Menu

Study Circle

३० एप्रिल २०१७

ईडी कडून 11,286 कोटींची मालमत्ता जप्त

        सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) मागील आर्थिक वर्षात देशभर 104 गुन्हे दाखल केले असून, 11,286 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

        परकी चलन विनिमय कायद्यानुसार (फेमा) गेल्या आर्थिक वर्षात 1,393 गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात आला. सर्वाधिक म्हणजे 60 हून अधिक गुन्हे नोटाबंदीच्या कालावधीत दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. फेमानुसार दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये देशभरात 538 जणांना नोटीस पाठवल्या. त्यात अनेक व्यावसायिक व सेलिब्रिटींचाही समावेश आहे. या सर्व प्रकरणांमध्ये 4,675 कोटींचे परकी चलन बुडवल्याचा संशय आहे.

         काळ्या पैशांशी संबंधित सर्वाधिक गुन्हे हे नोटाबंदीच्या कालावधीत दाखल करण्यात आले. देशभरात सुमारे 70 गुन्हे दाखल केले. त्यात फेमा आणि पीएमएलएनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. मुंबईतील राजेश्‍वर एक्स्पोर्ट प्रकरण त्यापैकीच आहे. नोटाबंदीच्या काळात बँक खात्यात 92 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी आल्यानंतर ईडीच्या रडावर आलेल्या राजेश्‍वर एक्स्पोर्ट कंपनीमार्फत वर्षभरात 1,478 कोटी रुपये हाँगकाँग आणि दुबईत पाठवल्याचे उघडकीस आले होते.

       राजेश्‍वरी एक्स्पोर्ट प्रकरणानंतर मुंबईसह देशभर बनावट कंपन्यांवर छापे टाकले होते. मुंबईत 700 हून अधिक बनावट कंपन्या आहेत. त्यांच्यामार्फत काळा पैसा पांढरा करण्याच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश करण्यात ईडीला यश आले. वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकप्रकरणीही ईडीने नुकतीच 18 कोटी 37 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

जीएसटी साठी आता 20 मेपासून अधिवेशन

       वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर करण्यासाठी आयोजित केलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला. त्यानुसार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आता 17 मे ऐवजी 20 मे पासून सुरू होईल.

       देशात येत्या 1 जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विधेयकाला मान्यता देण्यासाठी सरकारने सुरवातीला 17 ते 19 मे दरम्यान अधिवेशन घेण्याचे ठरवले होते; मात्र 18 आणि 19 मे रोजी नवी दिल्लीत जीएसटीच्या संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उपस्थित राहावे लागणार असल्याने अधिवेशनाच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष अधिवेशनाच्या नव्या तारखांबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

२९ एप्रिल २०१७

बँका खराब नोटा स्वीकारणार

        बँका खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले. अशा नोटांना बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता यावर तोडगा काढावा असंही आरबीआयने सांगितले. रिझर्व्ह बँकेकडे गेल्या काही दिवसांत बँका रंग लागलेल्या तसेच ज्यांच्यावर काही लिहिले आहे, धुतल्याने रंग उडाला आहे अशा नोटा स्वीकारत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. यामध्ये खासकरुन 500 आणि 2000 च्या नोटांचा समावेश होता. यानंतर आरबीआयने परिपत्रक काढत बँकांना या नोटा स्वीकारण्याचा आदेश दिला आहे.

       रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, नोटांवर लिहिण्यासंबंधी जो आदेश देण्यात आला होता तो बँक कर्मचार्‍यांसाठी होता. त्यांनी नोटांवर काही लिहू नये असे सांगितले होते. अनेक बँक कर्मचार्‍यांना नोटांवर लिहिण्याची सवय लागल्याचे लक्षात आल्यानंतर आरबीआयने हा आदेश काढला होता. अशाप्रकारे नोटांवर लिहिणे आरबीआयच्या क्लीन नोट पॉलिसीविरोधात आहेत. आरबीआयने सरकारी कर्मचारी, संस्था आणि सामान्यांना नोटांवर काही न लिहिता त्यांना व्यवस्थित ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

नव्या मोहिमेसाठी इस्रो सज्ज

      श्रीहरिकोटा येथून 5 मे रोजी आकाशाकडे झेपावणार्‍या जीएसएलव्ही मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो सज्ज झाली आहे. यावेळी जीएसएलव्ही-एफ09 दूरसंचार उपग्रह जीएसएटी-9 अवकाशात नेणार असून, त्याचे उड्डाण दुसर्‍या लाँच पॅडवरून होणार आहे.

       इस्रो येत्या 2 दिवसांत जीएसएलव्ही मोहिमेच्या उड्डाणाची वेळ घोषित करेल. जीएसएलव्ही-एफ05 च्या यशानंतर तब्बल 8 महिन्यांनी जीएसएलव्हीद्वारे होणारे ही मोहीम असल्याने हिला विशेष महत्त्व आहे. यापूर्वीच्या मोहिमेत उपग्रहाचे वजन हे 2,211 किलोग्राम होते, तर आत्ताच्या मोहिमेत 2,230 इतक्या वजनाचे उपग्रह असतील, अशी माहिती दिली आहे. यंदाचे उड्डाण हे जीएसएलव्ही यानाची 11 वी मोहीम असणार आहे.

       शुक्र आणि पृथ्वी यांच्यामधील साम्य आणि या दोन्हींचे मूळ एकच असल्याचा विश्‍वास यामुळे शुक्र ग्रहाबद्दल कायमच उत्सुकता आहे. भारतात या ग्रहाच्या अभ्यासासाठी इच्छुक शास्त्रज्ञांनी आपली नावे संस्थेला कळवावीत, असे सांगत इस्रोने संधीची घोषणा केली आहे. यासाठीचे प्रस्ताव देण्यासाठी 19 मे ही शेवटची तारीख असणार आहे.

२८ एप्रिल २०१७

चीनने बांधली पहिली विमानवाहू युद्धनौका

           साता समुद्रापलीकडेही दबदबा निर्माण करणारे नौदल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून चीनने पूर्णपणे देशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे जलावतरण केले. अशा प्रकारे पूर्णपणे स्वत:च्या ताकदीवर विमानवाहू युद्धनौका बांधणारा चीन हा जगातील सातवा देश ठरला.

        उत्तरेकडील दालियान बंदरातील नौकाबांधणी आवारात ही युद्धनौका बांधली गेली.वरिष्ठ नौदल आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत औपचारिक समारंभ झाल्यानंतर या युद्धनौकेने बर्थ सोडून प्रथमच समुद्रात प्रस्थान केले.

       चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार ‘००१ए’ या प्रकारातील ही विमानवाहू युद्धनौका ५० हजार टनांची आहे. तिचे आरेखन सन २०१३ मध्ये व प्रत्यक्ष बांधणी सन २०१५ मध्ये सुरु झाली. सागरी चाचण्या पूर्ण झाल्यावर आणि त्यावरील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उपलब्ध झाल्यानंतर ही विमानवाहू युद्धनौका सन २०२० पूर्वी नौदलाच्या सक्रिय सेवेत दाखल.

       या नव्या युद्धनौकेचे नाव अद्याप अधिकृतपणे ठरलेले नाही. परंतु तिचा स्थायी मुक्काम शॅन्डाँग प्रांतातील क्विंगदाओ नौदल तळावर राहणार असल्याने कदाचित तिचे नाव ‘शॅन्डाँग’ ठेवले जाईल, अशी अटकळ चिनी प्रसिद्धीमाध्यमांत वर्तविण्यात आली आहे. सन २०२० पर्यंत नौदलाचा झपाट्याने विस्तार करून युद्धनौका, पाणबुड्या व रसद पुरविणाऱ्या नौका असा मिळून एकूण २६५ ते २७३ युद्धनौकांचा बलाढ्य ताफा उभा करण्याची चीनची महत्वाकांक्षी योजना आहे. यात चीन देशी बनावटीच्या आणखी दोन ते तीन विमानवाहू युद्धनौकाही बांधेल.

डोपिंग प्रकरणी मदत करणारेही ठरणार दोषी

       उत्तेजकांचे सेवन हा नुसता फौजदारी गुन्हाच नाही, तर त्यात दोषी आढळणार्‍यास थेट कारावासाची शिक्षाच सुनावली जाईल, अशा प्रकारचा नवा कायदाच करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सांगितले.

      राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंध संस्थेच्यावतीने आयोजित परिसंवादानंतर गोयल यांनी ही माहिती दिली. उत्तेजकांचे सेवन आता केवळ आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर राहिलेले नसून, ते विद्यापीठ आणि शालेय स्तरावरदेखील पसरू लागल्याची भीती गोयल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, उत्तेजकांचे सेवन वरिष्ठ खेळाडूंपर्यंत मर्यादित राहिलेले नाही. ते कुमार खेळाडूंपर्यंत पोचू लागले आहे. उत्तेजकांचा गैरवापर झपाट्याने पसरू लागला आहे. त्यामुळे केवळ खेळाडूच नाही, तर त्यांना यासाठी सहाय्यभूत असणारे प्रशिक्षक, ट्रेनर, डॉक्टर अशा सर्वांनाच दोषी धरून त्यांना थेट कारावासाची शिक्षा सुनावणारा कायदा कसा अस्तित्वात येईल यावर आम्ही विचार करत आहोत.”

      उत्तेजक सेवन प्रकरणात सामील असणार्‍या प्रत्येकालाच आम्ही या कायद्यान्वये एकत्र दोषी धरणार आहोत, असेही गोयल म्हणाले. नाडाचे संचालक नवीन अगरवाल म्हणाले, उत्तेजक चाचणी घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आम्हाला चांगले निकाल मिळू लागले आहेत. खेळाडू दोषी आढळत आहेत, पण त्यांच्यात जागरुकतादेखील निर्माण झाली आहे. दरवर्षी आम्ही सुमारे 7 हजार चाचण्या घेण्यात येतात.

बँक आॅफ इंडिया ८९ गावे करणार डिजिटल

      बँक आॅफ इंडियाने आपल्या ४९ झोनमधील ८९ गावांना डिजिटल करण्यासाठी दत्तक घेतले . या गावांत बँकेने २२७ विक्री केंद्र यंत्रे (पीओएस) बसविली.

      बँकेने निवेदनात म्हटले की, सप्टेंबर २0१७ पर्यंत ५४ झोन डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. प्रत्येक झोनमध्ये किमान ५४ गावे डिजिटल करण्यात येणार.

    बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मेलविन रेगो यांनी सांगितले  आम्ही आमच्या सर्व झोन कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन ग्राहकांना विविध कार्डे आणि त्यांचा वापर याबाबत शिक्षित करण्यास सांगण्यात आले .

२७ एप्रिल २०१७

बहुतांश विमानांचा रंग पांढरा का?

           बहुतांश विमानांचा रंग पांढरा असतो. काही रंगीबेरंगी विमानेही तुमच्या पाहण्यात आली असतील; परंतु त्यांचा मूळ रंगही पांढराच असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे का? बहुतांश विमाने पांढऱ्या रंगाची असण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे विमान थंड ठेवण्यासाठी त्याला पांढरा रंग दिला जातो. पांढरा रंग उष्णतारोधक मानला जातो. तो उष्णतेला इतर रंगांच्या तुलनेत अधिक दूर ठेवतो. परिणामी पांढऱ्या रंगामुळे विमानाचे तापमान कमी राखण्यास मदत होते. दुसरे कारण आर्थिक आहे. एका विमानाला रंग देण्यासाठी जवळपास ३ लाख रुपये ते एक कोटी रुपये एवढा खर्च येतो. कोणतीही कंपनी एका विमानाच्या रंगकामावर एवढा खर्च करू इच्छित नाही. त्याचबरोबर एका विमानाला रंग देण्यास ३ ते ४ आठवडे लागतात. एवढा प्रदीर्घ काळ विमान उभे राहिल्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होऊ शकते. पांढरा रंग या सर्व समस्यांचे उत्तर आहे. उन्हामुळे इतर रंग फिकट होतात; परंतु पांढऱ्या रंगाबाबत ही समस्या नसते. त्यामुळे बहुतांश विमान कंपन्या आपल्या विमानाला हाच रंग देणे पसंत करतात. विमान कंपन्या विमानांची खरेदी-विक्री करीत असतात. त्यामुळे विमानावरील कंपनीचे नाव बदलणे किंवा आपल्या पद्धतीने त्यावर नाव टाकणे पांढऱ्या रंगामुळे सोपे होते. दुसरा रंग वापरल्यामुळे विमानाचे वजन वाढते आणि त्यामुळे इंधनाचा खर्च खूप वाढतो. पांढऱ्या रंगामुळे इंधन कमी लागते.

रुग्णाच्या पोटात विद्युत बल्ब

           डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाच्या पोटातून विजेचा बल्ब बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. सौदी अरेबियात ही घटना घडली. हा बल्ब त्याने ११ वर्षांपूर्वी गिळला होता. २१ वर्षांचा तरुण अनेक दिवसांपासून आजारी होता. प्रकृती गंभीर बनल्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्याचे अहवाल पाहिल्यानंतर डॉक्टर आश्चर्यचकित झाले. प्रकृती गंभीर असल्यामुळे रुग्णाला तात्काळ आपत्कालीन कक्षात नेण्यात आले. त्याच्या पोटात विजेचा बल्ब होता, असे डॉक्टरांनी सांगितले. या बल्बमुळे त्याची प्रकृती गंभीर बनली होती. दीड तासाच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पोटातून बल्ब बाहेर काढण्यात आला. त्याची प्रकृती आता ठीक आहे. दहा वर्षांचा असताना मी खेळता-खेळता बल्ब गिळला होता, असे या रुग्णाने सांगितले. तेव्हापासून हा बल्ब त्याच्या पोटात होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, रुग्णाची प्रकृती सुधारत आहे.

२६ एप्रिल २०१७

सीआरपीएफच्या महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती

           छत्तीसगडमधील सुकमा जिल्हात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले.सीआरपीएफच्या महासंचालकपदी 1983 च्या उत्तर प्रदेश कॅडर बॅचचे आयपीएस अधिकारी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती करण्यात आली.राजीव राय भटनागर यांच्याकडे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) महासंचालकपदाची जबाबदारी आहे. तर, सीआरपीएफच्या कार्यकारी महानिरीक्षकपदी सुदीप लखटकिया आहेत. 

         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने राजीव राय भटनागर यांनी निवड केली. गेल्या फेब्रुवारी महिन्यात सीआरपीएफच्या महासंचालकपदावरुन के. दुर्गा प्रसाद निवृत्त झाल्यानंतर त्याजागी कोणाचीही निवड करण्यात आली नव्हती. 
        केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या महासंचालकपदासाठी 1983 बॅचचे आयपीएस अधिकारी आर. के. पचनंदा यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, आर. के. पचनंदा यांची आयटीबीपीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते एनडीआरएफच्या महासंचालकपदी कार्यरत आहेत.

मलेरियाच्या पहिल्या लसीसाठी आफ्रिकेची निवड

      मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लस घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिका खंडातील तीन देशांमध्ये दिली जाणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) जाहीर केले. या तीन देशांमध्ये मलेरियाचा धोका अधिक असून, पुढील वर्षीपासून या लसीची प्रायोगिक स्तरावर चाचणी सुरू होणार आहे.

      अद्यापही डॉक्टरांपुढे मलेरियाचे मोठे आव्हान असून, जगभरात या रोगामुळे दरवर्षी 20 कोटी जण आजारी पडतात. यापैकी 5 लाख जणांचा मृत्यू होतो. मृतांमध्ये बहुतांशजण आफ्रिकेतील लहान मुले असतात. मलेरिया पसरण्यास कारणीभूत असलेल्या डासांपासून संरक्षण करण्यासाठी येथे मच्छरदाणी आणि डास मारण्याचा फवारा असे दोन उपाय योजले जातात, त्यामुळे ग्लॅक्सो स्मिथ क्लिन या कंपनीने आरटीएस (अथवा मॉस्क्युरिक्स) ही लस तयार केली आहे. मलेरियावरील ही लस अंतिम उपाय नसला तरीही योग्य काळजी घेत त्याचा वापर केल्यास हजारोजणांचे आयुष्य वाचविण्याची लसीची क्षमता आहे, असे डब्लूएचओचे विभागीय संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती यांनी सांगितले. मात्र, यासाठी या गरीब देशांमधील लहान मुलांना या लसीचे चारही डोस दिले जाण्याचे आव्हान संघटनेपुढे आहे.

    मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात झालेल्या विविध प्रयत्नांमुळे गेल्या 15 वर्षांमध्ये या रोगामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांच्या संख्येत 62 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, डब्लूएचओ च्या म्हणण्यानुसार, या रोगाचा सर्वाधिक धोका असलेल्या आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये याबाबतची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने रोगाचे प्रमाण घटले, असे ठामपणे म्हणता येणार नाही.

    पुढील वर्षीपासून दिली जाणारी मलेरियावरील ही लस 5 ते 17 महिन्यांपर्यंतच्या मुलांना दिली जाणार आहे. प्रयोगशाळांमधील चाचणीवेळी लसीचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दिसून येतात का, हे यावेळी तपासले जाणार आहे. ही लस तयार करण्यासाठी गेली अनेक वर्षे संशोधक प्रयत्न करत होते आणि यासाठी कोट्यवधी डॉलर खर्च आला आहे. केनिया, घाना आणि मलावी या देशांमध्ये चांगले प्रतिबंधात्मक उपाय योजिले जात असूनही रोगामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांचे प्रमाण कायम असल्याने या तीन देशांची चाचणीसाठी निवड केली आहे. 2040 पर्यंत जगभरातून मलेरियाची समस्या दूर करण्याचे डब्लूएचओ चे लक्ष्य आहे.

हुगळी नदीत कोसळून 3 जणांचा मृत्यू

           पश्चिम बंगालमध्ये हुगळी नदीत एक जेट्टी कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरतीच्या वेळी समुद्राला उधाण आलं असताना ही जेट्टी कोसळण्याची दुर्घटना झाली आहे. जेट्टीवर उभे असलेले जवळपास 200 प्रवासी नदीत पडले, मात्र त्यातील 40 जण अद्याप बेपत्ता आहेत.

               नदीत बुडालेल्या प्रवाशांचा शोधकार्य सुरू आहे. आपत्कालीन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, बेपत्ता असलेल्या प्रवाशांसाठी शोधकार्य राबवलं जात आहे. जेट्टी आधीच कमकुवत झाली असल्यानं ऐन भरतीच्यावेळी ती कोसळली, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

               मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख रुपये नुकसानभरपाई, तर जखमींना 25 लाख देण्याची घोषणा केली आहे. नदीत बुडालेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनही राबवण्यात आलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 22 साईट्सवर बंदी

           जम्मू - काश्मीर सरकारने हिंसाचाराला आळा घालण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसह 22 सोशल नेटवर्किंग साईट्सवर बंदी घ्यालण्याचा निर्णय घेतला. 

         गृह विभागाचे प्रधान सचिव आर. के. गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन टेलिग्रॉफ अॅक्टनुसार 22 वेबसाईट्स आणि अॅप्लिकेशनवर बंदी घ्यालण्यात आली आहे. या सर्व सोशल साईट्सवर पुढील निर्णय घेईपर्यंत सध्या महिनाभरासाठी बंद असतील. तसेच, 3 जी आणि 4 जी मोबाईलवरील सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
         बंदी घालण्यात आलेल्या सोशल वेबसाइट्समध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, वुईचॅट, ओझोन, गुगल प्लस, बायडू, स्काईप, व्हायबर, लाईन, स्नॅपचॅट, पिंटरेस्ट, टेलिग्राम, रेडीट, स्नॅपफीश, युट्यूब (अपलोड), व्हाईन, बझनेट, फ्लिकर अशा 22 साईट्स समावेश आहे. 
        गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या दगडफेकीमागे सोशल मिडीयाचा मोठा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली होती. त्यामध्ये जवळपास 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून दगडफेक करणा-या तरुणांना सुरक्षा दलांच्या ऑपरेशनबाबत माहिती पुरवली जाते आणि त्यानंतर त्यांना चकमक होणा-या ठिकाणी एकत्र जमवले जाते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी जम्मू - काश्मीर सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.

२५ एप्रिल २०१७

आमिर खानने स्वीकारला पुरस्कार

       बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानला मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मरनार्थ दिल्या जाणार्‍या विशेष पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी आमिर खानने तब्बल 16 वर्षानंतर पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली.

       आमिर खानच्या लगान चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. त्यावेळी तो ऑस्करच्या सोहळ्यासाठी गेला होता. परंतु त्याला त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला नाही. तेव्हापासून आतापर्यंत आमिर खानने एकाही पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली नव्हती. मात्र, 24 एप्रिल रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या पुरस्कारांचे वितरण केले. यावेळी आमिर खानला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित केले. आमिर खानला दंगल या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात आला.

के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

    साऊंड डिझायनर ते दिग्दर्शक असा प्रवास करणारे के. विश्‍वनाथ यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. येत्या 3 मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सुवर्ण कमळ, 10 लाख रुपये रोख आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

     दादासाहेब फाळके पुरस्कार समितीने या पुरस्कारासाठी ’कलातपस्वी’ के. विश्‍वनाथ यांची शिफारस केली होती. या शिफारशीवर व्यंकय्या नायडू यांनी शिक्कामोर्तब केले. नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून या पुरस्काराची घोषणा केली. के. विश्‍वनाथ यांचे तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये मोठे योगदान आहे. यापूर्वी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

       काही राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक फिल्मफेअर पुरस्कार, नांदी पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, साऊण्ड डिझायनर अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी सिनेसृष्टीसाठी सातहून अधिक दशके त्यांनी काम केले.

      के. विश्‍वनाथ यांनी दिग्दर्शित केलेला स्वाती मुथ्यम या सिनेमाला 59 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ऑफिशियल एण्ट्री म्हणून पाठवले होतेोसरगम, कामचोर, संजोग, जाग उठा इन्सान, ईश्‍वर, संगीत, धनवान या गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन के. विश्‍वनाथ यांनी केले आहे.

पोस्टमन पोहोचवणार औषधी

           भारतातील ग्रामीण भागांत औषधांचा पुरवठा करण्यासाठी व हवामानाची माहिती देण्यासाठी पोस्ट खात्याच्या मनुष्यबळाचा उपयोग करण्यात येणार.केंद्रीय पृथ्वी विज्ञान व आरोग्य मंत्रालय याबाबत पोस्ट खात्याशी चर्चा करीत आहे.

          पोस्ट खात्याचे सचिव बी. व्ही. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी विज्ञान मंत्रालय हवामानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट खात्याच्या मनुष्यबळाचा वापर करण्याची योजना तयार करीत आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला आम्ही स्थानिक जलवायू परिस्थितीचा डेटा पुरवत आहोत. त्यांची इच्छा असल्यास ही माहिती आम्ही शेतकरी किंवा किनारपट्टी भागातील मच्छीमारांना पुरवू शकतो. याबाबतच्या प्रस्तावित यंत्रणेच्या तांत्रिक विवरणाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे व आर्थिक तपशिलाचे काम सुरू आहे. ही सुविधा पुढील दोन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता.

           देशाच्या सुदूर व दुर्गम भागांत औषधांचा पुरवठा पोस्ट खात्याने करावा, अशी आरोग्य मंत्रालयाची योजना आहे. याबाबत चर्चाही झाली आहे; परंतु या योजनेला अंतिम स्वरूप दिले गेलेले नाही. याबाबत अंतिम निर्णय लवकरच होईल.

'मूर्ती लहान पण किर्ती महान', 9 वर्षाची चिमुरडी अंडर 19 च्या संघात

           मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पदार्पणातच त्यांने गोलंदाजांची पिसे काढत क्रिकेटमध्ये वय महत्वाचे नसून प्रतिभा महत्वाची असते हे दाखवून दिले होते. असाच आणखी एक प्रकार भारताचा महिला क्रिकेटमध्ये घडला आहे. आज महिलाच्या अंडर-19 संघाची निवड झाली आहे. यामध्ये चक्क नऊ वर्षाच्या अनादि तागडेची निवड करण्यात आली आहे.

       मूर्ती लहान पण किर्ती महान असं आपण अनेकदा म्हणतो... तेच आपल्याला सध्या ह्या चिमुकलीबद्दल म्हणावं लागेल. मध्यप्रदेशातल्या इंदौरमधील अनादि तागडेने क्रिकेटच्या जगात आपला इतिहास रचला आहे. या नऊ वर्षाच्या अनादिची अंडर- 19 महिला क्रिकेटमध्ये निवड झाली आहे. चौथीमध्ये शिकणारी अनादि वेगवान गोलंदाजही आहे. तिची गोलंदाजी बघून निवडकर्तेही हैरान झाले होते. तिची कामगिरी बघून एवढ्या लहान वयातही तिची निवड करण्यात आली.
 
         अनादिची निवड भारताच्या महिला अंडर 19 संघात झाल्यानंतर आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, यावेळी माध्यामांशी बोलताना तिचे वडिल म्हणाले. अनादिला क्रिकेटचा वारसा तिच्या आईकडून मिळाला आहे. तिची आई एक चांगली क्रिकेटर होती. मुलीच्या प्रशिक्षणासाठी कुणी चांगला कोच मिळाला नाही म्हणून तिने स्वत:च तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली. बेसिक प्रशिक्षणानंतर त्यांनी अनादिला 'हॅप्पी वंडर्स क्लब'मध्ये भरती केले. हार्दिक पांड्याची ती मोठी फॅन आहे. त्याची बॅटिंग, बॉलिंग, फिटनेस तिला आवडतात. हार्दिक बॅटिंगसोबत बॉलिंगही चांगली करतो. त्यासोबत तो फिटही आहे. आपल्यालाही त्याच्यासारख बनायचंय, असं अनादि म्हणते. तिला सचिनला भेटण्याची इच्छा आहे. तिची आईही सचिनची फॅन आहे. अनादिच्या वडिलांचं म्हणण आहे की, तिच्या आईने त्यांच्यासोबत लग्न केलं त्याला कारणही सचिनच आहे. कारण त्यांचा आणि सचिनचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो. तसेच त्यांच्या वडिलांचे नावही सारखेच आहे.

२४ एप्रिल २०१७

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 जवान शहीद

           छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले . 

           सुकमा जिल्ह्यात काला पठारजवळ चिंतागुफा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 74 बटालियनचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले असून सात जण जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सीआरपीएफच्या कॅम्पजवळ जादा जवानांचा फौजफाटा वाढविण्यात आला आहे. तसेच, जवानांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. येथील रोड ओपनिंगच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सीआरएफचे 90 जवान जात असताना 300 अधिक नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर नक्षलवाद्यांनी शहीद जवानांकडील शस्त्रसाठा पळविला आहे.
         नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी तात्काळ बैठक बोलावली आहे. तर, शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांबदद्ल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंजराज अहिर यांना रायपूरला पाठविले आहे. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक विकेकानंद सिन्हा आणि पोलीस उपमहानिरीक्षक सुंदरराज सुकमाकडे रवाना झाले.

रात्रीच्या प्रवासासाठी रेल्वेच्या नव्या डबल डेकर ट्रेन

           भारतीय रेल्वेकडून जुलै महिन्यात स्पेशल डबल डेकर ट्रेन सुरु करण्यात येणार. रात्रभरात करता येणाऱ्या प्रवासासाठी या डबल डेकर ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत. दिल्ली-लखनऊसारख्या सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गांवर डबर डेकर ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या ट्रेनमध्ये वातानुकूलित यंत्रणा असेल.

          ‘उत्कृष्ट डबल डेकर एसी यात्री एक्स्प्रेस किंवा उदय एक्स्प्रेस असे या नव्या ट्रेनचे नाव असेल,’ अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या ट्रेनमध्ये स्लीपर बर्थऐवजी आरामदायी आसने असणार आहेत. या ट्रेनच्या एका डब्याची क्षमता १२० प्रवासी इतकी असेल. नव्या ट्रेनच्या डब्यात गरम खाद्य आणि पेय पदार्थांच्या वेन्डिंग मशीन्सदेखील असणार आहेत. ‘नव्या ट्रेन सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या दिल्ली-लखनऊसारख्या मार्गांवर चालवल्या जातील. या ट्रेनचे तिकीट ३ एसी क्लासच्या तिकीटापेक्षा कमी असेल. मात्र या ट्रेनमध्ये मेल आणि एक्स्प्रेसच्या तुलनेत अधिक सोयी सुविधा असतील.

         नव्या डबल डेकर एसी ट्रेनमधील प्रत्येक डब्यात एलसीडी टेलिव्हिजन स्क्रीन असेल. यावर सुरु असलेले कार्यक्रम वाय-फायने जोडलेल्या हेडफोनच्या मदतीने प्रवासी ऐकू शकतील. ‘नव्या डबल डेकर ट्रेन रात्रीच्या प्रवासासाठी वापरल्या जाणार असल्या, तरी त्यामध्ये स्लीपर बर्थ असणार नाहीत. त्याऐवजी आरामदायी आसने आणि इतर अनेक सोयी सुविधा देऊन प्रवासाचा दर्जा सुधारण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

२३ एप्रिल २०१७

सुनीत तिसऱ्यांदा ‘मुंबई महापौर श्री’

           आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधवने ‘मुंबई श्री’ अतुल आंब्रेचे आव्हान मोडून काढत चार वर्षांत तिसऱ्यांदा ‘मुंबई महापौर श्री’ स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. २०१४ साली सुनीतने ‘मुंबई महापौर श्री’चा किताब पटकावला होता आणि २०१५ साली त्याने विश्रांती घेत २०१६ मध्ये पुन्हा बाजी मारली.

        शिवबा प्रतिष्ठान, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या सहकार्याने या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. ५५ किलो वजनी गटात अनुभवी संदेश सकपाळने नितीन शिगवणची कडवी झुंज मोडीत काढून गटविजेतेपद संपादन केले. मि. वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या नितीन म्हात्रेला ६० किलो वजनी गटात उमेश गुप्ता आणि विराज लाड यांनी कडवे आव्हान दिले. ६५ किलो वजनी गटात बप्पन दाससमोर प्रमोद झोरे थोडा कमी पडला. मात्र ७० किलो वजनी गटात विलास घडवले आणि संतोष भरणकर यांच्यात अटीतटीचा सामना झाला आणि त्यात विलासने बाजी मारली. ७५ आणि ८० किलो वजनी गटातही चुरस पाहायला मिळाली, परंतु अनुक्रमे प्रतीक पांचाळ आणि सुशील मुरकरने बाजी मारली.

 अफगाणच्या संरक्षणमंत्री आणि लष्कर प्रमुखांचा राजीनामा

           अफगाणिस्तानमधील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणचे संरक्षणमंत्री अब्दुल्ला हबीबी आणि लष्करप्रमूख कादम शाह शाहीम यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी या दोघांचा राजीनामा स्वीकारला.

         उत्तर अफगाणिस्तानमध्ये मझर-इ-शरिफ या शहराजवळील लष्करीतळावर दहशतवाद्यांनी शनिवारी हल्ला केला होता. या हल्ल्यात १६० हून अधिक जवानांचा मृत्यू झाला होता. तालिबानी दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती. शेवटी या दोघांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला. राष्ट्रपतींनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला.

२२ एप्रिल २०१७

राज्य सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्के वाढ

           राज्यातील सर्व श्रेणीतील सरकारी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना सहाव्या वेतन आयोगातील महागाई भत्त्यात 7 टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेतला. यामुळे वर्षाला तिजोरीवर साडेतीन हजार कोटींचा भार पडणार आसल्याचे सांगण्यात येते.

          केंद्रीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आसला तरीही राज्यस्तरीय कर्मचार्‍यांना मात्र आजपर्यंत सहाव्या वेतन आयोगाच्या तरतुदीतील महागाई भत्त्याच्या फरकासाठी तिष्ठत राहावे लागत होते.

          राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महागाई भत्त्याची 7 टक्के इतकी भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वित्त विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला. यामुळे राज्यातील 19 लाख कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला आर्थिक दिलासा मिळाला आहे. ही वाढ 1 जुलै 2016 पासून लागू होणार आहे. यानुसार फरकाची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.

बॅडमिंटन क्रमवारीत सिंधू तिसरी

          जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्यादृष्टीने मानांकन क्रमवारी जास्त महत्त्वाची आहे. अव्वल 24 मध्ये स्थान असल्यास जागतिक स्पर्धेच्या पात्रतेचे दरवाजे उघडतात. त्यामुळे या क्रमवारीस महत्त्व आहे. अर्थात, पुढील आठवड्यातील क्रमवारीनुसार हा निर्णय होईल. साईप्रणीतने 8 क्रमांकांनी प्रगती केली आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेतील विजेतेपदामुळेच तो हे साध्य करू शकला. मात्र, या स्पर्धेतील उपविजेत्या किदांबी श्रीकांतने अजूनही साईप्रणीतला मागे टाकले असून, तो 21 वा आहे. पुरुष एकेरीत सौरभ वर्मा 40 व्या स्थानावर आहे. महिला एकेरीत सिंधूने 2 क्रमांकांनी प्रगती केली आहे.

        बी. साईप्रणीतने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 22 वा क्रमांक मिळवत आतापर्यंतचे सर्वोत्तम मानांकन मिळवले आहे. पी. व्ही. सिंधूने 2 क्रमांकांनी प्रगती करीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

       या क्रमवारीत चीनची ताई झु यिंग पहिल्या, तर कॅरोलीन मरिन दुसर्‍या क्रमांकावर आहे. साईना नेहवालने एका क्रमांकाने प्रगती करीत 8 वा क्रमांक मिळवला. साईना, सिंधू सोडल्यास एकही भारतीय महिला अव्वल 40 मध्ये नाही. 6 क्रमांकांनी प्रगती केलेली रितूपर्णा दास 46 वी, तर तन्वी लाड 53 वी आहे.

तालिबानच्या हल्ल्यात 50 अफगाण सैनिक ठार

         उत्तर अफगाणिस्तानातील मजार ए शरीफ शहराजवळ असणार्‍या सैन्याच्या ठाण्यावर तालिबानने हल्ला केला. या भीषण हल्ल्यात अफगाणिस्तानचे 50 सैनिक ठार झाले. अमेरिकन सैन्याच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. तर अफगाणिस्तानच्या सेनेकडून 8 सैनिक मारले गेल्याचे तर 11 जखमी झाले.

         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दांत निषेध केला. मजार ए शरीफवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. मृतांच्या परिवाराबरोबर आमच्या सहवेदना आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. अफगाण सैन्याचे प्रवक्ता नसरतुल्ला जमशीदी यांनी सांगितले की, हा हमला नमाज पठन करत असताना सैन्य ठाण्यातील मशीदीजवळ झाला. 2 सैनिकी वाहनांमधून तालिबानचे 6 आतंकवादी सैन्याच्या वेषात आले. हल्लेखोरांनी वाहनात जखमी सैनिक असून त्वरित उपचारासाठी आत जाणे गरजेचे असल्याचा बहाणा बनवला व सैन्य ठाण्यात प्रवेश केला. त्यानंतर रॉकेल प्रोपेल्ड ग्रेनेड्स आणि बंदूकीने अफगाण सैन्यावर हल्ला चढवला.

         अफगाण सैन्यानेही प्रत्युतर दिले. यामध्ये एक आतंकवादी मारला गेला. तर अन्य 5 जणांना अटक केली. अफगाण सैन्याचे हे ठाणे सैन्याच्या 209 तुकडीचे मुख्यालय आहे. याच्या कार्यक्षेत्रात कुंदुज प्रांतासह संपूर्ण उत्तर अफगाणिस्तानचा प्रदेश येतो. कुंदज प्रांतामध्येच अफगाण सैन्य व तालिबानिंमध्ये जोरदार लढाई सुरु आहे. तालिबानचे प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने त्याच्या लढवय्यांनी अफगाण सैन्याचे जबरदस्त नुकसान केल्याचे म्हटले आहे. 

२१ एप्रिल २०१७

‘इसिस’चे चार दहशतवादी जेरबंद

           दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी ‘इसिस’ दहशतवाद्यांची मोर्चेबांधणी करणार्‍या नाझीम ऊर्फ उमर शमशाद अहमद शेख या 26 वर्षीय दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने उत्तर प्रदेश एटीएसच्या अधिकार्‍यांनी ठाण्यातील मुंब्रा येथून अटक केली. उत्तर प्रदेश एटीएस, महाराष्ट्र एटीएस, दिल्ली विशेष शाखा, आंध्र प्रदेश सीआय शाखेसह तब्बल 9 पथकांनी 5 राज्यांमध्ये ही कारवाई करत ‘इसिस’च्या 4 दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तर सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त केले. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या संशयितांना अटक केली. मुंब्य्रासह लुधियाना आणि बिजनोर येथून ‘इसिस’च्या तीन हस्तकांना जेरबंद केले.

           मुंबईसह लुधियाना (पंजाब), नरकाटियागंज (बिहार), बिजनोर (उत्तर प्रदेश) आणि मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) या ठिकाणीही व्यापक शोधमोहीम राबवली. या कारवाईत उत्तर प्रदेश एटीएस आणि दिल्ली पोलिसांना आंध्र प्रदेश, बिहार, पंजाब आणि महाराष्ट्र पोलिसांनी सहकार्य केले. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, आणखी 6 जणांची पोलिसांकडून चौकशीदेखील केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेले संशयित दहशतवादी ‘इसिस’संघटनेचा भाग होते. देशभरात दहशतवादी कारवाया करण्याचा कट ते आखत होते. यामधील काही संशयित ‘इसिस’मध्ये भरती करण्यासाठी तरुणांचा शोध घेत होते.

           वेगवेगळ्या दहशतवादी गटांचे सदस्य देशाच्या विविध भागात सक्रिय असून त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याची अशी पक्की टिप उत्तर प्रदेश एटीएसला खबर्‍यांकडून मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे त्यांनी दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल, आंध्र प्रदेशचा क्राईम इन्व्हेस्टिगेशन सेल, महाराष्ट्र एटीएस, पंजाब पोलिस व बिहार पोलिस या सगळ्यांशी समन्वय साधला. गेला महिनाभर आपापल्या राज्यांच्या कानाकोपर्‍यांत शोधमोहीम राबवल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली.

‘जालना जिल्ह्याला राष्ट्रीय सन्मान, ‘प्रधानमंत्री पुरस्काराने’ गौरव

           ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना जिल्ह्याचा गौरव केला. राज्यांच्या श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणारे जालनाचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना सन्मानित करण्यात आले. 1 लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर, महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा देशातील 10 अभिनव योजनेत समावेश केला.

           राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण काम करणार्‍या नागरी सेवेतील अधिकार्‍यांना दरवर्षी 21 एप्रिल रोजी ‘नागरी सेवा दिनी’ ‘प्रधानमंत्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. दिल्ली येथील विज्ञानभवनात प्रशासन सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015-16 साठी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले. प्रशासन सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागाचे राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, प्रधानमंत्री यांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा, कॅबीनेट सचिव पी.के.सिन्हा यावेळी उपस्थित होते.

           केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री ग्राम सिंचन योजना’, ‘दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना’, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’, ‘स्टँडअप इंडिया’-‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट’ या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना विविध श्रेणींमधे पुरस्कार देऊन या कार्यक्रमात गौरविले. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’ची अंमलबजावणी करणार्‍या देशातील सर्वच जिल्ह्यांनी प्रधानमंत्री पुरस्कारासाठी अर्ज केला होता. देशातील 12 जिल्ह्यांची यातून निवड केली व त्यांचे सादरीकरण झाले, यानंतर अंतिम 4 जिल्ह्यांमधून जालना जिल्ह्याची निवड केली.

२० एप्रिल २०१७

रोनाल्डोचा हॅट्ट्रिकसह शतकी गोल

           ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या वादग्रस्त हॅट्ट्रिकच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिकवर 4-2 अशी मात केली. या विजयासह रिअलने उपांत्य फेरीत वाटचाल केली. रोनाल्डोने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत गोलशंभरीही गाठली. या विजयासह रिअलने स्पर्धेत बायर्न म्युनिकविरुद्धची कामगिरी 6-3 अशी सुधारली. रिअल माद्रिदने सलग सातव्या वर्षी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. रिअलचा संघ पिछाडीवर होता, मात्र रोनाल्डोने भरपाई वेळेत केलेल्या गोलच्या बळावर रिअलने बाजी मारली. दुसर्‍या नाट्यमय सत्राच्या तुलनेत पहिले सत्र रटाळ ठरले. दोन्ही संघांनी गोलसाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. मध्यंतरानंतर लगेचच बायर्नच्या रॉबर्ट लेव्हानडोव्हस्कीने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले.

           76 व्या मिनिटाला रिअलतर्फे रोनाल्डोने प्रत्युत्तर देत बरोबरी केली. बायर्नने 2-1 अशी आघाडी घेतली. भरपाई वेळेत रोनाल्डोने दोन गोल करत रिअलला भक्कम आघाडी मिळवून दिली. मात्र हे दोन्ही गोल ऑफसाइड असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. पंचांनी हे गोल वैध असल्याचा निर्वाळा दिल्याने रोनाल्डोची या स्पर्धेतील गोलशंभरी पूर्ण झाली. हा विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. 112 व्या मिनिटाला मार्को असेन्ससिओने गोल करत रिअलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आट्युरो व्हिडालला दुसरे पिवळे कार्ड दाखवल्याने त्याला मैदान सोडावे लागले. 10 खेळाडूंनिशी खेळणार्‍या बायर्नचे आक्रमण यामुळे कमकुवत झाले. ‘माझ्या गौरवाप्रीत्यर्थ शहरातील रस्त्यांना माझे नाव देण्याची माझी इच्छा नाही. परंतु चाहत्यांनी माझी हुर्यो उडवू नये एवढीच अपेक्षा आहे. प्रत्येकवेळी मैदानावर उतरल्यानंतर सर्वोत्तम खेळ करत संघाच्या विजयात योगदान देण्याचा प्रयत्न करतो. गोल करू शकलो नाही तरी बाकी खेळाडूंना गोलसहाय्य करण्याची भूमिका बजावतो’, अशा शब्दांत रोनाल्डोने आपल्या भावना व्यक्त केल्या.

           अ‍ॅटलेटिको-लिस्टरची बरोबरी -

           2016 मध्ये प्रीमिअर लीग स्पर्धेच्या जेतेपदासह इतिहासात मोहर उमटवणार्‍या लिस्टर संघाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्ध 1-1 बरोबरीत समाधान मानावे लागले. सरासरीच्या बळावर अ‍ॅटलेटिकोने बाजी मारली आणि उपांत्य फेरीत स्थान पटकावले.

ज्येष्ठ लेखक, संशोधक प्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन

           ज्येष्ठ मराठी लेखक, संशोधक प्रा. रामनाथ चव्हाण यांचे सकाळी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. दलित साहित्य व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणून यांचा उल्लेख केला जात होता. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातले संशोधनात्मक लेखन असे विविध साहित्य प्रकारात आपले योगदान दिले होते. ते पुणे विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख आहेत.

           त्यांच्या या निधनाने सामाजिक लेखन क्षेत्रातील एक ताकदीचा लेखक हरपल्याची भावना साहित्य क्षेत्रामधून व्यक्त होत आहे. दलित आणि भटका विमुक्त समाज यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. भटक्या विमुक्तांची जातपंचायत, भटक्या - विमुक्तांचे अंतरंग, बिनचेहर्‍याची माणसं, गावगाडा काल आणि आज, घाणेरीची फुले, जगण्यासाठी, निळी पहाट, वेदनेच्या वाटेवरून, दलितांचा राजा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बामनवाडा, जाती आणि जमाती अशी अनेक त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

लाल दिव्यांची ऐट संपुष्टात

           देशातील अतिविशिष्ट महत्त्वाच्या व्यक्तींच्या स्तोमाचे प्रतीक मानल्या जाणार्‍या सरकारी गाड्यांवर दिमाखात मिरविणार्‍या लाल दिव्यांवर कायमची फुली मारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. केवळ लालच नव्हे, तर निळे, पांढरे, पिवळसर दिव्यांवरही बंदी घातली आहे. या निर्णयाने राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापासून ते जिल्हा पातळीवरील वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांपर्यंत सर्वांच्या गाड्यांवर 1 मे पासून कोणतेही दिवे नसतील. फक्त आपत्कालीन व मदतकार्यामध्ये सहभागी असलेल्या गाड्यांनाच निळा दिवा वापरण्याची परवानगी असेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.

           सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2013 मध्ये दिलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर लाल, निळे, पिवळे, पांढरे आदी सर्व रंगांच्या दिव्यांवर बंदी घालण्याचे घाटत होते. पण राजकीय सत्तेचे आणि व्हीव्हीआयपी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या लाल दिव्याला हात लावणे सहजासहजी शक्य नव्हते. मात्र, मागील आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाने बोलाविलेल्या बैठकीमध्ये गडकरींच्या मंत्रालयाने दोन प्रस्ताव ठेवले होते. एकतर संपूर्ण बंदी किंवा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती आणि सरन्यायाधीशांचा अपवाद करून इतरांसाठी बंदी करावयाची, असे ते दोन पर्याय होते. मंत्रिमंडळाने पहिला पर्याय स्वीकारल्याने प्रतिष्ठेचे प्रतीक वापरण्याचा अधिकार आता कोणालाही राहिलेला नाही.

           या संदर्भात मोटार वाहन कायद्याच्या कलम 108 मध्ये दुरुस्ती करण्यात येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंदीच्या नियमातून व्हीव्हीआयपींना सवलत देण्याचा अधिकार राज्य सरकारांकडून काढून घेतला आहे. त्यामुळे राज्यांच्या पातळीवरसुद्धा कोणालाही कोणत्याही प्रकारचे दिवे वापरता येणार नाहीत. या संदर्भातील अधिसूचना एक, दोन दिवसांत निघण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नियमावलीचा सविस्तर तपशील अपेक्षित आहे. लाल दिवा वापरण्यावर 1 मेपासून बंदी असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्या झाल्या गडकरींनी तातडीने आपल्या गाडीवरील लाल दिवा काढला. तसे करणारे ते पहिले मंत्री झाले. नंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तशीच घोषणा केली आणि पुण्यामध्ये असताना गाडीवरून लाल दिवा हटविला. त्यानंतर अनेक मंत्र्यांनीही गडकरींचे अनुकरण केले.

           * राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना चकाकता लाल दिवा (रेड बिकन विथ फ्लॅशर) वापरता येतो. राज्यांच्या पातळीवर राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश आदींसारख्या अतिवरिष्ठ व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना तोच दिवा असतो. त्यानंतरच्या महत्त्वाच्या व्यक्तींना नुसता लाल दिवा असतो.

           * निळा किंवा पिवळसर (अंबर कलर) दिवा प्रामुख्याने वरिष्ठ अधिकारी वापरतात. मुख्य सचिवांपासून ते उपजिल्हाधिकार्‍यांपर्यंत, पोलीस महासंचालकांपासून ते पोलीस उपअधीक्षकांपर्यंतच्या अधिकार्‍यांच्या गाड्यांवर निळा किंवा पिवळा दिवा असतो.

           * मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, आता फक्त आपत्कालीन सेवेमधील आणि मदतकार्यामध्ये सहभागी असणार्‍या वाहनांनाच निळा दिवा वापरता येईल. त्यामध्ये रुग्णवाहिका, अग्निशामक दलांपासून ते राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांना हा अधिकार असेल. शिवाय कर्तव्यावर असताना आणि आवश्यकता भासल्यास पोलीस अधिकारीही दिवा वापरू शकतील. हा ऐतिहासिक निर्णय आहे. लाल दिवे व्हीव्हीआयपी संस्कृतीचे प्रतीक बनले होते. काही ठिकाणी, काही वेळेला त्याचा गैरवापरदेखील होतो. सामान्यांना ते रुचत नव्हते. लोकशाही मजबूत करणारा हा निर्णय आहे.

           * नितीन गडकरी - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री

१९ एप्रिल २०१७

कॅनडामध्ये अवघ्या चार दिवसांत गायब झाली नदी

     कॅनडातील सर्वात मोठी ग्लेशियर्समधील एक मोठी नदी अवघ्या चार दिवसांत गायब झाली आहे. गायब झालेल्या "स्लिम्स नदी'ची रुंदी काही ठिकाणी तब्बल 150 मीटर इतकी होती. कॅनडातल्या युकून प्रांतात विशाल कास्कावुल्श ग्लेशियरपासून उत्पत्ती झालेली ही स्लिम्स नदी अनेक वर्षांपासून वाहत. मात्र गेल्या वर्षी हे ग्लेशियरजवळील बर्फ वेगाने वितळल्याने आलेलं पाणी अलेस्क या दुसऱ्याच नदीमध्ये मिसळून अलास्काच्या आखाताकडे गेले. मूळ ग्लेशियरपासून हे ठिकाण हजारो किमी दूरवर आहे. ग्लेशियरचे पाणी याआधी स्लिम व अलेस्क या नद्यांमध्ये जात. मात्र यावेळी सर्व पाणी एकाच नदीद्वारे प्रशांत महासागरात जाऊन मिळाले.

        नदी पूर्णत: कोरडी पडल्याचे आढळून आले. दिशा बदलून दुसऱ्याच मार्गाने नदीचा प्रवाह वाहू लागल्याच्या प्रकारास शास्त्रज्ञांनी "रिव्हर पायरसी' असे संबोधले आहे. भूतकाळामध्ये याआधी रिव्हर पायरसी घडल्याचे पुरावे सापडले आहेत.  मात्र रिव्हर पायरसीची ही घटना 21व्या शतकात पहिल्यांदाच घडली. 

सॅमसंग Galaxy S8, Galaxy S8+ भारतात लॉन्च

    सॅमसंग कंपनीचे बहुचर्चित गॅलक्सी एस 8 आणि गॅलक्सी एस 8 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात दाखल झाले .  

      दिल्ली येथील एका आयोजित कार्यक्रमात सॅमसंग गॅलक्सी एस 8 आणि गॅलक्सी एस 8 प्लस या स्मार्टफोनचे लॉन्चिंग करण्यात आले. सध्या या दोन्ही स्मार्टफोनची प्री-ऑर्डर फ्लिपकार्डवर ऑनलाइन करता येणार असून पाच मे नंतर भारतीय मोबाईल बाजारपेठेत दाखल होणार आहेत.
सॅमसंग गॅलक्सी एस 8 ची किंमत 57,900 रुपये आहे, तर सॅमसंग गॅलक्सी 8 प्लसची किंमत 64,900 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे या दोन्ही स्मार्टफोनची अमेरिकेपेक्षा भारतात जास्त किंमत आहे. अमेरिकेत सॅमसंग गॅलॅक्सी एस 8 ची 720 डॉलर्स (46,700 रुपये) आणि सॅमसंग गॅलक्सी 8 प्लसची 840 डॉलर्स (54,500 रुपये) इतकी आहे.
        दोन्ही स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक, कोरल ब्लू आणि मॅपल गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहेत. तसेच, या दोन्ही स्मार्टफोनमध्ये सॅमसंगने आपला Exynos 8895 प्रोसेसर लावला आहे. या प्रोसेसरमध्ये  2.35 GHz चा  क्वॉड कोअर मॉड्यूल बसविण्यात आले आहे. तसेच दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
        याचबरोवर 256 जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्ड वापरता येणार आहे. गॅलक्सी एस8 आणि एस8 प्लसमध्ये १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.  तसेच, गॅलक्सी एस-8 मध्ये 3000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर एस 8 प्लसमध्ये 3500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
         मार्च 2016 मध्ये कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सी एस 7 आणि सॅमसंग गॅलॅक्सी एस 7 एग्ज हे दोन स्मार्टफोन भारतात लॉंच केले होते. त्याला मिळालेल्या यशानंतर सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सी एस 8 आणि गॅलॅक्सी एस 8 प्लस स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले आहेत. 

काश्मीर प्रश्‍नाशी ‘सीपीईसी’चा थेट संबंध नाही

           पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार्‍या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपीईसी) काश्मीर प्रश्‍नाशी थेट संबंध नसल्याचा खुलासा चीनने केला. वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) प्रकल्पात भारताचे स्वागत आहे, असेही चीनने म्हटले आहे. सीपीईसी प्रकल्पास भारताकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर चीनने हा खुलासा करत भारताची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला.

           ओबीओआर प्रकल्पाच्या उभारणीत भारताने सहभागी होण्यास चीनची हरकत नसून, सीपीईसी प्रकल्प हा आर्थिक बाबींशी निगडित असून, त्याचा हेतू शेजारील देशांशी आर्थिक सहकार्य वाढविणे आहे. त्याचा काश्मीर सीमा प्रश्‍नाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

           या भागातील आर्थिक स्वरूपाच्या हालचालींचा सीपीईसी प्रकल्पाशी संबंध नसून, चीन-पाकिस्तान पूर्वीपासून आर्थिक स्वरूपाची मदत करत आला आहे. येथील आर्थिक हालचालींमागे शेजारील देशांचा विकास हा एकमेव हेतू असून, ओबीडीआरमध्ये सहभागी होण्यासाठी भारताला विविध पर्याय खुले असल्याचे वांग यी म्हणाले.

H1B - व्हिसाच्या नवीन कायद्यावर शिक्कामोर्तब

           अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने स्थानिक तरुणंना नोकरीत प्राधान्य देण्याच्या निर्णयावर शिक्का मोर्तब करत H1B-व्हिसाच्या अटी कठोर करणार्‍या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता हा अनेक भारतीय तरुणांना भारतात परतावे लागणार आहे. अमेरिकन सरकारने आयटी कंपनीत स्थानिकांना प्राधान्य दिले जाण्याचे आश्‍वासन पूर्ण केले. त्यामुळे कमी पगारावर काम करणार्‍या भारतीय तरुणांची हकालपट्टी होण्याच्या जास्त शक्याता आहे. ट्रम्प यांच्या ’अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत हा नियम लागू होणार आहे.

           या आधी H1B - व्हिसा लॉटरी पद्धतीने दिला जात असत, तो आता गुणवत्ता, अथवा मेरीट पद्धतीने दिला जाईल. त्यामुळे बाहेरच्या देशातून येणारी भरती कमी होईल असा देखील उद्देश आहे. ट्रम्प यांनी सही करताना सांगितले की, आम्ही कधीही इतर देशांतील नागरिकांना स्थानिक अमेरिकन कर्मचार्‍यापेक्षा जास्त प्राधान्य देणार नाही, तसेच इतर देशांतील कर्मचारी नागरिक केवळ गुणवत्ता आणि अधिक पगार या आधारावरच अमेरिकेत H1B - व्हिसा मिळवू शकतील.

राज्य शासनाचे राजकपूर आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराची घोषणा

           राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर केला आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांची निवड झाली. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणार्‍या पुरस्कारांची घोषणा केली.

           मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले, तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

           जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये व स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप 3 लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने या पुरस्कारार्थींची निवड केली.

           विक्रम गोखले -

           चेहर्‍यावरील हावभाव, डोळ्यातून व्यक्त होणार्‍या भावना आणि तितकीच प्रभावी संवादफेक यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे कलाकार म्हणजे विक्रम गोखले. सशक्त, गंभीर भूमिका साकारणारे संवेदनशील कलावंत म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. त्यांच्या रक्तातच अभिनय भिनलेला आहे. त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या महिला बालकलाकार तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि सिनेमातील एक गाजलेले नाव.

            गेली 100 वर्षे जुनी परंपरा असणार्‍या गोखले कुटुंबियांचे विक्रम गोखले हे महत्त्वाचे शिलेदार आहेत. मात्र स्वकर्तृत्वावर ठाम विश्‍वास असणार्‍या विक्रम गोखले यांनी स्वत:च्या अभिनय क्षमतेच्या जोरावर अभिनय क्षेत्रात नवी उंची गाठली आहे. मराठी, हिंदीसोबतच त्यांनी गुजराती भाषेतही काम करत आपल्यातील कलावंताला अधिक प्रगल्भ केले आहे. अभिनय क्षेत्राची तब्बल 50 वर्षे अविरत सेवा करत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा वसा जपला आहे. मिशन-11, समर 2007, हे राम, मुक्ता, हम दिल दे चुके सनम, बलवान, अग्निपथ, परवाना यासह 90 चित्रपटांच्या वर हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.

           अरुण नलावडे -

           अरुण नलावडे हे मराठी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन मालिका या तीनही माध्यमातून अतिशय सकसपणे भूमिका साकारणारे अष्टपैलू अभिनेते आहेत. नलावडे यांचा प्रवास बेस्टच्या आंतरविभागीय एकांकिका स्पर्धा, विविध लोकप्रिय एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा असा सुरु झाला आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर नलावडे यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटविली. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवत आपल्या कलेचा ठसा थेट ऑस्करच्या नामांकनापर्यंत पोहोचविला. 2003 मध्ये त्यांचा श्‍वास (2003) या चित्रपटाने मराठी चित्रपटासाठी ऑस्करचे नामांकन मिळवून दिले. वारसा, ताटवा या चित्रपटांचे दिग्दर्शन करताना त्यांनी सामाजिक विषयाला चित्रपट माध्यमातून मांडण्यास विशेष महत्त्व दिले.

           सायरा बानो -

           हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळात ज्या अभिनेत्रीने आपल्या अदाकारीने एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली त्या म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो. सायरा बानो यांनी वयाच्या 17 व्या वर्षी हिंदी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. 1961 साली त्यांनी प्रथमच शम्मी कपूर यांच्यासोबत जंगली या चित्रपटातून कारकीर्दीला प्रारंभ केला. या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटासाठी सायरा बानो यांना फिल्म फेअर अवॉर्डने सन्मानित केले होते. त्यांनंतर त्यांनी अभिनय केलेले अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. 1960 ते 1970 च्या दशकात त्यांनी एक यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांची कारर्कीद रसिकांच्या विशेष स्मरणात राहिली.

           जॅकी श्रॉफ -

           मुंबईतील तीन बत्तीसारख्या वस्तीमध्ये लहानपण घालविलेले बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा प्रवासही संघर्षाचा ठरला. आपल्या अभिनयाने रसिकांची नेहमीच दाद मिळविणारे जॅकी श्रॉफ यांचे महाविद्यालयीन शिक्षण विल्सन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात असतानाच जॅकी श्रॉफ यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. देवानंद दिग्दर्शीत स्वामी दादा (1982) या चित्रपटात खलनायक म्हणून अभिनय कारकीर्दीला प्रारंभ केला. त्यानंतर सुभाष घई निर्मित हिरो (1983) ला चित्रपटाच्या यशाने जॅकी श्रॉफ खर्‍या अर्थाने स्टार झाले.

           जॅकी श्रॉफ यांच्या वाटचालीतील तेरी मेहरबानीया, अंदर-बाहर, रिटर्न ऑफ ज्वेलथीफ, काश, राम लखन, कर्मा, रंगीला इत्यादी महत्त्वाच्या चित्रपटातून त्यांनी विविधरंगी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. चित्रपटाच्या सेटवर कर्मचारी वर्गाशी देखील मिळून मिसळून वागणे हे जॅकी श्रॉफच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य आहे. काही मराठी चित्रपटातही त्यानी भूमिका साकारलेली आहे.

           राज्य शासनाच्यावतीने यंदा 54 व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे वांद्रे रिक्लेमेशन, म्हाडा मैदान क्र. 1, वांद्रे पश्‍चिम येथे आयोजन केले आहे. या पारितोषिक वितरण सोहळ्यात या जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

१८ एप्रिल २०१७

'अॅम्बी व्हॅली' होणार लिलाव

      गुंतवणूकदारांचे देणे चुकते करण्यास सहारा उद्योगसमूहाच्या मालकीची पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील अ‍ॅम्बी व्हॅली ही मालमत्ता लिलावात विकून पैसे वसूल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

        सहाराने गुंतवणूकदारांचे 14 हजार कोटी रुपये अद्याप परत करायचे आहेत. त्यापैकी 5 हजार कोटी रुपये 17 एप्रिलपर्यंत सेबीकडे जमा न केल्यास अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव पुकारला जाईल, असे न्यायालयाने याआधी बजावले होते. सहाराने कबूल केल्याप्रमाणे पैसे जमा न केल्याने न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई व न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठाने लिलावाची कारवाई सुरु करण्याचा आदेश दिला.

       अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल लिक्विडेटर कार्यालयामार्फत करण्यात येईल. सहाराच्या वकिलांनी अ‍ॅम्बी व्हॅलीसंबंधीची सर्व आवश्यक माहिती दोन दिवसांत ऑफिशियल लिक्विडेटरना द्यावी आणि त्या कार्यालयाने 10 दिवसांत या मालमत्तेचे मूल्यांकन करून लिलावाची कारवाई कायद्यानुसार सुरू करावी, असा आदेश न्यायालयाने दिला. गेल्या फेब्रुवारीत न्यायालयाने अ‍ॅम्बी व्हॅलीवर टांचही आणली होती.

        सहारा रिअल इस्टेट आणि सहारा हाऊसिंग या सहारा समूहातील दोन कंपन्यांनी बेकायदा योजना राबवून गोळा केलेले 25 हजार कोटी रुपये व्याजासह सेबीच्या माध्यमातून परत करावे, असा आदेश न्यायालयाने ऑगस्ट 2012 मध्ये दिला होता. तरीही पैसे दिले नाहीत म्हणून न्यायालयाने सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि दोन संचालकांना तुरुंगात टाकले. अजूनही सहाराने 14 हजार कोटी रुपये द्यायचे बाकी आहेत.

       अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव होऊ नये असे वाटत असेल, तर इतर मालमत्ता विकून पैसे जमा करा, असे वारंवार सांगून आणि त्यासाठी अनेकवेळा मुदत देऊनही सहाराने रक्कम भरली नाही त्यामुळे अखेरीस अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव पुकारला. 

टीसीएसच्या भागधारकांची बायबॅक योजनेला मंजुरी

      टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) भागधारकांनी कंपनीच्या 16,000 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅक योजनेला बहुमताने मंजुरी दिली आहे. एकूण 99.81 टक्के भागधारकांनी बायबॅक प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. याआधी रिलायन्स इंडस्ट्रीजने 2012 साली अशीच मोठी बायबॅक योजना जाहीर केली होती.

       बायबॅक योजनेअंतर्गत कंपनी प्रतिशेअर 2,850 रुपयांप्रमाणे सुमारे 5.6 कोटी शेअर्सची पुन्हा खरेदी करणार आहे. यासाठी कंपनीला सुमारे 16,000 कोटी रुपयेएवढा खर्च येईल. रोख साठ्यातून बायबॅकसाठी निधी वापरला जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडे सध्या रोखीचा साठा वाढत चालला असून भागधारकांना आणि गुंतवणूकदारांना यातील काही वाटा मिळावा अशी मागणी केली जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्‍वास मजबूत होण्यास मदत होईल.

      मुंबई शेअर बाजारात सध्या कंपनीचा शेअर 2323.95 रुपयांवर व्यवहार करत असून 3.10 रुपये अर्थात 0.13 टक्क्याने वाढला आहे. सध्याच्या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 457,444.70 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

विजय मल्ल्यांना अखेर लंडनमध्ये अटक

      उद्योगपती विजय मल्ल्यांना अखेर लंडनमध्ये अटक केली आहे. विजय मल्ल्यांना स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना वेस्टमिन्स्टर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वेस्टमिन्स्टर न्यायालयाच्या आदेशानंतर ही अटकेची कारवाई केली आहे. लोन डिफॉल्ट प्रकरणात न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

     विविध बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज थकवून मल्ल्या कर्ज न भरता लंडनमध्ये गेले. त्यामुळे मल्ल्यांना फरार घोषित केले होते. त्यांना अनेकदा समन्स बजावूनदेखील ते भारतात परतण्यासाठी टाळाटाळ करत होते.

१७ एप्रिल २०१७

जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे निधन

       117 वर्षांच्या एमा मोरेनो या जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे इटलीमध्ये निधन झाले. एकोणिसाव्या शतकात जन्म झालेल्या बहुदा त्या शेवटच्या जिवंत व्यक्ती होत्या.

* एमा मोरेनो या दोन महायुद्ध, आर्थिक महामंदी, फासीवाद, 10 पोप आणि इटलीचे 90 सत्तापक्ष पाहणार्‍या त्या एकमेव व्यक्ती होत्या.

* इटलीतील एम्मा मार्टिना ल्युईगिया मोरानो या महिलेचा जन्म 29 नोव्हेंबर 1899 रोजी झाला होता. त्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सप्रमाणे सर्वात वयोवृद्ध असलेल्या व्यक्ती व महिला होत्या. वय संशोधन गटाने केलेल्या संशोधनानंतर त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये समाविष्ट केले होते.

* मोरेनो यांच्या वाग्दत्त पतीचा पहिल्या महायुद्धात मृत्यू झाला होता. त्यानंतर मोरेनो यांनी दुसर्‍या व्यक्तीशी विवाह केला. नंतर त्यांचा 1926 मध्ये दुसर्‍या व्यक्तीशी विवाह झाला, मात्र 1938 मध्ये त्यांनी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

* 19 शतकांत जन्मलेल्या एमा मोरमो तीन शतके पाहणार्‍या पहिल्या व्यक्ती असल्याचे मानले जाते.

* एमा मोरेनो यांची आईला 91 वर्षांचे आयुष्य लाभले होते, तर त्यांच्या दोन्ही बहिणीने शंभरी पार केल्यानंतर जगाचा निरोप घेतला होता.

* मोरेनो यांचे बालपण इटलीत व्हर्सेली येथे गेले. नंतर त्या लेक मॅगिओर येथील व्हर्बानियात आल्या. तेथे त्या प्रदीर्घ काळ वास्तव्यास होत्या. 90 वर्षे त्यांचा आहार सारखाच होता. त्या तीन अंडी-दोन कच्ची व एक शिजवलेले, ताजा इटालियन पास्ता व कच्चे मांस असा आहार घेत होत्या.

* मोरानो या सर्वात जास्त जगलेल्या जीन लुईस कॅलमेंट यांच्यापेक्षा 5 वर्षांनी तरुण होत्या. कॅलमेंट हे 122 वर्षे 164 दिवस जगले.

* वयोवृद्धता संशोधन गटाने केलेल्या यादीनुसार 1900 मध्ये जमेकात जन्मलेल्या व्हायोलेट ब्राऊन या आता जिवंत व्यक्तीत सर्वात वयोवृद्ध आहेत. त्यांचे वय 113 वर्षे 37 दिवस आहे.

2 रुपयांत भागणार तहान

       कडक उन्हामुळे रेल्वे स्थानकावर पाण्याची मागणी वाढली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात आता इंडियन रेल्वे कॅण्टीन अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) 5 वॉटर व्हेण्डिंग मशीन बसवणार आहे. यातून 2 रुपयांपासून 8 रुपयांपर्यंत पाणी विकत घेता येणार आहे. आठवडाभरात या मशीन स्थानकात बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे 24 तास ‘आरओ’ आणि यूव्ही फिल्टर केलेले शुद्ध पाणी प्रवाशांना मिळणार आहे.

       मध्य रेल्वेच्या फलाटांवर पाणपोईचा पर्याय होता. अनेक पाणपोईंकडे रेल्वेने दुर्लक्ष केल्यामुळे त्या बंदच असतात. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे उपाहारगृहातून बाटलीबंद पाण्याची खरेदी करावी लागते. हे बाटलीबंद पाणी सुमारे 10 ते 15 रुपयांपर्यंत मिळते. रेल्वेच्या फलाटांवर केवळ रेल्वे नीर मिळते. त्याचीही किंमत एवढीच असते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भुर्दंड सहन करावा लागत होता. या प्लास्टिकच्या बाटलीमुळे स्थानक परिसरात प्लास्टिक कचरा होत होता. हे टाळण्यासाठी रेल्वे प्रवाशांना सेवा देण्यासाठी आरआयसीटीसीद्वारे मध्य रेल्वेच्या स्थानकात या सुविधेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. यासाठी लागणार्‍या 5 मशीन ठाणे स्थानकात दाखल झाल्या आहेत. त्यांच्या जोडणीचे काम सुरू आहे. आठवडाभरात या मशीन सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

काय आहे वॉटर व्हेण्डिंग मशीन?

दिवसभर अल्प दरात या मशीन शुद्ध पाण्याचा पुरवठा करतील. त्यातून 2 रुपयांना ग्लासभर पाणी, 5 रुपयांत बाटलीभर पाणी घेता येणार आहे. 8 रुपयांना बाटलीमधून पाण्याचे वितरण केले जाणार आहे. प्रत्येक फलाटावर एक मशीन बसवण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या फलाटावरील प्रवाशांना त्याचा लाभ घेता येणार आहे. एकूण पाच मशीन बसवण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. यापूर्वी पश्‍चिम रेल्वेवर अशा मशीन बसवल्या आहेत. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात पहिल्यांदा याची जोडणी केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्यावतीने देण्यात येणार आहे.

१६ एप्रिल २०१७

जलयुक्त शिवार अभियान

       राज्य शासनाने दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी राबवलेली महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानात सोलापूर जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला. राज्य शासनाने जलयुक्त शिवारमध्ये सर्वोत्तम योगदान देणार्‍या जिल्हे, तालुके, संस्था व अधिकारी यांच्यासाठीचे पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कारांमध्ये सोलापूरसह पुणे व अहमदनगर या जिल्ह्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या पुरस्कारांच्या विजेत्यांच्या नावांची निवड केली.

जलयुक्त शिवार पुरस्कार

* गाव -

       प्रथम : मळेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर

       द्वितीय : वेळू, ता. कोरेगाव, जि. सातारा

       तृतीय : कर्जत, ता. कर्जत, जि. अहमदनगर

* तालुके -

       प्रथम : ता. पुरंदर, जि. पुणे

       द्वितीय : ता. कोरेगाव, जि. सातारा

       तृतीय : ता. चांदवड, जि. नाशिक

* जिल्हे -

       प्रथम : जि. सोलापूर

       द्वितीय : पुणे

       तृतीय : अहमदनगर

भारत-पाकमध्ये तणाव कायम, व्यापार मात्र सुधारतोय

       भारत-पाकिस्तान या दोन शेजारी देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांची सावली अद्याप दोन्ही देशांतील आर्थिक व्यवहारांवर पडलेली नाही. पाकिस्तान स्टेट बँकेच्या नव्या अहवालातून दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे सूचित होत आहे.

       पाकिस्तानमध्ये जुलै ते जून असे आर्थिक वर्ष असते. पाकिस्तान स्टेट बँकेच्या या अहवालानुसार, पाकिस्तानी आर्थिक वर्षातील पहिल्या 8 महिन्यांमध्ये म्हणजेच जुलै ते फेब्रुवारीदरम्यान पाकिस्तानमधून भारतात होणारी निर्यात 14 टक्क्यांनी वाढली आहे. याच काळात भारताने पाकिस्तानकडून 286 दशलक्ष डॉलरची आयात केली आहे. याउलट, पाकिस्तानची भारताकडून होणारी आयात 23 टक्क्यांनी कमी झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत पाकिस्तानने भारताकडून 958.3 दशलक्ष डॉलरची आयात केली. 

         अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिकेतून पाकिस्तानी सिमेंटची मागणी कमी झाली आहे. मात्र, भारतात सिमेंटच्या वाढत्या मागणीमुळे हा नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी झाला आहे. भारतीय बाजारपेठेत पाकिस्तानी उत्पादकांना जम बसविण्यात अपयश आले आहे. त्यामुळे हा आर्थिक व्यापार भारतासाठी अधिक फायदेशीर ठरत आहे.

         जुलै ते फेब्रुवारीदरम्यान पाकिस्तानची व्यापारी तूट 672 दशलक्ष डॉलरएवढी झाली आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षात हे प्रमाण 993 दशलक्ष डॉलरएवढे होते. याआधीच्या आर्थिक वर्षात (2015-16) पाकिस्तानने निर्यातीच्या तुलनेत भारताकडून चौपट आयात केली आहे.

        2016 मध्ये राजकीय वातावरणात कडवटपणा असतानाही भारतातून पाकिस्तानमध्ये सर्वाधिक निर्यात झाली. या काळात पाकिस्तानने भारताकडून 1.8 अब्ज डॉलरची आयात केली तर 440 दशलक्ष डॉलरची निर्यात केली.

१५ एप्रिल २०१७

हरमित सिंग ठरला ‘मुंबई श्री’

        चुरशीच्या लढतीत आकर्षक शरीरयष्टीचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना हरमित सिंगने ‘मुंबई श्री 2017’ किताब पटकावला. तसेच, बेस्ट पोझरसाठी अमित सिंग आणि बेस्ट इम्प्रुव्ह बॉडी पुरस्कारासाठी विराज सरमळकरची निवड झाली. मुंबई जिल्हा बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने अंधेरीत झालेल्या स्पर्धेचे क्रांती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजन केले होते.

        या स्पर्धेत 100 शरीरसौष्ठपटूंनी सहभाग घेतला. यामध्ये बॉडीफ्लेक्स संघाच्या खेळाडूंनी एकहाती वर्चस्व राखले. 55 किलो गटात नितीन देहरीकर (गोल्ड जिम), 60 किलो गटात सचिन कासले (बॉडीफ्लेक्स), 65 किलो गटात जगेश दैत (जे. डी. फिटनेस), 70 किलो गटात अमित सिंग (बॉडीफ्लेक्स), 75 किलो गटात वाहीद बांबूवाला (बॉडीफ्लेक्स) यांनी बाजी मारली.

ईपीएफओ सदस्यांना मिळणार 50 हजारांचा लाभ

        सलग 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणार्‍या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी 50 हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे. याशिवाय एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची किमान रक्कम उपलब्ध करून दिली जाणार. ईपीएफओच्या संचालक मंडळाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या सदस्यांनाही या सुविधेचा लाभ मिळेल. अपंगत्व आलेल्या सदस्याचे योगदान 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीचे असले तरी ‘लॉयल्टी-कम-लाइफ’चा लाभ त्याला दिला जाईल.

        * पीएफवर यंदा 8.65 टक्के व्याज

        * कर्मचारी भविष्य निधीचे (प्रॉव्हिडंट फंड) सदस्य असलेल्या 4 कोटींहून अधिक नोकरदारांना त्यांच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर वर्ष 2016-17 साठी 8.65 टक्के दराने व्याज मिळेल.

        * ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्‍वस्त मंडळाने डिसेंबर 2016 मध्ये याच दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला होता व त्यास सरकारची मंजुरी मिळणे बाकी होते.

        * हा व्याजदर अर्धा टक्क्याने कमी करण्याचा आग्रह वित्त मंत्रालयाने धरल्याच्या बातम्या आल्याने व्याजदराविषयी साशंकता होती. परंतु श्रममंत्र्यांच्या वक्तव्याने आता ती दूर झाली आहे.

        * ईपीएफओची धोरणे ठरविणार्‍या केंद्रीय विश्‍वस्त मंडळाने (सीबीटी) यासंबंधीच्या शिफारशी केल्या आहेत. विश्‍वस्त मंडळाची महत्त्वाची बैठक झाली.

        * या बैठकीत कर्मचार्‍यांच्या जमा रकमेशी संबंधित विमा योजनेत (ईडीएलआय) सुधारणा करण्याची शिफारस केली. या सुधारणेनुसार कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास अडीच लाखांचा लाभ देण्याची तरतूद केली आहे.

        * केंद्रीय श्रममंत्री - बंडारु दत्तात्रेय

शनि ग्रहाच्या चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता

        इन्सेलॅड्स या शनि या ग्रहाच्या एका चंद्रावर जीवसृष्टीस पूरक असलेल्या रासायनिक उर्जेची लक्षणे दिसून आल्याचे निरीक्षण अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या ’नासा’ने नोंदविले आहे. या चंद्रावरील हिमाच्छादित सागरीपृष्ठामध्ये पाणी अतितप्त होऊन घडणार्‍या वैज्ञानिक प्रक्रियेमुळे (हायड्रोथर्मल) हायड्रोजन वायू मिसळला जात आहे. पाण्यात मिसळलेला कर्बवायू व या हायड्रोजन वायूचा एकत्रित वापर करून सूक्ष्म जीवांना अन्ननिर्मिती करणे शक्य असल्याचे नासाने म्हटले आहे.

        पाणी, उर्जेचा स्त्रोत व कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस व सल्फर या जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांची उपस्थिती इन्सेलॅड्सवर असण्याची दाट शक्यता आहे. या चंद्रावर पाणी व हायड्रोजन (उर्जास्त्रोत) असल्याचा पुरावा आहे, याशिवाय इन्सेलॅड्सवर उर्वरित घटकही असण्याचा अंदाज शास्त्रज्ञांकडून वर्तविला आहे. शनिच्या एका छोट्या चंद्रावर रासायनिक उर्जेचे आढळलेले अस्तित्व हे अवकाशामध्ये पृथ्वीपलीकडील वसतियोग्य ठिकाणांचा शोध घेण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील एक मोठे यश आहे. असे नासाच्या ’जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी’मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ लिंडा स्पालकर यांनी म्हटले. कॅसिनी या नासाच्या अवकाशयानाने यासंदर्भातील पहिला पुरावा मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे यान नासाने ऑक्टोबर 2015 मध्ये अवकाशामध्ये पाठविले होते.

         इन्सेलॅड्स या चंद्राचे सूर्यापासूनचे अंतर तब्बल 88.7 कोटी मैल इतके आहे. किंबहुना, या प्रचंड अंतरामुळे येथे जीवसृष्टीची असलेली शक्यता अधिक महत्त्वपूर्ण व सुखद मानली जात आहे. इन्सेलॅड्स हा शनि ग्रहाचा सहावा सर्वांत मोठा चंद्र आहे. ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्शेल यांनी 1789 मध्ये या चंद्राचा शोध लावला होता. या चंद्राचा व्यास सुमारे 310 मैल इतका असून पृथ्वीपासून तो सुमारे 79 कोटी मैल अंतरावर आहे.

        या चंद्रावर द्रवावस्थेताल पाणी असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्यानंतर 2005 मध्ये यासंदर्भात संशोधन करण्यासाठी कॅसिनीने पृथ्वीवरुन उड्डाण केले होते. तेव्हापासून या यानाकडून पाठविण्यात आलेल्या माहितीचा शास्त्रज्ञांकडून अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासामधून जीवसृष्टीस पूरक ठरणारे वातावरण या चंद्रावर असल्याचा कालेला निष्कर्ष शास्त्रज्ञांसाठी अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे मानले जात आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्ध सॅम्युअल बद्रीची हॅट्ट्रिक

       विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलर्स असे धडाकेबाज फलंदाज असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाला अवघ्या 142 धावांमध्ये रोखण्यात यशस्वी झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला सॅम्युअल बद्रीने सुरवातीलाच धक्के दिले. मुंबईच्या डावातील दुसर्‍याच षटकात सॅम्युअल बद्रीने पार्थिव पटेल, मिशेल मॅक्लनघेन आणि रोहित शर्मा या तिघांना बाद करत हॅटट्रिक केली.

        ही यंदाच्या आयपीएलमधील पहिलीच हॅटट्रिक आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा बद्री हा दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी 2009 मध्ये तत्कालीन डेक्कन चार्जर्सच्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या अभिषेक नायर-हरभजनसिंग आणि जेपी ड्युमिनी या तिघांना लागोपाठ बाद केले होते.

         तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारले. खांद्याच्या दुखापतीमुळे सुरवातीचे काही सामने संघाबाहेर राहावे लागलेल्या विराट कोहलीचे या सामन्यात्र्रे पुनरागमन झाले. कोहलीच्या अनुपस्थितीत रॉयल चॅलेंजर्सचे नेतृत्व केलेल्या शेन वॉटसनला आजच्या सामन्यासाठी वगळण्यात आले.

        कोहली व गेल या सलामीवीरांनी संयमी सुरवात केली. लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीतही मुंबईच्या गोलंदाजांनी बंगळूरच्या फलंदाजांना रोखून धरले. हरभजनसिंगने चार षटकांत केवळ 23 धावा देत बंगळूरच्या फलंदाजांवरील दडपण वाढविले. संथ व संयमी खेळत कोहलीने अर्धशतक झळकावित आपले पुनरागमन साजरे केले. पण त्याचा अपवाद वगळला, तर बंगळूरच्या इतर फलंदाजांना फटकेबाजी करताच आली नाही. बंगळूरच्या डावात चार षटकार आणि सातच चौकार मारण्यात त्यांच्या फलंदाजांना यश आले.

भारत-पाकमध्ये तणाव कायम, व्यापार मात्र सुधारतोय

        2016 मध्ये राजकीय वातावरणात कडवटपणा असतानाही भारतातून पाकिस्तानमध्ये सर्वाधिक निर्यात झाली. या काळात पाकिस्तानने भारताकडून 1.8 अब्ज डॉलरची आयात केली तर 440 दशलक्ष डॉलरची निर्यात केली.

       भारत-पाकिस्तान या दोन शेजारी देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांची सावली अद्याप दोन्ही देशांतील आर्थिक व्यवहारांवर पडलेली नाही. पाकिस्तान स्टेट बँकेच्या नव्या अहवालातून दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे सूचित होत आहे. या संदर्भात ’डॉन’ या पाकिस्तानमधील वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली आहे.

        पाकिस्तानमध्ये जुलै ते जून असे आर्थिक वर्ष असते. पाकिस्तान स्टेट बँकेच्या या अहवालानुसार, पाकिस्तानी आर्थिक वर्षातील पहिल्या 8 महिन्यांमध्ये म्हणजेच जुलै ते फेब्रुवारीदरम्यान पाकिस्तानमधून भारतात होणारी निर्यात 14 टक्क्यांनी वाढली आहे. याच काळात भारताने पाकिस्तानकडून 286 दशलक्ष डॉलरची आयात केली आहे. याउलट, पाकिस्तानची भारताकडून होणारी आयात 23 टक्क्यांनी कमी झाली आहे. फेब्रुवारीपर्यंत पाकिस्तानने भारताकडून 958.3 दशलक्ष डॉलरची आयात केली. 

        अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेतून पाकिस्तानी सिमेंटची मागणी कमी झाली. मात्र, भारतात सिमेंटच्या वाढत्या मागणीमुळे हा नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी झाला आहे. भारतीय बाजारपेठेत पाकिस्तानी उत्पादकांना जम बसविण्यात अपयश आले आहे. त्यामुळे हा आर्थिक व्यापार भारतासाठी अधिक फायदेशीर ठरत आहे. जुलै ते फेब्रुवारीदरम्यान पाकिस्तानची व्यापारी तूट 672 दशलक्ष डॉलरएवढी झाली. त्या आधीच्या आर्थिक वर्षात हे प्रमाण 993 दशलक्ष डॉलरएवढे होते.

         याआधीच्या आर्थिक वर्षात (2015-16) पाकिस्तानने निर्यातीच्या तुलनेत भारताकडून चौपट आयात केली आहे.

         2016 मध्ये राजकीय वातावरणात कडवटपणा असतानाही भारतातून पाकिस्तानमध्ये सर्वाधिक निर्यात झाली. या काळात पाकिस्तानने भारताकडून 1.8 अब्ज डॉलरची आयात केली तर 440 दशलक्ष डॉलरची निर्यात केली.

नित्य नवा दर इंधनाचा

      भारतातील स्वयंचलित दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर ही बाब कोणत्याही सरकारच्यादृष्टीने अत्यंत नाजूक असायची, ती त्यामुळेच. पूर्वी हे दर सरकारनियंत्रित असत.

      त्यामुळेच या दरांविषयी कोणताही निर्णय घेताना सरकारला दहावेळा विचार करावा लागत असे. विरोधी पक्ष, संघटनाही त्यातले अर्थकारण समजून न घेता, त्याविषयी आंदोलनांचा पवित्रा घेत. भारतीय जनता पक्षही त्याला अपवाद नव्हता. परंतु, देशाने सरकारनियंत्रित दरपद्धतीकडून खुल्या दरपद्धतीकडे वाटचाल सुरू केल्यानंतर ही परिस्थिती बदलत गेली.

       भारतातील स्वयंचलित दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर ही बाब कोणत्याही सरकारच्या दृष्टीने अत्यंत नाजूक असायची, ती त्यामुळेच. पूर्वी हे दर सरकारनियंत्रित असत.

       त्यामुळेच या दरांविषयी कोणताही निर्णय घेताना सरकारला दहावेळा विचार करावा लागत असे. विरोधी पक्ष, संघटनाही त्यातले अर्थकारण समजून न घेता, त्याविषयी आंदोलनांचा पवित्रा घेत. भारतीय जनता पक्षही त्याला अपवाद नव्हता. परंतु, देशाने सरकारनियंत्रित दरपद्धतीकडून खुल्या दरपद्धतीकडे वाटचाल सुरू केल्यानंतर ही परिस्थिती बदलत गेली.

      आपल्याकडे एकूण खनिज तेलापैकी सत्तर टक्के तेलाचा पुरवठा हा आयातीतून होतो. त्यामुळे कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारात जे भाव असतील, त्यानुसार दर कमी-जास्त होतात.

      आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव वाढले तरी ते कृत्रिमरीत्या खाली ठेवून सरकार अंशदान (सबसिडी) देत असे. सरकारवरील हा बोजा दिवसेंदिवस वाढत गेला आणि त्याचे दुष्परिणामही समोर आले. आर्थिक सुधारणांच्या वाटचालीत टप्प्याटप्प्याने हे चित्र बदलत गेले. जानेवारी 2013 पासून दर पंधरा दिवसांनी आढावा घेऊन दर निश्‍चित केले जात आहेत. परंतु, तरीही दरातील बदलाचा आधीच अंदाज घेऊन फायदा उकळण्याचे प्रकार थांबले आहेत, असे म्हणते येत नाही. म्हणजे भाव वाढण्याची शक्यता असल्यास त्या तारखेआधी डीलरमंडळी इंधन उचलण्यासाठी घाई करीत आणि कमी होणार असे वाटले बरोबर त्या उलट त्यांचे वर्तन असे. यात ग्राहकांचे नुकसान होत होते. म्हणून दरांचा आढावा घेण्याचा पंधरा दिवसांचा हा कालावधी एक दिवसावर आणून रोजच्या रोज या इंधनांचे भाव निश्‍चित व्हावेत, असे ठरविण्यात येत आहे. सुरवातीला देशातील 5 शहरांत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात येईल.

       ग्राहकांचा प्रतिसाद आजमावून या पथदर्शक योजनेची सार्वत्रिक अंमलबजावणी होणार आहे. या दररचनेत जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल, हे पाहिले पाहिजे. त्यादृष्टीने लोकांनी दरनिश्‍चितीची पद्धत आणि त्यामागचे अर्थकारण समजावून घ्यायला हवे. अर्थसाक्षरता ही आजच्या काळातील एक निकडीची बाब असून त्यातूनच ग्राहक आपल्या हक्कांविषयी अधिक सजग होऊ शकतील.

फंड मालमत्तेत 42 टक्क्यांनी वाढ

        म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे मार्च 2017 अखेर 17.5 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचली आहे. खासकरून किरकोळ गुंतवणूकदारांचा ओढा वाढल्याने म्युच्युअल फंडात यंदा लक्षणीय वाढ नोंदली. 2016 मध्ये याच काळात ही मालमत्ता 12.3 लाख कोटी रुपयांच्या घरात होती. वर्षभरात त्यात तब्बल 42 टक्क्यांची वाढ झाली.

        मार्च तिमाहीमध्ये तिमाही आधारावर म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत 8 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती आयसीआरएने असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (ऍम्फी) एकत्रित केलेल्या आकडेवारीचा हवाला देत दिली आहे. आयसीआरएने दिलेल्या माहितीनुसार, लिक्विड, उत्पन्न आणि इक्विटी योजनांमध्ये (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम किंवा ईएलएसएस) अनुक्रमे रु.1.2 लाख कोटी, 96 हजार कोटी आणि 70 हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक झाली आहे.

       इक्विटी लिंक्ड योजनेत (ईएलएसएस) फेब्रुवारी महिन्यात 6,462 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, तर मार्च महिन्यात मात्र 8,216 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. याचबरोबर समभाग, समभाग संलग्न बचत योजनांमधील म्हणजेच इक्विटी लिंक्ड योजनेतील मालमत्ता विक्रमी 5.4 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली.

        सध्या देशात 41 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. त्यामध्ये कंपन्यांच्या मालमत्तेत वाढ नोंदवण्यात आली आहे, मात्र महिंद्रा म्युच्युअल फंडच्या मालमत्तेत घट झाली आहे, तर जेपी मॉर्गन म्युच्युअल फंड कंपनी या व्यवसायातून बाहेर पडली आहे. म्युच्युअल फंड घराण्यांमध्ये सर्वाधिक मालमत्तेसह आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल आघाडीवर कायम आहे. कंपनीची फंड मालमत्ता 2 लाख 42 हजार कोटींवर पोचली आहे, तर एचडीएफसी दुसर्‍या स्थानावर असून तिची मालमत्ता 2 लाख 37 हजार कोटी आहे. यापाठोपाठ रिलायन्स 2 लाख 10 हजार कोटी, बिर्ला सन लाईफ 1 लाख 95 हजार कोटी आणि त्यानंतर एसबीआय 1 लाख 57 हजार कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे.

भीम अॅप शिकवा, पैसे कमवा, मोदींची ऑफर

      कमी कॅश हे तत्त्व म्हणजे भ्रष्टाचारावर लागणारा रोख आहे. आज याच भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आणि कमी कॅश हे तत्व प्रत्येक भारतीयाच्या जीवनात रुजविण्यासाठी आम्ही लढाई सुरू केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला या लढाईत सक्रीय करण्यासाठी देशातील तरुणाईने या लढाईतील सैनिक बनावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात केले.

       पंतप्रधानांनी मांडलेल्या डीजी धन या योजनेंतर्गत भीम अ‍ॅप आणि भीम आधार या योजनांचा शुभारंभ आज मोदी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीचे औचित्य साधून नागपूरच्या मानकापूर इंडोअर स्टेडियममध्ये आयोजित एका भरगच्च कार्यक्रमात केला त्यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते.

       यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, हंसराज अहीर, महाराष्ट्र मंत्रीमंडळातील मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, नागपुरच्या महापौर नंदा जिचकार, खा. कृपाल तुमाने प्रभृती मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधानांनी केले 'BHIM Aadhaar Pay' लॉन्‍च

      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये डिजिटल ट्रॅन्जॅक्शनसाठी विशेष पेमेंट सिस्टिम लॉन्च केले. ही बायोमेट्रिक बेस्ड पेमेंट सिस्टिमवर आधारीत आहे. व्यापार्‍यांसाठी या सिस्टिीममुळे खरेदी सोपी होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने भीम आधार पे सेवा सुरु केली आहे. 

       स्मार्टफोन, इंटरनेट, डेबिट किंवा क्रेटिड कार्ड नसतानादेखील भीम आधार पे त्र्रे डिजिटल ट्रान्जॅक्शन करता येणार आहे.

       या योजनेत 27 बँका सहभागी झाल्या आहेत. याशिवाय 3 लाख व्यापारीही याच्याशी जोडलेले आहेत.

भीम आधार पे काय आहे -

      आधार पे व्यापार्‍यांसाठी तयार करण्यात आलेला आधार इनेबल पेमेंट सिस्टिम आहे. ज्यांच्याकडे डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट आणि मोबाईल फोन नाही, त्यांच्यासाठी ही सिस्टम तयार केली आहे.

आधार पे केवळ व्यापार्‍यांकडे असेल -

     आधार पे असे एक प आहे, ते केवळ व्यापार्यांकडे असणार आहे. यूजर्सना केवळ आपला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक आपल्या बँक अकाऊंट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी लिंक करावयाचे आहे. 

      भीम आधार पे प्ले स्टोअरच्या माध्यमातून डाऊनलोड करुन घेता येईल. यानंतर व्यापार्‍यांना आपल्या कस्टमरकडून ऑनलाईन पेमेंट करता येईल.

       यानंतर आपल्या बोटांची ठसे (फिंगरप्रिंट) आणि आधार कार्ड त्र्रे यामध्ये रजिस्टर करावे लागेल.

       कस्टमर्सच्या बँक अकाऊंटमधून पैसे थेट संबंधित व्यापार्याच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होतील. यासाठी कस्टमरकडे आधार क्रमांक मागितला जाईल. 

कस्टमर्सना फायदा होणार -

     कस्टमर्सना आधार पेच्या माध्यमातूत पेमेंट करण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डची गरज पडत नाही. रिपोर्ट्सनुसार, या पसाठी इंटरनेटची असण्याची आवश्यकता नाही.

मतदार यंत्र (इव्हीएम)

      गेल्या काही कालावधीपासून मतदार यंत्र (इव्हीएम) सदोष असून, त्यात फेरफाराचे होेत असलेले आरोप, राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या विश्‍वासार्हतेवर उपस्थित केलेले प्रश्‍नचिन्ह या पार्श्‍वभूमीवर  मतदान यंत्रे ही खरचं पूर्णपणे सुरक्षित आहेत का? अशी विचारणा सुप्रिम कोर्टाने केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाकडे केली.

       मतदारयंत्रात होणारा फेरफार रोखण्यासाठी व्हीव्हीपीएटी मशीन जोडणे अनिवार्य करण्यात यावे, अशा मागणीची याचिका बहुजन समाज पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती जे. चेलामेश्‍वर यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला 8 मे पर्यंत  म्हणणे मांडण्याचे आदेश दिले.

       उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर बसप ने मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा गंभीर आरोप करत इव्हीएमच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर बसपने इव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. दरम्यान, बसपच्या या न्यायालयीन लढाईला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचाही पाठिंबा मिळत आहे.

      इव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात याआधीही याचिका दाखल झाल्या. 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इव्हीएम अधिकाधिक विश्‍वासार्ह बनवण्यासाठी त्यांना व्हीव्हीपीएटी मशीन बसवण्याचे निर्देश दिले होते. व्हीव्हीपीएटी मशीन इव्हीएमला जोडल्यामुळे मतदारांना आपण दिलेले मत योग्य उमेदवाराच्या खात्यात जमा झाले आहे की नाही, याची खात्री करणे शक्य होते. दरम्यान, सध्या निवडणूक आयोगाकडून प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर सुरू आहे.

जवानांची कमतरता चिंताजनक

      भारतीय लष्करातील अनेक कॅम्पच्या सुरक्षिततेसाठी किमान 18 हजार जवानांची तातडीने आवश्यकता आहे. सैन्याची 370 प्लाटून्स स्थापन करण्याची मागणी संरक्षण मंत्रालयाच्या डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (डीएससी)ने केली.

       देशातील अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या व्यवस्थापनांसह सैन्याचे कॅम्प सुरक्षित राहावे यासाठी विशेष प्रशिक्षित केलेल्या जवानांची गरज आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण विभागाच्या वतीने माजी उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल फिलिप कँपोस यांच्यासह अनेक लष्कर अधिकारांच्या अधिपत्याखाली एक विशेष समिती बनवण्यात आली होती. त्या समितीने ही महत्त्वाची शिफारस केंद्राला दिलेल्या अहवालात केली आहे. या शिफारसीनुसार भारतीय लष्कराला सद्य:स्थितीत सुमारे 18 हजार सैनिकांची तातडीने गरज आहे. या समितीने केलेल्या पाहणीनुसार आणि काढलेल्या निष्कर्षानुसार देशभरातील संवेदनशील सीमाप्रांतात संरक्षणाकरिता तैनात असणार्‍या सैनिकांची संख्या तुलनात्मक कमी आहे, शिवाय नव्याने सेवेत समाविष्ट करण्यात येणार्‍या सैनिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण, एके 47, असॉल्ट रायफल्स, लाईट मशीन गॅस आदी शस्त्रास्त्रे वापरण्याची हातोटी असणार्‍या, तसेच तांत्रिक ज्ञान असणार्‍या सैनिकांची नियुक्ती तीन विविध प्लॉटून्सत्र्रे करावी, अशी मागणी यात नोंदवण्यात आली.

          पठाणकोट हल्ल्यानंतर गतवर्षी देशभरातील महत्त्वाच्या सुरक्षा केंद्रांवर या समितीच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी देशाच्या सुरक्षा यंत्रणेचे एकप्रकारे ऑडिट करण्यात आले होते. या पाहणीत देशभरातल्या अनेक ठिकाणी अपुरी सुरक्षा व्यवस्था असल्याचे समोर आले होते. गतवर्षी मे महिन्यात या समितीने हा अहवाल सुरक्षा विभागाकडे सोपवला असून या धर्तीवर विचारविनिमय केला होता, मात्र उरी आणि नगरगोटा हल्ल्यानंतरही सरकारच्या विशेष समितीने यावर कोणतीही उपाययोजना अद्याप केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानने कथित हेरगिरीप्रकरणी कुलभूषण जाधव यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर पुन्हा एकदा भारताची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था तसेच तसेच सीमे पलीकडील सुरक्षा यंत्रणा आणि त्यातील त्रुटी पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आल्या आहेत. संरक्षण मंत्रीपदावरून गोव्यात मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांची रवानगी झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सध्या अर्थमंत्री अरुण जेटली सांभाळत आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय पाहणीनुसार पाकिस्तान, चीन, इसिस यांच्याबरोबरीनेच आता अमेरिकेकडूनही भारताची हेरगिरी सुरू आहे.

       दुसरीकडे जगाच्या एका भागात सध्या कट्टरवाद्यांचे घमासान युद्ध सुरू आहे. सीरियाच्या लष्करी छावण्यांवर झालेले अ‍ॅेसिड हल्ले आणि त्यानंतर अमेरिकेने दिलेले प्रत्युत्तर, उत्तर कोरियाने केलेली जगातील सर्वात मोठी अणुबॉम्ब सिद्धता, या सर्वच पातळीवर भारताकडे स्वतंत्र संरक्षणमंत्र्यांची उणीव भासते आहे आणि हे अत्यंत धोकादायक आहे. वास्तविक पर्रिकर यांना मायभूमीत परत पाठविण्याचा निर्णय झाला तेव्हाच संरक्षणमंत्र्यांची स्वतंत्र जबाबदारी एका सुजाण नेत्याकडे द्यायला हवी होती. कँपोस समितीच्या शिफारशींचा आणि त्यांनी सूचित केलेल्या धोक्याचा तातडीने विचार व्हायला हवा. भारतात घुसखोरी करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशाला सर्वात पाहिल्यांदा याच सुरक्षेचा विचार करावा लागणार आहे. याशिवाय बेस कॅम्प सुरक्षा, टेहळणी यासोबतच जवानांकरिता देण्यात येणार्‍या अत्याधुनिक शस्त्रात्रांची, बुलेट प्रूफ जॅकेट्स, वाहन, नाईट व्हिजन डिवाइस आदी सुविधांपासून अद्यापही भारतीय जवान वंचित आहेत.

       दुसरीकडे जवानांमधील ताणतणाव, वरिष्ठांकडून होणारी मानसिक घुसमट, त्यातून येणारे नैराश्य या सर्व बाबींवर कृतिपूर्ण कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता असताना अद्यापही भारताला पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळत नाही, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल. पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबता थांबत नाहीत. भारतावर छुपे वार करण्याची एकही संधी पाकडे सोडत नाहीत. कधी चंदू चव्हाण, तर कधी कुलभूषण जाधव, अशाप्रकारे पाकने थेट महाराष्ट्राच्या अस्मितेलाच हात घातला आहे. असे असताना सत्ताधारी नेते गप्प कसे काय बसू शकतात? कुलभूषण जाधवांचा विचार केला तर पूर्णवेळ संरक्षणमंत्री हे देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आणि पद नाही का? कुलभूषण जाधव यांना कोणत्याही परिस्थितीत वाचविले जाईल, असे आश्‍वासन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. पाकिस्तानने जाधव यांच्याबाबत आततायीपणा केला तर परस्पर संबंधांवर विपरित परिणाम होण्याचा इशाराही स्वराज यांनी पाकिस्तानला दिला आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतावरच डोळे उगारताना आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याची वल्गनाही त्यांनी केली आहे. त्याचवेळी काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मुस्तफा कमाल यांनी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून एकप्रकारचा देशद्रोह केला आहे.

        देशाच्या सुरक्षेसमोर आव्हान ठरणा-या या घटना गतीने घडत असताना आपल्याकडे पूर्णवेळ संरक्षणमंत्री नसणे ही बाब अत्यंत खेदाची आहे. मध्यंतरी पर्रिकर यांची रवानगी गोव्याला झाल्यानंतर रिक्त झालेल्या संरक्षण मंत्रीपदाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा झाल्याचे सांगण्यात येते. मात्र तूर्त महाराष्ट्र सोडण्याची त्यांची तयारी नसल्याने संरक्षण मंत्रीपद अद्याप रिकामे आहे. पूर्णवेळ संरक्षणमंत्री नसणे, कुलभूषण जाधव प्रकरण, लष्कराकडील अपुरे जवान, पाकिस्तान, चीनच्या धमक्या, सीमे पलीकडून होणारी घुसखोरी अशा विविध कारणांमुळे देशाच्या सुरक्षिततेविषयी शंका निर्माण होत आहेत. आताच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेशिवाय कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही. त्याला पर्याय असू शकत नाही, असे सत्ताधा-यांनी वारंवार सांगितले आहे. असे असताना सर्व बाजूंनी देशावर होणारे अतिरेकी, परकीय राजकीय हल्ले पाहता पंतप्रधानांनी तातडीने पूर्णवेळ संरक्षणमंत्री नेमावे हेच बरे. सुरक्षेत कुठलीही उणीव राहणार नाही याची पूर्ण काळजी घेण्याची अत्यंतिक आवश्यकता आहेच, पण लष्कराला आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. ती देशाची गरज आणि सुरक्षा आहे.

श्रीनगर पोटनिवडणुकीत फारुख अब्दुल्ला विजयी

      लोकसभेसाठी श्रीनगर मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत नॅशनल काँफरंसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला विजयी ठरले आहेत. पीडीपीचे उमेदवार नाजीर अहमद खान यांचा त्यांनी पराभव केला. अब्दुल्ला दहा हजार मताधिक्याने निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यातील पीडीपी भाजप सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

       या निवडणुकीत केवळ साडे सात टक्के मतदान झाले होते. तर काही ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले होते. 9  आणि 13 एप्रिल या दिवशी या मतदान झाले होते. 9 एप्रिलला झालेल्या हिंसाचारामुळे काही ठिकाणी पुन्हा मतदान करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. काश्मीरमधील बुडगाम या भागात मतदानादरम्यान सर्वाधिक हिंसाचार झाला होता.

      13 एप्रिल रोजी काही ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले होते. या दिवशी खूप कमी मतदान झाले होते. 34,169 अधिकृत मतदात्यांपैकी केवळ 344 मतदारांना दुपारपर्यंत हजेरी लावली. त्या आधी मतदान झाले होते. त्या दिवशी सातच टक्के मतदान झाले होते. तर मतदान करण्यासाठी जाणार्‍या लोकांवर दगडफेक झाली त्यामुळे मतदानाला अल्पसा प्रतिसाद मिळाला होता. आंदोलक आणि लष्करामध्ये झालेल्या संघर्षात 8 जण मृत्यूमुखी पडले होते. 9 एप्रिलला 12.61 लाख मतदात्यांपैकी केवळ 7.14 टक्क्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीसाठी एकूण 9 जण उभे होते. नॅशनल काँफरंस पक्षाचे फारूख अब्दुल्ला, पीपल डेमोक्रेटिक पक्षाचे नाजीर अहमद खान हे रिंगणात होते. पीडीपी नेते तारिक हमीद यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती.

       बुडगाम आणि खानसाहिब या विधानसभा मतदारसंघातून तर एकाही मतदाराने मतदान केले नाही. तर चरार ए शरीफ या भागातून केवळ दोन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 9 एप्रिलला चादुरा या भागात सर्वाधिक हिंसाचार पाहायला मिळाला होता. या भागात आज 200 जणांनी मतदान केले आहे. बीरवाह या भागातून 142 जणांनी मतदान केले होते. मतदानाला अल्पसा प्रतिसाद मिळाल्यामुळे केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली होती. काश्मीरमधील ही स्थिती विदारक असल्याचे ते म्हणाले होते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही लवकरच कठोर पावले उचलू असे ते म्हणाले.

पुन्हा एकदा राईट टू रिकॉल

      सध्याची निवडणूक प्रक्रिया निर्दोष नाही, हे कुणीही सांगेल. या निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. अगदी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे. लोकपाल विधेयकासाठी मोठे आंदोलन उभारल्यानंतर काही काळ विश्राम करून आपण नव्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले होते. हा मुद्दा म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार होय. अण्णांनी यासंदर्भात आंदोलन केले असते आणि ते यशस्वी होऊन तसे विधेयक संमत झाले असते, तर खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी परत बोलावले असते.

       लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याची संकल्पनाही फारशी नवीन नाही. ही कल्पना भारतात 1940 च्या दरम्यान प्रथम मांडली. प्रसिद्ध विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय यांनी ही संकल्पना देशात सर्वप्रथम मांडली होती. जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनातही 1974 च्या दरम्यान ही संकल्पना पुनश्‍च मांडण्यात आली होती. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विधानसभेत लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार जनतेला देणारा कायदा मंजूर झाला आहे.  भारतातही काही नगरपालिका क्षेत्रांमध्ये हा कायदा लागू आहे. बर्‍याच लोकांना त्याची माहिती नाही.

       छत्तीसगडमध्ये नगरपालिकेतील प्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार नागरिकांना आहे. याखेरीज काही राज्यांमध्ये नगरपालिकांपुरता हा अधिकार जनतेला दिला गेला आहे. निवडून दिलेला नगरसेवक व्यवस्थित काम करत नसेल किंवा जनतेशी संपर्क ठेवत नसेल, तर त्याला परत बोलावता येते. 10 वर्षांपूर्वी मार्क्सवादी नेते आणि लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी यांनी अशी मागणी केली होती. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही निवडणूक सुधारणांचा आग्रह धरला होता. अर्थात, अशा प्रकारचे कायदे ज्या कायदेमंडळात संमत करायचे, तेथील सर्वच लोकप्रतिनिधींना धास्ती असल्यामुळे या कायद्याचा विचार फारसा झालाच नाही व आगामी काळातही एखाद्या विस्तृत जनआंदोलनाखेरीज हा प्रश्‍न विचारात घेण्यात येईल अशी चिन्हे नाहीत. ब्रिटनमध्ये भ्रष्ट लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार नागरिकांना देण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

        कोणत्या परिस्थितीत लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार जनतेला असावा, यासंदर्भात तज्ज्ञांनी काही मार्गदर्शक तत्त्वे मान्य केली आहेत. सामान्यतः कोणत्या कारणासाठी प्रतिनिधीला परत बोलावता येईल, यावर निर्बंध नसावेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच हा अधिकार कसा अंमलात आणता येईल, यावरही खल होत असतात. साधारणपणे मतदारसंघातील किमान 10 टक्के  मतदारांनी तशी मागणी करावी अशी धारणा जाणकारांमध्ये आहे. तत्त्वतः हे योग्यच आहे. लोकप्रतिनिधीला माघारी बोलावण्यासाठी अर्ज करणार्‍यांनी मागील निवडणुकीत मतदान केलेले असावे, अशी अट टाकण्यात यावी असेही जाणकार सुचवितात.

       भारताच्या संदर्भात जेव्हा आपण राईट टू रिकॉलचा विचार करतो, तेव्हा 1974 च्या जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीकडे लक्ष जाते. परंतु तत्पूर्वीही ही संकल्पना अस्तित्वात होती आणि मागणीही होती. अर्थात, अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने संसद किंवा विधिमंडळ स्तरावर या अधिकाराविषयी गांभीर्याने प्रयत्न केलेले नाहीत. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी नुकताच बिहार म्यूनिसिपल अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करून हा अधिकार लोकांना दिला. बिहारच्या पंचायती राज्य यंत्रणेत निवडून गेलेल्या सरपंचाला परत बोलावण्याचा अधिकार पहिल्यापासून आहेच. नव्याने नगरपालिकेला लागू केलेल्या कायद्यात अशी तरतूद आहे की, ज्या वॉर्डातील नगरसेवकाला परत बोलावण्यासाठी 50 टक्क्यांहून अधिक मतदार अर्ज करतील, त्याला परत बोलावले जाईल. राईट टू रिकॉल लागू करण्यामध्ये काही पेचही आहेत. ते समजून घ्यायला हवेत. दोन तृतीयांश मतदारांचे अर्ज जरी कौन्सिलरकडे आले, तरी ते सर्व अर्ज खरे आहेत, हे कळायला मार्ग नाही. तसेच अर्ज करणारे सर्व लोक त्याच विभागातील रहिवासी आहेत की नाही, हेही समजण्यास मार्ग नाही. त्यामुळे यातही घोटाळा होण्याची शक्यता नेहमीच असेल. अर्थात, अशा प्रकारचे अडथळे येतच राहणार. परंतु त्यामुळे ‘राईट टू रिकॉल’ व्यर्थ ठरत नाही. तो जनतेला प्रदान करायलाच हवा. येणारे अडथळे दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यास हरकत नाही. शिवाय, जिथे गोंधळ, गडबड किंवा घोटाळ्याची शक्यता आहे, तिचे निरसन करण्याची यंत्रणाही उभारावी आणि हा अधिकार कधी ना कधी नगरपालिकांप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभा सदस्यांच्या बाबतीत लागू करावा लागेल. 

बीबीसीवर भारतात 5 वर्षांची बंदी

        ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (बीबीसी) भारताकडून 5 वर्षांची बंदी घातली आहे. काझीरंगा अभयारण्याची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी केंद्र सरकारने हे पाउल उचलले आहे. या बंदीमुळे बीबीसीला या पुढील 5 वर्षे भारतात असणार्‍या राष्ट्रीय उद्यानांमध्ये आणि अभयारण्यांमध्ये चित्रीकरण करता येणार नाही. काही दिवसांपूर्वी बीबीसीकडून एक माहितीपट प्रदर्शित केला होता. या माहितीपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिष्ठेची न भरुन येणारी हानी झाली. याच कारणामुळे 10 एप्रिल 2017 पासून बीबीसीला भारतात माहितीपट किंवा वार्तांकनासाठीच्या चित्रीकरणासाठी परवानगी न देण्याचा निर्णय सरकारने घेतला.

       बीबीसीकडून तयार करण्यात आलेल्या या माहितीपटात काझीरंगा अभयारण्यातील शिकार रोखण्यासासंदर्भातील धोरणाविषयी भाष्य करण्यात आले होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) फेब्रुवारी महिन्यात काझीरंगा अभयारण्यातील परिस्थितीचे चुकीच्या पद्धतीने वार्तांकन केल्याप्रकरणी बीबीसीचे दक्षिण आशियातील प्रतिनिधी जस्टीन रॉवलाट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याच बरोबर बीबीसीवर बंदी घालण्यात यावी अशी शिफारस केली.

       बीबीसीला आसाममधील कोणत्याही व्याघ्र प्रकल्पांमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यासाठी परवानगी न देण्याचे आदेश 27 फेब्रुवारीला दिले होते. या प्रकरणात केंद्रीय वनमंत्रालयाने एनटीसीएचा हा निर्णय उचलून धरला. त्यानुसार 10 एप्रिलपासून बीबीसीला देशभरातील कोणत्याही राष्ट्रीय उद्यानात आणि अभयारण्यांमध्ये चित्रीकरण करण्यास मज्जाव केला आहे.

       बीबीसीने माहितीपटाचे चित्रीकरण करताना अनेक नियम व अटींचे उल्लंघन केल्याचे एनटीसीएने म्हणणे आहे. केंद्रीय वनमंत्रालयाला दिलेल्या अहवालात त्यांनी हे म्हणणे मांडले आहे. काझीरंगा अभयरण्यातील व्याघ्र प्रकल्पाचे नकारात्मक, द्वेषयुक्त आणि सनसनाटी चित्रण करून बीबीसीने भारताचे चित्र आंतरराष्ट्रीयस्तरावर मलीन केल्याचे एनटीसीएने म्हटले. 

हिंदुस्थान-बांगलादेश परस्पर संबंध

      चीनचा प्रभाव कमी व्हावा यासाठी हिंदुस्थान बांगलादेशबरोबर संरक्षण संबंध वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. बांगलादेशबरोबर संरक्षण भागीदारी वाढवण्याचा हिंदुस्थानचा इरादा आहे. हसिना यांच्या भेटीदरम्यान महत्त्वाचे संरक्षण करार करण्यात येणार आहेत. हिंदुस्थान सुमारे 500 दशलक्ष डॉलर्सची मदत करणार असून त्यातून बांगलादेश संरक्षण सामग्री विकत घेणार आहे. त्याचबरोबर संयुक्त गस्ती, संयुक्त कवायती, संरक्षण तंत्रज्ञानाचे हस्तांतरण असे काही महत्त्वपूर्ण करारही अलीकडेच करण्यात आले.

        हिंदुस्थान आणि बांगलादेश दरम्यान गेल्या आठवड्यात संरक्षण व नागरी अणू सहकार्यासह विविध क्षेत्रांत 22 महत्त्वाचे करार करण्यात आले. 3 वर्षांपूर्वी हिंदुस्थानात सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशशी संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी मोदी स्वतः ढाक्याला गेले होते. त्यानंतर बांगलादेशसोबतचा बहुप्रलंबित भूसीमारेषा करार पूर्णत्वास नेण्यात आला. हा करार पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती व हिंमत यूपीए सरकारकडे नव्हती. राजकीय पक्ष आणि इतर राज्यांकडून होणार्‍या विरोधाच्या भीतीपोटी हा करार केला जात नव्हता. मोदींनी कोणतीही भीती न बाळगता, विरोधाला न जुमानता हा करार पूर्णत्वास नेला. त्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदुस्थानविषयीची चांगली भावना निर्माण झाली.

       सामरिकदृष्ट्या बांगलादेश हा हिंदुस्थानच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. हिंदुस्थानची सर्वात मोठी 4 हजार किलोमीटरची भूसीमारेषा बांगलादेशबरोबर आहे. हिंदुस्थानशी निगडित सीमारेषेच्या संरक्षणासाठी सुरक्षा कुंपण घालण्याचे कामही पुढच्या वर्षी पूर्ण होणार आहे. या सीमेवर गस्तही वाढवण्यात येणार आहे. बांगलादेशमधील लोकशाहीच्या अस्तित्वावर, शांततेवर ईशान्य हिंदुस्थानातील स्थैर्य आणि शांतता अवलंबून आहे. पूर्वी ईशान्य हिंदुस्थानातील दहशतवाद्यांना बांगलादेशमध्ये आश्रय मिळत होता. खलिदा झिया यांच्या काळात हिंदुस्थान विरोधातील कारवायांसाठी ‘उल्फा’सारख्या संघटनेकडून अशा प्रकारचा वापर केला होता, परंतु शेख हसिना यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर बांगलादेशात धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही शासन-प्रशासन आणण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानात आश्रय घेणार्‍या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. 2009 ते 2014 या 5 वर्षांच्या काळात हिंदुस्थानातील फुटीरतावादी 17 नेत्यांना बांगलादेशात अटक करण्यास सुरुवात झाली. कित्येक जणांना हिंदुस्थानकडे हस्तांतरितही केले.

        एकुणातच शेख हसिना यांचे शासन हिंदुस्थानसाठी उपकारक ठरणारे आहे. आगामी निवडणुकांमध्येही त्याच पंतप्रधान बनण्यात हिंदुस्थानचा फायदा आहे. सध्या हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार असमतोल आहे. मागील काळात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार हा 6.8 अब्ज डॉलर इतका होता. शेख हसिना यांच्या दुसर्‍या कार्यकाळामध्ये हा व्यापार 17 टक्क्यांनी वाढला. एकूण 6.8 अब्ज डॉलरच्या व्यापारात 5.45 अब्ज डॉलरची निर्यात हिंदुस्थान करतो आहे, तर केवळ 690 दशलक्ष डॉलर्सची आयात करतो आहे. हा व्यापार असमतोल दूर करणे गरजेचे आहे.

        2016 मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बांगलादेशला 24 अब्ज अमेरिकी डॉलरचे आर्थिक साह्य देऊ केले. चीनकडून बांगलादेशी नौदलाला 2 पाणबुड्या मिळणार आहेत. मलाक्का सामुद्रधुनीत हिंदुस्थानी नौदलाकडून होऊ शकणारी संभाव्य कोंडी फोडण्यासाठी चीनच्या म्यानमार आणि बांगलादेशातून थेट बंगालचा उपसागर व हिंदी महासागराशी संपर्क जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बांगलादेशमधील चितगाव बंदरावर चीनचा डोळा आहे. बांगलादेशनेही चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पात सहभागी होण्यास अनुकूलता दर्शवली. चीनच्या या अफाट मदतीपुढे हिंदुस्थानने बांगलादेशला देऊ केलेली 4.5 अब्ज डॉलर्सची नागरी प्रकल्पांसाठीची आणि 500 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत तुटपुंजीच आहे. याशिवाय बांगलादेशच्या पायाभूत सुविधा उभारणी, ऊर्जा, दळणवळण आदी क्षेत्रांतही चीनने हिंदुस्थानला तगडे आव्हान उभे केले. चीनचा प्रभाव कमी व्हावा यासाठी हिंदुस्थान बांगलादेशबरोबर संरक्षण संबंध वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. बांगलादेशबरोबर संरक्षण भागीदारी वाढवण्याचा हिंदुस्थानचा इरादा आहे. हसिना यांच्या भेटीदरम्यान महत्त्वाचे संरक्षण करार करण्यात येणार आहेत. हिंदुस्थान सुमारे 500 दशलक्ष डॉलर्सची मदत करणार असून त्यातून बांगलादेश संरक्षण सामग्री विकत घेणार आहे. त्याचबरोबर संयुक्त गस्ती, संयुक्त कवायती, संरक्षण तंत्रज्ञानाचे हस्तांतरण असे काही महत्त्वपूर्ण करारही अलीकडेच केले.

        हिंदुस्थान आणि बांगलादेशमध्ये डिझेलचा पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकणार आहे. बांगलादेशमध्ये हिंदुस्थानी कंपन्या गुंतवणूक करणार. बांगलादेशला होणार्‍या वीजपुरवठ्यात हिंदुस्थान वाढ करणार आहे. दोन्ही देशांमध्ये रेल्वे आणि बस सेवा सुरू झाल्यास त्याचा फायदाच होणार आहे. हिंदुस्थान बांगलादेशसोबत ऊर्जा, सायबर सुरक्षा, सिव्हिल न्यूक्लिअरसह अनेक क्षेत्रांमध्ये व्यावसायिक भागीदारी वाढवत असून हिंदुस्थानी कंपन्या बांगलादेशमधील कंपन्यांसोबत मिळून तेलपुरवठ्याचे काम करत आहेत. त्यादृष्टीने भविष्यात अनेक करार केले जाणार आहेत.

        अर्थात बहुप्रतीक्षित तिस्ता जलवाटपावरील करार मात्र या दौर्‍यात अपूर्णच राहिला. हा करार दोन्ही देशांकरिता अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी हिंदुस्थान वचनबद्ध आहे अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली. मूलतत्त्ववादी आणि दहशतवादी संघटनांच्या कारवाया हा बांगलादेशसाठीही चिंतेचा विषय आहे. हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर बॉर्डर हट म्हणजे छोटे बाजार उभारणे, बांगलादेशच्या न्यायिक अधिकार्‍यांना प्रशिक्षण, बांगलादेशात कम्युनिटी क्लिनिकची स्थापना, जलवाहतूक, जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया व बांगलादेश यांच्यात समन्वय असे परस्पर सहकार्याचे स्वरूप आहे.

        हिंदुस्थानकडून बांगलादेश सोनार बांगला व्हावा म्हणून पावले टाकली जात आहेत. हिंदुस्थानात बांगला घुसखोरांची समस्या आहे. पण, बांगलादेशची प्रगती झाली आणि बांगलादेश व हिंदुस्थान यांनी हातात हात घेऊन सहकार्याचा, प्रगतीचा, व्यापाराचा आणि उन्नतीचा नवा सेतू जमवला तर उभय देशाला ते फायदेशीर ठरेल आणि घुसखोरी वगैरे समस्याही नष्ट होण्यास मदत होईल.

अमेरिकेने 1 अब्जाच्या महाबॉम्बने मारले 36 दहशतवादी

      अमेरिकेने दहशतवाद नष्ट करण्यासाठी 1 अब्ज रुपयांचा महाबॉम्ब अफगाणिस्तानमध्ये टाकला. या महाबॉम्बच्या हल्ल्यात इसिस या दहशतवादी संघटनेचे 36 दहशतवादी ठार झाले, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सैन्याच्या कारवाईचे जाहीर कौतुक केले.

      अफगाणिस्तानच्या वेळेनुसार साडेसातच्या सुमारास सी-130 या मालवाहक विमानातून अमेरिकेने हवाई हल्ला केला. अफगाणिस्तानमध्ये जमिनीखाली लपण्यासाठी इसिस या दहशतवादी संघटनेने तयार केलेला बोगदा नष्ट करण्यासाठी अमेरिकेने सुमारे 1,3,76,800 रुपयांचा मदर ऑफ ऑल बॉम्ब (एमओएबी) म्हणून ओळखला जाणारा महाबॉम्ब टाकला. अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल जॉन निकोलसन यांनी हा बॉम्ब टाकण्यासाठी लेखी आदेश दिला होता.

१४ एप्रिल २०१७

'इसिस' च्या गुहांवर अमेरिकेचा हल्ला

        अमेरिकेने अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतातील इसिसच्या आश्रयस्थानावर सर्वांत मोठा अण्वस्त्ररहित बाँब टाकला. अमेरिकेने हल्ला करताना इतक्या मोठ्या बाँबचा प्रथमच वापर केला आहे. बाँबच्या आकारावरून त्याला मदर ऑफ ऑल बाँब्ज असे म्हणतात.

        अफगाणिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी अमेरिकेने जीबीयू-43/बी (मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट बाँब) हा बाँब अचिन जिल्ह्यात इसिसच्या दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या गुहांवर टाकला. इसिसमध्ये भरती होऊ इच्छिणार्‍यांचे प्रशिक्षण येथे दिले जात असल्याचा संशय आहे.

         अफगाणिस्तानात इसिसचे 1 ते 5 हजार दहशतवादी असण्याचा अहवाल आहे. गेल्या आठवड्यात नांगरहार येथेच दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत अमेरिकेचा 1 सैनिक मारला गेला होता. हा भाग पाकिस्तान सीमेलगतच आहे. अमेरिकेच्या विशेष हवाई पथकाने एमसी-130 या विमानातून जीपीएसच्या साह्याने हा बाँब टाकला. या बाँबचे वजन 21,600 पौंड असून, अमेरिकेच्या ताफ्यातील हा सर्वांत शक्तिशाली अण्वस्त्ररहित बाँब आहे. इसिस हेच या हल्ल्याचे लक्ष्य होते, असे अमेरिकेतील सूत्रांनी सांगितले.

      अफगाणिस्तानातील इसिसविरोधात सुरू असलेल्या कारवाईचाच हा भाग असल्याचे आणि हा लढा गंभीरपणे अमेरिकेने घेतल्याचे पेंटॅगॉनचे प्रवक्ते डम स्टम्प यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले. दहशतवाद्यांकडून नागरिकांच्या होणार्‍या हत्या थांबविण्यासाठीच या हल्ल्याचे नियोजन अनेक दिवसांपूर्वीच झाल्याचेही स्टम्प यांनी सांगितले. या हल्ल्याच्या परिणामांची चाचपणी सुरू असून, इसिसचे अथवा इतर झालेल्या नुकसानीबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती उपलब्ध झाली नाही. जीबीयू-43/बी हा अमेरिकेच्या ताफ्यातील सर्वांत शक्तिशाली अण्वस्त्ररहित बाँब आहे. जीबीयू-43/बी हा शक्तिशाली बाँब अमेरिकेने इराक युद्धावेळी 2003 मध्ये तयार केला होता व त्याची चाचणीही झाली होती. ज्या एमसी-30 या लष्कराच्या मालवाहू विमानातून हा बाँब टाकला, ते विमान आधीच अफगाणिस्तानात तैनात केले होते. बाँब टाकला त्या ठिकाणी महत्त्वाचे दहशतवादी अथवा मोठ्या प्रमाणावर दहशतवादी असण्याची शक्यता असल्यानेच हा बाँब टाकला असण्याची शक्यता अमेरिकेच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

असा आहे जीबीयू-43/बी बाँब -

*   वजन : 21,600 पौंड (9,800 किलो)

*   लांबी : 30 फूट

*   स्फोटके : 11 टन

*   क्षमता : 5000 मीटर परिघातील परिसर नष्ट.

हुलकावणी देणारा नेपच्यूनसारखा ग्रह सापडला

        नेपच्यूनच्या आकाराचा हरवलेला ग्रह खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीपासून 3000 प्रकाशवर्षे अंतरावर सापडला आहे. नवीन ग्रहाचे नाव केप्लर 150 एफ असे असून त्याच्याकडे गेली अनेक वर्षे कुणाचे लक्ष गेले नव्हते, असे येल विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.

        संगणक अलगॉरिथमच्या मदतीने अनेक बाह्यग्रहांचा शोध लागला असून  त्यात या ग्रहाचा समावेश आहे. काहीवेळा संगणकात काही गोष्टी दृष्टोत्पत्तीस येत नसत, त्यातून केप्लर 150 या ग्रहप्रणालीचा शोध लागला. हा ग्रह त्याच्या तार्‍यापासून सूर्यापासून पृथ्वीचे जेवढे अंतर आहे त्यापेक्षा दूर आहे.

         केप्लर 150 एफ या ग्रहाला त्याच्या तार्‍याभोवती फिरण्यास 637 दिवस लागतात. 5 किंवा आणखी ग्रहांच्या प्रणालीत एवढी लांब कक्षा कुणाचीच नाही. केप्लर मोहिमेत 4 ग्रह सापडले असून त्यात केप्लर 150 बी, सी, डी व इ यांचा समावेश आहे. त्यांच्या कक्षा मात्र तार्‍याच्या जवळ आहेत. आम्ही नवीन मॉडेलिंग तंत्राचा वापर करून त्यात अधिक्रमित ग्रहांचे संदेश वगळले आहेत, त्यामुळेच खरे ग्रह सापडू शकतात, असे येल विद्यापीठाचे जोसेफ श्मिडट यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियातही धावणार भारतातील मेट्रो

         ऑस्ट्रेलियामध्ये लवकरच मेड इन इंडिया लिहिलेल्या मेट्रो धावणार आहे. त्याबरोबरच मध्यपूर्वेती देश आणि आशियातील अन्य देशामध्येही भारतात तयार झालेल्या मेट्रो धावणार आहेत. भारतात कारखाना उभारून मेट्रोची बांधणी करणार्‍या अलस्टोम व बंबार्डियर इंकने आता भारतातूनच दुसर्‍या देशांमध्ये मेट्रोची निर्यात करण्याचा निर्णय घेतला.

       भारतातील शहरी वाहतुकीच्या वाढत्या बाजार विचारात घेऊन फ्रान्स आणि कॅनडातील बहुराष्ट्रीय  कंपन्यांनी  2008 ते 2010च्या दरम्यान भारतात आपल्या उप्तादनाला सुरुवात केली होती. आता या कंपन्या बाहेरच्या देशातून मिळत असलेल्या मेट्रोच्य कंत्राटांची पूर्तता भारतातूनच करणार आहेत.

        अलस्टोम व बंम्बार्डियर येथील इंजिनियर्स आणि स्वस्तात उपलब्ध असलेल्या श्रमिकांचा उपयोग फोर्ड आणि ह्युंडाई मोटर्स या कंपन्यांसारखा करू इच्छित आहेत. याबाबत अलस्टोम इंडिया कंपनीचे दक्षिण आशियातील व्यवस्थापकीय संचालक भारत सलहोत्रा यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये कंपनीचे पहिले प्रोजेक्ट असेल. आम्ही येथूनच मेट्रोचे कोच सिडनीला पाठवणार आहोत. दक्षिण भारातील आपल्या कारखान्यामधून आम्ही हे कंत्राट पूर्ण करणार आहोत. ऑस्ट्रेलियासोबतच मध्यपूर्व व दक्षिणपूर्व आशियवरही आमचे लक्ष आहे.

रोनाल्डोचे युरोपात गोल शतक

         ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलच्या बळावर चॅम्पियन लीग फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लढतीत रियाल माद्रिदने बायर्न म्युनिखवर 2-1 ने विजय साजरा केला. या 2 गोलबरोबरच रोनाल्डोने युरोपातील आपले गोलशतकही पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. मला हा विक्रम करायचाच होता आणि बायर्नसारख्या संघाविरुद्ध मी हा माईलस्टोन गाठू शकलो याचा आनंद असल्याचे रोनाल्डोने म्हटले आहे.

       या लढतीत रोनाल्डोने 47 आणि 77 व्या मिनिटाला गोल केले. तत्पूर्वी विडालने 25 व्या मिनिटाला गोल करीत बायर्नला आघाडी मिळवून दिली होती. रोनाल्डोला तीन मिनिटांत दोनदा पाडल्याने बायर्नच्या झेवी मार्टिनेझला रेडकार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे शेवटच्या अर्ध्या तासात या संघाला 10 जणांसह खेळावे लागले.

       या लढतीत रियालला 18 व्या मिनिटालाच पहिली संधी मिळाली होती. मात्र बेन्झीमाने मारलेला हेडर गोलपोस्टच्या जवळून गेला. मध्यंतरानंतर दुसर्याच मिनिटाला कार्वाजेलने दिलेल्या पासवर रोनाल्डोने बरोबरीचा गोल केला. यानंतर 77 व्या मिनिटाला ग्रेथ बेलच्या पासवर विजयी गोल केला.

*   एकूण 143 लढतीत रोनाल्डोने गोलचे शतक ठोकले. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी लियोनेल मेस्सीचे 118 लढतीत 97 गोल आहेत.

*   रोनाल्डोने युरोपियन क्लब स्पर्धेतील आपल्या गोलचे खाते 2005 रोजी डेबरेकनविरुद्ध लढतीत उघडले होते.

*   11 वर्षे आणि 8 महिन्यांनंतर रोनाल्डोने गोलचे शतक पूर्ण केले.

*   रोनाल्डोने आपला 50 वा गोल 2013 साली गालाटासारेविरुद्ध लढतीत केला. रोनाल्डोने पुढचे 50 गोल उर्वरित 47 लढतीत केले.

फक्त 20 पैशांत विकली जातेय बँक खात्यांची माहिती

      देशातील 1 कोटी भारतीयांच्या बँक खात्यांची माहिती जमा करुन विक्री करणारे एक रॅकेट दिल्ली पोलिसांनी उघड केले आहे. विशेष बाब म्हणजे या माहितीचा वापर लाखो रुपयांवर डल्ला मारण्यासाठी केला जाणार असला तरी ही महत्त्वाची माहिती अवघ्या 10 ते 20 पैशांमध्ये विकली जाते असे उघड झाले आहे.

       दिल्लीतील 80 वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून 1 लाख 46 हजार रुपये काढण्यात आले होते. क्रेडीट कार्डाद्वारे हे पैसे काढण्यात आले होते. या घटनेचा तपास करताना बँक खात्यांची माहिती लीक करणारे एक रॅकेट सापडले. बँक, कॉल सेंटर आणि अधिकृत संस्थांमधून ही गोपनीय माहिती मिळवली जाते.

       बँक खात्यामधील माहितीमध्ये कार्ड नंबर, कार्डधारकाचे नाव, जन्मतारिख, मोबाईल नंबर आदी माहितीचा समावेश असतो. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी पांडवनगरमध्ये पुरन गुप्ता या तरुणाला अटक केली होती. गुप्ताने यापूर्वीही 50 हजार लोकांची माहिती विकली होती. अवघ्या 10 ते 20 हजारांमध्येच तो ही माहिती विकायचा. मुंबईतील एका सप्लायरकडून ही माहिती मिळायची असे गुप्ताने पोलिसांना सांगितले. या आधारे पोलिसांचे पथक मुंबईतील संशयिताचा शोध घेत आहेत.

        बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवत ही मंडळी गोपनीय माहिती मिळवून खात्यांमधून पैसे काढायचे. बर्‍याचदा ही फसवणूक करणारी टोळी ग्राहकांना फोनकरुन संशयास्पद व्यवहार होत असून तातडीने पासवर्ड आणि अन्य माहिती द्या म्हणजे व्यवहार थांबवता येतील अशा थापा मारुन ग्राहकांकडून माहिती घ्यायचे. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींकडून 1 कोटी लोकांच्या बँक खात्यांची माहिती सापडली आहे. या प्रकरणात सविस्तर तपास सुरु आहे. आता हे एक कोटी ग्राहक कोणत्या राज्यांमधील किंवा बँकेमधील होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

डिजीधन योजना

      डिजीधन योजनेअंतर्गत डिजीटल व्यवहार करणार्‍या भाग्यवान विजेत्यांची नावे आज नागपुरातील डिजीधन मेळाव्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली.

      लातूरची श्रद्धा मंगेश ही तरुणी भाग्यवान विजेती ठरली असून तिला 1 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. श्रद्धाने केवळ 1490 रुपयांचा डिजीटल व्यवहार केला होता. आणि ती डिजीधन योजनेची भाग्यवान विजेती ठरली.

       तर व्यापारी श्रेणीत रा.जी. राधाकृष्णन यांना 50 लाख रुपयांचे दुसरे तर रागिनी उपदेकर यांना 25 लाख रुपयांचं तिसर्‍या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. ग्राहक श्रेणीत चिमन भाई प्रजापती (गुजरात) यांना 50 लाख रुपयांचे दुसरे आणि भरत सिंह (देहरादून) यांना 25 लाख रुपयांचे तिसर्‍या क्रमांकाचं बक्षीस मिळाले.

        नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने देशात डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना सुरू केल्या होत्या. यासाठी 10 एप्रिलला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात बक्षीसांची सोडत काढण्यात आली. पण त्यावेळी विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. ही नावे नागपुरात पंतप्रधानांची उपस्थित असलेल्या डिजीधन मेळाव्याच्या कार्यक्रमात जाहीर करुन विजेत्यांना बक्षीसे दिली. 

नोटाबंदीचा उद्देश साध्य होतोय का?

        एकंदर परिस्थिती पाहता, पंतप्रधान मोदी यांनी 27 मार्च रोजी झालेल्या मन की बातमध्ये सर्वांनी आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन केले. पण महत्त्वाचे म्हणजे गेले काही दिवस बर्‍याच ठिकाणच्या एटीएम मधील रोकड लवकर संपत असून, जनतेला रेख रकमेची चणचण भासत आहे. रोखीच्या वाढत्या व्यवहारांचे हे द्योतक आहे.

        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 च्या नोटा अचानक रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. काळा पैसे, बनावट नोटांचा सुळसुळाट आणि दहशतवादी कारवायांत त्याचा सहभाग या सर्वांवर घाला घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले. एका आकडेवारीनुसार, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुमारे एकंदर 17 लाख कोटी रुपयांच्या नोटा प्रचलनात होत्या. यातील अंदाजे 84 टक्के रक्कम या दोन मोठ्या मूल्याच्या नोटांमध्ये होती. एवढी मोठी रोकड देशाच्या अर्थव्यवहारातून बाहेर गेल्यामुळे, रोख रकमेची चणचण निर्माण झाली. परंतु अर्थव्यवस्थेचे रहाटगाडगे चालवायचे असेल तर या नोटाबंदीला पर्याय शोधणे गरजेचे होते. यातून बँकिंगमधील आरटीजीएस, एनईएफटी, पेटीएम, क्रेडिट, डेबिट कार्ड यातून मोठ्या प्रमाणावर व्यवहार सुरू झाले.

      नोटाबंदीचा आणखी एक मुख्य उद्देश कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे, असा होता आणि आहे. महत्त्वाचे म्हणजे 500 व 1000 रुपयांच्या नोटावरील बंदी आणि त्या बदल्यात नव्या नोटांच्या उपलब्धतेसाठी लागणारा वेळ यातून देशात लेसकॅश परिस्थिती निर्माण झाली आणि डिजिटल आर्थिक व्यवहारांशिवाय पर्याय उरला नाही. परंतु, या वर्षातील जानेवारी महिन्याच्या मध्यापासून अर्थव्यवस्थेमध्ये नव्या नोटा नोटांची उपलब्धता वाढल्याने डिजीटल आर्थिक व्यवहारांचे प्रमाण आणि मूल्य घटत आहे. रिझर्व्ह बँकेने 10 मार्च रोजी सादर केलेल्या एका अहवालातून आणि 5 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट होते. परंतु मार्च महिन्यात आर्थिक वर्षअखेर होत असल्याने, करभरणा आणि इतर बंधनकारक देयकांची पूर्तता करावी लागल्याने आरटीजीएस, एनईएफटी, तसेच चेक पेमेंट्स व्यवहारांच्या संख्येत आणि रकमेत वाढ दिसते. परंतु, इतर पर्यायांमध्ये जानेवारी महिन्याच्या तुलनेत वाढ दिसत नाही. हे सर्व सोबतच्या तक्त्यांमध्ये दिले आहे.

       एकंदर परिस्थिती पाहता, पंतप्रधान मोदी यांनी 27 मार्च रोजी झालेल्या मन की बातमध्ये सर्वांनी आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन केले. पण महत्त्वाचे म्हणजे गेले काही दिवस बर्‍याच ठिकाणच्या एटीएममधील रोकड लवकर संपत असून, जनतेला रेख रकमेची चणचण भासत आहे. रोखीच्या वाढत्या व्यवहारांचे हे द्योतक आहे. तसेच रोखीच्या व्यवहारांना आळा घालून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अघोषित मार्गाने रोकड उपलब्धता कमी करत आहे का, अशी शंका येत आहे. हा चिंतेचा मुद्दा असून, असे होणे परवडणार नाही. कारण नोटाबंदीचे मुख्य उद्देश डिजिटल आर्थिक व्यवहार आणि करचुकवेगिरीला आळा घालणे असे आहेत. परंतु हे साध्य करण्यासाठी सरकारने काही पावले तातडीने उचलणे गरजेचे आहे.

        काळ्या पैशाच्या संदर्भात सरकारने नेमलेल्या एसआयटीचे प्रमुख न्या. एम. बी. शहा यांनी क्रेडिट, डेबिट कार्डावरील शुल्क पूर्णपणे मागे घेण्याची शिफारस केली आहे. तसेच खेडेगावापर्यंत डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी असलेले सर्व अडथळे दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे. असे व्यवहार नव्याने करणार्‍यांसाठी जगजागृती करावी लागेल, प्रोत्साहन द्यावे लागेल आणि महत्त्वाचे म्हणजे यामधील गैरव्यवहार, फसवाफसवी रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलून जनतेमध्ये विश्‍वास निर्माण करावा लागेल, तरच नोटाबंदीचे उद्दिष्ट खर्‍या अर्थाने साध्य होईल.


प्रकार
डिसेंं. 16  जाने. 17फेब्रु. 17 मार्च 17
आरटीजीएस, एनईएफटी16.6 16.4 14.818.6
चेक पेमेंट्स13  11.810 11.9
आयएमपीएस  5.3 6.2 6   6.2
क्रेडिट, डेबिट कार्ड्स  31.1 26.6 21.222.5
प्रीपेड पेमेंट्स  8.8 8.7 7.8 8.9
एकंदर 74.8 69.759.868.1

डिजिटल आर्थिक व्यवहारांची रक्कम (अब्ज रुपयांमध्ये)


प्रकार
डिसेंं. 16  जाने. 17फेब्रु. 17 मार्च 17
आरटीजीएस, एनईएफटी11538 113551087816294
चेक पेमेंट्स681266185994  8003
आयएमपीएस  432491  482   646
क्रेडिट, डेबिट कार्ड्स  552 481391410
प्रीपेड पेमेंट्स  21.3 21  18.7 21
एकंदर 19325 18966 17764    6825192

 

डिजिटल स्ट्रेस कमी करण्यासाठी

        या सर्वांबरोबरच सोशल मीडियावर घालवित असलेला वेळ कमी करा. तसे केल्यास तुम्हाला लोकांना प्रत्यक्षात भेटण्यास, बोलण्यास बराच वेळ मिळू शकेल. आपल्याला कोणत्या मीडियाचा किती वापर करायचा आहे, कोणता कंटेंट पाहायचा आहे, याचेही प्लॅनिंग करून ठेवा.

       पूर्वीच्या काळी परीक्षांमुळे, प्रेमसंबंधांमुळे, आर्थिक गोष्टींमुळे, नातेसंबंधांतील हेवेदाव्यांमुळे मनावर ताण येत असे. आज बदलत्या काळात तणावग्रस्त होण्यास डिजिटलायजेशनही कारणीभूत ठरत आहे. आज विविध गॅजेटस्नी जीवन व्यापून टाकले आहे. या गॅजेटस्ची हाताळणी करताना, त्यामध्ये साठवलेल्या डेटाची गोपनियता राखताना बरीच यातायात करावी लागते. त्यातूनही मनावर एक प्रकारचा ताण येत असतो.

उपाय -

बॅकअप घ्या -

         आपल्या डेटाविषयी काळजी करत बसण्यापेक्षा नियमितपणाने बॅकअप घ्या. यासाठी फ्लॅश ड्राईव्ह किंवा एक्सटर्नल हार्डडिस्कसारखी स्टोअरेज डिव्हाईसेस आज फारच कमी किंमतीत उपलब्ध आहेत. तसेच त्यांची क्षमताही दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. क्लाऊड स्टोअरेजचाही एक उत्तम पर्याय समोर येताना दिसत आहे. ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राईव्ह, मायक्रोसॉफ्ट वनड्राईव्ह यांसारखे अनेक पर्याय क्लाऊड स्टोअरेजसाठी उपलब्ध आहेत. यांवर पीडीएफ, स्प्रेडशीट्स, फोटोज यांसारख्या सगळ्याच फॉरमॅटमधील फाईल्स सेव्ह करता येतात. तसेच क्लाऊडमध्ये असल्यामुळे कधीही, कुठेही, कोणत्याही मशीनवरून ते ऍक्सेस करणेही शक्य आहे.

ई-मेल लिस्ट करा साफ -

         ईमेल उघडला की कित्येक ईमेल्स अनरीड मेल्स दिसून येतात. अशावेळी कोणता ईमेल वाचावा आणि कोणत्याकडे दुर्लक्ष करावे, हेही कळत नाही. त्यात एखादा कामाचा ईमेल मिस होण्याचीही शक्यता असते. अशा वेळेस इनबॉक्स साफ करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी रोजच्या रोज ईनबॉक्स साफ करण्याची सवय आपण स्वतःला लावून घ्यायला हवी. काही वेळा आपण चॅनेल्स सबस्क्राईब करून ठेवलेले असतात, पण प्रत्यक्षात त्यांची गरज नसते. अशा सबस्क्राईब केलेल्या चॅनेल्सना अनसबस्क्राईब केले तरी इनबॉक्सवरचा बराचसा ताण कमी होऊ शकेल.

पासवर्ड मॅनेजर वापरा -

        इंटरनेटचा वापर वाढत आहे, तसतशी आपल्याला वेगवेगळ्या साईटस्वर बनवाव्या आणि वापराव्या लागणार्‍या अकौंटस्ची संख्याही वाढत चाललेली आहे. अशा सर्वच अकाउंट्सचा पासवर्ड लक्षात ठेवणे आणि तो गोपनीय ठेवणे आवश्यक बनलेआहे. यासाठी चांगल्या पासवर्ड मॅनेजर अ‍ॅपची मदत घेता येईल.

स्मार्ट प्रॉडक्टसचा स्मार्ट वापर -

       आज इंटरनेट ऑफ थिंग्ज व वेबमुळे तर अनेक कामे चुटकीसरशी करता येऊ लागली आहेत. आपल्याला उपयुक्त अशा स्मार्ट डिव्हाईसेसची निवड आणि वापर आपण स्मार्टली करणे गरजेचे आहे. किचन, हॉल किंवा अगदी बेडरूमसाठीही अशी अनेक स्मार्ट गॅजेट्स बाजारात उपलब्ध आहेत. एअर प्युरिफायर, होम सर्व्हियलन्स सिस्टीम, स्मार्ट ज्युसर यांसारख्या डिव्हाईसेससोबतच स्मार्ट विअरेबल्सही चांगलीच उपयुक्त ठरू शकतात. या गॅजेट्सच्या किंमतीही फार जास्त नाहीत.

फोटोज क्युरेट करा -

         डिजिटल युगामुळे आज सगळ्यांकडेच फोटोज असतात. लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल्स अशा सर्वच गॅजेट्समध्ये फोटोजचा अक्षरशः पूर आलेला असतो. अशावेळेस आपण आपले फोटो योग्यरीतीने आणि योग्य जागी सेव्ह करून ठेवणे गरजेचे आहे. तसेच वेगवेगळी फोल्डर्स बनवून ते सॉर्ट करून ठेवणेही गरजेचे आहे. ऍमेझॉन प्राईम ही सुविधा सबस्क्राईबर्सना फोटोजसाठी अनलिमिटेड स्टोअरेज उपलब्ध करून देते. व्हिडिओसाठी मात्र केवळ 5 जीबी एवढीच जागा दिली जाते. तर गुगल फोटोज सर्व युजर्सना अनलिमिटेड फोटो व व्हिडिओ स्टोअरेजची सुविधा देते. तुमचे सर्व फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही इथे नीट सॉर्टिंग करून ठेवू शकता. नंतर ते तुम्हाला केव्हाही सहज उपलब्ध होऊ शकतील.

जुने तंत्रज्ञान करा रिसायकल -

        जुने प्रिंटर, फोन्स, टॅब्लेट्स घराच्या कोपर्‍यात कुठेतरी पडून असतात. यांना काही प्रमाणात रिसायकल करणे अगदीच शक्य आहे. त्याचे काही इतर उपयोग करता येऊ शकतात का, हेही तपासा. कोणा गरजूलाही तुम्ही ही गॅजेट्स देऊ शकता. मात्र, कोणालाही आपली गॅजेट्स देताना त्यातील डेटा आपण डिलिट केला आहे ना, याची खात्री करून घ्यायला विसरू नका.

       या सर्वांबरोबरच सोशल मीडियावर घालवित असलेला वेळ कमी करा. तसे केल्यास तुम्हाला लोकांना प्रत्यक्षात भेटण्यास, बोलण्यास बराच वेळ मिळू शकेल. आपल्याला कोणत्या मीडियाचा किती वापर करायचा आहे, कोणता कंटेंट पाहायचा आहे, याचेही प्लॅनिंग करून ठेवा. नेटफ्लिक्स, टीव्ही, केबल अशा सर्वच गोष्टी एकत्रितपणे वापरण्याऐवजी त्याचे योग्य नियोजन करा. टीव्हीवरचेही अनेक कार्यक्रम तुम्हाला युट्युब किंवा चॅनेल्सच्या वेबसाईट्सवर कधीही सहज पाहायला मिळू शकतात. 

हुलकावणी देणारा नेपच्यूनसारखा ग्रह सापडला

       नेपच्यूनच्या आकाराचा हरवलेला ग्रह खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीपासून 3000 प्रकाशवर्षे अंतरावर सापडला आहे. नवीन ग्रहाचे नाव केप्लर 150 एफ असे असून त्याच्याकडे गेली अनेक वर्षे कुणाचे लक्ष गेले नव्हते, असे येल विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.

       संगणक अलगॉरिथमच्या मदतीने अनेक बाह्यग्रहांचा शोध लागला असून  त्यात या ग्रहाचा समावेश आहे. काहीवेळा संगणकात काही गोष्टी दृष्टोत्पत्तीस येत नसत, त्यातून केप्लर 150 या ग्रहप्रणालीचा शोध लागला. हा ग्रह त्याच्या तार्‍यापासून सूर्यापासून पृथ्वीचे जेवढे अंतर आहे त्यापेक्षा दूर आहे.

       केप्लर 150 एफ या ग्रहाला त्याच्या तार्‍याभोवती फिरण्यास 637 दिवस लागतात. 5 किंवा आणखी ग्रहांच्या प्रणालीत एवढी लांब कक्षा कुणाचीच नाही. केप्लर मोहिमेत 4 ग्रह सापडले असून त्यात केप्लर 150 बी, सी, डी व इ यांचा समावेश आहे. त्यांच्या कक्षा मात्र तार्‍याच्या जवळ आहेत. आम्ही नवीन मॉडेलिंग तंत्राचा वापर करून त्यात अधिक्रमित ग्रहांचे संदेश वगळले आहेत, त्यामुळेच खरे ग्रह सापडू शकतात, असे येल विद्यापीठाचे जोसेफ श्मिडट यांनी सांगितले.

सौरऊर्जेच्या संशोधनातील नवे पान

       सौरऊर्जेच्या साठवणीसंबंधी येणार्‍या समस्यांची उकल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेचा या पानाच्या संरचनेचा उपयोग करून विकसित केलेले इलेक्ट्रोड आणि सुपर कपॅसिटर हे त्यातील लक्षणीय संशोधन.

        गेल्या 5-6 दशकांपासून ऊर्जेचा प्रश्‍न सर्व जगाला भेडसावत आहे. ज्या देशांनी सुरवातीलाच याची गंभीर दखल घेऊन ऊर्जा निर्माण, व्यवस्थापन व नियोजन केले ते सर्व देश आज प्रगत राष्ट्र म्हणून संबोधले जातात. भारतात ऊर्जेचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने आजही ग्रामीण भागात आपण वीज पोहोचवू शकलो नाही. भारतात उपलब्ध असणारे मर्यादित साठे आणि वाढती मागणी यामुळे भारताला नैसर्गिक वायू व तेल इतर देशांकडून आयात करावे लागत आहे.

       पारंपरिक ऊर्जास्रोतांची मर्यादा व वाढत असलेली मागणी लक्षात घेता पर्यायी ऊर्जा शोधणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबतीत विविध ऊर्जा स्रोतांवर संशोधन होत आहे. सौरऊर्जा ही एक महत्त्वाची पर्यायी ऊर्जा आहे. तथापि सौरऊर्जेच्या वापराबाबत अजूनही काही समस्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी लागणारा खर्च व सौरऊर्जेचे रूपांतर विद्युत किंवा उष्णता ऊर्जेत केल्यानंतर त्याची साठवणूक करण्यासंबंधीच्या अडचणी यामुळे सौरऊर्जेचा वापर तुलनेने कमी होत आहे.

       सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी सोलर सेलची कार्यक्षमता वाढविणे व रूपांतरित ऊर्जेची साठवण करणे यासंबंधी मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. कॅडमीअल सल्फाइड, सिलिकॉन, कॅडमीअम टेलेरॉईड इ. पदार्थांचा पातळ पापुद्रा (थिन फिल्म), तसेच अतिसूक्ष्म कॉटम डॉट, त्रिमितीय (थ्री डायमेन्शन) सोलार सेल यांची प्रायोगिक तत्त्वावरील कार्यक्षमता ही 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे आढळले.

      बाजारामध्ये असे सोलार सेल मोठ्या प्रमाणात मिळू लागले, तर भारताचा ऊर्जा प्रश्‍न बर्‍याच अंशी मार्गी लागेल. विद्युत ऊर्जेची साठवण या प्रश्‍नावर मात्र अजूनही म्हणावे असे उत्तर संशोधकांना मिळालेले नाही. विद्युत ऊर्जेच्या साठवणुकीसाठी सध्या मोठ्या बॅटरी वापरल्या जातात, परंतु त्या वजनाने व आकाराने मोठ्या असतात. तसेच त्याची किंमतही अधिक असल्यामुळे सर्वसामान्यांना सौरऊर्जा वापरापासून वंचित राहावे लागत आहे. विशेषतः दुर्गम भागामध्ये विद्युत ऊर्जा ग्रीडला देता येत नाही. त्यामुळे बॅटरी वापरून साठविण्याशिवाय काही पर्याय नसतो.

      या समस्येवर मार्ग निघावा, यासाठी मेलबोर्न येथील आरएमआयटी विद्यापीठाच्या संशोधकांनी चक्क निसर्गात उपलब्ध असणार्‍या नेचा या झाडाच्या पानातील संरचनेचा उपयोग केला आहे. तलवारीसारख्या दिसणार्‍या नेचाच्या पानामध्ये अनेक सूक्ष्म अशा शिरा असतात. या पानांचा उपयोग जास्तीत जास्त सौरऊर्जा शोषण करण्यासाठी, तसेच सर्व झाडाभोवती जमिनीतून पाणी पुरविण्यासाठी होतो. इतर पानांपेक्षा नेचाच्या पानामधील शिरांचे प्रमाण अधिक असल्यामुळे ही झाडे हिरवीगार दिसतात, असे संशोधकांच्या लक्षात आले.

      पानाच्या या गुणधर्माचा उपयोग करून आरएमआयटी या विद्यापीठातील संशोधकांनी अत्यंत पातळ, लवचिक व सौरऊर्जा शोषण करतील, तसेच प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवतील, असे इलेक्ट्रोड विकसित करण्यात यश मिळविले.त्यांनी विकसित केलेले सुपर कॅपॅसिटर हे पातळ, अधिक टिकाऊ व त्वरित शक्ती पुरविणारे आहेत. याचा उपयोग विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणामध्ये तसेच मोटारगाड्यांमध्ये होऊ शकतो. संशोधकांनी इलेक्ट्रोड व सुपर कॅपॅसिटर यांचे एकत्रित असे प्रोटोटाइप मॉडेल तयार करून त्यावर अनेक प्रयोग करून पाहिले. त्यामध्ये त्यांना विद्युत ऊर्जा साठविण्याची क्षमता सर्वसाधारण उपकरणांपेक्षा 30 पटीने अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे साठविलेली विद्युत ऊर्जा सूर्यप्रकाश नसताना किंवा ढगाळ वातावरण असतानासुद्धा वापरता येऊ शकते. नेचा या झाडाच्या पानातील फ्रक्ट्रलसारखी असलेली शिरांची रचना व त्याची अधिक असलेली घनता ही कल्पना वापरून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

   इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी ग्राफीन या पदार्थाचा वापर केला आहे. त्यासाठी अतिसूक्ष्म पातळ व लवचिक अणू-रेणूंचे थर बसविलेले आहेत. भविष्यामध्ये सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणे आणि त्याची साठवण करणे, या दोन्ही क्रिया फक्त पातळ पापुद्रा (थिन फिल्म) सोलार सेल करू शकेल. म्हणजेच सोलार सेल हे विद्युत ऊर्जा निर्माण करणारे व साठविणारे असे सेल्फ पॉवरिंग असतील, असा विश्‍वास शास्त्रज्ञांना आहे.

विकसित केलेल्या मायक्रोसुपर कपॅसिटरमध्ये -

        1 ब्युटाईल-3 मिथीमायडॅझोलियम या द्रवरूपी आयनचा उपयोग करण्यात आला आहे. ग्राफीन ऑक्साइड तयार करण्यासाठी हमरची आधुनिक पद्धती वापरण्यात आली आहे. 1 मिलिलिटर पाण्यामध्ये 1.3 ग्रॅम ग्राफीन ऑक्साइडचे मिश्रण तयार करून काचेच्या पट्टीवर त्याचे थेंब तयार केले. वरील द्रवाचे थेंब काचेच्या पट्टीवर 24 तास ठेवल्यामुळे त्यातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पट्टीवर ग्राफीन ऑक्साइडचे सूक्ष्मकण उतरतात. ग्राफीन ऑक्साइडच्या सूक्ष्म कणांत सिलिकाची, नॅनोपावडर व वरील आयनिक द्रव एकत्रित करून आयनोजेल तयार केले जाते. संगणकाच्या सहायाने उज2 लेझरचा उपयोग करून ग्राफीन ऑक्साइडचे इलेक्ट्रोड तयार केले जातात. मायक्रोकपॅसिटर लवचिक होण्यासाठी पॉलिइथिलीन टेरेप्यॅलेटचा उपयोग केलेला आहे. मायक्रोकपॅसिटरची क्षमता तपासण्यासाठी तयार केलेल्या पदार्थाला 180 अंश सेल्सिअसमध्ये वाकवणे, तसेच 90 अंश सेल्सिअसमध्ये पिळणे असे अनेक प्रयोग केले आहेत. तरीसुद्धा मायक्रोकपॅसिटर पूर्ववत होतात, असे शास्त्रज्ञांना दिसून आले. मायक्रोकपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंग करून पाहिले तर दहा हजार वेळा असे केल्यानंतरही 90% क्षमता राहते, असेही निदर्शनास आले.

शनि ग्रहाच्या त्या चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता...

       इन्सेलॅड्स या शनि या ग्रहाच्या एका चंद्रावर जीवसृष्टीस पूरक असलेल्या रासायनिक उर्जेची लक्षणे दिसून आल्याचे निरीक्षण अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाने नोंदविले आहे. या चंद्रावरील हिमाच्छादित सागरीपृष्ठामध्ये पाणी अतितप्त होऊन घडणार्‍या वैज्ञानिक प्रक्रियेमुळे (हायड्रोथर्मल) हायड्रोजन वायू मिसळला जात आहे. पाण्यात मिसळलेला कर्बवायू व या हायड्रोजन वायूचा एकत्रित वापर करून सूक्ष्म जीवांना अन्ननिर्मिती करणे शक्य असल्याचे नासाने म्हटले आहे.

      पाणी, उर्जेचा स्त्रोत व कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस व सल्फर या जीवसृष्टीसाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांची उपस्थिती इन्सेलॅड्सवर असण्याची दाट शक्यता आहे. या चंद्रावर पाणी व हायड्रोजन (उर्जास्त्रोत) असल्याचा पुरावा आहे, याशिवाय इन्सेलॅड्सवर उर्वरित घटकही असण्याचा अंदाज शास्त्रज्ञांकडून वर्तविला आहे. शनिच्या एका छोट्या चंद्रावर रासायनिक उर्जेचे आढळलेले अस्तित्व हे अवकाशामध्ये पृथ्वीपलीकडील वसतियोग्य ठिकाणांचा शोध घेण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील एक मोठे यश आहे. असे नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ लिंडा स्पालकर यांनी म्हटले. कॅसिनी या नासाच्या अवकाशयानाने यासंदर्भातील पहिला पुरावा मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे यान नासाने ऑक्टोबर 2015 मध्ये अवकाशामध्ये पाठविले होते.

       इन्सेलॅड्स या चंद्राचे सूर्यापासूनचे अंतर तब्बल 88.7 कोटी मैल इतके आहे. किंबहुना, या प्रचंड अंतरामुळे येथे जीवसृष्टीची असलेली शक्यता अधिक महत्त्वपूर्ण व सुखद मानली जात आहे. इन्सेलॅड्स हा शनि ग्रहाचा सहावा सर्वांत मोठा चंद्र आहे. ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्शेल यांनी 1789 मध्ये या चंद्राचा शोध लावला होता. या चंद्राचा व्यास सुमारे 310 मैल इतका असून पृथ्वीपासून तो सुमारे 79 कोटी मैल अंतरावर आहे.

       या चंद्रावर द्रवावस्थेताल पाणी असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्यानंतर 2005 मध्ये यासंदर्भात संशोधन करण्यासाठी कॅसिनीने पृथ्वीवरुन उड्डाण केले होते. तेव्हापासून या यानाकडून पाठविण्यात आलेल्या माहितीचा शास्त्रज्ञांकडून अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासामधून जीवसृष्टीस पूरक ठरणारे वातावरण या चंद्रावर असल्याचा कालेला निष्कर्ष शास्त्रज्ञांसाठी अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे मानले जात आहे.

घसरणीचे मूळ

      पोटनिवडणुका सर्वसाधारणपणे सत्तेवर असलेल्या पक्षांच्या बाजूनेच जातात. 8 राज्यांतील 10 विधानसभा मतदारसंघांमधील निकाल तेच सांगतात. मध्य प्रदेश, राजस्थान, आसाममधील भाजपचे, कर्नाटकमधील काँग्रेसचे आणि पश्‍चिम बंगालमधील तृणमूलचे वर्चस्व त्याच नियमाची पाठराखण करते, पण अपवाद ठरले दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि झारखंड. 6-8 महिन्यांनी निवडणुकीला सामोरे जाणार्‍या हिमाचलमध्ये भाजपने सत्तारूढ काँग्रेसकडून जागा हिसकावली. झारखंडमध्ये सत्तारूढ भाजपला झारखंड मुक्ती मोर्चाने स्वत:ची जागा काही बळकावू दिली नाही, पण दिल्लीमधील निकाल सर्वाधिक धक्कादायक.

     राजौरी गार्डन हा मतदारसंघ भाजपने जिंकला, यापेक्षा आम आदमी पक्षाच्या उमेदवारावर थेट अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढविण्याची वेळ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ठरावी. 2015 मध्ये याच केजरीवालांनी न भूतो.. असा पराक्रम केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सार्‍या फौजफाटेला परास्त करीत 70 पैकी 67 जागा जिंकल्या. त्या अभूतपूर्व कामगिरीस उणीपुरी 2 वर्षेच झाली असताना केजरीवालांवर मान खाली घालण्याची वेळ आलीय.

     विधानसभेतील पराक्रम जेवढ्या उंचीवर नेणारा होता, तेवढ्याच खोलीचा तळ या पोटनिवडणुकीने गाठला. हार-जीत ठीक असते, पण सत्तारूढ पक्षावर जेमतेम 2 वर्षांतच अनामत रक्कम जप्त होण्याची आलेली वेळ काही तरी कुजल्याचा, सडल्याचा सांगावा घेऊन आलेली असते. आपचे, केजरीवालांचे तसेच झाल्याचे स्पष्ट दिसत होतेच. प्रत्यक्ष कामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी उठता-बसता केंद्रातील मोदी सरकारशी नळावरचे भांडण करण्याच्या त्यांच्या कृतीचा दिल्लीकरांमध्ये चांगलाच राग होता. मोदी सरकार त्यांची छेड काढत नव्हते, असे नाही, पण ते जाळे होते.

        भांडखोरीच्या प्रवृत्तीने केजरीवाल त्यात अडकत गेले. शिवाय अतिमहत्त्वाकांक्षा त्यांच्या आड आली. अन्य राज्यांमध्ये चंचुप्रवेश करण्याच्या नादामध्ये दिल्लीकडे त्यांनी लक्ष दिले नाही. राज्य सरकार त्यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या भरवशावर सोडले. शिक्षण व आरोग्य क्षेत्रांत काही चांगली कामे जरूर झाली, पण मोदी सरकार काही काम करू देत नसल्याचा त्यांचा कांगावा अनेकांना रुचत नव्हता. त्यातच स्वत:भोवतीच्या कोंडाळ्यात ते चांगलेच रमले. सार्वजनिक शुचिता आणि स्वच्छ राजकारणाची हमी हे केजरीवालांचे एकमेव भांडवल, पण देशाचे माजी नियंत्रक व महालेखापाल (कॅग) व्ही. के. शुंगलू यांच्या अहवालाने केजरीवालांच्या नैतिकतेचा बुरखा टराटरा फाडला. अगदी भाजप, काँग्रेस या अंतर्बाह्य राजकीय असणार्‍या पक्षांना लाजवेल, असा त्यांचा कारभार.

     अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांना दिल्ली सरकारच्या तिजोरीतून 3 कोटी 42 लाख रुपये देण्याचा त्यांचा निर्णय तर त्यांच्या अनेक समर्थकांनाही पटला नव्हता. या सगळ्याचा स्फोट कधी ना कधी होणारच होता. तो एकदाचा झाला. पंजाब, गोव्यापाठोपाठ दिल्लीमध्ये पराभवाची हॅट्ट्रिक झालीय. त्याने आत्मपरीक्षणाचे भान आले तर फायदा त्यांनाच होईल, पण आपकडून केलेली मीमांसा पाहिली तर आत्मपरीक्षणाच्या अपेक्षेत काही अर्थ दिसत नाही. पंजाब, गोव्यामध्येही त्यांनी चुकांची कबुली देण्याऐवजी ईव्हीएमवर खापर फोडले. आताही ते तेच करीत आहेत. मोदींना देशव्यापी पर्याय होण्याच्या नादामध्ये त्यांनी सोडलेली पर्यायी राजकारणाची कास या घसरणीच्या मुळाशी आहे. वरवरच्या मलमपट्टीने हे मूळचे दुखणे दूर होणारे नाही.

इव्हीएम खरेच सुरक्षित आहेत का?

      गेल्या काही कालावधीपासून मतदार यंत्र (इव्हीएम) सदोष असून, त्यात फेरफार होत असल्याचे होत असलेले आरोप, राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या विश्‍वासार्हतेवर उपस्थित केलेले प्रश्‍नचिन्ह या पार्श्‍वभूमीवर  मतदान यंत्रे ही खरच पूर्णपणे सुरक्षित आहेत का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाकडे केली.

       मतदार यंत्रात होणारा फेरफार रोखण्यासाठी व्हीव्हीपीएटी मशीन जोडणे अनिवार्य करण्यात यावे, अशा मागणीची याचिका बहुजन समाज पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती जे. चेलामेश्‍वर यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला 8 मे पर्यंत  म्हणणे मांडण्याचे आदेश दिले.

       उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर बसपने मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा गंभीर आरोप करत इव्हीएमच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर बसपने इव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. दरम्यान, बसपच्या या न्यायालयीन लढाईला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचाही पाठिंबा मिळत आहे. इव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात याआधीही याचिका दाखल झाल्या आहेत. 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इव्हीएम अधिकाधिक विश्‍वासार्ह बनवण्यासाठी त्यांना व्हीव्हीपीएटी मशीन बसवण्याचे निर्देश दिले होते.

        व्हीव्हीपीएटी मशीन इव्हीएमला जोडल्यामुळे मतदारांना आपण दिलेले मत योग्य उमेदवाराच्या खात्यात जमा झाले आहे की नाही, याची खात्री करणे शक्य होते. दरम्यान, सध्या निवडणूक आयोगाकडून प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर सुरू आहे.

8 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपच

      8 राज्यांतील विधानसभेच्या 10 जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीतही भाजपच सरस ठरले. दिल्लीच्या राजौरी गार्डन मतदारसंघातून भाजप-अकाली पक्षाचे उमेदवार मनजिंदर सिंह सिरसा यांनी विजय मिळवला. त्यांना 14,652 मते मिळाली. आप च्या उमेदवार हरजित सिंह यांना 10,243 मते मिळाली. त्यांची अमानत जप्त झाली आहे, तर दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत भाजपने 5, काँग्रेस-3, जेएमएम-1, तृणमूल काँग्रेसने 1 जागेवर विजय मिळवला.

       हिमाचल प्रदेशचा भोरंज मतदारसंघ व आसामच्या धिमाजी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. नवी दिल्लीमधील काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी चंदे 33.23 च्या सरासरीने 25,950 मते मिळाली. भाजप-अकालीचे उमेदवार मनजिंदर सिंह सिरसा यांनी 50 टक्के सरासरीने सुमारे 40 हजार मतांनी घवघवीत विजयाची नोंद केली. ही पोटनिवडणूक आपचे आमदार जनरल सिंह यांनी राजीनामा दिल्यामुळे झाली. त्यांनी त्यानंतर पंजाबमधून निवडणूक लढवली होती.पक्षाच्या खराब प्रदर्शनावर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, मतदारांमध्ये जनरल सिंह यांच्या राजीनाम्यामुळे नाराजी होती, परंतु राजौरी गार्डनचा निकाल म्हणजे पूर्ण दिल्लीचा निकाल असा समज करून घेऊ नये. त्यांनी राजौरी गार्डनमध्ये पक्षाच्या पराभवानंतर काही दिवसांनी होणार्‍या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्ष पुन्हा उभारी घेईल, असे म्हटले आहे. या निकालाचा परिणाम आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांवर होणार नाही, अशी आशा व्यक्त केली. आम्ही येथील मतदारांंची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु मतदारांनी अन्य पर्याय शोधला. आम्ही आमच्या परिसराच्या विकासासाठी येथून पुढेही कार्यरत राहू, अशी ग्वाही दिली. पंतप्रधान मोदी यांनी 10 पैकी आठ ठिकाणी विजय मिळवल्याबद्दल जनतेला धन्यवाद दिले आहेत.

10 विधानसभा जागांचा निकाल -

*   राजौरी गार्डन दिल्ली : भाजप

*   बांधवगड, मध्य प्रदेश : भाजप

*   भोरंज, हिमाचल प्रदेश : भाजप

*   भीमाजी, आसाम : भाजप

*   नंजनगुड, कर्नाटक : काँग्रेस

*   गुंडलूपेठ, कर्नाटक : काँग्रेस

*   अटेर, मध्य प्रदेश : काँग्रेस

*   कांथी दक्षिण, प. बंगाल : तृणमूल काँग्रेस

*   धौलपूर, राजस्थान : भाजप

*   लिट्टीपाडा, झारखंड : जेएमएम  

असा आहे अमेरिकेने टाकलेला महाविध्वंसक बॉम्ब

        अमेरिकेने इसिसच्या अफगाणिस्तानातील तळांना लक्ष करत अणुबॉम्ब व्यतिरिक्त सर्वात मोठा असणारा महाविध्वंसक बॉम्ब टाकला. पूर्व अफगाणिस्तानात असणारे इसीसचे बंकर आणि गुहा उध्वस्त करून अमेरिकेने इसीसला एक जबरदस्त धक्का दिला आहे. याची बातमी आल्यानंतर या बॉम्बविषयी लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. मदर ऑफ ऑल बॉम्ब अशी ओळख असणार्‍या या महाविध्वंसक बॉम्बची ही काही वैशिष्ट्ये आहेत.

1) एमओएबी म्हणजे मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट त्याला मदर ऑफ ऑल बॉम्ब  असेही म्हणतात. स्टॅनफोर्ड च्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा बॉम्ब जपानमधील हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या 0.1 टक्के इतका विध्वंस करू शकतो. मात्र याने किरानोत्साराचा परिणाम होत नाही.

2) अमेरिकेच्याच शस्त्रागारात असणारा बी-61 हे अण्वस्त्र एमओएबी पेक्षा खूपच लहान आहे मात्र त्याची विध्वंसक क्षमता या बॉम्बपेक्षा 30 पटीने जास्त आहे.

3) या बॉम्बचे कार्यालयीन नाव जीबीयु-43बी असे असून त्याची 11 टन इतक्या वजनाची विस्फोटक वाहन क्षमता आहे.

4) एमओएबी च्या एका युनिटची किंमत 1 कोटी 60 लाख इतकी आहे. तर कशर्रीूं.लेा च्या अहवालानुसार अमेरिकन लष्कराने या बॉम्बच्या निर्मितीसाठी 32 कोटी इतका खर्च केला.

5) इराक युधावेली विकसित केलेला हा बॉम्ब मागच्या दशकभराहून अधिक काळ अमेरिकेच्या हवाई दलात आहे.

6) एमओएबी हा बॉम्ब लहान लक्षांसाठी वापरला जातो.जसे की, पृष्ठभागावरील कारवाई, बंकर किना गुहा उद्ध्वस्त करणे किंवा लक्ष वेधणे. जीपीएस तंत्राद्वारे याला मार्गदर्शित केले जाते. याला वाहून नेणार्‍या एअरक्राफ्टच्या मागील भागातून हे अतिशय वेगाने प्रक्षेपित होते. त्यानंतर पॅराशूटच्या मदतीने त्याची गती कमी केली जाते. त्यामुळे त्याची जमिनीवर आदळताना  असणारी गती ही एअरक्राफ्टमधून बाहेर पडतानाच्या गतीपेक्षा कमी असते.

7) हा बॉम्ब हवेतच फुटतो त्यामुळे हवेचा दाब वाढून शत्रूंच्या गुहा, बंकर आणि इमारती यांचा विध्वंस होतो. याचा मूलत: उपयोग शत्रूला वित्तीय आणि मानसिक हानी पोहचवणे हा असतो.

 8) बॉम्ब टाकल्यानंतर पॅन्टोगोंनच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, अमेरिकन लष्कराच्या एमसी-130 या विशेष विमानाद्वारे अफगाणिस्तानवर हा बॉम्ब टाकण्यात आला.

१३ एप्रिल २०१७

साक्षी मलिक, दीपा कर्माकरला पद्मश्री प्रदान

        प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या पद्मश्री पुरस्कारांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण केले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 75 जणांना पद्मश्री देण्यात आला.

        राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. जानेवारीमध्ये या पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित केली होती. पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे 89 जणांना पुरस्कार घोषित केले होते. यात 19 महिला आणि 70 पुरुषांचा समावेश आहे. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.

पद्मश्री विजेते -

*   विराट कोहली (क्रिकेटपटू)                *   साक्षी मलिक (कुस्तीपटू)

*   दीपा मलिक (पॅरालिंपिकपटू)            *   दीपा कर्माकर (जिम्नॅस्ट)

*   भावना सोमय्या (पत्रकार)                *   श्रीजेश (हॉकीपटू)

*   विकास गौडा (थाळीफेकपटू)             *   सी नायर (नर्तक)

*   अनुराधा पौडवाल (गायिका)             *   कैलाश खेर (गायक)

*   संजीव कपूर (शेफ)                         *   नरेंद्र कोहली (लेखक)

*   कंबल सिब्बल                               *   बसंती बिश्त (संगीत)

*   काशिनाथ पंडीत                            *   अरुणा मोहंती (नृत्य)

*   भारती विष्णुवर्धन (चित्रपट)            *   साधू मेहर (चित्रपट)

*   टी. के. मूर्ती (संगीत)                      *   लैशराम वीरेंद्रकुमार सिंह (संगीत)

*   कृष्ण राम चौधरी (संगीत)               *   जीतेंद्र हरपाल (संगीत)

जीएसटीच्या चार विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

        गेल्या कित्येक वर्षांपासून अडकून पडलेले वस्तू व सेवा कर विधेयक हे राज्यसभेतही मंजूर 6 एप्रिल रोजी मंजूर झाले. 29 मार्च रोजी जीएसटीशी संबंधित चार विधेयके लोकसभेत मंजूर केली होती. त्यानंतर आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे. नव्या कायद्यामुळे देशभरात एकसमान करप्रणाली तयार होईल आणि त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल. जीएसटी संदर्भातील शेवटची मंजुरी 17-18 मे रोजी मिळेल असे अरुण जेटली म्हणाले. 1 जुलैपासून या कायद्याची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे.

        जर अनेक कर संपुष्टात येऊन एक कर राहिला तर सर्व वस्तू स्वस्त होतील असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या कराबाबत म्हटले होते. जीएसटीमुळे सर्व देशात वस्तूंचे एकसमान दर राहतील. जीएसटी हे 1950 पासून आतापर्यंत सर्वात मोठे अर्थविषयक विधेयक असल्याचे अरुण जेटलींनी म्हटले होते. जीएसटी लागू झाल्यानंतर भाववाढ आणि चलन फुगवटा होऊ शकतो. 1 जुलैपासून काही काळ ही भाववाढ अनुभवास येऊ शकते. नंतरच्या काळात किमती स्थिर देखील होतील. जीएसटीमध्ये नफेखोरांवर नियंत्रण राहील अशी व्यवस्था केली आहे.

           अवाजवी कर गुंता टाळून सुटसुटीतपणा आणणारा हा एक-सामाईक, किंबहुना एकमेव अप्रत्यक्ष कर संपूर्ण देशस्तरावर सारख्याच दराने लागू होईल. जीएसटी लागू झाल्यावर तो इतर सर्व करांची जागा घेईल. केंद्र व राज्य सरकारकडून वसूल होणार्‍या कोणत्या करांना वस्तू व सेवा कर पर्याय ठरेल. सध्या विविध कर आकारले जातात. त्यामुळे हे सर्व कर एका छत्राखाली आणून कर रचना सुटसुटीत करण्याच्यादृष्टीने जीएसटी आवश्यक आहे.

भारतीय व्यक्तीने बनवली सर्वात लांब मोटारसायकल

       विक्रमासाठी वाट्टेल ते करणारी अनेक माणसं या पृथ्वीतलावर आहेत. त्यामध्ये वाहनांबाबतही अनेक विक्रम करण्यात आलेले आहेत. अवाढव्य आकाराच्या ट्रकपासून ते लांबच लांब बसपर्यंतचे अनेक विक्रम झालेले आहेत. आता एका भारतीय व्यक्तीने जगातील सर्वाधिक लांबीची मोटारसायकल तयार केली आहे. ही मोटारसायकल तब्बल 26.29 मीटर लांबीची आहे.

       गुजरातच्या भरतसिंह परमार यांनी ही मोटारसायकल बनवली आहे. 86 फूट 3 इंच लांबीची ही मोटारसायकल पाहून अनेक लोक थक्क होतात. गिनिज बुकच्या अधिकार्यांनी जामनगरमध्ये 22 जानेवारी 2014 मध्येच या मोटारसायकलीचे निरीक्षण केले होते. भरतसिंह यांनी त्यावेळी त्यांना ही मोटारसायकल चालवूनही दाखवली होती. त्यानंतर गिनिज बुकने त्यांना ही जगातील सर्वात लांब मोटारसायकल असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. यापूर्वी जी मोटारसायकल सर्वात लांब असल्याचे म्हटले जात असे ती या मोटारसायकलपेक्षा तेरा फुटांनी लहान आहे.

समुद्रात 10 किलोमीटर खोलीवरही जीवसृष्टीचे संकेत

       पश्‍चिम पॅसिफिक महासागरात जगातील सर्वात खोल भाग आहे. मरियाना ट्रेंच नावाच्या या भागात संशोधकांनी जीवसृष्टीचे संकेत शोधले आहेत. समुद्रात दहा किलोमीटर खोलीवरही अशा जीवसृष्टी असू शकते हे या संशोधनातून दिसून आले आहे. समुद्रात अत्यंत खोल ठिकाणी पाण्याच्या दाबामुळे तसेच विरळ ऑक्सिजनमुळे जीवसृष्टी तग धरू शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र, 10 किलोमीटर खोलीवरही तिचे अस्तित्व असू शकते हे यावरून दिसून आले.

        नेदरलँडमधील युट्रेच युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी यासाठी रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल्स वापरले. अशा उपकरणाच्या सहाय्याने त्यांनी इतक्या खोलीवरून समुद्रतळाचे 46 नमुने गोळा केले. साऊथ चामोरो ज्वालामुखीजवळील समुद्रतळापासून हे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यांचे प्रयोगशाळेत निरीक्षण व विश्‍लेषण करण्यात आले. या नमुन्यांमधील क्षारात मिथेन वायू आणि हायड्रोजनही आढळला. त्यामुळे याठिकाणी त्यांचा अन्नाचा स्रोत म्हणून वापर करणारे सूक्ष्म जीवाणू असू शकतात हे दिसून आले.

महिला सुरक्षा - हरियानामध्ये ऑपरेशन दुर्गा

       महिलांच्या सुरक्षिततेसाठी हरियाना सरकारने महिलांची छेडछाड करणार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑपरेशन दुर्गा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत 72 जणांना ताब्यात घेतले आहे.

       उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांची छेडछाड करणार्‍या रोमिओंविरूद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून प्रेरित होऊन इतर काही राज्यांतही महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. हरियाणामध्ये ऑपरेशन दुर्गा मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी 24 भरारी पथकांची स्थापना केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात महिलांची छेडछाड करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

       याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले की, महिलांच्या सुरक्षिततेसाठी हरियाना सरकारची ऑपरेशन दुर्गा ही एक चांगली मोहीम आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपला बहुमोल वेळ व्यर्थ घालवू नये. त्यांनी आपले काम, अभ्यास आणि इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. अलीकडच्या काळात लक्ष विचलित झालेल्या तरुणांना योग्य मार्गावर आणणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

        एखादे चांगले पाऊल उचलले तर त्यात वाईट काय आहे?, असे म्हणत विविध ठिकाणांवरून मिळालेल्या तक्रारींमुळे भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे माध्यम सल्लागार अमित आर्य यांनी दिली.

ना घर का, ना घाट का

       गुरुवारी देशाच्या विविध राज्यांत झालेल्या 10 विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल आले आणि अनेकांना पुन्हा राजकीय हादरे बसले आहेत. कारण सध्या देशभर मतदान यंत्रावर शंका घेतल्या जात आहेत, पण त्या शंका घेणार्‍या व त्यासाठी थेट राष्ट्रपतींना साकडे घालायला गेलेल्या काँग्रेसला, कर्नाटकातील दोन्ही जागा राखता आल्या आहेत. साहजिकच तिथले काँग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यंत्राचे मतदान निर्दोष असल्याची ग्वाही दिलेली आहे. पक्षश्रेष्ठींचा अवमान होऊ नये, म्हणून त्यांनी निदान कर्नाटकात तरी मतदान यंत्रे निर्दोष असल्याचा दावा केला आहे. कारण स्पष्ट आहे. त्यांच्याच उमेदवाराचा मोठा विजय झाला आहे आणि विरोधातल्या भाजपच्या उमेदवाराचा कर्नाटकात पराभव झाला आहे.

        काँग्रेसचा मुख्यमंत्री आपल्याच विजयावर शंका तरी कशी घेऊ शकणार? काहीशी तशीच अवस्था दिल्लीचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय माकन यांची झाली आहे. कारण दिल्लीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार निवडून आलेला नसला, तरी त्याला प्रचंड यश मिळाले आहे. देशातल्या अन्य राज्यातही जिथे ज्याचे प्रभावक्षेत्र आहे, तिथे त्याच पक्षाला यश मिळताना दिसले आहे, पण काही ठिकाणी मात्र राजकीय उलथापालथ होत असल्याचे चित्र साफ होत चालले आहे. अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाने राजकारणात भर घातलेल्या आम आदमी पक्षाचा पुरता बुडबुडा फुटण्याची वेळ जवळ येत चालली आहे. देशातील डाव्या राजकारणाचा अस्त जवळ आल्याचीही लक्षणे यातून स्पष्ट झाली आहेत. दिल्लीच्या निकालांचे वेगळे आकलन करण्याची गरज आहे, पण पश्‍चिम बंगालमध्ये ममतांच्या तृणमूलने पुन्हा यश मिळवताना, डाव्यांचा पुरता बोर्‍या वाजला आहे. कंठी या विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी भाजपला तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती आणि काँग्रेससह डाव्या आघाडीचा पाठिंबा असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचा दुसरा क्रमांक आलेला होता.

      यावेळी तिथेच भाजपने दुसरा क्रमांक पटकावला असून, डाव्या उमेदवाराला तिसर्‍या क्रमांकावर ढकलून दिलेले आहे. अगदी नेमके सांगायचे तर भाजपचा मतदानातला हिस्सा तिपटीने वाढला असून डाव्यांचा हिस्सा तितक्या प्रमाणात घटला आहे. याचा अर्थ इतकाच, की विद्यमान डाव्या आघाडीचे नेतृत्व पक्ष व आघाडी रसातळाला घेऊन चालले आहे. त्यांचे बंगालमधून नामोनिशाण पुसले जात आहे. प्रमुख विरोधी पक्ष वा ममतांचा खरा प्रतिस्पर्धी म्हणून भाजपचा तिथे उदय होताना दिसतो आहे. बाकी आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान अशा राज्यात भाजपने आपली शक्ती कायम राखली आहे. तर हिमाचल प्रदेशात भाजपने मुसंडी मारली आहे. झारखंडात मात्र स्थानिक मुक्ती मोर्चाने बळ कायम राखले आहे. खरी चिंता केजरीवालना आहे.

      2012 सालात अवघा दीड वर्षाचा असलेला हा पक्ष, पूर्ण शक्तीनिशी दिल्ली विधानसभेच्या आखाड्यात उतरला होता. तेव्हा त्याला नावापुरते यश मिळेल अशी अपेक्षा होती, पण त्याने काँग्रेसला मागे टाकून मोठे यश मिळवले आणि भाजपचे बहुमत हुकल्याने काँग्रेस पाठिंब्यावर केजरीवाल अल्पावधीसाठी मुख्यमंत्री झाले, पण यश मिळवणे जितके अवघड, त्यापेक्षाही यश पचवणे अशक्य असते. केजरीवालसह त्यांच्या अनुयायांना त्या यशाचे इतके अपचन झाले, की त्यांनी दिल्लीच्या सत्तेला लाथ मारून थेट पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. त्यात सपाटून मार खाल्ल्यावर पुन्हा दिल्लीत येऊन त्यांनी नागरिकांची माफी मागितली आणि दिल्लीकरांनी मोठ्या मनाने या उतावळ्याला माफही केले होते. काही नवे करून दाखवील अशा अपेक्षेने मतदाराने केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला अभूतपूर्व बहुमत दिलेले होते, पण सत्तेत सहा महिने बसले नाहीत, तर केजरीवालनी पुन्हा नवी नाटके सुरू केली. बनेल राजकारण्यांनाही लाजवील असा भ्रष्टाचाराचा सपाटाच लावला.

      मात्र कुठलेही प्रश्‍न विचारले वा आरोप झाले, तर प्रत्यारोप करून अंग झटकण्याचा कांगावा चालू ठेवला. त्याची किंमत आता मोजायची वेळ आलेली आहे. मतदार सामान्य बुद्धीचा असला तरी तो जितका प्रेम करतो, तितकाच चिडल्यावर धडाही शिकवतो. हे केजरीवाल यांना समजले तरी खूप झाले. कारण 2 वर्षांपूर्वी हीच जागा त्यांच्या जर्नेलसिंग नावाच्या उमेदवाराने 56 टक्के मते घेऊन जिंकली, त्याच जागी आता त्याच आम आदमी पक्षाला अनामत रक्कम गमावण्याची नामुष्की आली.

अवघ्या 10 दिवसांनी दिल्लीच्या 3 महापालिकांचे मतदान व्हायचे असून, त्यात काय होणार आहे, त्याची जणू नांदी झाली आहे. केजरीवाल दिल्ली सोडून पंजाबचे मुख्यमंत्री व्हायला पळाले होते आणि या जागेचा आमदारही राजीनामा देऊन पंजाबात निवडणूक लढवायला गेला होता. तिथे तो पराभूत झालाच, पण इथे दिल्लीतला आम आदमी पक्षाचा पायाही खिळखिळा होऊन गेला आहे. एक जागा गमावल्याने विधानसभेत फरक पडलेला नाही, पण हाती असलेल्या बहुमताची व्यवहारातील पत मात्र संपलेली आहे. अर्थात, त्यातून धडा घेणे हा केजरीवाल मंडळींचा स्वभाव नाही. म्हणूनच पराभव स्वीकारण्यापेक्षा ते मतदान यंत्रावर दोषारोप करीतच राहतील. प्रत्यक्षात दिल्लीनंतर पंजाब-गोवा जिंकायला गेलेल्या या केजरीवालांची अवस्था ना घर का, ना घाट का, अशी झाली आहे. कारण पंजाब त्यांना जिंकता आला नाही आणि असलेला दिल्लीचा बालेकिल्ला मात्र वाळूच्या किल्ल्यासारखा ढासळू लागला. येऊ घातलेल्या राजकारणाची चिन्हे त्यात सामावलेली असल्याने प्रत्येक पक्षाने यातून धडा घेण्याची गरज आहे.

१२ एप्रिल २०१७

मानवी मोहिमेसाठी भारताचे एक पाऊल पुढे

        गेल्या 10 वर्षांहूनही अधिक काळ ज्या स्वप्नवत अशा मानवी अवकाश मोहिमेची स्वप्ने 21 व्या शतकातील महत्त्वाकांक्षी भारताला पडत आहेत, त्या मानवी अवकाश मोहिमेच्यादृष्टीने आपण नुकतेच एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रत्यक्षात जरी येत्या काही वर्षांनी इंडियन ह्युमन स्पेसफ्लाईट प्रोग्रॅम कार्यान्वित होणार असला, तरी त्यासाठी आवश्यक असणार्‍या किचकट तंत्रज्ञानापैकी एक अशा पॅड बॉर्ट टेस्ट या चाचणीचे पहिल्या टप्प्यावरील संशोधन नुकतेच यशस्वीपणे सुरू झाले आहे.

       रशियाचे अंतराळवीर व अंतराळात प्रवास करणारे जगातील पहिले मानव ठरलेले युरी गागारीन यांनी पहिल्यांदा आपली अंतराळ सफर केली ती 1961 मध्ये. 56 वर्षांपूर्वी ही सफर यशस्वीपणे पार पडली होती. त्यासाठी 12 एप्रिल हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणून राष्ट्रसंघातर्फे साजरा केला जातो.

        मानवी अवकाश मोहिमेच्या सुरुवातीस रॉकेट प्रक्षेपणाच्या टप्प्यावर अचानक काही आणीबाणी उद्भवल्यास अवकाशयानातील अंतराळवीर सुखरूप बाहेर पडू शकावा, यासाठी पॅड बॉर्ट टेस्ट केली जाते. त्यातील सुरुवातीच्या काही नोंदी हे संशोधन योग्य दिशेने जात असल्याचे दाखवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या काही महिन्यांत या चाचणीचे सर्व टप्पे पार पडल्यावर मानवी अवकाश मोहिमेसाठीचा पुढील टप्पा सुरू होईल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथे या चाचण्या पार पडणार आहेत.

असा आहे भारतीय स्पेस ओडिसीचा प्रवास -

          आत्तापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनीच यशस्वी मानवी अवकाश मोहिमा केल्या आहेत. याच रांगेत येत्या काही वर्षांत भारतही यशस्वीपणे जाऊन बसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी अवकाश मोहिमांच्यादृष्टीने काही महत्त्वाच्या अशा तंत्रज्ञानाला सध्या इस्रोकडून युद्धपातळीवर विकसित करण्यात येत आहे. पैकी स्पेस कॅप्स्युल रिकव्हरी एक्स्परीमेंट (एसआरई), रियुझेबल लॉन्च व्हेइकल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर (आरएलव्हीटीडी) असे काही प्रयोग गेल्या काही वर्षांत विविध टप्प्यांवर यशस्वीही ठरले आहेत.

दिलीप कुमार लिव्हिंग लीजेंड लाईफटाईम पुरस्काराने सन्मानित

        बॉलीवुड अभिनेते दिलीप कुमार यांना त्यांच्या निवासस्थानी पंजाब असोसिएशनच्यावतीने लिविंग लीजेंड लाइफटाइम पुरस्काराने सम्मानित केले.

       94 वर्षीय अभिनेते दिलीप कुमार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकौंटवर ही माहिती दिली. दिलीप कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंजाब असोसिएशनचे रणबीर सिंह चंडोक आणि आनंद घरी आले. ईश्‍वर दयाळू आहे. पंजाब असोसिएशनच्यावतीने लिव्हिंग लीजेंड लाईफटाईम पुरस्काराने सम्मानित केल्याने मला अभिमान आहे.

यापूर्वी दिलीप कुमार यांना 1998 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2015 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

भज्जी चॅम्पियन चषकाचा अॅम्बेसेडर

        इंग्लंडमध्ये 1 ते 18 जूनदरम्यान होणार्‍या चॅम्पियन चषकासाठी टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू हरभजनसिंगसह आठजणांची अ‍ॅम्बेसेडर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) नियुक्ती करण्यात आली आहे. भज्जीशिवाय पाकचा शाहीद आफ्रिदी, बांगलादेशचा हबीबउल बशर, इंग्लंडचा इयान बेल, न्यूझीलंडचा शेन बाँड, ऑस्ट्रेलियाचा मायकेल हस्सी, लंकेचा कुमार संगकारा आणि द. आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ हे माजी खेळाडूही अ‍ॅम्बेसेडर असणार.

        2002 साली लंकेत झालेली ही स्पर्धा भारताने जिंकली होती आणि या संघात भज्जीचा समावेश होता. चॅम्पियन चषकाच्या या आठ अ‍ॅम्बेसेडरने एकूण 1774 वन-डे खेळल्या असून 51 हजार 906 धावा आणि 838 विकेट घेतल्या आहेत. हे आठ जण चॅम्पियन चषक टूरमध्ये सहभागी होतील. मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्पर्धेला आता 50 दिवसांचा कालावधी शिल्लक असून ओवल येथील मैदानावर 1 जूनला पहिली लढत यजमान इंग्लंड आणि बांगलादेशदरम्यान होणार. 

चार चेंडूतच त्याने दिल्या 92 धावा...!

      क्रिकेटच्या मैदानावर अनेक अनोखे विक्रम होतात आणि ते इतिहासातही नोंदवले जातात. असा एक अनोखा, पण विचित्र विक्रम ढाक्यातील डिव्हिजन लीग स्पर्धेत घडला. पंचांच्या पक्षपाती निर्णयाचा निषेध म्हणून एक्झियोम क्लबविरुद्ध लढतीत लालमाटिया क्लबच्या सुजोन मेहमूदने तब्बल 80 अतिरिक्त धावा जाणीवपूर्वक दिल्या. यामुळे एक्झियोम क्लबने 4 चेंडूत बिनबाद 92 धावा काढून विजय साजरा केला.

       ही लढत 50 षटकांची होती आणि लालमाटिया क्लब 14 षटकांत 88 धावांतच सर्वबाद झाला. त्यांचा एक फलंदाज धावचित झाला तर तीन पायचित, एक यष्टिचित झाला. मात्र पंचांनी जाणीवपूर्वक आमच्या फलंदाजांना बाद दिले, असा आरोप लालमाटिया क्लबने केला. पंचांचा निषेध करण्यासाठी या संघाने जाणीवपूर्वक अतिरिक्त धावा  दिल्या आणि एक्झियोम संघाला विजयी होऊ दिले.

        आपल्या खेळाडूंनी केलेल्या या कारनाम्याला लालमाटिया संघाचे सचिव अदनान रेहमान यांनी पाठिंबा दिला आहे. पंचाचे पक्षपाती निर्णय नाणेफेकीपासून सुरू झाले. आमच्या कर्णधाराला नाणेदेखील पाहू दिले नाही आणि फलंदाजी करण्यास सांगण्यात आले. आमचे खेळाडू युवा असून त्यांना अन्याय सहन होऊ शकत नाही म्हणून त्यांनी 4 चेंडूत 92 धावा दिल्या, असे रेहमान यांनी म्हटले आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळातर्फे या लीग सामन्यांचे आयोजन केले जाते. जे काही घडले ते अतिशय थक्क करणारे आहे, अशी प्रतिक्रिया मंडळाच्या प्रवक्त्याने दिली. 

विरार लोकलला 150 वर्षे पूर्ण

      विरार लोकलला आज 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. 12 एप्रिल, 1867 रोजी  विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे 6.45 वाजता विरारहून सुटायची व सायंकाळी 5.30 वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.

       महिलांसाठी ट्रेनमध्ये वेगळा दुसर्‍या श्रेणीचा डबा होता. याव्यतिरिक्त एक स्मोकिंग झोनही होता. त्याकाळी या ट्रेनमध्ये तीन श्रेणी होत्या. लोक सामान्यत: दुसर्‍या श्रेणीने प्रवास करायचे. प्रति मैलाचा दर होता 7 पैसे. तिसर्‍या श्रेणीसाठी दर होता 3 पैसे. त्यावेळी चर्चगेट ते विरार हा प्रवास आज या प्रवासाला लागणार्‍या वेळेपेक्षा कमी वेळात पूर्ण होत असे, कारण मध्ये स्थानके कमी होती. त्यावेळेची स्थानके अशी होती नीअल (नालासोपारा), बसीन (आमची वसई), पाणजू (वसईच्या दोन खाड्यामधले स्थानक), बेरेवाला (बोरीवली), पहाडी (गोरेगाव), अंदारु (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर), ग्रँट रोड.

      मात्र आजच्या दिवसापेक्षा रेल्वेच्या इतिहासात 16 एप्रिल 1853 ला अधिक महत्त्व आहे, कारण या दिवशी ठाणे ते बोरीबंदर ट्रेन - देशातली पहिली ट्रेन - धावली. पण ती लोकल नव्हती. लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा 1 फेब्रुवारी 1865 रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्‍चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरुप या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. 6 डब्यांपासून 15 डब्यांपर्यंत लांबलचक झाली ही गाडी. पादचारी पूल तयार झाले. पश्‍चिम रेल्वेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली, अशी माहिती पश्रि्चम रेल्वेचे सीपीआरओ रवींदर भाकर यांनी दिली.

       पश्‍चिम रेल्वेचे माजी मुख्य ऑपरेशन मॅनेजर ए. के. श्रीवास्तव म्हणाले, या रेल्वेमार्गावर रोज लाखों प्रवासी प्रवास करतात, पण त्यापैकी अनेकांना आजचा दिवस माहित नसेल. हे दुर्भाग्यपूर्णच आहे.मध्य रेल्वेच्या तुलनेत या दिवसाचे महत्त्व रेल्वेच्या इतिहासात तसे कमीच आहे.

कॅसिनीने टिपले शनीच्या सी कडीचे छायाचित्र

      शनी व त्याचे साठाहून अधिक चंद्र यांचे निरीक्षण करण्यासाठी नासाने कॅसिनी हे यान पाठवले आहे. आता या यानाने शनीच्या सी कडीची जवळून छायाचित्रे टिपली आहेत. यापूर्वी कॅसिनीने शनीची व त्याच्या टायटन, एन्सिलाडससारख्या अनेक चंद्रांचीही छायाचित्रे टिपली आहेत.

     नासाने म्हटले आहे की या नव्या छायाचित्रांमध्ये सी रिंग अन्य कड्यांच्या तुलनेत अधिक उजळ दिसते आणि त्यामुळे कडीच्या सुमारे बारा भागांचे निरीक्षण सोपे झाले आहे. या उजळ भागांना प्लॅटस् असे संबोधले गेले असून तुलनेने कमी उजळ असलेल्या सहा भागांना गॅप्स असे संशोधकांनी म्हटले आहे. उजळ भागात कणांची अधिक घनता असल्याने त्यावरून अधिक प्रकाश परावर्तित होतो. त्यामुळेच हा भाग अधिक प्रकाशमान आहे. मात्र, हे प्लॅटस कसे निर्माण झाले व ते कसे टिकून राहिले, हे संशोधकांना अद्याप समजलेले नाही. कॅसिनीने हे नवे छायाचित्र शनीपासून 3 लाख 12 हजार किलोमीटर अंतरावरून टिपले आहे.

जगातील सर्वात शक्तिशाली रडार प्रणाली

     युद्ध असो किंवा शांततेचा काळ असो, गाफिल न राहता युद्धसज्जता ठेवणे हे प्रत्येक देशाला स्वसंरक्षणासाठी गरजेचे असते. भारताने हा धडा 1962 च्या चीन युद्धावेळी शिकला होता. आता भारताची युद्धसज्जता जागतिक स्तरावरही चर्चेत असते. अशा सज्जतेत क्षेपणास्त्रांपासून ते रणगाड्यांपर्यंत अनेक हत्यारे, उपकरणे यांच्या सुसज्जतेचा समावेश असतो. लढाऊ विमाने किंवा युद्धनौकाही अत्यंत कार्यक्षम असाव्या लागतात. त्यामध्येच रडार यंत्रणेचाही समावेश होतो. अमेरिकेतील सागरी रडार यंत्रणा जगात सर्वाधिक शक्तिशाली मानली जाते.

       अमेरिकेने आपली सर्वात आधुनिक समुद्री एक्स-बँड रडार (एसबी-एक्स) फेब्रुवारी महिन्यात पेनिनसुला रवाना केली होती. ही एसबी-एक्स यंत्रणा लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची माहिती घेण्यात सक्षम आहे. यासोबतच संबंधित क्षेपणास्त्राच्या क्षमतेची इत्थंभूत माहिती देते. हे रडार आयसीबीएमवर देखरेख करण्यास सक्षम आहे व धोकादायक किंवा धोकादायक नसलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये अंतर पाडू शकते. सुमारे 50 हजार टन वजनाची ही रडार सिस्टीम प्रत्यक्षात एखाद्या युद्धनौकेपेक्षा कमी नाही.

       एसबी-एक्स 28 मजली उंच आहे व त्याचे डेक सुमारे दोन फुटबॉल मैदानाइतके आहे. रडारची निर्मिती अमेरिकेतील मिसाईल डिफेन्स सिस्टीम एजन्सीद्वारे करण्यात आली. रडारची रेंज 2000 कि.मी.पर्यंत आहे. त्यामुळे याला जगातील सर्वात पॉवरफुल रडार सिस्टीम मानले जाते.

भारत दिवसेंदिवस का तापतोय ?

    भारतातील तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळेच आपल्याला असह्य उकाड्याला तोंड द्यावे लागत आहे. एरवी फक्त मे महिन्यात छळणारा हा उकाडा आता मार्चपासूनच आपली तीव्रता दाखवत आहे. याचे कारण काय? उष्णतेची ही लाट कशामुळे येते? याची शास्त्रीय कारणे काय? याचा हा एक आढावा -

उष्णतेची लाट म्हणजे काय ?

        नेहमीच्या सरासरी तापमानात साडे चार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान वाढ होणे यालाच उष्णतेची लाट येणे असे मानले जाते, तसेच सात अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानवाढ ही तीव्र उष्णतेची लाट मानली जाते. मे महिन्यातील सरासरी 42 अंश सेल्सिअस असणारे तापमान 2010  मध्ये 47 अंश सेल्सिअसवर पोचले होते, त्या वर्षी उष्माघातामुळे 100 जणांचा मृत्यू झाला होता.

       भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, मागील शतकात भारताचे सरासरी तापमान 0.6 अंश सेल्सियसने वाढले आहे. 2016 हे 1901 पासून ते आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते. 2000 ते 2015 या 15 वर्षांपैकी तब्बल 13 वर्षे ही उष्ण वर्षे राहिली आहेत. ही उष्णता मापण्यासाठी हवामान विभागाची देशभरात 110 केंद्रे आहेत. 1991 नंतर भारतात उष्णतेची लाट येण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि हे प्रमाण 2020 पासून जास्तच होण्याची शक्यता आहे

याची नेमकी कारणे काय ?

      या तापमान वाढीचे आपल्याला माहित असणारे कारण म्हणजे ग्लोबल वार्मिंग हे होय. पण याची आणखी काही महत्वपूर्ण कारणे आहेत. उष्णतेच्या लाटेसंबंधी लागणारी आकडेवारी ही मार्च ते जून या दरम्यानची असते. आतापर्यंतच्या माहितीनुसार एप्रिल आणि मे या महिन्यांच्या तुलनेत मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचे प्रमाण कमी राहिले आहे. विशेषतः ज्या वर्षी ’अल निनो’ चा प्रभाव असतो  त्यावर्षी भारतात प्रचंड प्रमाणात उष्णता वाढते. आणि मध्य पॅसिफिक महासागराच्या असंगत तापमान वाढीमुळे भारताच्या मान्सूनवरही विपरीत परिणाम होऊन पाउस कमी पडतो. असे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. 1983, 1988, 1995, 1998, 2003, 2005, 2010 या अल निनो वर्षात उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या होत्या, असे 2000 सालच्या एस. के. चौधरी यांच्या अभ्यासात म्हटले आहे. 1961 ते 2010 पर्यंतच्या 11 अल निनो वर्षांपैकी 8 वर्षात उष्णतेची लाट आली.

         तसेच आपल्या देशाला लागून असणारा हिंदी महासागर हा इतर समुद्रांच्या तुलनेत जलद तापतो. याचा परिणाम भारातातील आर्द्रता कमी होण्यावर होतो. हे सुद्धा आपल्या तापमान वाढीचे कारण असल्याचे समोर आले आहे.त्याचबरोबर निर्वनीकरण, ओद्योगिक प्रदूषण यासारखी मानवनिर्मित कारणे सुद्धा याला कारणीभूत आहेत.

कोठे उष्णतेचे प्रमाण जास्त असते ?

        भारताचा उत्तर आणि वायव्य भाग, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्‍चिम बंगाल या राज्यांच्या किनारपट्टी भागात उष्णतेच्या लाटा मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. तसेच हिमालयाचा पठारी प्रदेश, उत्तर आंध्रप्रदेश, आणि मध्य भारत या भागात हळूहळू तापमान वाढ होत आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात शिमला, कुलू यासारख्या पर्यटन स्थळांवर तापमान वाढल्याचे दुर्मिळ चित्र पहावयास मिळाले होते.

उष्णतेच्या लाटेचा आपल्यावर काय परिणाम होतो ?

       उष्णतेच्या लाटेमुळे निर्जालीकरणाचा त्रास होऊ शकतो यामुळे प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो. उष्माघाताने बळी गेल्याच्या अनेक बातम्या आपण पाहत असतो. 2015 या वर्षात एकट्या आंध्रप्रदेशमध्ये 1422 तर तेलंगणात 541 लोकांचा जीव उष्णतेच्या लाटेमुळे गेला होता. त्यानंतर सरकारने योग्य ती पावले उचलल्याने 2016 मध्ये हे प्रमाण कमी झाले. यासाठी सरकारने उष्णतेच्या लाटेची पूर्वसूचना  देऊन घरातून बाहेर न पडण्यास सांगितले होते. तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढवली होती.

आयर्लंडमध्ये हिंदूंच्या संख्येत 34 टक्क्यांनी वाढ

       एकेकाळी समुद्र ओलांडून जाणे हे निषिद्ध आहे, असा मूर्ख समज पसरवण्यात आला होता. मात्र, हनुमानांनी समुद्र ओलांडूनच ईश्‍वरी कार्य साधले, हे अशा रूढी निर्माण करणारे सोईस्कररीत्या विसरले. अशा विचित्र रूढी व कालबाह्य (आणि धर्मबाह्य) परंपरांनी हिंदू धर्म जोखडात अडकला होता. मात्र, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, परमहंस योगानंद, स्वामी राम, महर्षी महेश योगी, ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांच्यासारखे अनेक महान संत आणि रामकृष्ण मिशन, स्वामिनारायण संप्रदाय, इस्कॉनसारख्या अनेक संस्थांनी जगातील या सर्वात प्राचीन धर्माचा अन्य देशांमध्ये मोठाच प्रसार केला. त्यामुळे सध्या जगभर अनेक वंशाचे व वर्णाचे लोक हिंदू धर्म स्वीकारत असल्याचे चित्र ठळकपणे दिसून येते. आयर्लंडमध्ये झालेल्या 2016 च्या जनगणनेनुसार मागील 5 वर्षांत आयर्लंडमध्येही हिंदूंची संख्या 34 टक्क्यांनी वाढली.

        जगातील सर्वच खंडांमध्ये सध्या हिंदू धर्माचा मोठा प्रसार झालेला आहे. त्यामध्ये अगदी आफ्रिकेतील घानासारखा देशही अपवाद राहिलेला नाही. हृषिकेशचे ब्रह्मलीन स्वामी शिवानंद यांचे आफ्रिकन शिष्य असलेले संन्यासी स्वामी घनानंद यांनी घानामध्ये अनेक दशकांपूर्वीच भारतीय संस्कृतीचा परिचय करून दिला होता. तिथे आता असंख्य मूळ कृष्णवर्णीय लोक अगदी आपल्यासारखेच गणेशचतुर्थी वगैरे सणही साजरे करतात व वैदिक पद्धतीने विवाह करतात. आफ्रिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत आणि इंग्लंडपासून अमेरिकेपर्यंत अनेक देशांमध्ये भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचा असा प्रसार झालेला दिसत आहे. त्याचेच प्रतिबिंब आयर्लंडमधील जनगणनेवरही उमटलेले दिसून आले. 4.76 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या आयर्लंड देशात गेल्या पाच वर्षांच्या काळातच हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तो या देशातील सर्वात वेगाने वाढत असलेला धर्म ठरला आहे.

११ एप्रिल २०१७

साक्षी मलिक जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी

        रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. जागतिक कुस्ती महासंघाने नुकतीच ही क्रमवारी जाहीर केली आहे.

साक्षीने 58 किलो वजनी गटात खेळताना सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकमधील तिची कामगिरी नेत्रदीपक होती. भारताला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकून देणारी ती पहिली महिला होती. या कामगिरीच्या जोरावरच साक्षीने क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले आहे. महिलांच्या क्रमवारीत जपानची काओपी इचो अव्वल स्थानावर आहे.

पुरुषांमध्ये 57 किलो वजनी गटामध्ये भारताच्या संदीप तोमरने अव्वल 10 कुस्तीपटूंमध्ये प्रवेश केला आहे. या गटामध्ये जॉर्जियाच्या व्लादिमीर के. याने अव्वल स्थान पटकावले आहे. साक्षी आणि संदीप हे दोघेही आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेची तयारी करत आहेत. ही स्पर्धा 10-14 मे या कालावधीमध्ये होणार आहे.

जगातील सर्वात महागडी युद्धनौका

        अमेरिकेत सर्वात महागडी युद्धनौका लाँच केली असून यूएसएगेराल्ड आर फोर्ट लाँच केली आहे. याची किंमत सुमारे 83,928 कोटी रूपये सांगितली आहे. याचा फ्लाईट डेकचा आकार 5 एकर आहे. यावर एकावेळी 72 एयरक्राफ्ट उभे राहू शकतात.

        युद्धाच्यावेळी रोज 220 विमाने उड्डाण करू शकतात. याची सिस्टीम लेजर किरणांनी अपग्रेड केली जाऊ शकते. गेराल्ड आर फोर्ड अमेरिकेचे निमित्ज-क्लास करियर रिप्लेस करेल, जो 51 वर्षांच्या सेवेनंतर 2012 मध्ये रिटायर करण्यात आली आहे. गेराल्ड आर फोर्डटी लाँचिंग 2015 मध्ये होणे अपेक्षित होते. त्यावेळी त्याचे 67,788 कोटी रूपये इतके होते. पण लाँचिंगला 2 वर्षाचा उशीर झाला. त्यामुळे त्यात आणखी 16 हजार कोटी रुपयाची वाढ झाली. अमेरिकेकडे अशा तीन युद्धनौका तयार होत आहे. बाकी दोनमधील एक युद्धनौका 2020 तर दुसरी 2025 मध्ये लाँच होईल.

पुलित्झर पुरस्कारांची घोषणा

       पुलित्झर पुरस्कार समितीने 101 व्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये द न्यूयॉर्क टाइम्सला सर्वाधिक तीन पुरस्कार मिळाले. द न्यूयॉर्क डेली न्यूज आणि प्रॉपब्लिकाला समाजसेवी पत्रकारितेसाठी संयुक्तपणे गौरवण्यात आले. पुलित्झर अमेरिकेतील सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. पुलित्झर पुरस्कार सर्वप्रथम 1917 मध्ये देण्यात आला होता. पुलित्झर पुरस्कार विजेत्यांना 15 हजार अमेरिकन डॉलर (96 लाख रुपये) आणि प्रमाणपत्र दिले जाते. द न्यूयॉर्क डेली न्यूज आणि प्रॉपब्लिकाने न्यूयॉर्क पोलिसांवर एक संयुक्त मालिका केली होती. यामध्ये अनेक दशकांपूर्वीच्या कायद्यांचा वापर करुन सामान्य लोकांना त्यांच्या घरातून आणि त्यांच्या उद्योगातून हटवले जात होते. या दोन्ही वृत्तपत्रांच्या या मालिकेला सुवर्ण पुरस्काराने गौरवण्यात आले. समाजसेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो.

विविध विभागांमधील पुरस्कार विजेत्यांची यादी -

*   समाजसेवा करणारी पत्रकारिता - द न्यूयॉर्क डेली न्यूज आणि प्रॉपब्लिका

    पत्रकार सारा राईले यांनी गरिबांना त्यांच्या घरांमधून, दुकानांमधून बाहेर काढण्यात येणार्‍या अनेक दशके जुन्या नियमांचा दुरुपयोग उजेडात आणला होता.

*   ब्रेकिंग न्यूज वार्तांकन - ईस्ट बे टाईम्स, ऑकलंड

    घोस्टशिप अग्निकांडाच्या अथक वृत्तांकनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये 36 लोकांना जीव गमवावा लागला होता. यामधून अग्निशमन दलाशी संबंधित त्रुटी प्रकाशझोतात आल्या होत्या.

*   शोधपत्रकारिता - डब्ल्यू व्ही के एरिक आयर, चार्स्टटन गॅजेट-मेल, चार्ल्सटन

    अमेरिकेत वेस्ट व्हर्जिनियामध्ये अतिसेवनाचे सर्वाधिक बळी जातात. याबद्दल प्रचंड विरोधाला सामोरे जाऊन सखोल वृत्तांकन केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. साहसी पत्रकारितेचा हा गौरव असल्याचे पुलित्झर पुरस्कार समितीने म्हटले आहे.

*   व्याख्यात्मक पत्रकारिता - इंटरनॅशनल कनसार्सियम ऑफ इन्वेस्टिगेशन जर्नलिस्ट, मॅकक्लाची अ‍ॅण्ड मियामी हेराल्ड

    6 खंडातील 300 पत्रकारांशी परदेशांमध्ये लपवला जाणार्‍या काळ्या पैशांचे वृत्तांकन केले. पनामा पेपर्सशी संबंधित असलेल्या वृत्तांचा यामध्ये समावेश होता.

*   स्थानिक वृत्तांकन -  द सॉल्ट लेक ट्रिब्यून चे कर्मचारी

    ब्राईगम यंग विद्यापीठातील लैंगिक अत्याचार पीडितांच्या व्यथांना वाचा फोडल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

*   राष्ट्रीय पत्रकारिता - डेव्हिड ए फाहरेंथोल्ड, द वॉशिंग्टन पोस्ट

    राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील पारदर्शी वृत्तांकनासाठी पुरस्कार देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प समाजसेवी संस्थांबद्दल उदार असल्याच्या राजकीय प्रचारामागील सत्य उजेडात आणल्याबद्दल गौरव करण्यात आला.

*   आंतरराष्ट्रीय पत्रकारिता - द न्यूयॉर्क टाइम्सचे कर्मचारी

    रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वत:च्या देशाला सामर्थ्यवान देश म्हणून जगासमोर आणण्यासाठी मोहीम राबवली. याबद्दलच्या वृत्तांकनासाठी गौरव करण्यात आला. पुतीन यांच्याकडून करण्यात येणार्‍या हत्या, ऑनलाइन छळ आणि विरोधकांविरोधात पुरावे तयार करणे, याबद्दलच्या वृत्तांकनासाठी हा पुरस्कार दिला.

14 एप्रिलपासून डिजिटल व्यवहारांवर कॅशबॅक

       पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिलला नागपुरात डिजिटल मेळाव्यात दोन नव्या योजनांची सुरुवात करण्याची शक्यता आहे. त्यानुसार सरकारी डिजिटल व्यवहार केल्यास किंवा डिजिटल व्यवहार करण्यासाठी इतरांना प्रेरित केल्यास सरकारकडून कॅशबॅक देण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देणे हा या पाठीमागील सरकारचा हेतू आहे. सरकारी देयकावर साधारणत: 150 ते 250 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक दिले जाणार आहे.

         शासनाच्या भीम अ‍ॅप, आधार अनबेल पेमेंट यंत्रणेद्वारे केल्या जाणार्‍या व्यवहारांवर सरकारकडून कॅशबॅक देण्यात येईल. मात्र, इतर खासगी कंपन्यांच्या अ‍ॅपवरुन किंवा बँकांच्या अ‍ॅपवरुन करण्यात येणार्‍या व्यवहारांसाठी सरकारकडून कॅशबॅक दिले जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

            दुसर्‍या योजनेनुसार, एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्राला सरकारच्या डिजिटल माध्यमांतून व्यवहार करण्यासाठी प्रेरित केल्यास 30 रुपयांचे अतिरिक्त कॅशबॅक मिळू शकते. कॅशबॅकची रक्कम व्यवहारांच्या संख्येवर ठरणार आहे. लोकांनी अधिकाधिक डिजिटल व्यवहार करावेत, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य मिळावे, यासाठी या योजना सुरु करण्यात येणार आहेत.

सैन्याच्या कँपच्या सुरक्षेसाठी 18 हजार सैनिकांची गरज

       भारतीय सेनेला आपल्या कँप सुरक्षेसाठी अतिरिक्त तुकड्यांची गरज आहे. सेनेच्या रक्षा मंत्रालयाने डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सला (डीएससी) 370 नव्या तुकड्या निर्माण करण्याची मागणी केली आहे. या नव्या तुकड्यांसाठी जवळपास 18 हजार सैन्याची भरती करणे आवश्यक आहे. भारतीय सेनेला देशातील प्रमुख सैन्य मुख्यालये आणि कँप यांना सुरक्षा देणा-या प्रशिक्षित सैनिकांची गरज आहे.

        माजी उपसेना प्रमुख लेफ्टनंट जनरल फिलिप कँपोस यांच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार अतिरिक्त सैनिकांची मागणी करण्यात आली आहे. कँपोस समितीने आपल्या एक वर्षाच्या व्यापक ऑडिटमध्ये देशातील सैन्य मुख्यालयांच्या सुरक्षेत कमतरता असल्याचा अहवाल मागील वर्षी मे महिन्यात सादर केला होता.

       पठाणकोट हल्ल्यानंतर सैन्य आणि सुरक्षा मुख्यालयांच्या सुरक्षा व्यवस्थेत कसे बदल करता येतील यासाठी माजी उपसेना प्रमुख लेफ्टनंट जनरल फिलिप कँपोस यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. यानंतर तिन्ही सैन्य मुख्यालयांमध्ये सुरक्षा मुद्यांवर चर्चा झाली. पण त्या नंतरही सरकार समितीच्या शिफारसी लागू करू शकले नाही. अशी माहिती समोर येत आहे. 

१० एप्रिल २०१७

स्मिता संधाने सारस्वतच्या पहिल्या महिला एमडी

        शंभराव्या वर्षांत पदार्पण करणार्या सारस्वत सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी स्मिता संधाने यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्या बँकेच्या इतिहासातील पहिल्या महिला एमडी नियुक्त झाल्या आहेत. एस. के. बॅनर्जी 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर स्मिता संधाने यांनी पदभार स्वीकारला.

        ऑगस्ट 2016 मध्ये त्यांची सहव्यवस्थापकीय संचालिका म्हणून निुयक्ती झाली होती. त्यांनी यापूर्वी बँकिंग, प्लॅनिंग, अकाऊंट्स आणि स्ट्रेस्ड अॅचसेट्स अशा विविध क्षेत्रांच्या विभागप्रमूख म्हणूनही काम पाहिलेले आहे. बुडित असलेल्या तीन बँकांचे सारस्वतमध्ये विलीनीकरण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

एशियन बिझनेस वूमन ऑफ द इयर

        ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाच्या महिला शिक्षणतज्ज्ञाला ’एशियन बिझनेस वूमन ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर केला आहे. आशा खेमका (वय 65) असे या शिक्षिकेचे नाव असून, त्यांचा येथील एका कार्यक्रमात सत्कार केला. आशा खेमका या त्यांच्या विवाहानंतर ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाल्या. त्यावेळी इंग्रजी भाषेचे ज्ञान नसतानाही त्यांनी जिद्दीने ही भाषा आत्मसात करत त्या वेस्ट नॉटिंगहॅमशायर महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शिक्षणक्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

        खेमका या मूळ बिहारमधील सीतामढी गावातील असून, वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी शाळा सोडून दिली होती. यानंतर वयाच्या 25 मध्ये आपल्या पती आणि मुलांसह त्या ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या. येथे आल्यावर टीव्हीवरील लहान मुलांचे कार्यक्रम पाहत त्या इंग्रजी शिकल्या. त्यांनी कॅराडिफ विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि नंतर त्या प्राध्यापिका झाल्या.

        2013 मध्ये त्यांना ’डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा ब्रिटनमधील अत्यंत प्रतिष्ठेचा नागरी सन्मान प्राप्त झाला. हा पुरस्कार मिळविणार्या त्या 1931 नंतरच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत. 1931 मध्ये हा पुरस्कार धार संस्थानच्या महाराणी लक्ष्मीदेवीबाई साहिबा यांना मिळाला होता. ब्रिटनमधील श्रीमंत आशियाई व्यक्तींची यादीही यावेळी जाहीर केली. येथील एशियन मीडिया अँड मार्केटिंग ग्रुपतर्फे ही यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये बोपारन कुटुंबाची संपत्ती 90 कोटी पौंड, लॉर्ड स्वराज पॉल (80 कोटी पौंड), संजीव गुप्ता (25 कोटी पौंड) यांच्या नावांचा समावेश आहे.

डब्ल्यूटीओ करारातून बाहेर पडण्याचे फायदे तपासण्याची गरज

           केंद्र सरकारचा सध्या राष्ट्रीय खरेदी धोरण निर्मितीवर भर असल्याचे दिसून येत आहे. या नवीन धोरणात सरकारकडून साहित्य खरेदी केली जात असताना स्वदेशी पुरवठादारांना प्राधान्य दिले जाईल. समजा जर सरकारला दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी फाईल कव्हर खरेदी करायची असेल तर विदेशी पुरवठादार ते 8 रुपये प्रतिकव्हर या दराने द्यायला तयार आहेत. पण स्वदेशी पुरवठादार त्यासाठी 10 रुपये दराची मागणी करत आहेत. अशावेळी सरकार साहजिकच विदेशी पुरवठादाराला प्राधान्य देईल. पण स्वदेशी पुरवठादाराकडून कव्हर घेतल्यास त्याचे उत्पादन इथेच होत असते, देशात नोकर्‍या निर्माण होत असतात आणि करसुद्धा इथेच जमा होत असतो. यामुळे विदेशी पुरवठादारामुळे सरकारचे आर्थिक नुकसानच होणार आहे. विदेशी पुरवठादारांकडून साहित्य खरेदी केल्यास त्यांचे उत्पादन वाढेल, ते तांत्रिक संशोधन वाढवतील आणि विदेशात उद्योजकता वाढेल. जर भारत सरकार फाईल कव्हर किंवा इतर साहित्य स्वदेशी पुरवठादाराकडून मागविले तर याच गोष्टी भारतातही वाढू शकतील.

          हेच तत्त्व मग विदेशी व्यापाराच्या संदर्भात लागू होते. जागतिक व्यापार संघटनेशी (डब्ल्यूटीओ) केलेल्या करारानुसार भारताला आयातीवरील कर कमी ठेवावे लागत आहेत. त्यामुळे विदेशी पुरवठादार त्यांचा माल कमी दरात इथे विकत असतात. त्याचा परिणाम असा होतो की स्वदेशी उद्योगांना त्याचा जबर फटका बसतो. चीनमधून आयात होणार्‍या मालाचे उदाहरण याबाबतीत चपखल बसते. थोडावेळ आपण असे समजू या की, सरकारने आयातीचे कर वाढवले तर भारतीय बाजारात त्याच फाईल कव्हरची किंमत 8 वरून 11 रु पये प्रतिकव्हर होईल. अशावेळी मग बाजारातले ग्राहक स्वदेशी उत्पादकाच्या 10 रुपये प्रतिकव्हरच्या पर्यायाची निवड करतील. असे घडले तर भारतात रोजगार निर्माण होईल, कर जमा होईल. ग्राहकसुद्धा विदेशी मालापेक्षा स्वस्त असलेल्या स्वदेशी मालाला प्राधान्य देईल. स्वदेशात निर्मित उत्पादनाच्या खपामुळे रोजगार निर्मिती होईलच, पण इथल्या नागरिकांना अनेक दृश्य-अदृश्य फायदे मिळतील. डब्ल्यूटीओचे सध्याचे नियम आयात करात वाढ करण्यास परवानगी देत नाहीत. तसे असले तरी स्वदेशी उत्पादकांकडून सरकारी कामाचे साहित्य घेण्यावर कुठलेही बंधन नाही. आपण एका बाजूला विदेशी बाजारपेठांमध्ये तर पोहोचूच शकतो, पण त्याचबरोबर स्वदेशी उत्पादकांना प्रोत्साहनसुद्धा देऊ शकतो. आपण जर आयात कर वाढवलेच तर आपले डब्ल्यूटीओचे सदस्यत्व जाण्याची शक्यता आहे.

          स्वदेशी उत्पादनाला प्राधान्य दिले तर ते देशाला फायदेशीर ठरेल. तसेच चित्र सरकारच्या प्रस्तावित राष्ट्रीय खरेदी धोरणातून दिसून येत आहे. यातून होणारा फायदा सरकारला बाजारपेठेतील खरेदीतून होईल. पण स्वदेशी बाजारपेठेतून खरेदी करण्यास प्राधान्य द्यायचे असेल तर आधी डब्ल्यूटीओ कराराच्या तरतुदींशी तडजोड करावी लागेल. म्हणून आपल्याला असेही मूल्यांकन करावे लागेल की स्वदेशी उत्पादकांना प्राधान्य देण्यात जास्त फायदा आहे की डब्ल्यूटीओच्या अखत्यारित राहणे जास्त फायद्याचे आहे. स्वदेशी उत्पादकांना प्राधान्य देऊन होणारा फायदा जास्त असेल तर निश्‍चितच आयात मालावरचा कर वाढवला पाहिजे, स्वदेशी उत्पादकांना प्राधान्य दिले गेले पाहिजे आणि गरज असेल तर डब्ल्यूटीओ करारातून बाहेर पडावे.

         माल, पेटंट संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक हे डब्ल्यूटीओचे चार स्तंभ आहेत. सध्या तरी डब्ल्यूटीओ करार दोन स्तंभांवर तयार करण्यात आला आहे. माल आणि पेटंट संरक्षण या त्या गोष्टी आहेत. प्रगत राष्ट्रे डब्ल्यूटीओच्या अखत्यारित राहून गुंतवणूक मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत, तर प्रगतिशील राष्ट्रे सेवा क्षेत्रात सहज प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या झाल्या भविष्यात घडणार्‍या गोष्टी. सामान्यत: भारताला मुक्त बाजारातून फायदा होत आहे. कार्पेट आणि औषधांसारख्या काही गोष्टींच्या निर्यातीतून तो फायदा होत आहे. पण पेटंट संरक्षणाच्या बाबतीत भारताला तोटाच होत आहे, कारण सर्वात जास्त पेटंट हे प्रगत देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे आहेत.

        आयात कर वाढवून स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यायचे किंवा नाही हा निर्णय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात असलेल्या पेटंटमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातला पैसा त्यांच्याच देशाकडे जातो किंवा नाही, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातून भारताला होणार फायदा जास्त आहे की कमी यावर अवलंबून आहे. केंद्र सरकारने तातडीने एक आयोग नेमून आंतरराष्ट्रीय व्यापारातून आणि पेटंटमुळे फायदा होतो किंवा तोटा याचा अभ्यास केला पाहिजे. जर आंतरराष्ट्रीय बाजारातून फायदा हा पेटंट गमावण्याच्या तोट्यापेक्षा कमी असेल तर आपण डब्ल्यूटीओ कराराच्या बाहेर यायलाच हवे.

नोटाबंदीनंतर 5400 कोटींची अघोषित संपत्ती

           9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 दरम्यान नोटाबंदीच्या काळात प्राप्तिकर विभागाने 31 जानेवारीदरम्यान जमा रोकडच्या इ-व्हेरिफिकेशनसाठी डेटा विश्‍लेषणसाठी ऑपरेशन क्लीन मनी सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्याप&#