Menu

Study Circle

animated-mobile-phone-image-0008 common number : 9595493355 

 

8th Spradha Pariksha Sahitya Sammelean 2017

८वे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन, ठाणे २०१७

850;478;16ac877a2aa288bd0c55d5c34e2550ed5b18e8da850;478;1da5c02b09b62cdd575698b0e196e18ca86c55a3850;478;7910d5ccca7146ae47f2595538ddaeae515abb93850;478;89c906e0402744807a1940cb364cf6c77c3a29a7850;478;31adc1145a342e9d3710f1cfc4f97d063371e848850;478;71996ffa09fb38b3b640e7b52d4ddb71bd2f19ef850;478;23f4b21af5d5087a8f6e4840e0e72573d9715d1f850;478;564d3bae4d1e2cc6436b9a195a23b052fbda7bba850;478;a8e752f08b3ee60e3e5d8a77f852a9ea38ca033d850;478;fe63bf0053faa37d395c76f8c435c39ea661db67850;478;352987d57b6baf8c5a7205a682498ca1f6426446850;478;2c123159ac6a7851d43efbad15902d598b9db391850;478;2f67319cabde21b3a8363ac50a03aeecb624d936
जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ केंद्रीय स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ

1)   आठव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने आपण या चळवळीला कोणती दिशा देऊ इच्छिता?

      उत्तर - सर्व प्रथम आजपर्यंत झालेला 7 साहित्य संमेलनाचे व मार्गदर्शक गुरुवर्याचे स्मरण करतो. 8 व्या संमेलनाचे वैशिष्ट्ये म्हणजे महाराष्ट्रातील दूरदरच्या दुर्गम भागातील राहणारा विद्यार्थी वर्गापर्यंत ज्ञान पोहचविणे, हा उद्देश आहे. विद्यार्थी हुशार असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध होतेच असे नाही परंतु स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण अशा सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहचू शकू त्यांनाही आपण जीवन सुधारण्यासाठी मदत करु शकू.

2)   उमेदवाराने पोलीस प्रशासनात कोणत्या हेतुने यावे ?

      उत्तर - सर्व स्पर्धा परीक्षा इच्छुक उमेदवारांनी सर्व स्पर्धा परीक्षांना बसावे ही आशा आहे. या परीक्षेतून कोणत्या पदासाठी निवड होईल हा नंतरचा भाग आहे. परंतु या प्रक्रियेद्वारे त्यांची पोलीस प्रशासनात निवड होऊ शकेल. काहींची सेल्स टॅक्स ऑफिसर, मंत्रालय असिस्टंट म्हणून निवड होईल. शासनातील अनेक जागांसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. परंतु प्रशासनातील पोलीस हे महत्त्वाचे खाते आहे. या खात्यात आपण जर आलो तर आपल्याला चांगली प्रतिष्ठा मिळते. युनिफॉर्म असल्याने एक वेगळी छाप लोकांवर पडते. लोेक आपल्याकडे अनेक अडचणी घेऊन येतात. त्या अडचणी आपण सोडविल्या तर एक वेगळे समाधान आपल्याला मिळते, सरकारी नोकरी असल्याने सरकारी नोकरीचेही अनेक फायदे आपणास मिळतात.

3)   शासनाने जी PSI वयोमर्यादा वाढविली आहे. त्याबद्दल आपले मत काय ?

       उत्तर - शासनाने वर्यामर्यादा वाढवल्याने उमेदवाराला याचा नक्कीच फायदा होईल याची मला खात्री आहे. विद्यार्थी ग्रॅज्युएशन, पोस्टग्रॅज्युएशन करेपर्यंत तो 26 ते 27 वर्षाचा होऊन जातो त्यानंतर मग विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा वयाच्या 26 ते 27 वर्ष  नंतर विचार करतात, कारण त्याच्या ध्येयाबाबत सुस्पष्टता नसते. तोपर्यंत स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी वयोमर्यादा त्यांनी पार केली आहे याची जाणीव झाल्याने आपल्या प्रशासनातील संधी हुकल्याने त्यांना उदासीनता प्राप्त होते. फार वाईट वाटते. परंतु वयोमर्यादा वाढविल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्याची निवडही होईल. त्यांच्या सक्षमतेबाबतचा विचार केला तर नक्कीच ते सक्षम असतील. कारण वाढत्या वयोमानानुसार जी प्रगल्भता आली असते. ती त्यांना प्रशासनात नक्कीच उपयोगी पडेल. उपनिरीक्षक पदासाठी वयाची अट 31 ते 34 केल्यामुळे फायदा होईल., राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, बी.एस.सी., अ‍ॅग्री, एम.एस.अ‍ॅग्री, कुणी अन्य विषय घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यामुळे जी प्रगल्भता आलेली असते, तिचा त्यांना फायदा नक्कीच होणार ते जास्त समजुतदारपणे काम करतील ज्या लोकांना अडचणी येतात त्या ते संवेदनशीलपणे सोडवतील अशी आशा आहे.

4)   एस.आय.ए.एसी किंवा यशदा व बार्टी मार्फत उमेदवारांना प्रशिक्षित केले जाते तरी युपीएससी परीक्षेत आपल्या मुलांची कामगिरी अपेक्षित अशी होत नाही याची कारणे काय ?

       उत्तर - आपल्याकडील विद्यार्थी हे खूप उशिराने या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करतात, शिवाय बालपण, शाळा, कॉलेज, युनिर्व्हसिटी या अभ्यास काळातील अभ्यासाकडे विद्यार्थ्यांनी कसे पाहीले आहे, या त्यांच्या सर्वांगीण अभ्यास ज्ञानाचा कस लागतो. स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करतांना कुणा एका व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली चार सहा महिने अभ्यास केला म्हणजे पुरेसे असते असे नाही. पास किंवा नापास होणं हे त्या विद्यार्थ्याच्या अभ्यास क्षमतेवर आधारीत असतं यशदा, बार्टी एस.आय.एस.सी. यासारख्या संस्था या मात्र बोट धरुन पुढे नेऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा अभ्यास योग्य प्रकारे केला असेल,  अनुभव असेल तर अशा संस्था विद्यार्थ्यांना यशापर्यंत नेण्याचे काम नक्कीच करतात.

5)   मुलाखत म्हणजे तुमच्या मते नेमकं काय आणि मुलाखतीपर्यंत गेलेला उमेदवार हे अतिशय चांगले मनुष्यबळ आहे त्याचा योग्य वापर कसा करता येईल ?

      उत्तर - केवळ पाठांतर करणे आणि लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवणे, लिखाण करणे सिलेक्ट होणे. हा एक मुद्दा आहे. त्यानंतर मुलाखत असते ही तुमच्या व्यक्तीमत्वाची परीक्षा असते. मुलाखतीत तुमच्यावर दबाव टाकला जातो. त्या दबावाला तुम्ही बळी पडता की तो दबाव झुगारुन जे काय योग्य आहे त्याची जाणीव असून तुम्ही तेच करता या सर्व जाणीवांची ती परीक्षा असते ते तुमचं खरं कौशल्य असतं. उमेदवाराने अ‍ॅप्लीकेशन फॉर्म भरताना जे योग्य आणि खरं आहे तेच नमुद करावे. शिवाय मुलाखतीचा फॉर्म भरतांना त्याची विशेष दक्षता घेतली पाहिजे. उदा. फॉर्म मध्ये हॉबी विचारलेली आहे तर ज्याची तुम्हाला खर्‍या अर्थाने गोडी वाटते आहे. तेच योग्य पद्धतीने नमूद करावे. उदा. एकाने आपल्या फॉर्ममध्ये लिहिले होते की मला खेडेगावांना भेटी द्यायला आवडते. तेव्हा त्यास विचारले होते की आजपर्यंत तू अशा किती खेडगावांना भेटी  दिल्या आहेस यावर तो म्हणाला. फक्त मी माझ्या मामाच्या गावाला भेट दिली आहे. हे उत्तर म्हणजे निव्वळ थाप आहे. मुलाखत म्हणजे तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल किती तळमळ, त्याची किती जाणीव आहे त्याबाबत किती आपुलकी वाटते. तुम्हाला त्या विषयांची किती माहिती आहे त्याबाबत तुम्ही संवेदनशील आहता का ? याची परीक्षा म्हणजे मुलाखत असते. मुलाखतीच्या वेळेस व्यक्तीस बघताक्षणी त्याची छाप पडली पाहिजे तो काळा आहे का ? गोरा आहे स्त्री का पुरुष हे महत्वाचं नसतं.  आता मुलाखतीचे मार्क्स कमी करण्यात आलेले आहेत. पूर्वी 50 पेक्षा जास्त असायचे. मुलाखतीमध्ये अपयश आले तर त्याने आत्मपरीक्षण करुन पुन्हा तयारी करावी. नक्की पुढच्या वेळेस यशस्वी होईल. त्याच्या या Talent चा वापर नक्कीच करता येईल. परीक्षेमध्ये अपयश आले म्हणून सर्व काही संपत नाही. त्या परीक्षे व्यतिरिक्तही अनेक शासकीय आस्थापनातील स्पर्धा परीक्षांचा त्यांनी विचार केला पाहिजे. अशा स्पर्धा परीक्षा वर्षभर चालूच असतात. जवळ जवळ 200 च्या वर अशा परीक्षा असाव्यात ज्यांनी तयारी केलेली असते ती तयारी या ठिकाणी उपयोगी पडते आणि मी म्हणेल की मुलाखतीची ही तयारी करावी आणि अपयशी जरी उमेदवार झालेला असला तरी त्यांच्या मनुष्यबळाचा योग्य पद्धतीने समाजासाठी वापर करुन घेता येऊ शकतो. त्यासाठी शासनांच्या बर्‍याच योजनाही आहेत. पोलीस खात्यात पोलीस मित्र योजना राबविली जाते. याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री मित्र योजना राबविली जाते. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वमित्र योजना राबविली आहे. या अशा विविध शासकीय योजनांची माहिती घेऊन त्या लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचविली तर लोकांच प्रबोधनही होत त्यांना त्याचा फायदाही होतो. उदा. बँका त्या स्वत: सर्वत्र जाऊ शकत नाही. परंतु तिच्या विविध लोकउपयोगी योजना सामान्य लोकापर्यंत पोहचविण्यासाठी त्याचे एक्सटेन्शन ऑफीसर आहेत. काही ठेवणीतील ऑफीसर आहेत ते लोकांपर्यंत पोहचून त्याचं प्रबोधन करतात. अ‍ॅग्रीकल्चर एक्सटेन्शन ऑफीसर बि-बियाणे, कीटकनाशके विविध अवजारे यांची माहिती शेतकर्‍यांना देऊन शेती फायदेशीर होण्यासाठी मार्गदर्शन करतात. शेतीसाठी लागणार्‍या  गोष्टी ते गावात उपलब्ध करुन देतात. तसेच पोलीस प्रशासनाने सुरु केलेल्या पोलीस मित्र योजनेचे आहे. यात दोन लाखाच्यावर विविध जाती धर्मातील लोक सहभागी आहेत ते विविध मार्गाने शासनाला आणि लोकांना मदत करीत असतात. सर्व मित्र आहेत तो आपली माहिती पोलीसांमार्फत लोकापर्यंत पोहचवितो. ज्यामुळे त्याला लोक मदतीसाठी पाचारण करु शकतात. बँकाची माहिती व गुंतवणुकी संदर्भात माहिती देणारे सुद्धा आहेत. शिवाय इतर कोणतीही मदत लागली तरी ती कोणती आहे. कशी उपलब्ध होऊ शकेल याची ही माहिती पोलीस मित्र आपली रोज काम करुन त्याचे उपक्रम सांभाळून देतात. उदा. अ‍ॅक्सिडंट च्यावेळी वेळेवर मदत त्या भागात तेथील लोकांना पुरविणं, पुर आला, रेल्वे बंद असतील, ट्रॅफीक जॅम असो, मिरवणुकीचं व्यवस्थापन असो अशा विविध मार्गाने मदत पुरविता येते आणि शासनाकडे अशी ट्रेन्ड लोक असतील तर त्या मनुष्यबळाचा नक्कीच फायदा होतो. एक NGO आहे ती बेवारस डेड बॉडीज डिसपोझल करण्याचं काम करते आहे तर काही NGO पुरग्रस्तांना जेवण पुरवण्याचं काम करतात. या सर्व गोष्टी करण्यासाठी मुळातच तुमच्या मध्ये इच्छाशक्ती पाहिजे की नोकरी घर, तुमचे इतर प्रोजेक्ट सांभाळून हे करता आले पाहिजे.

6)   स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे प्रमाणीकरण कसे करावे ?

      उत्तर - स्पर्धा परीक्षेत एखादा विषय सुस्पष्टपणे मांडता आला पाहिजे. तो मुद्देसुद असला पाहिजे. अभ्यासक्रमातील विचारवंताच्या योग्य पद्धतीने अभ्यास करुन तुम्हीही स्वत: काही विचार धारा तयार करुन ती योग्य पद्धतीने सादर केली पाहिजे. दुसर्‍याने सांगितलेल्या उत्तराची पोपटपंछी जशीच्या तशी न करता स्वत:च्या originality च प्रमाणीकरण करण महत्त्वाचं असते हे उमेदवाराने प्रकर्षाने ध्यानात घेऊन विषयाची खोलामध्ये जाऊन सर्वांगीण तयारी करावी. तयारी करतांना विषयांतील गुणदोष यांचा साकल्याने विचार करुन यांबाबत आतापर्यंत काय प्रयत्न झालेले आहेत. यावर उपाय लोकांच्या पचनी पडतील का रेडीमेड विचार धारेपेक्षा विचार प्रवाहाची पद्धत सांगणे आवश्यक आहे त्यांना विचार कसा करायचा शिकवील पाहिजे. कारण विषयाला दोन बाजू असतात त्याचा विचार करुन तुम्हाला सर्वांना सामावून घेऊन काम करुन सुधारणा केल्या तर त्याचं प्रमाणीकरण होऊ शकेल. (आणि यु.पी.एस.सीत प्रथम येईल)

7)   महाराष्ट्रातील विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत प्रथम येण्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजेत ?

      उत्तर - मनापासून या परीक्षेला बसायची तीव्र तळमळ असली पाहिजे. पहिल्यापासून तुमचा जो अभ्यास विषय असेल त्याचा अभ्यास फक्त पुस्तकापुरताच मर्यादित न ठेवता उमेदवाराचं वाचन हे चौफेर असले पाहिजे आणि माझ्या मते लायब्ररीतील सर्व संदर्भ पुस्तकांचा त्यांनी फडशा पाडला पाहिजे. जेव्हा तुमचे चौफेर वाचन असेल तेव्हा तुम्हाला योग्य अयोग्य गोष्ट चांगल्या कळतात त्या तुम्हाला शब्दात मांडता आल्या पाहिजे. ज्यामुळे त्या लोकांना सांगताना योग्य पद्धतीने तुम्ही समजावू शकता, अ‍ॅक्टीव्ह नॉलेज व पॅसीव्ह नॉलेज सारखे हे असत. पॅसीव्ह नॉलेज जे तुम्ही पाहीलं, वाचल, ऐकलं ग्रहण केलं आहे ते अ‍ॅक्टीव्ह नॉलेज मध्ये म्हणजे लिहून काढता आलं पाहिजे. परंतु हे लिहतांना सर्व सिकवेन्स पसरल्यासारखं विखुरल्या सारख्या वाटतात. लिहण्याचा कंटाळा येतो. यामुळे लोकांपुढे विचार व्यक्त करतांना लोकांची वाचा बसते. कारण या गोष्टीचा लिखाणात्मक व उद्बोधनात्मक सराव नसतो. म्हणून विद्यार्थ्याला यांचा सराव शालेय जीवनापासूनच करुन दिला पाहिजे त्याला शालेय स्तरावर विविध स्कॉलरशिप परीक्षांना बसविले पाहिजे. उदा. ऑल्पींयाड, गणित स्कॉलरशिप, संस्कृत स्कॉलरशिप  या परीक्षांच्या माध्यमातून त्यांच्यात स्पर्धा परीक्षात्मक गुण विकसित होतात त्यांनी विविध अ‍ॅक्टीव्हीटी मध्ये सहभागी झाले पाहिजे. स्पोटर्स असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील. वक्तृत्व, वाद-विवाद स्पर्धा असतील यात ते सहभागी झाले पाहिजे यामुळे त्याची चौफेर तयार होईल, लिखाण्याचाही सराव केला पाहिजे ते शिक्षकांकडून तपासून घेतलं पाहिजे ज्यामुळे विद्यार्थ्याला मोजण्याच्या भाषेत मुद्देसुदपणे अभ्यास अभिव्यक्ती लिहता येईल.

8)   पोलीस खाते आणि साहित्य यांचा अन्योन्य संबंध आहे का?

       उत्तर - पोलीस खात्याचा समाजाच्या प्रत्येक अंगाशी संबंध येतो. त्यामुळे समाजातील वेगवेगळे भाव व्यक्त होत असतात.  त्यात चांगले वाईटपण असतात त्याचे पोलीस हे साक्षीदार असतात. यांच्यातील सत्य घटनांशी संबंध जोडून वास्तव परिस्थिती समाजापुढे मांडत असतात. बाबा कदम यांनी यावर आधारित अनेक कांदबर्‍या रंगवल्या आहेत. टिव्हीवरील अनेक सिरीयल आहेत. सिनेमे आहेत अर्ध सत्यासारखे सिनेमा आहे. याद्वारे समाज परिस्थितीचे वर्णन करणारे सत्स परिस्थिती दाखविणारे आहेत. त्यामुळे हे सुद्धा साहित्यच आहे. जे वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीचा विजय दाखविते. चांगल्यांना प्रोत्साहन देणे साहित्याचा गाभा आहे. आचार्य अत्रे, बा. भ. बोरकर यांनी वारंवार सांगितलेले आहे की तुम्ही का लिहा? कारण समाजातील चांगल्या गोष्टी असतील, व्यंग असतील अपप्रवृत्ती असतील त्या जेव्हा लिहता तेव्हा तुम्हाला तुमचं आयुष्य चांगलं घडविण्यासाठी मदत होते. रामायण, महाभारत, ज्ञानेश्‍वरी, असतील.  अंधश्रद्धा दूर व्हावी अज्ञान दूर व्हावं हेच उद्दिष्ट आहे याचा गाभा आहे. आजुबाजूला असणार्‍या सर्व चराचरामध्ये परमेश्‍वर आहे. हे जाणून घेऊन त्याची प्रार्थना करणे या सर्वांसोबत सुसंवाद साधायचा याने सर्वांची प्रगती होणार आहे. sustainable development   हे UNO सांगते आहे तेही साध्य होणार आहे.

9)   प्रभावी व संवेदनशील प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल.

      उत्तर - हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 25 वर्षापूर्वी कॉम्प्युटरायझेशनला सुरुवात झाली त्याला अनेकांनी विरोध केला होता. परंतु आता कॉम्प्युटराझेशनपुरता न थांबता प्रत्येकाकडील त्याचा मोबाईल हा त्याचा ऑफीस झाला  आहे. ऑफीसमध्ये काम करणार्‍या महिला असोत की इतर सामान्य महिला असो या सर्वासाठी सुरक्षिततेसाठी आम्ही प्रतिसाद हे मोबाईल अ‍ॅप सुरु केले आहे. महिला त्या अ‍ॅपवर स्वत:चा नाव, नंबर किंवा वडिलांचा, भावाचा, नवर्‍याचा नंबर रेकॉर्ड करु शकतात. त्यात रेड बटन उपलब्ध आहे. तो दाबल्यास सोशल ईमरजन्सी द्वारा तो message त्याच विभागातील गस्त घालणार्‍या पोलीस बीट मार्शल पर्यत जातो. जो बीट मार्शल तुमच्यापर्यंत येत असेल तो कन्ट्रोल रुम मध्ये दिसायला लागतो. कंन्ट्रोलमधून Navigate  केले जात आणि अमुक या ठिकाणचा बीट मार्शल घटनेच्या ठिकाणी चालला आहे. यांचा msg सर्वांना जातो व तो बीट मार्शल घटनास्थानापर्यंत पोहचला की नाही. संबंधी याची विचारणा होते व तो संबंधीत बीट मार्शल घटनेच्या ठिकाणी जाऊन संबंधीत व्यक्तीची मदत करतो. अशा प्रकारे तंत्रज्ञानाद्ववारे प्रशासन जलदगतीने त्याची काम कार्यक्षम व तत्परतेने या तंत्रज्ञानामुळे करायला लागले आहे. पोलीस मित्र या हेल्पलाईन द्वारे कोणत्याही घटनेचा व्हिडिओ, किंवा माहिती सिनिअर ऑफीसर्सपर्यंत पोहचवता येते या अ‍ॅपद्वारे जवळच्या पोलीस स्टेशनला जाणारा मार्ग, जवळच पोलीस स्टेशन कोणत किती वेळ लागतो याची माहिती ही इंटरनेटद्वारा उपलब्ध होते. हॉस्पीटलमध्ये  Dr. OPED हे app सुरु करण्यात आले,  payment get ways,     शिवाय Demonitisation  मुळे तुमचे पैसे मोबाईल द्वारे वापरता येतात. पैसा बँकेत सुरक्षित रहातात. अशा अनेक तंत्रज्ञानात्मक सुविधा ह्या दिवसेंदिवस वाढत जाणार त्याचा फायदा हा नागरिकांना होणार की ज्यामुळे प्रशासन हे प्रभावी जलद व संवेदनशील होईल.

10)  बर्‍याच विद्यार्थ्यांना वाटते की पोलीस खात्यात प्रचंड राजकीय हस्तक्षेप असतो.

        उतर - राजकीय हस्तक्षेप असतो की नसतो हा प्रश्‍नच नाही. शासकीय काम करताना अनेकांशी विचार विनिमयकरुन निर्णय घेतले जातात. उदा. एखाद्या आमदाराने सांगितले की अमुक अमुक इन्स्पेक्टरला या या ठिकाणी नेमा. ते असे का ? सांगतात कारण त्यांनी आमक्या, आमक्याकडून ऐकलेलं असतं की तो कर्तव्यदक्ष, चाणाक्ष, कार्यतत्पर अधिकारी आहे. या त्याच्या क्षमता माहिती झाल्यामुळे त्या व्यक्तीची त्या त्या ठिकाणी किंवा पोलीस स्टेशनात बदली किंवा नियुक्ती होऊ शकते. कधी कधी त्या अधिकार्‍याच्या फॅमिली प्रॉब्लममुळे, मुलांच्या शिक्षणासंदर्भात असेल किंवा त्याच्या रेप्युटेशनमुळे या सर्व गोष्टीचा विचार करता बदली केली जाते, भारतातच नव्हे तर अमेरिकेत ही अशाच प्रकारची लॉबींग करणारे अनेक असतात. तेव्हा कोणता निर्णय घ्यायचा हे त्या अधिकार्‍यावर अवलंबून असत याला हस्तक्षेप म्हणणं योग्य नाही. जेव्हा सिनियर ने दिलेल्या सूचनांच फेरविचार करुन त्याबाबत काही वेगळं ही सुचवू शकता, तुमच्या काही अडचणी असतील त्या सांगू शकता त्यामुळे हे सांगताना वाईट वाटून घेणं किंवा चांगले वाटण हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

11)  मुली पोलीस प्रशासनात यायचे टाळतात, ही मानसिकता बदलण्यासाठी काय केले पाहिजे.

       उत्तर - महाराष्ट्र शासनाने 30% महिलांसाठी जागा राखून ठेवल्या असल्या तरी आनंद वाटतो की लाखो मुली पुढे येतात त्या जागांसाठी प्रयत्न करतात. प्रवेश मिळण्यासाठी, उत्साहाने, नोकरी पाहिजे, ईच्छा आहे म्हणून येतात. पोलीस प्रशासनात येण्यासाठी त्यांनी शारीरिक क्षमतांचा विकास केला पाहिजे. मुली उत्साहाने जरी आल्यातरी त्यांना शारीरिक क्षमतेच्या बाबतीत आजार असतील, अ‍ॅनीमिया असेल, कुपोषण असेल, दम्यासारख्या व्याधी असतील. श्‍वासाचे त्रास असतील. कमजोरी असेल तर अशा मुली शारिरीक क्षमता चाचणी उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. त्या घरातील लोकही नोकरी करावी म्हणून त्यांना पाठिंबा आणि प्रेरणा देतात. त्यामुळे त्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे. आतापर्यंत जरी मुली पोेलीस खात्याकडे कमी वळत असल्या तरी आता ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.

12)  आपल्या साहित्य संपदेबद्दल आमच्या वाचकांना माहिती द्या.

        उत्तर - मानवी हक्काचं संरक्षण आणि संवर्धन हे दुरस्थ शिक्षण प्रशिक्षण प्रणालीसाठीचा वापर करुन दुरस्थ शिक्षण प्रणालीचा मॉड्युल तयार केला आहे. सांगायला आनंद होतो की यांच्या आतापर्यंत 14 आवृत्त्या निघाल्या आहेत व आजही हजारो त्याची मागणी करीत आहेत. त्यावाचून लोक त्यांच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. शिवाय माझा संशोधनाचा आवडता विषय होता- बाल कामगार. अनेक मासिकामध्ये लेख लिहीलेले आहेत. बाल कामगार ही प्रथा कमी करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, कशाप्रकारे शासकीय यंत्रणा, NGO  व इतर संस्था यांची मदत घेता येईल. यासंदर्भात माहिती तयार केलेली आहे. हे लेखन मैत्री विद्यापीठाने तसेच पुण्यातील दांडेकर या संस्थेने publish  केलेले आहे. याचा अधिकार्‍यांना फायदा होत असेलच, शिवाय मी मुलाखती ही देत असतो.www.arundhatipravindixit.com ही मिसेसची वेबसाइट आहे. तिच्यावर मी विविध विषयावर लेख देत असतो. काही मुलाखतीही अपलोड केलेल्या आहेत. अशाप्रकारे लोकांशी संवाद साधत असतो. काही संवेदनशील लेखही आहेत. उदा. महिल सुरक्षा, तुरुंगसुरक्षा इ.

13) प्रशासकीय अधिकारी भ्रष्ट्राचारी होऊ नये यासाठी कोणती पाऊले उचलली गेली पाहिजेत ?

      उत्तर - या public service मध्ये तुम्ही कोणत्याही खात्यात जा त्या ठिकाणी काम करतांना लोकांचे प्रतिनिधी सेवक या नात्याने काम करता. लोकांनी तुमच्यावर विश्‍वास ठेवलेला असतो. लोकांचा पैसा शासनात जमा असतो. लोकांनी दिलेल्या अनेक योगदानाबदल्यात तुम्ही हे काम करीत असता दुसरं तुम्ही शासनात बसता तेव्हा तुम्हाला ही काही अनुभव आलेले असतात, तुम्हाला पिडलेलं असत, नाडलेलं असत. मानसिक त्रास दिलेला असतो. तेव्हा तुम्ही अधिकारी पदावर बसल्यानंतर तसं न वागता जनसामान्याच्या सेवेसाठी तुम्हाला नेमलेलं आहे याची जाणीव असली पाहिजे. प्रत्येकाने लक्षात ठेवावे. सुरुवातीच्या काळात आपण शासनाच्या बाहेर असतो. त्यानंतर काही काळ शासनात असतो. त्यानंतर तो पुन्हा बाहेर जाणार आहे. तेव्हा त्याने हे लक्षात ठेवता स्वत:च स्वत:वर नियंत्रण ठेवलं पाहिजे केवळ नियम आहे म्हणून नियंत्रण ठेवतो आणि कुणी पहातं नसेल तेव्हा पुन्हा चुकीचं वागणं हे योग्य नाही. स्वयं शिस्त पाहिजे. भ्रष्टाचार कमी करण्याचे अनेक उपाय आहे. आज शासनाच्या बर्‍याच गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे, digitalisation झाल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे आल्यामुळे माहितीचा अधिकारांचा वापर यासारख्या  गोष्टीमुळे अधिकार्‍यावर वचक राहतो. कर्मचारी बिथरत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे. 

14)  युवा वर्ग दहशतवाद व नक्षलवाद यांसारख्या अतिरेकी प्रवृत्तींना बळी पडू नये यासाठी काय केले पाहिजे.

       उत्तर - दहशतवाद कसा रोखावा याची माझी सविस्तर मुलाखत  युटूब वर अपलोड केलेली आहे. ती तुम्ही पाहु शकता. या अप प्रवृत्त्या आहेत. लहानपणापासूनच मुलांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना वाईट मार्गाला लावत असतात. त्यामुळे पालकांनी 12 वर्षापर्यंत तरी पाल्याला जपलं पाहिजे. योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. अनेक व्यक्तींची व प्रवृत्तींची, दहशतवाद कशामुळे होतो याची जाणीव करुन दिली पाहिजे. जी लोक आपल्याला सांगतात की आपल्यावर एखाद्या गोष्टींमुळे अन्याय होतो. हे सांगणार्‍याचे हेतू व विचार यांच्यावर विश्‍वास ठेवण्याआधी आपण त्याची शहानिशा केली पाहिजे. समाजातीलही लोकांनी शहानिशा केली पाहिजे. अनेक पुस्तकांच वाचन, पठण केले पाहिजे. अनेक घटना फक्त ऐकण्यावर आधारीत असतात. त्यातील काय चांगल्या काय वाईट या विषयी जागृत भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या घटनेवर व संस्कारावर विश्‍वास ठेवणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

15) स्टडी सर्कल अभ्यास चळवळीबद्दल आपले मत ?

      स्टडी सर्कल अनेक चांगले मार्गदर्शक उपलब्ध करुन देतात. 30% शिक्षक, 40% बरोबरच्या विद्यार्थ्याचे ज्ञान व उर्वरीत स्वत:च्या आकलनाने विद्यार्थी शिकतो. या संस्थेद्वारे समविचाराचे विद्यार्थी त्याला लाभतात. योग्य मार्गदर्शन त्याला उपलब्ध होते. त्यांना विविध विषयावर बोलून विचारांची देवाण घेवाण होते. अनुभव वाढतात संपर्क वाढतात. स्टडी सर्कल ही संस्था विद्यार्थ्यांसाठी इतर संस्थांसाठी व एकंदरीत समाजासाठी पथदर्शी ठरते आहे याचा मला आनंद आहे.

16) विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल ?

       उतर - विद्यार्थ्यांनी ethically अभ्यास करावा. ही परीक्षा म्हणजे व्यक्तिमत्वाच्या विकासाची परीक्षा आहे तेव्हा तुमच्या अंगी चिकाटी, passion,consistency असायला पाहिजे. उत्तरे योग्य पद्धतीने काळजीपूर्वक निवडावीत. सर्व विषयांचा साकल्याने अभ्यास करावा व देशात प्रथम येऊन दाखवावे हाच संदेश आहे.

- मुलाखत संकलन

गणेश खराडे, संतोष गुलमर

स्टडी सर्कल

ऑफिसर तुमच्या भेटीला या सदरात पी. एस. आय योगेश देशमुख यांनी स्टडी सर्कल दादर केंन्द्राच्या विध्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेचे शिवधनुष्य कसे पेलावे यांच्या अभ्यासाचे तंत्र मंत्र सांगितला.

850;700;979b3a3dcf07d5afdb7c7c67ecf8574ceff7e5e7850;700;4a8b8c8d31a434b8e1b63ef368afb724ff83f4db850;700;5d997a956ab587dfdc22b45fc155941c4354673a850;700;6021be22060af2bccac588ca40071a25c606376d850;700;d1539b3e1dcdc1da1a406cee645670d59c999f0c850;700;17764bfa7fae0352c266fc1530f6cc5f359f57ee