Menu

Study Circle

३० डिसेंबर २०१७

माजी फुटबॉलपटूची राष्ट्रपतिपदी नियुक्ती

      फुटबॉलच्या मैदानात आपली जादू दाखवणारा माजी फुटबॉलपटू जॉर्ज विया यांची लायबेरियाच्या राष्ट्रपतिपदी नियुक्ती झाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये विया यांनी प्रतिस्पर्धी जोसेफ बोकाई यांना ६० टक्केपेक्षा अधिक मताधिक्याने पराभूत केले. लायबेरियाची राजधानी मोनरोवियामध्ये वियो यांच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. जॉर्ज विया हे अॅलेन जॉनसन सरलीफ यांची जागा घेणार आहेत.

      राष्टपती पदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर जॉर्ज विया यांनी ट्विटरवरुन देशवायियांचे आभार मानले. हा विजय अभिमानास्पद असून, राष्ट्रपती पदाची जबाबदारीची जाणीव ठेवून कामाला सुरुवात करेल, अशी भावना व्यक्त केली आहे. वियोची फुटबॉलच्या मैदानातील कामगिरी उल्लेखनिय अशीच आहे. 'फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर' आणि बॅलन डीऑर पुरस्कार मिळवणारे आफ्रिकेचे ते एकमेव खेळाडू आहेत. २००२ मध्ये फुटबॉलला अलविदा केल्यानंतर वियो यांनी राजकारणात प्रवेश केला होता.

     एखाद्या खेळाडूने राजकारणात पाऊल ठेवल्याची ही पहिली वेळ नाही. सध्याच्या घडीला भारतीय राजकारणात देखील खेळाडूंनी राजकीय खेळीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय नेमबाज राज्यवर्धन राठोड यांनी राजकीय पटलावर एक विशेष स्थान मिळवले आहे. ते भारतीय मंत्रिमंडळात क्रीडामंत्रीपदावर विराजमान आहेत. याशिवाय सचिन तेंडुलकर, मेरीकोम देखील राज्यसभेचे सदस्य आहेत. मोहम्मद अझरुद्दीन यांनी देखील काँग्रेसकडून खासदारकीचा प्रवास केला आहे.

*    बांगलादेशविरोधात एकमेव कसोटी मालिका भारताने जिंकली होती.

*    ऑस्ट्रेलियाविरोधातील 4 कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-1 ने जिंकली.

*    श्रीलंकेमध्ये ऑगस्टमध्ये भारताने 3 कसोटी सामन्याची मालिका 3-0 ने जिंकली.

*    भारतात झालेली 3 सामन्याची कसोटी मालिकाही भारताने जिंकली.

2017 तील भारताचे वन-डे मालिका विजय -

*    इंग्लंडविरोधात 3 सामन्याच्या मालिकेत 2-1 ने विजय.

*    वेस्टइंडीज विरोधातील 5 सामन्याची मालिका 3-1 ने जिंकली.

*    ऑगस्टमध्ये विराटसेनेने 5-0 ने लंकादहन केले.

*    5 सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने पराभव केला.

*    न्यूझीलंडचा 2-1 ने पराभव केला.

*    वर्षाच्या शेवटी लंकेचा 2-1 ने पराभव.

2017 तील भारताचे  टी-20 मालिका विजय -

*    इंग्लंडचा 2-1 ने फडशा पाडला.

*    लंकेचा 1-0 ने पराभव केला.

*    न्यूझीलंडचा 2-1 ने पराभव.

*    वर्षाखेरीस लंकेचा 3-0 ने फडशा पाडला.

आंध्रलता आशालता करलगीकर यांचे निधन

      येथील ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका डॉ. आशालता करलगीकर यांचे दीर्घ आजाराने येथील रुग्णालयात  निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. 

      हैदराबाद येथे लहानपणीच उत्कृष्ट गायिका म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला . पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नीलम संजीव रेड्डी, लता मंगेशकर, मोहमद रफी आदी मान्यवरांसमोर त्यांनी आपली कला सादर करून प्रशंसा मिळविली होती. १९६३ साली अफगानिस्तान मधील काबूल येथे पं. भीमसेन जोशी, पं. सामताप्रसाद, ज्येष्ठ नृत्यांगना इंद्राणी रहमान अशा नामांकित कलाकारांबरोबर त्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला.

         त्यांच्या सांगीतिक कर्तुत्वामुळे त्यांना माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद ह्यांनी 'आंध्रलता' हा किताब देऊन गौरविले होते. विमा कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या आशाताईंना सूरमणी, सुरश्री असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. अतिशय नम्र, लाघवी व अभ्यासू गायिका गमावल्याने औरंगाबादच्या कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. 
त्यांच्या पश्चात पती वसंतराव करलगीकर, मुलगा निषाद, सून विद्या, मुलगी कविता, जावई किशन वतनी व नातवंडे असा परिवार आहे.

२९ डिसेंबर २०१७

भारताने पाकिस्तानचा तो विक्रम काढला मोडीत...

     मुंबईच्या वानखेडे मैदानात अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात करत मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत विजय संपादन केला. या विजयासह 2017 वर्षाचा शेवट भारतीय संघाने गोड केला आहे. हे वर्ष भारतीय संघासाठी लाभदायी ठरले आहे. यावर्षभरात भारतीय संघाने अनेक विक्रम आपल्या नावे केले.

     2017 वर्षभरात खेळलेल्या सर्वच 14 द्विपक्षीय मालिकेत भारताने विजय मिळवला आहे. टी-20 मालिकेत विजय मिळवताच भारताने पाकिस्तानचा वर्षभरात सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. 2011 मध्ये पाकिस्तान संघाने 13 मालिका विजय मिळवले होते. भारताने 2017 मध्ये 4 कसोटी, 6 वन-डे आणि 4 टी-20 मालिकेत विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले. 2018 च्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन हात करणार आहे. त्यामुळे होम ग्राऊंडवर मिळवलेला विजयी सिलसिला परदेशात कायम राखणार का? हा प्रश्न क्रीडारसिकांना पडलेला असेल.

2017 तील भारताचे कसोटी मालिका विजय -

*    बांगलादेशविरोधात एकमेव कसोटी मालिका भारताने जिंकली होती.

*    ऑस्ट्रेलियाविरोधातील 4 कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-1 ने जिंकली.

*    श्रीलंकेमध्ये ऑगस्टमध्ये भारताने 3 कसोटी सामन्याची मालिका 3-0 ने जिंकली.

*    भारतात झालेली 3 सामन्याची कसोटी मालिकाही भारताने जिंकली.

2017 तील भारताचे वन-डे मालिका विजय -

*    इंग्लंडविरोधात 3 सामन्याच्या मालिकेत 2-1 ने विजय.

*    वेस्टइंडीज विरोधातील 5 सामन्याची मालिका 3-1 ने जिंकली.

*    ऑगस्टमध्ये विराटसेनेने 5-0 ने लंकादहन केले.

*    5 सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने पराभव केला.

*    न्यूझीलंडचा 2-1 ने पराभव केला.

*    वर्षाच्या शेवटी लंकेचा 2-1 ने पराभव.

2017 तील भारताचे  टी-20 मालिका विजय -

*    इंग्लंडचा 2-1 ने फडशा पाडला.

*    लंकेचा 1-0 ने पराभव केला.

*    न्यूझीलंडचा 2-1 ने पराभव.

*    वर्षाखेरीस लंकेचा 3-0 ने फडशा पाडला.

राज्यसेवेच्या 69 जागांसाठी भरती

       महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षेची घोषणा केली असून एकूण 69 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज 18 जानेवारी 2018 पर्यंत करता येणार आहे. आयोगाद्वारे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 69 जागांसाठी भरती करण्याची घोषणा 28 डिसेंबर 2017 रोजी केली.

       यावेळी आयोगाद्वारे घोषणा केलेल्या जाहिरातीनुसार या परीक्षेद्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (6 जागा), सहायक संचालक-महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (8 जागा), तहसीलदार (6 जागा), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (4 जागा), कक्ष अधिकारी (26 जागा), सहायक गट विकास अधिकारी (16 जागा), उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (2 जागा), सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.

       उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जानेवारी 2018 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www. mahaonline.gov.in / www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

समुद्रातील मत्स्यसाठे शोधण्यासाठी ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन’ प्रकल्प

       कोकण किनारपट्टी भागात असलेल्या सागरी समृद्धीला अधिक व्यापकपणे प्रस्तुत करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने प्रस्तावित केलेला ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन’ प्रकल्प  ‘इस्रो’च्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात उपग्रहाद्वारे सागरतळातील विश्वाचा धांडोळा घेण्यात येणार आहे. त्यानुसार सागरी व्यावसायिक मासेमारी आणि  पर्यटनाच्या दृष्टीने किनारपट्टी भागात असलेल्या प्रवाळ बेटांचे सर्वेक्षणही करण्यात येणार आहे.

      कोकणातील सागरी मासेमारीवर असलेला कालावधी आणि  मर्यादांमुळे आलेले संकट त्यामुळे कोकणचे अर्थकारण धोक्यात आले आहे. या व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी मत्स्य विभागाने ‘इस्रो’च्या मदतीने उपग्रहाद्वारे सागरातील मत्स्यसाठे आणि त्यांची संवर्धनस्थळे निश्चित करण्यासाठी ‘स्पेस अ‍ॅॅप्लिकेशन’ प्रकल्प प्रस्तावित केला आहे. कोकणातील मत्स्य हंगामाच्या बंदीच्या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पाची चाचणी घेण्यात येणार आहे.

      या प्रकल्पाद्वारे सागरी क्षेत्रात प्रामुख्याने संप्रेषण, नेव्हिगेशन आणि रिमोट सेन्सिंग गरजा पूर्ण करणार आहेत. या प्रकल्पात सागरतळाची भौगोलिक रचना, तेथील पर्यावरण आणि हवामानातील बदल, भौगोलिक समुद्रशास्त्र, जीवशास्त्रविषयक समुद्रशास्त्र, सागरी जीवसंवर्धन आदी भागातील सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

स्वच्छता सर्वेक्षणात नाशिक 22 वे

        केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात अमृत योजनेतील 500 शहरांमध्ये नाशिक महापालिकेने कागदोपत्री पुराव्यांच्या आधारावर 22 व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. कागदोपत्री सादरीकरणात महापालिकेला 1800 पैकी 1641 गुण मिळाले असून, त्यामुळे महापालिकेने 500 शहरांमध्ये 22 व्या स्थानावर झेप घेतली असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. त्यामुळे आता पहिल्या 10 मध्ये येण्यासाठी महापालिकेला प्रत्यक्ष सर्वेक्षण पथकासमोर जोर लावावा लागणार आहे. दरम्यान, नाशिक शहराने पहिल्या 5 मध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता सर्वेक्षणासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक महापालिकेसह नगरपालिकांच्या कामगिरीचा आढावा घेतला. या आढाव्यासंदर्भात पत्रकांराना माहिती देताना आयुक्त कृष्णा यांनी पालिकेची कामगिरी सुधारल्याचा दावा केला आहे. यावर्षी देशभरातील 4140 शहरांसाठी स्वच्छता सर्वेक्षण होत असून, त्यात अमृत योजनेतील शहरे व अन्य शहरे असे दोन गट करण्यात आले आहेत. नाशिकचा समावेश अमृत योजनेत असून, महापालिकेने आतापर्यंत या सर्वेक्षणात विविध प्रकल्प व त्यांच्या अंमलबजावणी संदर्भातील कागदपत्रे सादर केली आहेत. कागदोपत्री सादरीकरणात 1800 गुण आहेत. त्यापैकी महापालिकेला 1641 गुण मिळाले असून, नाशिकचा क्रमांक 22 वा आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महापालिकेने वर्षभरात खतप्रकल्प, घंटागाडी, वेस्ट टू एनर्जी, घनकचरा व्यवस्थापन यामध्ये केलेल्या कामगिरीचा त्यात सहभाग आहे.  येत्या 4 जानेवारीपासून शहरात प्रत्यक्ष स्वच्छता सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. त्यासाठी केंद्रीय पथकही येणार आहे. त्यामुळे या पथकासमोर पालिकेला आता जोर लावून कामगिरी उंचवावी लागणार आहे.

काबूलमध्ये ‘इसिस’चा हल्ला

        अफगाणिस्तानची राजधानी काबूल हे शहर 28 डिसेंबर रोजी बॉम्बस्फोटाने हादरले. काबूलमधील पूल सोखतिया या परिसरात हा स्फोट झाला असून या स्फोटात किमान 40 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

         काबूलमध्ये कल्चरल सेंटरमध्ये 28 डिसेंबर सकाळी 10.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. कल्चरल सेंटरचा परिसर बॉम्बस्फोटांच्या आवाजाने हादरून गेला. आत्मघाती दहशतवाद्यांनी कल्चरल सेंटरच्या तळमजल्यावर हल्ला केला. तळमजल्यावरील सभागृहात किमान 100 जण उपस्थित होते. 2 दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हल्ल्यानंतर काही वेळाने दोन्ही दहशतवाद्यांनी स्वतःला बॉम्बने उडवून दिले. याच इमारतीमध्ये इराणमधील एका न्यूज एजन्सीचेदेखील कार्यालय आहे. महिला, लहान मुले आणि पत्रकार यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या हल्ल्यात 30 जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान ग्रेनेड फेकल्याचे समजते. या हल्ल्यामागे आमचा हात नाही, असे तालिबानने स्पष्ट केले. याच आठवड्यात काबूलमध्ये ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता. एनडीएसच्या कार्यालयाजवळ हा हल्ला झाला होता. 20 ऑक्टोबर रोजीही ‘इसिस’ने काबूलला लक्ष्य केले होते. 2 मशिदींबाहेर हा स्फोट झाला होता.

२८ डिसेंबर २०१७

पृथ्वी 4 जानेवारीला सूर्यापासून किमान अंतरावर, खगोलीय घटना

     सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरणार्‍या पृथ्वीचे अंतर सूर्यापासून साधारणपणे 15 कोटी किलोमीटर असते. मात्र, येत्या 4 जानेवारी रोजी पृथ्वी आणि सूर्याचे अंतर 14.71 कोटी किलोमीटर राहील. सूर्य पृथ्वीच्या जवळ असण्याच्या या खगोलीय घटनेला उपसूर्य असे म्हणतात. हे अंतर जुलै महिन्यातील अपसूर्य या खगोलीय घटनेपेक्षा सुमारे 50 लाख किलोमीटरने कमी असेल. उपसूर्य या घटनेचा जीवसृष्टीवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, सूर्याकडे थेट पाहणे डोळ्यांकरिता धोक्याचे राहील, अशी माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.

भारत बनणार पाचवी आर्थिक महासत्ता

    येत्या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकासदरात (जीडीपी) ब्रिटन आणि फ्रान्स या दोन आर्थिक महासत्तांना मागे टाकेल, असा अंदाज वर्तविला आहे. डॉलरच्या गंगाजळीमध्ये ब्रिटन व फ्रान्सला मागे टाकत भारत जगातील पाचवी आर्थिक महासत्ता होणार आहे.

     ’द सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ने (सीईबीआर) यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार आगामी वर्षात वीज आणि तंत्रज्ञान कमी किंमतीत उपलब्ध होऊन एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळेल. याशिवाय, आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवतील. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व वाढणार आहे. या एकूणच परिस्थितीमुळे आगामी 2018 वर्षात जगातील आघाडीच्या 10 अर्थव्यवस्थांच्या यादीत आशियाई देशांचे वर्चस्व असेल, असे या अहवालात सांगितले आहे.

       ब्रेग्झिटच्या धक्क्यातून सावरत असलेली ब्रिटनची अर्थव्यवस्था 2020 पर्यंत पुन्हा फ्रान्सला मागे टाकेल. तर रशियाचे जागतिक बाजारपेठेतील स्थान आणखी घसरेल. खनिज तेलाच्या कमी किंमतीला सरावलेली रशिया ऊर्जा क्षेत्रावरच मोठ्याप्रमाणावर अवलंबून राहील. मात्र, त्यामुळे नुकसान होऊन रशियाची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावरून 17 व्या स्थानापर्यंत खाली घसरेल, असे अंदाजही सीईबीआरच्या अहवालात वर्तविला आहे.

सध्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्बंधांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास मंदावल्याचे चित्र आहे. तरीही भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि फ्रान्सला सहजपणे माघारी टाकेल आणि जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल.

* डग्लस मॅकविल्यम्स, उपाध्यक्ष सीईबीआर

     या अहवालामध्ये जागतिक अर्थव्यस्थेत चीनचे वाढते महत्त्वही विषद केले आहे. 2032 पर्यंत अमेरिकेला मागे टाकून चीन जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. मात्र, अमेरिका आपले दुसरे स्थान अबाधित राखेल, असे निरीक्षण या अहवालात मांडले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उद्योग धोरणांमुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होईल, असे अंदाज बांधण्यात आले होते.

२७ डिसेंबर २०१७

जयराम ठाकूर घेणार हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

     गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये जयराम ठाकूर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 68 सदस्यांच्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले पण मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल यांचा पराभव झाल्यामुळे तिथे मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला होता. अखेर नव्याने निवडून आलेल्या सर्व आमदारांनी एकमताने जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली.

       जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक करुन भाजपाने धुमल यांच्या तुलनेत तरुण पण हिमाचल भाजपातील ज्येष्ठ नेत्यास संधी दिली आहे. जयराम ठाकूर हे भाजपाचे मंडी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ठाकूर यांच्या रुपाने भाजपाने पुन्हा रजपूत व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी संधी दिली आहे. अत्यंत तरुण वयातच ठाकूर अभाविपचे कार्यकर्ते म्हणून काम करु लागले.

     काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये अभाविपचे काम केल्यावर 1993 साली वयाच्या 28 व्या वर्षी ते विधानसभेची पहिली निवडणूक लढले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी 1998 साली विधानसभेत प्रथमच प्रवेश केला, त्यानंतर ते सतत विजयी होत गेले. प्रेमकुमार धुमल यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांची जबाबदारीही सांभाळली होती. ठाकूर यांनी 2013 साली मंडी लोकसभा मतदारसंघातून पोट निवडणूक लढवली होती मात्र तत्कालीन मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह यांचा विजय झाल्यामुळे त्यांना लोकसभेत जाता आले नाही. असे असले तरी ठाकूर यांची मंडी विभागावर पकड कायम राहिली. मंडी विभागात 10 पैकी 9 जागा भाजपाने जिंकल्या आहेत.

    जयराम ठाकूर हे केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या निवडीमुळे नड्डा यांचे हिमाचल भाजपातील स्थान बळकट होणार असे सांगण्यात येते तर प्रेमकुमार धुमल व अनुराग ठाकूर यांच्या हिमाचलमधील स्थानास धक्का पोहोचू शकतो.

सर्वात लहान पिझ्झा बनविण्याचा विश्वविक्रम

     जगातील सर्वात लहान पिझ्झा तयार करण्याचा विक्रम सर्वेश जाधव व त्याच्या सहकार्‍यांनी केला. या सर्वात लहान पिझ्झाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली. या पिझ्झाचा आकार फक्त एक इंच असून तो बनविणारा सर्वेश जगातील एकमेव आहे. हा पिझ्झा नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने बनविण्यात आला असून शिमला मिरची, मोझरेला चिजच्या साहाय्याने सजविण्यात आला होता. आकाराने लहान असल्याने तो सहज खाता यावा म्हणून त्यात फोर्सिप व ड्रॉपरसचा वापर करण्यात आला होता. नाताळनिमित्त असे 4 हजार पिझ्झा बनवून ते खडकी कॅन्टोन्मेंट भागातील वंचित मुलांना देण्यात आले.

    या विक्रमाच्या वेळी पाककला विश्वातील शेफ विष्णु मनोहर, सरपोतदार केटर्सचे किशोर सरपोतदार, पुणे रेस्टॉरंटचे प्रदीप बलवळकर उपस्थित होते. शेफ सर्वेश जाधव म्हणाले की लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटात पिझ्झा अत्यंत प्रिय आहे. नाताळनिमित्त सर्वाना पिझ्झाचा आस्वाद घेता यावा या हेतूने हा उपक्रम केला. सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न चालू असतो. छोटा पिझ्झा असल्याने अगदी कमी किमतीत याचा आस्वाद सर्वांना घेता येणार आहे.

२६ डिसेंबर २०१७

जगातील सर्वात मोठे ‘उभयचर’ विमान

    पाणी आणि जमिनीवरूनही चालू शकणारे जगातील सर्वात मोठे ‘उभयचर’ (एम्फिबियस) विमान चीनने विकसित केले असून, रविवारी याची चाचणी घेण्यात आली. ‘कुनलोंग’ असे टोपण नाव असलेल्या या विमानाने जिनवान एअरपोर्टवरून पहिले उड्डाण केले. चीनमध्येच तयार करण्यात आलेले हे विमान 39.6 मीटर लांबीचे असून 53.5 टन इतके वजन आहे. एकाच वेळी 12 तास आणि 4 हजार 500 कि.मी.पर्यंत अंतर उडण्याची क्षमता त्याच्यात आहे. 50 आसन क्षमतेचे या विमानात 12 टन पाणी भरण्याची देखील क्षमता आहे. त्यामुळे जंगलात लागणार्‍या आगींना विझवण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. चिनी लष्काराच्या आधुनिकीरणाचा  देखील हा एक भाग असून दक्षिण चिनी समुद्रावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी देखील चीन या विमानाचा उपयोग करेल.

जगातील सर्वात छोटे ख्रिसमस कार्ड

    जगभरात ख्रिसमसचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत असतात. आपला ख्रिसमस सगळ्यात वेगळा असावा, असा प्रत्येक देशातील नागरिक प्रयत्न करतात. त्याच एक भाग म्हणून ब्रिटनमधील राष्ट्रीय भौतिक शाळेतील वैज्ञानिकांनीही जगातील सर्वात छोटे ख्रिसमस कार्ड तयार करून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ख्रिसमस साजरा 
केला. 

    हे कार्ड फक्‍त 15 मायक्रोमीटर आकारचे आणि 20 मायक्रोमीटर लांबीचे आहे. हे कार्ड पाहण्यासाठी अत्यंत शक्‍तीसाठी मायक्रोस्कॉपची गरज लागले. यावर ख्रिसमसच्या शुभेच्छा देखील असून प्लेटिनमचा मुलामा दिलेले हे कार्ड सिलिकॉन नायट्राईडने बनलेले आहे. याचा उपयोग प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये केला जातो.

देशातील पहिली वातानुकूलित लोकल

     वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहणार्‍या मुंबईतील प्रवाशांची वातानुकूलित लोकलची प्रतीक्षा अखेर संपली. नाताळनिमित्त रेल्वे मंत्रालयाने मुंबईला वातानुकूलित लोकलची भेट दिली. देशातील पहिली वातानुकूलित लोकल सकाळी 10.30 वाजता बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जलद मार्गावरून निघाली. सुटीचा दिवस असूनही मुंबईतील प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.

     बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक 9 वर सकाळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी, खासदार किरीट सोमय्या, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, आमदार आशिष शेलार यांनी या लोकलला हिरवा कंदील दाखवला. बोरिवलीहून सुटलेली ही पहिली लोकल मोठ्या दिमाखात अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल या स्थानकांत थांबत चर्चगेटला पोचली. थंडीचे दिवस अन् त्यात सुटीचा दिवस असूनही प्रवाशांनी या लोकलने मोठ्या उत्साहात व हौसेपोटी प्रवास केला. ही लोकल चालवण्याचा पहिला मान मोटरमन शैलेश गेडाम यांना मिळाला. लोकलचा प्रवासी गार्ड होण्याचा मान जगनाथ पी. यांना मिळाला. लोकलचे स्वयंचलित दरवाजे, मोठमोठ्या खिडक्या व फुलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

       प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन साध्या लोकलमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, मात्र या वातानुकूलित लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. ’यूटीएस अ‍ॅप’मध्ये या लोकलचे वेळापत्रक दिलेले नाही. इंडिकेटरवर लोकल वातानुकूलित असल्याचे दाखवले जात नव्हते. त्याबाबत उद्घोषणाही करण्यात आली नाही.

२५ डिसेंबर २०१७

जगातील सर्वात लांब काचेचा पूल नागरिकांसाठी खुला

     चीनमध्ये जमिनीपासून २१८ मीटरवर काचेपासून उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच पूल रविवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. हा पूल हेबेईमधील शिजियाझुआंग शहरात आहे. हा काचेचा पूल जगातील सर्वात उंच असल्याचे सांगण्यात येत आहे. 

    दोन दरींवर बांधण्यात आलेल्या या पूलाची रुंदी दोन मीटर आहे. पूलासाठी वापरण्यात आलेली काच ही चार सेंटीमीटर जाड आहे. या काचेचे वजन  ७० हजार किलो आहे.

२४ डिसेंबर २०१७

जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

     हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी जयराम ठाकूर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पदासाठी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अखेर या शर्यतीत ठाकूर यांनी बाजी मारली. बुधवारी शपथविधी समारंभ पार पडेल.

  हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपकडून प्रेमकुमार धुमल यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले होते. मात्र, धुमल यांचा निवडणुकीत पराभव झाल्याने या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून होते. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि जयराम ठाकूर यांच्या नावांची चर्चा होती. 

     यासंदर्भात रविवारी भाजप संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत ठाकूर यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याची घोषणा नरेंद्रसिंह तोमर यांनी केली. ते म्हणाले, आज झालेल्या बैठकीत जयराम ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव प्रेमकुमार धुमल यांनी सादर केला. त्यास जे. पी. नड्डा आणि शांतीकुमार यांनी पाठिंबा दिला. अन्य कोणताही प्रस्ताव आला नसल्याने ठाकूर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. 

फिलिपाईन्समध्ये आगीत ३७ ठार

      फिलिपाईन्समधील डेवाओ शहरातील एका मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीने 37 जणांचे बळी घेतले. चार मजल्यांच्या या मॉलमध्ये अनेक जण आगीत अडकून पडले असल्याची भीती व्यक्‍त केली जात असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

      मॉलच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली. यामध्ये चौथ्या मजल्यावर एक कॉल सेंटर आहे. हे कॉल सेंटर 24 तास सुरू असते. येथील कर्मचार्‍यांना याची माहिती मिळाली नसल्याने ते आतच अडकून पडले. येथील मृतांचा आकडा सर्वाधिक असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

      रविवारी पहाटे तिसर्‍या मजल्यावर आग लागली. येथे कपडे आणि लाकडी फर्निचर मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने तत्काळ रौद्ररूप धारण केले. पहाटेची वेळ असल्याने मदतकार्य करण्यासाठी शासकीय यंत्रणांना घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागला. यामुळे आग लवकर आटोक्यात आली नाही. या आगीच्या मागील कारणांची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

23 डिसेंबर २०१७

बरेली युनिव्हर्सिटीकडून प्रियांकाला ‘डॉक्टरेट’

   प्रियांका चोप्राला बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. प्रियांका सध्या हॉलिवूड आणि बॉलिवूड अशा दोन्ही ठिकाणच्या कामांमध्ये व्यस्त असते. याचसोबत प्रियांका युनिसेफची ब्रॅण्ड ॲबेसिडर देखील आहे. प्रियांकाला नुकतेच ‘मदर तेरेसा’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आता तिला एका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीकडून तिला डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे. 

     उत्तर प्रदेशमधील बरेली शहर हे प्रियांकाचे मुळ गाव आहे. प्रियांकाला तिने शिक्षण घेतलेल्या ‘बरेली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’कडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे. 
     बरेली युनिव्हर्सिटीच्या दिक्षांत समारंभाला प्रियांका उपस्थित राहणार आहे. यावेळी प्रियांकाला मोमेंन्टो देऊन सत्कार करण्यात येणार आहे. 

     ‘प्रियांकाचा असा गौरव होत असल्याने मी खूप आनंदी आहे, प्रियांका अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेत असते. तिच्या कामामुळेच ती या सन्मानासाठी पात्र आहे’ असे प्रियांकाच्या आई मधू चोप्रा यांनी म्हटले. 

२१ डिसेंबर २०१७

देशातील कोट्यधीशांच्या संख्येत वाढ

     देशातील कोट्यधीशांची संख्या आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये 23.5 टक्क्यांनी वाढून 59,830 वर पोचली. आधीच्या वर्षाच्या तुलनेत कोट्यधीशांची संख्या वाढली असली, तरी त्यांच्या एकूण उत्पन्नात मात्र, 50,889 कोटी रुपयांची घट झाली आहे.

     प्राप्तिकर विभागाने विवरणपत्र छाननी वर्ष 2015-16 (आर्थिक वर्ष 2014-15) मधील आकडेवारी जाहीर केली. यानुसार, 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या 59,830 आहे. त्यांची एकूण संपत्ती 1.54 लाख कोटी रुपये आहे. छाननी वर्ष 2014-15 मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांची संख्या 48,417 होती. त्यांची एकूण संपत्ती 2.05 लाख कोटी रुपये होती.

      छाननी वर्ष 2015-16 मध्ये देशातील 1.2 अब्ज नागरिकांपैकी 4.07 कोटी करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्रे भरली. यातील 82 लाख जणांनी शून्य अथवा अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न दाखविले. सध्या अडीच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर आकारला जात नाही. छाननी वर्ष 2014 -15 मध्ये 3.65 कोटी नागरिकांनी प्राप्तिकर विवरणपत्रे भरली होती. त्यातील 1.37 कोटी नागरिकांनी शून्य अथवा अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न दाखविले होते.  छाननी वर्ष 2015-16 मध्ये सर्व करदात्यांचे एकूण उत्पन्न वाढून 21.27 लाख कोटी रुपयांवर पोचले. त्याआधीच्या छाननी वर्षात ते 18.41 लाख कोटी रुपये होते. सर्वाधिक 1.33 कोटी करदाते 2.5 ते 3.5 लाख या उत्पन्नगटातील होते

हाफिज सईदची पाककडून पाठराखण

      मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याची पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा यांनी जोरदार पाठराखण केली. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी सईद हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे स्पष्ट करत बाज्वा म्हणाले, की प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा त्याला हक्क आहे.

      पाकिस्तानी संसदेच्या एका समितीसमोर बाज्वा यांनी परराष्ट्र धोरण, दहशतवादाच्या विरोधातील लढाई अशा अनेक मुद्द्यांवर मते मांडली. यावेळी बाज्वा यांनी सईद संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वरील धक्कादायक विधाने केली.

      प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा सईदला हक्क आहे. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी तो महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे बाज्वा म्हणाले. या वेळी बाज्वा यांनी सईदची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.

      पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी आगामी निवडणुकीसाठी सईदच्या जमात उद दवा (जेयूडी) या संघटनेशी आघाडी करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्या पार्श्वभूमीवर बाज्वा यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. जेयूडीचा प्रमुख असलेल्या सईदचा समावेश जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत संयुक्त राष्ट्रांनी केला आहे.

* सईदप्रकरणी अमेरिकेला चिंता

       मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याने पाकिस्तानात होणारी 2018 ची सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून, ही अतिशय गंभीर बाब आहे. या घडामोडींबाबत आम्हाला चिंता वाटते आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली. जमात उद दवा (जेयूडी) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेला सईद हा पाकिस्तानात खुलेआम फिरत असल्याबद्दलही अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. दहशतवादी कारवाया केल्याबद्दल सईदच्या डोक्यावर अमेरिकेने 1 कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.  लष्करे तोयबाचाही संस्थापक असलेल्या सईदने निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मिल्ली मुस्लिम लीग पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचे सईदने म्हटले असले, तरी या पक्षाची अद्याप निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात आलेली नाही.

       सईदची नोव्हेंबरमध्ये नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तो पाकिस्तानात मोकाट फिरत असून, त्याने निवडणूक लढविण्याची घोषणा करणे या घडामोडी चिंताजनक आहेत, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने व्यक्त केले.

२० डिसेंबर २०१७

बेबीताई गायकवाड यांना कराड पुरस्कार

    पुणे येथील डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, आळंदीचे भारत विश्वशांती केंद्र आणि पुणे येथील माईर्स एमआयटी व भारत अस्मिता फाउंडेशनद्वारे दिला जाणारा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार नगरच्या बेबीताई गायकवाड यांना जाहीर झाला आहे. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, संतश्री ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा व 11 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 24 डिसेंबर रोजी लातूर येथील माईर्स एमआयएमएसआर मेडिकल कॉलेजमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

        भाजी विक्री करता करता स्वतःचा अवांतर वाचनाचा छंद जोपासून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी बेबीताई गायकवाड विविध उपक्रम राबवतात. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतःच्या घरी ग्रंथालयही सुरू केले आहे. गायकवाड यांच्यासह शंकरराव खोत (वाजेवाडी, जि. सातारा), डॉ. अशोक बेलखोडे (किनवट, जि. नांदेड), सुदामकाका भोंडवे (डोमरी, जि. बीड), प्रणव खुळे (सातुर्ना, अमरावती), रेखा भिसे (सारसा, जि. लातूर), रोहिणी नायडू (नाशिक), प्रदीप नणंदकर (लातूर) व जयवंत महाराज बोधले (पंढरपूर, जि. सोलापूर) यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक आरोग्य व कामगार राज्यमंत्री विजयसिद्रामप्पा देशमुख, लातूरचे माजी खासदार गोपाळराव पाटील, तेथील प्रसिद्ध विवेकानंद हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अशोक कुकडे, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.

       पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडीसारख्या मागासलेल्या भागातून पोट भरण्यासाठी नगरला येऊन भाजीपाल्याचा व्यवसाय केला, भाजीपाला विकत असतानाच येणार्‍या महिला व मुलांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण केली, जुन्या रुढी-परंपरांना झटकून वीरपत्नी व विधवांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना एकत्र आणले, त्यांचे मतपरिवर्तन करून विधवा विवाहास प्रोत्साहन दिले म्हणून गायकवाड यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार असल्याचे विश्वशांती विद्यापीठाद्वारे स्पष्ट केले आहे.

जगातील स्थलांतरितांत भारताचा पहिला क्रमांक

    परदेशातील स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर असून एकूण 1.7 कोटी भारतीय लोक परदेशात वास्तव्य करीत आहेत. त्यातील 50 लाख लोकांचे सध्याचे वास्तव्य आखातात आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.

     मेक्सिको, रशिया, चीन, बांगलादेश, सीरिया, पाकिस्तान, युक्रेन या देशांचे लोक त्या खालोखाल मोठ्या प्रमाणात स्थलांतरित म्हणून परदेशात आहेत. त्यांची संख्या 0.6 ते 1.1 कोटी आहे, असे 2017 च्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालात म्हटले आहे. भारताखालोखाल मेक्सिकोचे 1.3 कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून राहात आहेत.

       रशियाचे 1.1 कोटी, चीनचे 1 कोटी, बांगलादेशचे 0.7 कोटी, सीरियाचे 0.7 कोटी, पाकिस्तान व युक्रेनचे प्रत्येकी 0.6 कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून वास्तव्यास आहेत.

        भारताचे 30 लाख नागरिक संयुक्त अरब अमिरातीत तर प्रत्येकी 0.2 कोटी नागरिक अमेरिका व सौदी अरेबियात आहेत.

       सध्या जगात 2.58 कोटी लोक त्यांचा जन्मदेश सोडून परदेशात राहात आहेत. त्यांचे प्रमाण 2000 पासून 49 टक्के वाढले आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर हा चिंतेचा विषय असून, 2030 च्या शाश्वत विकास कार्यक्रमात त्याचा समावेश आहे. विश्वासार्ह माहिती व पुराव्यांच्या आधारेच स्थलांतराबाबतचे गरसमज दूर करून स्थलांतर धोरणे ठरवणे गरजेचे आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक उपमहासचिव लिउ झेनमिन यांनी सांगितले.

      स्थलांतरामुळे काही देशांत लोकसंख्या वाढली असून, तेथे लोकसंख्या कमी असण्याचा कल बदलला आहे, 2000 ते 2015 दरम्यान उत्तर अमेरिकेत लोकसंख्यावाढीचा दर 42 टक्के होता, तर ओशियानात तो 31 टक्के होता. युरोपात 2000 ते 2015 दरम्यान स्थलांतराअभावी लोकसंख्या कमी झाली आहे.

१८ डिसेंबर २०१७

स्मिता पाटील पुरस्काराने अभिनेत्री रेखा, अमृताचा गौरव

     अभिनेत्री रेखा आणि अमृता सुभाष यांना 16 डिसेंबर 2017 रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या सोहळ्यात स्मिता पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित केले.

      रेखा यांना ‘स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’, तर अमृता सुभाष यांना ‘स्मिता पाटील कौतुक पुरस्कार’ प्रदान केला. ’मी आत्मा पाहिलेला नाही किंवा तो कसा असतो हे मला माहीत नाही, पण स्मिता पाटील यांच्या रूपात तो मी अनुभवला आहे,’ असे भावोद्गार ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी यावेळी काढले. प्रसिद्ध संगीतकार आनंदजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

      रेखा यांनी यावेळी अमृता सुभाष यांच्यासह ‘कुठं कुठं जायाचं हनिमुनला...’ हे गाजलेले मराठी गाणे गात उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. पुरस्कारापोटी मिळालेली रक्कम रेखा यांनी स्मिता पाटील यांचे पुत्र प्रतीक बब्बर यांना भेट दिली.

      पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना अमृता सुभाष म्हणाल्या की, महान अभिनेत्री म्हणजे काय, हे आज मी रेखाजींच्या रूपाने अनुभवते आहे. त्यांच्यासह मला हा पुरस्कार मिळतो आहे, यासारखे दुसरे भाग्य काय असू शकते.

१६ डिसेंबर २०१७

पाककडून 43 भारतीय मच्छीमारांना अटक

       अरबी समुद्रात पाकिस्तानच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी केल्याचा आरोप ठेवत 43 भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानकडून अटक केली असल्याचे सरकारी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या मच्छीमारांच्या 7 बोटीही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

       ही घटना 14 डिसेंबर रोजी घडली असून, अटक केलेल्या सर्व मच्छीमारांना पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा विभागाने (पीएमएसएफ) पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ‘पीएमएसएफ’चे अधिकारी कमांडर वाजीद नवाझ चौधरी यांनी सांगितले, की अटक केलेल्या भारतीय मच्छीमारांना लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. मागील महिनाभरात पाकिस्तानच्या हद्दीत मासेमारी करणार्‍या 144 भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. तसेच, चालू वर्षी एकूण 400 भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानकडून अटक केली आहे. दुसर्‍या देशांच्या सागरी हद्दीत बेकादा मासेमारी केल्याबद्दल भारतीय आणि पाकिस्तानी मच्छीमारांना वारंवार अटक केली जाते. दोन्ही देशांचे गरीब मच्छीमार अनावधानाने दुसर्‍या देशाच्या हद्दीत मासेमारी करतेवेळी प्रवेश करतात, असे सांगण्यात आले.

१५ डिसेंबर २०१७

केप्लर-90 आय

     नासाच्या मोठ्या केप्लर डिस्कव्हरी या यंत्रनेने ’स्टार केप्लर-90’ या नावाने 8 ग्रहांचा समावेश असलेल्या नवीन सौर मंडळाचा शोध लावला आहे. नासाच्या केप्लर स्पेस टेलिस्कोपच्या कृत्रीम बुद्धिमत्ता यंत्रणेने हा शोध लावला आहे.

     ’केप्लर-90आय’ हे ग्रह प्रथमच आपल्या सौर मंडळाच्या रूपात मोठ्या संख्येने ग्रहमाला होस्ट करू शकतील, अशी माहिती एका खगोलशास्त्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे. मानवी बुद्धी आणि यंत्रे यांच्या एकत्रित वापराने आपल्या सौर मंडळ नजीकच्या सौर मंडळात नेमके काय आहे याविषयी शोध सुरु आहे. ’केप्लर-90आय’ एक लहान खडकाळ पृथ्वीसारखा ग्रह आहे. परंतु सूर्याच्या अगदी जवळ आहे. जो आपल्या ग्रहमालेतील सूर्यापेक्षा जास्त गरम आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा 2,500 प्रकाश वर्षे जुना आहे. हा ग्रह इतका उष्ण आहे की यावर जीवन शक्य नाही. या मालेतील इतर ग्रहांवर जीवन शक्य असू शकते असा अंदाज आहे. नासाला आता असे वाटते की अंतराळातील बहुतेक ग्रहांमध्ये ग्रहांची कक्षा (ग्रहमाला) असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पृथ्वीप्रमाणे जीवन असण्याची स्थिती अधिक विकसित होण्याची शक्यता आहे.

      वॉशिंग्टनमधील नासाच्या अ‍ॅस्ट्रोफिशिक्स डिव्हिजनच्या संचालक पॉल हर्टझ यांनी ’केप्लरने आधीपासूनच आम्हाला बहुतांश तारे दाखवले आहेत. आज केप्लरने पुष्टी केली की आपल्या सौर मंडळासारखे हे देखील ग्रहांचे मोठे कुटुंब असू शकतात.’ केप्लर-90 आय हा त्याच्या सूर्यमालेत पृथ्वीप्रमाणेच तिसर्‍या स्थानी आहे. त्याच्या कक्षेतील दर 90 बी आणि 90 सी हे 2 लहान ग्रह अनुक्रमे 7 व 9 दिवसांनी केप्लर-90 च्या भोवती फिरतात.

१४ डिसेंबर २०१७

भारतीय महिला ‘अ‘ संघाने टी-20 मालिका जिंकली

     भारतीय महिलांच्या ‘अ‘ संघाने बांगलादेश महिला ‘अ‘ संघाचा 40 धावांनी पराभव करत 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात भारताने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या अनुजा पाटीलकडे भारताच्या ‘अ‘ संघाचे कर्णधारपद असून, तिच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

      प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 152 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशची सुरुवातच अडखळती झाली होती. पहिल्या 5 षटकांत त्यांनी एक बाद 20 धावा केल्या होत्या. विजयासाठी बांगलादेशला षटकांमागे धावांची सरासरी हवी होती. पण, सुरुवातीपासूनच त्याचे दडपण बांगलादेशच्या संघावर दिसत होते. 8 षटकांत त्यांना एक बाद 37 धावा करता आल्या. धावांची आवश्यक सरासरी षटकांमागे 9 धावांपलिकडे गेल्यानंतर भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता. बांगलादेशकडून दुसर्‍या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली, पण धावांची गती त्यांना राखता आली नाही. 12 षटकांत त्यांनी दोन बाद गमावून 64 धावा केल्यानंतर त्यांचा डाव गडगडायला सुरुवात झाली. 15 षटकांनंतर त्यांची अवस्था 4 बाद 85 अशी झाली होती. शेवटच्या 5 षटकांतही त्यांच्या फलंदाज फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत. अखेर त्यांचा डाव 20 षटकांत 8 बाद 112 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

आर्क्टिक समुद्रात 500 वर्षे वयाचा शार्क

     संशोधकांनी बर्फाळ आर्क्ट्रिक समुद्रात ‘बुजुर्ग’ शार्कचा शोध लावला आहे. या शार्कचे वय तब्बल 512 वर्षे असल्याचे मानले जात आहे. एक टनापेक्षाही अधिक वजन असलेल्या या शार्कचा जन्म 1505 मध्ये झाला असावा, असे म्हटले जात आहे. पाश्चात्य संशोधकांनी त्याचे वय सांगताना तो शेक्सपिअरच्या जन्मापूर्वी जन्मला असे म्हटले आहे.

      ग्रीनलँडजवळील आर्क्ट्रिक समुद्राच्या वर्तुळात सापडलेला हा शार्क उणे 1 ते 10 अंश सेल्सिअस तापमानात राहतो आणि 7200 फूट खोलीपर्यंत पोहू शकतो. त्याची लांबी 18 फूट आहे. त्यावरूनच त्याच्या वयाचा अंदाज लावला आहे. ही प्रजाती वर्षाला एक सेंटीमीटर या वेगाने वाढते, असे मानले जाते. हा सर्वात वयस्कर ग्रीनलँड शार्क आहे. त्याचे अंदाजे आयुर्मान 400 वर्षांचे असते.

ज्युलियो रिबेरो यांना पोलिस जीवन गौरव

     अरविंद इनामदार फाऊंडेशनच्यावतीने दिला जाणारा ‘पोलीस जीवन गौरव’ पुरस्कार यंदा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा 29 डिसेंबरला दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते रिबेरो यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

       माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी 2015 पासून ‘पोलीस जीवन गौरव’ पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. यावेळी रिबेरो यांच्यासह नागपूर येथील पोलीस उपअधीक्षक रमेश मेहता, बीड येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मिसाळ यांनाही जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अनुक्रमे 1 लाख 31 हजार रु., 1 लाख 21 हजार रु., 1 लाख 11 हजार रु., सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.

१3 डिसेंबर २०१७

डोकलाममुळे भारतासोबतचे संबध ताणले

      चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ‘डोकलाम प्रकरणामुळे भारत आणि चीनचे संबध अतिशय तणावपूर्ण झाले होते’, असे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य वांग यांनी भारत, चीन आणि रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दिल्लीतील बैठकीत केले आहे.

       जवळपास 73 दिवस डोकलाममधील तणावपूर्ण वातावरणामुळे भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबधावर पडला आहे. गेल्याच आठवड्यात वांग यांनी डोकलाम प्रकरणावरुन धडा घेण्याचा सल्ला दिला होता आणि भविष्यात असा प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जावी असे वक्तव्य केले होते. ते पुढे म्हणाले ‘दोन्ही देशांनी डोकलाम प्रकरण चर्चेने सोडवून परिपक्व द्विपक्षीय संबधाचे उदाहरण प्रस्थापीत केले आहे.’ वांग परराष्ट्रमंत्री सुषमा स्वाराज यांच्याबरोबरील बैठकीत बोलताना म्हणाले ‘2017 मध्ये भारत आणि चीन दोघांच्या मधील संबधाबाबतीत प्रगतीपथावर आहेत पण, ते पुरेसे नाहीत.’ चीनी परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेल्या वक्तव्यावरून डोकलाम प्रकरण चीनच्या जिव्हारी लागले आहे असे दिसते.

दिव्यांगांना आधुनिक शिक्षणसंधी

      जागतिक स्तरावर जलदगतीने बदल होणार्‍या तंत्रज्ञान आणि आयटी क्षेत्रातील नवनवीन संशोधनामुळे दिव्यांग व्यक्ती शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिव्यांगांसाठी 32 वर्षांनंतर दिव्यांग स्पेशल स्कूल कोड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात या व्यक्तींना आधुनिक शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी ग्वाही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. विधिमंडळातील त्यांच्या दालनात मंत्री बडोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्पेशल स्कूल कोडमुळे दिव्यांग व्यक्ती कोणत्याही आधुनिक स्पर्धेपासून वंचित रहाणार नाहीत, तर आधुनिक शिक्षणाद्वारे इतरांच्या बरोबरीने मोक्याच्या ठिकाणी महत्त्वाची पदे भूषवतील.

      माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात झपाट्याने होणार्‍या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर 1985 पासून स्पेशल स्कूल कोडमध्ये बदल करण्यात येत होते. बदलत्या काळानुसार आधुनिक स्पेशल कोड सध्या तयार असून, राज्यातील तब्बल 2000 विशेष शाळांमध्ये जानेवारी, 2018 पासून ते लागू करण्यात येईल, असेही बडोले यांनी सांगितले.

      दिव्यांगांना ई-लर्निंग, तसेच कम्प्युटरचे आधुनिक शिक्षण देता यावे यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. विशेष शाळांतील कर्मचार्‍यांनाही दिव्यांग विद्यार्थ्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण देणे या कोडमध्ये बंधनकारक केले आहे. यासाठी राइट टू पर्सन डिसेबिलिटी अ‍ॅक्टमध्ये 2009 च्या शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे तरतुदी करण्यात आल्याचेही बडोले यांनी स्पष्ट केले.

१२ डिसेंबर २०१७

2023 चा वर्ल्डकप भारतात

      2021 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 सालची क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा भारतामध्ये होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नवी दिल्लीमध्ये झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये भविष्यातील क्रिकेट कार्यक्रम पत्रिकेची नव्याने आखणी केली. या दोन विश्वचषकांसोबतच 2019 ते 2023 या काळात भारत मायदेशात 81 सामने खेळणार असल्याचेही बीसीसीआयने जाहीर केले.

      याआधी भारताने तीन वर्ल्डकप स्पर्धांचे आयोजन केले आहे. 1987, 1996 आणि 2011 ला झालेल्या वर्ल्ड कपच्या मॅच भारताबरोबरच शेजारच्या देशांमध्येही खेळवण्यात आल्या होत्या, परंतु 2023 चा वर्ल्डकप भारत एकटा स्वबळावर भरवणार आहे. मागच्या स्पर्धांप्रमाणे 2023 वर्ल्ड कपमध्येही 10 संघ सहभागी होतील.

* अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारतासोबत -

      अफगाणिस्तान आपला पहिला कसोटी सामना भारताबरोबर खेळेल आणि भारत त्याचे यजमानपद भूषवेल, अशी घोषणा बीसीसीआयने केली. अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांना गेल्या जून महिन्यात आयसीसीने कसोटी संघांचा दर्जा दिला होता. अफगाणिस्तानने 2019 मध्ये ऑस्ट्रेलियासोबत पहिला कसोटी सामना खेळण्याचे निर्धारित केले होते, परंतु भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मैत्रीसंबंध पाहता या ऐतिहासिक कसोटी सामन्याचे आयोजन आम्ही करावे असे ठरविण्यात आले आहे, असे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले. अफगाणिस्तानला आयसीसीचा 11 वा पूर्णकालीन सदस्य म्हणून जून महिन्यात दर्जा मिळाला होता. यामागेही भारताने आपली शक्ती लावली होती. युद्धजन्य परिस्थितीने जर्जर असलेला हा देश आपल्या अनेक मालिका भारतात होमग्राऊंड म्हणून खेळत असतो. राशिद खान आणि मोहम्मद नबी हे अफगाणिस्तानचे दोन खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी झाले होते.

* मायदेशात खेळणार 81 सामने -

        नवीन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांबरोबर जास्त कसोटी सामने खेळणार आहे. यापूर्वी आखलेल्या भविष्यकालीन दौरा कार्यक्रमानुसार (एफटीपी) भारत 5 वर्षांत 51 सामने खेळणार होता, परंतु आता नवीन कार्यक्रमानुसार भारत सर्व प्रकारचे मिळून 81 सामने खेळणार आहे, अशी माहिती कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली. विराट कोहलीने केलेल्या अतिक्रिकेटच्या मुद्याबद्दल बोलताना चौधरी म्हणाले, सामन्यांची संख्या जरी वाढली असली तरी दौर्‍याचे दिवस कमी केले आहेत.

वृक्षलागवडीची नोंद ‘लिम्का बुक’मध्ये

       महाराष्ट्रात 1 ते 7 जुलै 2017 या काळात वन महोत्सवाच्या काळात 4 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविले होते. एका आठवड्यात 5 कोटी 43 लाख विक्रमी वृक्षलागवडीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी दिली.

       आपले जसे देशाच्या सीमेचे रक्षण करतात, तसेच वातावरणातील बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी 1 कोटी लोकांची हरितसेनेची फौज निर्माण करत आहे. आतापर्यंत 37 लाख नागरिकांनी स्वंयप्रेरणेने सहभाग नोंदविला असल्याची माहिती राज्याचे वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी दिली.

       वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर शाळेतील वेद चौधरी या विद्यार्थ्याने वनविभागाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन नोंदणी केल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. यावेळी खारगे यांनी, प्रत्येक नागरिकांनी स्वतःपासून मित्र, नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण करावे. लावलेली झाडे जगतील याची देखील काळजी घ्यावी. वनविभागाच्या वेबसाइटवर हरितसेनेत ऑनलाइन सहभागी होण्याचे आवाहन केले.

       दिलेल्या नमुन्यात ऑनलाइन नोंदणी केली की, आपल्याला हरितसेनेचे सदस्य झाल्याचे प्रमाणपत्र मिळते. ही हरितसेना महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान देऊ शकते. हे स्वंयसेवक त्यांनी केलेल्या पर्यावरणपूरक कामाचे छायाचित्रे देखील अपलोड करू शकतात. हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनविभाग नियोजनबद्ध काम करत असून, आता विभागासोबत सगळ्यांनी या कामात सहभागी होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

        वृक्षलागवडीच्या उपक्रमात धार्मिक संस्थांनी सहभागी व्हावे. पावसाळ्यात वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बेल, रुद्राक्ष यासारख्या रोपट्यांचे प्रसाद म्हणून वाटप करण्याची सूचना वनविभागाचे सचिव खारगे यांनी श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टला केली. यासाठी रोपांची उपलब्धता करून देण्याचे काम विभागाने करावे. त्यासाठी प्रायोजकांना तयार करावे. प्रसाद म्हणून मिळालेल्या रोपांची लागवड करून भक्तगणांनी झाडाचे संवर्धन करून वृक्षारोपणाच्या कामात सहभागी होण्याची साद घातली.

११ डिसेंबर २०१७

डोकलाममध्ये 1800 चिनी सैनिकांचा तळ

      सिक्कीम-भूतान-तिबेट सीमेजवळील डोकलाम क्षेत्रातील वर्चस्वावरून भारत-चीनमध्ये निर्माण झालेला तणाव काही प्रमाणात निवळला असतानाच ’ड्रॅगन’ने नवी चाल खेळली आहे. या क्षेत्रात 1600 ते 1800 चिनी सैनिकांनी तळ ठोकल्याचे वृत्त आहे. हेलिपॅड, रस्त्याची कामे, शिबिरे सुरू केली आहेत. त्यामुळे पुन्हा उभय देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

       डोकलाम क्षेत्रात चिनी सैन्याकडून रस्ते बांधणीचे काम हाती घेतले होते. त्याला भारतीय सैन्याने विरोध केला होता. यावरून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. आता पुन्हा चिनी सैन्याने डोकलाम क्षेत्रात तळ ठोकला आहे. मात्र, चीनला कोणत्याही परिस्थितीत डोकलाम क्षेत्राच्या दक्षिणेकडील बाजूस रस्त्यांचा विस्तार करू न देण्याचे राजनैतिक लक्ष्य भारताने निश्चित केले आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात पीपल्स लिबरेशन आर्मीचे (झङअ) सैन्य कायमस्वरुपी तळ ठोकून असतात, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, या वादग्रस्त क्षेत्रात चीन पुन्हा ताकद आजमावण्याचा प्रयत्न करेल, असा सावधानतेचा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सप्टेंबरमध्येच दिला होता.

लक्ष्मीकांत देशमुख यांचा गौरव

       बडोदा येथे होणार्‍या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाल्यामुळे एका कृतिशील लेखकाचा सन्मान झाला आहे. अध्यक्षपदी पंचरंगी लढत झाली आणि विशेष म्हणजे कोणत्याही आरोप-प्रत्यारोपांशिवाय निवडणूक पार पडली, हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणून नमूद करावे लागेल. व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप व्हायला नकोत परंतु वाद-विवाद व्हायला हवेत. यंदा असा कोणता वादही रंगला नाही. देशमुख यांच्याबरोबरच राजन खान आणि रवींद्र शोभणे हे मराठीतील आघाडीचे कादंबरीकार तसेच समीक्षक किशोर सानप आणि अनुवादक रवींद्र गुर्जर हे रिंगणात होते. साहित्यिक कर्तृत्वाच्या आधारे मूल्यमापन कठीण असते, कारण शेवटी आवड-निवड व्यक्तिसापेक्ष असते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार लोकशाही पद्धतीने होणारी ही निवडणूक आहे आणि निवडणूक म्हटले की, ती तिच्या तंत्राने लढवावी लागते. लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यात बाजी मारली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

         देशमुख हे प्रशासकीय सेवेत होते आणि सेवेत असताना सांस्कृतिक बाबींना प्राधान्य देऊन काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. लेखकाच्या ठायी संवेदनशीलतेबरोबरच सामाजिक बांधिलकीचे भान असावे लागते आणि देशमुख यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीमध्ये या दोन्हींचे दर्शन घडवले आहे. लेखक आणि कलावंताने लेखनाच्या पलीकडे जाऊन आपल्या नैतिक भूमिका आणि मनाशी बाळगलेल्या मूल्यांसाठी शक्य तेवढे काम करणे हे आपले उत्तरदायित्व आहे, असे मानणारे ते लेखक आहेत. परभणी येथे कथाकार बी. रघुनाथ यांचे स्मारक आणि कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन आणि कलादालनाचे नूतणीकरण ही त्यांच्या सांस्कृतिक कामगिरीची उदाहरणे आहेत. बालमजुरीसंदर्भातील ‘हरवलेले बालपण’ ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ हा कथासंग्रह त्यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. कोल्हापूरला जिल्हाधिकारी असताना स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आणि काही राज्यांनी त्यांच्या उपक्रमाचे अनुकरणही केले.

        मराठी साहित्य आपल्या मर्यादित भौगोलिक अवकाशात घुटमळत असताना देशमुख यांनी ‘इन्किलाब आणि जिहाद’ या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग उलगडून दाखवले असून मराठी साहित्यातील अशा प्रकारची ही एकमेव कादंबरी असावी. 6 कादंबर्‍या, 7 कथासंग्रह, 2 नाटके आणि इतर 6-7 पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा उपभोगशून्य स्वामी असतो, असे मागे एकदा मधु मंगेश कर्णिक म्हणाले होते. ते खऱे असले तरीसुद्धा तो मराठी सांस्कृतिक जगताचा एक वर्षासाठी का असेना, नेता असतो. लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासारख्या कृतीशील लेखकाला हे नेतृत्व लाभल्यामुळे ते अध्यक्षपदाचा मराठी भाषा व संस्कृतीच्या विकासासाठी अधिक कौशल्यपूर्ण वापर करतील आणि पुढील अध्यक्षांसाठी एक नवी वाट तयार करून देतील, अशी अपेक्षा व्यक्त करणे अयोग्य ठरणार नाही.

न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये बॉम्बस्फोट

       न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये बॉम्ब स्फोट झाला. यावेळी या परिसरातील नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढले आहे.

        मॅनहॅटन प्लॅटफॉर्मवर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या स्फोटप्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले. मॅनहॅटन बस टर्मिनल येथील 42 व्या मार्गावर हा स्फोट झाला आहे.

९ डिसेंबर २०१७

‘ब्रेक्झिट’ चर्चेत महत्त्वपूर्ण प्रगती

      ब्रिटन आणि युरोपियन युनियन यांच्यात ‘ब्रेक्झिट’ मुद्यावर महत्त्वाची चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. यासाठी पंतप्रधान थेरेसा मे सकाळीच ब्रसेल्सला रवाना झाल्या होत्या. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ‘ब्रेक्झिट’प्रश्नी महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याचे युरोपियन आयोगाने म्हटले आहे.

     या चर्चेदरम्यान एका महत्त्वपूर्ण करारावर एकमत झाले आहे. यामुळे ‘ब्रेक्झिट’संबंधीच्या चर्चेला व्यापक स्वरूप येईल. प्रामुख्याने ब्रिटनच्या युरोपियन युनियममधून बाहेर पडण्याच्या कालावधीसह व्यापार संबंधांवर भविष्यात महत्त्वपूर्ण चर्चा होईल, असे युरोपियन आयोगाचे प्रमुख ज्याँ क्लोद युंकर यांनी सांगितले.

रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे घडणार दर्शन

      मानवी श्रमांना रोबोटिक्स तंत्रज्ञानाची जोड दिल्यास औद्योगिक उत्पादन प्रक्रिया सोपी होऊ शकते. रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून कारखान्याला अत्याधुनिक रूप देता येते. यामुळे स्मार्ट उत्पादन करता येणार आहे. या तंत्रज्ञानाची माहिती उद्योजक व नागरिक यांना देण्यासाठी मेसे फ्रँकफर्ट ट्रेड फेअर्सने मुंबईत ‘स्मार्ट इंडस्ट्री सोल्युशन इंडिया’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर गोरेगाव, पूर्व येथे होणार आहे.

     या प्रदर्शनात वाहन उद्योग, तेल व वायू, रसायने, औषध निर्मिती उद्योग, पॅकेजिंग, यंत्रसामग्री इ. क्षेत्रांचे सादरीकरण होणार आहे. सीमेन्स, बार कोड इंडिया यांच्यासह अनेक कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या आहेत. फ्युचर फॅक्टरीसोबत दैनंदिन जीवनात रोबोटिक्सचा वापर करण्यासाठी प्रदर्शनात प्रोत्साहन दिले जाणार आहे.

     दिवसेंदिवस रोबोटिक्सची गरज वाढत आहे. डॉक्टर, इंजीनिअर, इत्यादी रोबोटच्या साह्याने अधिकाधिक कामे करतात. नदी स्वच्छता, बांधकाम, कार उत्पादन, संरक्षण इत्यादीसारख्या काही कार्यातसुद्धा रोबोटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. स्वयंचलनासाठी भारतीय बाजार जागतिक बाजाराशी स्पर्धा करत आहेत. या अनुषंगाने ‘मिक्स रियालिटी’, ‘ए एल अंड रोबोटिक्स इन सायबर फिजिकल सिस्टीम’ अशा विषयांबद्दल इंटरॅक्टिव्ह ह्युमनॉइड रोबोचे निर्माते सुधीर कदम माहिती देणार आहेत.

डुडलवर भारतातील पहिल्या महिला फोटोजर्नालिस्ट

      होमाई व्यारावाला यांच्या 104 व्या वाढदिनानिमित्त गुगलने डुडल तयार केले आहे. होमाई या भारतातील पहिल्या महिला फोटोजर्नालिस्ट होत्या. यावर्षीच्या गुगल डुडलमध्ये बेगम अख्तर, कोर्नेलीया सोराबजी, अनसुया साराभाई या महिलांना स्थान दिले गेले. होमाई व्यारावाला यांचा जन्म एका पारसी कुटुंबात गुजरात येथे झाला. त्यांना ऊरश्रवर 13 या टोपणनावाने ओळखले जात होते. या नावाने ओळखले जाण्याचे कारण म्हणजे त्यांचा जन्म 1913 मध्ये झाला. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांच्या पहिल्या गाडीचा नंबर ऊङऊ 13 होता. होमाई यांच्या वडिलांची टुरिंग टॉकीज कंपनी होती. त्यामुळे त्यांच्या बालपणी त्यांना प्रवास करायला मिळाला. त्यांनी नंतर मुंबईत सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे शिक्षण घेतले. त्यांनी त्यांच्या मित्राकडून फोटोग्राफी शिकली. ज्या काळात महिलांनी घराबाहेर पडून काम करणे धाडसाचे होते त्यावेळी त्यांनी फोटोग्राफीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

         1938 मध्ये त्यांनी व्यावसायिक फोटोग्राफीला सुरूवात केली. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात व्यारावाला यांना नवी दिल्ली येथील ब्रिटीश इन्फर्मेशन सर्व्हिसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याचवेळी त्यांनी मुंबईस्थित ‘द इलूस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’ साठी काम केले. त्यात त्यांच्या अनेक कृष्णधवल छायाचित्रांचा समावेश होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक फोटो काढले आहेत. त्यामध्ये देशातील घडामोडींसह पंडित नेहरु, महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या फोटोंचा समोवेश आहे.

       पतीच्या मृत्यूनंतर फोटोग्राफी बंद करुन होमाई व्यारावाला गुजरातमधील वडोदरा येथे एकाकी जीवन जगू लागल्या. त्यांना 2010 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. व्यारावाला यांचे 15 जानेवारी 2012 मध्ये निधन झाले. 

८ डिसेंबर २०१७

कोथळे प्रकरणात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

      सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात सरकारकडून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. न्याय व विधी विभाग कक्षाच्या अधिकारी वैशाली बोरूडे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 12 पोलिसांनी निलंबित केले असून, जिल्ह्यातील बड्या पोलीस अधिकार्‍यांची इतरत्र बदली केली आहे.

     पोलिसांच्या आमानुष मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह आंबोली येथे जाळून टाकण्याचा प्रकार युवराज कामटे याच्यासह काही पोलिसांनी केला आहे. संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या या प्रकरणात आरोपी निलंबित पोलिसांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांच्या या कृत्याच्या निषेधार्थ सांगलीत बंदही पुकारला होता. तसेच पोलीस या प्रकरणातील तपासात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप अनिकेतच्या भावांनी केला होता. त्या विरोधात दोन्ही भावांनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता. 

आंतरराष्ट्रीय अश्वसंग्रहालय लवकरच उभा राहणार

      जगातल्या सर्व प्रकारच्या आणि जातीच्या घोड्यांची जतन करणारे जागतिक पातळीवरचे अश्वसंग्रहालय उभारणीचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून हाती घेतले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे चेतक फेस्टीव्हल दरम्यान अश्वसंग्रहालय भूमीपूजन केल्यानंतर बोलत होते. पर्यटनविकास व रोहयो मंत्री जयकुमार रावल, फेस्टीव्हलचे आयोजक जयपालसिंह रावल, खा. डॉ. हीना गावित, आ. डॉ. विजयकुमार गावित आदी मान्यवर उपस्थित होते.

वर्ल्ड पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण

      मेक्सिको येथे सुरू असलेल्या वर्ल्ड पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळाले. महाराष्ट्रातील नागपूरच्या कांचनमाला पांडे हिने ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू बनली आहे.

      वर्ल्ड पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत एस-11 श्रेणीत 200 मीटर प्रकारात कांचनमालाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करणार्‍या कांचनमालाला पदक जिंकण्याची आशा होती मात्र तिला सुवर्णपदक मिळेल असे वाटले नव्हते. या कामिगिरीमुळे मला खूप आनंद झाला आहे तो शब्दात सांगता येणार नाही असे तिने सुवर्णपदक जिंकल्यांनतर सांगितले. कांचनमाला ही भारताकडून पात्र ठरलेली एकमेव महिला जलतरणपटू होती. या स्पर्धेतील इतर प्रकारात तिला थोडक्यात अपयश आले. 100 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात तिला पदकाने हुलकावणी दिली. ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅकस्ट्रोक प्रकारात तिला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.

‘कुंभमेळ्या’ला जागतिक वारश्याचा दर्जा

      कुंभमेळा हा भारतातील एक श्रद्धेचा विषय असून शेकडो वर्षांच्या परंपरेचा तो अविभाज्य भाग आहे. या पार्श्वभूमीवर युनेस्कोकडून कुंभमेळ्याला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले. त्यामुळे कुंभमेळ्याचा आता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारश्यांच्या यादीत समावेश झाला आहे.  युनेस्कोच्या यादीत बोस्वाना, कोलंबिया, व्हेनेझुएला, मंगोलिया, मोरक्को, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती येथील सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी एका सरकारी समितीची बैठक 4 ते 9 डिसेंबर या काळात होणार आहे. ‘योग’ आणि ‘नवरोज’ यांच्यानंतर गेल्या 2 वर्षात अशा प्रकारची मान्यता मिळालेला ‘कुंभमेळा’ तिसरा वारसा आहे.

     कुंभमेळ्याला अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या रुपात मान्यता करण्याची शिफारस करताना तज्ज्ञांच्या समितीने सांगितले होते की, भूतलावर हा यात्रेकरूंचा सर्वात शांतीपूर्ण मेळा आहे. युनेस्कोच्या विशेष समितीच्या मते, हा महोत्सव खूपच मोठा आणि शांतीपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. याचे आयोजन भारतातील अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या शहरांमध्ये केले जाते. या मेळ्यादरम्यान, या शहरांच्या नद्यांच्या किनार्‍यांवर पूजा अर्चा केली जाते. हा धार्मिक महोत्सव सहिष्णुता आणि सर्वसमावेशक प्रवृत्तीचे दर्शन घडवतो. यात कोणत्याही भेदभावाशिवाय लोक सहभागी होतात.

      यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी ट्विट करून सांगितले की, युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारश्यांच्या यादीत जागा दिल्याने हा आमच्यासाठी मोठा गौरवपूर्ण क्षण आहे.

७ डिसेंबर २०१७

‘राजधानी’ जेरूसलेमला अमेरिकेची मान्यता

     अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त शहर असलेल्या जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचे जाहीर केले. तेल अवीव येथील अमेरिकी दूतावास जेरूसलेमला स्थलांतरित करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्याचे आदेश ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले आहेत. ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या दीर्घकालीन भूमिकेला छेद देणारा असून, यामुळे मध्य-पूर्व क्षेत्रातील हिंसाचारात वाढ होईल, असा इशारा अनेक अरबी नेत्यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये ही ऐतिहासिक घोषणा केली.  ‘जेरूसलेमला अधिकृतपणे इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची वेळ आली आहे, असे आपल्याला ठामपणे वाटते आणि ती कृती योग्यच ठरेल’, असे ट्रम्प त्याबाबतची घोषणा करताना म्हणाले.

      इस्रायलने 1980 मध्ये जेरूसलेमला आपली राजधानी जाहीर केल्यापासून अरब राष्ट्रांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता अमेरिकने जेरूसलेमला इस्रायलची राजधानी जाहीर केल्यानंतर ही नाराजी अधिकच तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील विवादाचे केंद्र असलेल्या जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता न देण्याचा सल्ला पश्चिम आशियासह जगभरातील अनेक नेत्यांनी अमेरिकेला दिला होता. असे झाल्यास या क्षेत्रातील शांतता प्रक्रिया संपुष्टात येईल व नवा संघर्ष उफाळून अशांतता पसरेल, असे मत या नेत्यांनी व्यक्त केले होते. मात्र, तो विरोध झुगारत अमेरिकेने ही मान्यता दिली आहे.

जीवसृष्टीस अनुकूल पृथ्वीसदृश ग्रहाचा शोध

      आपल्यापासून 111 प्रकाशवर्षे अंतरावर असलेला ग्रह पृथ्वीची सुधारित आवृत्ती असून तेथे सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता वर्तवली आहे. के2 18बी हे या बाह्यग्रहाचे नाव असून तो महापृथ्वी म्हणून ओळखता येईल इतका पृथ्वीसदृश आहे. तेथे सजीवसृष्टीस पोषक स्थिती असल्याचे सांगण्यात आले. या ग्रहाचा पृष्ठभाग पृथ्वीसारखाच खडकाळ आहे.

    कॅनडातील टोरांटो विद्यापीठाच्या संशोधकांनी युरोपियन सदर्न ऑब्झर्वेटरीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे या ग्रहाचा शोध लावला असून तो ‘के 2-18’ या लाल बटू तार्‍याभोवती फिरत आहे. सिंह तारकापुंजात तो 111 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. टोरांटो विद्यापीठाचे डॉक्टरेटचे विद्यार्थी रायन क्लॉटियर यांनी सांगितले की, के 2 - 18 बी हा ग्रह विलक्षण आहे व त्याचा शोध उत्कंठा वाढवणारा आहे.

     2015 मध्ये या ग्रहाचा शोध लागला होता व तो एका तार्‍यापासून वसाहतयोग्य अंतरावर फिरत आहे हे लक्षात आले होते. त्यामुळे तेथे पाणी असण्याची शक्यता आहे. अजून काही घटकांच्या आधारे त्याची पृथ्वीसदृश ग्रह म्हणून तपासणी करणे बाकी आहे, असे ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ या नियकालिकातील शोधनिबंधात म्हटले आहे. क्लॉटियर व त्याच्या सहकार्‍यांनी युरोपियन स्पेस ऑब्झर्वेटरीतून मिळालेला आहे. ही वेधशाळा चिलीतील ल सिला येथे आहे.

६ डिसेंबर २०१७

पहिले भारतीय सुपरसॉनिक मिसाईल

      भारताने आकाश या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी चांदीपूर येथे करण्यात आली. आकाश हे पहिले भारतीय सुपरसॉनिक मिसाईल आहे. आकाश हे जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र असून त्याचा समावेश लष्करात केला आहे. या चाचणीमुळे भारताकडे आता कोणत्याही हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची ताकद मिळाली आहे.

     आकाश 25 किलोमीटरपर्यंतचा लक्ष्यावर हल्ला करू शकते. 55 किलोपर्यंतचे वजन आकाश वाहून नेते. कोणत्याही ऋतूमध्ये हे क्षेपणास्त्र काम करते. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थने (डीआरडीओ) या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. हे क्षेपणास्त्र लढावू विमाने, हवाई हल्ले करणार्‍या क्षेपणास्त्रांवरही हल्ला करू शकते. या क्षेपणास्त्राची रचना करताना एका पेक्षा जास्त बाजूंनी जरी धोका असला तरी एकाचवेळी ते हल्ला करेल. या क्षेपणास्त्राची चाचणी करताना डीआरडीओचे अधिकारी उपस्थित होते. 

ओखी चक्रीवादळ

      तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीपासून ते महाराष्ट्रापर्यंत धडकलेल्या ‘ओखी’ चक्रीवादळाने आतापर्यंत 39 बळी घेतले आहेत. 167 मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गृह मंत्रालयाचे सहसचिव संजीवकुमार जिंदाल म्हणाले, वादळाचा परिणाम हळूहळू कमी होत आहे. गुजरातमध्ये मतदान अगदी जवळ आलेले असले, तरी येथे या वादळाचा काहीही परिणाम होणार नाही.

      केरळमध्ये आतापर्यंत 29 जणांनी प्राण गमावले आहेत, तर तामिळनाडूमध्ये 10 जणांचा बळी गेला आहे. तामिळनाडूचे 74 आणि केरळचे 93 मच्छीमार अद्याप बेपत्ता आहेत. लक्षद्वीपमध्ये भारतीय आणि विदेशी असे एकूण 33 पर्यटक सुरक्षित असल्याचीही माहिती गृह खात्याने दिली आहे. नेव्ही आणि कोस्ट गार्डच्या मदतीने व्यापार्‍यांच्या जहाजांनाही सुरक्षितपणे लक्षद्वीपमध्ये किनार्‍यावर आणण्यात यश मिळाले आहे. खबरदारी म्हणून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.

५ डिसेंबर २०१७

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन

      ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे. शशी कपूर यांनी 1940 पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत 116 सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील 61 सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली.

      2011 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानीत केलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले होते.

       देखणा चेहरा आणि कसदार अभिनयाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.

       शशी कपूर म्हटल्यावर अनेकांना आठवतो तो त्यांचा बाणेदारपणा दाखवणारा ‘मेरे पास माँ है’ हा एका वाक्याचा संवाद. लोकप्रियता देणारे तद्दन व्यावसायिक असे कित्येक चित्रपट शशी कपूर यांनी केले, पण त्यांची ओळख तेवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही. शशी कपूर यांचे समकालीन कलाकार व्यावसायिक चित्रपटांमध्येच अडकलेले असताना कपूर यांनी त्याबरोबरीने निर्माता होण्याचे धाडस दाखवले. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून शशी कपूर यांनी तिथेही योगदान दिले.

        1970-80 चे दशक गाजविणार्‍या शशी कपूर यांच्याबद्दल ‘मेरे पास माँ है’ या संवादापुरतीच माहिती रसिकांना उपलब्ध असली तरी शशी कपूर यांची फारशी परिचित नसलेली आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील कारकीर्दही महत्त्वाची आहे. शशी कपूर यांचे गाजलेले व्यावसायिक चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे त्यांनी केलेले चित्रपट हा प्रवास तितकाच महत्त्वाचा होता. ‘बॉम्बे टॉकी’, ‘सिद्धार्थ’, ‘जुनून’, ‘हिट अँड डस्ट’, ‘न्यू डेल्ही टाईम्स’ हे हिंदी, इंग्रजी चित्रपट त्यांनी इतर व्यावसायिक हिंदी चित्रपटांबरोबरीने केले. भारत आणि रशियाच्या सहकार्याने त्यांनी ‘अजुबा’ हा चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित केला होता.

       व्यावसायिक चित्रपट करणारे शशी कपूर संधी मिळताच छोटी पण आशयघन भूमिका करण्यास प्राधान्य देत होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना केवळ कलात्मकतेच्या ओढीने काही नवोदित दिग्दर्शकांसोबत अत्यंत थोडक्या मोबदल्यात त्यांनी काम केले. चांगल्या चित्रपट प्रकल्पांना प्रसंगी आर्थिक हातभारही लावला. कलात्मक चित्रपटनिर्मितीमधून हाती फारसा पैसा लागत नाही, याची जाणीव असूनदेखील प्रसंगी आर्थिक नुकसान सोसूनही ते अशा चित्रपटांना पाठबळ देत राहिले. त्यामुळे कपूर घराण्यातील एक अभिनेता एवढीच त्यांची ओळख नाही.

       वडील पृथ्वीराज आणि मोठा भाऊ राज यांच्या वलयातून बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे फक्त शशी कपूर यांनाच शक्य झाले. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक या भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या. कपूर घराण्यातील अनेकांनी दिग्दर्शन करताना हात पोळून घेतले आणि नंतर नाद सोडून दिला, पण शशी कपूर कायमच या भूमिका करीत राहिले. आर. के. बॅनरच्या बाहेर त्यांनी स्वतःची निर्मिती संस्थाही उभी केली आणि उत्तम चित्रपट निर्माण केले. कला आणि व्यवसाय यांची अशी उत्तम सांगड घालणे शशी कपूर यांनाच शक्य झाले. म्हणूनच तमाम कपुरांमध्ये ते वेगळे कपूर ठरले.

वर्सोवा-वांद्रे सागरी मार्गाला मान्यता

         मुंबई शहर व पश्चिम उपनगरातील वाहतूक व्यवस्था जलदगतीने आणि सुलभपणे होण्यासाठी वर्सोवा-वांद्रे सागरी मार्ग प्रकल्पाच्या कामास राज्य शासनाने सोमवारी मंजुरी दिली. मुख्य मार्ग 9.60 कि. मी. लांबीचा असून, जोड रस्ते मिळून या प्रकल्पाची एकूण लांबी 17.17 कि.मी. होते. आठ पदरी हा मार्ग असेल. या प्रकल्पाच्या 7502 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. प्रकल्पाचा खर्च वसूल करण्यासाठी या मार्गावर 2052 पर्यंत टोल आकारणी करण्याची तरतूदही आधीच करून ठेवण्यात आली आहे. पुढील 3-4 महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांकडून देण्यात आली.

     मुंबईच्या पश्चिम उपनगरात वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचा वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. या भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पश्चिम मुक्त मार्गाची संकल्पना मांडण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून वर्सोवा-वांद्रे हा सागरी मार्ग बांधा वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर बांधण्याचा निर्णय 2009 मध्ये घेण्यात आला होता. परंतु काही कारणाने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता राज्य सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरविले आहे.

      वर्सोवा-वांद्रे सागरी मार्गासाठी केंद्र सरकारकडून पर्यावरणविषयक मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 एप्रिल 2016 रोजी घेतलेल्या बैठकीत हा प्रकल्प बीओटीऐवजी एमआरडीसीने कर्ज उभारणी करून बांधावा असा निर्णय घेतला होता. म्हणजे खासगी उद्योजकांच्या गुंतवणुकीतून हा प्रकल्प न बांधता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडी) 100 टक्के निधीची तरतूद करून कंत्राटदार नेमून बांधकाम करून घ्यायचे आहे. त्यासाठी एमएसआरडीसीला उद्योजक म्हणून घोषित केले आहे.

      आता राज्य शासनाने समुद्रकिनार्‍यापासून 900 मी. वर्सोवा-वांद्रे सागरी प्रकल्प बांधण्यास मान्यता दिली. या मार्गावर वांद्रे, कार्टर रोड, जुहू कोळीवाडा व नाना नानी पार्क असे जोडरस्ते असतील. या मार्गा चार पथकर नाके उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी 7502 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सध्या शासनाने वांद्रे-वरळी सागरी मार्गासाठी मान्य केलेले दर व प्रचलित पथकर धोरण प्रस्तावित वर्सोवा-वांद्रे प्रकल्पालाही लागू राहतील. त्यानुसार या प्रकल्पासाठी 2052 पर्यंत टोल वसूल करण्याची तरतूद आधीच करून ठेवली आहे. टोल वसुली व सागरी मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी एमएसआरडीच्यावतीने स्वंतत्र कंत्राटदार नेमण्यात येणार आहेत.

       पुढील 3-4 महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामास सुरुवात केली जाईल. हा प्रकल्प पूर्ण होण्यास साधारणतः 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती सूत्राने दिली. या प्रकल्पाच्या सविस्तर मान्यतेचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे.

मुस्लिमांना अमेरिकेत बंदी : सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

         अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी 6 मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. या निर्णयास आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा आहे, असे सांगत त्यावर प्रतिबंध घातला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे प्रतिबंध दूर होणार आहेत. जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यावर हा निर्णय घेतला होता. यानुसार यमन, इरान, लिबिया, सिरीया, सोमालिया आणि चाड आदी देशांवर निर्बंध लादले गेले होते. 

४ डिसेंबर २०१७

भारतीय संघाचे नेतृत्व करणार पृथ्वी शॉ

       मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू पृथ्वी शॉ याच्याकडे भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. पुढील वर्षी होणार्‍या आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. 16 संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.

      ‘अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने 2018 मध्ये होणार्‍या आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला. या संघाचे सराव शिबीर 8 ते 22 डिसेंबर या कालावधीत बेंगळुरू येथे आयोजित केले आहे. मात्र रणजी करंडक स्पर्धेत खेळत असल्याने शॉ आणि बंगालचा इशान पोरेल यांना काही दिवसांसाठी उपस्थित न राहण्याची मुभा देण्यात आली आहे. 12 डिसेंबरनंतर हे दोन्ही खेळाडू शिबिरात सहभागी होतील,’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली.

       गतउपविजेत्या भारताने 2000, 2008 आणि 2012 मध्ये विश्वचषक उंचावला आहे. गतवर्षी बांगलादेश येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताला वेस्ट इंडिजकडून हार पत्करावी लागली होती. विश्वचषक स्पर्धा सर्वाधिक 3 वेळा जिंकणार्‍या संघांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (1988, 2002, 2010) संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत.

* भारतीय संघ -

      पृथ्वी शॉ (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), मनोज कार्ला, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, आर्यन जुयाल (यष्टीरक्षक), हार्विक देसाई (यष्टीरक्षक), शिवम मावी, कमलेश नागरकोटी, इशार पोरेल, अर्शदीप सिंग, अनुकूल रॉय, शिवा सिंग, पंकज यादव; राखीव ः ओम भोसले, राहुल चहर, निनाद राथवा, उर्विल पटेल आणि आदित्य ठाकरे.

भारतीय नौदल : 5,600 वर्षांचा गौरवशाली इतिहास

      भारतीय लष्करात नौसेना ही अतिशय महत्त्वाची आहे. भारताच्या तिन्ही सीमा या सागरी मार्गाशी संबंधित असल्याने नौदलावरच देशाच्या संरक्षणाची जबाबदारी अधिक आहे. 5,600 वर्षांचा गौरवशाली इतिहास नौदलाचा असून, सध्या जगात पाचव्या क्रमांकावर नौदलाचे स्थान आहे.

       1934 मध्ये ब्रिटिशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची (आरआयएन) स्थापना केली. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याचे इंडियन नेव्ही किंवा भारतीय नौदल असे नामकरण झाले. 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला तो दिवस 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

        नौसेना अकादमीत दिले जाते प्रशिक्षण भारतीय नौसेना अकादमी केरळमधील कन्नूरजवळएझिमाला येथे आहे.      अधिकारीपदावर जाण्यासाठी एनडीए पुणे येथे 3 वर्षांचे प्रशिक्षण आवश्यक आहे. याशिवाय पदवी संपादन केल्यानंतरही लेखी, तोंडी परीक्षा देऊन अकादमीत प्रविष्ट केल्या जाऊ शकते. देशाचे संरक्षण आणि करिअर म्हणून विकास होण्यासाठी नौदल हे उत्तम क्षेत्र आहे.

         भारतीय पौराणिक कथेत, वरुण देवतेला मोठे स्थान आहे. वरुण हे समुद्र आणि नद्यांचे देव. अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यामध्ये झालेल्या युद्धात कश्यपांच्या अदिती आणि दित या राण्यांपासून झालेल्या मुलांनी मंथन करून अमृत मिळविल्याचे मानले जाते. आजही युद्धनौकांच्या शुभारंभप्रसंगी अदितीचे स्मरण केले जाते. चंद्रगुप्ताच्या राजवटीत समुद्र, नद्या, सरोवरांचे काम पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना केली होती.

        शिवरायांनी जाणले महत्त्व - देशांतर्गत संघर्ष आणि युद्धांमुळे नौदलाचे महत्त्व कोणत्याही राजाला कळले नाही. त्यामुळेच की काय पोर्तुगीज, ब्रिटिशांनी समुद्रतटाचा वापर करून देशात प्रवेश मिळविला. परंतु, हिंदवी स्वराज्याची निर्मिती करताना छत्रपती शिवरायांना तटाचे महत्त्व कळाले. कल्याण, भिवंडी व पेण येथे भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती त्यांनी केली. शिवरायांच्या आरमारात संदेश वाहक होडी, मचवा, शिबाड, गुराब या नौकांचा समावेश होता. पहिले स्वतंत्र आरमार उभारून त्यांनी पोर्तुगीज, मोगल, सिद्दी, इंग्रज या सागरी सत्तांचे सागरावरील वर्चस्व संपुष्टात आणले. कान्होजी आंग्रे यांना पहिले नौदलप्रमुख असे संबोधले जाते. शिवरायांनी पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग आदी सागरी किल्ल्यांची बांधणीही केली.

ओखी वादळ 48 तासांत गुजरात, महाराष्ट्राच्या किनार्यावर

      ओखी वादळाची तीव्रता कमी होत असली तरीही 4 डिसेंबरच्या रात्रीपासून पुढील 48 तासांत महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर वादळाचा धोका असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन 3 डिसेंबरला कन्याकुमारी येथे पोहोचल्या असून त्यांनी तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची तसेच अन्य अधिकार्‍यांची भेट घेऊन मदतकार्याचा आढावा घेतला. त्या केरळ आणि तामिळनाडूच्या पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत.

       चक्रीवादळाने केरळच्या खवळलेल्या सागरात अडकून पडलेल्या 17 मच्छीमारांची 5 दिवसांनंतर सुटका करण्यात यश आले आहे. नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयएनएस काल्पेनी या नौकेने 13 मच्छीमारांना वाचवून त्यांना कोल्लम येथील अधिकार्‍यांच्या हवाली केले. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने कायामकुलमपासून पश्चिमेला 30 मैल अंतरावर 4 मच्छीमारांची सुटका करून त्यांना वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. हवाई दलाची 9, नौदलाची 3 विमाने तसेच नौदलाची 10 जहाजे मदतकार्यात सहभागी होती. वादळामुळे केरळजवळील समुद्रामध्ये अडकलेल्या 600 हून अधिक मच्छीमारांची सुटका करण्यात यश आले असले तरी राज्यातील मृतांचा आकडा 19 वर पोहोचला आहे. 6 नवे मृतदेह सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

3 डिसेंबर २०१७

सलील पारेख ‘इन्फोसिस’चे सीईओ

       ‘इन्फोसिस’ने आज सलील पारेख यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. 2 जानेवारी 2018 पासून सलील पारेख हे यूबी प्रवीण राव यांची जागा घेतील, असे ‘इन्फोसिस’ने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. पारेख हे सध्या कॅपजेमिनी या फ्रेंच कंपनीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत.

     पारेख यांनी कॉर्नेल विद्यापीठातून संगणकशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. पारेख हे 5 वर्षांसाठी ‘इन्फोसिस’चे सीईओ आणि एमडी असतील, असे कंपनीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

साकेत कम्युनिकेशन्सला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

      डॉ. आर. एल. भाटिया यांनी स्थापन केलेल्या ‘वर्ल्ड मार्केटिंग काँग्रेस’द्वारे सर्व देशांमधून चार क्षेत्रांत काम केलेल्या संस्थेच्या कामाची माहिती एकत्र करून, योग्य ब्रँड्स आणि डव्हर्टायझिंग व मार्केटिंग एजन्सीची निवड करण्यात येते. या वर्षी ‘कंटेंट मार्केटिंग अँड समीट’ या विभागात ‘रोलबॉल’ या भारतात तयार झालेल्या खेळाच्या बांगलादेशामधील चौथ्या विश्वचषक स्पर्धेच्या मार्केटिंगसाठी साकेत कम्युनिकेशन्स प्रा. लि. या पुण्यातील एजन्सीची निवड करण्यात आली.

      जगातील 170 देशांतील क्रीडाप्रेमींनी स्पर्धेतील सामने फेसबुकद्वारे पाहिले. हा फेसबुकसारख्या महत्त्वाच्या माध्यमाचा जागतिक स्तरावर 170 देशांना एकाचवेळी मिळालेला सर्वांत मोठा प्रतिसाद मानला गेला. फेसबुक माध्यमाचा सर्वोत्कृष्ट वापर आणि त्यातून अपरिचित खेळाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल साकेत कम्युनिकेशन्समधील क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजिस्ट ऋषिकेश लोकापुरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

6 महिन्यांत राज्यात प्लॅस्टिकवर पूर्ण बंदी : मुख्यमंत्री

       येत्या 6 महिन्यांत प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे एनसीपीएमध्ये आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

      फडणवीस म्हणाले, “वातावरणात बदल होत आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्रदूषित पाण्यामुळे अरबी समुद्रकिनारा प्रदूषित होत आहे. यावर उपाय करण्यासाठी पाण्यावर प्रक्रिया करणार असून, त्यासाठी पर्यावरण विभागाने काही नियम घालून दिले आहेत. लवकरच पर्यावरण विभागाच्या काही परवानग्या मिळणार आहेत. 3-4 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल.”

      “एकीकडे देशातील अनेक नद्या प्रदूषित आहेत. महाराष्ट्रात मात्र नदी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे 2 वर्षांत 11 हजार गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेली आहेत. दुष्काळावर त्यांनी मात केली आहे. यामध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा होता.”

         “मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे, परंतु काही नागरिकांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने काम रखडत आहे. मेट्रोचे काम दिवसा करावे, रात्री करू नये, धुळीचा त्रास होतो, इमारतींना तडे जातात असे काही मुद्दे आहेत. जनतेने विकासाला साथ दिली पाहिजे. मेट्रोमुळे दळणवळणाला गती येणार आहे. काम रखडत गेले तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते.”

     पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, “मुंबईतील हवेत असलेले कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्यासाठी विविध उपाय केले आहेत. राज्यातील 40 नद्या स्वच्छ केल्या आहेत. प्लॅस्टिक कॅरिबॅगबंदीसाठी पर्यावरण विभाग वेगाने काम करत आहे.”

     मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर म्हणाल्या, “विकासाच्या मागे लागत असताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. ध्वनिप्रदूषण, पाणी प्रदूषण मानवाला घातक आहे. ग्लोबल वॉर्मिंग, प्लॅस्टिक वापराचा धोका आहे.” प्रदूषणाच्या तक्रारी थेट प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे केल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

१ डिसेंबर २०१७

तब्बल 96 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात घडला नवा विक्रम

       दक्षिण आफ्रिकेच्या मार्को मॅरेसने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जलद त्रिशतक झळकवण्याचा पराक्रम केला आहे. मार्कोने दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या स्थानिक सामन्यात बॉर्डर संघाचे प्रतिनिधीत्व करताना ईस्टर्न प्रोविन्स ईस्ट लंडन संघाविरुद्ध त्याने 191 चेंडूत 35 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने नाबाद 300 धावांची ऐतिहासिक खेळी केली. मार्कोने 68 चेंडूत शतक साजरे केले. पुढच्या 71 चेंडूत तो द्विशतकापर्यंत पोहचला. त्यानंतर फलंदाजीतील आक्रमकता कायम ठेवत त्याने अवघ्या 52 चेंडूत अखेरच्या 100 धावा पूर्ण केल्या.

       या डावात त्याला ब्रेडले विलियम्सने नाबाद 113 धावांची खेळी करत मार्कोला सुरेख साथ दिली. दोघांनी मिळून 448 धावांची भागीदारी रचली. दोघांनी मिळून मैदानात धावांचा पाऊस पाडला. हा दक्षिण आफिकेसाठी एक विक्रमच आहे. आपल्या या दमदार खेळीच्या जोरावर मार्कोने तब्बल 100 वर्षांपूर्वी इंग्लंडच्या चार्ली मॅकार्टनीने रचलेला विक्रम मोडीत काढला. चार्लीने 1921 मध्ये नॉटींघम शायरकडून खेळताना 221 चेंडूत 300 धावांची खेळी केली होती.

         याशिवाय इंग्लंडच्या डेनिस कॉमटॉनने 1948-49 मध्ये 181 मिनिटांत 300 धावा करण्याचा पराक्रम केला होता. मात्र, त्यावेळी त्याने किती चेंडू खेळले याची नोंद करण्यात आली नव्हती. त्यावेळी क्रिकेटमध्ये एका षटकात 8 चेंडू फेकले जायचे.