशा मंत्री परिषदेतून आंतरराष्ट्रीय करारांची निर्मिती होत असते.
         ‘डब्ल्यूटीओ’च्या सिंगापूर मंत्री परिषदेत 4 करार अशाच प्रकारे विकसित राष्ट्रांनी लादले होते, पण भारत आणि सहकारी सभासद राष्ट्रांनी विकसित राष्ट्रांचा आर्थिक गुलामगिरी लादणारा सदर विकसित राष्ट्रांचा मनसुबा हाणून पाडला व चारपैकी एकाच करार ‘डब्ल्यूटीओ’च्या चर्चेत आणला गेला. तो म्हणजे व्यापार सुलभ करार. तो बाली परिषदेत स्वीकारला गेला आणि आजमितीला अमलात आला.
           इतर प्रस्तावित करारांमध्ये गुंतवणूक करार, सरकारी यंत्रणेतील सहभागातील करार, व्यापार खुली स्पर्धा करार हे करार हाँगकाँग मंत्री परिषदेतून काढून टाकण्यात आले.

पोस्टाची पेमेंट बँक

          भारतामध्ये टपाल व्यवस्था ही मुख्यतः शासनकर्त्यांसाठी होती. व्यापार करणारे आपली स्वतंत्र टपाल व्यवस्था राबवीत असत, परंतु सामान्य लोकांसाठी कोणतीही टपाल यंत्रणा इंग्रजांचे शासन येईपर्यंत नव्हती. इंग्रजांनी स्वतःसाठी म्हणूनच टपाल व्यवस्था निर्माण केली, त्याद्वारे 1688 या वर्षी मुंबईला पोस्ट ऑफिस सुरू केले व त्यास मद्रास व कलकत्याशी जोडण्यात आले. 1774 या वर्षी वॉरन हेस्टिंग्ज यांनी आधुनिक टपाल यंत्रणेच्या व्यवस्थेचा पाया रचला ज्यात हळूहळू सुधारणा व प्रसार करत 1854 या वर्षी आज आपण पाहतो ती टपाल यंत्रणा स्थापित करण्यात आली.
           टपाल व्यवस्था चांगली राहावी यासाठी भारतात सर्वदूर टपाल कचेर्‍या उघडण्यात आल्या. भारतीयांनी टपाल व्यवस्थेचा उपयोग मोठ्या प्रमाणावर सुरू केला व टपाल खाते म्हणजे विश्‍वासार्हतेचे दुसरे नाव’ असा नावलौकिक झाला. पोस्ट ऑफिससारखी सर्वदूर पसरलेली व लोकांशी विश्‍वासाचे नाते प्रस्थापित करणारी दुसरी कोणतीही सरकारी यंत्रणा नव्हती, त्यामुळे जसे जसे टपाल यंत्रणेचे जाळे व टपाल कचेर्‍यांची संख्या वाढू लागली तसे तसे सरकारला या कचेर्‍यांचा उपयोग इतर कामांसाठी... अर्थात लोकांकडून काहीही जमा/गोळा करणे अथवा लोकांपर्यंत काहीही पोचवणे/वाटणे यासाठी करणे क्रमप्राप्त झाले. यातून पुढे लोकांच्या ठेवी जमा करणे, सरकारी बाँडस्ची विक्री करणे, पैशांची ने-आण करणे आदी सेवांचा उगम झाला.
आधुनिक बँकिंग सेवा भारतामध्ये 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आली. 1770 या वर्षी बँक ऑफ हिंदुस्तान व 1786 या वर्षी जनरल ‘बँक ऑफ इंडिया‘ या खासगी बँक सुरू करण्यात आल्या. 1806 या वर्षी ‘बँक ऑफ बेंगाल’ व त्यानंतर ‘बँक ऑफ बॉम्बे’ आणि बँक ऑफ मद्रास’ या सरकारी बँका सुरू झाल्या, ज्या पुढे जाऊन 1921 या वर्षी ‘इंपिरियल बँक ऑफ इंडिया’ या नावाने एकत्रित करण्यात आल्या. हीच बँक 1955 या वर्षी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ म्हणून नामांतरित झाली. 1873 च्या ‘सेव्हिंग्ज बँक अ‍ॅक्ट’च्या अनुसार पोस्ट ऑफिस बचत बँकेला सरकारी बँकेचा दर्जा देण्यात आला आणि 1882 या वर्षी पोस्ट ऑफिस बचत बँकेने आपला कारभार सुरू केला. दरम्यानच्या काळात 1877 ला मूल्यदेय पार्सल (तझझ) व 1880 या वर्षी मनी ऑर्डरची सेवासुद्धा सुरू झाली होती.
          पोस्ट ऑफिसवर सामान्य जनतेचा आधीच विश्वास दांडगा असल्यामुळे पोस्ट ऑफिस बचत बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मोठ्या ठेवी जनता ठेवू लागली. त्याचबरोबर, विविध प्रकारची खाती पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करण्यात आली. 1896 पर्यंत ‘पोस्ट ऑफिस बचत बँक’ इंग्रज सरकारची सर्वांत जास्त ठेवी असणारी बँक झाली. ठेवींबरोबर सिक्युरिटी डिपॉझिट अकाउंटसारख्या सेवा या बचत बँकेत मिळू लागल्या. तसेच मनी ऑर्डरचा उपयोग भाडे भरणे, शेतसारा भरणे, फीस भरणे आदी कामांसाठीसुद्धा होऊ लागला.
          1884 या वर्षी फक्त टपाल कर्मचार्‍यांसाठी सुरू झालेली ’टपाल जीवन विमा योजना’ सर्व सरकारी कर्मचार्‍यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. बचत खात्यांसोबत स्टॉक नोट्स, ज्यांना आपण ’सेव्हिंग सर्टिफिकेट’ म्हणून जाणतो, यांची विक्री टपाल खात्यातून 1882 या वर्षी सुरू करण्यात आली, तसेच ’ब्रिटिश पोस्टल ऑर्डरची’ फेड भारतातील टपाल खात्यात होऊ लागली व आंतरराष्ट्रीय मनी ऑर्डरद्वारे भारतातून बाहेरच्या देशांमध्येसुद्धा पैसे पोचू लागले. मात्र ’भारतीय पोस्टल ऑर्डर ’ सुरू होण्यासाठी 1935 पर्यंत वाट पाहावी लागली.
          युनिव्हर्सल पोस्टल युनियन, ज्याची स्थापना 1874 या वर्षी झाली होती, त्याचा भारत सुरवातीपासून सदस्य आहे, त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याबाहेरील देशांमध्येसुद्धा मनी ऑर्डरद्वारे पैसे पाठवणे सहज शक्य होऊ लागले.
         सैनिकांची पेन्शन, रेल्वे कर्मचारी व डाक-तार खात्यांचे कर्मचारी यांचे पेन्शन 1889 पासून पोस्टातून मिळू लागले. 1916 या वर्षी पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात वॉर लोन बाँड्स’ पोस्ट ऑफिसमधून विक्रीस ठेवण्यात आले.
          पोस्ट ऑफिस मध्ये बचत करण्यासोबतच विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार, जे सामान्यपणे बँकेतून होतात, ते पोस्टातून होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर टपाल कचेर्‍यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्याचबरोबर टपाल कचेर्‍यांत बचत करण्यासाठी गरीब-श्रीमंत सर्व थरांतील लोक येऊ लागले.
        सामान्य जनतेबरोबर पं. जवाहरलाल नेहरू, बाबू राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे राष्ट्रनेतेसुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये आपले बचत खाते ठेवू लागले.  PPF, TD, RD आदी वेगवेगळ्या पद्धतीचे खाते टपाल कार्यालयात उपलब्ध झाले.
       ’सुकन्या समृद्धी योजना’सारखे विशेष बचत खाते आपल्या कन्येच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी 2014 या वर्षी सुरू करण्यात आली, त्याला आज फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
        पोस्ट ऑफिस बचत बँकेमध्ये 2014-15 या आर्थिक वर्षाच्या शेवटी जवळपास 40 कोटी खाती आहेत, त्यात सुमारे 6.20 लाख करोड रुपये जमा आहेत. यापैकी 24 लाख खाती सुरू झालेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत उघडण्यात आली आहेत, त्यात सुमारे 521 कोटी रुपये जमा झाले आहेत. याच बरोबर Western Union आणि Moneygram  द्वारे आंतरराष्ट्रीय वित्त प्रेषण सेवा टपाल खात्यातून उपलब्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय पेन्शन सिस्टिम (NPS), जन सुरक्षा योजना व अटल पेन्शन योजना या केंद्र शासनाच्या नव्या योजनादेखील टपाल खात्याद्वारे राबविली जात आहे. सबब, टपाल कचेर्‍यांमधून विविध आर्थिक सेवांचे प्रमाण वाढते आहे व बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वच सेवा (कर्ज सोडून) टपाल कचेर्‍यांतून उपलब्ध आहेत.
          ’पोस्ट ऑफिस बचत बँक’ ही इतर बँकांप्रमाणे क्लिअरिंग हाउसची, ज्यात विविध बँका आपापल्या चेक्सची देवाण-घेवाण करतात. सदस्य असली तरी रुढार्थाने ही बँक नाही, कारण पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा झालेल्या रकमेतून कोणालाही कर्ज देण्यात येत नाही.
          या सर्व जमा झालेल्या रकमेचा भरणा भारत सरकारच्या ’पब्लिक अकाउंट’मध्ये करण्यात येतो, ज्यातून राज्य सरकारांना, त्यांच्या राज्यात जमा झालेल्या रकमे बरहुकूम कर्ज देण्यात येते, त्यामुळे इतर बँकांसारखे बचत बँक’, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येत नाही.
          स्वतंत्र भारतातील टपाल खात्यासाठी सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे  सुरू झालेली  'India Post Payment Bank'.  अर्थखात्याने 2007 या वर्षी रघुराम राजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणासंबंधी शिफारशी देण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीला आर्थिक समावेशन (Financial Inclusion) अधिक प्रभावीपणे कसे करावे यावरसुद्धा शिफारशी देण्यासाठी सांगण्यात आले होते. या समितीचा रिपोर्ट 2008 या वर्षी देण्यात आला, ज्यात आर्थिक समावेशनाची संकल्पना करण्यात आली. आर्थिक समावेशनाची गरज भारताच्या आर्थिक सुबत्तेशी जोडण्यात आली, कारण या वर्षी चार गोष्टींशिवाय कोणत्याही व्यक्तीला आर्थिक व्यवहार करणे एकतर सुकर होणार नव्हते, तसेच त्याची आर्थिक सुरक्षिततासुद्धा धोक्यात होती.
          आर्थिक सुबत्ता ही आर्थिक सुरक्षिततेशिवाय धोक्यात असते व अर्थव्यवस्थेच्या मुख्य सिस्टिमशी जोडल्याखेरीज आर्थिक सुबत्ता व सबलीकरण शक्य नसते. अशा प्रकारच्या सर्वांगीण अर्थसेवा, प्रस्थापित बँक व्यवस्थेतून राबवण्यास अधिक खर्च येतो, त्यामुळे सामान्य जनतेला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यासाठी 'Differentiated Bank' (विशिष्ट बँक) ची संकल्पना या समितीने मांडली.
          2013 या वर्षी नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली, लघू व्यापार व कमी आय असणार्‍यांसाठी विविध आर्थिक सेवा कशा प्रकारे उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीने  'Payment Bank' (देय बँक) ची संकल्पना मांडली, जी एक अशा प्रकारची बँक असणार होती, ज्यात कर्ज देणे ही बाब सोडल्यास बाकी सर्व आर्थिक सेवा उपलब्ध होत्या. ज्या बँका कर्ज देतात त्यांना नियमानुसार रिझर्व्ह बँकेकडे काही ठेवी रोख स्वरूपात ठेवाव्या लागतात, तसेच भारत सरकारचे बाँड्स खरेदी करणे सक्तीचे असते. यांचे प्रमाण त्यांच्याकडे असणार्‍या ठेवींच्या प्रमाणात असते, ज्यास CRR आणि SLR असे म्तात. तसेच, दिलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे NPA सुद्धा या बँकांना सोसावे लागतात. त्यामुळे या बँकांना इतर सेवा पुरविण्यात जास्त खर्च येतो; परंतु पेमेंट बँके’ला कर्ज बुडण्याची भीती नसल्याने त्या आपल्या सेवा माफक व कमी दरात देऊ शकतात. म्हणून आर्थिक समावेशनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पेमेंट बँक स्थापन करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला व 2014 या वर्षी अर्ज मागविले. 41 अर्जदारांमधून टपाल खात्यासोबत अन्य 11 जणांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. यातील तिघांनी नंतर आपले अर्ज माघारी घेतले.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक

          इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (IPPB) 30 जानेवारी 2017 रोजी रांची व रायपूर येथे शाखा सुरू करून आपला कारभार सुरू केला. IPPB आपल्या सेवा स्वतःच्या शाखांतून देणार आहे; सोबत टपाल कचेर्‍यांमधून व खेड्या-पाड्यातील लोकांच्या घरापर्यंत पोस्टमनद्वारे आपल्या सेवा पोचविणार आहे. यासाठी हातामध्ये धरले जाणारे यंत्र व इंटरनेट आणि मोबाईलद्वारे सेवा लोकांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था आहे.
            IPPB  च्या शाखा देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येतील, ज्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी 2016च्या बजेटच्या भाषणात केली होती.
           बचत बँक ते पेमेंट बँक हा 135 वर्षांचा प्रवास भारतीय जनतेच्या सेवेचा प्रवास आहे. या प्रवासाला सामान्य जनतेच्या विश्‍वासाची झालर आहे. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठे योगदान करण्याची संधी भारतीय टपाल खात्याला मिळाली आहे.
           ’पोस्ट ऑफिस बचत बँक’ संपूर्णपणे CBS प्रणालीमध्ये कार्य करते आहे, ज्यात ATM सारख्या सुविधा तर आहेतच, तसेच या ATM मध्ये इतर बँकेच्या कार्डचा वापर करून पैसे काढता येतात. तसेच पोस्टाचे ATM Card इतर बँकांच्या ATM मध्येसुद्धा वापरता येते. नुकत्याच झालेल्या नोटाबंदीनंतरच्या काळात टपाल कचेर्‍यांसोबतच हॉस्पिटल, पोलीस कार्यालय व इतर ठिकाणी विशेष व्यवस्था करून अहर्निश सेवामहे’चे आपले ब्रीदवाक्य खरे करून दाखविले आहे. आता पुढील काळात ‘पेमेंट बँके’च्या माध्यमातून टपाल खाते आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची कास धरून लोकांच्या घरांपर्यंत बँकेच्या सुविधा नेणार आहे, ज्याद्वारे आर्थिक समावेशनाच्या आपला खारीचा वाटा उचलत राष्ट्रसेवेचा व जनसेवेचा घेतलेला वसा निभावणार आहे.

चाळीसगावला पहिली पोस्टल बँक

          देशभरात इंडियन पोस्टल बँकांच्या शाखा सुरू होत असून, शासनाच्या पायलट प्रोजेक्टमध्ये चाळीसगाव तालुक्याचा समावेश आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद विभागातील पहिली पोस्टल बँक सुरू करण्याचा मान चाळीसगावला प्राप्त झाला आहे. जुलै 2017 पासून या बँकेतून प्रत्यक्ष ग्राहकांना सेवा पुरविली जाईल. चाळीसगाव तालुक्यात सुरू होणार्‍या या बँकेतून पाचोरा, एरंडोल, कासोदा, भडगाव या तालुक्यांला पोस्टल विभागाची अंतर्गत सेवा पुरविली जाणार आहे.
         भारतीय टपाल सेवेने बँक सेवा सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मान्यता यापूर्वी मिळवली आहे. पोस्टल बँकांतून ग्राहकांना भविष्यात पतपुरवठादेखील केला जाणार आहे.
या सेवा उपलब्ध -

*    पोस्टल बँकेतून सर्व सामाजिक अनुदानित योजनांचा लाभ ग्राहकांना मिळेल.
*    संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेसह इतर पेन्शन योजना, बचत व चालू खाते, पैशांचे हस्तांतर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अनुदानाची रक्कम व मजुरीचे वाटप केले जाईल.
*    दिवसभरातून खात्यातून 1 लाख रुपयांच्या व्यवहारांची मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे.
*    केंद्र व राज्य सरकारच्या सर्व बिलांचा भरणा, पोस्टल जीवन विमा भरणा केंद्र, अन्न व औषधी सबसिडी व शिष्यवृत्तींचा लाभ.

नोटाबंदीनंतरही 7 टक्के विकासदर

      जागतिक पतमानांकन संस्था ’फिच’ च्या अंदाजानुसार ने नोटाबंदीनंतरही भारताचा विकास 7 टक्के राहिला आहे.
     ’फिच’ चा अंदाज -
*    1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये विकासदर 7.7 टक्के राहील.

*    डिसेंबरच्या तिमाहीदरम्यान विकासदर 7 टक्के.
       विविध संस्थांचे विकासदराचे अंदाज -

*    सीएसओ - 7.1%
*    रिझर्व्ह बँक - 6.9%
*    आंतरराष्ट्रीय नाणेनिधी - 6.6%
*    संयुक्त राष्ट्रसंघ - 7.7%
      डिसेंबरच्या तिमाहीदरम्यान विकासदर 7 टक्के राहील, असा अंदाज सरकारतर्फे देण्यात आला होता. नोटाबंदीनंतर कृषिक्षेत्रातील वाढीने विकासदराला सावरले. देशातील काही अर्थतज्ज्ञांनी जीडीपी 7 टक्क्यांपेक्षा कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. नोटाबंदीनंतर एकूण खर्च आणि सेवाक्षेत्रातील कमकुवत कामगिरी होती. चलनाची स्थिती  खराब होती. अशा स्थितीतही विकासदर 7 टक्क्यांवर स्थिर राहिला.

क्रेडिट कार्ड

          भारत सरकारने 8 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपासून 500 व 1000 रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद केल्या. या नोटा बंदीचा मुख्य उद्देश होता, की रोजच्या व्यवहारात चालणारे किरकोळ व्यवहार वगळता, मध्यम व मोठे रोखीचे व्यवहार रोख स्वरूपात न होता बँकिंग प्रणालीतून व्हावेत, जेणेकरून प्रत्येक व्यवहाराची नोंद होईल. यासाठी धनादेश, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांसारखे पर्याय वापरून व्यवहार केले जावेत, असे सुचविण्यात आले. त्यामुळे चलन वापराचे प्रमाण कमी होईल व रोख व्यवहारातून होणारे पण बँकिंग प्रणालीत व करप्रणालीत नोंद न होणारे व्यवहार टाळले जातील. क्रेडिट कार्ड कंपन्यांनी या गोष्टीचा आपल्या सोईचा अर्थ लावत ग्राहकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी आकर्षक योजना जाहीर करून, नसलेले धन वापरण्याचे प्रलोभन निर्माण केले. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यातला मूलभूत फरक जाणून घेणे जास्त गरजेचे आहे.
जेव्हा डेबिट कार्ड वापरले जाते तेव्हा तेव्हा ती रक्कम तुमच्या बँक खात्यातून वजा केली जाते. याउलट जेव्हा क्रेडिट कार्ड वापरले जाते तेव्हा तितक्या रकमेचे कर्ज दिले जाते. ते दर महिन्याच्या ठरावीक तारखेच्या आत परत करणे अपेक्षित असते.
       क्रेडिट कार्डाच्या वापराचे काही ठळक फायदे -

*    सहजतः पैसे देण्याकरिता एटीएम शोधण्यापासून अथवा रोख रक्कम बाळगण्यापासून मुक्तता.
*    खर्चाचा हिशेब ठेवणे सुकर : दरमहा किती खर्च केला अथवा संपूर्ण वर्षात किती खर्च झाला याचा तपशील मिळतो.
*    कमी खर्चात अल्प मुदतीचे कर्ज : वार्षिक आकाराचा विचार करता बिलाचे नियमित पेमेंट केल्यास अतिशय कमी खर्चात कर्ज मिळाल्यासारखे असते.
       क्रेडिट कार्डाच्या वापराचे काही ठळक तोटे...

*    अति वापर : किमान देय रक्कम भरणा केल्यानंतर कमाल मर्यादेपर्यंत वापर करण्याची वृत्ती निर्माण होते.
*    देयक तपासणी : देयक तपासण्याकरिता खरेदीच्या पावत्या देयक येईपर्यंत जपून ठेवाव्या लागतात.
*    वेळेत देयकाचा भरणा न केल्यास व्याज : देय रक्कम वेळेत न दिल्यास त्यावर सुमारे 40 टक्के दराने व्याज आकारले जाऊ शकते. तसेच अशा घटना वारंवार घडल्यास अधिक व्याजदराने व्याज लावले जाते.
*    रोख रकमेवर भरमसाट व्याज : रोख रक्कम ज्या दिवशी काढली असेल त्या दिवसापासून मासिक 3.50 टक्के म्हणजे वार्षिक 42 टक्के दराने व्याज आकारले जाते.
        वरवरचे फायदे धोकादायक -
        क्रेडिट कार्ड देताना पहिल्या वर्षाकरिता मोफत वापर असे सांगितले जाते. पण त्याकरिता किमान किती वापर झाला पाहिजे याची अट घातली जाते. तसेच पुढील वर्षापासून क्रेडिट कार्डाच्या वापरावर मिळणार्‍या इतर फायद्यांसोबत किमान 200 रुपयांपासून वार्षिक आकार घेतला जातो.
        क्रेडिट कार्डाचा स्मार्ट वापर आवश्यक -
         क्रेडिट कार्डाच्या स्मार्ट वापरातून वार्षिक आकार वाचवू शकता. तुम्ही करत असलेली खरेदी (उधार घेतलेली रोख रक्कम नव्हे) हे एक महिन्याकरिता दिलेले बिनव्याजी कर्ज असते. जर क्रेडिट कार्डधारकाने कार्डाच्या खरेदीची उधारी संपूर्णपणे देयकाच्या अंतिम तारखेच्या आत भरली, तर अशा वापरावर कोणतेही व्याज द्यावे लागत नाही.
       क्रेडिट कार्डाचा स्मार्ट वापर कसा करावा -
       खरेदी करताना ती देयकाच्या तारखेच्या नंतर लगेचच करावी. उदा. :

*    देयकाची तारीख : 5,
*    देयकाची पूर्ण रक्कम अदा करण्याची तारीख : 24
      दर महिन्याच्या 6 ते 10 तारखेदरम्यान क्रेडिट कार्ड वापरून केलेली खरेदी रुपये 10,000. त्यामुळे बँकेच्या बचत खात्यात ही रक्कम शिल्लक राहिली. देयकाची रक्कम 30 दिवसांनी द्यावयाची असल्याने या रकमेवर मिळालेले 30 दिवसांचे व्याज रुपये 33 (4 टक्के दराने 30 दिवसांचे व्याज) असे 12 महिन्यांचे व्याज 396 रुपये.) याचा अर्थ जर तुमच्या क्रेडिट कार्डाचा वार्षिक आकार 200 ते 350 रुपये असेल, तर क्रेडिट कार्डाचा वापर मोफत केल्यासारखे झाले.
       स्मार्ट वापर झाला नाही तर...
       उपलब्ध उधारीची पत (credit limit) कमाल मर्यादा संपेपर्यंत वापरली जाते. मग त्याची उधारी चुकवण्याकरिता दुसर्‍या कार्डावरून आणखी उधारी घेतली जाते. त्यामुळे उधारीच्या चक्रव्यूहात सापडल्यासारखी स्थिती निर्माण होते. अशा बेजबाबदारी वापरामुळे किती आर्थिक नुकसान होते, ते पाहा :

उदा. :
*    15 जानेवारी रोजी देयकाची देय रक्कम रुपये 20,000
*    15 जानेवारी रोजी किमान देय रक्कम रुपये 1000
*    देयकाची पूर्ण रक्कम देण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी
*    रुपये 20,000 वर 40.80 टक्के दराने
*    30 दिवसांचे व्याज
*    15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 670.68
*    15 फेब्रुवारी रोजीचे देयक 20670.68
*    20 फेब्रुवारी रोजी भरलेली रक्कम रुपये 2000
*    21 फेब्रुवारी खरेदी 5000.00
*    15 मार्च रोजीचे देयक
*    15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी
*    रुपये 20,000 वर 4 दिवसांचे व्याज 89.43
*    20 फेब्रुवारी ते 14 मार्च
*    24 दिवसांचे 18000 रुपयांचे व्याज 482.89
*    15 मार्च रोजी एकूण देय रक्कम 24243.00
*    15 मार्च रोजी किमान देय रक्कम 1212.00
*    एकूण व्याजाची रक्कम 2 महिन्यात रुपये 1243
      पैसे वेळेवर न भरणे भविष्यातील व्यवहारांबाबत धोक्याचे...
      अनियमित पद्धतीने देयक आदा केले गेल्यास भरमसाट व्याज भरावे लागते. काही कालावधीनंतर हे प्रमाण जरी कमी झालेले असले व परिस्थिती बदललेली असली, तरीसुद्धा वैयक्तिक कारणांकरिता अथवा गृहकर्जासारखे कर्ज घ्यावयाचे झाल्यास असे कर्ज अदा करताना ज्या ’सिबिल’ या मानांकनाचा वापर केला जातो. त्यामध्ये पैसे वेळेत न भरणारा (defaulter) म्हणून गणना झाल्याने, संबंधित वित्त कंपनी पूर्णतः किंवा अंशतः कर्ज देणे नाकारू शकते किंवा दिल्या जाणार्‍या कर्जावर अधिक व्याजाची मागणी करू शकते. तसेच जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर काही वेळा संबंधित संस्थेकडून सिबिल’ रिपोर्टची मागणी केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
      क्रेडिट कार्डावर रोख रक्कम काढणे म्हणजे...
      क्रेडिट कार्डचा वापर करून रोख रक्कम काढणे, म्हणजे स्वतःच्या हातानी स्वतःच्या पायांवर धोंडा पाडून घेण्यासारखे असते, हे विसरता कामा नये. क्रेडिट कार्डाचा वापर करून खरेदी केल्यानंतर देयकाचा भरणा जर वेळेत केला नाही, तरच व्याज द्यावे लागते. पण रोख रकमेचे तसे नसते. ज्या दिवशी रोख रक्कम काढली गेली, त्या दिवसापासून सुमारे -वार्षिक 46 टक्के दराने व्याज आकारले जाते हे लक्षात ठेवले पाहिजे. उदा. :

*    15 जानेवारी रोख रक्कम काढली रुपये 10,000
*    देयकाची तारीख 15 फेब्रुवारी
*    30 दिवसांचे 10,000 रुपयांवरील व्याज रुपये 378.08
*    15 फेब्रुवारी देय रक्कम रुपये 10,378.08
      वेळेत पैसे न भरण्याच्या घटना वाढल्यास अधिक आकार...
      सर्वसाधारण परिस्थितीत 40.80 टक्के दराने व्याजाची आकारणी केली जात होती. परंतु वारंवार पैसे देण्यात दिरंगाई केल्याने हा व्याजदर 46.00 टक्क्यांपर्यंत वाढविला जाऊ शकतो.

*    क्रेडिट कार्डाचा वापर करून वेळेत पैसे न भरणे म्हणजे ऋण काढून सण साजरा करण्यासारखे आहे.
*    क्रेडिट कार्डचा वापर करत असताना पूर्ण दक्षता बाळगून वापर करणे, जास्त हिताचे ठरेल. नियमित देय रकमेचा भरणा केल्यास संबंधित कंपनीकडून क्रेडिट कार्डच्या कमाल मर्यादेत वाढ करणे. विविध सुविधांकरिता आकारल्या जाणार्‍या आकारांमध्ये सवलत देणे असे अनेक जास्तीचे फायदे मिळवता येऊ शकतात.
*    क्रेडिट कार्डाचा स्मार्ट वापर म्हणजे तुमच्या संपत्तीचे स्मार्ट व्यवस्थापन

इस्रो

          ’इस्रो’ने 15 फेब्रुवारी 2017 रोजी पृथ्वीच्या कक्षेत 104 कृत्रिम उपग्रहांना स्थान दिले. यात भारताचे 3 उपग्रह, तर उरलेले 101 उपग्रह इतर देशांचे होते.
          पीएसएलव्ही सी-37 या यानाने हे उपग्रह केवळ 28 मिनिटांत अवकाशात पोचले आणि एका मागून एक असे या 104 उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करण्याचे काम 90 मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण केले. अमेरिकेबरोबर इस्रोने इस्राईल, युनायटेड अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड आणि कझाकस्तान या देशांचा प्रत्येकी एक उपग्रह पाठवला. कमी खर्चात जास्तीत जास्त कार्यक्षमता आणि परिणामकारकता पुन्हा दाखवून भारत अंतराळाच्या घोडदौडीत लीडर ठरतो आहे.
भारत जरी पहिल्याच प्रयत्नात मंगळाभोवती परिक्रमा करण्यासाठी मंगळयान पाठवण्यात यशस्वी झाला असला, तरी त्यासाठी इतर देशांची आपल्याला मदत होती.
         या पूर्वीचा विक्रम (आता तो विक्रम म्हणायचा असल्यास) रशियाचा होता. त्यांनी 2014 मध्ये 37 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. भारताचा हा आकडा तिप्पट आहे.
         सुमारे 96 उपग्रह हे अमेरिकेचे आहेत. अमेरिकेतील एखाद्या संस्थेला भारतातून उपग्रह कक्षेत स्थापित करायचा असेल, तर ’कमिटी ऑन सायन्स’, ’स्पेस अँड टेक्नॉलॉजी’कडून वेगळी परवानगी घेणे बंधनकारक असते.  अमेरिकेत प्रक्षेपण वाहनांची क्षमता भारतापेक्षा जास्त असली तरी या कृत्रिम उपग्रहांची निर्मितीही खूप जास्त आहे. तसेच भारतातून प्रक्षेपण केल्यास एकूण उपक्रमाचा खर्च बराच कमी होतो. अमेरिकेमध्ये प्रक्षेपणासाठी लागणारा खर्च भारतातील प्रक्षेपणापेक्षा 3 पटीने जास्त आहे. त्यामुळे भारतातून प्रक्षेपणाचा त्यांना बराच फायदा होतो.
          याचा इस्रो’ला याचा आर्थिक फायदा होतो. या मोहिमेचा जवळजवळ निम्मा खर्च इस्रोने इतरांकडून मिळवला. भारतीय अंतराळ उड्डाणांचे अर्थशास्त्र, अमेरिकन कंपन्यांसाठी धोका आहे असे त्यांनाच वाटू लागले आहे.
          भारताच्या एकूण 3 उपग्रहांपैकी जो सर्वांत मोठा आणि मुख्य प्रवासी होता, तो म्हणजे CARTOSAT-2. हा हवामानविषयक उपग्रहांच्या मालिकेतील उपग्रह आहे. तसेच अन्य दोन INS-1A- आणि  INS-1B  नॅनो उपग्रहही अवकाशात पाठवण्यात आले.
          CARTOSAT-2  ही भारताची हवामानविषयक उपग्रहांची मालिका असून तिचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे. उपग्रहाचे वजन 664 किलो असून त्यात पॅनक्रोमॅटिक (म्हणजे ज्यात सर्व रंगांची समान नोंद होते असा) आणि मल्टी स्पेक्ट्रल (वेगवेगळ्या तरंगलहरींच्या) कॅमेरे आहेत.
        पृथ्वीच्या विहंगम दृश्र्यासाठी, येणार्‍या नैसर्गिक आपत्तीच्या माहितीसाठी, युद्धसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, आपले मोबाईल फोन व त्यातील GPS सिस्टीम, अँड्रॉईड फोनमधील विविध अ‍ॅप्लिकेशन्स - या साह्याने आपल्या परिसरातील ट्रॅफिकसंदर्भातील माहिती मिळवू शकतो, शैक्षणिकदृष्ट्या पाहता अवकाश संशोधनाच्या कार्यात या अनैसर्गिक उपग्रहांचा खूप महत्त्वपूर्ण सहभाग आहे.  
          किनारपट्टीवरील जमिनीचा वापर आणि नियमन, रस्त्यांचे जाळे सुधारणे आणि नियमन, पाण्याचे वितरण, जमिनीच्या नकाशांची निर्मिती इत्यादीसाठी या उपग्रहांकडून मिळणार्‍या छायाचित्रांचा वापर केला जाणार आहे. हा सुमारे 1 मीटर बाय 1 मीटर भागाची नोंद घेऊ शकतो. म्हणजे जर जमिनीवर दोन ट्रक उभे असतील, तर या उपग्रहाला ते सहज दिसतील. याचा आपल्या संरक्षणासाठीही उपयोग आहे.
         INS-1A आणि INS-1B  ही नॅनो उपग्रह मालिका भारताच्या भविष्यातील मोहिमांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशासाठी ही घटना खूप महत्त्वपूर्ण आहे.
        इस्रोने काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांचेही उपग्रह अंतराळात पाठवले आहेत. जसे IIT पवई किंवा पुण्याच्या COEP च्या विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह.
इस्रोच्या योजना -

*    खगोलशास्त्राच्या संदर्भात भारतीय खगोलशास्त्रज्ञांचा अ‍ॅस्टोसॅट उत्तम प्रकारे काम करत आहे. हा जगातला एकुलता एक अशा प्रकारचा उपग्रह आहे.
*    सूर्याची, शुक्राची निरीक्षणे घेण्याच्या दिशेने काम चालू आहे.
*    सार्क उपग्रह - SAARC उपग्रह. या संकल्पनेचे जनक म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.  उंच आकाशातून पृथ्वीवर पाहतो, तेव्हा संपूर्ण भूखंड एकसंध दिसतो. त्यात कुठलेही विभाग किंवा सीमारेषा दिसत नाहीत. पंतप्रधानांनी इस्रो’ला गिफ्ट ऑफ इंडिया’ या अभियानाअंतर्गत SAARC उपग्रहाची निर्मिती करण्यास सांगितले. हा उपग्रह कदाचित मार्चमध्ये PSLV च्या मदतीने उड्डाण करेल. या योजनेचा फायदा SAARC मध्ये असलेल्या भारताशेजारील सर्व राष्ट्रांना होईल. ज्यामुळे भारताचे इतर राष्ट्रांसोबतचे संबंध दृढ होऊन जागतिक शांतता व एकात्मतेस हातभार लागेल.

ट्रॅपिस्ट ग्रहमाला

           22 फेब्रुवारी 2017 रोजी शास्त्रज्ञांच्या समूहाने पृथ्वीपासून 39 प्रकाशवर्ष अंतरावर एका तार्‍याभोवती पृथ्वीसारखे 7 ग्रह फिरत असल्याचा दावा केला. या सातपैकी तीन ग्रह त्यांच्या तार्‍यापासून, जीवसृष्टीस योग्य अशा अंतरावर (हॅबिटेबल झोन) असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
          आकाशात दिसणारे तारे आपल्यापासून खूपच दूर अंतरावर असल्याने जगातल्या मोठ्यात मोठ्या दुर्बिणीतून त्यांचे छोटे ठिपके दिसतात. त्यांच्या भोवतालचे ग्रह दिसू शकत नाहीत. तार्‍याजवळचा ग्रह शोधणे म्हणजे दूरवरच्या सर्चलाईटशेजारचा काजवा शोधण्यासारखे अवघड असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते. याचमुळे तीस वर्षांपूर्वी तार्‍यांभोवती ग्रह आहेत की नाही हे ठाऊक नव्हते. मात्र शास्त्रज्ञांनी तार्‍यांभोवतालचे ग्रह प्रत्यक्षपणे नव्हे तर अप्रत्यक्षपणे शोधण्यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्रानुसार, तार्‍यांभोवताली फिरणारा ग्रह जेव्हा तार्‍याच्या बिंबावरून जातो तेव्हा तार्‍याचा प्रकाश ग्रहाने अडविल्याने आपल्याला तारा किंचित मंदप्रभ दिसतो व ग्रह पुढे निघून गेल्यावर पुन्हा पूर्वीप्रमाणे दिसू लागतो.
           * अधिक्रमणाचा (ट्रान्झिट) वापर करून अप्रत्यक्षरीत्या तार्‍याभोवताली ग्रह फिरत असल्याचा शोध लावला जातो. हे तंत्र वापरून प्रथम नोव्हेंबर 1999 मध्ये महाश्‍व तारकासमूहातील एका तार्‍याभोवताली फिरणार्‍या ग्रहाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला.
हेच तंत्र वापरून ग्रह शोधण्यासाठी अमेरिकेने 2009 मध्ये केप्लर नावाची दुर्बीण अंतराळात सोडली. तिने 2 हजारावर ग्रहांचा वेध घेतला आहे. अंतराळात 2003 मध्ये सोडलेली स्पिट्झर नावाची इन्फ्रारेड तरंग लांबीवर काम करणारी दुर्बीणदेखील ग्रहांचा वेध घेत आहे. हीच दुर्बीण वापरून अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कुंभ राशीतील तार्‍याभोवती फिरणारे सात ग्रह शोधले.
          हा तारा ज्याला ‘ट्रॅपिस्ट-वन’ नावाने संबोधले जाते, तो आपल्या सूर्यापेक्षा छोटा व मंद तेजाचा आहे. या तार्‍याकडे दुर्बीण रोखली असता त्याचा प्रकाश अधूनमधून मंद होताना दिसला. याचमुळे या तार्‍याभोवती ग्रह फिरत असावेत व त्यांच्याचमुळे तार्‍याचा प्रकाश कमी होत असल्याचे ध्यानात आले. एकंदर 34 वेळा तारा मंद झाल्याचे दिसल्यावर ‘ट्रॅपिस्ट-वन’भोवती सात छोटे ग्रह फिरत असावेत, असे शास्त्रज्ञांना वाटते.
            या शोधमोहिमेच्या गटाचे प्रमुख मायकेल जिऑँ यांनी पत्रकार परिषदेत या शोधाविषयी सखोल माहिती दिली. त्यांच्या मते ते पाहत असलेला तारा छोटा म्हणजे सूर्याच्या तुलनेत 8 टक्के वजनाचा व मंद तेजाचा आहे. त्याच्या मंद तेजामुळेच त्याच्याभोवताली फिरणार्‍या ग्रहांचा शोध लावणे सोपे झाले.
           बेल्जियम शास्त्रज्ञांच्या समूहाने मे 2016 मध्ये ट्रॅपिस्ट तार्‍याभोवतालच्या 3 ग्रहांचा शोध लावला होता.
           हे तिन्ही ग्रह तार्‍यासमोरून एकामागून एक जात असताना त्यांचा वेध घेतला गेला. मात्र तार्‍याचा प्रकाश जास्तच वेळा कमी-जास्त होताना दिसल्याने कदाचित तीनपेक्षा जास्त ग्रह या तार्‍याभोवती फिरत असावेत असे वाटू लागले. यामुळे शास्त्रज्ञांनी स्पिट्झर दुर्बिणीतून या तार्‍याची सतत तीन आठवडे निरीक्षणे घेतली.
           या निरीक्षणामुळे शास्त्रज्ञांना कळून चुकले की पूर्वीच्या तीन ग्रहांशिवाय अजून चार ग्रह या तार्‍याभोवती फिरत असावेत. हे सर्व ग्रह आपल्या मंगळ ग्रहापेक्षा मोठे असावेत. कदाचित ते पृथ्वीच्या तुलनेत 40 ते 140 टक्के वस्तुमानाचे असावेत.
           हे सातही ग्रह तार्‍याच्या अगदी जवळून, दीड दिवस ते काही आठवडाभरात प्रदक्षिणा घालीत आहेत. मात्र ट्रॅपिस्ट तारा आपल्या सूर्यापेक्षा खूपच मंद तेजाचा असल्याने त्याच्या जवळच्या ग्रहांवरचे तपमान जास्त नसून ते जीवसृष्टीस पोषक असण्याची शक्यता आहे. कदाचित यापैकी बाहेरच्या ग्रहावर द्रवरूप पाणी व समुद्रदेखील असू शकतील.
           या ग्रहांचे निरीक्षण हबल हवाई दुर्बीण व जेम्स वेब दुर्बिणीतून केले जाईल. या दुर्बिणीच्या सहाय्याने या ग्रहांवर वातावरण, पाणी व प्राणवायू आहे काय, याचा शोध घेतला जाईल. कदाचित या ग्रहावर वातावरण सापडल्यास तिथे जीवसृष्टीसुद्धा असू शकेल.
* 1983 : चकतीच्या आकाराचे काही -
         बेटा पिक्टोरीस नावाच्या एका भल्यामोठ्या तार्‍याभोवती चकतीच्या आकारासारखे काही असल्याचे ए. एम. लाग्रेंज यांच्या टीमला दिसून आले. ही धुळीची आणि गॅसची चकती असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
* 24 एप्रिल 1990 : हबल अवकाश दुर्बीण -
        आपल्या सूर्यमालेबाहेर काय काय आहे, याचा शोध घेण्यासाठी आणि एका तार्‍याभोवती काय काय फिरतेय हे बघण्यासाठी हबल नावाच्या अवकाश दुर्बिणीचे मिशन लाँच करण्यात आले. हा अवकाश संशोधनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता.
* जानेवारी 1992 : सूर्यमालेबाहेरचे काही -
       अ‍ॅलेक्झांडर वोल्शन आणि डेल फ्रेल या संशोधकांना दोन ग्रह एका तार्‍याभोवती फिरत असल्याचे आढळून आले. आपल्या सूर्यमालेबाहेरही ग्रह असल्याचा हा पहिला शोध होता. वर्षभराने पृथ्वीपासून 1170 प्रकाश वर्ष दूर असलेल्या ग्रहाचा शोध लागला. हा ग्रह आपल्या गुरु ग्रहापेक्षा अडीचपट मोठा होता.
* ऑक्टोबर 1995 : एक नवे तारांगण -
        पहिल्यांदाच एक अख्खे तारांगण संशोधकांना आढळले. डिडियर क्युलोज आणि कायकेल मेयर या संशोधकांना आपल्या सूर्यासारखाच एक सूर्य दिसला. त्याला ‘51 पेगासी’ नाव दिले गेले.
* 1999 : पहिले फिरते सौरमंडल -
         पेगासेस तारमंडळात एका तार्‍यासमोरून अनेक ग्रह फिरत होते आणि त्यात बदलही होत होते, याचा शोध डेव्हिड चेर्बोनेउ आणि ग्रेग हेनरी यांना लागला. हे ग्रह त्या तार्‍याच्या अगदी जवळ होते आणि त्यामुळे त्यावर पाणी, ऑक्सिजन, नायट्रोजन तथा कार्बन असण्याची शक्यता संशोधकांना वाटली.
* 4 एप्रिल 2001 : तिथे जीवन आहे...?
         आपल्या सूर्यमालेबाहेरील एका सूर्याभोवती एक ग्रह फिरत असल्याचे दिसून आले. जिनेव्हा युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना दिसलेला हा नवा ग्रह पृथ्वीसारखाच होता. तो पृथ्वीसारखाच त्याच्या सूर्याभोवतीही फिरतोय, हेही दिसून आले.
* ऑक्टोबर 2001 : परग्रहावरील वातावरण कसे?
          डेव्हिड चेर्बोनेउ आणि टिमोथी ब्राऊन यांच्या टीमने हबल अवकाश दुर्बिणीवर स्पेक्टोमीटर मापकाचा वापर करून पहिल्यांदाच परग्रहावरील वातावरणाचे विश्‍लेषण केले. परग्रहवासीयांचा शोध घेण्याच्यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल होते.
* 1 सप्टेंबर 2002 : सर्वांत मोठा ‘सूर्य’ -
        आपल्याला दिसतो त्या सूर्यापेक्षा तेरा पट अधिक मोठा आणि 40 पट अधिक प्रखर सूर्य संशोधकांना आढळला.
लोटा ड्रॅकोनिस बी असे त्याचे नाव.
* 13 जून 2002 : पहिली ‘नॉर्मल’ सोलर सिस्टिम -
         आपल्या सूर्यमालेसारखीच एक नवी सूर्यमाला या अवकाशात असल्याचे पॉल बटलर आणि जिओफ्री मर्सी या संशोधकांना आढळून आले. गुरु ग्रहासारखा एक ग्रह त्याच्या सूर्याभोवती फिरत होता. हा शोध एक नवी सौरमाला अस्तित्वात असल्याचा पुरावा होता.
* 23 जून 2003 : सुटकेसच्या आकाराची दुर्बीण -
          कॅनडाने ‘मोस्ट’ नावाची सुटकेसच्या आकाराची अवकाश दुर्बीण लाँच केली. तार्‍यांच्या प्रखरतेमध्ये होणारे बदल टिपण्याचे काम करण्याची जबाबदारी या दुर्बिणीवर होती.
* 25 ऑगस्ट 2003 : स्पिट्झर अवकाश दुर्बीण -
          सात ग्रहांचा जो शोध ‘नासा’ने लावला तो याच स्पिट्झर अवकाश दुर्बिणीमुळे. ग्रह-तार्‍यांचा आकार आणि त्यावरील वातावरण याचे संशोधन या दुर्बिणीद्वारे केले जाते.
* मार्च 2005 : सूर्यमालेबाहेरचा पहिला प्रकाश -
           स्पिट्झर अवकाश दुर्बिणीद्वारे आपल्या सूर्यमालेबाहेर इन्फ्रारेड लाइट्स असल्याचे दिसून आले. प्रकाशमान ग्रह-तार्‍यांचा हा पहिला शोध होता
* 27 डिसेंबर 2006 : कोरोट सॅटेलाइट लाँच -
        फ्रान्सच्या उपग्रहाने एका सूर्याभोवती ग्रह फिरत असल्याचे टिपले.
* मे 2007 : परग्रहाचा पहिला नकाशा -
        डेव्हिड चेर्बोनेऊ आणि हिदर नटसन या शास्त्रज्ञांनी स्पिट्झर अवकाश दुर्बिणीद्वारे सूर्यमालेबाहेरीत परग्रहाचा पहिला नकाशा तयार केला. त्यातच ढगांसारखे काही घटकही परग्रहांभोवती दिसून आले.
* 7 मार्च 2009 : केपलर मिशन -
          फ्लोरिडातून उड्डाण घेतलेला एक अग्निबाण नासाची केपलर दुर्बीण अवकाशात घेऊन गेला. दीड लाखाहून अधिक तार्‍यांसोबत ही दुर्बीण फिरेल आणि चार वर्षं अवकाशात शोधकार्य करत राहील, असे हे मिशन होते. या केपलरने हजाराहून अधिक ग्रह-तार्‍यांचा शोध घेतला. ही फार मोठी कामगिरी होती.
* जानेवारी 2011 : पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह -
         पर्वतरांगा असलेला पहिला ग्रह केपलर दुर्बिणीला दिसला आणि त्यासोबतच एका नवीन छोट्या ग्रहाचाही शोध लागला. पर्वरांगा असलेला हा पृथ्वीच्या दीडपट आकाराचा असावा, असा अंदाज बांधला गेला. शिवाय त्याचे वजनही पृथ्वीपेक्षा साडेचार पट अधिक असल्याचे संशोधकांनी सांगितले.
* सप्टेंबर 2013 : ग्रहाची पहिली प्रतिकृती तयार -
           केपलर आणि स्पिट्झर या दुर्बिणींनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे संशोधकांनी आपल्या सूर्यमालेबाहेरील ग्रहावर असलेल्या वातावरणाची प्रतिकृती तयार केली. हा ग्रह गुरू ग्रहापेक्षा 50 टक्के मोठा असल्याचे दिसले. त्याला केपलर 7बी असे म्हटले गेले. हा केपलर 7 बी ग्रह त्यांच्यावर पडणार्‍या सूर्यप्रकाशातून पश्‍चिम बाजूने प्रकाशमान होतो असेही दिसून आले.
* एप्रिल 2014 : पृथ्वीसारखा पहिला ग्रह -
           केपलर या दुर्बिणीने आपल्या सूर्यमालेबाहेर पृथ्वीसारखा ग्रह असल्याचे शोधले आणि तो एका सूर्याभोवती फिरत असल्याचेही दिसून आले. हा ग्रह पृथ्वीपेक्षा केवळ 10 टक्के अधिक मोठा आहे आणि त्यावर पृथ्वीसारखेच वातावरण असण्याची शक्यता वर्तविली गेली. पाणीही असेल आणि ओघाने जीवनही असेल, याचाही शोध सुरू झाला.
* जुलै 2015 : पृथ्वीचा मोठा भाऊ -
          केपलरने नवा शोध लावला. पृथ्वीपेक्षा जवळपास दीडपट मोठा ग्रह आपल्या सूर्यमालेबाहेरील सूर्याभोवती आपल्या पृथ्वीसारखाच प्रदक्षिणा घालत असल्याचे केपलरमधून दिसून आले. आपल्यासारखाच सूर्य आणि त्याभोवती फिरण्याचा कालावधीही त्या ग्रहाचा जवळपास पृथ्वीसारखाच (385 दिवस). त्यामुळे या ‘सुपर अर्थ’वर जीवसृष्टी असल्याची दाट शक्यता वर्तविली गेली. पाणीही असणार, असेही मानले गेले.
* ‘ट्रॅपिस्ट वन’ आणि ‘एक्सोप्लॅनेट्स’ -
         अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या संशोधकांनी अवकाशातील नव्या सौरमंडलाचे अस्तित्व शोधून काढले आहे. या नव्या सौरमंडलातील सारेच ग्रह साधारण पृथ्वीसदृश आणि पृथ्वीच्या आकाराचे असून, त्यावर सजीवसृष्टीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
*    एका छोट्या तार्‍याच्या (सूर्य) भोवती फिरणारे पृथ्वीच्या आकाराचे सात ग्रह संशोधकांना आढळून आले आहेत. या तार्‍याला ‘ट्रॅपिस्ट वन’ असे नाव देण्यात आले आहे. तो पृथ्वीपासून 40 प्रकाशवर्षे इतका दूर आहे.
*    या ‘ट्रॅपिस्ट वन’भोवती फिरणार्‍या ग्रहांना ‘नासा’ने ‘एक्सोप्लॅनेट्स’ असे नाव दिले आहे.
*    आपल्या सूर्याच्या तुलनेत हा सूर्य अतिशय लहान असून, आपल्या सौरमालेतील ज्युपिटरपेक्षा तो मोठा नाही. आपल्या सूर्यापेक्षा ‘ट्रॅपिस्ट वन’चे वस्तुमानही अतिशय कमी आहे.
*    आपल्या सूर्यतेजाच्या तुलनेतही हा सूर्य अतिशय ‘शीत’ असून, आपल्या सूर्यापेक्षा त्याचे तेज 200 पटीने कमी आहे.
*    या सूर्याचे तेज कमी असल्याने त्याच्याभोवती परिक्रमा करणार्‍या ग्रहांवरील कायम ‘संधिप्रकाश’ आढळून येतो.
*    या सौरमंडलातील सूर्यच तुलनेत ‘शीतल’ असल्याने त्याच्याभोवती भ्रमण करणार्‍या या ग्रहांवर द्रव स्वरूपातील पाणी असण्याची शक्यताही खूप मोठी आहे.
*    या सौरमंडलातील सारेच ग्रह त्यांच्या मुख्य तार्‍यापासून (सूर्य) खूपच जवळ असून, आपल्या सौरमालेत बुध ग्रह जितक्या अंतरावर आहे त्यापेक्षाही ते त्यांच्या सूर्यापासून जवळ आहेत.
*    हे ग्रह एकमेकांच्या इतक्या जवळ आहेत की यातील एखाद्या ग्रहावर आपण उभे राहिलो तर शेजारच्या ग्रहांवरील ढग किंवा त्यांचा आकार स्पष्टपणे नजरेस पडू शकतो. आपल्याला साध्या डोळ्यांनी चंद्र जितका मोठा दिसतो, त्यापेक्षाही मोठ्या आकारातील दृश्य आपल्याला दिसू शकते.
*    या ग्रहांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या एका भागात कायम दिवस असेल तर दुसर्‍या भागात कायम रात्र. कारण या सौरमालेतील ग्रह सूर्याशी ‘टायडल लॉक्ड’ आहेत. म्हणजे या ग्रहांना स्वत:च्या अक्षाभोवती फिरण्यास जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ साधारणपणे त्यांच्या सूर्याभोवती फिरण्यासही लागतो. (आपल्या सौर्यमालेतील चंद्रासारखेच हे उदाहरण. चंद्राला आपल्या अक्षाभोवती फिरण्यास साधारणपणे 28 दिवस लागतात, तेवढाच कालावधी त्याला पृथ्वीभोवती फिरण्यासही लागतो.)
*    या खडकाळ ग्रहांवर पाण्याची शक्यता तर शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे, (त्याचा स्पष्ट पुरावा मात्र अजून मिळालेला नाही) पण येथील वातावरणही सजीवसृष्टीसाठी, मानवी वसाहतीसाठी अनुकूल आहे की नाही, याच्या अभ्यासालाही आता शास्त्रज्ञ लागले आहेत.
*    यातील सातवा ग्रह बर्फाळ असल्यासारखा दिसत असून, तो आपल्या सौरमालेतील प्लूटोची आठवण करून देतो.
*    स्पिट्झर, हबल आणि केपलर या दुर्बिणींच्या सहाय्याने पुढील संशोधन सुरू असून, 2018 मध्ये पूर्णत्वास येणार्‍या ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या सहाय्याने नासा त्यात मूलभूत संशोधन करणार आहे.
*    या नव्या दुर्बिणीच्या सहाय्याने या ग्रहांवरील पाणी, ऑक्सिजन, मिथेन, ओझोन तसेच तेथील वातावरणातील इतर घटकांची ‘केमिकल फिंगरप्रिंट’ घेणे शक्य होणार आहे.
*    या नव्या ग्रहांवरील तपमान, पृष्ठभागावरील दाब इत्यादी गोष्टींचाही अभ्यास करून भविष्यात हे ग्रह मानवी वसाहतींसाठी अनुकूल ठरू शकतील किंवा नाही याबाबतचे संशोधन होणार आहे.
*    स्पिट्झर स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने संशोधकांनी या सौरमंडलाचा शोध लावला असून, त्यातील तीन ग्रहांवर पाण्याची प्रबळ शक्यता असल्याचे संशोधकांचे मत आहे. हे ग्रह सजीवांच्या राहण्याच्या लायक असू शकतील असाही संशोधकांचा कयास आहे.
*    आपल्या सौरमंडलाच्या बाहेर शास्त्रज्ञांनी आतापर्यंत 3500 ग्रहांचा शोध लावला असला तरी ते मानवी वास्तव्यासाठी अनुकूल नाहीत.
*    सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्र्यक तेवढे तपमान असलेल्या खडकाळ ग्रहांचा शोध गेल्या कित्येक दशकांपासून शास्त्रज्ञ घेत आहेत. कारण अशाच ठिकाणी तरल अवस्थेत पाणी सापडू शकते, जे सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे.
*    एकाच सूर्याभोवती इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रहांची परिक्रमा शास्त्रज्ञांना प्रथमच आढळून आली आहे. शास्त्रज्ञांनी शोधलेल्या सातही ग्रहांवर पाण्याची शक्यता असली तरी त्यातील किमान तीन ग्रहांवर तरी पाणी सापडेलच असा विश्‍वास शास्त्रज्ञांना आहे.
*    सौरमंडलातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा शोध असून, अंतरिक्षात दुसरीकडे कुठे सजीवसृष्टीचे अस्तित्व असू शकते का यासंदर्भातली ही आजपर्यंतची सर्वात मोठी उपलब्धी आहे. येत्या काही वर्षांत या ग्रहांवर मानवी अधिवासाची शक्यता गृहीत धरता येते.
*    शास्त्रज्ञांच्या मते इतर ग्रहांवर मानवी वसाहतीची शक्यता आता ‘जर-तर’ची नाही, तर ‘केव्हा’ एवढाच प्रश्‍न आता शिल्लक आहे.
*    हे सारे ग्रह पृथ्वीशी खूपच मिळतेजुळते असून, इतक्या वर्षांच्या संशोधनात शास्त्रज्ञांना अशी स्थिती पहिल्यांदाच आढळून आली आहे.
*    सातपैकी तीन ग्रह संशोधकांनी मे 2016मध्ये शोधून काढले होते. हे ग्रह सजीवसृष्टीसाठी अनुकूल असल्याचे लक्षात आल्यानंतर शास्त्रज्ञांनी त्यादृष्टीने अधिक प्रयत्न सुरू केले आणि पृथ्वीसदृश आणखी काही नव्या ग्रहांचा शोध शास्त्रज्ञांना नुकताच लागला. असेच आणखीही काही ग्रह या सौरमालेत असण्याची शक्यताही शास्त्रज्ञांनी नाकारलेली नाही.

उत्तर कोरिया - मलेशियात तणाव

       मलेशियामध्ये उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊनचा सावत्र भाऊ किम जाँग नामची हत्या करण्यात आली होती. मलेशियातील क्लालालांपूर विमानतळावर ही घटना घडली होती. किम जाँग नामच्या हत्येप्रकरणी मलेशियन पोलिसांनी उत्तर कोरियाच्या एजंट्सना ताब्यात घेतले होते.

       किम जाँग ऊनच्या आदेशानुसार किम जाँग नामची हत्या झाल्याची चर्चा आहे. या हत्येप्रकरणी मलेशिया पोलिसांनी उत्तर कोरियाच्या काही नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

        मलेशियन पोलिसांच्या तपासावर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊन संतापल्याने उत्तर कोरियातील मलेशियन नागरिकांना देशाबाहेर जाण्यास मज्जाव केला. मलेशियामधील घटनेचा सविस्तर तपास होईपर्यंत मलेशियन नागरिकांना उत्तर कोरियाबाहेर जाता येणार नाही असा फतवा उत्तर कोरियाने काढला.

        उत्तर कोरिया आणि मलेशियामध्ये नेहमीच तणावपूर्ण संबंध होते. किम जाँग ऊनच्या फतव्यामुळे यात भर पडली.

         किम जोंग नाम हा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याचा सख्खा सावत्र भाऊ होता. मलेशियाच्या क्वालालंपूर विमानतळावर दोन महिलांनी त्याला ठार केले. या दोन महिलांमधली एक किम जोंग नाम यांच्या समोर आली. तिच्या दोन हातात काही चिकटसा द्राव होता. तो तिने हातावर हात घासता घासता एकत्र केला आणि किम जोंग नाम यांच्या चेहर्‍याला फासला. दुसरीने त्यांच्या चेहर्‍यावर एक फवारा उडवला होता. अवघ्या काही मिनिटांमध्ये किम जाँग नामचा मृत्यू झाला होता.

        ओ ईथाइल एस 2 डायसोप्रोपिलअ‍ॅमिनो इथाइल मिथाइल फॉस्फोनोथिओएट या रसायनाच्या मदतीने किम जाँग नामवर विषप्रयोग झाला होता.

ऑस्कर पुरस्कार 2017

        यंदाचे हे पुरस्कार सोहळ्याचे 89 वे वर्ष आहे. ऑस्कर पुरस्कर सोहळ्यात मूनलाईट आणि ला ला लॅण्ड यांनी बाजी मारली. ‘मूनलाईट’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासह ’ला ला लॅण्ड’ने 6 पुरस्कार पटकावले. या चित्रपटातील भूमिकेसाठी एमा स्टोनला प्रथमच ’ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा’ पुरस्कार मिळाला.
*    सर्वोत्कृष्ट चित्रपट - मूनलाईट
*    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एमा स्टोन (ला ला लँड)
*    सर्वोत्कृष्ट अभिनेता - केसी अ‍ॅफ्लेक (मँचेस्टर बाय द सी)
*    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - डेमियन चॅझेल (ला ला लँड)
*    सर्वोत्कृष्ट सह अभिनेता - महेरशाला अली (मूनलाईन)
*    सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री - व्हायोला डेव्हिस (फेन्सेस)
*    सर्वोत्कृष्ट पार्श्‍वसंगीत - ला ला लँडसर्वोत्कृष्ट अनिमेशनपट - झूटोपिया
*    सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर - ओ. जे. : मेड इन अमेरिका
*    सर्वोत्कृष्ट वेशभूषा - फॅन्टास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाईंड देम
*    सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - सुसाईड स्क्वाड
*    सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - हॅकसॉ रिज (केविन ओनेल)
*    सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) - मँचेस्टर बाय द सी (केनेथ लोनरगन)
*    सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) - मूनलाईट (बॅरी जेंकिन्स आणि टॅरेल अ‍ॅल्विन मॅकक्रेने)
*    सर्वोत्कृष्ट गीत - सिटी ऑफ स्टार्स (ला ला लँड)
*    सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - लाईनस सॅडग्रेन (ला ला लँड)
*    सर्वोत्कृष्ट संकलन (एडिटिंग) - हॅकसॉ रिज
*    सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट - द सेल्समन
*    सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - ला ला लँड
*    सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉट - पाईपर
*    सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - अराईव्हल
*    सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - द जंगल बुक
*    सर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट - सिंग

देशातील सर्वाधिक लांबीचा केबल ब्रिज भडोचमध्ये

        गुजरातमध्ये नर्मदा नदीवर भडोचमध्ये बांधलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या केबल ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर ऑक्टोबर 2014 मेमध्ये पुलाचे काम सुरू झाले.

*    1344 मीटर लांब व 20.8 मीटर्स रुंदीच्या या केबल पुलाचे काम 2 वर्षांत पूर्ण झाले असून त्यासाठी 379 कोटींचा खर्च झाला आहे. यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर भडोच येथे होणारी वाहतूक कोंडी दूर होईल.

*    मुंबईतल्या वरळी-वांद्रे येथील सी लिंक पुलासारखा दिसणारा हा भव्य केबल ब्रिज इंग्रजी वाय आकाराच्या 10 स्तंभाह्णवर उभा असून प्रत्येक स्तंभ 18 मीटर्स उंचीचा आहे.

*    स्ट्रेच तंत्रज्ञानानुसार एकुण 216 केबल्स या पुलासाठी वापरल्या आहेत. प्रत्येक केबलची लांबी 25 ते 40 मीटर्सच्या दरम्यान आहे. 17.4 मीटर रुंदीच्या 4 लेन रस्त्यासह 3 मीटर्स रुंदीचे भव्य फुटपाथ पुलाच्या दोन्ही बाजूला आहेत.

*    पुलावर 400 पेक्षा अधिक एलईडी दिव्यांची रोषणाई आंतरराष्ट्रीय दर्जानुसार करण्यात आली आहे.

दोन तृतीयांश भारतीय लाच मागतात

        ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या लाचलुचपत विरोधी  आंतरराष्ट्रीय संघटनेने हा अहवाल तयार केला असून या अहवालात दोन-तृतीयांश भारतीय लोकांकडून एखादे काम करून देताना त्यांना लाच द्यावी लागते, असे म्हटले आहे. 16 देशांतील 20 हजार प्रतिनिधींनी या सर्वेक्षणासाठी लोकांची मते नोंदवली. यामध्ये 90 कोटी लोकांना गेल्या वर्षभरात निदान एकदातरी लाच दिल्याचे म्हटले आहे.

‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’अहवालातील नोंदी-

*    आशियाई-पॅसिफिक प्रदेशातील लाचखोरांचे सर्वाधिक मागणार्‍या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे.

*    भारतात 69 टक्के लोक लाच मागतात. व्हिएतनाममध्ये लाच मागणार्‍यांचे प्रमाण 65 टक्के आहे. चीन व पाकिस्तान मध्ये हे प्रमाण अनुक्रमे 26 आणि 40 टक्के आहे. 

*    जपानमध्ये लाचखोरीचे प्रमाण अगदी नगण्य म्हणजे 0.2 टक्के तर दक्षिण कोरियात हे प्रमाण 3 टक्के इतके आहे. 

भारतातील 30 टक्क्यांपेक्षा अधिक युवक बेरोजगार

        ओसीईडीच्या अहवालानुसार यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7% आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा आलेख चढता असला तरीही देशातील रोजगाराच्या संधी वाढत नाहीत.

ओसीईडीच्या अहवालातील नोंदी -

*    भारतीय अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढत आहे. मात्र रोजगाराची भारतातील स्थिती वाईट आहे.

*    देशातील नोकर्‍यांचे प्रमाण कमी असल्याचे ओसीईडीचा अहवाल सांगतो. जगातील इतर देशांमधील स्थिती मात्र नेमकी उलट आहे. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग कमी असला तरी, या देशांमधील रोजगाराचे प्रमाण मात्र वाढते आहे.

*    देशातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील 30 टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांकडे रोजगार आणि पुरेसे शिक्षण किंवा रोजगाराभिमुख प्रशिक्षण नसते. ही आकडेवारी ओसीईडीच्या सरासरी मापदंडाच्या दुप्पट तर चीनच्या तीनपट आहे.

*    बेरोजगारी आणि अपुरे शिक्षण झालेला युवा वर्ग ही भारतासमोरील मोठी समस्या आहे.

*    भारताची लोकसंख्या वेगाने वाढते आहे. मात्र त्या तुलनेत रोजगाराच्या संधी वाढत नाहीत.

*    देशातील 30% तरुण बेरोजगार

*    चांगल्या नोकर्‍या उपलब्ध नसल्याने देशातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. नोकर्‍यांची उपलब्धता नसल्याने तरुण वर्गाकडून शिक्षणाला फारसे प्राधान्य दिले जात नाही.

*    भारतातील व्यवस्थेला रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात अपयश येते आहे.

*    भारतातील कामगार कायदे अतिशय जटिल आहेत. शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रातील कामगिरी निराशाजनक आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील नियम-कायदे अतिशय अडचणीचे आहेत.

*    विद्यमान केंद्र सरकारकडून रोजगारवाढीचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारकडून सरकारी प्रशासनातील पारदर्शकतेसाठी पावले उचलली जात आहेत.

आधार कार्डशी जोडलेल्या 85 योजना

         यूपीए सरकारने आणलेल्या आधार कार्डची उपयुक्तता समजल्यानंतर मोदी सरकारने या कार्डचा सर्वच क्षेत्रात वापर वाढवण्याचे ठरवले आहे. देशभरात 1 अब्जापेक्षा अधिक नागरिक आधार कार्डधारक आहेत. म्हणजेच देशात जवळजवळ 85 टक्के लोकांकडे आधारकार्ड आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही 85 सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित रहाल.
मध्यान्ह भोजन आणि सर्व शिक्षा अभियानासह अन्य 40 सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्ड सक्तीचे केले आहे. या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जून पर्यंत आधार कार्ड बनवून घ्येण्याचे आवाहन सरकार तर्फे करण्यात आले आहे.
          एका सरकारी अधिकार्‍याच्या माहितीनुसार, प्रत्येक राज्यामध्ये पाच ते 18 वर्षापर्यंतच्या 75 टक्के मुलांकडे आधारकार्ड आहेत. जेव्हापासून आधारकार्ड सक्तीचे केले आहे तेव्हापासून सर्व तरुणांसह वयस्कराकडे आधार कार्ड आहे. ज्या मुलांकडे आधारकार्ड नसेल त्यांनी 30 जूनपर्यंत शाळेमार्फत बनवून घ्यावे. अन्यथा मध्यान्ह भोजन आणि सर्व शिक्षा अभियाना सारख्या सर्वच सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागेल. भविष्यामध्ये सबसिडीमार्फत येणार्‍या 84 सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड सक्तीचे असेल. ज्यांच्याकडे आधारकार्ड नसेल त्यांनी 30 जूनपर्यंत बनवून घ्यावे व ते जमा करावे. अन्यथा त्यापासून तुम्ही वंचित रहाल.
आधारद्वारे लाभ घेत असलेल्या काही योजना -
*    राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम
*    दीनदयाल अंत्योदय योजना
*    एलपीजी सबसिडी
*    सामाजिक न्याय मंत्रालयाने शिष्यवृत्तीच्या 6 वेगळ्या योजनासाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे.
*    आंतरजातीय विवाहानंतर मिळणार्‍या आर्थिक लाभासाठी आधारकार्ड सक्तीचे.
*    ऑनलाइन रेल्वे तिकिटासाठी आधारकार्ड सक्तीचे
*    सेवानिवृत्त झालेल्या केंद्रीय कर्मचार्‍यांना पेन्शन आणि पीएफसाठी आधार कार्ड.
*    आधारकार्ड असल्यास फक्त रुग्णालयच नाही तर फार्मा लॅब आणि पॅथलॉजीमध्ये तुम्ही रुग्णाची माहिती देऊ शकता.
*    तिरुपती बालाजी मंदिरात अंगप्रदक्षिणम याच्या बुकिंगसाठी आधार कार्ड नुकतंच अनिवार्य करण्यात आले आहे. याचा फायदा असा आहे की, एकच व्यक्ती वारंवार अंगप्रदक्षिणम करू शकणार नाही. कारण की, यासाठी भाविकांची बरीच गर्दी असते.
*    मोदी सरकारने डिजिटल इंडियाच्या अंतर्गत डिजिलॉकर ही नवी योजना सुरु केली आहे.
*    म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे.
*    ट्रान्सपोर्ट - आंध्रप्रदेशमध्ये गाड्यांचे बुकिंग सर्टिफिकेट, लर्निंग लायसेंस, चालक परवाना आणि वाहनांच्या मालकी हक्क बदलण्यासाठी जुलै 2015 पासून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले.
*    लवकरच विमा हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. त्यामुळे ई-कॉमर्स वेबसाइटवरही विमा मिळणार आहे. विमा कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की, ई-केवायईसीला ई-आधारच्याद्वारे जोडता येईल

आकड्यांची उत्तरे किती खरी?

         एका बाजूला ‘जीव्हीए’ म्हणजे सकल मूल्यवर्धन (ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड) आणि ‘जीडीपी’ म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) या दोहोंचे आकडे वाढलेले आहेत, तर दुसरीकडे आपल्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक खालावली आहे, उत्पादनवाढ फारशी नाही आणि रोजगारनिर्मितीलाही वेग नाही.
            ‘केंद्रीय सांख्यिकी संस्था’ किंवा ‘सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन (‘सीएसओ’) ही एक महनीय संस्था आहे. डॉ. प्रणब सेन हे तिचे माजी प्रमुख सांख्यिकी अधिकारी तसेच डॉ. टी. सी. अनंत हे विद्यमान प्रमुख सांख्यिकी अधिकारी, हे दोघेही आदरणीय व्यक्ती आहेत.
चालू आर्थिक वर्षांच्या तिसर्‍या तिमाहीत, म्हणजे ऑक्टोबर 2016 ते डिसेंबर 2016 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट- ‘जीडीपी’) 7 टक्क्यांनी वाढल्यामुळे चालू आर्थिक वर्ष 31 मार्च 2017 रोजी संपेल तोवर या वर्षभरातील आपला आर्थिक वाढदर 7.1 टक्क्यांवर पोहोचलेला असेल, असा निर्वाळा डॉ. अनंत यांनी दिला आहे. तर डॉ. सेन यांनी याच आकड्यांचा पुनराभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की, मुळात माहितीच अपुरी असल्यामुळे आर्थिक वाढ दराबद्दलचे अंदाजही बदलावे लागतील आणि तो फार तर 6.5 टक्के असेल.
डॉ. सेन आणि डॉ. अनंत यांच्या निष्कर्षांकडे पुन्हा पाहिले आणि त्या दोहोंतूनच खरे कोण ठरेल याचा विचार केला, तर डॉ. सेन यांच्या निष्कर्षांच्या बाजूने झुकण्यासाठी पुरेशी कारणे आहेत.
* अर्थव्यवस्थेचे मंदावणे -
             2016-17 या आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला, यंदाचा वाढदर 7.6 टक्के असेल असा दावा सरकारने केला होता. तो  निश्‍चलनीकरणानंतर 7 टक्के होणार आहे. 0.6 टक्क्यांवर पाणी सोडणे म्हणजे आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात 90 हजार कोटी रुपयांची घट होणे. जर हाच वाढदर 6.50 टक्क्यांवर पोहोचला तर 1,65,000 कोटी रुपयांचा फटका बसेल.
             मापनाची निराळी पद्धत सुरू करण्याचा बदल लागू झाल्यानंतर, ‘जीव्हीए’ म्हणजे सकल मूल्यवर्धन (ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड) आणि ‘जीडीपी’ म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) या दोहोंचे आकडे केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे प्रकाशित केले जातात. यापैकी ‘जीव्हीए’ हे अनुमान असते आणि ‘जीडीपी’ मात्र कर-महसुलाची बेरीज आणि अनुदानांची वजाबाकी करून मग काढला जातो.
 गेल्या 3 वर्षांमधील ‘जीव्हीए’ ची वाढ -

 2014-15  2015-16 2016-17
पहिली तिमाही7.26   7.756.89*
दुसरी तिमाही 7.916.69*
तिसरी तिमाही  6.29   6.95 6.61*
चौथी तिमाही 6.19 7.42 ?
संपूर्ण वर्ष 6.94 7.83  6.67

   
(अंदाजित)
*पुनर्विलोकित

निश्‍चलनीकरणानंतर तीन बाबी अबाधित राहिल्या -
1)     सरकारी खर्चावर अनिष्ट परिणाम झाला नाही, उलट 8 नोव्हेंबर 2016 नंतर सरकारने खर्चात वाढ केली,
2)     यंदा मोसमी पाऊस चांगला झालेला असल्याने शेतीत जी काही सुगी झाली त्यावर काही परिणाम झाला नाही (म्हणजे पीक चांगले आले, जसे पाऊस चांगला असल्यास येते.)
3)     घरपट्टी, पाणीपट्टी, टेलिफोन बिले आदींच्या भरण्यावर निश्‍चलनीकरणाचा परिणाम झाला नाही, उलट या बिल-भरण्यासाठी जुन्या नोटाही चालतील, अशी मुभा देण्यात आली होती म्हणून भरणा वाढला.
गेल्या 2 वर्षांतील सरकारी खर्च, कृषिउत्पन्न आणि बिलभरणा वगळून ‘जीव्हीए’ चे आकडे -

 
    2015-16
   2016-17
पहिली तिमाही  9.26  7.35
दुसरी तिमाही 9.82 6.47
तिसरी तिमाही  9.98    5.73
चौथी तिमाही  8.76    ?


            सरकारी खर्च आणि कृषी उत्पन्न वगळता बाकी क्षेत्रांमधील मूल्यवर्धनात 2015-16 च्या अखेरच्या (जानेवारी-मार्च 2016 या) तिमाहीपासून मंदगती सुरू होती आणि ही घसरण 2016-17 मध्येही कायम होती. निश्‍चलनीकरण 2016-17 मधील तिसर्‍या तिमाहीच्या मध्यावर झाले, त्याने तर गती आणखी मंद झाली, घसरण तीव्र झाली.
            कररूपी महसुलात वाढ झाली म्हणून ते आकडे मिळवून ‘जीव्हीए’ (सकल मूल्यवर्धन) वाढेल असे नव्हे, तसेच यातून अनुदाने वजा केली की मिळाला ‘जीडीपी’चा (सकल राष्ट्रीय उत्पन्न) आकडा, असेही नव्हे. अबकारीत समजा आर्थिक वर्ष सुरू असतानाच वाढ केली असेल - जे या सरकारने यंदा केलेले आहे - तर सरकारच्या महसुलाचा आकडा वाढलेला दिसेल, पण म्हणून ‘आर्थिक वाढ झाली’ असे होत नाही. अनुदाने कमीच केली असतील, तरीही आर्थिक वाढ सुधारली असे मानता येणार नाही.
            आर्थिक वाढीचे खरे प्रतिबिंब दिसते ते अधिक गुंतवणूक, अधिक उत्पादन आणि जास्त रोजगारसंधी अशी स्थिती दाखवणारे आकडे असतील तर त्या आकड्यांमध्ये. जीव्हीए आणि जीडीपीचे जे आकडे मांडण्यात आले ते आश्‍चर्यकारकरीत्या वाढलेले दिसताहेत खरे, पण अन्य अनेक आकडे असे सांगतात की, आपल्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक खालावली आहे, उत्पादनवाढ फारशी नाही आणि रोजगारनिर्मितीलाही वेग नाही.
              सकल मूल्यवर्धनाच्या 2015-16 मधील तिसर्‍या तिमाहीच्या आकड्यांची तुलना यंदाच्या (2016-17) तिसर्‍या तिमाहीतील आकड्यांशी केल्यास खाणकाम क्षेत्र, औद्योगिक उत्पादन क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, व्यापार/हॉटेल/ वाहतूक/दळणवळण व आर्थिक सेवा या क्षेत्रांतही ‘जीव्हीए’ची वाढ 2016-17 मध्ये झपाट्याने खालावलेली दिसेल.
             ‘औद्योगिक उत्पादन निर्देशांका’त (‘आयआयपी’मध्ये) 2016-17च्या तिसर्‍या तिमाहीत वाढ झालेली दिसते, पण ती  0.2 टक्क्यांची. याच काळात (उद्योगांसाठी) बँक-कर्जे घेतली जाण्यातील वाढ नकारात्मक, म्हणजे उणे 4.3 टक्के अशी होती.
सकल राष्ट्रीय उत्पन्नातील अचल गुंतवणुकीचे प्रमाण 29.3 टक्क्यांवरून आता 26 टक्के इतके घसरले आहे. सप्टेंबर 2016 पर्यंतसुद्धा एकंदर सर्व कंपन्यांच्या अचल संपत्तीत उणे 9.36 टक्के अशी घटच झालेली होती.
                देशातील सर्व औष्णिक वीजकेंद्रांमधील क्षमता-वापराचे प्रमाण 60 टक्क्यांवर होते.
                सकल मूल्यवर्धनाचे, म्हणजे ‘जीव्हीए’चे आकडे 2016-17 च्या पहिल्या आणि दुसर्‍या तिमाहीच्या पुनरावलोकनानंतर (सुधारित अंदाजात) जसे अधोगामी झाले, तसेच खाली जाणारे आकडे तिसर्‍या तिमाहीच्याही पुनरावलोकनानंतर दिसून येतील. यातही असंघटित क्षेत्राची आकडेवारी पुनरावलोकना दरम्यान जेव्हा विचारात घेतली जाईल, तेव्हा आणखी बदल होतील आणि तेही अधोगामीच असतील.

ऑलिव्ह रिडले कासव

            6 लाख एवढ्या विक्रमी संख्येतील ऑलिव्ह रिडले कासवांनी गहीरमाथा समुद्र किनार्‍यावरील वाळूत यावर्षी अंडी घातली. परंतु जागेच्या प्रचंड टंचाईमुळे कित्येक दशलक्ष अंडी कासवांनी नष्ट केली.
             22 फेब्रुवारी रोजी हा सामूहिक अंडी घालण्याचा महिना सुरू झाला. त्याला अर्रीबादा (कासवांच्या जातींनी मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यास स्पॅनिश भाषेत अर्रीबादा) म्हणतात . या किनार्‍यावर मनुष्यवस्ती नाही. 2 मार्चच्या रात्रीपर्यंत या ठिकाणी 6,4,641 ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली होती.
            या जातीच्या कासवांनी 7 कोटींपेक्षा जास्त अंडी घातली. तथापि, 3 कोटींपेक्षा जास्त अंड्यांची हानी झाली.
            1 किलोमीटर लांबीच्या या किनार्‍यावर कासवांना अंडी घालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे परंतु ते अंडी घालण्यासाठी विशिष्ट जागेचीच निवड करतात. त्याचा परिणाम किनार्‍यावर जागेची टंचाई निर्माण झाली.
            ही अंडी नेहमी नष्ट करणारे तरस किंवा कोल्ह्यांचे कृत्य नाही नाही तर स्वत: कासवांनी ती मोठ्या प्रमाणावर नष्ट केली आहेत. अंडी घालण्यासाठी योग्य जागेची निवड करताना आधीच घातलेली दश लक्षावधी अंडी कासवांनी नष्ट केली.

हत्तीला पुरते फक्त 2 तासांची झोप

            प्राण्यांच्या जगात सगळ्यात जास्त ज्याची स्मृती टिकून राहते त्या हत्तीला ही स्मृती टिकवून ठेवण्यासाठी पूर्ण आठ तासांच्या झोपेची गरज नाही. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांच्या एका तुकडीने दिलेल्या माहितीनुसार जंगली हत्ती एका रात्री सरासरी फक्त 2 तास झोप घेतो व ही झोप ज्या प्राण्यांच्या झोपेची रीतसर नोंद आहे त्या कोणत्याही प्राण्यांच्या झोपेपेक्षा कमी आहे. हा निष्कर्ष आश्‍चर्यकारक आहे कारण हत्ती हे त्यांच्या प्रदीर्घकाळ असणार्‍या स्मृतीसाठी ओळखले जातात व स्मृती आणि झोप यांचा परस्परांशी संबंध असल्याचे अभ्यासाने दाखवले आहे. हत्तींच्या हालचाली व माग काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी फिटबिटसारखे साधन वापरले. हे साधन हत्तीच्या सोंडेला जोडण्यात आले. सोंड जेव्हा 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ स्तब्ध राहिली की शास्त्रज्ञांनी आता हत्ती झोपला, असे मानले. या तुकडीने सुमारे महिनाभर 2 मादी हत्तींचे निरीक्षण केले. त्यात त्या दोन तासांपेक्षा कमी झोप घेतात व दोन दिवस झोपही घेत नाही, असे दिसले. आफ्रिकन हत्ती हे पृथ्वीवर सगळ्यात कमी झोप घेणारे सस्तन प्राणी आढळले. कमी झोप घेण्याचा संबंध हा हत्तींच्या मोठ्या आकाराशी असल्याचे या अभ्यासात आढळले आहे.

अल निनो

         ऑस्ट्रेलियन ब्यूरो ऑफ मेटेओरॉलॉजीच्या (एबीएम) माहितीनुसार 2017 मध्ये अल निनो आकाराला येणे वाढले आहे. एबीएमने पाहणी केलेल्या 8 पैकी 6 नमुन्यांनी अल निनोची सुरवात जुलै 2017 मध्ये होण्याची शक्यता दाखवली आहे. यावर्षी अल निनो परिस्थिती घडण्याची साधारणत: 50 टक्के असेल.
*    अल निनो ही हवामानाची एक अवस्था आहे व तिचा भारताच्या पर्जन्य हंगामावर मोठा परिणाम होतो. सामान्य पाऊस होणे हे देशाच्या शेतीसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण देशातील फार मोठी शेतजमीन ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे भारताच्या मान्सूनबद्दल काहीशी काळजी व्यक्त होत आहे.
*    देशात जून ते सप्टेंबर असा पावसाळा असतो व अल निनो परिस्थिती ही सामान्यापेक्षा खालच्या पावसाशी संबंधित आहे.
*    2017 मध्ये अल निनोच्या रचनेची जी शक्यता दिसते त्यामुळे भारतातील पावसाबद्दल काहीशी काळजी वाटेल परंतु पाऊस आणि पिकांवरील नेमका परिणाम हा काही फक्त एवढ्या या एकाच घटकावर अवलंबून नाही.
*    देशात अल निनोचा प्रारंभ पावसाळ्यात जेव्हा सरासरीने तोडला गेला तेव्हा भारतात फक्त पाचवेळा (1987, 1991, 2002, 2004, 2015) सामान्यापेक्षा खालचा पाऊस झाला तर तीन वेळा सामान्य पाऊस झाला.
*    1994 मध्ये सामान्यापेक्षा वर पाऊस झाला. याशिवाय अल निनोच्या कालावधीचाही कृषी क्षेत्रावर परिणाम होत असतो. पेरणी झाल्यावर जुलैमध्ये अल निनो आला तर त्याचा अन्नधान्य उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.
*    2017 मध्ये सामान्यापेक्षा खाली पाऊस होण्याची शक्यता ही सामान्य वर्षात सामान्यापेक्षा वर पाऊस होण्याच्या शक्यतेपेक्षा जास्त आहे. तथापि, पाऊस आणि अन्न उत्पादनावरील नेमका परिणाम हा इतर अनेक घटकांवर अवलंबून आहे.

जायंट पांडाच्या काळ्या-पांढर्‍या रंगाचे रहस्य

         जायंट पांडाच्या अंगावरील कातडी ही विशेषत्वाने, काळी आणि पांढरीच का असते हे आम्ही शोधून काढले असल्याचा दावा डेव्हिस येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी केला आहे. या आठवड्यात ‘बिहेव्हियरल इकॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात म्हटले आहे की पांडांच्या अंगावरील लव (फर) ही शत्रूला फसवण्यासाठी आणि संपर्कासाठी वापरली जाते. प्रो. टिम कॅरो हे या अभ्यासाचे प्रमुख आहेत. ते म्हणाले की पांडांच्या रंगाचा शोध घेणे हे यापूर्वी खूप अवघड होते, कारण तेव्हा तुलनेसाठी, असे जीवच नव्हते. जायंट पांडांचा रंग असा विलक्षण का हे समजून घेणे हे फार दिवसांपासून जीवशास्त्राला पडलेले कोडे होते कारण तुलनेसाठी अशा रंगाचा प्राणी उपलब्ध नव्हता.
         संशोधकांनी जायंट पांडाच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवावरील फरची तुलना मांसभक्षी 195 जाती आणि अस्वलाच्या वर्गातील 39 जीवांच्या फरशी केली. त्यात पांडाचा पांढरा चेहरा, गळा, पोट आणि पार्श्‍वभागाचा उपयोग त्यांना बर्फाळ ठिकाणी लपण्यासाठी तर काळे हात व पाय सावलीत लपण्यासाठी मदत करतात, असे दिसले.

चीन विमानाने करणार ’उपग्रह प्रक्षेपण’

         अवकाश संशोधनात आपण पिछाडीवर पडू नये यासाठी चीनने आपल्या अवकाश संशोधन कार्यक्रमाला चांगलीच गती दिली आहे. चीन सध्या विमानातून थेट अवकाशात रॉकेट पाठवण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करत आहे. सरकारी चिनी वर्तमानपत्राने अधिकार्‍यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
          लष्करी, व्यावसायिक आणि वैज्ञानिक उद्दिष्ट्यांसाठी शेकडो उपग्रह अवकाशात पाठवण्याची चीनची योजना आहे. चीनच्या लाँच व्हेईकल टेक्नोलॉजी प्रबोधिनीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये 100 किलो भार वाहून नेऊ शकणार्‍या रॉकेटचे डिझाईन तयार केल्याची माहिती ली टॉनग्यु यांनी दिली. ध-20 या चीनच्या वाहतूक विमानाने हे रॉकेट वाहून नेता येईल.
         एका ठरावीक उंचीवर हे रॉकेट विमानापासून वेगळे झाल्यानंतर प्रज्वलित होऊन अवकाशाच्या दिशेने प्रवास सुरु करेल असे ली यांनी सांगितले. विमानातून रॉकेट लाँचिंग हा जमिनीवरून प्रक्षेपकाद्वारे उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या पारंपारिक पद्धतीला एक पर्याय आहे. यामुळे वेळापत्रक आणि अनुकूल वातावरणावर अवलंबून राहावे लागणार नाही.  
         चीनची एप्रिल महिन्यात कार्गो स्पेसक्राफ्ट लाँच करण्याची योजना आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चीनच्या अवकाश कार्यक्रमाला प्राधान्य दिले आहे. चीनकडून प्रयत्न सुरु असले तरी, त्यांचा अवकाश कार्यक्रम अजूनही अमेरिका आणि रशियापेक्षा पिछाडीवर आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा प्रदूषण अहवाल

         जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या अहवालानुसार घर आणि बाहेरील प्रदूषित हवा, अप्रत्यक्ष धूम्रपान, असुरक्षित पाणी, स्वच्छतेचा अभाव यामुळे दरवर्षी 5 वर्षांखालील 17 लाख बालके प्राण गमावतात.
* अहवालातील नोंदी -
*     1 महिना ते 5 वर्षांदरम्यानच्या बहुतांश बालकांचे मृत्यू मलेरिया, न्यूमोनिया आणि डायरियामुळे होतात. सुरक्षित पाणी आणि स्वयंपाकाच्या स्वच्छ इंधनाचा वापर करून हे आजार टाळता येऊ शकतात.
*     प्रदूषणामुळे मुदतपूर्व प्रसूतीचाही धोका असतो. घर आणि बाहेरील प्रदूषणाशी संपर्क, तसेच अप्रत्यक्ष धूम्रपान यामुळे बालकांना बालपणी न्यूमोनिया होऊ शकतो, तसेच पुढे चालून त्यांना दम्यासारखा श्‍वसनविकार जडण्याचीही शक्यता असते. प्रदूषित हवेच्या श्‍वसनामुळे त्यांना हृदयरोग, मस्तिष्काघात आणि कर्करोग होण्याचा जीवनभर धोका असतो.
*     5.70 लाख बालकांचा न्यूमोनिया यासारख्या श्‍वसनप्रणालीच्या संसर्गामुळे मृत्यू होतो. प्रदूषित हवा, तसेच धूम्रपान करणार्‍यांचा संपर्क यामुळे हे होते.
*     2.70 लाख बालकांचा मुदतपूर्व प्रसूती, प्रदूषणांमुळे होणारे संसर्ग यामुळे मृत्यू होतो. आरोग्य केंद्रांत स्वच्छ पाणी, स्वच्छता, प्रदूषण कमी करण्याने हे मृत्यू टाळू शकतो.
*     2 लाख मुलांचा दरवर्षी मलेरियामुळे मृत्यू होतो. डासांची उत्पत्तीस्थाने कमी करून तद्वतच पिण्याचे पाणी झाकून ठेवून आपण हे मृत्यू टाळू शकतो.
*     2 लाख मुले उंचावरून पडून, विषबाधा होऊन किंवा पाण्यात बुडून दरवर्षी मृत्युमुखी पडतात.
*     प्रदूषित पर्यावरण वाढत्या वयातील मुलांसाठी अधिक घातक आहे. विकसित होत असलेले अवयव आणि रोगप्रतिकारक प्रणाली, तसेच छोटा श्‍वसनमार्ग यामुळे मुलांना प्रदूषित हवा आणि पाण्याची पटकन बाधा होते.
*     मार्गारेट चॅन, महासंचालक, जागतिक आरोग्य संघटना
*     डॉ. मारिया नैरा, संचालक, जागतिक आरोग्य संघटना

500 अणुचाचण्या

         कझाकिस्तानच्या ‘द पॉलिगन’चा इतिहास भयंकर आहे. 1949 ते 1989 यादरम्यान येथे दरवर्षी सरासरी 10 अणुचाचण्या घेण्यात आल्या. आता त्यांचे दुष्परिणाम दिसत आहेत. शीतयुद्धादरम्यान सोव्हिएत रशियाने अणुचाचणीसाठी येथे सर्वात मोठे केंद्र उभारले होते. सोव्हिएतने येथे 456 अणुबॉम्बची चाचणी घेतली. ‘द पॉगिलन’ म्हणून हे स्थळ ओळखले जाते. कुअरशाटोफ हे येथील मुख्य शहर आहे. रशियन भौतिकशास्त्रज्ञ आयगोर कुअरशाटोफ यांच्या कार्याचा गौरव म्हणून या शहराला त्यांचे नाव देण्यात आले आहे. कुअरशाटोफ यांनी सोव्हिएतच्या अणुकार्यक्रमाचे नेतृत्व केले होते.
          सर्बियाच्या तुलनेत हा भाग मेक्सिकोच्या जवळ असल्यामुळे त्याची अणुचाचण्यांसाठी निवड करण्यात आली. या भागात लोक राहत नव्हते. येथील जमीनही गरजेपेक्षा अधिक कडक आहे. त्यामुळेच रशियन शासक निकोलसने (प्रथम) 1854 मध्ये सरकारविरुद्ध बोलणारे लेखक फ्योदोर दोस्तोवस्की यांना निर्वासित करून या भागात आणून सोडले होते. ही जागा निर्मनुष्य होती, असे सांगण्यात येत असले तरी 1947 मध्ये येथे 70 हजार लोक राहत होते. त्यात कारिप्बेक कुयुकोव यांचाही समावेश आहे. ते रशियन अणुचाचण्यांचा परिणाम भोगत आहेत. अणुचाचणीनंतर येथे आरोग्याची समस्या निर्माण झाली. नवनवे रोग उत्पन्न होऊ लागले. कॅन्सर साथरोगासारखा पसरला. काही लोकांनी तर आपले कुटुंबीय आणि मुलांसह आत्महत्या केली.

मुद्रीघोडा (सी हॉर्स)

         मानव, पक्षी, किडे किंवा प्राणी असेल. मुलांना जन्म देण्याची क्षमता केवळ मादीकडे आहे. मात्र, यालाही एक अपवाद आहे. होय समुद्रीघोडा (सी हॉर्स) हा जगातील एकमेव असा जीव आहे जो नर असूनही मुले जन्माला घालण्यास सक्षम आहे. सी हॉर्स एक प्रकारचा मासा असून, तो घोड्यासारखा दिसतो. जगभरात सी हॉर्सच्या तीन डझन प्रजाती असून, त्यांचे सरासरी आयुर्मान 1 ते 5 वर्षे असते. 15 ते 35 सें.मी. एवढी लांबी असलेला हा मासा जगातील सर्व समुद्रांत 1 ते 15 मीटर एवढ्या खोलीवर उष्ण आणि उथळ पाण्यात आढळून येतो. तो सरड्याप्रमाणे रंग बदलतो आणि डोळ्याच्या चारही बाजूंना पाहू शकतो. सी हॉर्सची मादी तिची अंडी नराच्या पिशवीत टाकते. त्यानंतर 10 दिवस ते 6 महिन्यांच्या काळात पिलांचा जन्म होतो. सी हॉर्सपासून अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

         केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2011 ते 2015 या काळात केलेल्या सर्वेक्षण आणि चाचण्यात राज्यातील 17 शहरांतील हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर 10’ या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्‍चित पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचे आढळून आले.
*    केंद्राच्या सर्वेक्षणानुसार, देशातील सर्वाधिक प्रदूषित 94 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश आहे.
*    मुंबईसह नागपूर, नवी मुंबई, उल्हासनगर, बदलापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव या राज्यातील 17 शहरातील हवा आरोग्यासाठी हानिकारक आहे.
*    मुंबई शहर आणि उपनगरांत मोटारींमुळे शहरात दररोज 900 टन वायुप्रदूषण होत आहे.
*    उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत आहेत. त्यातील 80 टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे. याचे कारण म्हणजे संबंधित ठिकाणांवरील वाढती लोकसंख्या, बांधकाम प्रकल्प, कारखाने आणि उर्वरित घटक होय.
*    महाराष्ट्रानंतर प्रदूषणात उत्तर प्रदेशचा नंबर आहे. उत्तर प्रदेशातील 15 शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत.
*    पंजाबमधील 8, हिमाचल प्रदेशामधील 7 शहरांचा समावेश आहे.
*    आंध्र प्रदेशातील 5 शहरे, कर्नाटकातील 4 आणि गुजरातमधील सुरत, तामिळनाडूमधील तुतीकोरीन प्रदूषित आहेत.

हात स्वच्छ करण्याची उत्पादने मुलांसाठी घातक

         अमेरिकेतील ‘रोग नियंत्रण आणि काळजी’ या केंद्रातील संशोधकांच्या मते, हात स्वच्छ करणारी अल्कोहोलवर आधारित उत्पादने लहान मुलांसाठी असुरक्षित आहेत. यावर उपाय म्हणून हात स्वच्छ धुण्यासाठी इतर उत्पादनांचा वापर करण्याऐवजी पाणी किंवा साबणाचा वापर करावा. आणि पुढील आरोग्याला होणारा धोका टाळावा. यासाठी पालकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
        अमेरिकेतील अल्कोहोलवर आधारित हात स्वच्छ करणारी उत्पादने वापरत असल्याचा 6 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांची माहिती गोळा करण्यात आली. ही माहिती 2011 ते 2014 या दरम्यानची होती. 2011 ते 2014 दरम्यान जवळपास 70,669 हात स्वच्छ करणारी उत्पादने वापरण्यात आली. यातील 92 टक्के म्हणजे जवळपास 65,293 उत्पादनांमध्ये अल्कोहोल आढळून आले. तर 5,376 म्हणजेच 8 टक्के उत्पादनांमध्ये अल्कोहोल आढळून आले नाही.
*    हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी व अल्कोहोलवर आधारित सुगंधी द्रव्याची आकर्षित करणारी उत्पादने मुले गिळतात. त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. पोटातील वेदना, मळमळ आणि अगदी ग्लानी येण्याची शक्यता यामुळे निर्माण होते.
*    अल्कोहोलवर आधारित हात स्वच्छ करणारी उत्पादने मुलांसाठी घातक असून, यामुळे मुलांची श्‍वसनक्रिया बंद पडणे, आम्लपित्त होणे असेच ग्लानी येण्यासारखे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.
*    शरीरावर प्रतिकूल परिणाम करणार्‍या या उत्पादनांमुळे आरोग्य बिघडू शकते.

जागतिक हवामान स्थिती 2017

         ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ या अमेरिकास्थित स्वायत्त जागतिक आरोग्य संशोधन संस्थेच्या अभ्यासातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत. मात्र  सदर ‘जागतिक हवामान स्थिती 2017’ हा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मात्र फेटाळला आहे.
या अहवालानुसार...
*    भारतात प्रदूषणाचे बळी ठरणार्‍यांचे प्रमाण 1990 मध्ये दर 1 लाख लोकसंख्येमागे 165 एवढे होते. त्यात घट होऊन 2010 मध्ये ते 135 वर आले, मात्र त्यानंतरच्या 5 वर्षांत हे प्रमाण जवळपास तेवढेच राहिले.
*    सौदी अरेबिया आणि बांगलादेशाच्या तुलनेत भारतातील हवेचा दर्जा चांगला आहे.
*    चीनच्या तुलनेत भारतातील हवा 50 टक्के अधिक प्रदूषित आहे.
*    दक्षिण आफ्रिकेच्या दुप्पट आणि इंग्लंडच्या पाचपट वाईट आहे.
*    ज्या पाच देशांतील हवेचा आणि त्यामुळे आरोग्यावर होणार्‍या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यात आला, त्यात प्रदूषणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.
*    हार्वर्ड विद्यापीठात 2015 साली झालेल्या अभ्यासानुसार या पीएम 2.5 मुळे भारतात दरवर्षी 6 लाख, 45 हजार व्यक्तींना जीव गमवावा लागतो.
*    गेली पाच वर्षे भारतीयांसाठी सर्वाधिक गुदमरवणारी ठरली. या कालावधीत देशातील हवेचा दर्जा अभूतपूर्व वेगाने घसरला.
*    दरवर्षी 1 दशलक्ष भारतीय प्रदूषणाच्या दुष्परिणामांमुळे मृत्युमुखी पडतात.
*    प्रदूषण वाढत असल्याने मधुमेह किंवा हृदयविकाराप्रमाणेच जीवघेणे ठरू लागले.
*    पीएम 2.5 म्हणजे काय?
        पीएम म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर. हे कण मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. 2.5 मायक्रोमीटरपेक्षा सूक्ष्म असे हे कण श्‍वासातून फुप्फुसांपर्यंत खोल जातात आणि त्यांच्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघातासारखे प्राणघातक आजार होऊ  शकतात. या कणांचा आकार माणसाच्या केसाच्या 30 व्या भागाएवढा लहान असतो.
* जीवघेणे पीएम 2.5 -
        जिथे पीएम 2.5चे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. अशा हवेत साधारण अर्धे जग जगत आहे. त्याचे सर्वाधिक प्रमाण असणार्‍या भागांपैकी जवळपास 86 टक्के भाग हा चीन, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात मोडतो. प्रत्यक्षात कतार, सौदी अरेबिया आणि इजिप्तमध्ये सर्वाधिक प्रदूषित हवा आहे, मात्र तेथे मानवनिर्मित कारणांपेक्षा नैसर्गिक कारणांमुळे म्हणजेच धुळीमुळे अधिक प्रदूषण होते. तो प्रदेश वाळवंटी असल्यामुळे तिथे ही समस्या भेडसावते. एकंदर भारतीय उपखंडातच मानवनिर्मित कारणांमुळे होणारे प्रदूषण अधिक आहे.
        शेतातील पालापाचोळा जाळणे, वाहने आणि वीजनिर्मिती प्रकल्प ही यामागची मुख्य कारणे. पीएम 2.5मुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण 2012 ते 15 या दरम्यान तब्बल 40 टक्क्यांनी वाढले. 2012मध्ये या कारणामुळे 3 दशलक्ष व्यक्तींना प्राण गमवावे लागले, हे प्रमाण 2015मध्ये 4.2 दशलक्षांपर्यंत वाढले. विकसित देशांमध्ये सर्वसामान्य व्यक्तीचे आरोग्यसंपन्न आयुष्य 60 वर्षे असते, मात्र विकसनशील देशांत 15 ते 44 या वयोगटाच्या आरोग्यावर प्रदूषणाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत, असे 1997 मध्ये जागतिक बँकेने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
        2010 पासून सौदी अरेबियातील हवेचा दर्जा सुधारण्याचे प्रमाण हे भारतातील हवेचा दर्जा खालावण्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. हवेतील सल्फर, नायट्रोजन आणि कार्बनच्या कणांमुळे, विशेषत: पीएम 2.5 मुळे (पार्टिक्युलेट मॅटर) होणारे प्रदूषण हे हृदयरोग, मधुमेहानंतरचे जगभरातील मृत्यूंचे पाचवे मोठे कारण असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ज्या हवेत आपण सतत वावरतो तिच्यात दडलेले हे जीवघेणे सूक्ष्म कण कमी व्हावेत म्हणून गांभीर्याने प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.
* अहवाल फेटाळला, प्रदूषणवाढ मान्य -
         या अहवालातील निष्कर्ष विशेषत: प्रदूषणामुळे देशात दरवर्षी एक दशलक्ष व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरणमंत्री अनिल दवे यांनी 22 फेब्रुवारीला फेटाळला. भारतात वायुप्रदूषणाविषयी गांभीर्याने अभ्यास करणार्‍या अनेक सरकारी, बिगरसरकारी संस्था आहेत. स्वत:विषयी अभिमान बाळगणारा देश नेहमी स्वत:कडील माहितीवर विश्वास ठेवतो आणि त्यानुसार कृती करतो. हवेचा दर्जा राखणे हे काही रॉकेट सायन्स नाही. राज्यांची सरकारे आणि तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी हवेचा दर्जा राखण्यासाठी काय करायला हवे, हे अनेकदा सांगून झाले आहे, यापुढेही ते सांगितले जाईल, असे म्हणत दवे यांनी अहवाल फेटाळला असला, तरी त्यांच्या मंत्रालयाकडे प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची आणि आलेल्या अपंगत्वाची आकडेवारी स्पष्ट करणारा कोणताही अहवाल उपलब्ध नाही. त्यांच्या अधिकार्‍यांनीही ते मान्य केले आहे. देशातील हवेचा दर्जा खालावत आहे, याबाबत मात्र दुमत असल्याचे दिसत नाही. विशेष म्हणजे खुद्द पर्यावरण मंत्रालयानेच 22 फेब्रुवारीला निकृष्ट हवा असलेल्या 94 शहरांची यादी प्रसिद्ध केली होती.

रुधिरशास्त्रातील मोजमापे

         सी.बी.सी. म्हणजे संपूर्ण रक्तघटकांची तपासणी करताना लोहित रक्तकणिका म्हणजेच तांबड्या रक्तपेशी, श्‍वेत रक्तकणिका किंवा पांढर्‍या रक्त पेशी आणि प्लेटलेट्स म्हणजेच रक्तिबबिका या तिन्ही रक्त पेशींचे मोजमाप केले जाते. तसेच हिमोग्लोबिन, हिमाटोक्रीट, MCV, MCH, MCHC, RDW   आणि चझत अशा काही चाचण्यादेखील संपूर्ण रक्त तपासणीत केल्या जातात. यांच्या मापनावरून आरोग्याची कल्पना येऊ शकते, तसेच काही व्याधी असतील, तर त्याचीही सूचना मिळू शकते. यामुळेच रोगनिदानशास्त्रात रुधिरशास्त्राला आता अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे.
           जवळपास प्रत्येक रुग्णाची सीबीसी ही रक्ततपासणी केली जाते. हिमाटोक्रीट किंवा  PCV (packed cell volume)  या मापनात संपूर्ण रक्तात असणार्‍या लोहित रक्तपेशींची घनता समजते. MCV (Mean Corpuscular Volume) म्हणजेच लोहित रक्त कणिकांचे सरासरी आकारमान. याचे मापन फेम्टोलिटरमध्ये केले जाते.
         1 फेम्टोलिटर हे 10-15 लिटर किंवा एक घन मायक्रोमीटर इतके असते. पंडुरोग, थालासेमिया, जीवनसत्त्व इ 12 ची कमतरता आणि कर्करोगाच्या उपचारासाठी घेतली जाणारी केमोथेरपी यात चउत चे प्रमाण बदलते.
        Mean Corpuscular Hemoglobin (MCH)  या मोजमापानुसार प्रत्येक लोहित रक्तकणिकेत असणारे हिमोग्लोबिनचे प्रमाण समजते. हे मोजमाप पिकोग्राम (1 पिकोग्राम =10-15 किलोग्राम) मध्ये केले जाते. सर्व रक्तपेशीत असणारे सरासरी हिमोग्लोबिनचे प्रमाण म्हणजेच MCHC (Mean Corpuscular Hemoglobin Concentration) लोहित रक्तकणिका कशा पद्धतीत पसरल्या आहेत. हे  RDW (Red blood cell distribution width)   या मोजमापावरून समजते. रक्तिबबिका किंवा प्लेटलेट्स यांची संख्या आणि घनता याची सर्वसाधारण कल्पना MPV (Mean Platelet Volume) यावरून येते.
        एखाद्या रुग्णाच्या शस्त्रक्रियेच्या अगोदर अशा रक्ततपासण्या करणे जरुरीचे असते. तसेच गरोदरपणात मातेच्या आरोग्याचे अचूक निदान समजण्यासाठी देखील या चाचण्या आवश्यक आहेत. अशाप्रकारच्या चाचण्या या प्राथमिक स्वरूपाच्या असतात. तद्नंतर काही विशेष आढळल्यास डॉक्टर अधिक सखोल निदानासाठी वैशिष्ट्यपूर्ण तपासण्या करतात. उदाहरणार्थ कर्करोगाचा अंदाज पांढर्‍या रक्तपेशींच्या अति वाढलेल्या प्रमाणावरून येतो.

ओ ईथाइल एस 2 डायसोप्रोपिल अ‍ॅमिनो इथाइल मिथाइलफॉस्फोनोथिओएट

         ‘ओ ईथाइल एस 2 डायसोप्रोपिलअ‍ॅमिनो इथाइल मिथाइलफॉस्फोनोथिओएट’ हे रसायननाम, किम जोंग नाम आणि डॉ. रणजीत घोष ही नावे वाचून आपल्या फार काही लक्षात यायचे नाही. कोण आहेत हे आणि त्यांचा आपल्याशी काय संबंध इतकाच काय तो प्रश्‍न कोणाच्याही मनात येऊ शकेल. तसे योग्यच ते.
        किम जोंग नाम हा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याचा सख्खा सावत्र भाऊ. या दोघांचे वडील - किम जोंग इल. हे उत्तर कोरियाचे राज्यकर्ते. त्यांना तीन अर्धांगी होत्या. नाम आणि उन ही त्यांच्या पहिल्या दोन पत्नींची अपत्यं.
        किम जोंग नाम याची फेब्रुवारीमध्ये मलेशियात हत्या झाली. मलेशियाच्या क्वालालंपूर विमानतळावर दोन महिलांनी त्याला ठार केले. या दोन महिलांमधली एक किम जोंग नाम यांच्या समोर आली. तिच्या दोन हातात काही चिकटसा द्राव होता. तो तिने हातावर हात घासता घासता एकत्र केला आणि किम जोंग नाम यांच्या चेहर्‍याला फासला. दुसरीने त्यांच्या चेहर्‍यावर एक फवारा उडवला. पहिल्या महिलेच्या हातात हे ‘ओ ईथाइल एस 2 डायसोप्रोपिलअ‍ॅमिनो इथाइल मिथाइल फॉस्फोनोथिओएट’ हे रसायन होते. काही मिलिग्रॅम इतकेसुद्धा हे रसायन माणसाच्या संपर्कात आले तर प्राण घ्यायला ते पुरेसे असते. त्याचा स्पर्श झाल्या झाल्या ते त्याच क्षणाला धुतले गेले नाही आणि ताबडतोब या विषावर उतारा शरीरात दिला गेला नाही तर मरण हमखास.
         दोन पद्धतीने त्याची मारकता वापरता येते. एक म्हणजे हे असे किम जोंग नाम यांच्या अंगाला फासले तसे आणि दुसरे म्हणजे ते श्‍वासातने हुंगले जाईल अशी व्यवस्था करणे.
          या दोन महिलांनी वापरलेले हे व्हीएक्स रसायन (नर्व्ह एजंट)जगातल्या काही मोजक्या घातक रसायनांत गणले जाते.
या रसायनाच्या 1 ग्रॅमच्या शंभराव्या भागानेही माणसे मरू शकतात. संयुक्त राष्ट्र संघाने त्याचे वर्गीकरण केलेय वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स. 2003 साली याच अस्त्रांच्या शोधासाठी अमेरिकेने सद्दाम हुसेन याच्या इराकवर हल्ला केला होता.
          1980 साली इराण आणि इराक या दोघांत युद्ध सुरू झाले. या युद्धात इराणचे अयोतोल्ला खोमेनी यांना अमेरिका शस्त्रास्त्र पुरवठ्यात मदत करत होती आणि सद्दाम हुसेनदेखील शस्त्रास्त्रांसाठी अमेरिकेवर अवलंबून होते.
           सध्या उत्तर कोरियासारख्या देशात एका अंदाजानुसार 5 हजार टन ही अशी रासायनिक अस्त्रं साठवून ठेवण्यात आलेली आहेत.
           जपानमधल्या एका रेल्वे स्टेशनवर ‘ओम शिनरिक्यो’ या अघोरी पंथातल्या दहशतवाद्यांनी ऐन गर्दीच्यावेळी अशा प्रकारचे एक रसायन सोडून कित्येक माणसे मारली होती.
          या अस्त्रांच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय करार आहे, पण उत्तर कोरियासारख्या देशाने त्यावर काही स्वाक्षरी केलेली नाही.
          डॉ. रणजीत घोष इंग्लंडमध्ये इंपिरियल केमिकल इंडस्ट्रीज, म्हणजे विख्यात आयसीआय, या कंपनीच्या पीक संरक्षण विभागात संशोधक होते. त्या वेळी पिकांसाठी कीटकनाशके तयार करण्याच्या प्रयत्नात असताना एका टप्प्यावर त्यांच्या हातून या ‘ओ ईथाइल एस 2 डायसोप्रोपिल अ‍ॅमिनो इथाइल मिथाइल फॉस्फोनोथिओएट’ रसायनाची निर्मिती झाली. त्याच्या चाचण्या पिकांवर घेताना त्यांना लक्षात आले, हे रसायन फारच भयानक विध्वंसक आहे. म्हणून त्या कंपनीने 1950 साली त्याची निर्मिती थांबवली. त्यानंतर अमेरिकेने हे तंत्रज्ञान विकत घेतले आणि त्याच्या निर्मितीचा कारखाना सुरू केला.

घरच्या मैदानावर अश्‍विनचे बळींचे द्विशतक

        रविचंद्रन अश्‍विनने घरच्या मैदानावर 200 बळींचा टप्पा ओलांडला. तो मायदेशात सर्वात वेगाने 200 बळी पूर्ण करणारा गोलंदाज ठरला आहे. 47 वी कसोटी खेळत अश्‍विनने या लढतीदरम्यान आपल्या बळींची संख्या 269 वर नेली. त्याने सर्वाधिक कसोटी बळी टिपणार्‍या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बिशनसिंग बेदींना (266 बळी) मागे टाकले. झहीर खान (311), हरभजन सिंग (417), कपिलदेव (434) आणि अनिल कुंबळे (619) हे गोलंदाज अश्‍विनच्या पुढे आहेत.

भारत- ऑस्ट्रेलिया दुसरी क्रिकेट कसोटी

        बंगळुरू कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करत एक विक्रम आपल्या नावे केला. भारताने ऑस्ट्रेलियाला 188 धावांचे लक्ष्य दिले होते त्याचा पाठलाग करताना कांगारूंचा संघ 112 धावांमध्ये गारद झाला. म्हणजे 200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य देऊनही भारताने कांगारूंवर मात केली.
        200 पेक्षा कमी धावांचे लक्ष्य देऊन विजय मिळवण्याच्या बाबतीतील भारताचा हा विजय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. याबाबतीत सर्वात मोठा विजय वेस्ट इंडीजच्या नावावर आहे. 1994 मध्ये वेस्ट इंडीजने इंग्लंडला 147 धावांनी हरवले होते.
        1994 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजने इंग्लंडला 194 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, त्याबदल्यात अख्खा इंग्लंडचा संघ केवळ 46 धावांमध्ये गारद झाला होता.
        त्यानंतर 1911 मध्ये मेलबर्न कसोटीत 170 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 80 धावांमध्ये ऑलआउट झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने 89 धावांनी जिंकला.
भारताने छोटं लक्ष्य देऊन केव्हा केव्हा साजरा केला विजय -
*    2004-107 चे टार्गेट, ऑस्ट्रेलिया 93 धावांवर ऑलआउट
*    1981-143 चे टार्गेट, ऑस्ट्रेलिया 83 धावांवर ऑलआउट
*    1996-170 चे टार्गेट, द. आफ्रिका 105 धावांवर ऑलआउट
*    1969-188 चे टार्गेट, न्यूझीलंड 127 धावांवर ऑलआउट
*    पहिल्या डावात पिछाडीवर असताना भारताचा घरच्या मैदानावर विजय -
*    274 V ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2001
*    99 V ऑस्ट्रेलिया, मुंबई, 2004
*    87 V ऑस्ट्रेलिया, बंगलुरु, 2017

पी व्ही सिंधू

         बॅडमिंटन खेळत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या पी व्ही सिंधूने जाहिरात क्षेत्रात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर मात केली. पी व्ही सिंधूला धोनीपेक्षा जास्त मानधन मिळत आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी व्ही सिंधू जाहिरातींमधून मानधन मिळवणार्‍यांच्या यादीत कर्णधार विराट कोहलीच्या मागे आहे. पी व्ही सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यू सायना नेहवाल आणि सानिया मिर्झापेक्षाही जास्त आहे.
          सिंधूचे सध्या जाहिरात मानधन एक ते सव्वा कोटी आहे. विराट कोहलीला ब्रॅण्ड्सकडून दिवसाला दोन कोटी मिळतात. धोनी खेळात अग्रेसर असताना घेत असलेल्या मानधनापेक्षा ही रक्कम जास्त आहे.  
          सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकत भारताची मान उंचावली आहे. रौप्यपदक जिंकणारी ती पहिलीच महिला खेळाडू आहे. ऑलिम्पिकमधील तिच्या यशानंतर मानधनाची रक्कम 15-25 लाखांहून एक कोटी करण्यात आली होती. सिंधूने गेल्या 5 महिन्यात जवळपास 30 कोटींचे करार केले आहेत. हे करार बेसलाइन वेंचर्सकडून करण्यात आलेल्या 3 वर्षांच्या कराराचा भाग आहे. ज्यासाठी तिला 50 कोटींची निर्धारित रक्कम मिळणार आहे.

अडेल अ‍ॅडकिन्स : नवकलाकाराचा ग्रॅमी पुरस्कार

         ब्रिटनमधल्या मध्यमवर्गाचे आयुष्य जगलेल्या अडेल अ‍ॅडकिन्सने  वयाच्या पंचविशीत 18 ग्रॅमी पुरस्कार मिळविले.
2008 साली एकोणिसाव्या वर्षी  संगीताचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचा ‘नाइन्टीन’ हा अल्बम आला. या ‘नाइन्टीन’ अल्बमने ग्रॅमीत तिला नवकलाकाराचा पुरस्कार पटकावून दिला. ‘होमटाऊन ग्लोरी’ आणि ‘चेसिंग पेव्हमेण्ट’ ही गाणी प्रसिद्ध झाली. त्यामुळे अमेरिकेत ओळख प्राप्त झाली आणि दोन वर्षांत तिचा आवाज जगभर लोकप्रिय झाला. ‘ट्वेन्टीवन’ या तिच्या अल्बमने लोकप्रियतेचे सारे इतिहास मोडून नवे निकष मांडले. ‘रोलिंग इन द डीप’, ‘समवन लाइक यू’ या गाण्यांची यूट्यूबवर आज शेकडो-हजारो व्हर्शन्स आहेत.  मनोरंजनासाठीची किंवा वेळ मारण्यासाठी बीट्स चमत्कृतींची यमकपूर्ण गाणी बनविण्यात तिला स्वारस्य नाही. तिच्या लोकप्रिय गाण्यांऐवजी ‘टायर्ड’, ‘टेक इट ऑल’, ‘डोण्ट यू रिमेम्बर’ ही गाणी ती ऐकविते. स्वत:ची गाणी स्वत: लिहून चाली-संगीत करणारी जी थोडीथोडकी कलाकारांची फळी शिल्लक राहिली, त्यात अडेल अग्रभागी आहे.
* ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात मानांकन असलेल्या 5 मानाच्या पुरस्कारांना खिशात घालून वर सर्वाधिक 9 नामांकने मिळवूनही बियॉन्सला फक्त केवळ 2 पुरस्कार मिळाले.

बॅरी जेन्किन्स व मूनलाइट

        2017 चा सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपटाचा मान हा बॅरी जेन्किन्स यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मूनलाइट’ या चित्रपटाला मिळाला.  बॅरी जेन्किन्स यांचा जन्म 1979 साली मियामीमधील लिबर्टी या अमली पदार्थाचे वर्चस्व असलेल्या भागात झाला. जेन्किन्स यांना त्यांच्या वडिलानी हा आपला मुलगा नाही, असा दावा करीत नाकारले. त्यानंतर आई-वडिलांच्या विभक्त आयुष्यात जेन्किन्स यांची रवानगी नातेवाईकांकडे आश्रितरूपात झाली.
          या काळात त्यांची आई अमली पदार्थाच्या व्यसनात बुडाली. या सगळ्या दु:खांचे बुरूज खांद्यावर वाहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. मियामीमधील वातावरणाचा आपल्यावर परिणाम न होऊ देता सुरुवातीला फुटबॉलमध्ये करिअर करण्याचे त्यांनी ठरविले. मात्र ते सोडून फ्लोरिडामध्ये सिनेमाचे शिक्षण घेतले.
*     2008 साली सिनेमाच्या शिक्षणानंतर त्यांनी मित्राकडून 15 हजार डॉलर कर्ज काढून ‘मेडिसिन फॉर मेलॅन्कली’ हा पूर्ण लांबीचा सिनेमा बनविला. या चित्रपटाला समीक्षक-परीक्षकांनी नावाजले.
*     2014 साली टेरेल ऑलविन मॅक्कार्नी या नाटककाराने मियामी शहराविषयी लिहिलेल्या नाटकाची संहिता हाती लागल्यावर त्यांनी ‘मूनलाइट’ची संकल्पना विकसित केली.
*     1.50 लाख डॉलर इतक्या (ला ला लॅण्डच्या तीसपट कमी) खर्चामध्ये त्यांनी हा चित्रपट बनविला. या चित्रपटाला फिल्म फेस्टिव्हल्समधून समीक्षकांनी उचलून धरले.
*     कॉलसन व्हाइटहेड या लेखकाच्या अंडरग्राऊंड रेलरोड या खूपविक्या (बेस्टसेलर) पुस्तकावर ते सध्या चित्रपट बनवीत आहेत.
*     मियामी येथे पोलिसांनी हकनाक केलेल्या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येनंतर संपूर्ण अमेरिकाभर निषेध आणि बंडाचा झेंडा उभारला गेला होता. त्याचे गडद पडसाद चित्रपटातील नायकाला मिळणार्‍या अभूतपूर्व सहानुभूतीस कारणीभूत आहेत. दिग्दर्शक म्हणून जेन्किन्स यांना अमेरिकेतील सध्याच्या वातावरणाचा, ऑस्करच्या झालेल्या उपरतीचा फायदा झाला.

रवि राय

        रवि राय यांचे 6 मार्च रोजी निधन झाले. मूळचे ते लोहियावादी. राम मनोहर लोहिया यांनी सामाजिक उन्नयनासाठी निव्वळ सरकारीकरणावर भिस्त न ठेवता लोकांमधील ऊर्जेला प्राधान्य देण्याकडे कल ठेवला त्यावर त्यांचा अढळ विश्वास आणि लोहिया यांनी राजकीय पातळीवर जो बिगरकाँग्रेसवाद मांडला, त्याचे ते पाईक होते. ‘पक्षांतरबंदी कायद्या’खालील अत्यंत महत्त्वाचा आणि निःस्पृह निर्णय देणारे सभापती म्हणून राय परिचित आहेत.
         पंतप्रधान विश्‍वनाथ प्रताप सिंह यांचा पाठिंबा काढून 64 खासदारांनी ‘समाजवादी जनता दल’ स्थापले आणि लोहियावादी नेते चंद्रशेखर यांच्यासाठी पंतप्रधानपदी आरूढ होण्याचा मार्ग प्रशस्त केला. काँग्रेसचे राजीव गांधी यांनी चंद्रशेखर यांना बाहेरून पाठिंब्याचे आश्‍वासन दिले, तरीही विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी काही खासदार कमी पडत होते. ऐन वेळी पक्षादेश झुगारून चंद्रशेखरांना पाठिंबा देण्याचे काम ज्यांनी केले, अशा 8 खासदारांना अपात्र ठरविण्याचा आदेश राय यांनी दिला. नियमांचा सोयीस्कर अर्थ लावून, ‘जनता दल पुन्हा फुटले’ असा निर्वाळा देऊन चंद्रशेखर यांना मदत करण्याची संधी राय यांना होती. त्यापेक्षा त्यांनी लोकसभेतील सर्वोच्च पदाची शान महत्त्वाची मानली. त्याचवेळी, ‘पक्षात फूट पडल्याचा दावा तुम्ही एकदाच सभागृहात मांडू शकता’ असा दंडक घालून दिला.
         ते ज्या काळात लोकसभेचे सभापती होते, त्यावेळी देश अस्थिर अवस्थेतून जात होता-मंडल आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकारला होता, बाबरी मशीद तोडण्याआधी अडवाणी-जोशी आदी भाजप नेत्यांच्या रथयात्रा सुरू होत्या, राजीव गांधींनी श्रीलंकेत धाडलेली शांतिसेना त्या देशात तिरस्कारजन्य हिंसाचाराला बळी पडत असल्याने परत बोलावण्याची वेळ आलेली होती, जनता दलाची सत्ता केंद्रासह अगदी पाच राज्यांत असली तरी देशातील राजकीय स्थिती कमालीची अस्थिर असल्याने या सार्‍या तणावांचे पडसाद लोकसभेत उमटत, त्यात सुब्रमणियम स्वामी यांच्यासारखे कायदेमंत्री किंवा देवीलाल यांच्यासारखे उपपंतप्रधान यांना कधी आवरावे लागेल नेम नसे.  तेव्हा ‘गॅट करार आणि डंकेल प्रस्ताव’ यांच्यावर सखोल चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती’सारखे मार्ग काढत त्यांनी सभापतिपद सांभाळले.
           महाविद्यालयीन जीवनात ब्रिटिशांनी ‘राजद्रोहा’च्या आरोपाखाली - म्हणजे रावेनशॉ कॉलेजात 1947 च्या जानेवारीत तिरंगा फडकावला म्हणून - राय यांना ताब्यात घेतले होते. त्यांचे कायद्याचे शिक्षण स्वातंत्र्यानंतर पूर्ण झाले आणि पुढे लोहियांच्या नेतृत्वाखाली ओरिसात त्यांनी ‘समाजवादी पक्ष’ स्थापला. याच पक्षातर्फे पुरी मतदारसंघातून 1967 मध्ये ते लोकसभेवर गेले. आणीबाणीनंतरच्या ‘जनता सरकारा’त ते आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री होते, तेव्हा मात्र ते राज्यसभेवर होते.
1977 ते 1985 पर्यंत बिजू पटनाईक यांच्यासारख्या समाजवादी नेत्याने राखलेल्या केन्द्रपारा लोकसभा मतदारसंघातून राय 1989 साली पहिल्यांदा, तर लगेच 1991 मध्ये दुसर्‍यांदा निवडून आले. ‘लोकशक्ती अभियान’ ही सामाजिक संघटना त्यांनी 1997 पासून उभारली.

वि. शं. चौघुले

        7 मार्च, 2017 रोजी समीक्षक वि. शं. चौघुले यांचे निधन झाले.  मुंबईत मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म, गिरगाव व माझगाव येथे गेलेले बालपण, महापालिकेच्या शाळेत शिक्षण, सिद्धार्थ महाविद्यालयातून बीए व एमए हा त्यांचा शिक्षणप्रवास. आर्यन हायस्कूल, श्रीरामपूर येथील महाविद्यालय, चिपळूणचे दातार महाविद्यालय, विलेपार्ले येथील महिला महाविद्यालय हा त्यांचा शिक्षकी-प्राध्यापकीचा प्रवास. मराठी विभागप्रमुख या पदावर असताना विलेपार्ले येथील महिला महाविद्यालयातील 27 वर्षांच्या सेवेअंती ते निवृत्त झाले. साहित्य, समीक्षा, लेखन, संवाद ही त्यांच्यासाठी जिव्हाळ्याची क्षेत्रे आणि पेशा प्राध्यापकाचा. या दोन्ही बाबी चौघुले यांच्यासाठी परस्परपूरक ठरल्या.  महाविद्यालयात एकीकडे शिकवण्याचे काम आवडीने करीत असताना तितक्याच आवडीने साहित्यिकांच्या मुलाखती घेणे, विविध नियतकालिकांत ग्रंथपरीक्षणे लिहिणे असे त्यांचे सुरू असायचे.
 1986 मध्य परीक्षणांतील काही निवडक परीक्षणांचे संकलन या स्वरूपात त्यांचे ‘ग्रंथसंवाद’ हे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. या काळात चौघुले यांचा जयवंत दळवी, रमेश तेंडुलकर, अनंत काणेकर यांच्या सारख्या असंख्य साहित्यिकांशी विविध कारणांनी संपर्क झाला. 1997 मध्ये चौघुले निवृत्त झाले. त्यांच्या नावावर वीसपेक्षा अधिक पुस्तके जमा आहेत.
* त्यांची पुस्तके -
‘साहित्याची आस्वादरूपे’, ‘आस्वाद आणि आलेख’, ‘अध्यक्षीय भाषणातील साहित्यविचार’, ‘मुक्तगद्य’.‘आस्वाद आणि आलेख’, ‘साहित्याची आस्वादरूपे’ अशी त्यांची पुस्तके मूलत: समीक्षेची, ‘जिव्हाळ्याची माणसं’, ‘मॅजेस्टिक कोठावळे’, ‘रघुवीर सामंत : बेरीज आणि वजाबाकी’, ‘मी आणि माझे सुहृद’ ‘सुखाचे सोबती’, ‘आठवणींच्या पायवाटा’‘संतसाहित्य आणि समाजप्रबोधन’, ‘संत समाज अध्यात्म’ मी आणि माझा देव’

भारताचा सर्वात उंच तिरंगा

       पंजाबमधील अटारी येथील भारत-पाकिस्तान सीमेवर भारताने सोमवारी सर्वात उंच तिरंगा झेंडा फडकवला.  पाकिस्तानच्या लाहोर शहरातूनही हा तिरंगा डौलाने फडकताना दिसतो. पाकिस्तानी रेंजर्सनी याबाबत आपली नाराजी सीम सुरक्षा दलाला कळवली असून सीमेवरुन हा झेंडा दुसरीकडे हलवण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. भारत या झेंडयाचा उपयोग हेरगिरीसाठी करु शकतो अशी भिती पाकिस्तानला आहे.  
      तिरंगा फडकवण्यात आलेल्या ध्वजस्तंभाची उंची 110 मीटर (360 फूट), रुंदी 24 मीटर आणि वजन 55 टन आहे. रांचीतील 91.44 मीटर (300 फूट) उंच ध्वज स्तंभाला या ध्वजाने मागे टाकले आहे. सीमेपासून 150 मीटर अंतरावर हा झेंडा स्थापन करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे जमणार्‍या हजारो पर्यटकांसाठी हा झेंडा आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
 पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाने 3.50 कोटी रुपये खर्च करून ही योजना आकाराला आणली आहे.

हैदराबाद विमानतळ ठरले जगातील सर्वोत्तम

         भारतातील हैदराबाद विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरले आहे. एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलतर्फे (एसीआय) विमानतळावर मिळणार्‍या सुविधेच्या (एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी-एएसआय) आणि विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येच्या आधारे ही निवड केली जाते.
       याद्वारे 50 लाख ते दीड कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या यादीत हैदराबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय विमातळाने 2016 मधील जगातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. तर वर्षाला 4 कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये पहिल्या स्थानी दक्षिण कोरियातील विमानतळाचा नंबर लागला आहे.
       विमान कंपन्या, हाऊसकिपींगच्या कर्मचार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आम्हाला पहिले स्थान पटकावता आले.

तिबेटमध्ये दुसरे हवाई टर्मिनल

          चीनने तिबेटमधील दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या विमानतळ टर्मिनलचा सोमवारी वापर सुरू केला. भारताच्या सीमेजवळ असलेल्या या टर्मिनलची 2020 साली वार्षिक क्षमता 750000 प्रवाशांना व 3000 टन माल वाहतूक हाताळण्याची असेल. हे नवे विमानतळ टर्मिनल तिबेटमधील सहावे असून, ते अरुणाचल प्रदेशच्या जवळ असलेल्या निंगची मैनलिंग विमानतळाचा भाग आहे.
           तिबेटमध्ये चीन रस्ते, रेल्वे व हवाई वाहतुकीसाठीच्या पायाभूत सुविधा वाढवत असल्यामुळे भारतात त्याबद्दल चिंता व्यक्त झाली आहे. या पायाभूत सुविधांचा मोठा लाभ चीनच्या लष्कराला होत आहे. गेल्या काही वर्षांत भारतानेही सीमेवरील भागात विकासाची कामे हाती घेतली आहेत. विमानतळाने 10,300 चौरस मीटर जागा व्यापली आहे.

तवांग

           भारत आणि चीनचा सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र चीनने भारतासोबत असलेला हा सीमावाद मिटवण्यासाठी अरुणाचल प्रदेशमधल्या तवांगच्या बदल्यात भारताला स्वतःच्या ताब्यातील दुसरा भूभाग देण्याची तयारी दर्शवली आहे. चीनचे माजी वरिष्ठ राजनैतिक अधिकारी दायी बिंगुओ यांनी एका मुलाखतीत याचे संकेत दिले आहेत. त्यांनी तवांगच्या बदल्यात अक्साई चीनच्या दुसर्‍या भूभागाच्या देवाण-घेवाणीबाबत सूतोवाच केले आहेत. तवांग हा भारत आणि चीन या सीमेकडच्या पूर्वेतील सामरिक आणि राजनैतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील भूभाग आहे.
           2013 साली निवृत्त होण्याआधी दायी बिंगुओ यांनी दशकाहून अधिक काळ भारतासोबत चीनचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत-चीनच्या सीमेच्या वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र तवांग या भूभागाची देवाण-घेवाण भारतासाठी सहजशक्य नाही. कारण तवांग मठ तिबेट आणि भारतातल्या बौद्ध धर्मीयांसाठी विशेष महत्त्वाचा आहे.
पूर्वेकडे भारताने चीनची काळजी घेतल्यास चीनही त्याच्या मोबदल्यात (अक्साई चीन) इतर भूभाग देण्याचा विचार करेल. दायी यांनी गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे.
            2005 पासून चीनने भारताच्या पूर्वेकडच्या क्षेत्रात लुडबुड करण्यास सुरुवात केली आहे. तवांगवर चीनची नजर आहे आणि त्याला तो दक्षिण तिबेट म्हणून संबोधतो. 15 व्या शतकात दलाई लामा यांचा येथेच जन्म झाला. भारतासोबत झालेल्या 1962 च्या युद्धात चीन या क्षेत्रातून मागे हटला होता. तवांगवर चीनने अधिपत्य स्थापन केल्यास तिबेट आणि पर्यायाने बौद्ध केंद्रांवर त्यांचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.

डेमोसिल क्रेन व खिचन

          राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील ‘खिचन’ या गावात हिवाळी पर्यटनासाठी दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून लाखोंच्या संख्येने करकोचे (डेमोसिल क्रेन) पक्षी येथे दाखल होतात. 4 महिने गावकर्‍यांचा प्रेमळ पाहुणचार घेतल्यानंतर ते पुन्हा मायदेशी परततात. साधारणपणे फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला हे पाहुणे परतीच्या प्रवासासाठी उड्डाण करतात.2010 साली खिचनमध्ये सुमारे 15 हजार पक्षी दाखल झाले होते. 2015 मध्ये हीच संख्या 24 हजारापर्यंत गेली. यंदाही ही संख्या खूपच मोठी आहे.
          डेमोसिल क्रेन या स्थलांतरित विदेशी पक्ष्याचा अधिवास मुख्यत्वे मंगोलिया, चीन, सायबेरिया यांसारख्या देशांमध्ये सर्वाधिक आहे. इराण, अफगाणिस्तानमार्गे हजारो किलोमीटरचा प्रवास करून हिवाळी पर्यटनासाठी हे पाहुणे लाखोंच्या संख्येने राजस्थानमधील खिचन गावी मुक्कामी येतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने ते खिचन येथे दाखल होतात.
          सूर्योदय होताच खिचन गावात करकरा जातीच्या पक्ष्यांचे थवे आकाशात दिसू लागतात. या पाहुण्यांच्या स्वागतासाठी गावकर्‍यांनी ‘रेस्टॉरंट’ उभारले आहे. भरवस्तीत मोकळ्या भूखंडावर चोहोबाजूंनी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. गावातील पक्षिप्रेमी सेवाराम व त्यांचे सहकारी या ठिकाणी त्यांच्यासाठी खाद्य उपलब्ध करून देतात.
         खिचन गावात या पक्ष्यांची संख्या सर्वाधिक असते. त्याचप्रमाणे बीकानेर, फलोदी, पचपदरा व शिवक्षेत्र या भागातदेखील करकरा पक्ष्यांचे थवे मनमुक्त फिरत असतात.
दरदिवशी सुमारे 3 क्विंटलपर्यंत खाद्य पक्ष्यांना लागते.

६ मार्च २०१७

आयएनएस विराट

        भारतीय झेंड्याखाली 30 वर्षे सेवा बजावल्यानंतर हिंदी महासागरात 3 दशके खडा पहारा देणारी आयएनएस विराट ही युद्धनौका 6 मार्च 2017 रोजी आयएनएस विराट निवृत्त झाली.
जगाच्या 27 वेळा प्रदक्षिणा होईल एवढे अंतर या नौकेने पार केले आहे. जलमेव यस्य बलमेव तस्य या घोषासह देशाच्या सीमांचे संरक्षण करणार्‍या आयएनएस विराटच्या कार्यकाळात हिंद महासागर शांत राहिला.
         आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सेवा बजावत असताना हिंद महासागरावर आपला वरचष्मा कायम राखता यावा यासाठी भारतीय नौदलाचा दुसर्‍या दुसर्‍या विमानवाहू युद्धनौकेची गरज 1980 च्या दशकात भासली. त्याच्या आधारावर सुरू झालेला शोध हा युनायटेड किंगडमच्या एचएमएस हर्मस विराटचे जुने नाव या युद्धनौकेवर येऊन थांबला. द्वितीय विश्‍वयुद्धादरम्यान 1943 साली या युद्धनौकेचा आराखडा तयार करण्यात आला होता.
         विकर्स शिपयार्ड येथे 1959 साली तयार करण्यात आलेली एचएमएस हर्मस ही युद्धनौका 1959 ते 1970 दरम्यान युकेसाठी आघाडीची युद्धनौका राहिली होती.  आयएनएस विराटमध्ये कार्यरत असलेले बॉयलर आणि अन्य मुख्य यंत्रणा या द्वितीय विश्‍वयुद्धा दरम्यान घडवल्या गेल्या असूनही ही यंत्रणा त्याच ताकदीने काम करत होती.
           465 मिलीयन डॉलर किमतीत विकत घेण्यात आलेली आयएनएस विराटची सेवा ही पुढे 5 ते 10 वर्षांची राहील असा अंदाज होता, पण आयएनएस विराटने 30 वर्षे देशसेवा बजावली.
          1977 साली या युद्धनौकेत पहिल्या हॅरीयर या लढाऊ विमानाने झेप घेतली. त्याची डरकाळी 2016 पर्यंत हिंद महासागरात कायम राहीली. यापूर्वी विराटने सी विक्सन इंटरसेप्टर, गॅनेट, व्हर्लविंड हेलिकॉप्टरला भरारी देण्याचे काम रॉयल नेव्हीत केले होते.
          सत्तरीच्या दशकात ही युद्धनौका कमांडो कॅरियर च्या रूपाने खुल्या समुद्रात आली. त्याच्यानंतर या दशकाच्या उत्तरार्धात तिने पाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर उडवण्यासाठी स्वतःला सज्ज केले होते.
दृष्टिक्षेपात आयएनएस विराट

*    भारतीय झेंड्याखाली 30 वर्षे सेवा, मुंबईत 6 मार्चला सेवेला मिळणार पूर्णविराम.
*    जलमेव यस्य बलमेव तस्य हे घोषवाक्य.
*    कमी रनवेच्या जोरावर टेक ऑफ आणि हेलिकॉप्टर सारखे जागेवर लॅण्डींग करण्याची क्षमता असलेल्या सी हॅरीयरची दमदार साथ.
*    सी किंग (ब्रिटिश बनावट) कमोव्ह 31 (रशियन), धृव (भारतीय) हेलिकॉप्टरचे आयएनएस विराटवर वास्तव्य
*    22,622 तासांच्या जंबो हवाई उड्डाण.
*    2282 दिवस समुद्रात घालवले.
*    10 लाख 94 हजार 215 किलोमीटरचा एकूण जलप्रवास
*    80,715 तास चालले बॉयलर.
*    चालू स्थितीत असलेल्या सगळ्यात जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून गिनीज बुकात नोंद.
*    भारतीय लष्करासह अनेक यशस्वी ऑपरेशनमध्ये सहभाग
*    युद्धाभ्यास मलबार (अमेरिका) युद्धाभ्यास वरूणा (फ्रान्स).
*    नसीम अल बहार (ओमान) याशिवाय अन्य युद्धाभ्यासात सहभाग.
*    पश्‍चिमी ताफ्याची सर्वोत्तम नौका म्हणून चारवेळा गौरव.
*    सलग 3 महिने समुद्रात मुक्कामी राहण्याची क्षमता.
*    9 मेगावॉट वीजनिर्मिती करणारी यंत्रणा विराटमध्ये.
*    150 अधिकारी, 1500 खलाशींचा चमू या युद्धनौकेवर.
*    30 सी हॅरीयर लढाऊ विमाने राहण्याची क्षमता.
*    220 मी. लांब, 45 मीटर रुंद.
फॉल्कलॅण्ड युद्धातील कामगिरी -
      1981 साली सुमारे 100 दिवस चाललेल्या फॉल्कलॅण्ड युद्धात युकेपासून 9000 समुद्री मैल लांब अर्जेंटीना सोबत झालेल्या युद्धात ब्रिटिश लष्कर आणि नौदलाच्या कारवाईची सूत्रे एचएमएस हर्मसवरुन हालली. याबरोबर हॅरीयर विमानांनी हर्मस वरून झेप घेत शत्रूची 23 विमाने जमीनदोस्त केली होती.
ऑपरेशन ज्युपिटर -
      फॉल्कलॅण्ड मध्ये लष्कराच्या साथीने केलेल्या संयुक्त कारवाईची पुनरावृृत्ती करण्याची संधी आयएनएस विराटला पुनश्‍च 1989 साली. श्रीलंकेत पेटलेल्या रणात गढवाल रायफल्सच्या जवानांना श्रीलंकेत नेण्याची कामगिरी विराटला सोपविण्यात आली. पावसाळी आणि विपरीत वातावरण असताना एका रात्रीतून विराटला सज्ज केले गेले आणि लगोलग ते केरळच्या तटावर थडकले. 76 पेक्षा जास्त फेर्‍या करत विराट तसेच हेलिकॉप्टरांनी 350 जवान त्यांच्या सगळ्या सामुग्रीसहित युद्धभूमीवर उतरवले होते.
ऑपरेशन पराक्रम -
      13 डिसेंबर 2001 साली भारताच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर युद्धाचे ढग जमायला सुरू झाली. ही सज्जता केवळ भूमीवर नाही तर समुद्रातही करण्यात आली होती. सुमारे 10 महिने ही युद्धनौका कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी सज्ज राहीली. हिंदी महासागरातून खाडीकडे जाणार्‍या जहाजांची नाकाबंदी करण्याचे महत्त्वाचे काम आयएनएस विराटने केले होते. त्याच्यामुळे भारतीय नौदलाचा धाक हा आजही कायम आहे.
भारताला दिले 5 नौदलप्रमुख -
      आयएनएस विराट या युद्धनौकेला 22 कमांडर लाभले. 8 मे 1987 साली कॅप्टन विनोद पसरीचा यांनी या युद्धनौकेचे पहिले कमांडरपद भूषवले होते. देशाच्या 23 नौदलप्रमुखांपैकी 5 जणांनी आयएनएस विराटचे कमांडर म्हणून काम पाहिले आहे. यात अ‍ॅडमिरल (नि.) माधवेंद्र सिंग (तत्कालीन कॅप्टन) हे पहिले. विराटला कमांड करणारे आणि नौदलाचे प्रमुख विराटचे नेतृत्त्व करणारे आणि नंतर नौदलाचे प्रमुख झालेले पाच अधिकारी आणि त्यांचा विराटवरील कार्यकाल :

*    अ‍ॅडमिरल माधवेंद्र सिंग (16 डिसेंबर 88 ते 30 ऑगस्ट 90)
*    अ‍ॅडमिरल अरुण प्रकाश (31 ऑगस्ट 1990 ते 26 डिसेंबर 1991)
*    अ‍ॅडमिरल निर्मलकुमार वर्मा (9 नोव्हेंबर 1996 ते 13 डिसेंबर 1997)
*    अ‍ॅडमिरल डी. के. जोशी (17 डिसेंबर 2001 ते 8 जानेवारी 2003)
*    अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा (17 मे 2006 ते 11 ऑगस्ट 2007)
कॅप्टन पुनीत चड्डा -
       भारतीय नौदलात 1 जुलै 1987 साली दाखल झालेले कॅप्टन पुनीत चड्डा हे आयएनएस विराटचे शेवटचे कर्णधार ठरले आहेत. ऑपरेशन पवन नंतर आयएनएस आंग्रेवर नॅव्हीगीटींग ऑफिसर म्हणून काम त्यांनी केले. त्याच्यानंतर त्यांनी आयएनएस रणजीत, अभय आणि रणवीर, आयएनएस विभूती, आयएनएस निरीक्षक आदी नौकांवर काम करण्याचा अनुभव मिळवला. 23 ऑक्टोबर 2015 ला त्यांनी आयएनएस विराटचे नेतृत्व स्वीकारले होते.

*     आयएनएस विराट या युद्धनौकेच्या संरक्षण देणार्‍या बराक सिस्टीमचा सहभाग राहणार आहे. या युद्धनौकेचे बॉयलर सुस्थितीत असले तरी त्यांना काढणे सोयीचे राहणार नसल्याने संपूर्ण युद्धनौकेच्या भवितव्यावर या उर्वरित भागांचे भविष्य अवलंबून राहणार आहे.
शेवटची सफर 23 जुलै 2016 ला -
       देशाची दुसरी विमानवाहू युद्धनौका असलेल्या आयएनएस विराटच्या सलग 30 वर्षे चालू स्थितीत ठेवण्याचे मोठे काम देशातील डॉकयार्डने केले आहे. एखाद्या नौकेचे आयुष्य संपल्यावरही त्यांचा वापर कसा करायचा. त्यांना सुस्थितीत कसे राखायचे ही कला भारतीय नौदलाकडे आहे. त्याच्याशिवाय विराटने एवढा काळ महासागरांमध्ये काढणे कठीण होते. स्टीम बॉयलरवर पुढे सरकण्याचे बळ मिळणार्‍या आयएनएस विराटने कोचीन बंदरापर्यंतचा प्रवास स्वबळाने केला होता. हा प्रवास तिचा अंतिम ठरला होता.

लाहोरमधून दिसणार भारताचा 'तिरंगा'

        भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी येथे 360 फूट उंचीवर भारताचा तिरंगा ध्वज फडकाविण्यात आला असून, हा झेंडा लाहोरमधून दिसतो.
*    हा देशातील सर्वांत उंचीवरील झेंडा आहे.
*    360 फूट उंचीवरील या झेंड्याचे नाव - फ्लॅगमास्ट
*    हा झेंडा उभारण्यासाठी 3.50 कोटी रुपये खर्च.
*    भारत-पाकिस्तान दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (एलओसी) 200 मीटर आतमध्ये भारतीय हद्दीत.
*    55 टन वजन असलेल्या पोलवर हा झेंडा फडकाविण्यात आला आहे.
*    यापूर्वी रांचीमध्ये 293 फूट उंचीवर भारतीय झेंडा फडकाविण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे

       पंतप्रधान नरेंद्र मोदी मे आणि जून महिन्यात पाच देशांच्या दौर्‍यावर जाणार आहेत. यामध्ये श्रीलंका, जर्मनी, स्पेन, रशिया आणि कझाकिस्तान यांचा समावेश आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौर्‍यानंतर  एकही परदेश दौरा केलेला नाही. मोदी संसदेचे अधिवेशन आणि नंतर पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त होते.
*    संयुक्त राष्ट्राचा वेसाक दिन साजरा करण्यासाठी 12 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेत उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्रातर्फे दरवर्षी बौद्ध बहुसंख्य देशांमध्ये वेसाक दिन साजरा केला जातो. या वर्षी या उत्सवाचे यजमानपद श्रीलंका भूषवणार आहे.
*    मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मोदी जर्मनी, स्पेन व रशिया या देशांच्या दौर्‍यावर - यावर्षी भारत आणि रशियाच्या राजनैतिक संबंधाना 70 वर्षे पूर्ण.
*    जर्मनीची भारतातील गुंतवणूक वाढवण्याच्यादृष्टीने नरेंद्र मोदींची बर्लीन भेट महत्त्वाची. भारताच्या मेक इन इंडिया कार्यक्रमास जर्मनीचा मोठ्या प्रमाणावर हातभार आहे. जर्मनी भारतातील सातव्या क्रमांकाचा गुंतवणूकदार आहे व भारतातील एकूण परराष्ट्रीय गुंतवणुकीपैकी 3 टक्के गुंतवणूक जर्मन कंपन्यांची आहे.
*    जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदी यांची कझाकिस्तानला भेट.

चीनने निश्‍चित केला 6.5 टक्के वृद्धीदर

        जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था चीनने 2017 साठी जीडीपीचा वृद्धीदर 6.5 टक्के निश्‍चित केला आहे. चीनने मागील वर्षी 6.5 ते 7 टक्के वृद्धीदराचे लक्ष्य ठेवले होते. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान ली क्विंग यांनी हा अहवाल सादर केला. यात जीडीपीचा वृृद्धीदर 6.5 निश्‍चित केला आहे.
       2016 मध्ये चीनचा वृद्धीदर 6.7 टक्के होता. 26 वर्षांतील हा सर्वात नीचांकी दर होता. 2015 मध्ये चीनचा वृद्धीदर 6.9 टक्के होता. यावर्षी चीनने शहरी भागात 1.1 कोटी रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2016 च्या तुलनेत हे लक्ष्य 10 लाखांनी अधिक आहे.

भारतात 5 वर्षांखालील अर्ध्याहून जास्त मुले कुपोषित

        भारतामध्ये 5 वर्षांहून कमी वय असलेली अर्ध्यांहून जास्त मुले अशक्त (अ‍ॅनीमिक) असल्याची माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. या सर्व मुलांमध्ये रक्ताची कमतरता, थकवा, सारखे आजारी पडणे अशी लक्षणे दिसत असून या सर्वांचा मेंदूच्या विकासावर परिणाम होत आहे.

        2015-16 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात 6 लाख कुटुबांमधील एकाच वयोगटातील 38 टक्के मुलांची उंची कमी होती. 36 टक्के मुलांचे वजन जास्त, तर 21 टक्के मुले अशक्त आढळली.

       2011मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे 2015 मध्ये भारतात 5 वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांची संख्या एकूण 12.4 कोटी असल्याचा अंदाज आहे. यामधील 7.2 कोटी मुले अ‍ॅनीमिक, 5 कोटी मुले कमी उंची, 2.6 कोटी मुले अशक्त आणि 4.4 कोटी मुलांचे वजन कमी असल्याचे समोर आले होते. 2005-06 मधील आकड्यांशी तुलना करता परिस्थिती खूपच वेगळी आहे.

       ही आकडेवारी अशक्त सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आरसा आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. सर्व्हेक्षणातून असेही लक्षात येते की अनेक गरोदर महिला स्वतः अ‍ॅनीमिक असल्याने त्याचा सरळ परिणाम त्यांच्या होणार्‍या मुलांवर पडतो. सर्व्हेक्षणानुसार 25 ते 49 वयोगटाकील 53 टक्के महिला आणि 23 टक्के पुरुष अ‍ॅनीमिक होते.

       बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान आणि छत्तीसगडमधील आकडेवारी सर्वात जास्त असून हरियाणा, गुजरात आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमधील हा आकडा कमी असला तरी समाधानकारक नाही. तामिळनाडूत 51 टक्के मुलं अशक्त आणि कुपोषित असून केरळमध्ये प्रत्येक तीन मुलांमागे एका मुलाला हा आजार आहे.

न्यायव्यवस्था व संसद संघर्ष

        सुदृढ लोकशाहीसाठी लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये सुसंवाद आवश्यक असतो, परंतु भारतीय लोकशाहीत सन 1950 पासून न्यायव्यवस्था व राज्यकर्ते यांच्यातील संघर्ष सुरू आहे. या संघर्षातील अलीकडचे दर्शन ‘जलिकट्टू’ या प्रथेला न्यायालयाने घातलेल्या बंदीला बगल देण्यासाठी काढलेल्या तामिळनाडू शासनाच्या अधिसूचनेने झाले. भारतीय राज्यघटना आर्टिकल 123 प्रमाणे शासनाला संसद काम करत नसेल तर संसदेचे कामकाज सुरू होईपर्यंतच्या काळात तातडीच्या कारणास्तव अशाप्रकारे अधिसूचना काढता येते. अशीच अधिसूचना राज्य शासन आर्टिकल 213 प्रमाणे राज्यपालांमार्फत काढू शकते. या अधिसूचना केवळ संसद अथवा विधानसभा कामकाज करत नसतील त्या काळापुरत्या तातडीच्या कारणासाठी काढल्या जातात. ही अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या कामी सन 2014मध्ये दिलेल्या कामामध्ये ‘जलिकट्टू, बैलगाडी शर्यत अशा गोष्टी पी.सी.ए. कायद्याच्या विरुद्ध आहेत,’ असे नमूद करून केंद्र सरकारने दि. 11 जुलै 2011 रोजी काढलेली अधिसूचना योग्य धरली व देशात जलिकट्टू, बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली. या बंदीला बगल देण्यासाठी परत केंद्र सरकारने व तामिळनाडू सरकारने नवीन अधिसूचना आणून ‘जलिकट्टू’ला परवानगी दिली.

        शासनाने कायदा करायचा त्याच्या अंमलबजावणीचा न्यायालयाने निर्णय द्यायचा व त्याला बगल देण्यासाठी नवीन कायदा आणायचा. हा संघर्ष सातत्याने सुरू आहे. या संघर्षाची खरी सुरुवात सन 1967मध्ये ‘गोलखनाथ विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब’ या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने झाली. या निकालाने शासनाला मूलभूत अधिकार काढून घेण्याचा अधिकार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर संसदेने सन 1971 मध्ये हा निकाल फिरविण्याचा प्रयत्न केला; परंतु सन 1973 मध्ये केशवानंद भारतीप्रकरणी 13 न्यायाधीशांच्या बेंचच्या 7 विरुद्ध 6 या निकालाने हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्याची किंमत जस्टिस खन्ना यांनी मोजली. कारण त्यांची सेवाज्येष्ठता डावलली गेली व मुख्य न्यायाधीश पद न दिले गेल्यामुळे राजीनामा दिला. त्यानंतर अनेक वेळा घटना दुरुस्तीवरून संघर्ष वाढत गेला.

         सर्वोच्च न्यायालयाने कारखानदारांचा कारखाना बंद करण्याचा हक्क मान्य केला. हा हक्क डावलण्यासाठी औद्योगिक कलह कायदा दुरुस्त केला गेला. सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने मूलभूत हक्कांची पाठराखण केली व शासनाला लगाम लावला. याचीच परिणीती शासन व न्यायालय यांच्यात संघर्ष झाला. या संघर्षातील अलीकडची गाजलेली केस म्हणजे मुस्लीम महिलांना पोटगी देण्याचा अधिकार. या शहाबानू प्रकरणाच्या निकालाला बगल देण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने सन 1986 मध्ये नवीन कायदा आणला. सर्वोच्च न्यायालयाने सीमारेषा पाळत या नवीन कायद्याची घटनात्मक वैधता योग्य ठरवली, परंतु हा संघर्ष वाढतच गेला. 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राजकारणातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाला मतदारांना उभ्या राहणार्‍या उमेदवारांची माहिती देण्याची व विशेषत: गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती देणारा निकाल दिला. या निकालाला बगल देण्यासाठी कधी नव्हे ते सर्व राजकीय पक्ष एकत्र आले व 2002 मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना काढण्यात आली. या अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान दिले असताना सर्वोच्च न्यायालयाने शासनाला न्यायालयाच्या निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार नाही, असे नमूद करून मूळ निकाल कायम ठेवला ज्याच्यामुळे आज सर्वसामान्य मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी कळू लागली. अशाप्रकारे अनेकवेळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांना बगल देण्यासाठी केंद्र सरकारने केवळ नवीन कायदेच आणले नाहीत तर हे कायदे पूर्वलक्षी प्रभावाने आणण्याचा प्रयत्न केला.

        सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक वेळेस आपल्या निकालाला बगल देणारा कायदा रद्द केलेला नाही. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी सन 2010 मध्ये ‘नीट परीक्षा’ लागू करण्याचे नोटिफिकेशन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले व याबाबतची पुनर्विचार याचिकाही रद्द केली. केंद्र सरकारने या निकालाला बगल देण्यासाठी अधिसूचना काढली. ही अधिसूचना सर्वोच्च न्यायालयात आली असताना त्याबद्दल नाराजी व्यक्त करूनही ही अधिसूचना रद्द करण्यास नकार दिला. कारण त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असते. सर्वोच्च न्यायालयाने संसदेचा पूर्वलक्षी प्रभावाने कायदे आणण्याचा अधिकार मान्य केला आहे, पण याबाबत जर ज्या निकषांच्या पायावर कायदा रद्द केला गेला तर ते निकषच कायदेशीर प्रक्रियेने बदलले असतील तर हा अधिकार मान्य केला गेला.

         पूर्वलक्षी प्रभावाने कायदे आणून निकालाला बगल देण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा ताशेरेही ओढले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचनाही केवळ तातडीच्या काळी काढावयाची असताना वारंवार अधिसूचना काढण्याच्या केंद्र सरकारच्या प्रवृत्तीवर 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सहा विरुद्ध एक या बहुमताने 2017 मध्ये ताशेरे ओढले आहेत.

       शासन कायदे करते न्यायव्यवस्था त्यांच्या अंमलबजावणीचे आदेश देते आणि शासनच त्याची अंमलबजावणी करत नाही. ‘जलिकट्टू’बाबतचा निर्णय केंद्र सरकारने बैलांचा समावेश कायद्यामध्ये केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली. केंद्र सरकारने हेल्मेटबंदी आणली. त्याची अंमलबजावणी उच्च न्यायालयाने केली, पण अंमलबजावणी करण्यास शासन तयार नाही अशारीतीने संघर्ष झाल्यावर न्यायालयाला रोष देण्यापेक्षा कायदे आणताना विचार करून आणले तर हा संघर्ष टाळण्यासारखा आहे. आज न्यायव्यवस्थेमुळे ताजमहालसारख्या वास्तूचे जतन होऊ शकले आहे.

भारत-चीन संबंधातील मोकळेपण

        भारताच्या परराष्ट्र विभागाचे सचिव जयशंकर प्रसाद यांनी मार्च 2017 मध्ये चीनचे उपपंतप्रधान वांग ली यांच्याशी भारत-चीन दरम्यानच्या तातडीच्या प्रश्‍नांची चर्चा केली. भारत व चीन यांचे अलीकडच्या काळात गोठलेले संबंध जयशंकर प्रसाद आणि वांग ली यांच्यातील वाटाघाटींनी मोकळे होऊन चर्चेच्या पातळीवर येणे महत्त्वाचे आहे. दोन्ही देशांना परस्परांशी आर्थिक व व्यापारी संबंध राखायचे आणि वाढवायचे आहेत. त्यांच्या परस्परसंबंधाची गरजही आता त्यांना कळून चुकली आहे. जुन्या संबंधांच्या मर्यादा आणि इतिहासातील तेढ यावर मात करून परस्परांशी जुळवून घेणे हा त्यांच्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आताच्या वाटाघाटींमुळे ते तयार होण्याची शक्यता आहे.

        जयशंकर प्रसाद - चिनी उपपंतप्रधान वांग ली यांच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे -

        1) मुंबईवरील पाकिस्तानी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरवून पाकिस्तानबाहेर घालविणे व भारताच्या स्वाधीन करणे हा मुद्दा या वाटाघाटीत ऐरणीवर होता. आतापर्यंत भारताने जेव्हा हा विषय जागतिक व्यासपीठांवर आणला तेव्हा चीनने पाकिस्तानची बाजू घेऊन त्या गुन्हेगाराचा बचाव करण्याची भूमिका घेतली. त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी व जगाचा गुन्हेगार ठरविण्यासाठी आवश्र्यक ते पुरावे भारत सादर करू शकत नाही अशी भूमिका घेत चीनने भारताच्या मागणीचा विरोध केला. आता परिस्थिती बदलली आहे. कोणत्याही कारणास्तव का असेना, पण पाकिस्तानला हाफीज सईदचे आपल्या देशातले वास्तव्य अडचणीचे वाटू लागले आहे. जैश-ए-मोहम्मद ही त्याची जिहादी संघटना पाकिस्तानात अतिरेकी चढायांची तयारी करीत आहे आणि तिचे कार्यकर्ते पाक व अफगाणिस्तानच्या सीमेवर हिंसाचार माजवीत आहेत. त्यामुळे सईदला बाहेर घालविणे व अडकवून ठेवणे हा पाकिस्तानच्याच हिताचा भाग होऊ लागला आहे. नेमक्या यावेळी जयशंकर प्रसाद यांनी सईदविरोधी निश्‍चित व भक्कम स्वरूपाचे पुरावे चीनसमोर मांडले आहेत. ते  नाकारणे चीनएवढे पाकिस्तानलाही बहुदा जमणारे नाही वा ते नाकारणे त्यांच्या अंतर्गत अडचणींमुळे त्यांना शक्य होणार नाही. असे झाल्यास चीनच्या मदतीने भारताला हाफीज सईदचा बंदोबस्त करणे जमणारे आहे.

        2) भारताला अणुइंधन पुरवठा करणार्‍या राष्ट्रांच्या समितीचे सदस्यत्व मिळण्याची. त्या सदस्यत्वाला चीनने आजवर कठोर विरोध केला. तो करताना त्याने पाकिस्तानची बाजू उचलून धरली. भारत हे जसे अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे तसा पाकिस्तानही अण्वस्त्रधारी देश आहे असे म्हणत भारताला हे सदस्यत्व दिल्यास पाकिस्तानलाही ते द्यावे लागेल अशी भूमिका घेऊन चीनने आजवर भारताची अडवणूक केली. आता चीनच्या भूमिकेत सौम्य बदल झाला आहे. भारताच्या सदस्यत्वाचा प्रश्‍न कार्यवाहीबाबतच्या (प्रोसीजरल) गुंत्यात अडकला आहे व तो गुंता सोडविणे अवघड नाही असे चीनच्या वतीने सांगण्यात आले. त्याचवेळी भारताच्या सदस्यत्वाबाबत चीनची भूमिका विधायक राहील असेही त्या देशाने घोषित केले आहे. हा बदल या दोन देशांतील संबंध सुधारतील व काहीसे सलोख्याचे होतील हे सांगायला पुरेसा नाही. कारण त्यांच्यातील प्रश्‍न अतिशय जुने, गुंतागुंतीचे आणि 70 वर्षांएवढ्या दीर्घ वैराचे आहेत. ते सीमावादापासून भारताच्या सुरक्षा समितीवरील सदस्यत्वापर्यंतचे आहेत. ते सुटायला दीर्घकाळ लागणार आहे. त्यातून पाकिस्तानशी असलेली चीनची परंपरागत मैत्री हे प्रश्‍न सुटू न देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

        3) चीनने त्याच्या माओकालीन कठोर भूमिका अलीकडच्या काळात अधिक विधायक बनविल्या आहेत. शिवाय त्याला आर्थिक संबंधांच्या विस्ताराएवढाच पूर्वेकडे आपला राजकीय प्रभाव वाढवीत न्यायचा आहे. जपान, थायलंड, ऑस्ट्रेलिया यांच्याशी काहीसे दुराव्याचे संबंध असताना भारतासारख्या प्रचंड देशाशी दुरावा राखणे त्याच्या आंतरराष्ट्रीय संबंधावरही ताण आणणारे आहे. भारताच्या विधायक सहकार्यावाचून वा किमान समन्वयावाचून त्याला त्याची आत्ताची आव्हाने पेलणे अवघडही ठरणार आहे. एकट्या पाकिस्तानवर अवलंबून राहून व भारताभोवतीच्या देशात आर्थिक गुंतवणूक वाढवून चीनला हे जमणारे नाही. त्यासाठी त्याला भारतालाही अनेक क्षेत्रात सोबत घ्यावे लागणार आहे. परस्परांची गरज व ताज्या राजकीय अडचणी यावर भर देत वर्तमानात प्रयत्न करणे हाच राजनयाचा खरा धडा आहे. 

सेवा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक

       देशाच्या सेवा क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात पहिल्या नऊ महिन्यांत प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) 77.6 टक्के वाढली आहे. ही गुंतवणूक 7.55 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
*    सेवा क्षेत्रात बँकिंग, विमा, आऊटसोर्सिंग, कुरिअर, तंत्रज्ञान सेवा यांचा समावेश होतो.
*    2015-16 च्या एप्रिल-डिसेंबरमध्ये सेवा क्षेत्रात 4.25 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली होती.
*    देशातील जीडीपीत सेवा क्षेत्राचे योगदान 60 टक्के आहे.

जगातील सर्वांत श्रीमंत गाय

       कॅनडातील ‘ईस्टसाईड लेविसडेल गोल्ड मिस्सी’ ही जगातील सर्वाधिक किमतीची गाय (22 कोटी रुपये)  आहे. या गायीच्या शारीरिक क्षमतेने तिला ‘श्रीमंत’ बनविले आहे. ही गाय हॉल्स्टीन प्रजातीची आहे. या प्रजातीच्या बहुतांश गायी दररोज 15 ते 40 लिटर दूध देतात. त्यामुळे या गायींची जेव्हा निलामी होते तेव्हा तिची खरेदी करण्यासाठी व्यापारी अधिकाधिक किंमत देण्यास तयार होतात.
        मिस्सीसाठी 3.23 दशलक्ष डॉलर जवळपास 22 कोटी रुपये एवढी अंतिम बोली लागली होती. या गायींमुळे अमेरिका आणि कॅनडातील दुग्ध उत्पादन वाढले आहे. या गायींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा विशाल आकार. या गायी आकाराने सामान्य गायींहून मोठ्या असतात. जन्मावेळी त्यांच्या वासराचे वजन 40 ते 45 किलो असते. सामान्यपणे या गायीची लांबी 58 इंच आणि वजन 580 किलो असते. या गायीच्या दुधात 3.5 टक्के एवढा स्निग्धांश (फॅट) असतो. जो जर्सी गायीत कमी आहे. या गायीला जास्त तापमान सहन होत नाही.

श्रीराज कृष्णन कोप्पोरेम्बिल

      गेल्या 9 वर्षांपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणार्‍या श्रीराज कृष्णन कोप्पोरेम्बिल याला 13 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. मुळचा केरळमधील असलेल्या श्रीराज कृष्णन  याने अबू धाबीमधील बिग तिकीट ड्रॉच्या जाहीर झालेल्या निकालात12 कोटी 71 लाख 70000 हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. नियमितपणे लॉटरीचे तिकीट खरेदी करणार्‍या कृष्णनला याआधी कधीही लॉटरीचे तिकीट जिंकता आले नव्हते.

श्गानसरस्वती किशोरी आमोणकर

      वेदान्ताचे सार सुरांतून उलगडून दाखविण्याचे सामर्थ्य असलेली बहुधा एकमेव गायिका असे वर्णन केले जाते, ते फक्त किशोरी आमोणकरांचेच. रसिकांसाठी साक्षात सरस्वती. उभ्या भारतासाठी गानसरस्वती. परिपूर्णतेचा ध्यास, सुरांवरील श्रद्धा आणि तर्कशुद्ध निष्ठा यातून जे मनस्वी व्यक्तित्व साकारले आहे, ते किशोरीताई म्हणून ओळखले जाते, सच्च्या निर्भेळ सुरांवरची आपली श्रद्धा श्रोत्यांकडे संक्रमित करण्याच्या किमयेने या गानसरस्वतीची गायकी अलौकिक बनली.
       मोगुबाई कुर्डीकरांसारख्या कडक गुरूच्या पोटी जन्माला आलेल्या या बाईनं गायकीच्या पुरुषार्थाची चौकट स्वकर्तृत्वाने रुंद केली. मनाला येईल तेव्हा मोडलीदेखील. त्यांनी मापदंड निर्माण केले, तेही नक्कल करण्याच्या आवाक्याबाहेरचे. शास्त्रीय संगीतातील साचेबद्ध घराण्याच्या चौकटीबाहेरचा विचार करणार्‍या किशोरीताईंनी रससिद्धांताला जन्म दिला. सुरांच्या मांगल्याचे नवे घराणेच जणू या गानसरस्वतीपासून सुरु झालंय. गायकीतल्या त्यांच्या प्रयोगांमधून साकारलेल्या आविष्कारांनी रसिकांच्या मनावर कायमचे गारूड केले.
        भावगीत, चित्रपट संगीत या वहिवाटीच्या वाटेवर त्यांचे सूर फारसे कधी रेंगाळलेच नाहीत. तरीही संतवाणी, मीरेची भजनं किंवा भावगीतही त्यांच्या सुरांनी आणखी मंगल केली. 

अभिनेते ओम पुरी

      भारदस्त आवाज, पल्लेदार संवादफेक आणि कसदार अभिनयाने रुपेरी पडद्यावर दीर्घकाळ आपली छाप उमटविणारे अभिनेते ओम पुरी यांना 89 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला. सारा बरेइलिसकडून दिवंगत कलाकारांच्या स्मरणार्थ गीत सादर करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
* ओम पुरी यांनी ईस्ट इज ईस्ट, गांधी, सिटी ऑफ जॉय , माय सल दी फॅनेटिक, दी पॅरोल ऑफिसर, वूल सारख्या आंतराष्ट्रीय चित्रपटात त्यांनी काम केलेले आहे. 6 जानेवारी 2017 रोजी हृदयविकाराने ओम पुरी यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.
* ओम पुरींना ऑस्कर सोहळ्यात कॅरी फिशर, प्रिंस, जेने वाईल्डर, मायकल किमिनो, पॅटी ड्यूक, गॅरी मार्शल, अँटन येल्चिन, मॅरी टेलर मूर, कर्टिस हॅन्सन आणि जॉन हर्ट यांच्यासोबत श्रद्धांजली वाहण्यात आली.

‘राष्ट्रकवि’ दिनकर

      रामधारी सिंह ‘दिनकर’ हे निसर्गाच्या रम्य दर्शनाने भावुक बनणारे कवी होते. तसेच आसक्ती, विरक्ती, हिंसा-अहिंसा या द्वंद्वातील प्रश्‍नांनी विकल झालेल्या भाषावस्थेचे चित्रण, विविधस्तरावर करणारे कवीश्रेष्ठ होते. ‘धूप और धुआँ’ (1951) या संग्रहातील कवितेत, विशेषत: ‘भगवानकी विक्री’  व ‘पंचतिक्त’ यांसारख्या कवितांतून आजकालच्या परिस्थितीचे प्रतिबिंब दिसते. तत्कालीन परिस्थितीतील ढोंग, खोटेपणा, निराश करणारा राजकीय नेत्यांचा देशबुडवेपणा- यावर प्रकाशझोत टाकला आहे. चिनी आक्रमणामुळे व्यथित झालेले दिनकर ‘प्रतिज्ञा’ कवितेत शब्दांचा उपयोग तलवारीसारखा करताना दिसतात.
       आंतरराष्ट्रीय कवी संमेलनात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांच्या साहित्याचे अनेक भारतीय भाषांतून आणि विदेशी भाषांतून अनुवाद झालेले आहेत. दिनकरजी प्रभावी गद्यलेखकही होते. त्यांनी अनेक साहित्यिक निबंध उदा. काव्य कि भूमिका, ‘पंत, प्रसाद आणि मैथिलीशरण’ तसंच शोधकथा, समीक्षा डायरी, तत्त्वज्ञान, इतिहास, इ. विषयांवरही लिहिले आहे.त्यांचे 30 कवितासंग्रह आणि 25 गद्य साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत.
राष्ट्रकवी दिनकरांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत-
*    1948 - साहित्यकार संसद (अलाहाबाद) पुरस्कार ‘कुरुक्षेत्र’साठी.
*    1959 - पद्मभूषण.
*    1960 - ‘उर्वशी’साठी उत्तर प्रदेश सरकारचा पुरस्कार. बलदेवदास पदक.
*    1964 - भागलपूर विद्यापीठाची डी.लिट्.
*    1972 - ‘उर्वशी’साठी ज्ञानपीठ पुरस्कार

शाहिद आफ्रिदी

         खैबर खिंडीत पठाणी आफ्रिदी जमात मोठया प्रमाणात वास्तव्य करते. आफ्रिदीचे वडील आणि आजोबा हे या वस्तीतील म्होरके होते. शाहिदच्या कुटुंबातील बहुतेकांनी लष्कराची वाट धरली तर काहींनी स्वत:चा उद्योगधंदा टाकला. शाहिदचा मोठा भाऊ तारिकचे क्रिकेट दुखापतीमुळे संपुष्टात आले. 1980 ला आफ्रिदीच्या कुटुंबातील काही जणांनी कराचीत स्थलांतर केले. अभ्यासाची आवड नसल्यामुळे शाहिदने क्रिकेटचा ध्यास जपला. पण शाहिदच्या वडिलांना हे मंजूर नव्हते.
        शाहिदने 16 वष्रे 216 दिवस या वयोमानाच्या क्रिकेटपटूने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम दाखविला. ‘पिंच हिटर’ ही नवी संज्ञा क्रिकेटमध्ये त्याने रूढ केली. शाहिदने 2003 च्या विश्‍वचषकानंतर संघातील वादामुळे पाकिस्तान सोडले आणि दक्षिण आफ्रिकेत स्थानिक क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
         बॉब वूल्मर पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदी आले तेव्हा त्यांना या संघात आफ्रिदी दिसेना. मग वूल्मर यांनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन शाहिदची मनधरणी केली आणि त्याला पुन्हा पाकिस्तानच्या संघात आणले. त्याने गमावलेला आत्मविश्वास त्याला पुन्हा मिळवून दिला. ऑक्टोबर 1996 पासून शाहिद पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळत आहे. या कालखंडात पाकिस्तानमध्ये राजकीय आणि क्रिकेटमधील बरीच स्थित्यंतरे झाली. क्रिकेट मंडळ बदलले, कर्णधार बदलले, वूल्मर यांचा संशयास्पद मृत्यू, मॅच फिक्सिंग, उत्तेजक सेवन अशा अनेक घटना घडल्या. पण शाहिदचे तेज कमी झाले नाही. 2009 मध्ये पाकिस्तानला ट्वेन्टी-20 क्रिकेटचे विश्वविजेतेपद मिळवून देण्यात शाहिदचा सिंहाचा वाटा होता.
         शाहिद हा गुन्हेगार आहे, असे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार अ‍ॅलन बोर्डर म्हणाले होते. याचे कारण म्हणजे शाहिदने क्रिकेटच्या मैदानावर वारंवार गैरकृत्ये, गैरवर्तने केली. कधी चेंडू कुरतडणे, कधी प्रेक्षकाला मारहाण तर कधी खेळपट्टीचे नुकसान अशा गुन्ह्यांखाली त्याने शिक्षा भोगली आहे.
       2014 मध्ये त्याने शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची निर्मिती केली. देशातील नागरिकांचे आरोग्य आणि शिक्षण पुरवण्याचे कार्य ही संस्था करते. ‘युनिसेफ’प्रमाणे अनेक जागतिक संस्थांच्या पोलिओ उपक्रमात आफ्रिदीचा सहभाग आहे.

गोपाल बागले

         मार्च, 2017 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध दहशतवादाच्या घटनांमुळे कधी नव्हे इतके ताणले गेले असतानाच पाकिस्तान विषयात हातखंडा असलेले गोपाल बागले यांची नियुक्ती परराष्ट्र प्रवक्तेपदावर झाली आहे. ते विकास स्वरूप यांची जागा घेतील. स्वरूप यांची नेमणूक कॅनडात उच्चायुक्त पदावर झाली.
         बागले यांनी 3 वर्षे पाकिस्तानात उपउच्चायुक्त म्हणून काम केलेले असल्याने त्यांना पाकिस्तानच्या राजनीतीमधील खाचाखोचा चांगल्याच ज्ञात आहेत. त्याचा फायदा त्यांच्या या नेमणुकीमुळे भारताला राजनैतिक पातळीवर होणार आहे.
1992 मध्ये परराष्ट्र सेवेत गोपाल बागले दाखल झाले. भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1992 च्या तुकडीतील ते अधिकारी असून त्यांनी लखनौ विद्यापीठात रसायनशास्त्रात एमएस्सी केल्यानंतर राजनैतिक सेवेचा पर्याय निवडला.
 1994 ते 1996 मध्ये ते युक्रेनमधील कीव येथे कनिष्ठ आयुक्त होते.
 1996 ते 1999 दरम्यान त्यांनी रशियातील भारतीय दूतावासात द्वितीय सचिवपदी काम केले.
 1999 ते 2002 दरम्यान ते लंडनमध्ये उच्चायुक्तांचे सहायक होते. संयुक्त राष्ट्रातील नेमणूक हाही त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा भाग होता. माध्यमे, माहिती व संस्कृती या विभागाचे सल्लागार म्हणून ते काम करीत होते.
         2005 ते 2008 दरम्यान काठमांडूत त्यांनी काम केले. त्यावेळी नेपाळने माओवादाच्या वर्चस्वाखालील देश असताना लोकशाहीकडे वाटचाल केली, त्या स्थित्यंतराचे बागले हे साक्षीदार आहेत. त्यानंतर त्यांना जी नेमणूक दिली गेली ती थेट पाकिस्तानात.
         2011 ते 2014 या काळात ते इस्लामाबाद येथे उपउच्चायुक्त बनले. त्यानंतर त्यांना पाकिस्तानविषयक सहसचिव हे पुढचे पद मिळाले. त्यात त्यांच्यावर पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराण या देशांच्या परराष्ट्र  मंत्रालयांशी समन्वय साधण्याचे काम होते.
        बागले यांची नेमणूक नेपाळशी आपले संबंध सुधारण्यास उपयुक्त ठरणार आहे. कारण त्यांना नेपाळी भाषा तर चांगली येतेच, शिवाय त्यांना तेथे प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव आहे. पाकिस्तान भारताशी चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असताना मोदी सरकारला सावध पावले उचलावी लागतील.
          पठाणकोट, उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणलेले आहेत अशा परिस्थितीत भारताने नेमकी पाकिस्तानबाबत काय भूमिका घ्यावी हे ठरवण्यात बागले यांची मोठी भूमिका राहील. याशिवाय दोन्ही देशांत नेहमी वाक्युद्ध सुरूच असते, त्यात तोलूनमापून योग्य तेच बोलण्याचे कसब त्यांच्याजवळ आहे यात शंका नाही.
पाकिस्तानशी निगडित इराण व अफगाणिस्तान या देशांचाही त्यांना चांगला अनुभव आहे. एकीकडे चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा ही डोकेदुखी आहे.
         मौलाना मासूद अझर याला दहशतवादी जाहीर करण्यात चीनने दोनदा संयुक्त राष्ट्रात भारताच्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणले. त्यानंतर मॉस्को येथे अफगाणिस्तानसंबंधी शिखर परिषदेत हा विषय मांडण्यासाठी खास बागले यांना पाठवण्यात आले होते, यावरून त्यांची राजनैतिक वाटाघाटीतील निपुणता समजून यावी. भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर संपर्क वाढावा, त्यातून गुंतवणूकही मिळावी यासाठी एक विभाग परराष्ट्र मंत्रालयात सुरू करण्याचे पायाभूत कामही त्यांनी केले आहे. 2017 मध्ये परराष्ट्र खात्यातील वीस अधिकारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांची एक नवी फळी परराष्ट्र खात्यात पुढे येत आहे, त्यात बागले हे एक आहेत.

एअर मार्शल अजित भोसले

          एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (निवृत्त) यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.  हवाई दलात विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणार्‍या भोसले यांना प्रदीर्घ अनुभव आहे. 5,200 तास उड्डाणाचा अनुभव असणारे भोसले प्रथम श्रेणीतील प्रमाणित दिशादर्शन प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. गांधीनगरच्या दक्षिण-पश्‍चिम मुख्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. हवाई दलाच्या देशातील व देशाबाहेरील मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला.
           हवाई दलातील 39 वर्षांच्या सेवाकाळात आघाडीवरील तळ आणि कार्यालयीन व्यवस्थेतील विविध पदांवरील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. हवाई मोहिमांमध्ये सहभाग, भरतीपूर्व लष्करी प्रशिक्षण आणि शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास, हेरगिरी रोखणे, प्रशिक्षण संस्थांची क्षमतावाढ, लष्करी जवान-स्थानिक नागरिक संबंधांचे व्यवस्थापन, सायबर सुरक्षितता व हवाई उड्डाणातील सुरक्षितता अशा नानाविध विषयांवर त्यांनी काम केले. पुण्याच्या हवाई दल केंद्राचे मुख्य व्यवस्थापक, नवी दिल्लीच्या हवाई दलाच्या मुख्यालयात गुप्तचर विभागाच्या प्रमुख व्यवस्थापकाची धुरा त्यांनी सांभाळली.
कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बस्तवडे हे त्यांचे मूळ गाव. 15 फेब्रुवारी 1957 रोजी त्यांचा जन्म झाला. वडील कृषी विभागात असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण भ्रमंती करीतच झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी नाशिकच्या भोसला सैनिकी विद्यालयातून पूर्ण केले. या शाळेतून त्यांच्या जीवनाला खर्‍या अर्थाने कलाटणी मिळाली. घोडेस्वारी, नेमबाजी या प्रकारांत नैपुण्य मिळविताना ते अभ्यासात नेहमी अव्वल राहिले. यामुळे सवरेत्कृष्ट विद्यार्थ्यांचा किताबही त्यांनी पटकावला. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि लष्करी सेवेत जाण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे फलित म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झाले.
           8 जून 1978 रोजी त्यांची हवाई दलाच्या उड्डाण (दिशादर्शन) शाखेत नेमणूक झाली. डिफेन्स सव्र्हिस स्टाफ कॉलेजचे पदवीधर असणार्‍या भोसले यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून एम. एस्सी. तर कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटमधून व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेतले. सेवा काळात त्यांनी जपानमधील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट अ‍ॅण्ड नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिफेन्समधून एम. फिल.ची पदवी मिळविली.
           त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सरकारने 2005 मध्ये विशिष्ट सेवा पदकाने तर 2010 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकाने भोसले यांना सन्मानित केले.

टीसीएसचे प्रमुख राजेश गोपीनाथन

          टाटा समूहाची ‘ब्ल्यू आईड’ कंपनी म्हणजे टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसचे प्रमुख नटराजन चंद्रशेखरन ऊर्फ एन. चंद्रा. टाटा समूहाचे टाटा कुटुंबाबाहेरील पहिले अध्यक्ष म्हणून सूत्रे